शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code
Showing posts with label फ्रेंडशिप एक साहस भाग ६. Show all posts
Showing posts with label फ्रेंडशिप एक साहस भाग ६. Show all posts

Sunday, March 30, 2025

फ्रेंडशिप एक साहस भाग ६

 फ्रेंडशिप एक साहस भाग ६

Night / hostel room / inter

       कृती :

मुली आपल्या रूमवर आलेल्या आहेत. आपल्या अंथरुणावर बसलेल्या आहेत.

           संवाद :

      वेदिका :

 उद्या सकाळी किती वाजता उठायचं.

        श्वेता :

किती वाजता म्हणजे? आपल्या ठरलेल्या टायमिंगला.

रनिंग करून जवळील ग्राऊंडवर जायचं. तिथं एक्सरसाईज करायची. नंतर परत यायचं.

      वेदिका :

येवढ्या लांब कशाला? इथेच करूया की?

      श्वेता :

इथे… नको, उगाच त्या आरिची लुडबुड असते. व तिच्या दोन कोंबड्या नेहमी मागावर असतात.

      माधवी :

त्यांना काय घाबरायच एवढं?

       श्वेता :

घाबरायचा प्रश्नच नाही. उगाच तिच्या नादाला लागून आपले टार्गेट मिस व्हायचं. तिच्या नादाला लागण्यापेक्षा आपल ग्राउंडवर गेलेलं बरं.

    माधवी :

काल प्राजक्ता काय म्हणत होती.

      श्वेता :

तिच्या आजीच्या ओळखीचा एक धारकरी आहे. तो आपल्याला स्वसंरक्षण शिकवेल. असं सांगत होती.

( सिट्टी ऐकू येते. )

        वेदिका :

ये बाई आली वाटत. चला झोपा लवकर नाहीतर बाहेर लाईटच बिल, अन् इकडे बाईची बिपी वाढायची.

( लाईट ऑफ होते. हॉस्टेल इन्चार्ज मॅडम कमला शिरसाठ बाहेरून राऊंड घेत जातात.)

                                 Cut to…..

…… …… ……. ……..

Morning / Inter – outer / hostel – road – ground /

कृती : अलार्म वाजतो. सर्व मुली उठतात. वेगाने अंथरूण काढतात. ब्रश करतात. आपले ट्रॅक सूट घालतात. पायात बुटाच्या लेस बांधतात. व रनिंग करायला निघतात. धावू लागतात. धावताना….

       वेदिका :

खरंच सकाळचं रनिंग केल्यानं खूप फायदा होतो नाही. दिवसभर फ्रेश राहता येत. व अभ्यास ही नीट होतो.

        श्वेता :

मला वाटत आपणं आधीच हे नियोजन करायला हवं होत.

      वेदिका :

अजून काय वेळ गेलेली नाही. आहे की आणखी एक वर्ष.

        श्वेता :

राहिलेली सारी अभ्यासाची कसर भरून काढायची.

       अनुजा :

बोलता काय? पळा… बघा ती किती वेगानं चाललीय.

    श्वेता :

अग, खरंच की रेवा एवढी फास्ट…च्यामारी जाडीन जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय.

            माधवी :

होय तर… स्लिम पण झालीय. अन् ॲक्टीव्ह ही,

          वेदिका :

गोडांबेला जास्तच मनावर घेतलय मॅडमनी.

       श्वेता :

   चला पळा.

( त्या वेगाने धावू लागतात. ग्राउंड वर जाऊन तेथील लॉनवर पहुडतात. थोडा दम खावून त्या थोडी एक्सर साईज करतात. ध्यान करतात. व रूमवर येवून अंघोळीसाठी जातात.)

 रुम मध्ये आल्यावर

             संवाद :

      श्वेता :

वेदे, जा ग कपडे आण जा. अंघोळीला जाऊ.

          वेदिका :

     थांब थोड

      रेवा :

आग् आटपा लवकर. वेळ होईल.

    ( माधवी टेरेसकडे जात असते. तेव्हा श्वेता )

      श्वेता :

ए मधू , माझा पण ड्रेस आण.

