Day / outer / tent parisar
मुली पॅकिंग करत आहेत. पोलिस व्ह्यन आली. फौजदार उतरतो.
फौजदार :
अभिनंदन
श्वेता :
कोण होते ते.
इन्स्पेक्टर :
तुमचे प्रथम अभिनंदन करतो. खूप दिवसापासून या परिसरात मुलींच्या मिसिंग केस मध्ये या मुली कुठे जातात. हे शोधत होतो. आज तुमच्यामुळे आम्हाला या मुलींचे अपहरण कर्ते सापडले. आज शिवजयंतीच्या दिवशी आपण स्वराज्यातील मावळ्यांचे काम केले. याबद्दल अभिनंदन. तुम्हाला या कामांबद्दल लवकरच बक्षीस देऊ. बर येतो आम्ही. आमच्यावर आज बंदोबस्ताची मोठी जबाबदारी आहे. काही मदत लागल्यास कळवा.
प्राजक्ता :
हा कळवतो.
(पोलिस गाडी निघून जाते.)
Cut to …….
……. …… …
वेदिका :
काय करायला आलो, व काय घडतंय?
अनुजा :
अंग आता कुठे सुरवात आहे. आयुष्यात अनेक चढ - उतार आहेत अजून…
माधवी :
जर प्राजक्ता सावध झाली नसती तर ….
श्वेता :
तर असता एका अरबाच्या घरात क्याब्रे डान्स करत.
प्राजक्ता :
छत्रपती शिवरायांनी आपल्याला सांगितलच आहे. की आपल्याला खरा धोका हा समुद्र मार्गे आहे म्हणून. व आज मला ते पटू लागलंय.
वेदिका :
पोलिसांच्या हवाली करण्यापेक्षा त्यांना आपण चांगलीच अद्दल घडवायल हवी होती.
रेवा :
झोपेत असताना भ्याड हल्ला करतात. जागी असताना या म्हणावं. दाखवला असता इंगा…
प्राजक्ता :
त्यासाठी आपली झोप पण सावध हवी.
श्वेता :
झोपेपेक्षा नजर सावध हवी. काल त्याबाबत बोलले होते. तेव्हाच लक्ष द्यायला हवं होत….
प्राजक्ता :
आम्हाला काय माहित हे बोके शिकारीला टपून बसले आहेत.
माधवी :
शिकार करायला आले अन् स्वतःच शिकार झाले.
सुमा :
मला तर काहीच सूचत नाहीये.
प्राजक्ता :
(आश्विन जवळ जात.)
माफ करा मला, तुमच्या विषयी गैरसमज झाला होता.
( त्याच्या हाताला लागलेलं पाहून )
अरे हे काय, तुमच्या हाताला लागलेय.
रेवा फर्स्टटेड बॉक्स आण,
( रेवा बॉक्स आणते. प्राजक्ता स्वतः मलम पट्टी करते.)
श्वेता :
ये सोडा आता विषय, आपल्याला गड चढून राजांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत.
प्राजक्ता :
पण त्या आधी जिजाऊ मातांचे घ्यायला हवेत. कारण आज त्यांच्या या वाड्याने आम्हाला आत्मनिर्भर बनवले.
माधवी :
चला तर मग
Cut to …..
…… ……. …..
Day / outer / raygad parisar
मुली जिजाऊ समाधीचे दर्शन घेतात. त्यानंतर गडाकडे जातात. पहिल्या पायरीला वंदन करून आशीर्वाद घेतात. व एकमेकींच्या हातात हात घेऊन उभा राहतात.
श्वेता :
मग काय ठरलं, गडावर रोपवेने जायचे की पायऱ्या चढून.
प्राजक्ता :
पायऱ्या चढून.
सर्वजनी एकदम
छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव घोषणा देत. पायऱ्या चढू लागतात.
Cut to ……
……. …. …….
Day / outer / raygad
गडाचा मुख्य प्रवेशद्वारावर आल्यावर
श्वेता :
काय प्राजक्ता, आलो ना गडाच्या मुख्य दरवाजा जवळ.
