शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code
Showing posts with label फ्रेंडशिप एक साहस भाग ११. Show all posts
Showing posts with label फ्रेंडशिप एक साहस भाग ११. Show all posts

Friday, July 18, 2025

फ्रेंडशिप एक साहस भाग ११

फ्रेंडशिप एक साहस भाग ११

 NIGHT 9.00 O’ CLOCK / INTER / HOTEL SHIVENERI

(हॉटेल शिवनेरी मधील एका साईड टेबलावर जेवणाचा आस्वाद प्राजक्ता व मैत्रिणी घेत आहेत. शांत संगीत चालू आहे. मॅनेजर त्यांना पाहून वेटरला लावून देतो. वेटर येतो.)

वेटर :

मॅडम, इथे बसू नका, हा टेबल बुक आहे.

श्वेता :

 बुक आहे म्हणजे काय? हॉटेल आहे की रिझर्व सेंटर.

वेटर :

 तसं नाही मॅडम, तुम्हाला मी दुसरीकडे जागा देतो.

श्वेता :

 दुसरीकडे आणि कुठे? आम्ही इथेच बसणार.

( तिथे मॅनेजर येतो. )

मॅनेजर :

नमस्कार मॅडम.

प्राजक्ता :

 आपली ओळख,

मॅनेजर :

 मी या हॉटेलचा मॅनेजर आहे.

प्राजक्ता :

 तुमच्या इकडे कस्टमरशी असेच वागतात का?

मॅनेजर :

 तसं नाही मॅडम, आमच्याकडे हर तऱ्हेचे गिऱ्हाईक येतात. त्यामुळे आम्ही खास लोकांसाठी विशेष वार्ड केले आहेत.

श्वेता :

 मग आम्ही काय सामान्य वाटलो का?

मॅनेजर :

 आपणासाठी आतील बाजूस खास सोय आहे.

प्राजक्ता :

बर.

( मैत्रीणींना उद्देशून)

 चला ग , आतील बाजूस.

(त्या आतील टेबलवर जातात.)

वेटर :

ऑर्डर मॅडम

प्राजक्ता :

हा घे.

(No oc)

Cut to ……

……. …… ……

NIGHT 9.20 O’ CLOCK / INTER / HOTEL SHIVENERI

 (  विभागास लागून दुसरीकडे असणाऱ्या टेबलांतील टेबलावर दोन तरुण येऊन बसतात. त्यातील एक हँडसम असतो. त्याचे नाव आश्विन असते. तो प्राजक्ता कडे पहात असतो. इकडे ऑर्डर येते. प्राजक्ता व तिच्या मैत्रिणी टेबलवर ताटे ठेवणाऱ्या वेटरला)

वेटर :

 ऑर्डर घ्या ही मॅडम.

माधवी :

सर्व्हिस तरी फास्ट आहे म्हणायची.

वेटर :

 सवय झालीय आम्हाला आता. आणखी काय हवं असेल तर सांगा मी जवळच आहे इथे.

प्राजक्ता :

 हा, ठीक आहे.

( जेवत असताना आश्विन पहात आहे हे प्राजक्ताला जाणवते. ती लक्ष न देता जेवू लागते.)

( दुसऱ्या टेबलवर जयेश अश्विनला )

जयेश :

 काय अश्विन नजर कूठे आहे?

आश्विन :

 काही नाही जेवण ऑर्डर पाहतोय.

 जयेश :

उगाचच खुळ्यात काढू नकोस. जेवणं खोली कुठे? पाहतोस कूठे?

आश्विन :

 तसं काही नाही रे.

जयेश :

तरीपण नजर सारखी त्या कॉर्नरच्या. टेबलकडे का चाललीये.

आश्विन :

 गप्प कोणीतरी ऐकेल.

( जेवणं येते, तो जेवत तिकडे पाहू लागतो. प्राजक्ताला अस्वस्थ वाटू लागते.)

श्वेता :

 काय ग, काय झालं?

प्राजक्ता :

 कॉर्नरचे टेबलकडे जरा बघ. म्हणजे कळेल.

( श्वेता रुमाल खाली टाकून पाहून अंदाज घेते.)

श्वेता :

हे बघ , तू जेव तिकडे लक्ष देवू नकोस.

रेवा :

 आपलं एक् टार्गेट पूर्ण झालं.

प्राजक्ता :

 आता दुसऱ्याचा विचार करूया.