      माधवी :

 हा आणते.

( माधवी टेरेस वर जाते. व कपडे उन्हातील घेताना श्वेता व वेदुचा फाटका ड्रेस पाहून )

        माधवी :

 (ओरडत)

    आ…. ए..श्वेता, वेदु या लवकर…

         श्वेता :

    ( खालूनच )

काय ग.. काय झालं..

      माधवी :

  या लवकर वरती…

( श्वेता व वेदिका अन् त्यांच्या मैत्रिणी वर टेरेसवर येतात. श्वेता व वेदिका ड्रेस पहातात. व त्यावरील स्टिकर्स त्यांना दिसतात.)

      श्वेता :

थांब दाखवतेच तिला.

     वेदिका :

      ( श्वेताचा हात धरत. )

 थांब श्वेता.

      श्वेता :

हे बघ, लई झालं तिचं.

  ( ती घाईने हात झटकून निघालेली असते. )

           वेदिका :

पुरावा काय? तिनेच केलंय.

         ( श्वेता मागे फिरून )

         श्वेता :

मी शंभर टक्के खात्रिनच सांगते. हे त्या उंदरणीच काम आहे. काल पिक्चर सोडून मध्येच बाहेर आली होती. तो हाच कांड करायला. अन् ही स्टिकर्स बघ तिचीच आहेत. असली चीटुकली स्टिकर्स फक्त तिच्याकडेच होती. मागील महिन्यात मॅडमनी दिलेल्या प्रोजेक्टला असली चिटुकली स्टिकर्स तिनेच लावली होती. बाकीच्या मुलांची कात्रणे मोठी होती. व एवढी लहान फक्त तिच्याकडेच आहेत.

मी उघड सांगते तुला , आम्हा घाटी पोरींना या देसोरीन उघड उघड चॅलेंज दिलंय.

        वेदिका :

 मग स्विकारुया च्यालेंज.

       श्वेता :

म्हणूनच तर निघालेय ना.

        वेदिका :

 शांत हो आधी, काट्यानेच काटा काढायचा.

       श्वेता :

त्या बोहळणीला म्हणावं, तूच घाल हा ड्रेस. व जिप्सी होऊन फिर म्हणावं.

        वेदिका :

 बोहळणी…अगदी बरोबर बोललीस,, आता बघ मी काय करते ते?

           माधवी :

श्वेता शांत हो. वेदिका म्हणते ते बरोबर आहे.

         श्वेता :

मधू.. कसं शांत व्हायचं. माझ्या आईने खूप कष्टाने घेतला होता ग ड्रेस. मी किती जपून वापरत होते. काल तो सेलिब्रेशनचा कार्यक्रम होता म्हणून घातला होता ग.

          माधवी :

तरी पण हा आपमानाच्या विषाचा घोट पी. व शांत हो . बघू,.. तिला कसा शह व मात द्यायची.

( त्या तिघी खाली जातात. आपले आवरुन हॉस्टेलचे जिन्यावरून जाताना वाटेत उभा असलेल्या आरोहीला पाहून नाक मुरडतात. व वेडावण दाखवून खुन्नस देतात. )

                                   Cut to……

……. ……. ……. ……

Day / inter / laddies hostel

    कृती :

आरोही व तिच्या मैत्रिणी उभ्या आहेत. श्वेता व तिच्या मैत्रिणी आरोही समोरून जातात.

    संवाद :

     तन्वी :

कालच्या पराक्रमाचा काही रिझल्ट कळला नाही.

     आरोही :

गेली ना नाक मुरडून.

     तन्वी :

पण तवा काही तापला नाही.

   आरोही :

 ती काय तापते. आल् असेल परीक्षेचं टेन्शन

      मानसी :

अग .. त्या रोज एक्सर साईज करतात. रनिंग पण चालू आहे. अन् टाईम टेबल पण लावलय त्यांनी, अभ्यासाचा जोर पण लावलाय.

