शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Friday, September 9, 2022

वास्तव आणि प्रेम (भाग १)

II वास्तव व प्रेमII

लेखक : निशिकांत हारुगले.

एम. ए. बी.एड.

(सानेगुरुजी कॉलनी तील मुख्य रस्त्यापासून आतील गल्लीतील घरातील स्वयंपाक घरात शैलजा स्वयंपाक करण्यात मग्न आहे. तिचा नव्हरा जो खाजगी कंपनीत कारकून आहे तो रात्र पाळीवरून आला आहे. तो झोपलेला आहे. दिवाणखान्यात शोकेशच्या कपाटात म्युझिक सिस्टीम चालु आहे. त्यावर रिमिक्स गाणी वाजत आहेत. त्याच्या तालावर झुंबा डान्स व्यायाम करण्यात स्वप्नजा मग्न आहे. थोड्याच वेळात गॅसवर ठेवलेल्या कुकरची सिटी वाजते. शैलजा स्वप्नजेला हाक मारते.)

शेलजा,

 “ स्वप्ने ये स्वप्ने तिथं झुंबा डान्सवर माकडासारख्या उड्या मारण्यापेक्षा इथं मला जरा घरकामात मदत केलीस तर?”

(आईची हाक ऐकूण स्वप्नजा दिवाणखान्यातून स्वयंपाक खोलीत येते. तिथं चाललेली स्वयंपाकाची गडबड व आईची तारेवरली कसरत बघून ती म्हणते.)

स्वप्नजा

“ तुला मी एक्झरसाईज करत्याले पाहवत नाही का? थोड्याच लोकांचा तर स्वयंपाक आहे.”

शैलजा,

“ थोड्या लोकांचा आहे. बरोबर आहे बाळ पण मला शाळेत जायला उशीर होईल. जरा मदत केलीस तर काय तुझ्या बापाचा तोटा होणार आहे का?.”

स्वप्नजा,

“ ते मला माहित नाही पण मी बाबांना विचारते की त्यांचा काही तोटा होतोय का?”

(स्वप्नजा मोठ्याने बाबा बाबा असं ओरडू लागते. तिच्या तोंडावर भाजी चिरत्याला हात ठेवत)

शैलजा,

“ जरा काही बोललं की लागली लगेच चाड्या करायला.”

स्वप्नंजा

“ मग करायला नकोत.”

( गॅसवर सिमला मिरचीस फोडणी देत)

शैलजा,

“ घोड्यासारखी वाढलेय नुसती जरा काम नको. माझ्या शाळेतील मुली बघ लहान असून आपल्या आईस भांडी घासण्यापासून ते सडासारवण करण्यापर्यंत कामे करतात.”

स्वप्नजा ,

“ हो आज जमिनी सारवत्यात उद्या नव्हर्यांची तोंड रंगवतील शाडूच्या पोतेर्यान.”

शैलजा,

“ तुझ्यापेक्षा बर नाहीतर बारावी झाल्यावर माझं ऐकलं असतस तर चांगली डी.एड. करून शिक्षिका झाली असतीस, कुठून खूळ घेतलय डोक्यात देवास ठाव, म्हणे एम. बी. ए. करणार आहे म्हणे. बी कॉम करण्यापेक्षा शिक्षिका झाली असतीस. तर दहा ते पाच ड्युटी करून घरात आलेल बर, व चांगला संसार केला असतास.”

स्वप्नजा,

“ डोकं फिरायला नाही माझं, म्हणे दहा ते पाच ड्युटी केली असती म्हणे, तूझ्या शाळेतल्या हेडमास्तर पासून ते सर्व शिक्षकांचा वेळ शाळेतील झूरळ, उंदर व भिंतीवरील पाली मारण्यात जातो. का तर म्हणे शालेय पोषण आहारात काहीतरी सापडले व आपली नोकरी जाईल. कुणी सांगितलेय सुळावरच्या तलवारी खाली उभारायला. व एवढं शिक्षिका शिक्षिका म्हणतेस, तर जनगणना करणेत व खर्डे घासी करणेत तुमचा सगळा वेळ जातो. तुला आपला बाबा कारकुनी भेटलाय म्हणून बर, नाहीतर वाशीनाक्यावरील सदोबा आज्जा सारखा पट्टा गळ्यात घालावा लागला असता. मग बसली असतीस बगळ्यासारखी मान वरती करून.”

( जोरात सान्सी येऊन पायावर पडते. स्वप्नजा विव्हळत.)

शैलजा,

“ कारटे शिक्षकी पेशाला नावे ठेवतेस पण त्याच पैशावर मी तुला लहानाची मोठी केली. व हायस्कूल मध्ये असताना सावित्रीबाईंचे भाषण करायचीस त्या पण शिक्षिकाच होत्या.”

स्वप्नजा,

“हो पण त्यांनी कुठं मुलींना शिक्षिका व्हा अस सांगितलेय. त्या म्हणाल्या मुलींनी शिका प्रगती करा डॉक्टर व्हा, इंजिनिअर व्हा, मार्केटिंग करा,”

शैलजा,

“ मला शेंड्या लावू नकोस, त्या काळात कुठं एवढ्या डिग्र्या होत्या. व मार्केटिंग करण एवढं सोप नाहीये. खर्याच खोटं व खोट्याच खरं करावं लागत. तुला भाजी तरी विकता येईल काय?”

स्वप्नजा,

“ का नाही येणार. कालच मी भाजी विकणाऱ्या भाजीवालीला बनवलं. मागच्या आठवड्यात तिने माझ्याकडून दहा रुपये जास्त घेतले.म्हणून मी तिला वीस रुपयाची भाजी फुकटात द्यायला लावली. व मार्केटिंग करायला मी फायनान्स विभागात काम करणार आहे. मार्केटिंग नाही.”

शैलजा,

“ खरंच, आता तर तुझी कमाल झाली. बिचारी भाजीवाली तरीच ती आज काल आमच्या घराकडे फिरकत नाही.”

( शैलजा अशा गप्पा मारत कुकर मधील डाळ काढते व त्यास झणझणीत लसणाची फोडणी देते. व मस्त कोल्हापुरी सांबर तयार करते.

त्या दोघीजणी चटकन स्वयंपाक करतात. जेवण झाल्यावर शैलजा आपल्या मुलीला स्वप्नजेला सांगते.)

शैलजा,

“ स्वप्ना मी ड्युटीवर जाते. पपांना व्यवस्थित जेवण वाढ. व सगळा पसारा आटप.”

थोड्या वेळाने

(स्वप्नजा चे पपा उठतात फ्रेश होऊन अंघोळीला जातात. व आपले आवरून डायनिंग टेबलवर येतात. टेबलावर बसत असताना ते विचारतात.)

सुधाकर,

“आज कसली भाजी आहे?”

स्वप्नजा,

“ आपल्या आवडीची शिमला मिरची.”

(सुधाकर आपले तोंड वाकडे करत)

सुधाकर,

“ तुझी आई बोलून नसेना पण आपल्या कृतीतून राग व्यक्त करते, तुला एम. बी. ए. च्या एंट्रान्सला बसवलं त्याचा असा राग ती माझी नावडती भाजी करून काढते.”

(दरवाजाची बेल वाजते. स्वप्नजा आपल्या हातातील भाजीचे भांडे टेबलवर ठेवते. व दार उघडण्यास जाते. दार उघडल्यावर दारात ग्यारेजवाले मोहन काका आलेले पाहून.)

स्वप्नजा,

“ काय काका, आज ग्यारेजला सुट्टी वाटतं.”

(काका आत येत)

मोहन,

“ हो आज जरा कंटाळा आला होता. म्हणून घेतली सुट्टी.”

(मोहन आत येतो टेबलावरील जेवण पाहून)

मोहन,

“ काय सुधाकर जेवण चाललय वाटतं.”

स्वप्नजा,

“ बसा काका जेवणार काय?”

मोहन,

“ नको, नको आताच तुझ्या काकूंच्या हातचे बटाटे पोहे खाल्लेत.”

(सुधाकरकडे पाहत)

मोहन,

“काय सुधाकर शिमला मिरची वाटत.”

सुधाकर,

“ तुझ्या बहिणीने केलीया आवडीने खातोस काय?”

मोहन,

“ नको रे बाबा,”

सुधाकर,

“ मटणाची हाडक असती म्हणजे बसला असतास की विचारायच्या अगोदर. बरं, ते जाऊ दे. तुझं गॅरेज कसं चाललय.”

मोहन,

“ मस्त चाललंय, पण तुझ्या लेकीन खोललेली बुलेट काय बाबा अजुनही जोडलेली नाही.”

स्वप्नजा,

“ काका मीच जोडणार ती, मला दाखवा फक्त कस जोडायच ते.”

मोहन,

“ कधी येतेस शिकायला.”

स्वप्नजा,

“ येईन की परवा मला सुट्टी आहे ना.”

मोहन हसतच,

“ आपले चिरंजीव कुठे दिसत नाहीत.”

स्वप्नजा,

“ असणार आणखी कुठे, ग्राऊंडवर बसला असेल चेंडूला लाथा मारत. रोनाल्डो होतोय म्हणे, अभ्यासाचा नाही पत्ता पुढे चेंडू कुरतडत बस म्हणावं.”

मोहन,

“ तो काही फक्त फुटबॉलच खेळत नाही तर चांगल गॅरेज चालवेल. त्याला कमी समजू नकोस.”

स्वप्नजा,

 “ बरं बाबा तुमचं आटपा मी जरा निघते.”

सुधाकर,

“ कुणीकडे?”

स्वप्नजा,

“ शामराव विठ्ठल पत संस्था.”

मोहन,

“ थांब मी पण येणार आहे तिकडे. जाता जाता सोडतो.”

स्वप्नजा,

“ काका तुम्हाला ती बँक माहीत नाही.”

सुधाकर,

“ अरे, तुला नाही कळणार ती आपल्या मैत्रिणीकडे वैशालीकडे निघालीय. तिच्या वडिलांचं नाव शामराव असल्याने ती तिला चिडवतेय.”

लगेच मोहन,

“ म्हणजे वैशाली हिला चांदोमामा तर म्हणत नाही ना?”

(सगळे हसतात.स्वप्नजा आपल्या मैत्रिणीकडे जाते.)

…. ….. ……

(महिनाआखेर असल्याने दुपारी लवकर शैलजा घरी आली. बंगल्याच्या बाहेरील पत्र पेटीत एक पत्र मिळते.तो एक लिफाफा असतो. ते घेऊन आत येते. आतील टेबलावर ठेऊन आपली पर्स आत बेडरूम मधील तिजोरीत जाऊन ठेवते. बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होते. व बाहेरील सोफासेटवर येऊन बसते. स्वप्नजेस हाक मारत )

शैलजा,

“ स्वप्ने अग स्वप्ने जरा चहा ठेव ग.”

आतील खोलीतून रवी स्वप्नजेचा भाऊ,

“ आई ती घरात नाही आपल्या मैत्रिणीकडे वैशालिकडे गेली आहे.”

शैलजा,

“ बाळ रवी, तू तरी कर रे, मी थकलेय.”

रवी,

“ थांब आणतो.”

(रवी स्वयंपाक घरात जातो. व चहा करून आणतो.तो चहा घेत. ती त्याच्याकडे तर कधी चहाकडे पाहात.)

रवी,

 “ मस्त झालाय ना चहा.”

शैलजा,

“ हो झालाय की असा रोज चहा दिलास ना मधुमेहावरील गोळ्या चालू करायला लावशील.”

( इतक्यात बाहेर मैत्रिणीकडे भेटाय गेलेली स्वप्नजा येते. येताना बाहेरील टेबलावर ठेवलेल्या पाकीटाकडे न्याहाळून पाहते. ते फोडून वाचते. व आत नाचत येते. डिंक तिंग डिंग…असे म्युझिक तोंडाने वाजवत ती आत येते. तिला पाहून)

 शैलजा,

“ काय मरीआई अंगात आलीय वाटत.”

स्वप्नजा,

“ होय आलीया अंगात मला एडमिशन मिळाले येत्या २४ तारखेला मुलाखात आहे.”

शैलजा,

“ मग त्यात काय एवढं नवल वाटण्यासारखे आहे.”

स्वप्नजा,

“ तुलां नाही कळायचं ते. मला हवं ते कॉलेज मिळाले.पुण्याचं.”

(स्वप्नजा निवडलेल्या कॉलेजमध्ये आपल्या वडिलांबरोबर जाऊन एडमिशन घेते. व तिथे हॉस्टेलवर न राहता एक छोटी रूम तेथील जवळील वस्तीत भाड्याने घेते. व तिथेच तिची ओळख बेळगावच्या व साताऱ्याच्या एका मुलीशी होते. त्या तिघी एकत्र राहायचे ठरवतात. व ती कोल्हापूरला येते.)

(एम. बी. ए. पहिलं सेमीस्टर सुरू होते. स्वप्नजा कॉलेजला जाण्यासाठी आपली बॅग भरते. सर्व साहित्य बॅग मध्ये भरण्यास तिची आई शैलजा मदत करत असते.)

स्वप्नजा,

“ ए बाई उगाचच काय बाय भरू नकोस.”

शैलजा,

“ तू शांत बस चार पाच वेळा खाणारी तू, तिथं काय घरच्या सारखं खायला मिळणार आहे. मुलींना पण देत जा. आपल्याच भागातील आहेत ना.”

स्वप्नजा,

“ तुझ एवढं सगळ ओझं घेऊन गेलो तर मला खादाड कोंबडी म्हणतील.”

शैलजा,

“ म्हणेनात त्यांचं खातेस. माझ्या पैशाचं खातेस. आपल्या कोल्हापूर सारखं जेवण कुठे मिळायच नाही. मला खात्री आहे. ह्या पंधरा दिवसात संपवून फोन करून पुन्हा मागवसिल. आणखी हो काही लागलं तर आपल्या सदूमामाकडे माग तो देईल. व त्याच्याकडे वरचेवर जात जा.म्हणजे तुला देखील बर वाटेल.”

स्वप्नजा,

“ हे बघ मी काय त्याच्याकडे सारखं जाणार नाही. त्याची बायको माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघते. व उट सुट माझ्या लग्नाचा विषय काढते.”

शैलजा,

“ हे बघ परक्या शहरात तोच तुझा सख्खा आहे. व झालीच तर त्याचीच मदत होईल.”

स्वप्नजा,

“ त्याची काळजी करू नको. मी त्याची तयारी केली आहे. माझे मित्र आहेत तिथे. व मैत्रिणीपण आहेत. लग्न झालेल्या.”

शैलजा,

“तरी देखील काळजी वाटते. पपांनी दिलेल्या फोन वरून संपर्क करत जा. मी ही करत जाईन.”

स्वप्नजा,

“ हो ग माझी आई करत जाईन.”

…. ….. …..

(दुसऱ्या दिवशी सकाळी स्वप्नजा आपल्या आईकडून दही साखरेची चीमट हातात घेऊन खाते. व नमस्कार करून)

शैलजा,

“सुखी राहा.” असा आशीर्वाद देते.

 आपल्या वडीलांसमवेत व मोहन काका बरोबर कोल्हापूर बसस्ट्यांडवर पुणे स्वारगेट बस धरते. तिचे वडील सुधाकर ही बरोबर आहेत. मोहन काका बस मध्ये बसवून निघुन जातात.

पुण्यास आल्यावर स्वारगेटला उतरून रिक्षाद्वारे आपल्या ठरवलेल्या रूमवर येतात.

तिथे साहित्य ठेऊन सदामामाला जाऊन भेटून पुन्हा रूमवर येतात.तिच्या इतर मैत्रिनी सुद्धा आलेल्या असतात. गावी येण्यापूर्वी तिचे वडील तिच्या मोबाईलमध्ये सिमकार्ड घालून देतात. तसेच खर्चाला काही रुपये देतात. व कोल्हापूरला यायला निघतात. आपल्या नवीन मैत्रिनींसंगे रूमवरील साहित्य नीट लावते. त्या दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायचं ठरवतात. .त्या तिघी कोल्हापूर सातारा भागातील असल्याने खुश असतात.)

…. ….. ….. …..

(दुसऱ्या दिवशी स्वप्नजा उठते. रूमवर गरम पाण्याची व्यवस्था नसल्याने बाथरूम मध्ये जाऊन थंडगार पाण्याने अंघोळ करते. थोडावेळ हुडहुडी भरते. नंतर ती अशी काय बादली ओतून घेते की दणक्यात तिची अंघोळ होते. तिथे जाताना आपल्या मनासी.)

स्वप्न जा,

“बापरे थंड पाणी कस वाटते. गारगार हुडहुडी नुसती. चला आता काय सवय व्हायला हवी.”

ती अंघोळ करते. व आपली कपडे चेंज करून आत येते. तिच्या मैत्रिणी हसतच)

मधुजा,

“काय कशी काय वाटली अंघोळ , गरम गरम पाणी कस लागतंय मुळामुठेचं.”

स्वप्नजा,

“ कस म्हणजे बाकीच्या नद्या सारखं गारेगार.”

(त्या एकत्रित चहा बनवतात. व घेतात. व कॉलेजचा पाहिला दिवस असलेने त्या निघतात. स्वप्नजा आपल्या आवडीचा भगवा पंजाबी ड्रेस घालून कॉलेजला एक वही घेऊन आपल्या पर्स मध्ये घालून जाते. बाकीच्या मैत्रिणी काही खरेदीसाठी मागे राहतात.ती कॉलेज मध्ये प्रवेश करते. कॉलेज मध्ये आल्यावर तिला बागेच्या पुढे असणाऱ्या व्हरांड्यात तिन तरुण मुले दिसतात. ती तिच्याकडे पाहून कुजबुजत असतात. त्यात एक अमोघ ,दुसरा रोहित, तिसरा संजय)

अमोघ,

“कोण आहे रे ही दिसायला स्मार्ट आहे. पण पेहराव पहिला की साधी वाटते.”

रोहित,

“ अरे ती होय आठवलं कोल्हापूरची आहे. मुलाखतीला माझ्या पुढे होती. हुशार आहे.”

अमोघ,

“ हा मग ही अंबाबाई आहे तर.थांब हीची थोडी गंमत करूया.”

(कॉलेजच्या मोठ्या इमारतीत आपला वर्ग शोधायचा या विचारात स्वप्नजा या त्रिकुटाचा समोर येते. या त्रिकुटाला पाहिल्यावर ती विचार करते. की यांना विचारावे का? या विचारात ती पटकन त्यांच्या पुढे येते. व विचारते.

स्वप्नजा,

“ एम. बी. ए. च्या पाहिल्या सेमीस्टर चा क्लास कुठे आहे?”

अमोघ,

“ एम. बी. ए. क्लास फर्स्ट सेमीस्टर ना. या व्हरांड्यात पुढे जावा मागील बाजूच्या इमारतीत खालच्या बाजूस आहे.”

स्वप्नजा,

“आभारी आहे.”

(ती निघून जाते.)

(त्यानी सांगितलेल्या बाजूने ती इमारतीच्या मागील बाजूस विभागातील बिल्डिंग मध्ये आल्यावर तिला तिथे मुलांची कपडे उनात घातलेली दिसतात. व तेथील सामूहिक कपडे धुण्याच्या जागेत मुले एकमेकावर पाणी उडवत असतात. तिला पाहून ते लपतात. ते फक्त निकरवर असतात.ती तिच्याकडे पाहतात .तिचं लक्ष जाते. वरील बाजूस पाटी असते. बॉईज हॉस्टेल ती तिच्याकडे टक्कामक्का पाहू लागतात. त्यांच्या त्या नजरा पाहून ती )

स्वप्नजा,

“ सॉरी माफ करा मी चुकुन इथे आले.”

 (व ती वेगानं मागे वळते व निघते. तेव्हा ती मुले सिटी वाजवतात. तेव्हा)

 स्वप्नजा,

“ ए माकडांनो गप्प बसा.”

( स्वप्नजा चटकन बिल्डिंगच्या व्हरांड्यात पुन्हा येते.तिला गडबडीने येताना पाहून अमोघ आपल्या मित्रांना म्हणतो.

“ पाहा आता अंबाबाईचा रंग उडालेला चेहरा.”

(थोड्याच वेळात स्वप्नजा त्या त्रिकुटाच्या समोर येते. तिच्याकडे पाहत )

संजय,

“काय मिळाला का? एम. बी. ए. चा क्लास.”

स्वप्नजा,

“एम. बी. ए. चा नाही पण बेलट्याने अंघोळ करणारी माकड पाहिली. व यात आश्चर्य करण्यासारखं काय आहे. अशा प्रकारे अंघोळ करणारी कित्येक मुले मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी नृर्सिंहवाडीला कृष्णेत उड्या टाकताना पाहते.”

(ते तिघे तिच्याकडे पाहत असतात. त्यानं जवळून ती थेट कॉलेजच्या शिपायाकडे जाते. त्याला विचारून ती क्लासकडे जाते. नवीन प्रवेश करणारे अनेक मित्र बनतात.

सुचित्रा मूळची बेळगावची पण तिचे वडील सर्विसला पुण्याला असल्याने ती येथे स्थाईक झाली होती. तिला पुण्याची भरपूर माहिती होती ती सुट्टीला बेळगावला जायची. त्यामुळे तिकडील ही बरीच माहिती होती. तिची व स्वप्नजाची मैत्री जमते. कराडची मधूजा व सातारची गायत्री या ही तिच्या मैत्रिणी होतात.पाहिल्या दिवशी कॉलेज वर अनेक मित्र बनतात. एक दोन लेक्चर झाल्यावर. ती कॉलेज सुटल्यावर आपल्या मैत्रिणीसंगे ती निघते. तेव्हा तिला कॉलेजच्या पायऱ्यांवर उभा असलेला अमोघ दिसतो. तो मित्रांत बढाया मारत असतो. त्याच्यापासून पुढे गेल्यावर स्वप्नजा सुचित्रेला विचारते.)

स्वप्नजा,

“ सूचित्रे हे त्रिकुट कोण.”

सुचित्रा,

“ ए बाई त्याचं एवढं नाव नको. ती मोठ्या बापाची बिघडलेली कारटी आहेत. त्यात तो देखणा गहुवर्णी उंच आहे ना? तो अमोघ, खूप मालदार पार्टी आहे. त्यांचे मोठमोठे कारखाने आहेत. त्याला काय शिकायची गरज. मालदार पार्टी. फक्त दाखवायला डिग्री हवी बस. म्हणून शिकतोय. त्यांचे अनेक कारखाने पुणे, सातारा, बेळगावला आहेत. रोज नव्या गाड्या काय, रोज एक नवीन स्टंटबाजी करत असतो. महागडे ड्रेस, नव्या मैत्रिणी काय सांगू नकोस. लई हवेतच असतो.आपल्याला हॉलिवूडचा हिरोच समजतो.”

स्वप्नजा,

“ बरं तो दुसरा मापटा कोण?”

सुचित्रा,

“ तो होय संजय तो ही मालदार आहे. त्याच्या बापाची मोठ मोठी पाच कपड्याची दुकाने आहेत. अन् त्याच एक गुपित सांगू. तो आपल्या क्लास मधील मुग्धावर लाईन मारतो.”

स्वप्नजा,

“ ती मगाशी भेटलेली.”

सुचित्रा,

“ हो तिचं नखरे करणारी.”

स्वप्नजा,

 “ती नकटी. तिच्यात काय पाहिलं यानं. हा तरी कुठे राजकुमार आहे म्हणा. बरं तो तिसरा कोण?”

सुचित्रा,

“ तो होय रोहित त्याचे बाबा इंजिनिअर आहेत. व आई प्राध्यापक आहे. एकुलता एक मग काय सगळा पैशाचा खेळ. पण यांपासून लांबच राहिलेलं बरं. कारण हे अभ्यास सोडून सगळे उपद्व्याप करत असतात.”

( अशा चर्चा करत त्या निघून जातात.)

… … … …. ….

( कॉलेज सुरू होऊन महिना होतो. स्वप्नजाच्या अनेक मैत्रिणी होतात.कॉलेजची चांगली पारख होते. कॉलेज मध्ये चांगली रमते. एके दिवशी कॉलेजला जाताना सुचित्रा व स्वप्नजा गप्पा मारत निघालेल्या असतात. स्वप्नजेचे टेरेसच्या दिशेने लक्ष जाते कॉलेजच्या जिन्याच्या वरील भागात टेरेसच्या कट्ट्यावर टाकी शेजारी कट्ट्यावर अमोघ त्याच्या मित्रांसंगे बसलेला दिसतो. स्वप्नजा सुचित्रेला विचारते.)

