क्रमशः. पूढे चालू......
Day. कोल्हापूर – पन्हाळा रोड. Morning. Outer
अन्विका गाडी पन्हाळा रोडला चालवू लागते.
आण्विका, हा आता सांग पुढलं
वेदांगी, अग ती तन्वी आहे ना,
आण्विका, हा ( गाडी चालवत)
वेदांगी, ती गेली पळून शेजारच्या दातक्या मोहन बरोबर.
आण्विका, काय खरंच.
वेदांगी, हो, काल बाबांना कळलं, अन…
आण्विका, खर सांगू काय वेदे, आज तुमच्या घरी यायलाच हवं होत. तुझ्या बाबांचा पडलेला चेहरा बघायला.
काय तिचं कौतुक करायचे, बर झालं गेली पळून ते, आता तरी उघडले का डोळे तुझ्या बाबांचे.
वेदांगी, कुठले उघडतात,पळून गेली ती अन् शिक्षा आम्हाला सुरू, त्यांच्या डोक्यात आता मी पण जाईन कुणाचातरी हात धरून म्हणून माझं लग्न जमवायचं चाललंय.
आण्विका, असं आहे तर, कमाल आहे बाई तुझ्या बाबांची.
वेदांगी, मामाला फोन पण झालाय, तो लागला लगेच कामाला,
आण्विका, एवढ्या लगेच, मामा सुद्धा राहिला नाही बघ तुझा.
वेदांगी, आमचा कोळी समाज तिकड लांब आहे ना, मला तर वाटतयं आता काय बाबा ऐकणार नाहीत.
आण्विका, म्हणजे सुपारी फुटणार तर तुझी या एक दोन महिन्यात.
अग, मुलगा बघितलास का काय करतो ते.
वेदांगी, मी बघायच्या आधीच ७५% ठरलंय.
आण्विका, असे कसे तुझे बाबा पाहणं नाही, बोलचाल नाही, मुलगीची पसंती काय आहे की नाही. लगेच कंडका.
वेदांगी, त्यांना वाटतयं मी जर का तन्वी सारखी गेले पळून तर त्यांचं नाक कापेल.
आण्विका, नाक आहे कुठे त्याचं कापायला. नकटे तर आहेत.
वेदांगी, काय म्हणालीस, तुला चेष्टा सुचतेय.
आण्विका, तस नाही ग मला म्हणायचे, अस का वाटत त्यांना?
वेदांगी, ते तरी काय करणार नोकरी मुळे कोल्हापूरला यावे लागले. आमचा अग्री कोळी समाज तिकडील कोकणातील , इकडे सगळे घाटी लोक. कुणासंगे गेले तर. हाच विचार घोळतोय मनात.
आण्विका, त्यांचं तरी चुकीचं कसं म्हणायचं. कायम नटून थटून असतेस. अस वाटण स्वाभाविक आहे.
वेदांगी, काय म्हणालीस, ( ती डोक्यात टपली मारते)
आण्विका, आई ग, ए मारू नको की.
आण्विका, स्वतः च काढलेल्या पोरीवर विश्वास नाही साधा त्यांचा.
वेदांगी, नाही तर काय? मला तर खूप राग येतो बघ.
आण्विका, म्हणजे काय, तू तर जाणार म्हण, कोकणात सुरमई खायला.
वेदांगी, गप्प ग, मामा स्थळ काढणार म्हणजे तो आधी झिंग्याल्याला, त्याच स्थळ पण तसच झिंग्याल्याल असणार.
आण्विका, फोटो, बायोडेटा तरी पाहिलास काय.
वेदांगी,फोटो नाही पणं बायोडेटा पाठवलाय पपांच्या फोनवर.
आण्विका, तू पाहिलास काय?
वेदांगी, हो पाहिलाय,
आण्विका, तुझ्याकडे आहे आता.
वेदांगी, आहे की, कालच चार्जींगला त्यांचा फोन असताना माझ्या मोबाईलमध्ये सेंड केला.
( मोबाईल हातात घेत स्क्रीन ओपन करत ती दाखवते.)
हा बघ
आण्विका गाडी बाजूला घेते. मोबाईल तिचा हातात घेऊन पहात.
आण्विका, अग, हे सगळ ठीक आहे. पण तो कसा दिसतो ते तरी माहीत आहे का?
हे बघ तुला मी सांगते मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होईलच ना, जर चांगला वाटला तर लग्नाला उभी राहायला काय हरकत आहे.
वेदांगी, शहाणीच आहेस, तो काळा असुदे नाहीतर गोरा. त्यापेक्षा बेवडा नसला म्हणजे मिळवलं, त्याच्या चार पाच प्रेमिका असल्या तर माझं कसं होईल, ती माहिती नको का काढायला.
आण्विका, ते तर काढायलाच हवं, बर चल कॉल येतोय पोरांचा जाऊ, नंतर बघू काय करायचं ते. आता दिवसभर फ्री रहा. उगीच या टोळक्याने संशय नको.
वेदांगी, बर.
आण्विका, गाडी पुढे नेते.
Cut to …..
…. …… …… ….. …… ……
Day. Afternoon. Outer
सर्व मित्र व आण्विका व वेदांगी सर्वजण पन्हाळा फिरतात. व एका ठीकाणी जमतात.