       आरोही :

लावू देत पाहिजे तितका जोर, …. या किती जरी नाचल्या तरी या आरोही शताब्दी एकस्प्रेस समोर या मालगाड्या काढून काढून मार्कस काढणार किती ? यांचे मार्क्स जास्तीत जास्त हायर सेकंड क्लास पर्यंतच,…. फर्स्ट क्लास कूठे आहे यांच्या नशिबात.

    मानसी :

तरी पण अवंदाच वार वेगळंच वाटतंय.

     आरोही :

 मग या वाऱ्याला पर्वतास्त्राने आडवू, बघूच किती वर चढतात ते.

  ( त्या हसतात)

                       Cut to……

……. …….. …….. ……

Day / Inter / collage kantin

कृती :

कॉलेज कॅन्टीन मध्ये मुली एका खिडकी साईड टेबलवर नाष्ट व चहा घेत आहेत.

 संवाद :

     श्वेता :

तुझं आपल बरं आहे, रोज घरी जायला मिळते. आम्ही मात्र..

    प्राजक्ता :

काय झालं आता येवढं चिडायला

        वेदिका :

   ड्रेस कातरला.

      प्राजक्ता :

कुणी ग? कशाने ?

      माधवी :

आणखी कोण? दोन पायांची उंदरीन

    प्राजक्ता :

 हे बघ आधी कोड्यात बोलायचं सोड. व स्पष्ट काय ते सांग.

श्वेता :

काल त्या अरोहीन माझा व वेदूचा टेरेसवर उन्हात घातलेला ड्रेस कातरला.

      प्राजक्ता :

कोणी पाहिलंय का? असेल तर सांग सरळ जाऊन तक्रार करू.

      श्वेता :

 पाहिलं नाहीं कुणी, पण हे तिचेच काम असणार. येवढं मात्र नक्की.

    प्राजक्ता :

हे बघ विना पुरावा कोणावरही असे आरोप करणे चांगले नव्हे.

श्वेता :

हे बघ, ड्रेस कातरलेल्या जागेवर उंदीर जाणं शक्यच नाही. व त्याला कातरायचा असता तर शोभनाचा कातरला असता ना?

अनुजा :

हे मात्र अगदी पटलं. काय खाते ग ती! सारखं चरत असते. तिने प्रत्येक ड्रेसला मोठे मोठे खिशे शिवून घेतले आहेत.

धुण धुवायला लागली. तरी त्यात काही न काही असतेच.

      प्राजक्ता :

हे बघा विना पुरावा आपणं भांडाय गेलो तर आपणच गोत्यात येऊ.त्यापेक्षा शांत राहिलेलं बरं.

( इतक्यात नाष्टा घेवून वेदिक टेबलावर ठेवून शेजारी बसत )

   वेदिका :

ड्रेस काय बाई आमचा कातरलाय. आम्हीच सोसायला हवं.

      प्राजक्ता :

हे बघ तुम्हाला हवा असेल तर त्यापेक्षाही चांगला ड्रेस मी आणून देते. तुम्ही मात्र गप्प बसा. व तुमच्या अभ्यासावर व एक्सर साईजवर भर द्या.

तुम्ही अभ्यासाला लागल्यापासून ती अस्वस्थ झालेय. व तुमचं लक्ष विचलित करण्यासाठीं हा सगळा खटाटोप चाललाय मॅडमचा.

       रेवा :

अरेच्या, असं आहे होय. म्हणूनच ती तन्वी सारखी आमच्या रूमच्या बाहेरून सारखी घिरट्या घालत असते होय. आता ध्यानात आलं माझ्या.

     श्वेता :

ते काही असो, आम्ही तिला चांगलाच लवंगीचा व घाटी कळ्या मिरीचा तडका देणार बघ.

      प्राजक्ता :

बाईसाहेब, प्रथम अभ्यास करा. मग देऊ तडका बिडका काय? समजल, डण

( सर्वजणी एकमेकीचे हात एकत्र हातावर देत.हसत)

डण म्हणतात.

                       Cut to……..

…… ……. …… …..