स्वप्नजा,

“ सुचित्रा हे त्रिकूट इथे काय करतेय.”

सुचित्रा,

“आणखी काय टाईम पास वर्गात कधीतरीच दिसतात ती पोर्णिमेच्या चंद्रावाणी, पूर्वीपासून या कॉलेजचे विदयार्थी असलेने त्याचं चांगलंच फावलय. तो शिपाई संध्याकाळी जाताना गेट बंद करण्यासाठी कितीतरी वेळा ओरडत असतो. ही माकड काय खाली यायचं नावच घेत नाहीत.काय तिथे खजाना हाय कोण जाणे.”

(कॉलेज मधील तासिका होतात. स्वप्नजा संध्याकाळ झाल्यावर तास संपल्यावर निघते. निघताना तिच्यासोबत कराडची मधुजा असते. कॉलेज समोरील रोडवरून त्या मार्केट मध्ये येतात. स्वप्नजेस काहीतरी खरेदी करावयाची असते.)

स्वप्नजा,

“ चल थोडी खरेदी करूया.”

मधूजा,

“ काय घेणार आहेस?”

स्वप्नजा,

“ थोड नास्ट्याच साहित्य व एक पाना हवाय. जो माझ्या ब्यागेच्या खालील बोल्ट अवळायचाय रूम वरील एका बयेन रात्रीची लाईट लावायला जाताना बॅग पाडली.त्याची खालची पट्टी निखळली आहे. ती आवळायची आहे.”

( त्या दोघी बाजारातून फिरतात. व साहित्य खरेदी करत एका साहित्याच्या दुकानात जातात.स्वप्नजा तिथं बोल्ट दाखवत.)

स्वप्नजा,

“ या बोल्टाचे मापाचा पाना आहे काय?”

(दुकानदार बोल्ट न्याहाळत. मागे जाऊन पाना आणून देतो. व काही बोल्ट ही घेते. बिल पेड करताना तिचे लक्ष बाजूच्या भिंतीवरील कुलपाकडे जाते. ती त्या दुकानदारास भाव कुलपाचा विचारते.)

स्वप्नजा,

“ अहो काका या कुलपाचा भाव काय?”

दुकानदार,

“ पंचवीस रुपये.”

स्वप्नजा,

 “ व ते मोठे.”

दुकानदार,

“ पन्नास रुपये.”

स्वप्नजा,

 “ ही दोन कुलपे घेते. लहान आहेत जी चाळीस रुपयाला दोन द्या की.”

(दुकानदार ती दोन कुलपे देतो. त्या दुकानातून बाहेर पडतात.)

बाहेर येताना मधूजा,

“ मेकॅनिकल व्हायचा बेत आहे का? पाना म्हणता म्हणता बोल्ट व कुलूप ही घेतलेस.”

स्वप्नजा,

“ काय करणार बॅग एका बयें पाडली. व रूमवरिल बाथरूमच् दार ही जरा निखळलय. घर मालकाला बोललो पण तो काय मनावर घ्यायला तयार नाही. काय करेल बिचारा आर्थिक तंगी आहे त्याची. मग आम्हीच मुलींनी ठरवल की आपणच दार नीट करायचं.”

( शेवटी किळकोळ खरेदी करून त्या निघाल्या.)

….. ….. …… …..

(दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये. कॉलेज मधील दुसऱ्या शाखेचे विद्यार्थ्यांची परीक्षा असलेने त्यांच्या क्लासची लेक्चर संध्याकाळी असतात. बाकीची मुले लेक्चरला असतात. अमोघ व त्याचे मित्र बाहेर जिन्यावर असतात. स्वप्नजा व तिच्या मैत्रिणी जाताना पाहून)

संजय,

“ अरे, ती बघ कोल्हापूरची आपण तिला फसवल होत ती.”

अमोघ,

“ ए अंब्बाबाई.”

स्वप्नजा तेथून गप्प जाते.ते हसत खिदळत असतात.

संजय,

“ चल जाऊ क्लास मध्ये.”

रोहित,

“ नको रे त्या विसरभोळे प्राध्यापकांच लेक्चर म्हटल की बोर वाटत. त्या पेक्षा आपण टेरेसवर जाऊया चल.”

(ते तिघे टेरेसवर जातात. थोड्या वेळानं क्लास संपतो. सर्व मुले निघतात. स्वप्नजा मुद्दाम मागे राहते. व सर्व मुले गेल्याचे पाहून हळूच जिन्याच दार बंद करून कुलूप लावते. कॉलेजचा शिपाही देखील दिवसभराच्या थकव्यान दरवाजे गडबडीत बंद करून निघतो.)

(थोड्या वेळाने सामसूम जाणवल्यावर हे तिघे खाली यायला निघतात. जिन्यावरून खाली येतात. त्यांना टेरेसचे दार बंद दिसते. ते ओरडू लागतात.)

अमोघ,

“ ए दार कुणी बंद केलं. अरेच्या सदा गेला काय बघ.आम्हाला इथेच अडकवून.”

संजय,

 “ काय करायचं आता, रात्रीच आठ वाजलेत. लेक्चर पण संपले. कोणच नाही वाटत.”

रोहित,

“ तरी मी नको म्हणत होतो.”

अमोघ,

“ ए रडूबाई गप बस गणू शिपायाला हाक मार.”

संजू,

 “ तो रजेवर आहे.”

रोहित,

 “ त्याला पण आजच फावल वाटत.”

 संजू,

“ फोन लाव घरी कोण तरी येईल.”

अमोघ,

“ घरी फोन करून काय सांगतोस. आपण टेरेसवर अडकलोय. मग पुढिल चौकशी चालू होईल. क्लास सोडून वर काय करायला गेला होता म्हणून.”

संजय,

 “ मग आता काय करायचं.”

अमोघ,

“चला वरती जाऊ. बघू टेरेसवर कुठे मार्ग भेटतो काय ते.”

( ते तिघे टेरेसवर जातात सगळीकडे फिरून पाहतात. कुठून रस्ता नसलेने. ते इकडे तिकडे पाहतात. त्यांना कॉलेजच्या भिंतीलगत असलेले नारळीचे झाड दिसते. ते टेरेसला लागून असते. तेच एकमेव आधार असते.)

रोहित,

“ या झाडावरून उतरायला येईल काय रे.”

संजय,

“ ए बाबा साधं विकत घेतलेल्या शहाळ्याचे पाणी पिणारे आपण जमेल काय नाहीतर हॉस्पिटलमध्ये पार्सल अन गुडघे गळ्यात पडतील.”

अमोघ,

“ त्या सदाला दाखवतो उद्या टेरेसला कुलूप लावयच?”

रोहित,

“ अरे त्या नळ्यावरून उतरता येईल काय बघ.”

अमोघ,

“लेका, तो नळा केवढा , तू केवढा जाशील नळ्यासकट लिफ्ट सारखा घुमत. तुझा आकार पाहिलास काय कसा भोपळ्यासारखा झालाय ते.”

संजय,

“ हे बघा मी वैष्णला फोन लावतो.”

(अमोघ वैष्णवला फोन लावतो.)

अमोघ,

“ हॅलो, वैष्णव अरे आम्ही टेरेसवर अडकलोय रे. तेव्हा जरा मदत कर.”

वैष्णव,

“ कुठल्या टेरेसवर.”

अमोघ,

कुठल्या म्हणजे कॉलेजच्या टेरेसवर. तो सदा कुलूप लावून गेलाय. लेकाच्यान आम्हाला बघितलं पण नाही. रोज हाक मारणारा आज कसा काय गेला कुणास ठाऊक.”

वैष्णव,

“ तुम्ही कशाला गेला होता तिथे.”

अमोघ,

“ तू आता बायोग्राफी विचारणार की मदत करणार ते सांग.”

वैष्णव,

“ बघतो प्रयत्न करतो.”

अमोघ,

“ अरे बाबा कर लवकर नाहीतर इथं चीलटांच व डासांच जेवण होऊ आम्ही.”

( अमोघ फोन ठेवतो. इकडे डास चावायला लागतात.)

संजू,

“ बाबा, काय करू आता मला डेंग्यू झाला तर. केवढे मोठे हे डास.”

रोहित,

“ या कॉलेजच्या संस्थापकाला हीच जागा मिळाली काय शाळा बांधायला.नाल्याजवळ. “

( थोड्या वेळानं डास जसे चावतील तसा त्यांचा डान्स सुरू होतो. इकडे वैष्णव सदा शिपायकडे जातो. त्याला सर्व माहिती देतो. पण सदा तयार होत नसतो.)

वैष्णव,

“ सदादादा तेवढं कुलूप काढ.”

सदा,

“ बर झालं, बसुदेत रात्रभर, नाहीतर रोज घसा फाटस्तोपर्यंत ओरडलो तरी खाली येत नाहीत. आता बसा म्हणावं रात्रभर डास मारत.”

वैष्णव,

“ हे बघ उद्या काय जर झाल तर कॉलेजची बदनामी होईल. व तुझी नोकरी जाईल. माझं एवढं काम कर तुला हॉटेलला जेवण देतो.”

सदा,

“ आधी जेवण दे. मग बघू. तुमचा काही भरवसा नाही.”

( वैष्णव हॉटेल मध्ये नेऊन सदाला जेवण देतो.चांगल पोट फुगेतोवर तो जेवतो मग रात्रीचे दहा वाजता ते कॉलेज वर येतात. सदा सर्व दारांची कुलूप काढून टेरेस जवळ येतो. बरोबर वैष्णव आहे. ते तिघे दाराजवळ येतात. सदाकडे डोळे वटारून)

अमोघ,

“तुला काय पगार जास्त झाला काय रे. आम्हाला कोंडून गेलास तो.”

सदा,

“ हे बघ अम्या सरळ बोलायचं.एक तर रात्रीच तुला सोडवायला आलोय व जर लई टिवटिव करशील तर परत जाईन. मग बस चीलट मारत.”

रोहित,

“ कुलूप तूच लावलस व आम्हाला बोलतोस व्हय रे.”

सदा,

“ ए एडपट कुलूप बघ आधी संस्थेत कधी असलं कुलूप तरी आहे काय. सगळी गोद्रेजची कुलप आहेत. हे दुसऱ्या कुणीतरी लावलय. मी मगाशी गडबडीत गेलतो. तेव्हा नाही लक्षात आलं.”

( सर्वजण सदाच्या हातच्या किल्ल्या व कुलूप न्याहाळतात.)

संजय,

“ तूच लावलं असशील.”

सदा, “हे बघ लावायच असत तर चांगल मोठ कुलूप लावल असत. हे कुलूप मी लावलेलं नाही.”

अमोघ,

“मग आता काय करायचं.”

सदा,

“ काय करायचं म्हणजे तोडायचं.”

(सदा वैष्णवला दगड मिळतो काय बघायला सांगतो. पण त्याला तिथे आसपास मिळत नाही. शेवटी तो सदा जवळ येतो. सदा विचार करून इमारतीच्या मागे जिमखाण्यात जाऊन लोखंडी रॉड आणतो व ते कुलूप तोडतो. त्यांना बाहेर काढून पुन्हा कॉलेज बंद करतो. ते सगळे बाहेर येतात.)

अमोघ,

 “ हे बघ ही घटना तुझ्यात व आमच्यात कुठे बोलू नकोस.”

( अमोघ त्याच्या खिशात पैसे ठेवतो. व ते निघतात.)

…. …. …. …. ….

दोन दिवसांनी कॉलेजमध्ये बाहेरील कट्ट्यावर बसून ते तिघे विचार करत असतात.

अमोघ,

“ कोण रे असेल कुलूप लावणारं.”

रोहित,

“पाहायला हवा गुप्त शत्रू कोण ते?”

( इतक्यात तेथून सुचित्रा व स्वप्नजा जाताना पाहून.)

अमोघ,

“ ए अंबाबाई.”

स्वप्नजा सुचित्रेस उद्देशून,

“ सूचित्रे बॉईज हॉस्टेलपेक्षा टेरेस वरील रात्र मस्त जात असेल ती ही डासांच्या सहवासात.”

(तिचे हे बोलणे ते आश्चर्याने पाहतात.)

स्वप्नजा,

“ मित्रांच्या संगतीने टेरेसवरवर अडकलो डासांच्या सहवासात असा कसा दंगलो.”

(अशा ओळी गुणगुणत ती जाते. सुचित्राच्या लक्षात ते येत नाही.)

अमोघ,

“ अरे, ही अंबाबाई तर पोचलेली निघाली.”

रोहित,

“ आता हिला सोडायचं नाही.”

अमोघ,

“ तिला पण असेच कुठेतरी कोंडायचे की तिथून ती निसटणारच नाही.”

… …. ….. ….

( स्वप्नजा आपल्या मैत्रिणीच्या मदतीने बाथरूमचे दार बसवते. व बाथरूमच्या दाराचा प्रश्न सोडवते. मुली या नंतर बटाटेपोहे करून खातात. व कॉलेजमध्ये आपले आटोपून जातात. कॉलेजच्या तासिका चालू होतात. रात्रीच्या जागरणामुळे व सकाळच्या कामामुळे तिला झोप येऊ लागते. ती प्राध्यापकांची परवानगी घेऊन तोंड धुण्यासाठी आपल्या बाकावरुन उठते. व लेडीज बाथरूममध्ये जाते. व फेस वॉश करते. ते करताना अचानक दरवाजा बंद होतो. तिला वाटते. की वाऱ्याने बंद झाला असेल. असा विचार करते. व आपले तोंड पर्स मधील रुमालाने ती पुसून घेते. व आपले आवरून दरवाजाकडे येते. व दरवाजा उघडू लागते. पण दरवाजा बाहेरून बंद असल्याचे जाणवते. बाहेर आवाज येत असतो. त्यावरून समजते. की बाहेर संजय व रोहित असल्याचे ओळखते. ते दोघे कुलूप लावत आहेत. याची खात्री झाल्याने जोरदार लात ती दरवाजावर मारते.)

रोहित,

“आता बस आत तासभर.”

स्वप्नजा घाबरते. पण थोड्या वेळाने धीर गंभीर मुद्रेने आत मध्ये जाऊन दुसरीकडून बाहेर जाणेचा रस्ता शोधतो. सगळीकडून बंधिस्त असणाऱ्या त्या बाथरूम मध्ये फक्त एकच प्रकाशाचा झोत होता तो ही टॉयलेट खिडकीतून. त्याकडे पाहत.

स्वप्नजा,

“ यातून साधं कुत्र्याच पिल्लुही जाणार नाही.”.

ती मागे फिरते. पुन्हा दरवाजाकडे जाते. त्याची कडी तपासत. आतील व बाहेरील कडीला एकच गुंफण असते. त्याचे बोल्ट आतील बाजूस आहेत. हे तिच्या लक्षात येते. ती लगेच तिची पर्स उघडते. व तपासते. पहिल्यांदा तिला नीलकट्टर लागते. त्याला बाजूस सारत पुढे तपासत. तिला पुन्हा एक पुडी लागते. त्यात चटणीचा बुक्का असतो. जो तिच्या आईने ठेवलेला असतो. स्वरक्षणासाठी. पुढे तपासताना तिला एक छोटा पाना लागतो. जो लहान असतो. जो तिने बॅग अवळनेसाठी घेतलेला असतो. ती त्याचा वापर करू लागते. पहिल्यांदा ती कडीच्या खालचे बोल्ट काढू लागते. ते बसत नसतात. मग कडीचे बोल्टांना लावून पाहते. त्याला ते बसल्यावर ती बोल्ट काढू लागते. सुरवातीस त्रास होतो. नंतर तिला ते शक्य होते. व ती दरवाजा उघडते. या दरम्यान मधली सुट्टी झाली मुली बाथरूम जवळ जमतात त्याला बाहेरून कुलूप पाहून त्या शिपायाला बोलावतात. तो तिथे येइपर्यंत. ते कुलूप निखळून कोयंडा पडतो. व बाहेर येते. ती खूप घामावलेली असते. बाकीच्या मुली तिला बाकावर बसून पाणी पाजतात. )

( शिपाही तक्रार सांगतो. प्राचार्य बोलावून चौकशी करतात.)

प्राचार्य केबिन

प्राचार्य,

“ बाळ तुला माहीत आहे का हे कोणी केलं असेल.”

स्वप्नजा,

“ नाही, मी इथे नवीन आहे. कुणीतरी चुकून कडी घातली असेल.”

प्राचार्य,

“ बाळ कडी नुसती नव्हती तर कुलूप ही होत.”

स्वप्नजा,

“ माझ इथे कुणी शत्रू नाही. व असेल कुणीतरी चुकून घातलं.”

प्राचार्य, शिपायाकडे पहात

“ पप्रायवशमुळे तिथे सीसीटिव्ही नाहीये. याचा कुणीतरी गैरफायदा घेतेय. मोहन लक्ष ठेव. उगाच कॉलेजची बदनामी नको.”

(स्वप्नजा व तिच्या मैत्रिणी तेथून जातात.)

प्राचार्य सर्व मुलांना नोटीस पाठवून बोलून सूचना देतात. व कडकं समज देतात. तिघे तिथे शांत उभे असतात.

तिथून पुढे काही दिवस शांततेनं जातात. पण स्वप्नजेच्या मनात राग असतो. ती बदला घ्यायचं ठरवते.

…. ….. …… …

(कॉलेज कॅन्टीन मध्ये स्वप्नजा मधूजा व सुचित्रा एकत्र चहाचा आस्वाद घेत गप्पा मारत असतात. आजूबाजूला अनेकजण नाष्टा घेत असतात. इतक्यात तिथे अमोघ आपल्या मित्रांबरोबर येतो. तेथील एका टेबलजवळ चेअरवर बसत ते पोऱ्याला बोलावतात. व ऑर्डर देतात.)

अमोघ,

“ ए इकडे ये.”

पोऱ्या,

“ काय आणू साहेब.”

संजू,

“ नास्ष्ट्याला काय आहे.”

पोऱ्या,

“ मिसळ पाव, शीरा, उपिट, इडली, वगैरे,”

अमोघ,

“ तीन मिसळ व कॉफी आण.”

( तो मुलगा पोऱ्या आत जाऊन मिसळपाव घेऊन येतो. मिसळ थंड पाहून रोहित चिडतो. व कानाखाली मारतो.)

रोहित,

“ ए रात्रीची आणलीस काय. थंड पैसे घेता तर चांगल घाला लोकांना खायला.”

अमोघ,

“अरे, गडबडीत आणली असेल.समजून घे.”

( तो मुलगा आत जातो. सर्व प्लेट घेऊन. मधूजा व स्वप्नजा ते पहात असते. स्वप्नजा उठून बाहेर जाऊ लागते. तेव्हा मधूजा)

मधूजा,

“ काय ग का निघालीस.”

स्वप्नजा,

“ थोड काम आहे पलीकडील मेडिकल मधून जरा पित्त शामक औषध घेऊन येते.”

मधूजा,

“ बर, लवकर ये. मी ऑर्डर देते.”

( स्वप्नजा बाहेर जाऊन येते. व मधूजाने सांगितलेली ऑर्डर तोंपर्यंत येते. त्या दोघी नाष्टा करतात. त्यांच्यापुढे तो मागचा मुलगा गरमागरम मिसळ घेऊन अमोघच्या टेबलकडे जातो. व त्यापुढे ठेवत.)

पोऱ्या,

“ घ्या साहेब तुमची ऑर्डर गरम मिसळीची.”

( अमोघ व त्याचे मित्र मिसळपाव खातात. थोड्या वेळाने कॉफी देखील येते. ती घेतात. तो पोऱ्या स्वप्नजा जवळून जाताना तिला इशारा करतो. काम फत्ते. ते तिघे निघून जातात.)

(थोड्या वेळाने बील घेऊन तो मुलगा स्वप्नजा जवळ येतो. व तिच्याकडे ती लहान बाटली देतो. स्वप्नजा हळू आवाजात.)

स्वप्नजा,

“ कुणाला कळलं नाही ना.”

पोऱ्या,

 “ कुणाच्या बापलांपण कळणार नाही.”

स्वप्नजा,

“ सगळ राहू देत. आधी ती भांडी घासून टाक. नाहीतर तुझ्या अंगलट येईल.”

पोऱ्या,

“ भांडी घासायला बाई आलेय. आतापर्यंत झाली असतील स्वच्छ.”

स्वप्नजा,

“ हे बील घे. व जा आता.”

पोऱ्या,

 “ ठीक आहे.”

( स्वप्नजा व तिच्या मैत्रिणी नष्टा करून निघतात. व तासिकेस जातात.)

क्लासमध्ये लेक्चर सुरू आहे. अमोघच्या पोटात गुड गुड वाजु लागते. तो सरांना

अमोघ,

“ सर, मी बाथरूमला जाऊन येऊ का?”

सर,

“ ठीक आहे.”

अमोघ निघून जातो. थोड्या वेळाने

संजू पण तेच सांगतो. व जातो. नंतर रोहित ही विचारतो.

सर,

“ हे बघ रोहित तुम्हा तिघांना मी चांगल ओळखतो. तुम्हाला करायचं ते करा. तू ही जाऊ शकतोस.”

रोहित पायावर पाय घासत निघून जातो.

स्वप्नजा हसत असते.

सुचित्रा,

“ स्वप्ने ही काय भानगड आहे.”

स्वप्नजा,

“ काही नाही ग, त्यांनी मला बाथरूम दाखवले. मी त्यांना टॉयलेट दाखवले एवढंच.”

( अमोघ व त्याचे मित्र टॉयलेटला जाऊन इतके घाईला येतात की त्यांना सलाईन लावायची पाळी येते.त्याना हॉस्पिटल मध्ये अडमिट केले जाते.)

हॉस्पिटल मध्ये एक वार्ड तिघे तेथील खाटेवर झोपलेले आहेत. सलाईन लावले आहे. नर्स तिथे चेकपला येते.

नर्स, ( चेकअप करत)

“ पचत नाही तर कशाला खावं. आता झाली ना पंचाईत.”

( ते कण्हत असतात. व एकमेकाला बोलतात.)

अमोघ,

“ ती मिसळच जड लागली असणार.”

रोहित,

“ त्या क्यांटींग वाल्याला दाखवतोच.”

संजय,

“ जरा यातून बाहेर पडूया रे. मग बघू.”

( इतक्यात एक बुके येतो. त्याखाली महालक्ष्मीचा फोटो असतो. त्या खालती लिहिलेलं असत की टॉयलेट वारीच्या हार्दिक शुभेच्छा. तो बुके ते निरखून पाहतात.)

अमोघ,

“अरे, ही अंबाबाई आपल्या पुणेकरांना चांगलीच भारी लागलेय. हिला कशी अडकवावी.”

रोहित,

“ तिला प्रयत्नपूर्वक अडकवायला हवे.”

संजय,

“ अरे, तिनेच कशावरून ती काय आपल्याला खायला तरी द्यायला आली होती का?”

रोहित,

“ मंद भोपळ्या तू गप हे तिचच काम आहे.”

संजय,

“ ए आता काय कांड करू नका. तुमच्या करणाम्याने इथपर्यंत पोहोचलोय. आता काय कराल तर ती आपल्याला स्मशानात पोहोचवेल.”

अमोघ,

“ आपण हार मानायची नाही. काट्यानेच काटा काढायचा.”

( पाहिलं सेमीस्टर पूर्ण होते. एक महिना सुट्टी असल्याने स्वप्नजा आपल्या गावी कोल्हापूरला जाते.)

…. …. ….. …. ….. …..

कोल्हापूरला आल्यावर. स्वप्नजा आपल्या मित्रांच्या ओळखीने दुसऱ्या सेमीस्टरचे साहित्य गोळा करते.

( रात्रीची वेळ शैलजा स्वयंपाक घरात जेवन बनवत आहे. ती निरनिराळे पदार्थ करुन घालत आहे.)

रवी,

“ काय स्वप्नाबाई चैनी आहे तुमची रोज नव नवीन पदार्थ, चैनी आहे बुवा.”