सात्विक, अरे खूप भुक लागलेय फिरून चला काहीतरी पोटपूजा करूया.
वेदांगी, हो तर मला पण लागलीय चला की काहीतरी खाऊया.
आण्विका, चला तिथे एक माझ्या ओळखीचं स्टॉल आहे. तिथे मस्त नाष्टा पाणी मिळतं.
त्या तिथे जातात. मस्त ऑर्डर देतात. सर्वांना नष्टा पसंत येतो. लोणी डोसा.
मदन, वाव मस्त, आवडला मला. अगदी कोल्हापूर सारखं आहे नाही.
सात्विक, बाळा हे ठिकाण पण कोल्हापूर जिल्ह्यातच आहे हा.
मदन, पण कोल्हापूर पेक्षा चार्जेस कमी आहेत इथे.
सात्विक, ये अनुच्या ओळखीमुळे चीफ दरात मिळालाय डोसा. नाहीतर
मदन , नाहीतर काय?
सात्विक, बघ तिकडे पाटी.
मदन, अरे हो रे. खरंच.
मदन अन्विकेस
मदन, थ्यांक्स अनु,
आण्विका, गप रे, त्यात काय थ्यान्क्स मानायचे.
बर ही ट्रीट माझ्याकडून ह.
सात्विक, काय ,
आण्विका, मग द्यायला नको का? म्हंटल शेवटची आपली कॉलेजची भेट आहे. यानंतर जो तो आपापल्या कामात असणार. म्हणून आपण द्यावी एखादी नाष्टा ट्रीट. आवडली का?
मदन, हो आवडली की.
बर चला वेळ होतोय. थोड राहीलेली ठिकाणे पाहू अन् जाऊया.
सर्व मित्र, हो, बर थ्यांक्स हं अनु.
सर्व पन्हाळा फिरतात.
व एके ठिकाणी जमतात, व एकमेकांना भेटून बाय करून चारपाच वर्ष केलेल्या गंमती जमती व सर्व आठवणी आठवून निरोप समारंभ करतात.
व बाय करून निघतात
…. ….. …… …
Evening. पन्हाळा कोल्हापुर रोड out door
वाटेत स्कूटी चालवताना
आण्विका, मग काय ठरवलस
वेदांगी, अजून काही ठरवलं नाही. तू काहीतरी सुचव की.
आण्विका, चल मग घरी गेल्यावर बघू.
वेदांगी, घरी केव्हा, नको इथंच बोलू की, नाहीतर घरी बTबा ….
तिचे बोलणे तोडत.
आण्विका, तू गप ग, बघते मी तुझ्या बाबांना.
आण्विका, बाजूला गाडी थांबवते व फोन लावते.
वेदांगीचे बाबा फोन उचलतात.
आण्विका, हॅलो काका,
वेदांगीचे बाबा, हं बोल आनु कुठे आहात, आलात की नाही.
आण्विका, निघालोय आम्ही परत, सहापर्यंत पोहोचू , पण…
वेदांगीचे बाबा, पण काय आणखीन,
आण्विका, वेदुला आज घरी जेवायला नेवू का?
वेदांगीचे बाबा, घरी की बाहेर कुठे?
आण्विका, घरीच, दीदी आलेय, त्यामुळे जेवणाचा बेत आहे. म्हटलं परीक्षा झालेय, व बरेच दिवस झालेत तिला बोलवायचं म्हणतेय जेवायला. म्हणून ..जरा.
वेदांगीचे बाबा, चालेल सोड मग जेवल्यावर पण लवकर या इकडे तिकडे फिरत बसू नका.
आण्विका, बर काका.
आण्विका फोन ठेवते. पुन्हा घरी आपल्या फोन लावते.
आण्विका, हॅलो आई.
आई, हा बोल बाळ, कुठं आहेत, निघाला की नाही.
आण्विका, अग निघालोय आम्ही झालं आमचं पाहून येतोय थोड्या वेळात. बर ऐक आज मी वेदूला घरी बोलवलेय बघ जेवायला
आई, बर, या लवकर.
आण्विका फोन ठेवते
वेदांगी, आज काय खास बेत आहे का?
आण्विका, हो,
वेदांगी, काय ग सांग की.
आण्विका, काय नाही ताई आलेय, बिर्याणीचा बेत आहे.
वेदांगी, वाव, मग काय मज्जाच मज्जा
आण्विका, मज्जा करायला आधी घरी तर जायला हवं.
वेदांगी, बिर्याणी कोण करणार,
आण्विका, कोण म्हणजे अपकोज ताई आणखी कोण.
वेदांगी, हे आपल बर आहे ह. ताई दोन दिवस आली सुख घ्यायला अन् तिला काम लावयच.
आण्विका, मागचे आठ महिने आम्ही केलीय सेवा म्हणून ती आमची आज करणार आहे. तीनच बेत आखलाय
वेदांगी, पण आपण काहीतरी मदत नको का करायला.
आण्विका, करू की बिर्याणी खायला.
असे म्हणून आण्विका गाडी मारते.
Cut. To.
….. …… ….. ….. ….