प्रसंग पुढील :

 Day / outer – inter / cantenre yard /

कृती :

सर्वत्र अंधार आहे. मुग्धाला जाग येते. ती एका कंटेनरमध्ये असते. ती आपल्या हाताने चाचपडत अंदाज घेत उठते. तीचं अंग जड झालेलं आहे. तीचं डोके दुखत आहे. ती आधार घेत उठते. स्पर्शावरुन तिला ती एका पत्र्याच्या खोलीत असल्याचे तिला जाणवते. तिला बाहेरून बोलण्याची कुजबुज एकू येते.

           संवाद :

जावेद :

साहब इतनी मेहनत ली, हमे भी एक अंगुर चखने को मिलता तो.

सादिक :

चूप बे, रुपये मिले ना तेरे को l पूरे दस साल मे भी इतना नही कमाता l तेरे चखे हूवे खराब अँगुर सेट को भेट दू l वो क्या सोचेगा l चूप बैठ l

जावेद :

 ठीक है l माफ कर दो l

सादिक :

( नाराज जावेदला पाहून प्रेमाने)

नाराज मत हो यार, ये मराठी आंगुर बहुत ही लजिज होते है l उन पर अरब सेठ मर मिठते है l अगर इतनी ही ख्वाईश है, तो चला जा चकले पे l वहा पर है ना अपनी अनारकली l

महमूद :

वो तो पुराणी हुई है l उसमे अब मजा नहीं रहा l पुरा रस निचोड लिया है जावेद ने l है ना जावेद, नया यह घाट का माल चखणे को मिल जाये तो मजा आ जाये l

( जावेद हसता है l)

सादिक :

जबान बंद कर अपनी , दीवारों के भी कान होवे l इधर उधर भी लोग होते है l सून लेंगे अपनी बाते l पार्सल समंदर पार भेजना है l तयारी को लगो l अंगुर् चखणा है l इन्हे |

आसिफ:

 चलो काम पर लग जावो l महमूद कल रात तक यह कंटेनर बंदरगाह पर होना चाहिए l तयारी करो l आ देखणा लडकिया किस हाल मे है l

सादिक :

लडकिय नहीं हुरे कहो हूरे l स्वराज्य की हुरे l मिठे करवंद जैसी l

( भयानक हास्य . जावेद कंटेनरकडे जाऊ लागतो. त्याकडे तिरकस नजरेने पाहून)

सादिक :

जावेद …. तू ठेर l महमूद तू देखं लडकियो की हालत l

महमूद :

जी हुजुर l

( महमूद कंटेनरकडे जातो. दरवाजा उघडण्याचा आवाज होतो. मुग्धा आवाज ऐकून बेशुध्द होण्याचे नाटक करते. आत अंधार असतो. तो आत मध्ये बॅटरी पाडून पाहतो.)

 महमुद :

( मनात )

सब ठीक ठाक है l

 (कंटेनरचा दरवाजा बंद होतो.)

                         Cut to …….

…….. …… …….. ………

Inter / prajakta home / bathroom and holl /day

    कृती :

प्राजक्ता बाथरुममध्ये जाऊन हात पाय धुत असते. आजी तिच्या रूममध्ये येते.

      संवाद :

 आजी :

प्राजक्ता, ये …प्राजक्ता.

प्राजक्ता :

आजी मी इकडे आहे. बाथरूम मध्ये, थांब आले.

( प्राजक्ता रुमालाने आपले हात पाय पुसत बाहेर येते.)

प्राजक्ता :

 बोल आजी. काय काम होत का?

आजी :

हो, … आहे एक महत्वाचं…. चल आवर जरा बाहेर जाऊन येवू..

प्राजक्ता :

थोड थांब आवरते.

                       Cut to….

….. …… ….

Outer / in the car / day

( प्राजक्ता आजी एकत्र फोर व्हिलर मधून निघतात. वाटेत गाडीमध्ये )

प्राजक्ता :

देवळात जायचंय का?

आजी :

 नाही

प्राजक्ता :

 मग कुठे?

आजी :

 कळेल थोडया वेळात.

प्राजक्ता :

 सस्पेस्न आहे का?

आजी :

 हो गुपितच आहे.