स्वप्नजा,

“ मग काय देवाने द्यावे व नशिबाने घ्यावं.”

रवी,

( आईला स्वप्नेस बिर्याणी वाढताना.)

“ आमचं नाही बुवा कधी कौतुक केलं.”

शैलजा,

“ तर तुला काय वाऱ्यावर सोडल्यासारखाच बोलतोस. ती काहीतरी करतेय तरी. पण तू बघ तुझ्याकडे त्या फूटबॉलचा नाद सोड व जरा अभ्यास कर. जरा कुठं तरी नोकरी करशील नाहीतर बसशिल तसाच.”

रवी,

“ बसशिल काय बसशिल.”

स्वप्नजा,

“ महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर रे, कट्ट्यावर म्हणत, अंबाबाई के नाम पर दे दे बाबा दे दे.”

रवी,

“ ये तुझ्या सारखी नोकरी नाही करणार मी. गुलाम कुठली.”

स्वप्नजा,

 “ मग काय करणार.”

रवी,

“ बिजनेस करणार बिजनेस”

स्वप्नजा,

“ काय चेंडू विकणार आहेस काय पंचर झालेले.”

रवी,

“ होय, तू ये मार्केटिंग करायला.”

स्वप्नजा,

“ तुझा चेंडू साधा बिळातील उंदरे तरी घेतील का? काय करायचं ते आधी ठरव.”

रवी,

“ठरवाय कशाला पाहिजे? काढीन एखादी पोल्ट्री.”

स्वप्नजा,

“ काढच तू एखादी पोल्ट्री पप्पा खाद्य घालू देत. व आई कचरा काढूदेत. मग पिल्ली मोठी झाल्यावर तू व तुझे मित्र आहेत एक एक कोंबडी संपवायला.म्हणजे लाखाचे बाराहजार.झालेच समजा. त्या पेक्षा बारावी झाल्यावर तू गाड्या दुरुस्तीचा कोर्स कर. आपला हायवेवर प्लॉट आहे. काढ तिथे गॅरेज. नाहीतर तुझा जास्त वेळ जातोच की मोहन काकांच्या गॅरेजमध्ये.”

शैलजा,

“ हो का हे आपल बर आहे की तू तेवढी शिकून एम बी ए कर व त्याला सांग गॅरेज काढायला. मी त्याला शिकवणार आहे. समजल काय .कलेक्टर करणार हाय.”

स्वप्न जा,

“ ए मास्तरीन बाई लई आंधळ प्रेम नको. आपल नाणं बघावं व ते बाजारात खपवाव. व मोटार मेकॅनिकल म्हणजे तुला काय साधंसुधं वाटल काय. मोहन काकांनी त्याच व्यवसायावर तिन बंगले बांधलेत नाहीतर तुझ हाय निम्मी नोकरी घराचे हप्ते फेडत गेली. व तुझा हा बाब्या आहे ना तो पुस्तकात देखील चेंडू उडकतो. पटल तर सल्ला घे नाहीतर सोडून दे. माझं काय.”

( स्वप्नजेच म्हणणं रवीला पटल त्याने बारावी नंतर. आय. टी. आय. द्वारे मोटर मेकॅनिकल करायचं ठरवलं.)

रवी,

“ तुमचा सल्ला शिरोधार्य मॅडम.”

 ( बेळगावची सुचित्रा स्वप्नजेस मध्येच येऊन भेटून जाते. पहिल्या सेमीस्टरचा निकाल लागतो. स्वप्नजेस चांगले गुण मिळालेले असतात. त्या पाठोपाठ खालच्या यादीतत दुसरी मुले असतात. दुसरे सेमीस्टर सुरू होते. स्वप्नजा व तिच्या मैत्रिणी पुन्हा कॉलेज जॉईन करतात.)

( रोज सकाळी स्वप्नजा तिथे जवळच्या पार्कमध्ये जात असते. ती रनिंग, योगा व प्राणायाम करत असते. सकाळचा शांत परिसर व्यायामासाठी योग्य असलेने ती नियमित तिकडे जाई. एके दिवशी)

शिशिर ऋतूत झाडाचा पाला गळून पडला आहे.नियमित पणे जॉगिंग करणारी स्वप्नजा धावताना तेथील एका झाडाखालून जाताना तिचा पाय एका सापळ्यात अडकतो. व खेचले जाऊन ती उलती लटकली जाते. बागेत कोणी नव्हते. जवळच पाण्याच्या हौदा मागून लपत छपत येणारा अमोघ दिसतो. तो जवळच राहत असतो. तिला अडकलेली पाहून तो तिथे येतो. व)

अमोघ,

“आता कशी सापडली. मांजरी जाळ्यात. गेली पंधरा दिवस पाळत ठेवून होतो. आम्हाला टॉयलेला पळवतेस. आता बस इथे तासभर बकऱ्या सारखी लटकत.”

स्वप्नजा,

“ तासभर लटकायला मी काय तुझ्यासारखी कच्ची नाही. थांब व बघ.”

( पायाला बांधलेल्या दोरीला उलटे होऊन मल्ल खांबाच्या कसरती करत.आपला पाय सोडवते. व झोका घेत ती शेजारील झाडाची फांदी पकडते. व झाडाच्या आधारे खाली उतरते. व अमोघला म्हणते.)

स्वप्नजा,

“ अमोघ या कला आता जुन्या झाल्यात. मला लटकवणेसाठी दुसरं काहीतरी कर.मी हायस्कूलमध्ये असताना गोल्ड मेडल मिळवलंय मल्लखांबात.”

अमोघ,

“ माझे मसल बघितलेस काय? चिरडून टाकेन.”

स्वप्नजा,

“ प्रयत्न तरी करून बघ.”.

( कराटे स्टाईल मध्ये उभारत.)

तिचा रुद्र अवतार बघून तो निघून जातो.

अमोघ,

“ आता जातो. पण बघून घेईन तुला.”

स्वप्नजा,

“ स्वतःला मालखेडचा राजा अमोघवर्षच समजतोय.”

(ती घड्याळात बघते. व रूमवर जाते.)

….. ….. ….. …..

कॉलेज रोडवरून जाताना स्वप्नजाचे श्यांडेल तुटते. ते दुरुस्ती साठी ती एका दुकानदाराकडे जाते. तिथे जवळच टू व्हीलर दुरुस्तीचे दुकान असते. तेथील काळ्या ग्रीसने माखलेले माणूस गाडीचे चाक काढत असतो. ते पाहून ती गालात हसते. व तिला दहावी परीक्षा झाल्यावर मोहन काकांच्या गॅरेजमधल प्रसंग आठवतो. त्यांचे पाने घेऊन घरातील गाडीचे चाक कसे खोलले होते. तेही आठवते. व ती चप्पल शिवून झाल्यावर ती मार्केट मधून एक पाना घेते जो गाडीचे चाक निखळू शकेल.)

( कॉलेजचे पार्किंगमध्ये मुले स्वतःची वाहने लावत. ते मुख्य इमारतीच्या मागील बाजूस तिथं जास्त लगबग नसायची. अमोघ संध्याकाळी क्लासमुळे गाडी पार्क करतो. व क्लासला जातो. क्लास चालू होतो. थोड्या वेळाने.)

स्वप्नजा,

“ सर मला जरा मळमळते. मी जाऊ.”

सर,

“ ठीक आहे जाऊ शकतेस.”

( स्वप्नजा हळूच बाहेर पडून पार्किंग एरियात जाते. अमोघच्या गाडीचे चाकाचे साईडचे पाय ठेवायचे स्टँड निखळते. ती खूप घामावलेली असते. वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होते. व कोणी पहायच्या आत तेथून निघते. थोड्या वेळानं क्लासमध्ये येते. क्लास होतात. व कॉलेज सुटते. अमोघ आपली बाईक काढून स्टंट मारत मुलांच्या पुढ्यातून जाताना गाडी घसरते. तो पडतो. सगळे हसतात. त्याला खरचटलेले असते. सर्व मुले सावरतात. संजय व रोहित त्याना हॉस्पिटल मध्ये नेवून मलमपट्टी करतात.

इकडे. मधूजा हसणाऱ्या स्वप्नजेल

“स्वप्ने चल माझे एक काम आहे..”

स्वप्नजा,

“ काय ग.”

मधूजा,

“चल जरा नाष्टा करून येऊया.”

स्वप्नजा,

“ नको कशाला थोड्या वेळाने जेवायचं तर आहे.”

मधूजा,

“ चल ग रोजचं ते खाणावळीच जेवण माहीत आहे. ठरलेल्या भाज्या त्या पुण्यातल्या दुधिभोपळा, कारले ,वांगी व कोबीस याच्यापुढे दुसरे काय? आपण कस कृष्णाखोऱ्यातील राहिल्याने चमचमीत अन झणझणीत खायची सवय थोडेच जाणार आहे.”

(मधूजाचा आग्रह काही केल्या स्वप्नजा टाळू शकली नाही. त्या दोघी हॉटेल प्रिय मध्ये गेल्या. एका कॉर्नरचा टेबल निवडला. त्या दोघी तिथे जाऊन बसल्या. )

मधूजा,

“ वेटर जरा इकडे ये.”

वेटर येतो.

वेटर,

“ काय हवंय मॅडम.”

मधूजा,

“ दोन मिसळ व दोन चहा.”

वेटर निघून जातो.

मधूजा,

 “ हे बघ स्वप्ने तू हे जे काय चालवलंय ते बंद करावस असं मला वाटतंय.”

स्वप्नजा,

“ काय बंद करावं.”

मधूजा,

“ मी स्पष्टच बोलते. रॅगिंग करन.”

स्वप्नजा,

 “ मी कुठे करते रॅगिंग.”

मधूजा,

 “ चाक कोण खोलत होतं तुझा आज्जा काय.”

स्वप्नजा,

“ रॅगिंग व माझ वागणं यात फरक आहे. असं मला वाटत.”

मधूजा,

“ हे बघ आपण मध्यमवर्गीय माणसं तुझ्या या वागण्यानं वैर वाढत. तो अमोघ गर्भ श्रीमंत आहे. त्याला या गोष्टी म्हणजे चिल्लर आहेत. त्याला ही डिग्री म्हणजे भिंतीवर टांगावयास लागणारा एक फोटो. एवढच. आपण तिच्याकडे करिअरच्या दृष्टीने पाहतो. तो काय पाहुण्यांना दाखवेल ही डिग्री. “

स्वप्नजा,

“ मी कुठे त्याला त्रास दिलाय.”

मधूजा,

“ नाही कस तू त्यांना सतावतेस. व ते तुला. तू काही पुरुष नाहीस सगळीकडे तुझ चालायला. मान्य आहे तू जरा ड्यासिंग आहेस. मी तुला गुलाम हो असं म्हणत नाही. पण तुझी कृती कुणालातरी जखमी करू शकते. कुणाचाही अपघात करू शकते.”

स्वप्नजा,

“ अग, पण एवढं सिरियस काही नाही केलय.”

मधूजा,

“ हे बघ तुला करियर करायचं की फक्त मुले काढायचं मशीन होऊन भाकऱ्या बडवायच्यात. जर भाकऱ्या बडवायच्याच होत्या तर हा उठारेटा कशाला. व तुझ्या सर्व करामती प्राचार्यांना माहीत आहेत. तू हुशार व चांगली असल्याने त्यांनी मला समजावयास सांगितले. मग तू काय करायचं ते ठरव. मी काय तुला समजावणार. शेवटी तू व मी एकाच भागातल्या आहोत. कराड काय नी कोल्हापूर काय एकच ना.”

स्वप्नजा,

“ होय बरोबर आहे तुझ. मी इथून पुढे त्याच्या नादाला लागणार नाही..”

( थोड्याच वेळात वेटर नाष्टा घेऊन येतो. त्या नाष्टा करतात.)

स्वप्नजा,

“ इथून पुढे आपल्या मनासारखं होईल. कुंतल देशाच्या राजकुमारी मधूजाताई.”

मधूजा,

“ मी कुंतल देशाची आन तू कुठली. तिथलीच ना. चल चावट खोडकर कुठली.”

त्या दोघी बिल भागवून हॉटेलच बाहेर पडल्या.

…. …. …. ….. …..

( अमोघला खूप खरचटलेले असते. त्याचे मित्र त्याला मलमपट्टी करण्यास हॉस्पीटल मध्ये नेतात तिथे त्याचे आईवडील ही येतात.

हाताला लागल्याने. डॉक्टर एक्स रे काढून चेक करतात. व खूप गंभीर नसलेने विश्रांतीचा सल्ला देतात.)

अमोघची आई,

“ मी तर कंटाळले या पोराला. दरवेळी काहीना काही उपद्व्याप करतो.”

अमोघचे वडील,

“ तो एक अपघात होता. निसटला असेल एखादा स्क्रू. आपला मुलगा नीट आहे ना.बस तर मग.”

अमोघची आई,

“ लई गोड बोलण्याने डोक्यावर चढलाय तो.”

( वटवट करत त्याचे आई वडील डॉक्टरकडे केबिनच्या दिशेने जातात. इकडे )

रोहित,

“ मला वाटतेय त्या बयेचच काम असणार हे.”

अमोघ,

“ ते कस काय.”

रोहित,

“ बाथरूमच दार निखळणारी ती बया. गाडीची सीट सहज निखळेल.”

संजय,

“ मी कालच एक पुस्तक आणलय. मुलींना कटवायचे एकशे एक नमुने.”

रोहित,

“ अरे बाबा, कटवायचे नकोत. फसवायचे हवेत.”

अमोघ,

“ बस्स आता, ती काही साधी सुधी मुलगी नाही. चांगली पोहोचलेली आहे. केव्हा कशी वार करेल समजायचं नाही. व या भांडणास आपणच सुरुवात केली.”.

संजय,

“ शेवटचा डाव करूया काय.”

( ते तिघे पुस्तक न्याहाळत एक एक पान चाळू लागतात. अचानक एका पानावरील मजकुराकडे लक्ष जाते.सहाव्या नंबरच्या पानावर बोट ठेवत. संजय मोठ्याने ओरडतो.)

“ सापडला.”

रोहित,

“ गाढवा मोठ्याने ओरडू नको. हे हॉस्पिटल आहे. धक्के मारून हाकलतील वाच हळूवार.”

संजय वाचतो,

“ मोबाईलच्या माध्यमातून लाघवी बोलून मुलींना भुलवणे.”

अमोघ,

“ थोड दिवस थांब. माझी तब्येत ठीक झाली की बघू.”

संजय,

“ ते काही नाही. आताच तिला वेसण घातली पाहिजे.तिचा मोबाईल आहे. मी पाहिलंय. कुठून तरी नंबर घेतला पाहिजे.”

( ते मलमपट्टी झाल्यावर ते डिस्चार्ज घेतात. व हॉस्पिटल मधून निघतात.)

…. …. …. ….. …..

संजय कॉलेज मध्ये अनेक मित्राकडून फोन मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला मिळत नाही

( एके दिवशी संजयच्या घरी.)

रोहित,

“ काय मिळाला काय नंबर.”

संजय,

“ नाही रे.”

रोहित,

“ अरे, मी एकदा बाजारात स्वप्नजा व तिच्या मैत्रिणी सोबत तुमच्या शेजारची सोनल पहिली. तिच्याकडून आपण माहिती मिळवू.”

संजय,

“ सोनल होय मग झाले काम माझ”

….. …… ……

( दुसऱ्या दिवशी सकाळी सोनलला गाठून तो फिरायला येणार काय विचारतो. ती तयार होते.)

रोडवर सोनल चालली आहे. मागून संजय बाईक वरून येतो. व विचारतो.

संजय,

“ हे सोनल कशी आहेस.”

सोनल,

“ ओ, संजू हाय.”

संजू,

“ काय येतेस काय फिरायला.”

सोनल,

“ कोण मी.”

संजय,

“ हो, चल जाऊया , सिंहगडला.”

सोनल,

“ आज नको उद्या.”

संजय,

“ बर.बर.”

( संजय बाईक घेऊन जातो.)

…. …. …..

( दुसऱ्या दिवशी संजय सोनलला फिरवून आणतो. तिला हॉटेलला जेवण देतो. व तिच्यापुढे विषय काढतो.)

बाईक वरून,

संजय,

“ ये सोनल कस काय चाललय. तो तुझा मित्र प्रमोद काय म्हणतोय.”

सोनल,

“ तो काय म्हणतोय. हरामखोर आहे तो. एक रुपया खर्चायला नको. उगाच श्यायनिंग मारतोय.”

“ सोनल माझं एक काम आहे. माझ्या मित्राला एक नंबर हवाय. तुला ती आमच्या कॉलेज मधील स्वप्नजा आहे ना तिची व तुझी ओळख असेलच ना.”

सोनल,

“ आहे पणं एवढी नाही. फक्त तिच्या रूममधील विद्या माझी मैत्रीण आहे. व क्लासमेंट सुद्धा. तिच्यामुळे आमची ओळख एवढंच. पण तुला कशाला हवाय नंबर ती चांगली मुलगी आहे.”

संजय,

“ माझ्या एका मित्राचा जीव अडकलाय तिचात तिचा फोन नंबर हवाय.”

सोनल,

“ हे बघ मला फसवू नकोस. ती मुलगी चांगल्या वळणाची आहे. फसवणार असाल तिला तर मी नाही नंबर देणार.”

( शेवटी संजय तिला फाईव्ह स्टारमध्ये भोजन देतो. शेवटी फोन नंबर आणण्याचे ती कबूल करते.)

….. ….. ….. …..

(एके दिवशी सोनल स्वप्नजाचे रूमवर तिला पाहून, विद्या जी पोहे करत असते ती)

विद्या,

“ कस काय येणं केलं सोनालताई.”

सोनल,

“ माझं एक काम होत तुझ्याकडे.”

विद्या,

“ बोला बाईसाहेब काय सेवा करू.”

सोनल,

“ हे बघ थट्टा करू नकोस, मला जिओग्राफीची नोट्स हवी आहेत.”

विद्या,

“ देते थांब. हं.”

इतक्यात अंघोळीहून स्वप्नजा येते तिला पाहून.

सोनल,

“हाय स्वप्ना.”

स्वप्नजा,

“हाय.”

विद्या पोहे करते. तोपर्यंत स्वप्नजा ही आटोपून तिथे येते. ती पोहे घेते. पोहे खाताना सोनल तिची बारकाईने चौकशी करू लागते. स्वप्नजेस तिचे वागणे खटकते.

सोनल,

“ काय ग, तुझ गाव कोणतं.”

स्वप्नजा,

“ कोल्हापूर.”

असे प्रश्न विचारत जाताना ती स्वप्नजाकडे तिचा नंबर मागते.

स्वप्नजा आपली पर्स न्याहाळत एक डायरी काढते. व त्यातील एक नंबर तिला सांगते. तो ती लिहून घेते. व विद्याकडील जिओग्राफी वही घेते व निघून जाते.

ती गेल्यावर डोळे मोठे करून पहात विद्या,

“ काय गरज होती तिला नंबर द्यायची.”

स्वप्नजा,

“ अग, तुझी मैत्रीण आहे ना. एवढे पोहे केलेस तिच्यासाठी वाटल असेल, तिला आपली अनेक मैत्रीण असावी. म्हणून मागितला असेल नंबर त्यात काय एवढं.”

विद्या,

” म्हणे त्यात काय एवढं. मी जरी मैत्री केली तरी माझी मैत्री दुरून डोंगर साजरे अशी आहे. व तिने आज पर्यंत माझा फोन मगितला नाही अन् आज तुझा घेतला.”

स्वप्नजा, ( पोहे खात.)

“ तिला विचार ना.”

विद्या,

“ हे बघ मी तिला काही विचारणार नाही. व तू काय तिच्या नादाला लागायचं नाही चांगली गोगलगाय नी पोटत पाय आहेत तिच्या.”

स्वप्नजा,

“ हे आपल बर आहे की तुझ, तू तिचा उठारेटा करतेस ते चालत. पण मी मात्र बोललेल खपत नाही.”

विद्या,

“ हो का मला काही हौस नाही तिला करून घालायला. ऐन वेळी पोहे भिजवायला व ती मांजरीण यायला गाठ पडली. नाही कस म्हणायचं. रुमाल बदलावे तस बॉयफ्रेंड बदलते ती. मी काही हौस म्हणून करत नाही मला तिच्याकडून अर्थशास्त्राच्या नोट्स हव्यात ज्या तिच्याकडे आहेत. वर्गातील गायत्री म्हणत होती. की तिच्याकडे तिच्या दादाच्या नोट्स आहेत. ज्या मला हव्या आहेत. म्हणून या बयेला मस्का लावायचा नाहीतर हीच्या नादाला लागलो तर लोक हिला बॉयफ्रेंड बदलते, आम्हाला नवरे बदलतील म्हणतील.”

( तिचे बोलणे ऐकून स्वप्नजा हसते.)

स्वप्नजा,

“ बर बर माझे आजी.तुझ्या कोंबड्याने उगवू दे.”

( त्या दोघी व त्यांची रूममेट सर्व आवरून आपल्या कामाला व अभ्यासाला लागतात.)

….. ….. ….. …..

दोन दिवसानंतर.कॉलेज आवारात स्वप्नजा प्रवेश करताना सुचित्रा तिच्याजवळ येते. आजुबाजूस मुलांची कुजबुज चालू असते. सुचित्रा मधुजा व स्वप्नजेला बाजूस घेऊन

सुचित्रा,

“ ये जरा बाजूस चला ग तुम्हाला गंमत सांगणार् आहे.”

त्या एका कोपऱ्यात उभ्या आहेत.

स्वप्नजा,

“ काय ग काय झाल.”

सुचित्रा,

“ तुला कळलं काय कॉलेजमधील त्या संजय आन रोहितची भानगड.”

स्वप्नजा,

( आश्चर्याने पहात)

“ काय झाल.”

सुचित्रा,

“ अग, यांनी कत्रजच्या पोलिसांच्या बायकोला रात्रीचे बारा वाजता मिसकॉल व शेवटी शेवटी तर चावट बोलून सतावले. एका पोलिसाची बायको असून ती एवढी घाबरली की तिला हॉस्पिटल मध्ये अडमीट व्हावे लागले.”

स्वप्नजा,

“ ते काय बोलले ते कळलं काय.”

सुचित्रा,

“ ते काय माहित नाही पण काल ती दोघं चांगलीच लॉकपची हवा खाऊन आलेत. तो संजा तर फांगडे पाय करून चालतोय. व तो रोहित त्याच नाक कूठे डोळा कूठे व कानाचा नक्षा याचा पत्ताच लागत नव्हता. अमोघ मात्र यात नव्हता. यांची कॉल हिस्ट्री फोजदारानं मोबाईल कंपनीतून काढली. व यांची चांगलीच मस्ती जिरवली. शेवटी टेबल खालून पैसे सारून सोडवल यांच्या बापानं. नाहीतर.”

स्वप्नजा,

“ पण तुला एवढं कस कळलं. काय उगाच चेंडू फेकतेस .”

सुचित्रा,

“ तुला माझं पटायचं नाही. मला ओल इंडिया रेडिओन सांगितल.”

स्वप्नजा,

“ कोण तो नाशिकचा कांदा.”

सुचित्रा,

 “ अग, हळू बोल तो अर्चित मघाशी कॉलेजमध्ये आलाय. त्यानं त्याला कांदा म्हंटलेल ऐकलं तर त्या फणसाला राग येईल ना.”

स्वप्नजा,

“ इकडे तिकडे पाहते. रत्नागिरीचा माधव त्याकडे डोळे वटारून बघत असतो.”

त्या ते पाहून निघून जातात.

( पाहता पाहता दुसरे सेमीस्टर देखील संपते.)

…… …. …… …….

तिसऱ्या सेमीस्टर मध्ये सुट्टीत एका कंपनीत काम करून एक लहान प्रोजेक्ट पूर्ण करण्यास सांगितले जाते. स्वप्नजा सुचित्रा व त्यांच्या मैत्रिणी वेगवेगळ्या कंपनीत काम करून प्रोजेक्ट पूर्ण करतात. तिसरे सेमीस्टर सुरू होते.

रोहित संजय स्वप्नजेस चोप देण्यासाठी योजना आखतात.

यासाठी आपल्या बारावीतील मैत्रिणीची मदत घेतात. वृषाली जी बॉक्सिंग खेळणारी असते. तिची गाठ घेऊन योजना आखतात.