प्राजक्ता :
माझा अजून ही विश्वासचं बसतं नाही.
वेदिका :
इथं पर्यंत आलोय म्हंटल्यावर एक शेल्पी तर झालीच पाहिजे.
माधवी, अनुजा :
हो तर झालीच पाहिजे.
श्वेता :
चला तर मग घेऊयात.
( त्या शेल्फ घेतात. व पुढे जातात.)
Cut to …..
…. ….. ….
Day/ outer/ raygad
वाटेत असणाऱ्या पाण्याच्या छोट्या झरीवर. प्राजक्ता पाणी पिऊ लागते.
रेवा :
अंग, थांब मी बिसलेरी आणलिये.
प्राजक्ता :
ये गप्प..
( ती तेथील एक पान लावते. व पाणी पिऊ लागते. वेदिक फोटो काढते.पाणी पिल्यावर. )
प्राजक्ता :
फोटो कशाला काढलास.
अनुजा :
तुझ्या घरी पाठवायला.
प्राजक्ता :
वेदे उगाच नाटकी करु नकोस. सारखं ते बिसलेरीच पाणी पिऊन पिऊन कूकुल बाळ व्हायची पाळी आलीय. गप इथे तरी मोकळे जगू द्या.
वेदिका :
नको प्राजू बाळ ते पाणी पिऊ नकोस. तुला सर्दी होईल, पोट दुखेल, डॉक्टरला बोलवावे लागेल.
प्राजक्ता :
वेदे फोटो डिलीट कर, नाहीतर टकमक टोकावरून ढकलेन बघ.
श्वेता :
अन् तरीसुद्धा घरी कळलं तर.
प्राजक्ता :
घरी कोण सांगतंय. कोण तु की तू हा, ड्राइव्हर काका तर खाली आहेत. ते काय सांगणार. हा सुमन तू सांगणार…., हे बघ सुमे यातलं एक जरी सांगितलस तर याद राख. तुझ प्रेम प्रकरण सगळ्या कोल्हापूरभर करेन.
सुमन :
मी काही नाही सांगत, पण तेवढं गुपित ठेवा.
श्वेता :
काय सुमा , काय भानगड ….
सुमन :
काही नाही ….
( त्या हसू लागतात.)
Cut to …..
….. ….. …..
Day / outer / raygad
( शिरकाई देवी मंदिर, बाजारपेठ , हत्ती तलाव परीसरात त्या येतात.)
सुमन :
काही म्हणा, शिवरायांच्या प्रत्येक गडावर पाण्याची सोय आहे.
प्राजक्ता :
हे अगदी बरोबर बोललीस. पण ही निसर्ग निर्मित नाहीत , विचार करून बनवली आहेत.
( त्या पुढे जात असतात. मागून आश्विन येतो. )
आश्विन :
काय यार, आम्हाला मागेच ठेवून आलात.
प्राजक्ता :
आम्ही प्रतिज्ञेने येवढे भारावून गेलो होतो. की लक्षातच नाही राहिलं.
रेवा :
चला जाऊया पुढे….
Cut to ……
…… ….. ……
Day / outer / holicha mal raygad
( छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करतात.)
रेवा :
हा भाग सपाट व विस्तृत आहे ना.
वेदिका :
हे होळीचे मैदान आहे.
रेवा :
काय.
वेदिका :
इथे होळी पेटवत. व पेटत्या होळीतून जो नारळ काढून दाखवेल त्यास सोन्याचं कड दिले जायचे.
माधवी :
आजच्या पोरांना सांगितल. तर..
प्राजक्ता :
कडं राहु दे, माझे हात भाजतील असे सांगतील ते.
आश्विन :
आम्हाला कमी समजू नका. आमच्या पण धमण्यात सळसळत रक्त आहे. आम्ही सुद्धा काढू शकतो. होळीतून नारळ.
प्राजक्ता :
उगाचच वावड्या उठवू नकोस.