श्वेता :

ते ही करायचं की.

माधवी :

 जरा माझं म्हणणं आहे की जाताना आपण रोपवेने जाऊया. व येताना येवू पायऱ्यांवर उड्या मारत.

प्राजक्ता :

 अजिबात नाही, आपणं आव्हानं स्वीकारलंय ते पुर्ण करायचंच.

वेदिका :

एवढी तयारी करतोय ते कशासाठी? रोपवेनं जाण्यासाठी नाही?

रेवा :

अग पण …

प्राजक्ता :

 तुला जमत नसेल तर सोपा उपाय आहे एक.

रेवा :

सांग सांग,

प्राजक्ता :

 अरोहीचे पाय धर व क्षमा माग. व म्हण जमत नाही.

रेवा :

 त्यापेक्षा गड चढून पाय मोडले तरी चालेल.

प्राजक्ता :

मग ठरलं तर… सर करायचा गड.

श्वेता :

कधी जायचय.

प्राजक्ता :

फेब्रुवारी १६ ला प्रस्थान करूया. मी सर्व डेटा काढलाय पाचाडपर्यंत गाडीन जायचं. तिथून पुढे चालत.

वेदिका :

 अजून तसे पाच सहा महिने आहेत.

श्वेता :

म्हणून काय घोरत पडायचं नाही.

माधवी :

 मग काय नियोजन.

श्वेता :

 वस्तादानी सांगितलेय तसं,

अनुजा :

अगदी बरोबर श्वेते.

प्राजक्ता :

 परीक्षा काळात दुर्लक्ष झालं आता वेळ आहे प्रॅक्टिसला.

श्वेता :

मग ठरलं तर डन्न.

सर्वजणी :

 डन्न.

जेवताना :

 प्राजक्ता :

 काय लावायची का रेस,

( रेवा बोर्ड कडे पाहत. तिथे तांबडा, पांढरा रस्सा, व सोलकढी अनलिमिटेड असते.)

रेवा :

 चल होऊन जाऊ दे..

Cut to …..

( हॉटेल परिसरात एक् गाडी थांबते, चार टारगेट मुले उतरतात. दारु प्यायलेली असतात. ती धडपडत आत हॉटेल मध्ये येतात. टेबलवर बसत. ऑर्डर देतात. राक्षसा सारखं जेवू लागतात. जेवण आटपत  आल्यावर.)

एकजण

ए वेटर, इकडे ये.

( वेटर जवळ येतो.)

वेटर :

 बोला साहेब.

 ( गुंड १) :

काय चव हाय की नाय, पाणचट पाणी वाढलंय नुसत.

गुंड २ :

 याची चव घे कळलं तुला. लेकाव लोकांकडून पैसे घेता अन पाणचट जेवणं देता. रस्सा तो ही आंबट.

वेटर :

 अहो ती सोलकडी आहे. रस्सा नाही बघा जरा.

गुंड १ :

बघ काय बघ, तुला काय आंधळे वाटलो का?

बघ खिडमिड्या पिऊन.

( गुंड सोलकडीत थोडी व्हिस्की मिसळतो. व त्याला धडपडत उभा राहून पाजू लागतो.)

वेटर :

 सोडा हो मला, मी घेतलीय टेस्ट.

( ते त्याला पकडुन जबरदस्ती पाजू लागतात. तो हात आडवा धरतो.त्याच्या हाताला धरत)

गुंड २ :

आम्हाला शिकवतो का रे भुसणळ्या. अंगात हाडे आहेत का तुझ्या. हे घे चव.

( वेटरच्या चेहऱ्यावर सोलकडी फेकली जाते. तो केविलवाणे पहात.)

वेटर :

 माफ करा साहेब, दुसरा रस्सा आणतो.

गुंड १

दूसरा रस्सा मागवयल त्यात काय तुझी हाडे घालतोय का चव यायला.

( वेटर गप्प राहतो.)

बोल की बांगड्या.

( आवाज ऐकून मॅनेजर येतो.)

मॅनेजर :

 काय झाले साहेब.बोला.

गुंड १:

 बोला काय बोला, पाणचट पाणी रस्सा म्हणून देता. व विचारलं की हा तुमचा वेटर उडवा उडवीची उत्तरे देतो.

मॅनेजर :

तुम्हाला रस्साच पाहिजे ना मी देतो.

गुंड १ :

 देतो काय देतो, दिलाच पाहिजे.