रोहित व संजय हॉटेलमध्ये बसलेले आहेत. वेटर चहा आणून देतो. रोहित फोन करतो.

रोहित ( फोन वर)

“ हाय, वृषाली का?”

वृषाली(पलीकडून फोनवर)

“ हा बोल की रे.”

रोहित,

“ एक काम होत तुझ्याकडे”

वृषाली,

“ आज अचानक कशी काय आठवण झाली.”

रोहित,

“ एका मुलीला अद्दल घडवायची आहे.”

वृषाली,

“ का, कोण आहे ती.”

रोहित,

“ आहे एक अंबाबाई खूप सतावतेय.”

( रोहित सर्व माहिती सांगतो. व फोटो व पत्ता पाठवतो.)

वृषाली,

“ ठीक आहे बघून घेऊ तिला एका थपडात गार करते. मला पण वृषाली म्हणतात.”

 ( फोन ठेवला जातो. त्यापूर्वी सगळी माहिती व फोटो तिला मोबाईलवर रोहित सेंट करतो.)

रोहित,( फोन ठेवून)

“ आता झाल आपल काम.”

( ते दोघे हसतात व एकमेकाला टाळी देतात.)

….. …. ….. …….

( दुपारची वेळ स्वप्नजा व विद्या बाजारातून फिरत काही साहित्य खरेदी करत आहेत. वृषाली त्याना पहात आहे. ती त्यांच्या मागावर आहे. खुप गरमी आहे. सस्वप्जा विद्याला म्हणते.)

स्वप्नजा,

“ खूप गरमी आहे ना.”

विद्या,

“ हो तर खूप कायली होते अंगाची.”

स्वप्नजा,

“ चल आईस्क्रीम घेऊ व बागेत जाऊन खाऊ”

(त्या दोघी आईस्क्रीम विकत घेऊन शेजारच्या बागेत जाऊन झाडाखाली बाकावर बसलेत व आईस्क्रीम खात असताना.तिथे वृषाली येते. व स्वप्नजेला म्हणते.)

वृषाली,

“ स्वप्नजा तूच का?”

स्वप्नजा,

“ हो, पण आपण कोण?”

वृषाली,

“ मी वृषाली रोहितची व अमोघची मैत्रिण, तुला मुलांना सतावायला लई आवडत म्हणे.”

स्वप्नजा,

“ तुला त्या रोह्यान सांगितल की अम्यान.”

वृषाली,

“ त्याना रोह्या आम्या म्हणायला तू काय महाराणी आहेस.”

स्वप्नजा,

“ पण एवढी चौकशी करणारी तू गं कोण? त्याची वकील का.”

वृषाली,

“ हे बघ पुण्यात राहायचं तर खाल मान घालून मांजरासारखं राहायचं. नाहीतर चालू पडायचं.”

मधेच विद्या बोलते,

“ हे आपल तुझ बर हाय की देणं नाही घेणं कंदील लावून येणं. पुणे काय तुझ्या बापाचं आंनदण आहे का? ते चालू पडायला.म्हणे चालू पडायचं.”

वृषाली, ( विद्याकडे पाहत)

“ ये चष्मेस जास्त नाटकी नकोत. हं, नाहीतर चष्मा फ मग बासशील आंधळ्यासारख दे बाबा दे म्हणत.”

स्वप्नजा,

“ तू काय फोडतीस. तुझ्या डोळ्यांची बुबळं काढीन व त्याच्या गोठ्या खेळीन. मी.”

वृषाली,

“ ये अंबाबाई जास्त बोलशील तर हाड मोडीन डॉक्टरला सुधा सापडणार नाहीत जोडायला.”

स्वप्नजा,

“ मी काय तुला शहरी बॉयलर कोंबडी वाटलो. जर एवढी हाडक आवडत असशील. तर जा की मटणाच्या दुकानात. शेपूट हलवत.”

( स्वप्नजा चे बोलणे वृषालीस चांगलच झोंबल. ती तिने जोराचा दणका दिला स्वप्नजा खाली कोसळली. तिच्या हातातील पिशवी खाली पडली. ती उठण्याचा प्रयत्न करत असताना वृषाली पुन्हा तिला ढकलते. विद्या तिला सावरत उठवते.)

वृषाली,

“ कसा वाटला दणका.”

विद्या,

“ बाई आहेस की हत्तिखाना.”

( वृषाली विद्याला धरून फिरवते व सोडते. ती शेजारील झाडावर जाऊन थांबते. तिचा चष्मा वरखाली होतो. स्वप्नजा उठते व तिला जोराने बकरी स्टाईलने टक्कर देते. व रेटत झाडाला नेते. व तिचा पाय ओढत फरफटत ओढते. व बागेतील वजनदार तागडीवर पाडते. व दुसऱ्या बाजूनं दोन तीन वेळा सिस्वा उचलते. वृषाली जेरीस येते. त्यातून देखील वृषाली दोन चार लगावते. तिचे हात एका पुरुषांच्या सारखे लागत असतात. ती स्वप्नेचं केस धरते. तोच विद्या सावरून तिचे केस धरते. पण बॉयकट केस पकडता येत नसतात तेव्हा तिचा हात चावते वृषालीला बाप आठवतो. तिची पकड ढीली पडते स्वप्नजेच्या केसावरील. स्वप्नजा सावरते व तिला ढकलून बाकड्यावर पाडते. व कराटे स्टाईलने दणका देते. की बस दिवसाचे तारे दिसू लागतात.शेवटी कसेबसे त्या तिला जेरीस आणतात. व शेवटी आपले साहित्य घेऊन तिथून निघतात.)         क्रमशः

….. ….. …….


Saturday, April 9, 2022

निर्णय

 निर्णय

लेखक : निशिकांत हारुगले

निर्णय

पुणे शहरातील एका बिल्डिंगच्या आवारात पाचव्या मजल्यावर ऑफिस केबिन तेथे खिडकी शेजारी अपर्णा उभी आहे.थोड्याच वेळात शिपाई कॉफी घेऊन येतो.

रिंग वाजते.

अपर्णा, “ येस कम इन.”

शिपाई, “ मॅडम कॉफी.”

अपर्णा कॉफी घेत खिडकीतून बाहेर पाहते. तिला लहानपणीच्या आठवणी येतात.

पुणे शहर श्रीमंत घरकुल आवारातील बंगला ‘ शारदा सदन’ एका रूममध्ये सुषमा पानतावणे ही आया एका लहान मुलीस शाळेसाठी तयार करत आहे. तिची वेणी घालून इतर मेकअप चालू आहे. वरील खोलीतून भांडणाचे आवाज येत आहेत. आया मुलीला तयार करते. ती मुलगी नाराज आहे तिचं नाव अपर्णा आहे. ती तिसरी इयत्तेत शिकत आहे. तिचा भाऊ शुभम शेजारी आपल्या स्कूलची तयारी करत आहे. वरच्या खोलीतून येणाऱ्या भांडणाकडे तो दुर्लक्ष करतो.

आया, “ सुरू झालं यांचं छोट्या आपल्या मुलांचा देखील विचार हे लोक करत नाहीत.

…. …. …

वरील खोलीतील संवाद

प्रणित, “ हे बघ तुझ्या या पार्टीमुळे मुलांकडे दुर्लक्ष होते. तू सुधार व आपल्या घराकडे लक्ष दे. बाई आहेस की बिनडोक मशीन.”

आसावरी, “ ते नाही जमणार मी मुलांना सांभाळते.व तू त्या सेक्रेटरी बरोबर मज्जा कर. ते काही नाही. मला जमणार.तुझी पण मुले आहेत ना.”

प्रणित, “ तोंड सांभाळून बोल. उगाच काहीबाही आरोप करतेस.उगाच देवान तोंड दिले म्हणून काही पण आरोप करतेस. ”

आसावरी, “ मी उगाच काही बोलत नाही. मला सर्व काही माहीत आहे.”

प्रणित थोड शांततेनं

“ हे बघ मी खोटं काही बोलत नाही माझे असे कुठलेच संबंध नाहीत. व हा राग डोक्यातून काढून टाक. व आज माझी महत्त्वाची मीटिंग आहे. तू मुलांना स्कूल मधून घेऊन ये.”

आसावरी, “ ते काही नाही मी आज बर्थ डे पार्टीला जाणार आहे. मला माझ्या मैत्रिणीने तारांगण हॉटेलला पार्टी देणार आहे. व मला तिथे जायला उशीर होतो. त्यामुळे तू आन नाहीतर लाऊन दे तुझ्या त्या लॉलीपॉपला, मला नाही जमणार.”

प्रणित, स्वतच्या मुलांपेक्षा तुला पार्टी महत्त्वाची .इतर बायका बघ. कशा वागतात. व तू ही आहेस.काय हा पेहराव हे वागणं लाज वाटते मला.”

तो रागासरशी बाहेर पडतो. आया मुलांना कार मध्ये बसवते.प्रणित ड्रायव्हरला गाडी चालू करणेस सांगतो. गाडी स्कूल जवळ थांबते. छोटी अपर्णा व शुभम गाडीतून उतरतात.

प्रणित, “ ध्यान देऊन शिका ह. शुभम अपर्णा ची काळजी घे. संध्याकाळी मम्मी येईल न्यायला. गेटच्या बाहेर जाऊ नका.”

 मुलांना सोडून प्रणित गाडीतून निघून जातो.

छोटी अपर्णा आपल्या भावाच्या हाताला धरून स्कूलमध्ये प्रवेश करते. ती आपल्या भावास बोलते.

“ दादा किती दिवस पप्पा मम्मी असे भांडणार मम्मी तर माझ्याकडे लक्षच देत नाही.माझी पोनिटेल पण बांधत नाही.”

शुभम, “ हे बघ अनाथ मुलांना पप्पा मम्मी नसतात ते जगतातच ना. मग आपल्याला नावापुरते तरी आहेत ना येवढच. आपण समाधान मनायच बाकी सर्व देवावर. चल विचार करू नको त्याचा जास्त.”

शुभम तिला वर्गात नेहून सोडतो. तिथं मुले क्लास चालू नसल्याने दंगा मस्ती करत असतात. अपर्णा वर्गात जाऊन बसते. तिला इंग्लिशच्या मॅडमांची भीती वाटते. कारण घरातील वादाने तिचा होमवर्क अपूर्ण असतो. ती विचार करत असताना तिच्या मागून एक सुंदर मुलगा येतो. व तिला घाबरवतो. तो तिचा फ्रेंड विशाल असतो. विशाल हा तिचा फ्रेंड खूपच गमतीदार तिचे सर्व टेनशन् घालवतो. कधी तिला आंबे, चिंचा, आवळे घरा शेजारी असणाऱ्या दामू काकांच्या बागेतील चोरून आणायचा. काकांचा कधी मारही खायचा व वरती हसायचं. व सुटल्यावर पळून जाताना म्हणायचं

“ ओ काका मी आहे म्हणून तुमची बाग आहे. नाहीतर तुमचे चिंचा आंबे कचऱ्यात गेले असते. कारण तुमचा अमेरिकेतील मुलगा नाही खायला येणार ती. व तुमची औषधे मीच आणतो ना. मग आता मीच तुमचा मुलगा आहे ना.”

काका हसायचे व म्हणायचे. “खर आहे बाळा तुझ. पण तुला दोन धपाटे दिल्याशिवाय गमतच नाही. व तू नसलास तरी करमत नाही.”

संवाद

विशाल, “भाव,”

अपर्णा, “ काय हे घाबरलो ना मी.”(दचकून)

विशाल, “ तू पाहावं तेव्हा कोणता विचार करतेस.माझे काका म्हणतात की जास्त विचार करू नये. ”

अपर्णा, “ माझे पप्पा व मम्मी नेहमी भांडतात. ते भांडू लागले की मला खूप भीती वाटते. माझा होमवर्क अपूर्ण आहे. व जोगळेकर मॅडम खूप वांड आहेत. आज त्या मला शिक्षा करणार. मला छडीन मारणार.”

विशाल, “ त्यात काय घाबरायच आमचा बा पण वांड आहे. मारून मारून दोन फटकेच देतील ना. ठार तर मारत नाहीत ना. मी बघ कसा आहे. काल गणिताच्या तासाला मी बाहेर होतो. गणित पूर्ण असताना मी अपूर्ण सांगितली. कारण मला बाहेरची फुटबॉल मॅच पहायची होती.”

अपर्णा, “ म्हणजे तू काल विनाकारण शिक्षा घेतलीय.होय

 विशाल, “ मनाप्रमाणे मी वागतो.नाहीतर तासाला काय लक्ष लागणारच नव्हते.”

अपर्णा, “ काय?”

विशाल, “ हो.”

इतक्यात बेल वाजते. मुले हॉलमध्ये जमतात. व प्रार्थना होते. त्यानंतर आपापल्या वर्गात मुले जातात. क्लास चालू होतो. इंग्लिशच्या मॅडम वर्गात येतात. साडी नेसलेल्या पोक्त वयाच्या डोळ्यावर चश्मा वर्गात आल्यावर त्या होमवर्क विचारतात.

जोगळेकर मॅडम, “ कालचा होमवर्क दाखवा.”

एका मागून एक बेंचवरील वह्या तपासत त्या अपर्णाची वही तपासून पाहतात व होमवर्क अपूर्ण असलेने तिला उभे करून छड्या देतात. व बाकावर उभा करतात. ती रडत बेंचवर उभी आहे. सर्व मुले हसत आहेत. व विशाल फक्त तिच्याकडे दयेच्या नजरेने पाहत आहे. बिचारी

… … …. ….

दुपारची सुट्टी झाली .मुले लंच करणेसाठी बसलेली आहेत. मॅडमांनी दिलेल्या शिक्षेने तिच्या हातावर वळ उठलेत. विशाल आपला लंचबॉक्स घेऊन तिथे येतो.तिच्या हातावरून हात फिरवतो. व आपल्या हाताने तिला घास भरवतो. व तिची समजूत काढतो. हसवत प्रयत्न करतोय.

विशाल, “ रडू नकोस, थोड्या वेळानं दुखनं थांबेल. मी मंत्र टाकतो. आमच्या वस्तिवरच्या सिदुबुवासारखं.

“ अल्यमंतर कलीमांतर छू.”

तरी देखील ती रडतेय पाहून तो तिला हसविण्याचा प्रयत्न करतो.

“ हे बघ जोगळेकर मॅडम रस्त्याने जाताना त्यांचा पाय चीखलवरून घसरला. कशा दिसतील.”

अपर्णा हसते.

अपर्णा भानावर आली मनातील विचारचक्रतून ती बाहेर आली. इतक्यात टेलिफोन ची रींग वाजते.ती फोन उचलते.

संवाद,

“ मॅडम मी कॉर्लोक कंपनीचा मॅनेजर बोलतोय. आज दुपारी तीन वाजता अशोक हॉटेलमध्ये मिटिंग आहे. त्यासंबंधी सर्व डेटा मी सेंट केलाय आपल्या ईमेल आयडी वर चेक करा. व पोहोच सेंट करा.

अपर्णा संगणकावरील डेटा चेक करते. व पोहोच सेंट करते. तसेच काही त्रुटी असलेल्या त्यांना सांगण्यास सेक्रेटरीला सांगते. सेक्रेटरी त्या प्रमाणे कामकाज पूर्ण करते.

… …. …. …

दुपारचे दोन वाजले. अपर्णा ऑफिसमधील शिपायास बोलवते. त्याला

“सदा, ड्रायव्हरला सांग गाडी काढायला, मिटिंगला जायचे आहे.”

सदा बाहेर जाऊन ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतो. ड्रायव्हर खाली जाऊन गाडी काढतो. अपर्णा व तिची सेक्रेटरी ऑफिस मधून निघते. व गाडीत बसताना.

“ड्रायव्हर अशोका हॉटेल चलो.”

ड्रायव्हर, “ जी मॅडम.”

गाडी अपारमेंटच्या बाहेर निघते. व मेन रोडला लागते. वेगाने निघते.

… … …

थोड्याच वेळात रस्त्यावर गाडी बंद पडते. ड्रायव्हर खूप प्रयत्न करतो. गाडीचे बोनेट उघडून बघतो. उन्हामुळे झळा जाणवू लागल्या होत्या. गाडीच्या इंजिंनमधून धूर निघत असतो.

अपर्णा, “ तुम्हाला गाडीची देखभाल ठेवता येत नाही. आता माझी महत्त्वाची मिटिंग आहे. आणि हा प्रॉब्लेम.”

सेक्रेटरी, “ मॅडम शांत व्हा. काहीतरी होईल.”

अपर्णा शांत होते व ड्रायव्हरला

“ गॅरेज कुठे मिळते का बघा. व माझी सोय करा. ऑफिसला कळवा हा प्रॉब्लेम, व पर्यायी गाडी बघा. अथवा मागवा.”

तो ड्रायव्हर कावराबावरा झालेला असतो. त्याची कंडीशन पाहून अपर्णा स्वतःच मोबाईल डेटा सर्च करून एरिया व गॅरेज सर्च करते. तेव्हा त्यात ' शिवनेरी गॅरेज ‘ असे नाव येते. ते सर्च करून ती फोन नंबर काढते. व मोबाईल वरून कॉल करते. इकडे गॅरेज मध्ये एक कर्मचारी फोन उचलतो. व

संवाद

“हॅलो शिवनेरी गॅरेज,”

“ हो बोला”

“ मी अपर्णा भालदार बोलते. माझी गाडी इथे शिवाजी रोडला बंद पडलेली आहे. तरी प्लीज मदत करा.”

इतक्यात दुरुस्तीला आलेल्या गाडीची ट्रायेल घेऊन विकी आत येतो.”

त्याला कर्मचारी रघु सांगतो.

“ साहेब शिवाजी रोडवर एक गाडी नादुरुस्त आहे. व अर्जंट हवी आहे.”

विकी आपली बुलेट काढतो तिच्या मागे चैन लावलेली असते. कर्मचाऱ्यांकडून नंबर व लोकेशन घेऊन तो निघतो.ड्यासिंग सुंदर उंच नाकेला असा विकी

गाडी बंद पडलेल्या ठिकाणी आल्यावर.वाटेत लोकेशन अपर्णा ने पाठवलेलं पहात तो तिथे पोहोचतो.

गाडी पाहतो.

“ गाडी गॅरेजला न्यावी लागेल.”

सेक्रेटरी, “ बघतरी आधी नीट.”

“बघूनच सांगतोय. खूप दिवस सर्व्हिसिंग पण केलं नाहीये.”

“ किरकोळ असेल उगाच गाडीतील त्रेंड असल्यासारखे वागु नकोस.”

सेक्रेटरी अपर्णाला, “ मॅडम किरकोळ असेल दुरुस्ती, हा उगाच सांगत असेल. तो बघा कसा आहे.रुपवरून वाटत नाही हा कोणी मेकॅनिकल असेल.”

ते हळू बोलणे ऐकून

“ हे घ्या पानं. व तुम्ही दुरुस्त करा ना मग. मी जातो”

अपर्णा, “ ठीक आहे, ती गाडी दुरुस्तीला न्या व माझी सोय तेवढी करा.”

तो गाडी आपल्या बुलेटला बांधतो. व त्यांना चालत येण्यास सांगून गाडी गॅरेजला आणतो.

गॅरेजमध्ये आणल्यावर थोड्याच वेळात त्या तिथे पोहोचतात. भर ऊनात चालून आल्याने सेक्रेटरी थकलेली असते. अपर्णा मात्र तिला रोजच्या जॉगिंगच्या सवयीमुळे अपटूडेट असते.

तो सांगतो, “ मॅडम उद्या मिळेल गाडी.”

“ बर ते असुदेत, मला आता दुसरी गाडी मिळेल का.”

“क्याब मागवा. कृपा करून.”

सेक्रेटरी तिथे बसलेल्या मेंबरला,

“ आहों काय तुमचा कर्मचारी आहे.जरासुद्धा दया नाही त्याला. आम्हाला जर तिथे म्हंटला असता तर. खूप चालवलं हो जवळच आहे म्हणाला तुम्ही तरी सांगा महिलांशी अस वागतात का. मी कधीच इतकी चाललेली नाही हो”

साहेब म्हंटल्यावर रघु खुश होऊन विकीला

“ विकी जा मॅडमना सोडून ये.”

विकि डोळे मोठे करतो.

रघु, “ विकी साहेब जरा सोडता का मॅडमला.”

सेक्रेटरी, “ काय हे तुमचं वजनच नाही. कामावरून काढून टाका त्याला.”

विकी, “ ये लई बोलतेस. जायचय ना ऑफिसला.”

अपर्णा, “ माफ करा हं पण मला अर्जंट एका मिटिंगला जायचयं गाडी खराब झाल्यामुळे खूप वेळ झालाय व प्लीज मला तेवढी मदत करा.”

अपर्णा चे बोलणे ऐकूण

 विकी , “मी सोडतो,थांबा.”

 तो आत जात “दोनच मिनिट.”

इकडे सेक्रेटरी फोन करून अशोक हॉटेलमधे आयोजकांना कळवते.

विकी आत जाऊन फ्रेश होऊन येतो. व आतील एक सुंदर आपली कार काढून घेऊन येतो. ती पहात

सेक्रेटरी, “ वाव, मॅडम पाहिलत काय? मी म्हटल होत ना की हा बनेलच आहे. बघा साधा कर्मचारी याची ही बडदास्त तर मालक कसा असेल.”

अपर्णा, “ हे बघ आता शांत बस, नाहीतर सगळ काम बिघडायच.”

त्या कारमध्ये बसतात. विकी कार चालवतो.

संवाद

“मॅडम,पत्ता सांगा,”

सेक्रेटरी, “ हा घ्या अशोका हॉटेल.”

तो पत्ता घेतो. व कार चालवतो . कारचा आरसा नीट करतो. व आरशात अपर्णा कडे पाहत गाडी चालवतो.थोडं पुढे गेल्यावर एका सिग्नलला कार थांबते. शेजारी बाग आहे. बागेतील बाकावर एक बाई

 आपल्या छोट्या मुलीला घास भरवते ते पाहून तिला आपल्या लहानपणाच्या प्रसंग आठवतो.

बंगल्याच्या आवारात बागेत आया छोट्या अपर्णास चारत आहे. शेजारी तिची आई बाकावर सावलीत पुस्तक वाचतेय. तिचा भाऊ शेजारी आहे. तो तिला चिडवत आहे.इतक्यात तिचे मामा व मामी तिथे येतात.त्यांना पाहून

संवाद

अपर्णाची आई आसावरी “ये सखाराम दादा खूप दिवसांनी आलास रे. कसा आहेस.”

सखाराम, “ चाललय बर ,तू कशी आहेस? चाललय ना नीट.दाजी कुठे आहेत. दिसत नाहीत”

आसावरी, “ कुठे म्हणजे कामावर.”

सखाराम, “ तसं नाही म्हणायचं मला हल्ली घराकडे नसतात का.”

आसावरी, “असतात की ,पण कंपनी मिटिंगसाठी बाहेर जावे लागते.”

सखारामची बायको संगीता मधेच

“ तसं नाही वनसं हल्ली काय काय एकावयास मिळते माहीत आहे का.”

आसावरी, “ काय ऐकायला मिळते.”

संगीता, “ नाही तुम्हाला राग येईल म्हणून बोलत नाही. पण इतकं वाईट वाटते की तुमच्यासारखी बायको असताना भाऊचं अस वागणं पटत नाही.”

आसावरी, “ काय वागणं स्पष्ट बोल वहिनी.”

सखाराम, “ ती काय बोलणार, हे बघ फोटो.”

आसावरी फोटो पाहते त्यामधे प्रणित व सेक्रेटरी यांचे चुकीचे संबंध असलेले फोटो असतात.ती खुप चिडते. व रडू लागते.ते पाहून

सखाराम, “ म्हणूनच मी सांगत नव्हतो बघ. तू अशी रडू लागलीस तर या बाळांनी कुणाकडे बघायचं.”

आसावरी, “ येऊ देत त्यांना दाखवते, ती सटवी माझा संसार मोडायलाच बसलीय. आता खूप झालं. पाणी खूप पुलाखालून गेलंय.सोडतच नाही त्यांना.”