अश्विन :
बघ आजमावून.
प्राजक्ता :
हो का, तू नारळ काढायला जाऊन हात भाजायचा. अन् तुझ्या घरचे पोराचा हात भाजला म्हणून आम्हाला शिव्या घालायचे.
आश्विन :
मी तयार आहे. नारळ काढायला. पण मलाही सोन्याचं कडं बक्षीस हवं.
प्राजक्ता :
सोन कसं आहे. हे तरी माहीत आहे का?
आश्विन :
माहित आहे की.
वेदिका :
ये बाबा, तुझी ती होळी पण नको, अन् नारळ ही.
तुझ्या एकाच्या कड्यात. आमच्या लग्नाचे दागिने होतील.
अमित :
पैज लावायला पण जिगर लागते.
श्वेता :
ओ जिगरवाले. लई बोलू नका. एवढी जिगर आहे ना, तर जावा टकमक टोकावरून उडी टाका जावा. बघतो आहे का जिगर.
अमित :
तू घे की, मी सुध्दा बघतो. तुझी हिम्मत.
श्वेता :
मी घ्यायला तयार आहे. काय पैज देणारं बोल.
अमित :
देईन की तुला सोन्याचं कडं.
वेदिका :
ए श्वेता उगाचच मोठ बोलू नको, हाडे तरी मिळतील का?
श्वेता :
तु गप ग, जरा, मी उडी टाकाय तयार आहे. पण माझी एक अट आहे.
अमित :
ती कोणती?
श्वेता :
मला प्यारागायडींग आणून दे. मारतो उडी बघ.
उत्कर्ष :
अशी उडी काय आम्हालाही मारता येते.
श्वेता :
मग मार की. आम्ही कुठे नको म्हणालो.
( सर्वजण हसू लागतात.)
Cut to …..
DAY / outer / rajwada parisar raygad
सर्वजण पाहात राजवाडा परिसरात येतात. मुजरा करतात.
वेदिका :
आपले प्रेरणास्थान.
प्राजक्ता :
जगाच्या पाठीवर मानाने जगण्याचं बळ, स्फूर्ती देणारा इतिहास आपल्या राजांचाच आहे.
श्वेता :
मग पुनः मुजरा झालाच पाहिजे.
( त्या वाकून मुजरा करतात.)
आश्विन :
फक्त मुजरा नको, तर काहितरी प्रेरणा घ्या. काहीतरी बनून दाखवा.
रेवा :
हो का, तू काय होणार आहेस.
आश्विन :
मी आहे मराठा वीर सरदार.
प्राजक्ता :
मग सदरा व धोतर कुठे गेलं. शर्ट व प्यांट दिसतेय अंगात.
आश्विन :
सदर व कोटाचा जमाना गेला.
श्वेता :
हो का.
चला अजून पुष्कळ पहायचं आहे.
( राणीवसा, सदर, धान्यकोठारे , जगदीश्वर मंदिर अशी बरेच ठिकाणे पाहत आहेत.)
Cut to ……
…… …… …….
Day / outer / raygad
( शिवराय समाधी जवळ आल्यावर त्यांनी फुले वाहिली व नमस्कार केला.)
Cut to …....
…… ….. …….
Day / outer / tent place
( त्यांनी सर्व साहित्य पॅक केल आहे. रेवा फोटो सेंट करते. )
Cut to …..
…… …… ……
Day / outer / hotel
( हॉटेल मध्ये त्या आल्या आहेत. जेवत आहेत.)
अनुजा :
खूप गरम होतंय नाही. भूक पण जाम लागलेय.
( त्या जेवू लागतात.)
( रेवा मोबाईल मध्ये मेसेज पाठवत असते.)
श्वेता :
रेवा जेव, काय करतेस.
रेवा :
फोटो पाठवतेय.
श्वेता :
कुणाला.
रेवा :
कुणाला म्हणजे त्या बिनडोक आरोहिला. व तिच्या लोमड्या मैत्रीणीना.
