Day / Inter / Hostel /
Action :
परीक्षा टाइमटेबल शिपाई बोर्डावर लावतो. मुले येऊन पाहून जात आहेत. हॉस्टेलवर सर्व खोलीत मुली उठून फिरत तसेच बसून, व्हरांड्यात फिरून वाचन करत आहेत. बाथरुम मध्ये नोटस लावलेल्या आहेत. कोणी टॉयलेट मध्ये बसून सूत्रे व व्याख्या पाठ करत आहेत. तर कुणी टेरेसवर फिरत अभ्यास करत आहे. कुणी वाचत पेंगत आहे. गजर वाजल्यावर उठून पाने पुस्तकाची परतत आहेत.
Cut to …..
….. …… …….
Night / Inter / Hostel office shejaril Room
Action :
कमला शिरसाठ मॅडम आपल्या खुर्चीत बसलेल्या आहेत. एक जाडी मुलगी त्यांच्या डोक्यावर तेल टाकून मालिश करत आहे.
Dialog :
कमला शिरसाठ :
वा वा वा, … किती बरं वाटतंय, बघ, हे परीक्षेचे दिवस आलेत की माझे सुखाचे दिवस चालू होतात बघ..
मुलगी :
ते कसं काय मॅडम ?
मॅडम :
अग्, या सगळ्या मांजरीणी अभ्यासात गढून जातात. इतकं की सांगू, …. मला शांती लाभते, बघ शांती.
मुलगी :
असं होय,
कमला शिरसाठ :
माझी तर सरकारला कळकळीची विनंती आहे बघ. की या ज्या परीक्षा सहा महिन्यानं घेतात. ते काही खरं नाही. त्यापेक्षा महिन्याच्या महिन्याला घेत जावं बघ. म्हणजे हॉस्टेल कसं शांत शांत
( ती मुलगी एकत एकत जास्त तेल घालते. त्याचे ओघळ डोळ्यावर येवू लागतात.)
कमला शिरसाठ :
अगं ये, बास कर, काय अंघोळ घालतीस… लक्ष कूठे आहे तुझं.
चोळ जरा…. अभ्यास नाही तर यात तरी प्रगती कर….. एखादं मसाज सेंटर तरी काढता येईल.
( ती मुलगी डोके मालिश करु लागते. इतक्यात घड्याळ गजर करते.)
Cut to ……
…… ……. …….
Day/ Inter /morning / Hostel
आरोही :
तन्वी, मनू मंदिरात जाऊन येऊया का? परीक्षा जवळ आलीय.
तन्वी :
चालेल की, संध्याकाळी जाऊ
Cut to ….
…… …… …….. …….
Day/ Inter -Outer / Ganesh Temple
(तन्वी, मानसी , व आरोही गणेश दर्शन घेतात. गंध फुले वाहतात. घंटी वाजल्याचा आवाज मंदिर बाहेर येवून प्रदक्षिणा मारत असतात. तिथे असणाऱ्या भिकरणी कडे पाहत)
तन्वी :
आरोही पाहिलंस का?
( आरोही पहाते तिचे डोळे रागाने लाल होतात. चिडून)
आरोही :
पाहतेय चल बघू.
( भिकरणी च्या अंगावरील आपला ड्रेस पाहून)
आरोही :
हा ड्रेस कोणी दिला?
भिकारीण :
दोन देवासमान पोरी होत्या ग माझे मत, तू पण कायतरी दे की?
आरोही :
( मोबाईल वरील फोटो एका मुलीच्या वाढदिवसाचे काढून त्यातील श्वेताचा दाखवत )
ही होती का ती?
ती भिकारीण :
होय ग, देवगुनाची ग बाय ती, तू पण दे की काहीतरी.
( आरोही तिच्या वाडग्यात पाच रुपयांचे नाणे टाकते. व निघते.)
Cut to …....
……. ……. …
Day / Outer /morning / college garden
( बागेत एका झाडाखाली प्राजक्ता व तिच्या मैत्रिणी अभ्यास करत आहेत. आरोही व तिच्या मैत्रिणी तिथे जाऊन चिडून अंगावर जात)
आरोही :
श्वेते नालयके माझा ड्रेस भिकरणीस दिलास काय?
( भांडणं करत)
श्वेता :
उलट आभार मान,तुझ्यासारखे नाही दुसऱ्याचे ड्रेस कात्रीने कापत.
( तन्वी कडे पाहत)
काय ग तन्वे, तुला सगळ माहीत आहेत या उंद्रिनीचे कारनामे, खोटं बोलशील तर दाडवान चेपिन.
तन्वी :
गप, आरोही चल इथून.
वेदिका :
चल ,.. काय चल, बोल की आमचे ड्रेस कुणी खराब केले.
तूच ना मग तुला कसं सोडावं.
आरोही :
ए शहाणे, लई नाटक नको करुस. तुला काय वाटल, कि मी तुम्ही अरेरावी कराल, व मी घाब्रेन. जा, स्वतला काय समजतेस. होय कापले ड्रेस, उंदर सोडताना लाज नाही वाटली.
वेदिका :
तुला कुणी सांगितलं आम्हीं उंदरे सोडली म्हणून.
आरोही :
मला सगळ कळतं, बाकीच्या रुम सोडून मधल्या आमच्याच रूममधे कशी घुसलीत.
श्वेता :
ए.. जा आम्ही नाही सोडली काय करणार तू?
आरोही :
थांब दाखवतेच,
( भांडणं सुरू, भांडणात दोन गुच्या तन्वी व मानसी ल लागतात. प्राजक्ता भांडणं सोडवते.)
प्राजक्ता :
हे , बघा झालं ते झालं, परीक्षा तोंडावर आलेत. उगाच भांडणे नकोत.
आरोही :
हे बघ, तू तत्त्वज्ञान शिकवू नकोस. या मंद डोक्या माग तुझच सुपीक डोकं असणार. हे कळतंय मला.
प्राजक्ता :
तोंड सांभाळ आरोही, जा, तू कुठं येवढी सज्जन लागून गेलीस. तू पण कमी प्रतापी नाहीस. तुमचे हे प्रयोग मला माहित पण नाहीत. हे बघ तू जे केलंस त्याचा बदला त्यांनी घेतला. एवढंच. आता वाद सोडा व परीक्षेवर ध्यान द्या.
आरोही :
वेड घेवून पेडगावला जाऊ नका, नालायक मुली.
प्राजक्ता :
ए… गप्प
तन्वी :
ए .. चल उगाच इशू वाढवू नकोस, प्राचार्या पर्यंत जाईल, पेपर दोन दिवसावर आहे. चल , यांचं बघू नंतर.
मानसी :
चल गप्प , आता इथून.
श्वेता :
ए.. तन्वे काय म्हणतेस, नंतर बघू, आम्ही पण घेतो बघून.
( आरोही, तन्वी, मानसी तेथून जातात.)
श्वेता :
गेली उंद्रीन.
प्राजक्ता :
गप्प बस, स्वेते व वेदे, चला सोडा तो विषय, लागा गप चूप अभ्यासाला. चला ल्याबररीत.
( त्या निघतात.)
Cut to......