संगीता, “ आम्ही आहोत ना तुमच्या पाठीमागं.पण आर्थिकदृष्ट्या जरा नाजूक आहे. नाहीतर कुठल्या भावास आपली बहीण जड झालेय का?”

आसावरी, “ मी आहे ना, बघतेच आज, येऊ देत घरी.”

सखाराम, “ ताई मला थोडे पैसे हवे होते, मिळतील का.”

आसावरी, “ आत बंगल्यात जाते आपल्या तिजोरीतून काही रुपये काढून भावास देते. “

पैसे मिळताच सखाराम व संगीता तिथून निघतात.निघताना सखाराम.

“ चला थोडीफार कमाई झाली.”

…. ….. ….

रात्रीचे सात वाजून पस्तीस मिनिटे झालेत बंगल्याच्या आवारात कार प्रवेश करते. प्रणित गाडीतून खाली उतरतो. ड्रायव्हर गाडी पार्किंग करतो. प्रणित बंगल्याच्या हॉल मध्ये आल्यावर चौकशी करतो.

संवाद

प्रणित, “ आया मुले जेवलित.”

आया सुषमा, “ हो साहेब, शुभम होमवर्क करतोय व बेबी आत खेळतेय"

प्रणित, “ मॅडम कुठे आहेत.”

आया, “आहेत वरती आपल्या रूममध्ये.”

इतक्यात वरून जिना उतरत आसावरी

“ का घरी असायला नको होत.”

प्रणित, “ तसं नाही विचारलं.”

आसावरी, “ तुम्हाला वेळ का लागला.”

प्रणित, “ काम होत.”

आसावरी, “ कोणत काम होते, मी फोन केला होता तेव्हा कर्मचारी म्हणाला मिटिंग संपली व साहेब चार वाजताच निघाले.”

प्रणित, “ निघालो होतो पण सेक्रेट्रीच्या बाबांना अडमिट केलं होतं.त्यामूळे ती आली नाही म्हणून मला समजल्यावर भेटण्यास गेलो एवढच.”

आसावरी, “ इथ स्वतच्या मुलांना दवाखान्यात नेण्यास तुम्हाला वेळ नाही. व सेक्रेटि्च्या वडलांना बघायला जायला बर वेळ भेटतो.”

प्रणित, “ म्हणजे तू माझ्यावर संशय घेतेस तर.”

आसावरी, “ नवरा छीनाल असेल तर बायकोला वाच ठेवावेच लागते.”

प्रणित, “ तोंड सांभाळ तुझ. वाटेल ते बोलू नकोस.”

आसावरी, “ का बोलू नको त्या सेक्रेटरीसोबत जे रंगढंग चाललेत ते काय मला ठाऊक नाहीत असं वाटल तूला.”

“ तोंड सांभाळून बोल. उगाच खोटे आरोप करू नकोस?”

आसावरी, “ मी खोटं बोलत नाही. हे घ्या पुरावे. आयुष्यात कधी मला फिरवायला जमलं नाही.ही थेर कशी जमतात. ”

प्रणित, “ हे खोटं आहे. तुला कुणीतरी खोटे पुरावे आणून दिलेत.”

आसावरी, “ तुम्हा पुरुषांना अंगलट डाव आले की मोठ्याने ओरडले की वाटते सगळ खपत. पण मी हे खपवून घेणार नाही.मला हे चालणार नाही..”

प्रणित, “ तुला वाटेल ते कर जा.हे आता रोजचच झालय.”

आसावरी, “ बघते उद्या त्या बयेला.”

असे बोलून ती वर आपल्या खोलीत जाते. व उपाशी झोपते. तो ही टेन्शन मध्ये झोपी जातो.

….. ….. ……

इतक्यात हॉर्न वाजतो. अपर्णा विचारातून बाहेर येते.थोड्याच वेळात कार अशोका हॉटेलच्या गेटमधून आत प्रवेश करते. अपर्णा व सेक्रेटरी कार मधून उतरतात. आयोजक वाट पाहत असतात. अपर्णा मॅडम आल्याचे पाहून ते स्वागत करतात हस्तांदोलन करतात .विकीच्या कारचे भाडे द्यायचे असल्याने अपर्णा थोड थांबा असं त्याला सांगते विकी तिथं थांबतो. ती आत जाते. मिटिंग चालू होते. जवळ जवळ चार तास मिटिंग होते. प्रोजेक्ट पसंद आल्याने व अडचणीवर सोलुशन काढल्याने अपर्णाचे सर्व अभिनंदन करतात.

संवाद.

“ अभिनंदन मॅडम मस्त तुम्ही प्रोजेक्ट छान सादर केला. सर्व कसं मस्त समजाऊन सांगितल.आम्हाला पटल ते.”

“ थॅन्क्स”

“अपर्णा माझी निवड योग्य होती. हे तू सिद्ध केलस.तुझ्यावर ही जबाबदारी सोपावून मी योग्य निवड केली हे सिद्ध केलस.” मिस्टर रमाकांत देशमुख

रमाकांत बरोबर त्यांचा पुतण्या असतो. गोरा दिसनेस स्मार्ट स्त्रीलंपट अपर्णा वर लाईन मारणारा, तिच्याशी लग्नाची अपेक्षा असणारा तीच्यकडे सतत पाहणारा. सिद्धार्थ देशमुख रमाकांत यांच्या कंपनीवर त्याचा टेकओव्हर करणेचा डाव आहे. त्याबरोबर अपर्णाशी लग्न करणे हा ही त्याचा डाव आहे. एका दगडात दोन शिकार.

….. …… ……..

रमाकांत अपर्णाचे अभिनंदन करतात

“ अभिनंदन अपर्णा तुझे पुनः एकदा अभिनंदन”

अपर्णा, “ ते काही नाही सर तुम्ही मला त्या पडत्या काळात संधी दिली यातच सर्व काही आहे सर. मी तुमची खूप आभारी आहे.”

सर्व अपर्णाचे अभिनंदन करतात. ती कॉन्फरन्स हॉल मधून बाहेर पडते. तेव्हा सिद्धार्थ तिचे अभिनंदन करण्यास पुढे येतो.

“अभिनंदन, स्वीट हार्ट.”

अपर्णा, “ थ्यांकस ,पण माझ नाव अपर्णा आहे. आपण अपर्णा म्हटल तरी चालेल.”

“ अपर्णा तर अपर्णा , आजचा डिनर माझ्या संगे घेणार का.”

अपर्णा, “ नाही.”

ती तडक खाली लिफ्ट ने जाते.

“ याच आदेवर मी तर फिदा आहे. ब्युटी विथ ब्रेन.” सिद्धार्थ

अपर्णा खाली येते.

व खाली आल्यावर तिला विकी दिसतो.

संवाद,

अपर्णा, “ तुम्ही गेला नाही अजून.”

विकी, “ काय हे मॅडम तुम्हीच थांबा म्हणालात ना.”

अपर्णा, “अरे बापरे, तुमचं प्रवासी भाडे द्यायचे होते म्हणून मी तुम्हाला म्हणाले. तुमचा महत्त्वाचा वेळ माझ्यामुळे वाया गेला. माफ करा‌ हं”

 बर ती सेक्रेटरीकडे पाहत. “ यांच्या बिलाचे काहीतरी बघा. व खूप वेळ झाला जेवणाचेही बघा त्यांच्या.”

सेक्रेटरी,” मॅडम बीलाचे मी पेड करेन पण जेवणाचे काय ते कंपनीच्या खात्यात कस टाकणार.”

अपर्णा,” तुम्हाला घाई नाही ना.” सेक्रेटरीला पहात, “ माझ्या बीलात जोडा.”

विकी, “नाही, मी तिकडील कामाची सेटिंग लावली आहे.”

अपर्णा, “ मला खूप मदत झाली. चला आजचा डिनर माझ्याकडुन तुम्हाला.”

ती पुढे जाते.

विकीला डिनरला बोलवले तेव्हा सेक्रेटरी ‘मॅडमना कळतच नाही. कशाला या मेकॅनिकला बोलवलं त्यापेक्षा ट्रिट द्यायची. जेवला असता कुठेतरी बाहेर.”

…. …. …. ….

तो मॅडम पाठोपाठ जातो. पुढे हॉटेल मध्ये थोड्या वेळानं त्यांचं जेवण आयोजन होत. अपर्णा विकिसोबत जेवण घेताना विकी जरा संकोचतो. कारण एवढ्या मोठ्या वातावरणीय सवय नसते त्याला. बाकीचे सुट घातलेले लोक व हा मात्र नॉर्मल ड्रेस वर तसा दिसे हँडसम पाणीदार डोळे असलेला उमदा मुलगा. बघताच कोणीही प्रेमात पडेल.असा.

त्याला मोठ्या हॉटेलची सवय नसते. त्याची तगमग पाहून ती त्याला पुढील खुर्चीवर डायनिंग वर बसण्यास सांगते. तो बसतो. वेटर जेवण आणतो. उच्चभ्रू लोकात जेवणाची सवय नसलेने त्याला कसे खावे हे माहीत नसते. तो गोंधळतो.ते पाहून सेक्रेटरी हासते. शेजारी दुसरीकडे इतर लोक बसलेत. सिद्धार्थला दुसरीकडे बसावे लागते. अपर्णा शेजारी अनेक मान्यवर व रमाकांत बसलेत. समोरच्या सीटवर सिद्धार्थ बसताना त्याला दुसरीकडे अपर्णा बसायला सांगते व आपल्या समोर विकिस जागा देते. रमाकांत शेजारी बसून तो तिच्याकडे पहात आहे. तो चिडून आहे. अपर्णा शेजारी रमाकांत समोर विकी बसलाय ते त्याला खटकते. अपर्णा विकीस इशारा करते व ती कशी जेवण करते तस करणेस सांगते. तो जेवण करतो.जेवण झाल्यावर सिद्धार्थच्या लक्षात येते. अपर्णाची कार खराब असलेने तिला घरी ड्रॉप करतो असा विचार करून तो.जवळीकता वाढवू पहातो.

“ अपर्णा मी ड्रॉप करतो तुला.”

अपर्णा, “ नको, आहे माझी सोय.” व ती विकीला विचारते

“विकी, मला सोडशिल का घरी, तुझ्या परतीच्या मार्गावरच राहते मी.”

विकी भारावलेला असतो. “ हो मॅडम मी सोडेन.”

अपर्णा सिद्धार्थकडे पाहत, “ सिद्धार्थ, तुला वेळ असेल तर माझी सेक्रेटरी अनुजाला सोड.”

सिद्धार्थ नाखुशीने तयार होतो.

कार्यक्रम संपल्यावर ती निरोप घेते. व विकीच्या कार मध्ये बसते. तो खूप खुश असतो. मॅडमची सीट झाडून बसण्यास तयार करून देतो. अपर्णा बसते. कार हॉटेलच्या बाहेर पडते. सिद्धार्थ चिडलेला नाखुशीने सेक्रेटरी ला आपल्या कारमध्ये घेतो रमाकांत सर शेजारी बसतात. तेही निघतात.

….. …. …. …..

अपर्णा थोड पुढे गेल्यावर विकीला सांगते

“ जर एखादी क्याब मिळाली तर बघ. उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास कशाला,”

विकी, “ त्यात त्रास कसला. मॅडम”

अपर्णा, “ मी तुझ्या गॅरेजच्या विरुद्ध दिशेस राहते. मला त्या सिद्धार्थ बरोबर जायचे नव्हते. म्हणून मी तुला लिफ्टसाठी गळ घातली.”

विकी, “ पण मला काही हरकत नाही. व तुम्हाला अस यावेळी एकटे सोडणे मला योग्य वाटत नाही. .त्यापेक्षा तुम्ही मला पत्ता सांगा. मी तुम्हाला सुरक्षित पोहचवतो.”

अपर्णा, त्याला आपला सिंहगड रोडचा पत्ता सांगते. तो मॅपद्वारे तिला सुखरूप पोचवतो. तिचं घर एक टुमदार छोटा बंगला असतो. तो तिला सोडतो. ती गाडीतून उतरते. व

 अपर्णा, “ आभारी आहे,”

विकी , (हसतो व तिचे घर पाहतो बाहेरून ) “बर येतो.”

विकी आपली कार घेऊन निघतो. त्याला ते घर ओळखीचे वाटते. अपर्णाचा स्वभाव ही आवडतो. अपर्णा घरात जाते बेल वाजवतो.तिच्या घरातील आया दरवाजा उघडते. ती म्हातारी झालेली आहे तिच्या बाबांच्या घरातील नोकर सुषमा पानतावणे ची मुलगी, ती फ्रेश होते. व आयेस आपल्या आईच्या तब्येतीची चौकशी करत.

“ कशी आहे ती?”

आया, “ खुप दंबवल तिन . आताच कुठे डोळा लागलाय तिचा.”

अपर्णा, “ तू जेवलीस,”

आया, “ हो, थोड्याच वेळापूर्वी.”

अपर्णा, “ ठीक आहे, आता तूही विश्रांती घे. मी पाहून काही लागल तर.”

आया जाते, अपर्णा आपली मम्मी झोपलेल्या ठिकाणी जाते. व तिच्या डोक्यावरून हात फिरवते. व अंगावर कांबरून घालून ती आपल्या खोलीत झोपण्यास जाते.

..,.. …… …….

सिद्धार्थ रमाकांत यांना सोडतो. व सेक्रेटरी अनुजास सोडायला जातो जाताना कारमध्ये.

“ किती पगार मिळतो तुला?”

सेक्रेटरी, “ २५००० रुपये सर.”

सिद्धार्थ, “ मी तुला ३०००० देईन फक्त मला तू अपर्णा मिळूवून दे.”

सेक्रेटरी, “ ती खूपच स्मार्ट आहे. बारीक सारीक गोष्टींवर लक्ष असते तिचे, हे एवढं सोपं नाही. अत्यंत हुशार बाई आहे ती.”

सिद्धार्थ, “ म्हणूनच ती मला आवडते.”

सेक्रेटरी,” मी मदत करेन.पण मला ही मोबदला म्हणून तिची खुर्ची हवी.”

सिद्धार्थ, “ दिली, नाहीतर लग्नानंतर तिला काम करायची गरज काय?”

सेक्रेटरी, “ ठीक आहे.”

सिद्धार्थ, “ तो ड्रायव्हर कोणता?”

सेक्रेटरी, “ तो एक मामुली मेकॅनिकल आहे. शिवनेरी गॅरेज मध्ये असतो.”

सिद्धार्थ, “ त्याचे व अपर्णा चे काही संबंध.”

सेक्रेटरी, “ मला नाही वाटत.ती एक क्याजुआली मुलाखात होती.”

सिद्धार्थ, “ मला नाही वाटत.तरीपण लक्ष ठेव. व मला सांगत जा. हे घे माझे कार्ड.”

तो कार्ड देतो व तिला तिच्या घरी सोडतो.

…… …… …… ……

शिवनेरी गॅरेज विकी अपर्णाची कार दुरुस्त करतो .तेव्हा त्याला त्यात एक रुमाल सापडतो. तो आपल्या खिशात तो ठेवतो. व कार दुरुस्त करतो. इतर कर्मचारी त्याला कालच्या घटना विचारतात.

मोन्या, “ विकी भाऊ काल इतका वेळ का?”

परत्या, “ मॅडम थांबा म्हणाल्या असतील.”

विन्या, (विनय) “ म्हणून काय चार तास थांबायचं.”

परत्या, “ आर तस नाही आपल्या गड्याचा पायच निघना तिथून.”

विकी, “ तुम्ही लई मनोरे रचू नका, तसं काही नाही. त्यानी थांबा म्हंटले म्हणून थांबलो.”

विन्या, “ म्हणून शेजारी बसून जेवायला घाटल होय.आम्ही एवढ्या गाड्या दुरुस्त केल्या पण आम्हाला कुणी चहा सुध्दा पाजला नाही.”

सुहास,(गाडी दुरुस्त करतेवेळी बाहेर येऊन) “ करपलेल्या तुला कशाला विचारतील. थोबाड बघ आरशात.”

विन्या, “ असुदेत करपलेल माझं लगीन झालंय, दोन दिवसाला ब्रेकअप होत नाही मैत्रिणी संग. तिशीचा झालास बघ बोकड a शेळी तरी आई लव म्हणेल काय तुला.”

सुहास चिडतो व त्याला मारण्यास मग लागतो. तो इकडे तिकडे पळतसुटतो. व विकीच्या मागे थांबतो. विकी सुहास ल समजावते हा गलका चालू असताना अपर्णा च कंपनी ड्रायव्हर येतो. व

“कार दुरुस्त झाली काय?”

वीन्या “ झाली”

( विकी इशारा करतो. )

विन्या, “ झाली नाही वाटतें. नंतर देऊ. पत्ता सांगा फक्त पोचवू.”

ड्रायव्हर फोन करतो. व अपर्णा स सांगतो

“ मॅडम कार तयार नाहीये. नंतर देतो म्हणतायेत.”

अपर्णा, “ बर, तुम्ही या, किती वाजता मिळेल विचारा? “

ड्रायव्हर चौकशी करतो. “ आजुन किती वेळ लागेल?”

विकी, “ संध्याकाळी देईन मी आपल्या मॅडमची घरी नेऊन.”

ड्रायव्हर जातो इतर

मोण्या, “आता काय बेत हाय.”

पारत्या, “ काय म्हणजे मॅडमना लांब ट्रेकला न्यायचं असेल.”

विन्या, “ अडकल पाखरू कमळात बाबा. काय खर ने याचं.”

सगळे दंगा करतात.

…. ….. ….. …..

सकाळचे अकरा वाजले. दुरुस्ती आलेली टू व्हीलर विकी दुरुस्त करतो. ट्रियाल घेणेसाठी गाडी घेऊन गॅरेज बाहेर पडतो.थोडे अंतर गेल्यावर एका वस्ती शेजारून जाताना एक महिला आवाज देते .तिच्या मुलीची बस चुकली. ती शाळेचा ड्रेस घालून रडत उभी आहे. तिची आई तिच्या शेजारी उभा आहे

पार्वती मौसी, “ अरे विकिबाळा, एवढं सुहासिनीला स्कूलमध्ये सोडतोस का?तिची स्कूल बस चुकली.”

विकी, “ चल.”

विकी मुलीला गाडीवर घेतो. व ती रडण्याचे सोडून हसते. तो गाडी वेगाने मारतो. सिग्नलला गाडी थांबते. त्या शेजारी सिटी बस उभा आहे. अपर्णा कार खराब असलेने आज बसने ऑफिसला चालली. ती बसमधे खिडकीकडे बसलेली आहे. ती पेपर वाचत आहे. इतक्यात विकीचे लक्ष तिच्याकडे जाते. तो हाक मरतो. तोपर्यंत सिग्नल बदलतो व बस पुढे जाते. तो मागून गाडी मारतो. व बस ह्या बरोबरीने नेतो. व हाक मारतो. तिला शेजारील पुरुष सांगतो.

“ आहों तुम्हाला कोणतरी बोलवत आहे.”

“ ती बाहेर पाहते तर तिला विकी दिसतो. तिची व त्याची नजर नजर होते. व बस पुढे  निघून येते. सुहासिनीचे स्कूल येते.ती

“ दादा स्कूल आले बघ.”

तो भानावर येतो. तिला स्कूलमध्ये सोडतो. आत जाताना ती विकीला मागे वळून बोलते

भैया, “ मस्त आहे वहिनी.”

तो हसतो, व केसांवरून हात फिरवतो. व निघतो

…… ……. ……..

दुरुस्त कार देण्यासाठी विकी अपर्णा चे घरी जातो. बंगल्याच्या आवारात कार प्रवेश करते. त्याला ओरडण्याचा आवाज येतो. तो आत जातो. अपर्णा ची आई बेडवर झोपलेली तिची ताब्यात खराब आहे. आया त्याला मदत करणेस सांगते. तो तिला उचलून कारमध्ये ठेवतो. आया दरवाजा बंद करते. व कारमध्ये बसते. तो वेगाने कार दवाखान्याच दिशेने नेतो. तिला स्त्रेचेरवेरून अडमित करतो. डॉक्टर उपचार करतात. आया कॉल करते .

“ अपर्णा बेबी मम्मीला नॉर्मल अटॅक आलाय. अडमीत केलंय. लवकर ये. ललित हॉस्पिटल मध्ये.”

अपर्णा फोन घेते. स्टाफ व रमाकांतना संदेश देते. व निघते. थोड्याच वेळात ती हॉस्पिटल मध्ये पोहोचते.तिचे डोळे पाणावलेले. डॉक्टर आय सी यू मधुन बाहेर पडतात. व अपर्णा स

“ आता धोका टळलाय . पण काळजी घेतली पाहिजे.”अपर्णा डॉक्टरांना, “ मी भेटल तर चालेल ना.”

“ हो चालेल, पण शांतता पाळा. “

“ठीक” अपर्णा आत जाते. आईची कंडीशन बघते. थोड्या वेळानं बाहेर येते. व

आया, “ हा मुलगा नसता तर काही खर नव्हत.”

अपर्णा विकी जवळ जाते व आभार मानते. आया पेशंट जवळ थांबते. अपर्णा नर्सने दिलेली चिठी घेऊन औषध आणण्यास जाताना तो मी आणतो.तेव्हा ती “ नको मी जाते.”

तो ही तिच्याबरोबर मेडिकल मध्ये जातो. औषध अपर्णा घेते. पण गडबडीत तीची पर्स कंपनीत विसरली. ती नंतर देतो अस सांगताना मेडिकल वाला नकार देतो तेव्हा विकी आपले कार्ड देतो. व बील पेड करतो.

अपर्णा पैसे नंतर देते अस सांगते. व हॉस्पिटल मध्ये येते. थोड्या वेळाने विकी कामानिमित्त निघून जातो. जाताना काही गरज वाटल्यास फोन कर. असे सांगतो.

….. ……. …….

अपर्णा हॉस्पिटल मध्ये थांबते. आयाला घरी जायला सांगते. पेशंट खोलीत स्पेशल वॉर्ड मध्ये आसावरी बेड वर झोपलेली आहे. अपर्णा शेजारील बेडवर पहुडली. तिची नजर आसावरी(आईवर)आहे.ती डोळे झाकते

.स्वप्नात

लहान अपर्णा शाळेस सुट्टी असलेने खेळत आहे. तिची आई आसावरी काहीतरी विणकाम करत तिथं बेंचवर बसली आहे. इतक्यात फोन वाजतो.पलीकडून आवाज

“मॅडम तुमचा नवरा व सेक्रेटरी आज संध्याकाळी६.०० वाजता पल्लवी हॉटेलमधे भेटणार आहेत.”

आसावरी, “ पण आपण कोण बोलताय.”

“ तुमचा शुभचिंतक.”

तिकडून फोन कट होतो. आसावरी चिडते. व इकडे तिकडे फेऱ्या मारते.दिवसभर ती अस्वस्थ असते. संध्याकाळी सहा वाजतात घड्याळात सहाचे टोले पडतात. आसावरी फोनकॉल करते. तिकडून तिचा नवरा फोन घेतो.

“ हॅलो कुठे आहात.”

प्रणित, “ महत्वाच्या मिटिंग मध्ये आहे. वेळ होईल.”

तो फोन ठेवतो. मागील म्युजिकचा आवाज येत असतो..

फोन ठेवल्यावर प्राणितचा मित्र, “कुणाचा फोन होता?”

प्रणित, “ होम मिनिस्टचा”

मित्र, “ काय म्हणत होती.”

प्रणित, “ आणखी काय कुठे आहात.सांगितल मिटिंगमध्ये आहे.”

मित्र, “ सांगायचं खर काय ते.”

प्रणित, “ सांग व शंभर प्रश्नांची तयारी कर.”

असावरीला शंका येते. ती तडक आपली कार काढते. व पल्लवी हॉटेल गाठते. तिथे वाढदिवसाचा कार्यक्रम चालू असतो. अनेक लोक डान्स करत असतात. तिथे आसावरी पोहोचते. आपल्या नवऱ्याला डान्स करताना पाहते. बरोबर दुसरी बाई असते. ती कोण आहे ते पाहते. व तिला झटका बसतो. सेक्रेटरी बरोबर अफेअर असेल असे सांगून कान भरणारी तिची मैत्रीण शोभना तिला पाहताच आसावरी चिडते. व भर कार्यक्रमात तिचे व नवऱ्याचे जोरदार भांडण होते.