Outer - inter evening. Anvika house
आण्विका व वेदांगी अण्विकाच्या घरी बंगल्यावर पोहोचतात. ती गाडी पार्क करते.
वेदांगी, पोहोचलो ऐखदासे.
अग बाई, मी बाळाला ऐखाद खेळन घ्यायचं म्हणते.
आण्विका, ए बाई गप्प चल,
वेदांगी, थांब आलेच.
वेदांगी बाहेर जाते.
आण्विका, अग ये एक की… गेली ऐकतच नाहीत.खेळणी भरपूर आहेत. काय दुकान काढायचेय.
आण्विका गाडी पार्क करून घरात येते. बाहेरील हॉल मध्ये लहान बाळ खेळत आहे. ते आपला पायाचा अंगठा चोकत आहे. त्याशेजारी अण्विकाची आई बसलेली आहे.
आण्विका, मुलाला पाहून
अरेरे, बाळ आहे, पाय धुवायच राहिलच.
आण्विका मागे वळते व बेसमेंटला जाऊन पाय धुवून येते.
आई तिच्याकडे पहात
आई, आलेले ले कोण आलय बघ मावशी आलेय.
आण्विका, काय रे काय चाललय, मम्मी कुठ हाय.
आई, ती होय जेवणं करतेय.
अग, वेदु कुठेय.
आण्विका, गेलीय खेळणं आणायला. नको म्हणताना ऐकतेय कुठे?
इतक्यात वेदांगी येते. आण्विका वेदांगीला
ते आधी खाली बेसमेंटला जाऊन पाय धूवून ये. लहान बाळ आहे ना.
वेदांगी, अरे हो खरंच, थांब आले. हे घे.
आणलेला टेडी देत
आण्विका, अरे टेडी, बघ बाळा तुझ्या वेदू मावशीनं काय आणलय ते. टेडी आणलाय. चल आपण मस्ती करूया.
आई, काय ग इतका वेळ, सकाळी गेला होता.
आण्विका, रंकाळा बघायला गेलो नव्हतो. पन्हाळा फिरायला गेलतो. सगळा किल्ला पाहायचा म्हणजे होणार की वेळ.
वेदू पाय धुवून येते.
आण्विका बाळाकडे पहात
आण्विका, बघ वेदू मावशी.
वेदांगी, काय रे काय चाललय, सायकल मारतोयस, मार जोरात.
इतक्यात सातचे ठोके पडतात.
आई, सात वाजलेत जा जरा मदत कर जा तिला. दुपारपासून ती एकटीच करतेय. मला साधा भांड्याला सुद्धा हात नाही लावू दिला.
अन्विका, मात्रुसेवा चाललेय म्हण की सरळ.
आण्विका वेदांगीला मुलाजवळ बसण्यास सांगून आत निघालेली असते. इतक्यात ताई आतून किचनमधून बाहेर येते.
आण्विका, चल मी आले मदतीला.
ताई, झालंय सगळं. भांडी तेवढी स्वच्छ करून घे.
आण्विका, बरं.
आण्विका आत जाते.
थोड्या वेळात येते.
आल्यावर,
आण्विक, (गप्पा मारत बसलेल्या वेदांगीला)
चल आत.
वेदांगी तिच्या मागे जाते.
….. ……. …… …… ……
आण्विका room inter. Night 7.30
आण्विका व वेदांगी आतमध्ये जाते तिथे टेबलजवळील ड्रॉवर मधून आपला लॅपटॉप काढून. तो चालू करते.
आण्विकि, दाखव बायोडेटा.
वेदांगी, (मोबाईल फोन दाखवत) हा घे.
आण्विका नेट चालू करून त्यावर बायोडेटावरील ऋषिकेश अग्रावकर हे नाव टाकून सर्च करते.
सात आठ जण येतात. त्यानंतर जन्मतारीखेशी सुसंगत आयडी निवडते.
एक काळा नाटा येतो ते पहात.
आण्विका, वेदे, हा बघ चालतोय का?
वेदांगी, ई…नको ग बाई मला. त्यापेक्षा बिन लग्नाची राहीन मी.
दुसरी प्रोफाईल पहाते. त्याचे मॅरेज फोटो पाहून अण्विका याच तर वाजलय.
तिसरी प्रोफाईल पहाते. तिथे फोटो नसतो. पण जन्मतारीख, प्लेस व सगळ जुळते.
त्यावर पत्ता. असतो. व खालील बाजूस शुभेच्छा संदेश व ग्रुप फोटो असतो. तो पाहून
आण्विका, हा, ही तुझ्या नवऱ्याची आय डी आहे. याची माहिती हवी. यामधील तो कोणता हे कळायला हवं.
वेदांगी नाराज होते
इतक्यात बाहेरून ताई डायनींग टेबलवर जेवण मांडत.
पाने वाढलेत या दोघी जेवायला.
आण्विका, आलो, आलो,
वेदांगी, आता काय करायचं.
आण्विका, हे बघ आधी जेवू नंतर मग ठरवू काय करायचे ते.
त्या जेवायला जातात.
Cut to
….. …… …. ….. ……
Outer. Road. Night ९.०० o clock
आण्विका वेदांगीला घरी सोडायला जाताना वेदांगीचा नाराज मुड पाहून.