   ( कार एका वस्तीत येते. अरुंद रस्ता असतो. वस्तीतून जाताना अनेक लोक कारकडे पहात असतात. ड्रायव्हर एका पानवठ्यावर गाडी उभा करतो. काच खाली होते. )

आजी :

( कार मधून बाहेर डोकावत, पाणवठ्यावरील महिलेस )

 काय ग, इथे मल्हारी रायबागकर कूठे राहतो.

पाणवठ्यावरील महिला :

सुमाच घर होय. या वाटन सरळ जा. पुढे पानपट्टी हाय. तिथून चौथ झोपड.

आजी :

सुमा नव्हं ग. मल्हारी रायबागकर.

महिला :

आव तेच सांगतेय तुम्हाला. सुमा तेंची मालकीण हाय.

आजी :

 असं होय.

महिला :

 व्हय जी.

( पुढे कार जाते. एके ठिकाणी चौकशी करून पुढे एका मातीच्या साध्या घराजवळ थांबते. आजी व प्राजक्ता गाडीतून उतरतात.)

प्राजक्ता :

कूठे आलोय आपण.

आजी :

 कळेल तुला. चल.

( आजी दारात जाऊन )

आजी :

मल्हारी.. ए मल्हारी….

( एक मध्यमवर्गीय व्यक्ती बाहेर येते. धोतर व सदरा परिधान केलेला. )

मल्हारी :

कोण हाय.

मल्हारी :

(आजी दुर्गाबाईना पहात )

नमस्कार अक्कासाहेब, आज खूप वर्षांनी इकडे आलात. अहोभाग्य तुमच्या सारखी मंडळी आमच्या घराला आलीत. बरं वाटलं.

मल्हारी :

(मागे वळून)

अग. पाहिलस का कोण आलंय ?

मल्हारीची बायको सुमन :

 हा आले.

( बाहेर आल्यावर डोक्यावर पदर घेत. )

 मल्हारीची बायको :

कोण अक्कासाहेब. या की.

( पाया पडून आशीर्वाद घेत.)

 आजी :

औक्षवंत हो. अशीच हासत खेळत रहा. कसं काय चाललंय?

मल्हारीची बायको :

तुमच्या कृपेनं आहे सर्व चांगल. पोराला पण नोकरी लागलीय आता.

मल्हारी :

 अग, जरा चहा पानाच बघ.

मल्हारीची बायको :

जी..

( ती आत जाते.)

मल्हारी :

या अक्का बसा. काय सेवा करू ?

आजी :

( तेथील बाकड्यावर बसत. )

सांगायचं म्हणजे, ही माझी नात. आता मोठी झालेय. तिला व तिच्या मैत्रिणींनी जरा लाठी काठी. व इतर शस्त्र प्रशिक्षण द्यावं म्हणते. अन् आपल्या देखरेखीत तुम्हीच चांगले वस्ताद आहात. तुमची काय असेल ती फी देवू.

मल्हारी :

पैशाचा विषय काढून लाजवू नका आजपर्यंत तुम्ही किती मदत केलीय मला.

  शिकवीन की. आपल्या घरचीच माणसं तुम्ही. काय पोरी शिकणार नव्हं.

प्राजक्ता :

हो

आजी :

 मग कधी पासून सुरुवात करता.

मल्हारी :

 या दोन दिवसात माझी. एक ब्याच संपते. तेव्हा पुढील शुक्रवारी सुरू करु.

आजी :

 चालेल , मग शुक्रवार पासून नक्की.

( इतक्यात मल्हारीची पत्नी चहा घेवून येते. चहा घेतात. व निघतात.)

                              Cut to …….

……. …… ………

Day / in car / outer

प्राजक्ता :

आजी ते वस्ताद आहेत.

आजी :

 शस्त्र चालवणेत त्यांचा हात कोण धरणार नाही. व त्यांनी जर तुम्हाला शिकवलं. तर तुम्हाला कोणत्याच सेल्फ डिफेन्सची गरज नाही. मात्र …

प्राजक्ता :

मात्र काय?

आजी :

 त्यांनी दिलेल्या सूचनाच पालन काटेकोर केल पाहिजे. त्यांची शिस्त कडकं आहे.