“ हीच मीटिंग का तुमची.”

प्रणित, “ हो का तू इथे का आलीस?”

आसावरी शोभनाकडे पहात,

“ तूच सांगत होतीस ना यांच्याबद्दल, व आता तूच माझ्या नवऱ्याला नादी लावतेस.”

शोभना, “ नादी लावयला तुझा नवरा तुझ्या ताब्यात कुठे आहे. तुझ्या शंकेखोर वागण्याला तो कंटाळला आहे.मला कशाला बोलतेस. मी काही चुकीचं सांगत नाही. व मी नादी नाही लावलं. उलट तोच लगलाय माझ्या नादी. मला कशाला बोलतेस. तुझा नवरा तुझ्या ताब्यात नाही. मला कशाला बोलतेस.”

आसावरी चिडून शोभनाच्या कानात लगावते. व नवऱ्याची गचांडी पकडुन त्यालाही दोन लगावून घरला येते.

संपूर्ण पार्टीत झालेल्या अपमानाने तो चिडतो. व घरी येतो. व रात्रीचे बारा वाजता त्यांचे पुन्हा भांडण होते.

“ तू मला मारलीस, तुझी लायकी काय? दोन रुपये कमवता येत नाहीत व फुशारक्या मारतेस.”

आसावरी, “ माझी लायकी काढायला तू एक मामुली नोकर माझ्या बाबांनी तुला इथे आणलं. नाहीतर त्या दोन बाय दोनच्या खोलीत बसला असतास सडत. माझीच बुध्दी भ्रष्ट झाली होती म्हणून मी तुझ्या प्रेमात पडले. तुझ्या भूलथापांना बळी पडले. व आता पच्छाताप होतोय खरंच मी ऐकलं नाही घरच्यांचं. तू लग्ना आधी कसा होतास. व आता पैसा आल्यावर तुझ हे वागणं पाहिल्यावर माझा प्रेमावरील विश्वास उडालाय.”

प्रणित, “उडालाय ना विश्वास मग कर मला मोकळ, जेव्हा तेव्हा शंका घेत असतेस.”

आसावरी, “ कुठलीही गोष्ट पाहिल्याशिवाय मी विश्वास ठेवत नाही. तू लबाड व ढोंगी आहेस. खोट्या शपथा घेणारा तू , तुला अस कस मी मोकळं करेन.माझी मुलं कुठे जातील त्यांकडे बघून सोसतेय नाहीतर हा बंगला गाडी ऐश्वर्याचा हव्यास असता तर मी तुला कधीच जवळ केलंच नसत.”

प्रणित, “ हे बघ तुझ व माझं कधीच पटायचं नाही. त्यापेक्षा आपण वेगळं झालेलं बर.”

आसावरी, “तुला रान मोकळं मी देणार नाही. तू वाईट विचारांचा झालयेस पैशाच्या जोरावर तू मला लाठाडतोयस तो पैसाच तुझ्याजवळ राहणार नाही.”

प्रणित, “ मला शाप देतेस, आधी तुझ्या माहेरच बघ. तो तुझा भाऊ आयाशी आहे.त्यानं सगळ लुटल. व आता भिकारी आहे. व तू जे बोलतेस थोबाड आवर तुझ व चालती हो इथून.”

आसावरी व प्रणित मध्ये खूप झगडा होतो. तोही दारूच्या नशेत बरेच बळलतो.आसावरी मुलांना घेते. व तडक माहेरी जाते.

….. …… ……

इतक्यात दरवाजा वाजतो नर्स चेकपला आलेली असते. अपर्णा जागी होते. ती रुटिंग चेकपला आलेल्या नर्सला मदत करते. चेकप पूर्ण होते.

“ नॉर्मल आहे. काळजी नसावी.”

अपर्णा, “ बर, तिला आणखी काही द्यावे लागणार आहे का?”

नर्स, “ आता पर्यंत पाहता नॉर्मल जेवण द्या. सकाळी.”

नर्स निघून जाते. अपर्णा असावरीच्या पांढऱ्या केसातून हात फिरवते. तिला कोर्टातील प्रसंग आठवतो.

सिटी कोर्टामध्ये तिचे बाबा मामा मामी आई आसावरी तसेच वकील व इतर मान्यवर मंडळी बसले आहेत. कोर्ट निर्णय सूनावते.

‘ सर्व प्रकारची दलीले एकूण हा निर्णय घेण्यात येतो कि मिस्टर प्रणित भालदार व आसावरी भालदार यांना डीबोज देण्यात येतो. तसेच मुलगा शुभम याची कस्टडी त्याचे वडील तर मुलगी अपर्णाची आई आसावरी भालदार यांकडे सोपवणेत येते. तसेच प्रणित भालदार यांनी आसावरी भालदार यांना पोटगी खातर दहा लाख रुपये देणे तसेच त्यांचा पुणे इथला सध्या बंद असलेला सिंहगडरोडचा बंगला त्यांना देणे अगत्याचे आहे.’

कोर्टाच्या बाहेर पडताना

आसावरी मुलीला आपल्या कारमध्ये बसवते आहे. अपर्णा रडत आहे. प्रणित जवळ रडवेल्या स्थितीत शुभम उभा आहे.कारमध्ये बसताना

प्रणित, “ आसावरी तुला या गोष्टीचा पश्र्चाताप होईल.”

आसावरी, “ बघू काय होत ते?”

मामी (कारमध्ये बसल्यावर) “ वाटल होत आर्धितरी जायदाद मिळेल इथ पण पानं पुसली तोंडाला.”

कार निघून जाते.प्रणित आपल्या मुलास घेऊन निघतो.

…,. …….

डोंगरी भागातील स्कूल जिथे हॉस्टेलची सोय ही आहे.तिथे प्रणित शुभमला एडमिशन घेतो. तिथली फी पेड करतो. व शुभमला सूचना देतो व निघून येतो.

आसावरी भावाच्या घरी राहत होती.थोड्याच दिवसात असवरीचा भाऊ सखाराम व वहिनी संगिता सर्व पैसे गोड बोलून काढून घेतात.असावरीला पाहून

“ हे बघा तुमची बहीण आहे ना मग मागा थोडे पैसे त्यात काय एवढं. देऊ नंतर नाहीतर आपल्याकडेच राहणार आहेत ना आता.”

“अग हळू बोल ताई ऐकेल काय वाटेल तिला.”

आसावरी तिकडे येते. “.काय झालं वहिनी .”

“काय नाही हो वन्स तुमच्या भावाला लोकांची देणी चुकवायची आहेत. त्यासाठी पैसे पाहिजेत. नंतर देतो म्हणतेत द्याल ना, थोडे उसने.”

आसावरी, “ दादा किती पाहिजेत, जास्ती नको फक्त तीन लाख”

“ ठीक आहे, हे घे चेक.”

आसावरी चेक काढून देते. थोड्या दिवसात त्यांचे पैसे संपतात कोणत्या ना कोणत्या कारणाने ती पैसे घेतात. व एके दिवशी.असावरीला बंगला विकण्यास सांगतात ती नकार देते.

संगीता नवऱ्याशी , “ हे बघा मला एवढ्या लोकांचं काम जमणार नाही. एकतर बिन काम करता रहातात व खर्च पण आपणच बघायचा ते काही नाही एक तर ती राहील नाहीतर मी, निघाले मी माहेरी.”

सखाराम, “ कुठे जाईल बिचारी थोडी तरी दया कर.”

“ ते काहीं नाही .फुकट पोसायला इथे काय माहेरी गठ्ठोल पूरुन ठेवले आहे काय.”

आसावरी, “ आतापर्यंत माझ्याच पैशावर चैन केली. व लगेच डोळे दाखवतेस होय. सरडा ही रंग बदलायला वेळ लावेल पण तू नाही. माझ्या वडिलांची प्रॉपर्टी खाऊन तूच संपवली. व आता माझ्या बंगल्यावर तुझा डोळा,ते काही नाही निघते मी.आई बापाच्या मागे मुलीचं माहेर ही परकं होत हे आता कळलं मला.”

“कळलं ना मग निघा इथून.”

संगीता त्यांच्या बॅगा घराबाहेर फेकते. त्या घेऊन आसावरी छोट्या अपर्णाला घेऊन घराबाहेर पडते व आपल्या बंगल्यावर येते. व दार उघडते.

…….. …….. …….

इतक्यात सकाळ होते. अपर्णा भानावर येते.थोड्या वेळाने कंपनी मालक रमाकांत व सिद्धार्थ पाहायला येतात.

 रमाकांत, “ कशी आहे तब्येत आईची.”

अपर्णा, “ आहे आता बरी, झोपलेय आता.”

रमाकांत, “ काळजी घे, लागले तर पैसे माग. मी डॉक्टरांना भेटून येतो.”

रमाकांत पुढे डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातात. तितक्यात विकी तिथं येतो.

सिद्धार्थ, “ किती काळजी घेशील अजूनही सांगतो माझं एक व लग्न कर माझ्याशी अस सरकारी हॉस्पिटलमध्ये नाही यावे लागणार तुला. डॉक्टर घरामध्ये येतील. राणीसारख ठेवीन.”

अपर्णा, “ माझा बाप पण असेच म्हणत होता माझ्या आईला. त्याच उदाहरण बघतोयच ना पुढ्यात. माझ्या, नाद सोड तू माझा. ”

सिद्धार्थ, “ हा तुझा अंदाज मला वेड लावुन जातो ग.”

इतक्यात तिथे विकी येतो. सिद्धार्थ बोलणे थांबवतो पण त्यांचं बोलंन ऐकु येत. त्याला बघून तो रागानच “हा दीड दमडीचा मेकॅनिकल काय सुख देणार.अजून विचार कर.”

अपर्णा, “ सुख माझं कशात आहे ते मी ठरवेन तू शिकवू नकोस.”

सिद्धार्थ, “ काय आहे याच्यात एवढं”

अपर्णा, “ माणुसकी आहे.”

सिद्धार्थ, “ मग काय लग्न करणार आहेस.”

अपर्णा, “ हो करणार आहे. मी याच्याशी लग्न तुझा काय प्रॉब्लेम आहे.”

सिद्धार्थ, “ मी रस्त्यावर आणेन तुला.”

अपर्णा, “ चालेल तयार आहे मी, सोडू नोकरी का?”

इतक्यात रमाकांत तिथे येतात. व अपर्णाचा निरोप घेतात. व निघून जातात.

विकिकडे पाहून अपर्णा , “बोला तुम्हाला काय हवंय कार दुरुस्तीचे बील की सेवेचं बील जे माझ्या आईला इथे अडमिट करायचा खरचं.”

आया, “ बेबी कुणाचा राग कुणावर काढतेस तो चांगला मुलगा आहे. त्यामुळेच तुझी आई वाचली.”

अपर्णा, “ मला या चांगुलपणाची भीती वाटते. बोला तुमचा खर्च किती झाला.”

अपर्णाचे डोळे पाणावले होते. विकीला काही सुचत नव्हते. तरीही तो बोलला ठीक आहे द्या तर मग ३४७० रुपये “

अपर्णा थांबा म्हणते व हॉस्पिटल शेजारी असणाऱ्या ए टी एम मशीन मधून रुपये काढून देते. व नमस्कार करून निरोप घेते.

ती हॉस्पिटल मध्ये जाताना तो तिच्या पाठमोऱ्या देहाकडे एकटक पहात होता. तो हसला व म्हणाला तू कितीही मला लांब कर मी तितका जवळ येणार तू या विशालचीच फक्त आहेस. तू मला नाही पण मी तुला ओळखले बेबी. तो निघतो.

…. …… …… …..

शिवनेरी गॅरेज सर्वजण शांत बसलेत मूड हाफ आहे. नाराज आहेत.

विन्या, “ नकार दिला ना, सोड आता तीची अपेक्षा, कोणा श्रीमंताला करून घ्यायची असेल.”

सुहास, “ गप ती तशी नाहीयेय कारण दुसरच आहे.”

मोन्या, “ कोणत कारण असेल, “

प्रतिक, “ सोड यार मिळेल दुसरी. जास्त विचार नको करू.”

विशाल उठतो ते काही नाही ती माझीच आहे. माझी लहानपणीची मैत्रीण तिचं माझ्याशीच फक्त लग्न होणार.”

विन्या, “ तिचं तुझी मैत्रीण कशी?”

विकी, “ मी पाहिलंय तिचं घर तिथे मी माझी एक वस्तू पाहिलीय.तिचं आहे माझी बालणीची सखी.”

इतक्यात एक जीप येते. त्यातून काही गुंड उतरतात जे सिद्धार्थ ने पाठवलेले असतात. ते तिथे विकी कोण आहे.असे बोलून दंगा करू पाहतात.

विकी, “ मी आहे,बोला.”

एक गुंड, “ हे बघ हाड पाहिजे असतील तर नाद सोड त्या मुलीचा”

विशाल, “ तिचा नाद मी तर लग्नाचं बोलतोय , तुम्ही कोण वर्हाडी काय.”

दुसरा गुंड, “ अरे उचल याला याची वरात काढू.”

एकजण पुढें होतो .विशाल त्याला उचलून आपटतो. दुसऱ्याला फिरून जीपमध्ये टाकतो. एकामागून एक सर्वांची धुलाई करतो. व जीपमध्ये घालून सिद्धार्थच्या बंगल्यावर नेऊन टाकतो. व त्यास बाहेरून,

“ किती जणांना पाठवायचे ते पाठव त्यांची गत हीच होणार. तू वाट बघ तिची ती फक्त माझीच.”

तो स्टाईलमध्ये निघून येतो.

……….., …… ……..

दुसऱ्या दिवशी अपर्णा हॉस्पिटल मध्ये असताना विकी तिथे येतो. अपर्णा जवळ येऊन बसतो. अपर्णा त्याकडे पहाते. तो तिच्याजवळ आपल्या कडील गुलाब देत प्रपोज करतो.

अपर्णा त्याला

“ मी तुझ्यावर प्रेम नाही करत.सिद्धार्थचा ससेमिरा चुकवणेसाठी मी ते म्हणाले.”

विकी, “ पण मी सिरियस आहे.”

“ तुला पण पैशाची भुरळ पडली काय.”

विकी, “ मी पैशाला नाही विचारत.”

अपर्णा, “ पण मी तुझ्याकडे त्या नजरेनं नाही पाहिलं. व तू एक मेकॅनिकल मी अस कस हो म्हणू.तुझे व माझे क्षेत्र वेगळे कसं जुळणार विचार.”

विकी, “ कोण म्हणत आपले विचार जुळणार नाही. मी जुळूवून आणीन. व तूच ते कबूल करशील.”

तो निघून जातो.

….. …… ......

अपर्णा डिस्चार्ज घेऊन आईला घरी नेते. व कामावर रुजू होते. संगणकातील गडबडी लक्षात घेत व शिपायास बोलावून

“माझ्या संगणकाला कोणी हात लावला होता का.”

शिपाई, “ सिद्धार्थ साहेब आले होते.”

अपर्णा संगणक चेक करते. महत्त्वाची कागदपत्रे ती तपासून पाहते व त्यातील मजकूर रमाकांत ना पाठवते. ते बाहेर प्रदेशी असतात. व महत्वाच्या फाईली बाबत कल्पना देते.ज्यामध्ये नविन प्लांट जो असतो त्याची व सिद्धार्थच्या वागण्याची कल्पना देते. व शांतपणे आपल्या खुर्चीवर बसते. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजते. ती फोन उचलते. पलीकडून

“ कशी आहेस अपर्णा.”

खूप दिवसांनी तो आवाज पण ओळखीचा वाटत होता. तिने विचारलं , “ कोण आहे.”

शुभम, “ मी तुझा दादा शुभम.”

“ लवकर आठवण झाली बहिणीची जिवंत आहे का नाही ते पाहतोयस.”

“ अस टोचून का बोलतेस."

“ टोचून बोलू नाहीतर काय करू आई बाबांचा डीबोज व शिक्षा मला का? मी काय गुन्हा केला. मला अनाथासारख राहावं लागल . तू व बाबांनी माझी साधी चौकशी पण नाही केलीत. ती बाई जिच्या घरात नोकर राबत होते. तिला रोज एकाच्या घरात मोलकरीणी सारखं काम करावं लागलं . थोड्याशा पूरषी अहांकरासाठी काय मिळवले त्यांनी शेवटी आलेच ना रस्त्यावर.”

“ हे बघ मी येतोय आता तिकडे.”

“ कशाला जिवंत आहे का ते बघायला अजून ती, मी आहे काळजी घ्यायला तिची.”

“ हे बघ सर्व काही एकामुळेच नाही घडले चूक कोणाची यापेक्षा आता त्यांना जवळ आणून आपण पुन्हा सुरुवात कराय हवी.”

“ बर , तुला सांगायचे राहिलं काल तिची तब्येत बिघडली होती.”

“ काय ?”

“ आता ठीक आहे.”

“मी येतोय बाबांना घेऊन माझे काम झालेय. आपण आपल्या त्या जुन्या घरात पुन्हा सुरुवात करुया. माझं इथले कामकाज संपले. व मी भारतात सेटल व्हायचं ठरवलंय.”

“ बर, कधी येतोयेस”

“पुढील आठवड्यात”

तो फोन ठेवतो.ती आपल्या केबिनमध्ये खुर्चीत बसते. व डोळे झाकलेले. मनात अनेक विचारचक्र. तिला घर खर्च चालवणारी आई आसावरी दिसते. लोकांच्या घरात भांडी धुणी करणारी, ते लोक वाटेल तसे बोलतात. प्रसंगी कमी पगार देणारे तसेच , कधी तर त्या दोघी पाणी पिऊन उपाशी झोपलेल्या ,.स्कूल मधून आल्यावर ती आई आई करत ती काम करणाऱ्या ठिकाणी गेलेली व तेथील कामाच्य मोबदल्यवरून होणारे वाद सर्व तिला आठवतात. व तिचे डोळे पाणावतात.

इतक्यात एक बुके येतो. त्यावर हॅप्पी बर्थडे असे लिहिलेले असते.

आज माझा वाढ दिवस ही तारीख तर फक्त माझ्या घरीच माहीत. हा कोणी पाठवलाय. ती पहाते.

विकीने पाठवलाय हे तिला कळते. त्या सोबत चाफ्याची फुले असतात. ती फुले घेऊन वास घेते.

……. …… ………

स्कूल वेळे पूर्वी आठवीत शिकणारी अपर्णा रस्त्यावर काही फुले व गुच्छ विकत असते. तेव्हा तिच्या समोर एक कार उभी राहते.त्यातून तिचे बाबा प्रणित उतरतात त्याच्या बरोबर एक महिला असते. ती दोघे कुठेतरी फंक्शनला निघालेले असतात. फुले घेताना ते अपर्णास ओळखतात .पण त्यांबरोबर असणारी महिला त्यांना तिच्याबरोबर बोलू देत नाही. अपर्णा जवळ जाऊन

“ बुके हवाय.”

अपर्णा मागे वळून बुके देत. “ बाबा.”

“तू फुले विकतेस, काय वेळ आणली तुझ्यावर.तू चल घरी.”

“ आणि आई.”

“ तिचं नाव नको तिला तेथे जागा नाही.”

“ मग मी तिथे येऊन काय करू.”

“ ही बघ तुझी नवीन आई.”

“ जन्मदात्या आईला सोडून मी या बाईला आई म्हणू. ते नाही जमणार.”

इतक्यात ती स्री” हे बघा मला ही मुलगी किती उध्दट आहे. तिच्या आई सारखीच आहे.”

“ असणारच तुझ्यासारखी नाही स्वतच्या मैत्रिणीच्या नवऱ्यावर डोळे ठेवणारीने मला अक्कल शिकवू नये.”

“ चला इथुन नको ती फुले दुसरीकडे घेऊ.”

ते तिथून निघून जातात. थोड्याच दिवसात त्यांची कंपनीत फ्रोड होतो व ती लिलावात जाते. व प्रणित रस्त्यावर येतो. एक बंगला व एक दहा एकर जमिनीचा तुकडा शिल्लक राहतो व पंचवीस लाख प्रणितच्या पैशावर आयाशी करणाऱ्या पर्या त्याला सोडून जातात. त्याला पश्चाताप होतो. तो आपल्या मुलाला फॉरेनची स्कॉलरशिप मिळालेली असते. त्याला काही रक्कम टाकून परदेशी पाठवतो. व आपण छोटे मोठे काम करत गुजराण करु लागतो.

….. ….. ….. …..

बेल वाजते. अपर्णा स्वप्नातून बाहेर येते. तेवढ्यात दार उघडून सिद्धार्थ आत येतो. तो चिडलेला असतो.

अपर्णा, “ एखाद्या ऑफिस मध्ये जाताना विचारायची पद्धत असते माहीत नाही का तुला.”

सिद्धार्थ, “ मला ती फाईल हविये.”

अपर्णा, “ कोणती फाईल.”

सिद्धार्थ, “ निर्मळ प्रोजेक्टची.”

अपर्णा, “ त्याचा तुझ्याशी संबंध नाही.”

सिद्धार्थ, “ मला माहित आहे. की तू तो प्रोजेक्ट चालू करतेस.”

अपर्णा, “ होय माझा प्रोजेक्ट आहे तो. तुझा काहीही संबंध नाही त्याच्याशी.”

सिद्धार्थ, “ मी कुठे म्हणतोय माझा प्रोजेक्ट आपला होईल जेव्हा तू माझी होशील.”

अपर्णा, “ स्वप्न पाहू नकोस. माझं ठरलंय”

सिद्धार्थ निघून जातो.तो चिडलेला असतो.

…. …… …… …….

अपर्णाच्या सांगण्याने रमाकांत आपल्या कंपनीची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतात. व सिद्धार्थला काढून टाकतात. अपर्णाचा भाऊ परदेशातून येतो. ती त्याच्या मदतीने आपल्या वडिलांच्या जागेवर जी शिल्लक असते. तिच्यावर नवीन फॅक्टरी उभा करते. त्यासाठी ते दोघे आपले थोडे पैसे खर्चतात. फॅक्टरी चालू होते. जोमाने चालू होते. कंपनीच्या विभागणीत ती पार्टनर असते.त्यामुळे तिच्या वहिनीला वाटते. की अपर्णाचे व आपल्या भावाचे लग्न व्हावे. तेव्हा ती ते नाकारते. व एकत्र रहानेस ही नकार देते.

……… ……. …….

जेवण हॉल डायानिंग टेबल वर सर्व जेवणास बसलेत.

वहिनी शुभ्रा, “ काय अपर्णा लग्नाचा विचार केलास की नाही.”

अपर्णा, “ चाललाय.”

शुभ्रा, “ माझ्याकडे एक स्थळ आहे. माझा भाऊ आहे. खूप शिकलेला मोठी कंपनी सांभाळतो. हरकत नसेल तर बोलू का.”

शुभम, “ कोण अजित का.”

अपर्णा, “ मी पाहिलेय स्थळ वेळ आल्यावर सांगेन. या अक्षता टाकायला.”

शुभ्रा, “ पण मुलगा कोण आहे. काय काम करतो. ते तरी माहीत पाहिजे. सांग तरी कोण ते. की आपल्याकडे जेवायला बोलाव त्याला”

अपर्णा, “ नको मी सांगेन तुम्हाला.”

शुभम, “ अस कसं, आता सर्व राग विसरून एकत्र राहूया.”

अपर्णा, “ नाही दादा, आज आईकडे पहाता तिची तब्येत ठीक नसते. व मला तिला त्रास होईल असे काही करायचे नाही. व कधीही थोडक्यात गोडी असते. मला वाटतं आपण व्यावहारिक भागिदरिवीषयी बोलूया. फॅमिली नको कारण हे सांधे आता जुळणार नाहीत”

“ अस म्हणू नकोस चुकीला माफिने उत्तर द्यावे.” शुब्रा

“ पण माझे नाते माफीच्याही पलीकडे गेले आहे.”

प्रणित, “ राहू दे जगू द्या तिला तिच्यासारखं मी खूप त्रास दिलाय जेव्हा मुलीला बापाच्या मायेची गरज होती तेव्हा मी धुंदित चुकीचे केले . माझी जबाबदारी ओळखली नाही. व आता सर्व ठीक आले असताना पण ही दरी आहेच.”