आण्विका, कशाला जास्त विचार करतेस. सगळ काय आपल्या मनासारखं होईल का?
वेदांगी, तस नाही पणं…
आण्विका, लग्नचं होतय ना. कुठल्या जेलमध्ये तरी टाकत नाहीत ना?
वेदांगी, ते तर आहेच.
आण्विका, हे बघ लग्न हे तर करावेच लागणार. व आता आपल वय पहाता घरच्यांनी आपल्या पायावर उभे राहण्याइतकं शिक्षण तरी दिलेय व ते आपल्या भल्याचाच विचार करतात ना.
वेदांगी, ते खरंय ग पणं घरच्यांनी जरा माझ्या मनाचा विचार तरी घ्यायल हवा.
आण्विका, हे बघ तुझ लग्न विचार करूनच ठरवतील. उगाच कुण्या ऐर्या गैर्याच्या गळयात नाही टाकणार तुला. आता फक्त प्रश्न आहे. की तो दिसतो कसा हे पाहायचा व त्याचा स्वभाव कसा आहे? तो काम कोणत करतो? याचाच.
वेदांगी, हो ते कळलं की बस, आणखी काय हवं.
आण्विका, हे बघ तो कसा दिसतो. व त्याचे कामकाज वगैरे सर्व हिस्ट्री मी काढते. माझे काका आहेत. की कोकणात अलिबागला. त्यांकडून काढेन माहिती. हा मी पण आता सुट्टीला तिकडे जाणार आहे. तेव्हा समजेलच की सगळं.
जर का मुलगा बरा वाटला. तर होकार दे लग्नाला नाहीतर बघू दुसरा. मी समजावेन काकांना. काळजी करू नकोस.
वेदांगी, चालेल मग, कर चौकशी तेवढी.
Cut to……
….. …… …..
फोटो संयोगिता
ही संयोगिता अण्विका व वेदांगीची फ्रेंड , या तिघी एकत्र बेंच पार्टनर इयत्ता ५ वी पासून. एकीची समस्या ही तिघिंची समस्या मानली जाते.
या तिघी इतक्या जिवलग की एक भेल असो की पाणीपुरी तिघी एकत्रच वाटून खाणार.
बर या तिघिंच्या घरच्यांची ओळख करून द्यायचीच राहिली.
वेदांगी, ही रायगड जिल्ह्यातील कोळी समाजातील , तिचे वडील सरकारी नोकर असल्याने त्यांची बदली कोल्हापुरला झाली. तेव्हा वेदांगी पाचवीत होती. त्यांच्या प्रामाणिक कामामुळे ते इथ टिकून आहेत. पण नवीन पिढीचे विचार त्यांना पटत नाहीत. मुलीने आज्ञाधारक असावं असं त्याचं मत आहे. त्यामुळे वेदांगी वर त्यांचं बारीक लक्ष असत. तिच्या माघारी दफ्तर चेक करण असो वा मोबाईल मेसेज चेक करण हे त्यांचं चालूच असत त्यांचं मत एवढंच मुलीनं कुठल्या तरी मुलाच्या प्रेमात पडून पळून जाऊन लग्न जर केलं तर यांचं नाक कापल जाईल. म्हणून ते दक्षता घेत असतात. यांची बायको अत्यंत साधी. बिचारी गप्प गायीसारखी सगळं ऐकूण घेत असते.
संयोगिता : ही मध्यम वर्गीय कुटुंबातील. वडील ड्राइव्हर असल्याने जेमतेम घर चालत होत. ती एखाद भांडण लागल तर ते मिटवणारी. मनमिळावू अशा स्वभावाची. पण बारावी झाली व तिच्या बापानं शिक्षणाचा खर्च झेपणार नाही हे जाणले व तिचे लग्न लावले. व ती आपली दोन मुले, नवरा व भांडखोर सासूला सांभाळत संसार करू लागली. तिची कडक सासू तिला टोमणे मारत असे. तेव्हा अन्विकाने तिला एका योजनेतून कर्ज देवून गारमेंटचे दुकान टाकून दीले. ते तिने आपला संसार सांभाळत इतके मोठे केले. की आजकाल तिच्या हाताखाली सात आठ जण कामाला असतात.
त्यामुळे सुरवातीला टोमणे मारणारी तिची सासू सध्या गुलाबजामच्या पाकासारखी गोड झाली आहे.
आण्विका, ही गोड लाघवी व दिसायला सुंदर अशी. पण स्वभाव अत्यंत शांत. पण स्वतः होऊन कोणाची कळ न काढणारी पण जर का तिला कोण विनाकारण बोलल तर त्याचा फैसला लगेच लावणारी. मात्र मित्र मैत्रिणींना मदत करणारी अशी. तिच्या मोठ्या बहिणीच लग्न झालंय. वडील चांगल्या कंपनीत कामाला आहेत. आई गृहिणी असून भाऊ शिकत आहे.
….. …… …… …… …..