श्वेता :
ते पाठवायला हवंच का?
रेवा :
अरे वा, कळायला नको का त्यांना.
आम्ही गड सर केला ते.
वेदिका :
पाठव तिला व फोन कर …
(रेवा फोटो सेंट करते. व कॉल करते. रिंग वाजते पण कोण उचलत नाही. दोन तिन वेळा करते. पण कॉल उचलला जात नाही.)
रेवा :
उचलत नाही.
वेदिका :
कशी उचलेल. नाव पाहिलं असेल, ट्रू कॉलरवर.
अनुजा :
मग तन्वी नाहीतर मानसीला लाव.
( मानसीला फोन लावते. बिझी येतो.)
रेवा:
नेटवर्क बिझी येतेय.
माधवी :
तन्वीला लाव.
( तन्वीला फोन लागतो. ती उचलते.)
तन्वी :
हॅलो कोण?
रेवा :
लागला, लागला…
वेदिका :
आण इकडे ….
वेदिका :
हॅलो कोण तन्वी का?
तन्वी :
हो, आपणं कोण?
वेदिका :
मी वेदिका काटकर बोलतेय.
तन्वी :
बोल काय काम आहे?
वेदिका :
तुझी मैत्रीण फोन उचलत नाही, म्हटल तुला कळवाव.
तन्वी :
काय ते?
वेदिका :
आम्ही रायगड चढून उतरलो म्हणून सांग तुझ्या त्या नकचडी अरोहीला. व खोटं वाटत असेल तर फोटो पाठवलेत बघ म्हणावं प्रत्येक ठिकाणचे. लई मोठं बोलत होती ना, प्राजक्ताला. एखादा गड चढून दाखव म्हणून.. दाखवला तिने आता तू तुझं बघ म्हणावं…..
तन्वी :
ये गप्प, हे बघ वेदे तुझं अती होतंय. काय गड चढला, गड चढला, व उतरला. म्हणजे उपकार केले नाहीत अरोहीवर व आमच्यावर. तो चढायसाठी जी तयारी केलीय ना ती आरोहीमुळेच. नाहीतर मळगळलेल्या. त्या बाहुलीकडून काय झालं असत. तिच्या अंतरप्रेरणेला काडी अरोहीने लावली. म्हणून तुम्ही चढलात तो गड, नाहीतर अजूनपर्यंत अंथरुणात लोळणाऱ्या तूम्ही तिची काय बरोबरी करणार. व राहता राहिला अरोहिचा प्रश्न, तर एवढं लक्षात घे की जी तुम्हाला चिडवून चेतना देऊन गेली. ना, तिचं लग्न लावताहेत येत्या चार पाच दिवसात ते ही त्या बिनडोक गुंडांशी, तुला काय ग त्याचं. ज्याचं जळत त्यालाच कळतं, चार पैशाची बिदागी काय नाही दिली तूम्ही इतकं पाण्यात बघताय तिला. लाज वाटली पाहिजे. आपल्या वर्गातील होतकरू अरोहीस त्या गुंडांशी लग्न करावं लागतंय. अन् तुम्ही तमाशा पाहात हसता,. तिला फोन करुन त्रास देऊ पाहताय. शेम ऑन यू, परत फोन करु नकोस, ठेव बिनडोक ….
( फोन ठेवल्या नंतर )
रेवा :
काय झालं ग, काय म्हणाली, चिडली का?
वेदिका :
हो खूपच, आपल चुकतंय.
प्राजक्ता :
काय झालं?
वेदिका :
अरोहीच जबरदस्ती लग्न लावताहेत ते पण एका गुंडांशी. या चार पांच दिवसात.
माधवी :
तिला तसच पाहिजे, चांगला दारु पिऊन बडवणारा मिळाला ते बरं झालं.