अपर्णा जेवण आटोपते. व निघते. कंपनी उभारत असताना तिने कधी रमाकांत यांच्या कंपनीकडे दुर्लक्ष केले नव्हते. त्या कंपनीचा कारभार ती नीट पहात होती.

… …. ….. …..

निर्मळ प्रोजेक्ट हातातून गेल्यामुळे व अपर्णाच्या सांगण्याने रमाकांत यांनी बेदखल केल्याने सिद्धार्थ चिडून अपर्णास धडा शिकवण्यासाठी तिला उचलून न्यायचं ठरवून एका गुंडास सुपारी देतो.कुणालाही न कळता तिला किडन्याप करतात.

अपर्णास घरी फोन येतो.

सेक्रेटरी, “ मॅडम महत्वाच्या मिटिंगसाठी आपल्याला बोलवले आहे. आपल्यासाठी कार पाठवली आहे.”

अपर्णा, “ पण माझ्या नोटमध्ये नाहीये.”

सेक्रेटरी, “ अचानक ठरलीय.रमाकांत सरांनी सांगितले.”

अपर्णा, “ बर मी फोन करते ड्रायव्हरला.”

सेक्रेटरी, “ त्याची काही गरज नाही. मॅडम , “मी सोय केलेय ड्रायव्हर आजारी असलेने कार पाठवतो तुम्हाला.”

अपर्णा , “ ठीक आहे.”

थोड्या वेळात कार दारात हजर होते. ब्लू कलरची कार अपर्णा आयेस सूचना देऊन आपल्या आईचा आशीर्वाद घेते.. व मी आलोच मिटिंगला असे म्हणून ती निघते. कार मध्ये बसताना ती ड्रायव्हरला विचारते. “ मिटिंग कुठे आहे.”

ड्रायव्हर, “सिटी बाहेर एका हॉलवर आहे. मला तुम्हाला पोहचवून पुढे दुसरीकडे जायचे आहे.”

अपर्णा कार मध्ये बसते व कार निघते. आया तिला बाहेर सोडायला आलेली असते. कार निघून जाते.

… … …. …..

पुढे थोड्या अंतरावर कार एका ठिकाणी थांबते. दोन गुंड त्यात प्रवेश करतात.

अपर्णा, “ कोण तुम्ही व हे काय चाललंय. “

ड्रायव्हर, “ तुम्हाला योग्य ठिकाणी पोचवले जाणार आहे.शांत राहशील तर ठीक नाहीतर.”

एक गुंड पिस्तूल डोक्यावर लावतो. व “गप्प बस नाहीतर वरच पाठविन.”

“ अरे जपून साहेबांचं प्रेम आहे तिच्यावर उगीच त्रास देऊ नकोस.”

अपर्णास समजले की हे गुंड सिद्धार्थने पाठवलेत. तिने शांत राहणे पसंत केले. थोड्या वेळाने तिचे डोळे बंद केले. तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली. तिने डोळे बांधताना शेवटचा पॉइंट ओळखला. व ती बंद डोळ्याने अंक मोजू लागली. व टर्न पाहू लागली. थोड्या वेळाने एका बंद फॅक्टरीत कार पोहोचते. तिथे एका खोलीत तिला एका ठिकाणी बांधण्यात येते.

 थोड्या वेळाने तिथे सिद्धार्थ येतो. अपर्णास ठेवलेल्या ठिकाणी येतो. व तिच्याकडे तिरकस पणे पहात.

“ काय मॅडम कस वाटतंय, प्रेमाने मानसं जेव्हा ऐकत नाहीत ना, तेव्हा अस जबरदस्ती काम करावं लागतंय बघ. तुला राणी करायचं ठरवलं आणि तू त्या फडतुस मेकॅनिकलचे स्वप्न रंगवतेस .”

अपर्णा, “ तू रोज रात्रीला पब मध्ये जाऊन गुण उधळणारा , त्यापेक्षा तो मेकॅनिकल बरा.”

सिद्धार्थ तिच्यावर हात उगारतो. पण कंट्रोल करून बांधा हिला अन्न पाणी काही देऊ नका. आपोआप उपाशी राहिल्यावर शुद्धीवर येईल. व कागदपत्रे कुठे आहेत ते सांगेल.”

अपर्णा, “ कित्येक दिवस उपाशी राहण्याचा अनुभव आहे मला. या जन्मात तरी तुझ्या मनोकामना मी पूर्ण होऊ देतं नाही.”

तो चिडतो. अपर्णास पुन्हा बांधून घातले जाते. व तिथे पहारा ठेवून तो निघून जातो.

….. ….. ……

एक हॉटेल रूम सिद्धार्थ व अपर्णाची सेक्रेटरी एका रूम मध्ये. सिद्धार्थ तिला एका वेगळ्या सिम वरून फोन कॉलकरून पोलिसांना कॉल लावून एक चिठ्ठी देतो. व कॉल करायला सांगतो. ते दोघे तिथून निघतात. व पुढे एका सूनसान ठिकाणी कार थांबवते व तिला सिद्धार्थ कॉल करायला लावतो.

ती फोन करते.

“ हॅलो पोलिस स्टेशन वाचवा मला मला शिवनेरी गॅरेजच्या मेकॅनिकल.विकीने किडण्याप केलंय व एका अज्ञात ठिकाणी ठेवलंय प्लीज वाचवा माझ्या जीवितास धोका आहे.. हॅलो, हॅलो, प्लीज. .. आ…आ.”

ती ठेवते. तिकडे पोलीस ऐकून कॉल ट्रेस करतात. ती कॉल ठेवून हसते.

इतक्यात तिच्या गळ्याभोवती स्कार्फ आवळल गेला. थोडावेळ तडफड बाकी शांत. सिद्धार्थ पुढे ड्रायव्हरला

“ धर उचल व फेक तिकडे.जाऊ दे दरीत.खावू देत गिधाडं तेवढेच पुण्य.”

ड्रायव्हर हसतो. व तिला उचलून दरीत फेकले जाते. तो हसत, “ सालि गळ्यातच पडली होती. एकदाची संपवली. आता मेकॅनिकल जेलात, व अपर्णा माझ्या मिठीत. चल .” पण तिचे शव एका झाडावर अडकते. ते तिथून निघतात.

…..

पोलिस शिवनेरी गरेजवर जातात. विकीला पोलिस स्स्टेशनला चलायला सांगतात.

“ इथे विकी कोण आहे?” एक पोलिस.

“ मी आहे.” दुरुस्त करणाऱ्या कार खालून बाहेर येत. सर्व आश्चर्याने पाहतात.

“ चल लई शहाणा झालास होय. चल जरा तूझी गाडी दुरुस्त करू लई गाड्या दुरुस्त करतोस म्हणे.”

विकी, “ अस का बोलताय.”

पोलिस, “ काही नाही तुझी खातीरदारी करायची आहे. चल बस जीपमध्ये, टाका रे याला आत.”

पोलीस त्याला पकडुन जीपमध्ये घालतात. त्याचे सहकारी.

वित्क्या, “ काय साहेब त्यानं काय केलंय.”

पोलीस, “ एका मुलीचं अपहरण केले फोन आला होता. चौकशी साठी बोलवले आहे. चला.”

पोलिस विकीला घेऊन जातात.त्याचे मित्र गॅरेज बंद करून त्याच्या मागे जातात.

….. ….. ….

पोलिस स्टेशनमध्ये त्याची चौकशी करतात. “ अशोका कंपनीची सेक्रेटरी तिचं तू अपहरण केलं आहेस. असे समजले आहे.”

“नाही साहेब मी जर असे केले असते तर आता इथे असा उभा नसतो. हे माझ्यावर कुभांड रचल आहे.”

“ते कळेलच. कोणी काय केलय ते. तोपर्यंत जा लॉकप मध्ये.”

पोलिसांची दुसरी टीम कॉल ट्रेस करते. व कॉल आलेल्या ठिकाणी माग घेत जाते.तिथे गेल्यावर त्यांना इकडे तिकडे शोधताना दरीच्या साईटला एक लाश सापडते. ती तपासली जाते. व तिचा पोस्टमाटेम केला जातो. व स्टेशनला कळवले जाते. व तोपर्यंत पोलिस विकीला चोप देतात…..

..,……. ….

इकडे अपर्णा घरी न आल्याने व कॉल न लागल्याने आया तिच्या भावास फोन करते.

“ हॅलो शुभम भाऊ अपर्णा बेबी आलेय काय.”

“नाहीये का .”

“ बराच वेळ झालंय बेबीचा कॉल नाही आलाय. एरवी दुपारी मॅडमची चौकशी करते. पण आज नाही आला. आसावरी म्यामच्या गोळया संपलेत कॉल करताना लागतच नाही. तुम्ही बघा ना.”

शुभम, “ बघतो मी, आईच्या मेडीसिनचा फोटो पाठव मी आणतो.”

आया फोटो सेंट करते मेडीसिनच शुभम लगेच आपल्या बाबां बरोबर निघतो. व अपर्णाच्या घरी पोहोचतो. अपर्णास फोन लावण्याचा प्रयत्न करतो. तो लागत नाही.

आईची औषधे देतो. तिथे बायकोस थांबवून तो पोलिस स्टेशन मध्ये जातो.

पोलीस स्टेशनमध्ये

“ हॅलो सर मला कंप्लेंट द्यायची आहे.” शुभम

पोलिस मधुकर हवालदार, “ बोला काय तक्रार आहे.”

 शुभम, “ माझी बहीण अपर्णा सकाळी फोन आल्यावर कंपनीस गेली होती.पण अजून परत नाही आली. व कॉल पण अटेंड करत नाही.”

“कधीपासून.” हवालदार.

“सकाळपासून.” शुभम.

पोलीस आयाला सगळी माहिती विचारतात. व नोंदवतात.

इतक्यात आतून पोलीस विकीला मारत असलेले आवाज येतात.

आया आवाज ओळखून वाकून बघते.

“ अरे हा तर विकी बाबू आहे.” आया.

शुभम पाहतो. व

“ याला कशासाठी पकडले.”

“ मर्डर केलाय याने एका मुलीचा.”

“काय कोणाचा.” शुभम

“ अशोका कंपनीच्या सेक्रेटरीचा.” हवालदार.

“ काय , माझी बहिण तिथेच काम करते. पण हा तर तिच्या ओळखीचा आहे. तो अस करणार नाही.”शुभम

“ हो साहेब मी ओळखते याला. मॅडम ची आई आजारी असताना याने मदत केली होती. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.”

थोड्याच वेळात दुसरा पोलिस तिथं येतो. व सर्व रिपोर्ट देत. म्याप दाखवत

“ सर काल जो कॉल आला होता. तो या पूर्वी जवळ जवळ खूप वेळ पल्लवी हॉटेल मध्ये ॲक्टिव होता. नंतर घटना स्थलावर तो कॉल केल्यावर बंद झाला. व तिथे सर्च करताना मोबाईल सापडला पण सिम नाही. बराच वेळ तिथं शोधल नाही सापडलं. व आपण सांगितलेलं त्या नुसार विकी उर्फ विशालचा कॉल ट्रेस केला तेव्हा तो काळ संध्याकाळी मूव्ही बघायला तो गेला होता. तिथे त्याचा नंबर ॲक्टिव होता. व तेथील सी सी टिव्हीत तो दिसला . व त्याच वेळी इकडे खून झाला. एकच माणूस एकावेळी दोन ठिकाणी असू शकत नाही. व या दोन स्थळातील अंतर एवढे आहे की इतक्या लवकर तो तिथे पोहचू शकत नाही. आपल्याला गुमराह केलं जातंय.

इन्स्पेकटर रवी शुक्ल,” हे बघा त्याला सोडा म्हणावं. व तपासाला सुरुवात करा त्या सेक्रेटरीची बॉस ही गायब आहे. मला तर हे षडयंत्र वाटतंय.”

ठिक आहे ते विकीला सोडतात. व मलमपट्टी करतात. शुभम विकीला घेऊन जातो. खूप मारल्यामुळे त्याचे अंग दुखत होते.तो एका खाटेवर झोपलेला आहे. त्याच्या कपाळावर पट्टी आहे.इतक्यात त्याला स्वप्न पडते. तो जागा होतो. स्वप्नात त्याला अपर्णा दिसते.तो जागा होतो. व तिथून बाहेर पडतो.पोलीस्टेशन मध्ये त्यानं काही ऐकलं होत.त्यावरून अंदाज बांधला. ही साजीस सिधार्थनेच केली असणार. व तो तडक बाहेर पडतो. व कॉल करतो.

“ हॅलो प्रतिक माझी गाडी घेऊन ये इथेचे अपर्णाचे घरी.”

प्रतिक, बाईक घेऊन येतो. व विकिस् देतो. व सिद्धार्थच्या मोबाईल लोकेशन ट्रेस करतो. व त्याला त्याचे लोकेशन समजते. तो जाताना पाहून शुभम मी पण येतो.ते दोघे निघतात.जाताना तो इशारा करतो. प्रतिक समजतो. व कॉल करून आपल्या मित्रांना बोलवतो..

………. ……….

तिन दिवस उपाशी अवस्थेत अपर्णा तब्येत खालावलेली असते. तिला एका खुर्चीवर बांधले आहे. ती तहानलेली आहे. तिची पाण्यासाठी तडपड आहे. एक गुंड तिला पाणी पाजण्यास नेतो व तिच्या समोर ओततो.ती रागीट नजरेने पाहते.इतक्यात. कॉल वाजतो. तेथील गुंड फोन उचलतो. पलिकडून

सिद्धार्थ, “ काय झालं मॅडम काय म्हणतात.”

गुंड, “ बाई लई खवाट हाय, ट्स काय मस् होत नाही काय काय केलं. उपाशी आहे. दोन दिवस काय करायचं साहेब.”

“ पाणी पाजा तिला फक्त. थोड्या वेळात येतो मी तिकडे.” सिद्धार्थ.

ते तिला पाणी पाजतात. सिद्धार्थच्या बंगल्या बाहेर काही अंतरावर.विकी थांबलेला. थोड्याच वेळात त्याचा मित्र विन्या व प्रतिक येतो. ते एक मशीन देतात. विकी ते घेऊन नजर चुकवून आत जातो वाचमनला बेशुद्ध करून बंगल्याच्या अडोशाल नेऊन लपवतो व त्याची कपडे आपण घालून तिथे थांबतो.थोड्या वेळाने ड्रायव्हर गाडी काढत असताना त्या गाडीस मशीन लावतो. कार निघते. सिद्धार्थ कारमध्ये बसतो. कार निघते. व वाचमन विकी नजर चुकवत. गेट उघडतो. कार निघते.

विकी गेट बंद करून आपल्या गाडीकडे जातो. व ब्यागेमधील मशीन द्वारे ट्रेस करून पत्ता लावतो.

……. …… …..

सिद्धार्थच्या कारचा मागं काढत ते शहराबाहेर जातात. तिथून पुढे डोंगर व अत्यंत दाट जंगल सानिध्यात असणाऱ्या एका जुन्या कंपनीच्या गोडावून मध्ये बाहेर मोठा पहारा तिथे परिसरात आल्यावर विकी व त्याचे मित्र आपल्या गाड्या दाट झाडीत लपवतात. व विकी आपल्याकडील छोटा ड्रोन काढतो आणि वर उडवून तेथील सर्व प्रकारची माहिती घेतो. व योजना आखून आपल्या मित्रांना सांगतो. व ते सर्व चार बाजूने एक एक गुंडांना उडवत पुढे चालतात. थोड्याच वेळात ते सर्व बाहेरून एक एक गुंडांना मारत मेन बिल्डिंग मध्ये येतात.

……,…

बिल्डिंग मध्ये आल्यावर तेथे. सिद्धार्थ आपली कार लावून आत मध्ये जातो. तिथे अपर्णास .

“ काय मॅडम कसं काय हवापाणी मानवते काय. अजून सांगतोय माझ्याशी विवाह कर. सगळ्यांची मालकीण तुला बनवून .”

“ अरे, जा कपडे बदलल्याप्रमाणे तू बायका बदलणारा तुला निर्मळ प्रोजेक्टची जागा हडपयची आहे. कारण ती सोन्याचे अंड देणारी कोमडी आहे. तू एकदा जमीन नावावर झाली की सख्या बापालापण सोडणार नाही. व मी तर कुणाची कोण चल जा या जिवात जीव असे पर्यंत मी काय तुझे मन सुभे पूर्ण होऊ देत नाही. “

“ देणार तू सही देणार तिकडे बघ.”

 ती पहाते तो बघ तुझा भाऊ तुझ्या लाडक्या प्रियकराला घेऊन आलाय.त्याला काय माहित की मी काय चीज आहे. व तिकडे पण बघ तुझी आई व तुझे बाबा.”

दोन गुंडांनी तिच्या आई बाबा व आयेला पकडुन आणले होते. जेव्हा पोलिस स्टेशनमधून विकीला सोडले तेव्हा सिद्धार्थच्या माणसांनी पाळत ठेवून होती. त्यांनी नंतर तिच्या आई व वडिलांना व इतर घरच्यांना पकडुन आणले होते. व तिथे डांबले होते.

विकी व त्याचे मित्र व शुभम बाहेरील गुंडांना मारून बिल्डिंग मध्ये आल्यावर. तिथे अनेक गुंड असतात. ते आत आल्यावर त्यांना बघून

 सिद्धार्थ, “ व्यायाम जास्त झाला असेल तर थांबा आता. नाहीतर या म्हातारी व म्हाताऱ्याला ढकलतो बघ इथून खाली. लई फिरवा फिरवी झाली.”

ते सर्व थांबतात. सिद्धार्थ आपल्या माणसांना “ बघताय काय पकडा यांना लई शेफारलेत. अन् ही अपर्णा एवढं माग माग फिरून सुद्धा काय उपयोग लइच भाव खाते. पटकन कागदपत्रे कुठे आहेत ते सांग, तुला लगेच मोकळी करतो.”

अपर्णा, “ जा तुला सांगितल्यावर तू काय सोडणार आहेस. “

सिद्धार्थ, “ हे बघ अपर्णा जरा तिकडे बघ. नाहक तुझे आई बाप मरतील. त्यामुळे एक माझ व सांग काय ते.”

इतक्यात विकिचे मित्र लपत छपत येऊन तिच्या आई बापाला सोडवतात. व पुन्हा जोरदार मारामारी होते. विकी सिद्धार्थला खूप मारतो. इतक्यात पोलिस घेऊन रमाकांत येतात. व सिद्धार्थ व त्याच्या साथीदारांना पकडुन नेतात.

….. ….. ….. …… ……. …..

पुढे

लग्नमंडप तिथे वर्हाड्यांच स्वागत करण्यासाठी शुभमच्या बायकोचा भाऊ तो अक्षता वाटतोय.

विकी व अप्रणाचे लग्न होते. सर्व आशीर्वाद देतात.

लेखक : निशिकांत हारुगले

Monday, March 7, 2022

येसन एक मर्यादा

 येसन


येसन एक मर्यादा


महाराष्ट्रातील घाटी प्रदेशातील एका गावातील एका घरात सोप्यात दोन चार स्त्रिया एकत्र येऊन बसलेल्या आहेत. सोप्यातील खिडकीतून सूर्याची प्रकाशाची किरणे सोप्यात पसरली आहेत. घरातील गृहिणी आपल्या मुलीचे नाक टोचण्याचा खटाटोप करत आहे. तिच्या मदतीला शेजारची पार्वती आली आहे. जी मुलींचं नाक टोचण्यात तरबेज आहे. सोप्यात पलंग आहे. पलंगावर सूनिताची सासू बसली आहे. भली मोठ्ठी वाकळेची सुई बघून ती मुलगी जरा घाबरलेली आहे.नाक टोचताना पाहून सूनिताचा लहान मुलगा आडवे येत आहे. त्याला वाटते की आपल्या बहिणीला उगाच त्रास देत आहेत. तो मागून आई व पार्वतीस गुच्यांचा प्रसाद देत आहे ते बघून सुनीता चुलितील लाकूड त्याला दाखवते. तो घाबरतो व पळून जातो. व या आपल्या कामास लागतात.

वैदेही, “नको.. ग आई, दुखेल ग. केवढी मोठी सुई घेतलीय बघ ती.”

सुनिता, “ही काय सगळीच घालणार नाही तुझ्या नाकात, थोडीच घालणार टोचण्यापुरती.”

तारा आज्जी, “आग, छोटी सुई घ्या म्हणजे कमी दुखेल, तो शिलाई मशीनचा डब्बा आणा दिवळीतून,”

पार्वती उठून जाते व दिवळीतून डब्बा आणते. त्यातील सुई काढून नाक टोचू लागते. नाक टोचताना वैदेही दंगा करू लागते. तेव्हा तिची आई तिला दाबून धरते व इतर दोन बायका मदत करतात. पार्वती तीच नाक टोचून त्यात दोरा ओवते व छोटीशी गाठ मारते.नाक टोचल्यावर त्यावर तेल व कुंकू लावते. व खोड्यात टाकलेल्या जनावराने सुटकेचा श्वास सोडावा. तसा सोडून ती आजीजवळ येऊन बसते. थोड्याशा वेदना तिला जाणवत असतात. ती आजीला म्हणते,

“आजी नाक का ग टोचतात.”

आजी, “ बाळा मुलींचं वाकड पाय पडू नयेत. व तिच्या मर्यादा समजण्यासाठी, म्हणून नाक टोचतात.”

वैदेही, “ मुलींचंच  का मुलांचं पण टोचल पाहिजे.”

आजी, “ तस नाही बाळा मुलगा कितीही बाहेर उंडारून आला तरी त्यावर बंधन नसते. पण मुलगी जराशी जरी चुकली तर तिचं नाव खराब होत. तिचं लग्न होन अवघड होते. “

वैदेही, “ हे आपल बर आहे की सर्व बंधने मुलीलाच तिने कपडे असे घालावेत, टिकली लावावी. सातच्या पुढे घराबाहेर नको, वगैरे…”

आजी, “ वैदू बाळ मुलगी हीच घराची लक्ष्मी असते. घराची सत्ता व जबाबदारी ही. ती दोन घराण्याचं नेतृत्व करते. एकदा तिचं चुकीचं पाऊल पडल की तिच्या सासर व माहेरची मान प्रतिष्ठा धुळीस मिळते. चारित्र्यसंपन्न स्त्रीला समाजात पुरुषही आदबिनच बोलवतो.व चारित्र्यहीन स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वाईटच असतो.”

वैदेही, “ पण यासाठी नाक का टोचायच तसं पण आपण राहतोच ना.”

आजी, “ नाक टोचल्यान स्त्रीचं सौंदर्य वाढत . तसेच तिच्या नाकातील दागिना तिला नेहमी आरशात पाहताना तिची मर्यादा तसेच बोलतानाचा संयम पाळाय सांगतो. महाभारत द्रौपदीच्या उपहासात्मक बोलण्यातून घडले.”

थोड्याच वेळात जेवणखोलितून वैदेहीची आई येते. तिला, आजीला व बाकीच्या स्त्रीयांना शिरा खायला देते. तो शिरा घेत.

 वैदेही, “ अय्या शिरा, वा मला खूप आवडतो.”

सुनिता, “ म्हणूनच केलाय तुझ्यासाठी.”

वैदेही, “ असा रोज शिरा मिळणार असेल तर रोज नाक मी टोचून घेईन.”

सगळ्या बायका हसतात.

सुनिता, “ ये वेडाबाई रोज काय नाक टोचायला व शिरा करायला जमणार नाही. हा खा व जरा घर झाडायला मदत कर. मी आतल्या तयारीला लागते.”

 सुनिता आत स्वयंपाक घरात निघून जाते. व वैदेही शिरा खाऊन आजी व आपली आणि इतर बायकांच्या प्लेटा घेऊन जेवणखोलितल्या म्होरीतल्या भांड्यात ठेवते. सर्व घर झाडून काढते. म्होरीतील भांडी स्वच्छ घासून धुवून आणून ठेवते व आपले हातपाय धुवून मेकप करुन केस विंचरते. स्वतःला आरशात न्याहाळते. थोड्यावेळाने अंधार पडायला लागतो ती देवाजवळ सांजवात लावते. शुभं करोति म्हणून ती आपल्या शाळेतील अभ्यासास बसते. तिचे लहान भाऊ तिला चिडवतात.