Night. १०.०० p.m. outer – inter
आण्विका स्कूटी घेऊन गेट मधून आत येते. व घरात प्रवेश करते. पायातील बूट काढून स्टँड वर ठेवते. व बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन येते. टिव्ही चालू असते. घरातील सर्व टिव्ही वरील मालिका पहात असतात. बाळ खाली गालीचावर खेळत असते. आण्विका बाळाजवळ बसते. खुळखुळा वाजवते. इतक्यात स्वयंपाक खोलीतून तिचे बाबा हॉल मध्ये येतात. त्यांचे जेवण झालेले असते. आई मागून येत त्यांच्या हातावर बडीशेप ठेवते.
ती खात ते सोफासेटवर बसतात.
बाबा, काय अनु ट्रीप कशी झाली?
आण्विका, झाली ना मस्त.
सुलभा (आई) म्हणजे तुम्हाला कळलं तर.
बाबा, कळलं म्हणजे मला विचारूनच ती गेली होती.
सुलभा, हे आपल बरं आहे हं तुमचं, आमच्या पुढे भांडायच, व मागील बाजूने तह करायचा.
बाबा, तह वगैरे काही नाही हं. ती कोणतंही काम मला विचारायच्या आधी करत नाही.
बाबा, बर आता सुट्टीत काय करणार आहेस? काही क्लास वगैरे लावणार आहेस का?
आण्विका, नाही, काही क्लास वगैरे नाही लावणार. पण जरा मावशीकडे जावून यायचं म्हणते. गेली चार वर्षे ती बोलावतेय. पण माझा अभ्यास असल्याने चार वर्षे नाही जाता आले. व त्यामुळे ती रुसलेय.
बाबा, मग जा ना बाळ. पण तुला सोडायला कोण जाणार. माझ्या तर सुट्टया जास्त पडलेत. व आता काम पण वाढलंय. त्यामुळे मला वेळ नाही मिळणार.
तिथे बसलेल्या आपल्या मुलाला
बाबा, काय रे तू जातोस का सोडायला?
• मुलगा, मला वेळ नाही. माझी पण एक्साम जवळ आलेय.
आई, अरे असे काय करतोस. एकाच तर दिवसाचा प्रश्न आहे. जा की सोडून ये जा. एकटी कशी जाईल पोर.
मुलगा, मला वेळ नाही. म्हणजे नाही.
आण्विका, नको मला कोण सोडायला. मी काय लहान नाही. जाईन मी एकटी.
दीदी, तू एकटी जाणार. ये…… असा काय करतोस रे. समजत नाही. जा की सोडून ये.
भाऊ, गेलो असतो ग. पण माझी एक्झाम आहे ना. तिला येवढच जायचयं तर पंधरा दिवस थांबाय सांग. पेपर झाला की येतो सोडून.
आण्विका, काही नको. मी जाईन एकटीच. मी काय आता लहान नाही. व मला स्वतःच संरक्षण येत करता. व मी काही दिवसाचीच जाणार आहे.
बाबा, बर कधी जाणार आहेस?
आण्विका, परवा निघायचं म्हणते.
बाबा, रिझर्व्हेशन करू का गाडीच.
आण्विका, कशाला नको. बघते मी काय करायचं ते.
आई, बर , जातीस तर मावशीकडून जेवणाच्या नवीन रेसिपी शिकून घे काय?
ताई, अग आई ती डॉक्टर आहे. तिला काय पडलेय जेवणं करायचं. व आजकाल बऱ्याच रेसिपी आहेत युटुब वर व तिला येतं सगळ.
आण्विका तू जा एन्जॉय कर जरा, समुद्र किनारा फिरून कुलाबा पाहून ये.
इतक्यात बाळ रडू लागतं.
दीदी, अलेलेले काय झालं रडायला. मावशी सोबत फिरायला जायचय. नेत नाही का तुला. थांब तीच घर आपण उन्हात बांधू काय. अन् गेली तर जाऊ देत आपण राहू इथ आजोबांनी आणलेलं खाऊ संपवू काय. जा म्हणावं आमची दिवाळी सुरू.
आण्विका, पंधरा दिवसांसाठी चाललेय. आयुष्यभरासाठी नाही हा. ये टग्या आईच लई ऐकू नकोस हं. मागचे आठ महिने मी व माझ्या आईने सेवा केलीय तुझी. तुझी आई पडली होती लोळत अंथरुनावर.
दीदी, हो का मग जा आता झोपायला आम्हाला मालिका बघू दे.
आण्विका, काय त्या मालिका सारख्या बघता देव जाणे. चुगल्या चाहाड्या शिवाय भांडण तंट्या शिवाय काय आसत सांग त्यात. मी जर देशाची पंतप्रधान असते. तर सगळ्या मालिकाच बंद करून टाकल्या आसत्या.
दीदी, ये गप, मालिका बंद करते. सुया टोचून गोळ्या देणं वाटल काय.
आण्विका, माझा पेशा एवढा सोपा वाटतोय तर फक्त एक दिवस, नको नको फक्त एकच रात्र काढून दाखव सी पी आर च्या मुडदा घरात. आहे का हिम्मत?
दीदी, इ… नको ग बाई… तूच जिंकलीस, राम राम….. रात्रीच्या वेळी नको ती नावे घेतेस. जा तिकड.
आण्विका, कशी जिरली. बर गुड नाईट …
आण्विका झोपायला रुमकडे जाते.