वेदिका :
गप्प बस, तिने डिवचलं म्हणून आपण अभ्यास केला, चांगले मार्क्स काढले. शरीर क्षमता विकसित केली, व आज जे त्या गुंडांना पकडुन देण्याचे आपणं धाडस केले व गड सर केला ना, ते कुणामुळे झालं, आरोही मुळे, आपल्यात आत्मविश्वास पेरण्याचे काम तिने केले. जसे शिवराय सांगत प्रत्येक मावळा हा शिवाजी आहे. तसेच आपल्यात शिवराय निर्माण करणारी शिवाजी ती आहे. व आपला हा शिवाजी आपण त्या जुलमी मामाच्या ताब्यातून सोडवून आणण्याचे काम आपणं केलं पाहिजे.
प्राजक्ता :
हो खरचं, आहे, तिन डिवचल म्हणून आपण पेटून उठलो व घडलो.
रेवा :
मग काय ठरलं.
श्वेता :
अरोहीला सोडवायची व तिच लग्न लावून द्यायचं. ते ही तिच्या आवडीच्या मुलाशी.
प्राजक्ता :
मग चला तर… पुढचं मिशन आरोही गोडांबे.
( त्या जेवणं करतात. व गाडीत बसून निघतात. )
Cut to ……
….. ……
Day / inter / Tanvi home
तन्वीच्या घरी बाहेरील हॉल मध्ये सर्व बसले आहेत.
चहा घेत…
श्वेता :
आरोहीच लग्न केव्हा ठरलं?
तन्वी :
लग्न कसलं, जबरदस्ती आहे नुसती. मामाच्या उपकराखाली दबलेली काय करेल बिचारी.
प्राजक्ता :
उपकार कसले, मामाचे कर्तव्य आहे ते. अन् जरी असले तरी काय ,मनाविरुद्ध लग्न करायचे.
तन्वी :
मग काय करेल बिचारी.
रेवा :
अग पण तिचं पुढल्या ब्याचच्या राजेशवर प्रेम होते ना.
तन्वी :
तो काय करणार, तिचा मामा आधी गुंड आहे. एकदा त्या दोघांना पाहिलं त्यानं, दुसऱ्या दिवशी होता हॉस्पीटलमध्ये.
प्राजक्ता :
लग्न कुठे आहे?
तन्वी :
उंबरणीला, चोवीस तारखेला, तिच्या मामाच्या गावी.
श्वेता :
बघू कसं लग्न होतंय ते, चला लागा तयारीला.
( त्या कुजबुज करतात. व योजना आखतात.)
Cut to ….
….. ….. …..
( सर्व जनी निश्चय करतात. अश्विन व त्याच्या मित्रांना ही बोलावतात. मानसी ही येते. व ती सर्व उंबारणीला निघतात.)
…. …. …….
Day / outer / road
बस उंबर्णी स्टॉपला थांबते. मानसी, श्वेता , माधवी मेकपच साहित्य घेऊन उतरतात.
माधवी :
माहित आहे ना तुला,
मानसी :
हो मी आले होते. या आधी एकदा यात्रेत जेवायला.
श्वेता :
चला तर मग …
( चैताचा महिना असतो, सगळी शेते उजाड असतात. झाडांना पालवी फुटली आहे. वाट छोटी असते. तिथे जवळ बांबूचे बेट पुढे वाटेला लागते. त्या पुढे एक पाटी आहे. त्यावर उंबार्णी दोन किलोमीटर असे लिहिले आहे. उन वाढलेलं असल्याने. मानसी डोक्यावर ओढणी घेते व चालताना हसू लागते.)
श्वेता :
दात काढायला काय झालंय?
मानसी :
दात काढू नाहीतर काय करू? तुला कधी पंजाबी ड्रेस मध्ये मी पाहिली नाही ना, कायम ट्रॅक सूट घालणारी अवघडल्यासारखं वाटत असेल.
श्वेता :
हो तर, खूपच वाटतंय.
( एक जीप जवळून पास होऊन थोडं पुढे जाऊन थांबते. )
माधवी :
ये गप बसा ग.
( त्या पुढे चालू लागतात.)
क्रमशः.....