“ येसण घातलेली ताई.”

तेव्हा ती त्यांना धपाटे घालायला जाते. तेव्हा ते पळून जातात.

…………….

काही दिवसानंतर तिच्या नाकात नथ घातली जाते. ती शाळेला जाताना रोज आरशात पहात असते. आपले सौंदर्य निरखत असते. ती आता सातवी पास झाली . गावाबाहेर माळावर हायस्कूल होते. तिथं तिचं एडमिशन तिच्या वडिलांनी केलं. ती चांगल्या मार्क नी पास झाली होती.

जून उजाडला पंधरा तारीख शाळेचा पहिला दिवस. वैदेही सर्व आटोपून आपल्या मैत्रिणीसवे हायस्कूलला निघाली. तिच्या मैत्रिणी तिला बोलवायला आलेल्या आहेत.

“ वेदू, अग वेदु येतेस ना, आवरलं की नाही तुझ.” शैलजाने हाक मारली.

वैदेही, “ थांबा आले आले.”

शाळेचं दफ्तर घेऊन बाहेर पडताना तिने आजी व आईला नमस्कार केला. आईने डब्बा दिला व नीट शाळेला जा म्हणाली. पुढील सोप्यात बसलेल्या वडिलांना नमस्कार करून ती आपल्या मैत्रिणीसंगे शाळेस निघाली. घराबाहेर आल्यावर तिच्या मैत्रिणी.

संध्या, “ किती संस्कारी बाळ आहे ना, वैदेही नमस्कार करून बाहेर पडते मोठ्यांच्या .”

शैलजा, “ हो तर पोटभरून आशीर्वाद मिळाला वाटतं.”

गिरजा, “ मिळाला तर असणारच संस्कारी आहे ती. तुमच्यासारखी नाही, तुम्ही केला का नमस्कार घरी कोणाला?”

संध्या, “ हो केला की.”

शैलजा, “ ये चला लवकर आधीच वेळ झालाय.”

सर्वजणी शाळेस जातात. शाळेस जाताना गावाबाहेर आल्यावर मेनरोडला लागल्यावर बरीच मुले शाळेस निघाली होती. काही अंतर चालल्यावर शेजारील गावची काही मुले सायकलिवरून त्यांना घासून ओरडत व खिदळत जातात. हुक्क्या घालतात.

थोड्या वेळाने त्या शाळेत पोहोचल्या. शाळेतल्या शिपायाकडे चौकशी करतात.

शैलजा, “ अहो, काका इयत्ता आठवीचा वर्ग कोणता?”

 शिपाई, “या लाईनेतून पुढे गेल्यावर उजवीकडे पाचवा वर्ग.”

त्या तिथे पोहोचल्या. वर्गाबाहेर व्हरांड्यात मुले दंगामस्ती करत होती.

त्या वर्गात पोहोचल्या. तेव्हा वर्गातल्या एका मुलाने पंखा चालू केला. पंख्यावरील रद्दीचे तुकडे ठेवलेले ते रंगीबेरंगी तुकडे त्यांच्या अंगावर पडू लागले. सर्व मुले ओरडू लागली. त्या कावऱ्याबावर्या होऊन एका बाजूच्या खिडकीलगत बेंचवर जाऊन बसल्या. थोड्या वेळानं घंटा झाली. शालेय प्रार्थना झाली. तास सुरू झाला. शिक्षक पुढे शिकवत आहेत. व वर्गातील पाटलाच्या अमोघचे लक्ष मुलीत बसलेल्या वैदेहिकडे आहे. इंग्लिश विषयाचा तास चालू झाला. वैदेहीच्या हातातील पेन खाली पडला. तो उचलण्यासाठी ती खाली वाकली. बेंच खालचा पेन घेताना तिला अमोघ पाहतोय हे जाणवले. तिने त्याकडे दुर्लक्ष केले.

थोड्यावेळाने सुट्टी झाली. मुली वॉशरूमला गेल्या. वैदेही आपल्या मैत्रिणीसवे गेली. वरहांड्यातील मुले तिच्याकडे पाहून हसत होती.अमोघ व त्याचे मित्र पण त्याकडे पहात होते. नंतरच्या सर्व तासिका झाल्या. संध्याकाळी सुटीची बेल झाली. मुले घरला निघाली. तेव्हा परगावची मुलेपण निघाली. त्यांनी त्यांच्या सायकली काढल्या. व ती निघाली. अमोघने आपली सायकल काढली. व त्याने सायकल जाताना वैदेहीच्या जवळून घासून मारली. व मागे बघून तो हसला व निघून गेला. अचानक सायकल जवळून घासून गेल्यामुळे ती दचकली. व तिने पाहिले. तो अमोघ होता.

शैलजा, “ काय ग तो गोरा मुलगा कोण असल ग.”

संध्या, “ का ग.”

शैलजा, “ काही नाही दिवसभर लई नाटक चाललेत तेची.”

संध्या, “ तो होय पाटलाचा अमोघ होय.”

शैलजा, “ कुठल्या पाटलाचा.”

संध्या, “ वाडीच्या सदू पाटलांचा, आम्ही शेत करतो की तेंच.”

शैलजा, “ वाईट वळणाचा वाटतोय.”

संध्या, “ तसा नाही ग तो खूपच छान आहे. मी भेटले तेला कितीतरी वेळा माझ्याकडे कधी नाही पाहिल तेनं.”

शैलजा, “ तू काय अप्सरा आहेस काय? तुझ्याकडे बघायला. करापलेल तोंड तुझं.”

संध्या, “ मला नाव ठेवायला तू कुठं हिरोईन लागून राहिलीस.”

शैलजा, “ माझ्याकडं कशाला बघतोय ,(बोट दाखवत) हिच्याकडे बघत होता.”

वैदेही कावरीबावरी झाली. त्या आपापल्या पुढे घरी गेल्या.

दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मुले व्हरांड्यात खेळत होती. वैदेही व तिच्या मैत्रिणी शाळेत आल्या. त्यांनी वर्गात प्रवेश केला. त्या नियमित बेंचवर बसण्यास गेल्या. वैदेहीच्या बेंचवर काही फुले एका कागदात ठेवलेली दिसली. ती मोग्र्याची होती. वर्गातील व्हरांड्यात खेळणारी मुले ते पहात होती. ती फुले इतर मुलींनी पहिली व

शैलजा. “ कुणी आणलीत संधे तू का.”

संध्या, “ नाही, मी तुमच्या बरोबरच होते.वैदेही ने आणली तर नसतील.”

वैदेही, “ मी नाही.”

इतक्यात शैलजाचे लक्ष खिडकीकडे गेले. तिला वाकून खिडकीतून पाहणारी मुले दिसली. त्यांना बघून

शैलजा, “ आपली नव्हेत ही, उचलून ठेव बाजूला.”

संध्या, “ एवढ्या फुलांचा गजरा किती छान दिसेल.मीच घेते ती.”

संध्या फुले आपल्या बॅगेत ठेवते. इतक्यात इकडे मुले संध्याने फुले घेतलेली बातमी जाऊन अमोघला सांगतात.

“ अरे, ती फुले संध्याने घेतली.”

तो चिडून, “ तिला कुणी घ्यायला सांगितली. सगळा प्लॅन बेकार. एवढं श्रम केलं कुठून कुठून फुले गोळा केली. व सगळ व्यर्थ ,थांब त्या संधेला दाखवतो.”

……..

दुसऱ्या दिवशी शाळेस सुट्टी होती. शेताकडे जाणारी संध्या त्याला गाठ पडली. तिच्या केसातील गजरा पाहून तो आणखीनच चिडतो. व

अमोघ, “ काय संध्ये , फुलं लई माळलीस.”

संध्या केसांवर हात फिरवत, “ छान आहेत ना.”

अमोघ, “आहेत पण तुझ्यासाठी नव्हती ती.”

संध्या, “ म्हणजे मी नाही समजलो.”

अमोघ, “ ती वैदेही साठी होती. मी ठेवली होती ती; पण तू का घेतलीस. ती मला आवडते.”

संध्या, “ माफ कर हं, पण ती काहीच बोलली नाही. मला. व फुले पण घेतली नाहीत तिने.”

अमोघ, “ तिला माहित नाही अजून ती मला आवडते. व ती शैलजा असते ना नेहमी, बिचारी तिच्याच धाकात असते.”

संध्या, “ माझ्याकडे देत जा मी देईन तिला."

अमोघ, “ ठीक आहे, उद्या देईन मी. माझ एवढं काम केलीस ना की तुला पार्टी देईन बघ.”

ते दोघे निघून जातात.

… … … …

दुसऱ्या दिवशी अमोघ संध्याकडे गुलाबाचे सुंदर फुल देतो. संध्या ते गुपचूप आपल्या बॅगेत ठेवते. व वर्गात गेल्यावर वैदेही एकटी असताना देते.वैदेहीला गुलाब आवडतो, म्हणून ती तो डोक्यात माळते. वैदेहीच्या डोक्यातील गुलाब पाहून मुले गाणे म्हणू लागतात. ‘ फुल गुलाब का… … '

वैदेहीच्या डोक्यातला गुलाब पाहून शैलजा, ” वेदे गुलाब कुठला ग.”

वैदेही, “ संध्यांन दिलाय. तिलाच विचार.”

शैलजा, “ संध्या आम्हाला पण चालला असता की गुलाब.”

संध्या, “ आगं, कुणीतरी दिलाय गुलाब तो.”

शैलजा,” कुणी दिला ग येवडा चांगला गुलाब. काय कुठं डाका टाकाय गेलतीस का.”

संध्या, “ अमोघने दिला होता.वैदूला देण्यास ती तेला आवडते ना.”

अमोघ ने गुलाब दिल्याचे कळते व वैदेही कावरी बावरी होऊन तो डोक्यातून काढते. व बॅगेत टाकते.

व शैलजाकडे पाहु लागते.

शैलजा, “ वैदे काय चाललय, हूरळली मेंढी निघाली लांडग्याच्या मागणं.”

वैदेही. “ मला माहित पण नव्हतं . हिनच आणला वाटलं.”

शैलजा, “ संध्ये इथ शिकायला आलोय नको ते धंद करायला नाही.”

संध्या, “ मी काय केलय फक्त फुलच दिलंय नव्ह.”

शैलजा, “ होय फुल दिलंस त्याबरोबर काटापण आणलास नव्ह. उद्यापासून आमच्या बरोबर येऊ नकोस तू बाकीच्या मुली बोलतात ते खरच आहे तू अगोचरासारखी वागतेस ते.”

वैदेही खाल मान घालून उभा होती.

संध्याकाळ झाली शाळा सुटली. मुले घरला जाताना पाठीमागून मुले वेगाने सायकल पुढे मारतात. व हुक्या घालतात.

वैदेही घरी येते. आपले दप्तर हॉलमधील सोफासेटवर काढून ठेवते. व हातपाय धुवून स्वच्छ मेकप करते. सोप्या वरील दप्तर आजी कपाटात ठेवू लागते. तेव्हा तो गुलाब खाली पडतो. तो आजी उचलते.आजीच्या मनात … …

‘ गुलाब तो ही एवढा चांगला. कुठून आला असेल हिच्या मैत्रिणीकडे तर एवढं सुंदर गुलाबाच रोपट नाही. मग शैलेजाकडे विचारू. असे म्हणून आजी तो तसाच ठेऊन देते.’

आजीला दुकानाला चाललेली शैलजा दिसते ती तिला विचारते की वैदेहिकडे गुलाब कसा आला. की तू दिलास.

शैलजा, “ तिच्या मैत्रिणीने दिलाय तिला संध्येन, तिला तिच्या मित्राने दिला होता म्हणे.”

आजी, “ बरंय जा तू. मी बघते काय करायचं ते. नको ते वारं लागायच्या आधी उतारा केलेला बरा.”

… … … … …

रात्र होते. सर्वांची जेवणे होतात. आजीन आपल व वैदेहिच अंथरूण टाकल.

दिवळीतील तेलाची बाटली घेतली व त्यातील तेल हाताला व पायला लावले.

इतक्यात वैदेही तेथे आली. ती आजीचे पाय चोळू लागली. व आजीला म्हणाली. “ छान शी गोष्ट सांग.”

आजी, “ गोष्ट ऐकायला लहान नाहीस आता. “

वैदेही, “ तरी पण सांग की.”

आजी, “ मी आज तुला गोष्ट नाही सांगणार. पण एक सत्य सांगते.”

वैदेही कान देऊन ऐकू लागते.

आजी, “ हे बघ आपल्या गल्लीत खालच्या आळीत सदू बोर्ड्याची मुलगी आहे ना. ती आता इथच असते,”

वैदेही, “ती होय सुनिता ताई.”

आजी, “ हा तिच, शाळेत असताना ती खूप हुशार होती. तिला घरातून खूप सवलत मिळत असे.तेव्हा साधी नथ टोचून दिली नाही तिच्या आईन. तिचे सर्व हट्ट पुरवले. पुढे दहावी झाल्यावर कॉलेजला गेल्यावर तिन पळून जाऊन लग्न केलं एका मुलाबरोबर. आंधळ प्रेम पुढे त्याने एक मूल झाल्यावर तिला सोडून दिलं. एक छोटं मुलं व हिला सोडून तो पळून गेला. व शेवटी घरी संपर्क साधून घरलाआली.काय तो अवतार, पाच दिवस उपाशी होती. धड शिक्षण पूर्ण नाही. का इतर कष्टाच्या कामाची सवय.”

वैदेही, “ बर मग काय झालं ग.”

आजी, “ मग काय मक्यात, या घटनेवरून बाळा एवढंच शिकायचं, की तारुण्यात प्रेमाच्या नावाखाली नको ते उद्योग करू नये. आपल्या पेक्षा आपल्या घरातल्यांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. त्यानी चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात. त्यांचा दुनियादारीचा अनुभव जास्त असतो. हे बघ तिला घरी घेतलंच नसतं, तर तिचं काय झालं असते. यासाठी मुलींनी शिक्षणावर भर द्यावा. स्वावलंबी झाले पाहिजे. जर ती अर्धवट शिक्षण सोडून पळून गेली नसती तर आज एखाद्या चांगल्या पदावर नोकरी किंवा व्यवसाय तरी करत असती ही. आज तिच्या अर्धवट शिक्षणामुळे ती मजुरी करते. तिच्या भावजा सारख्या टोमणे मारतात. लाचार जगणं आलय तिच्या वाटेला.म्हणून तुला म्हणते की शिक्षणाकडे लक्ष दे. तू अस मला वाटत.”

वैदेही, “ बर.बाई .”

अस म्हणून ती झोपी गेली, रात्री आजीच्या सल्याचे विचार तिच्या डोक्यात घुमू लागले.

… … … … …. …

पाटलांचा अमोघ काही ना काही संध्येकडून पाठवायचा. कधी लॉलीपॉप, कधी बर्फी, तर कधितर लेमन गोळ्या , संध्याच्या हातातील ते पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटायचे. पण मनावर ताबा ठेऊन ती नकार द्यायची संध्या तिला बोलायची.

“ खायला काय झाले. तो देतोय ना? तुझे पैसे तर खर्च होत नाहित ना.”

 तेव्हा एखादा तुकडा त्यातून घ्यायचा. तो ही शैलजेपासून लपून. कारण आजी शैलजाकडे चौकशी करते ही बातमी छोट्या मोहन कडून समजली होती.

…. …. …. ….

एके दिवशी. शाळेत येताना संध्याकडून अमोघन चिठ्ठी पाठवली. संध्याने तिला ती दिली. छोट्या सुट्टीत सगळ्यांची नजर चुकवून ती बकुळीच्या झुडपात शाळेशेजारी वाचली.

मजकुर

       ‘ माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुला पहात रहावेसे वाटते. उद्या रविवार आहे. शाळेस सुट्टी आहे. तू मला उद्या भेटायला ये गावाबाहेर माळावरच्या सिदू मुंबैवाल्याच्या आंब्याखाली मी तुझी वाट पाहतो दुपारी एक वाजता तू भेट. ‘

चिठ्ठी वाचताना तिचे काळीज धडधडत होते.काय करावे हे सुचत नव्हते. कधी नाही ती संध्या अभ्यासाला घरी संध्याकाळी आली. त्या दोघीजणी माडीवर गच्चीत अभ्यासाला बसल्या. शैलजाचे घर लांब असलेने ती येत नसे. अभ्यास करताना संध्याने आजूबाजूला पाहिले.

संध्या, “ काय लिहिलं होत ग.”

वैदेही, “ गप ग एवढी गणित करते.” (हळू आवाजात)

संध्या, “सांग की.”

वैदेही, “ भेटायला ये म्हणतोय.”

संध्या, “ जा की मग.”

वैदेही, “ सहजच बोलतेस की नाही ,मला भीती वाटते.”

संध्या, “ मी येते की सोबतीला, केव्हा बोलवलेय.”

वैदेही, “ दुपारी दोन वाजता मुंबईवाल्याच्या आंब्याखाली.”

संध्या, “ हे बघ जाऊया आपण मी सांगते. माझं काम आहे म्हणून.”

वैदेही, “ बघू ठरवलं नाही मी अजून.”

संध्या, “ चल जाऊया कायतरी खायला देईल की तो."

वैदेही, “ भुक लागलीय काय तुला, खा जा मग किलोभर भात.”

इतक्यात जिन्याच्या पायऱ्या वाजू लागतात. आजी गच्चीत येते. व धूणं काढते. व संध्याकडे बघते.

आजी, “ संध्या तू कवापासून अभ्यास करायला लागलीस. नाहीतर बघावं तेव्हा भुतावानी भटकतीस नुसती. बर करा अभ्यास.”

आजी धूणं घेऊन खाली जाते.

….. ….. ….. …..

दुसऱ्या दिवशी दीडच्या सुमारास संध्या वैदेहिकड येते. व माळावरच्या मंजुकडे जाऊन इंग्लिशच पुस्तक आणाय जाऊया का विचारते.

वैदेही, “ नको आता उनाच नंतर जाऊ.”

संध्या, “ नंतर मी शेण लावाय जाणार चल आताच जाऊ.”

संध्या, “ आजी मी वैदेहिला घेऊन जाऊ.”

आजी, “ जावा पण लवकर या.”

आजी वैदेहीकडे पाहत, “ जा ग तिच्या बरोबर एकटी कुठं जाईल उनाची.”

वैदेही आडे वेडे घेत तिच्यासोबत जायला निघाली. उनाचा भर चांगलाच होता. रस्ता सामसूम होता. गल्लीतून त्या पुढे गेल्या व मेन रोडला लागल्या पुढे वळणावर त्या दोघींना पाहून वर्गातल्या ज्ञान्यान आपली सायकल वळवली. व सुसाट सुटला.

वैदेही, “ संध्या तो ज्ञान्या का ग गडबडीने गेला असा तरकाटल्यासारखा.”

संध्या, “ काय माहीत चल तू.”

वैदेही, “ काय नाही कसं आपण मंजुकडेच चाललोय ना. "

संध्या, “ हो ग,चल , का आठवण झाली अमोघची.”

वैदेही, “ नाही मी ती चीठ्ठी केव्हाच फाडली.”

संध्या, “ कशाला फाडलीस तेला वाईट वाटलं की.”

वैदेही, “ वाटू देत, वाटल तर.”

संध्या, “ चल जाऊया. काय होत तेला भेटायला बोलवलंय ना.”

वैदेही, “ नको बाई मला भीती वाटते."

त्या पुढे कॉर्नेरला गेल्यावर माळावर जाणारा रस्ता लागला. त्या रस्त्याने पुढे गेल्यावर ओढा लागला.

गावातला शंकरांण्णा बैलं धूत होता. एक बैल धुवून त्यानं कासरा आपल्या लहान मुलाकडे दिला होता. धुतलेले बैल शेजारच्या रानातील वैरण खाण्यासाठी तिकडे निघाला होता. तेव्हा शंकराण्णाने मुलाला सांगितलं बाळा कासरा वड बैल थांबेल. एसणीला इस्का बसला की बैलाला ताब्यात ठेवनं सोप जात.

येसन एक मर्यादा



ओढा पार करणाऱ्या वैदेहीच्या कानावर ते शब्द पडत होते. तिला आजीचे बोलणे आठवले. त्या पुढे ओढा पार करून गेल्या. थोड्या अंतरावर फाटा लागला. मंजूच्या घराकडे वळायचं सोडून संध्या दुसरीकडे वळताना पाहून.

वैदेही, “ आगं, इकडे कुठे.”

संध्या, “ चल गप्प. तो बघ त्या झाडाखाली अमोघ त्यानं तुला भेटाया बोलवले ना. मग चल की हे बघ त्यानं रेवड्या दिल्यात.”

 वैदेहीला संध्याचा विचार कळला. तिच्या हाताला हिसडा मारून ती

वैदेही, “ शैलजा म्हणत होतीच तू वाईट विचाराची आहेस.मला नाही यायचं तुझ्या संगे.”

वैदेही मागे वळली व घराकडे चालू लागली. ती परत जाताना पाहून अमोघ संध्याजवळ आला. व ती का गेली विचारलं. संध्या, “ ती भेटनार् नाही म्हंटली, मी तिला मंजुच्या घरला जायचं कारण सांगून आणली होती.”

अमोघ वेगाने सायकल घेऊन वाटेत तिला गाठतो. तोपर्यंत ती ओढा पारकरून गेली होती.

अमोघ, “ वैदेही, वैदेही.”

ती थांबली. व त्रासलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत.

अमोघ, “ हे बघ तू मला आवडतेस.”

वैदेही, “ मग मी काय करू,”

अमोघ, “ हो म्हण ना."

वैदेही, “ नाही, तू माझा विचार सोड, शिकायच्या वयात मला प्रेमाचा विचार नाही करायचा.”

अमोघ, “ मी तुला फुलासारखी ठेवीन.”

त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती निघून गेली. तो तिच्या पाठमोऱ्या देहाकडे पाहतच राहिला.

…. ….. …

त्याच दिवशी संध्याकाळी शैलजा वैदेहीच्या घरी गेली. तिच्यासोबत एक मैत्रीण ही होती. त्या वैदेहिला घेऊन परसदारी गेल्या. तिथं एका झाडाखाली उभ्या राहिल्या.

शैलजा, “ माधवी सांग गं सर्वकाही.”

माधवी, “ वैदेही आमच्या वर्गात असणार्या नीताला ही तेन प्रेम आहे.अस सांगितल  व फसवल. सुरवातीस खाऊ देऊन तो गोड बोलत होता.ही बघ चिठ्ठी. खोटं वाटत असेल तर अक्षर तपासून बघ त्याच. त्याच्या गोड गोड बोलण्याला भुलू नकोस. तो तसाच सर्वांना झुलवतो.”

वैदेही दिवसभर संध्याचे प्रताप सांगते.

शैलजा, “ थांब संध्याला बघतेच.”

वैदेही, “ मी त्याच्या नादाला लागत नाही व संध्याच्याही. उद्यापासून आपण दोघीच शाळेला जाऊ.”

शैलजा व तिची मैत्रीण माधवी वैदेहिकडे चहा घेतात. व निघतात. वैदेही आपल घरकाम आटोपते व हातपाय धुवून स्वच्छ मेकप करते. त्यावेळी आरशात पाहताना आपल्या नथिकडे पहात. मनात म्हणते.

“ आजपासून चुकीचं पाऊल कधीच पडणार नाही."

दुसऱ्या दिवशी

त्या दोघी शाळेला एकत्र जाताना पाहून मागून संध्या हाक मारते. तेव्हा तिला वाटेतील एका झाडाखाली नेऊन

शैलजा, “ आम्ही सांगतो तस् वागत असशील तर आमच्या बरोबर ये. नाहीतर नको.”

संध्या झाल्या चुकीबद्दल क्षमा मागून उठाबशा काढते. व सोबत शाळेस जाते.

.शाळेत गेल्यावर त्यांना अमोघ व त्यांचा गँग एका बाजुला असलेल्या बाकावर शांत बसलेले दिसले. तेव्हा पासून सायकली पण शांत झाल्या. रस्त्याने हुकक्या न घालता अमोघ व त्याचे मित्र जाऊ लागले. व मुलींमध्ये एक वेगळा आत्मविश्वास आला.

लेखक - निशिकांत हारुगले

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...