….. …… …… ……..
दोन दिवसा नंतर….
Morning. Inter
आण्विकाच्या घरी.
आण्विका आपली बॅग भरत असते. इतक्यात आई काही मसाले ,चटणी, लाडू डब्बा घेऊन येते.
ते पाहून
आण्विका, ए बाई काय काय नेऊ मी. इथ माझ्या वस्तूपेक्षा तुझच पार्सल जास्त दिसतंय.
आई, जास्त नाही थोडेच देते. वाटल्यास रिक्षा करून जा बसमधून उतरल्यावर.
आण्विका, मला डॉक्टर सोडून हमाल बनावालियास म्हण.
आई, हे बघ तिथं वाटल्यास रेवतीचे कपडे घाल. पण एवढं ने. तिला बर वाटेल.
दीदी, काय बहिणीवर प्रेम उत्तू चाललय बघ.
आण्विका बॅग प्याक करते. त्यामधे आपला कॅमेरा सुद्धा घेते.
सर्वांना नमस्कार करते.
इतक्यात ताई अआतून दही साखर आणून देते.
आण्विका, बाळ कुठाय
ताई, झोपलाय तो.
आण्विका आत जाते बाळाला पाहून,
आण्विका, अरे लबाड, झोपलाय काय, मावशीला नाही का टाटा करायचा. असे म्हणत ती बाळाची पापी घेते.
इतक्यात बाबा गाडी काढतात.
बाबा, ये आटप लवकर बस निघेल. मला पण कामावर जायला उशीर होतोय. चल लवकर
आण्विका, सगळ्या मोठ्यांना नमस्कार करून गाडीवर बसते. बाबा गाडी चालवतात. आण्विका सर्वांना टाटा करते. व निघते.
….. ….. ….. ….. …..
कोल्हापूर सी बी एस स्ट्यांड
Morning. Outer…
सी बी एस स्ट्यांडवर गर्दी असते. तेथे पार्किंग गाडी करून ते कोल्हापूर -अलिबाग बस लागलेल्या ठिकाणी येतात. बस मध्ये चढून मोकळी सीट पाहून बाबा बसमधील प्रवास्यास
बाबा, इथ कोण बसलेय का?
प्रवाशी, नाही हो. आताच लागलीय बस.
बाबा, मग ठीक आहे.
बाबा अण्विकाला,
बाबा, अनु इथे आहे बघ तुझी बॅग. मस्तच सीट आहे.
आण्विका तिथे येते.
बाबा, हे घे पैसे काढून देत.
आण्विका, अहो रात्री दिलेत ना, मग आणखी कशाला.
बाबा, गप घे, लांबचा प्रवास आहे. जास्त कमी लागतात.
आण्विका, पण आहेत माझ्याकडे.
बाबा जबरदस्ती पैसे तिच्या हातात देतात.
थोडावेळ थांबून……
बाबा, बर, मी निघतो. मला आवरून कामावर जायचं आहे. नीट जा, पोहोचल्यावर फोन कर. मी सांगतो फोन करून…… ल येईल तो न्यायला.
आण्विका, बर….
बाबा निघून जातात.
…… …… …… …….
Morning. Kolhapur aalibag bas. Outer inter
बस स्टॉपला लागलेय. बाजूला अनेक बसेस ये- जा करत आहेत. अण्विका आपली बॅग नीट ठेवत आहे. बाजूच्या सीटवर अनेक पॅसेंजर बसलेत. कंडेक्टर येऊन तिकीटे काढत आहे.
आण्विकाचा फोन सीट खाली पडलेला, तो ती उचलत आहे. त्याचवेळी ईशान बसमध्ये येतो. व आपली रिझर्व्हेशन केलेल्या सीटवर पाठमोरी असलेली अन्विका पाहून
लांबूनच कंडक्टरला
ईशान, माझं रिझर्व्हेशन आहे. मला माझी सीट देताय का?.
कंडक्टर रिझर्व्हेशन तपासून.
कंडक्टर, थांबा साहेब, देतो.
कंडक्टर सीट चेक करत अन्विका फोन घेत असते तिथे येत.
कंडक्टर, यस क्युज मी मॅडम, ही सीट रिझर्व्ह आहे.
आण्विका, काय, ती सीटकडे पाहत. तिथे रिझर्व्ह नंबर पहाते
बापरे, गडबडीत मी पाहिलच नाही. व ती वर पहाते.तर..
एक हँडसम तरुण तिच्यासमोर उभा असतो. ज्याच्या डोळ्यावर गॉगल आहे. तिला त्याचा चेहरा ओळखीचा वाटतो.
आण्विका, माफ करा मला माहीत नव्हत. मी जागा एक्सचेंज करते.
आण्विका इकडे तिकडे पहाते. बस फुल्ल झालेली असते.
आण्विका, बापरे, बस फुल्ल झालेय. आता काय करायचं.
आण्विका, कंडक्टरला, मला माहित नव्हत. मला दुसरीकडे जागा अडजेस्ट करून देता का? काय आहे. मी पण लांब प्रवासाला चाललेय. अलिबागला.
कंडक्टर, गाडी तर फुल्ल आहे.म्याडम तरी बघतो काहितरी.