प्राजक्ता :

 ते तर होईलच. थांब ही बातमी मी मैत्रीणीना सांगते.

ती फोन करते.

प्राजक्ता :

( फोन लावून )

हॅलो..श्वेता…

                                      Cut to…….

……. ……. ………

Day / Outer / Play ground / morning

 कृती :

ग्राउंडवर शस्त्र पूजा केली जाते. प्रत्येक मुलगी येऊन शस्त्र शिक्षक रायबागकर यांचा आशीर्वाद घेतात. प्राजक्ताची आजी तिथे असते. नारळ वाढवला जातो. प्रशिक्षण सुरू करतात. सर्व प्रकारचे प्रशिक्षण चालू करतात.

                            Cut to ……

(V o)

 मुली प्रशिक्षण घेणे, तासिका अटेंड करणे, नोटस काढणे. प्रिंट काढून रुमच्या भिंतीवर चिकटवणे. असे उपक्रम करु लागतात.

                          Cut to …….

……. …… ……

Three months later

Day / inter / collage holl

Action :

आरोही आपला नवीन ड्रेस घालून आलेली असते. कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा असतात. सावित्री बाई फुले जयंती निमित्त भाषण असते. हॉल मध्ये मुले बसलेली आहेत. शिंत्रे मॅडम सूत्र संचालन करत असते.

Dialog :

आयोजक शिंत्रे मॅडम :

आता आपल्यापुढे आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे. आरोही गोडांबे.

( आरोही स्टेजकडे जाते. तिला जाताना मनस्वी.)

मनस्वी :

आरोही खूप छान दिसतेस या ड्रेस मध्ये.

आरोही :

 थॅन्क्स मनू

( आरोही ताठर मुद्रेने स्टेजकडे जाते.)

आरोही :

नमस्कार माझ्या पूज्य गुरुजन व माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो आज मला सावित्री बाई फुले यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करण्यास दिल्या बद्दल मी प्रथम धन्यवाद देते. सावित्री बाई फुले यांचे कार्य हे एखाद्या दीपस्तंभा प्रमाणे आहे……..

( विद्यार्थी प्रेक्षक मध्ये बसलेल्या श्वेता व वेदिका एकमेकींकडे पहात. )

श्वेता :

 ऐकलस का मनस्वी काय म्हणाली ते.

वेदिका :

 हो अत्यंत काळजीपूर्वक.

श्वेता :

मग काय ठरलं?

वेदिका :

उद्या , मग करायचा का प्लॅन.

श्वेता :

धुण तरी धुवू दे तिला आधी. मग …..

                          Cut to…….

…… ……. …….

Night / Outer / hostel teres

पहाटेचे पाच वाजतात. रूमचे दार उघडते. श्वेता टेरेसवर जाते. वेदिका हॉस्टेलचे पलीकडील बाजूस जाते. श्वेता हळूच ड्रेस दोरीवरील काढून पिशवीत घालते. व पिशवी फेकते. वेदिका पिशवी जिंकते. व रनिंगला जाते. पाठोपाठ श्वेता ही जाते. पुढे एके ठिकाणी त्या थांबून. ड्रेस वर राग व्यक्त करतात.

तो कुस्करतात

 Dialog :

 श्वेता :

 काय ग गोडांबे कसं वाटतंय मार खाताना.

वेदिका :

 कसं म्हणजे आंब्याला दगड मारतात तस्. काढ रस तिचा.

( वेदिका आपल्या हातात ड्रेस घेवून कुस्करते )

श्वेता :

 हाण… चार आणखीन.

वेदिका :

नको, बाकीच्या ग्राउंडवर गेल्या असतील. उगाच शंका नको.

श्वेता :

मग या ड्रेसचं काय करूया?

( तिथे रस्त्याकडेला एक भिकारीण असते. वेदिकाचे लक्ष जाते.)

वेदिका :

 तिकडे बघ.

(त्या दोघी एकमेकीकडे पाहून हसतात. )

                           Cut to ….....

……… …….. ……..


वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...