कंडेक्टर ईशानला
‘ साहेब तुम्ही एकटे आहात की आणखी कोण आहे.
ईशान, माझी एक सीट रिझर्व आहे. बाकी त्या वाटल तर बाजूला बसू शकतात.
ईशान अण्विकास बारकाईने पाहतो. त्याने तिला ओळखलेल असत. पण आपण कस प्रथम बोलवायचं. उगाच रागावली तर म्हणून तो गप्प राहतो.
आण्विका, (मनात) हा तर ईशान असेल. हा तोच आहे. काय ताठा आहे बघ याचा. जणू साहेबच असल्यासारखं ताठतोय. यानं मला ओळखलं नाही का. ओळखाय न काय झालं. सीट रिझर्व्ह आहे. म्हणूनच तोरा दाखवत असेल. बर हा कुठे चाललाय म्हणायचा असेल पुण्या बिण्याला मला काय करायचय. पण आता काय करायचं. काही झालं तरी अडजस्ट तर करावच लागेल.
कंडक्टर, (विचार करणाऱ्या अण्विकास,)
मॅडम कसला विचार करताय.
आण्विका, काही नाही. बर. त्यांना विचारा कोणत्या बाजूला बसणार ते.
ईशान, हसत मी कडेला खिडकी शेजारी बसेन. बाकी शेजारी त्या बसू शकतात.
आण्विका, (मनात) गेली खिडकीची साईड, खिडकी कडेला बसून शायनिंग मारायची असेल. बस म्हणावं.
आण्विका, बर बसा.
आण्विका तिची बॅग उचलून बाजूला घेते. व
बसा,
ईशान आपली बॅग वरील क्यारेज मध्ये ठेवतो. व आपल्या जागेवर बसतो. आण्विका शेजारी बसते.
आण्विका, मुद्दमच माफ करा मला माहीत नव्हत सीट रिझर्व्ह आहे ते. पुढे गाडीखाली झाली की मी बदलेन सीट.
ईशान, अहो, त्याची काय गरज आहे. मला काय संपूर्ण सीट नकोय.
आण्विकि, बर.
ईशान, मला ओळखल नाही का?
आण्विका, मुद्दामच ओळखीचा वाटतोय चेहरा पण…. नाव आठवत नाही.
ईशान, मी ईशान पाटील, आता ओळखल का?
ईशान (मनात ) मला ओळखत नाही की मुद्दाम दाखवत नाही.
आण्विका, हा, ओळखल
ईशान, तू अण्विका ना, अण्विका भोसले.
आण्विका, हो , बर काय करतोस आजकाल,
ईशान, मी फॉरेस्ट खात्यात कामाला आहे. फॉरेस्ट ऑफिसर म्हणून.
आण्विका, (मनात) हा म्हणूनच राजेश्री लई ताठलेत होय. मघाशी बर त्या कंडक्टर जवळ अनोळखी असल्या सारखा उभा होता.
आण्विका, म्हणजे नोकरी करतोस म्हण.
ईशान, बारावी नंतर बी. एस. सी. करत स्पर्धा परीक्षा दिली व ट्रेनिंग पूर्ण करून आता आहे नोकरीला कोल्हापूर- सिंधुदुर्ग सीमेवर दाजीपूर साईटला.
आण्विका, हा, मग आज काय दौरा,
ईशान, अलिबागला,
आण्विका, अलिबागला…
ईशान, हो तिकडे आमचं विशेष ट्रेनिंग आहे, खात्याचं, बर तू हल्ली काय करतेस.
आण्विका, मी B.H.M.S ला आहे. लास्ट इयर ची एक्साम झाली. फक्त ऐंट्रान्शिप बाकी आहे. आता सुट्टी असल्याने चाललेय मावशीकडे अलिबागला.
थोड्या वेळात कंडक्टर वेळ वाजवतो.
कंडेक्टर, इशारा देतो. ड्रायव्हर गाडी चालवतो.
…. ….. ….. …..
Morning. Day. Outer
कोल्हापूर पुणे रोड
बस धावत आहे. कंडक्टर तिकीट काढत आहे.
कंडक्टर, तिकीट…तिकीट….
पॅसेंजर, एक कराड द्या.
कंडक्टर तिकीट काढत पुढे येतो…
आण्विका जवळ येत..
कंडक्टर, मॅडम तिकीट घ्या.
आण्विका, एक अलिबाग द्या.
ईशान, थांब मी काढतो.
आण्विका, नको, काढते मी. ती काय दहापाच रुपयाची बाब आहे.
ईशान, डॉक्टर मॅडम, मी आता कमावतोय.
अण्विका, तरी पण नको, काढते मी.
आण्विका, काका द्या एक अलिबाग.
कंडक्टर तिकीट देतो. व पुढे जातो.
थंडगार वारा येऊ लागल्याने ईशान खिडकी ची काच पूढे ढकलतो.
आपल्या कानातील हेअर क्वाड ओन करतो.
मोबाईल साँग कनेक्ट करतो. व गाणी ऐकु लागतो.
व अण्विकाकडे पाहत हसत
ईशान, काल जरा जागरण झाली. थोडीशी विश्रांती घेतो.
आण्विका, काय करत होतास एवढं.
ईशान, काल मित्रांसोबत गेलो होती मूव्ही बघायला. बरेच दिवस झाले पार्टी मागत होते. नोकरी लागल्यावर म्हटलं देवून टाकू, पार्टी केली व फिल्म पहायला गेलो होतो.
ईशानने डोळे झाकले. व तो विसावला शेजारील सीटवर.
आण्विकास झोप येत नव्हती. ती इकडे तिकडे बघत तिने आपल्या बॅग मधील आजचा न्यूजपेपर काढला व वाचू लागली.
थोडावेळ तिने वाचून तो आपल्या बॅगमध्ये पुन्हा होता तसा ठेवला.
तेव्हा तिचे लक्ष ईशान कडे गेले.
आण्विका, (मनात) आज जवळजवळ पाच सहा वर्षांनी हा दिसतोय. आजपर्यंत कधी इतक जवळून नव्हतं पाहिलं अकरावी बारावी इयत्तेतला हाच का तो ईशान
आण्विका भूतकाळातील आठवणीत जाते.
Flash back
…. ….. ….. …… …
Day १०. O clock rani season
आण्विका, संयोगीता व वेदांगी एकत्र क्लासला जात आहेत.
वेदांगी, काय ग कालची नोट्स पूर्ण केलीस ना.
संयोंगीता, हो केली ना,
वेदांगी, नाहीतर जोगळेकर बाईंची बोलणी खावी लागतील.
आण्विका, ती बोलत नाही केव्हा, सारखी चटर पटर करत असते नुसती. मुलांनो, हे लिहून आणा. त्या नोट्स पूर्ण करा. सगळ्यांना कारकून करून ठेवलंय बाईने, फळ्यावर काही लिहायला नको, देतेय नोटस,
संयोगीता, पण शिकवते मस्त.
वेदांगी, त्यात काय शंका नाही. पण लेखन लई बाईचं.
आण्विका, तर काय, माझ्या महिन्यात दोन लाँग स्केप वह्या भरल्या.
संयोगीता, बरं चला लवकर वेळ झालाय.
त्या शाळेच्या ग्राउंडच्या जवळील रोडने जात असतात. इतक्यात ग्राउंड वरून एक फूटबॉल येऊन अन्विकास लागतो. अण्विका तोल जावून खड्यात पडते. तिचे कपडे राड होतात. तिला थोडे खरचटते ससुद्धा रत्याने जाणारे लोक गोळा झाले. त्या दोघी मैत्रिणीं अण्विकास सावरण्याचा प्रयत्न करतात.
एक बाई, अरे लागल वाटत. काय या मुलांना कळतच नाही. कसे खेळायचे ते.
दुसरा, रस्त्यावरून कोण येत जात हे बघत नाहीत.
तिसरा, बॉल लागला का?
हात थोडा दुखावल्याने अण्विका रडू लागते.
इकडे मैदानावर
विनीत, अरे बॉल लागला वाटत कुणाला,
महेंद्र, कळतच नाही बघ बॉल कसा मारायचा ते. लागलं वाटत कुणाला.
ईशान, घाबरून तिथे आला.
ईशान, लई लागलं का?
त्याला समोर पाहताच व त्याने बॉल मारल्याचे लक्षात येताच वेदांगी त्याला जोरदार थप्पड लगावते.
वेदांगी, कळत नाही का? लहान आहेस, रस्त्यावरून कोण येत कोण जात याचा तरी अंदाज करायचा,
ईशान गाल चोळत बाजूला होतो,
इतर लोक चला तिला पटकन दवाखान्यात नेऊ.
Flash back
आण्विका स्वप्नातून बाहेर आली. तिने त्याकडे पाहिले, तो आता शांत भासत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक नवखे तारुण्याचे तेज जाणवत होते.
ती त्याचे सौंदर्य पाहत पुन्हा स्वप्नात हरवली.
…. ….. ….. …… ….. …..
Day after noon. Inter. Hospital
आण्विका रडत होती.
डॉक्टर , घाबरु नको बाळ, हाड काही मोडल नाही, फक्त दुखावला गेला आहे. स्ट्यापिंग करावं लागेल. बर होईल थोड्या दिवसात.
वेदांगी, त्या मुलाला चांगल बदडले पाहिजे.
संयोगीता, ए गप, त्याने काही जाणून बुजून केलं नाही. चुकून लागला तो बॉल.
वेदांगी, तुला लागायला पाहिजे होता. म्हणजे समजलं असत.
संयोगीता, ये गप्प बस पेशंट पेक्षा तुझाच दंगा जास्त आहे.
वेदांगी, हो तर.
आण्विका, ए बाई, गप्प बसा ग उगाच तुमची भांडणे नकोत.
डॉक्टर स्ट्यापिंग करून काही औषधे देतात.
इतक्यात अण्विकाचे बाबा येतात. व तिला घेऊन जातात.
ईशान हॉस्पिटल बाहेर एका कोपऱ्यावर उभे राहून पहात असतो. अण्विकाला बाबा घेऊन जाताना त्याला खूप वाईट वाटत असते.
Cut to…..
…. ….. ….. ….. ……
क्रमशः. पुढे