मॅनेजर :

 तू आत जा व म्हादूला लावून दे.

( वेटर आत जातो. म्हादु तिथे येतो.)

महादू :

 बोला साहेब.

मॅनेजर :

 यांना नवीन रस्सा दे.

महादू :

 जी साहेब.

( महादू आत जातो.)

ते एकमेकांशी बोलत

एकगुंड :

 कशी जिरवली त्याची.

( हसण्याचा आवाज)

दुसरा गुंड :

याला म्हणतात पॉवर, एक बाटली आत गेली की मर्द होतो बापय. समजल काय सूर्या.

Cut to ……

….. …… …

( प्राजक्ता व तिच्या मैत्रिणी जेवून बाहेर जाताना बिल भागवताना काँटर वर श्वेता व प्राजक्ता जाते. बाकीच्या गाडीकडे जातात. याच वेळी वेटर त्या तरुणांना बिल देतो)

वेटर :

 साहेब बील.

 गुंड :

 कसलं बील

वेटर :

जेवणाच.

गुंड :

 देत नाही म्हणावं.

वेटर :

असं करू नका हो आमचं पोट चालत यावर.

गुंड :

 तुझं पोट गेलं तेल लावत. देत नाही जा,

( गुंड वेटरला ढकलतो. बिल पे करण्यास निघालेल्या प्राजक्ताला धक्का लागतो. ती वेटरला सावरते.)

(ते पाहून आश्विन चिडून उठत असतो. त्याचा मित्र जयेश हात धरून बसवतो.)

श्वेता :

 ए आडदांड भिरंबाटलास काय?

गुंड ( धडपडत)

काय म्हणालीस, भिरंबाटलास, कोण मी.

प्राजक्ता :

( श्वेताला मागे घेत.)

 काही नाही भाऊ, तुम्हाला नाही. ती मला व वेटर काकांना म्हणाली.

गुंड :

 असं होय. मला वाटल मला बोलतेय.

प्राजक्ता :

नाही नाही, तुम्हाला कशाला म्हणेल.

प्राजक्ता ( श्वेता कडे पाहत)

 श्वेता चल गप बिल भरून जाऊया. उशीर होतोय.

Cut to ….

....... …….

( काऊंटरवर जाऊन बील देताना)

श्वेता :

तू का मध्ये बोललीस पाहिलस ना त्याने कसं ढकललं वेटरला.

प्राजक्ता :

हे बघ गप्प बस, जिथं तिथं तलवार काढून चालत नाही.तो माणूस नशेत आहे. उगाचच भांडणं कशाला.आपणं इथ आलोय सेलिब्रेशन करायला. झगडायला नाही. समाजात वावरताना हर तऱ्हेची मानस भेटतात.

श्वेता :

भेटतात म्हणून काय. हवं ते करतील.

प्राजक्ता :

 तू गप्प.

( प्राजक्ता बिल पे करते.)

मॅनेजर :

( बिल घेत)

मॅडम, आम्हाला हे रोजचंच आहे. रोज अशी एखादी केस येतेच, तुम्ही नका ध्यान देवू.

Cut to ….. …..

……. ……..

( तो गुंड जागेवर गेल्यावर इतर गुंड त्याला बोलतात.)

एक गुंड :

काय हे बॉस, एका मुलीन तुमचा अपमान केला. अन् तुम्ही गप्प.

दुसरा :

तर काय, जरा सुद्धा किंमत राखली नाही. सरळ तुम्हाला भिरंबाटलास म्हणाली.

गुंड : ( चिडून)

 अस म्हणाली काय, थांब दाखवतोच, त्यांना नमुना.

( तो काऊंटरकडे जातो. जिथे श्वेता व प्राजक्ता बिल भागवत आहेत. तो जाऊन प्राजक्ताच्या ओढणीला हात पुसू लागतो. ती हिसडा मारते)

प्राजक्ता :

काय भानावर आहेस की नाही, ओढणी व टिशू पेपर यातील फरक कळत नाही. नॉनसेन्स.

(राक्षसी हास्य)

(श्वेताकडे पाहत)

गुंड :

नाय कळत, अन् मला भिरंबाटलास म्हणतेस. तू काय राजकुमारी आहेस का कुठल्या राजाची?

प्राजक्ता :

ये पींडक गप्प बस.

( तो अंगाला स्पर्श करू लागतो. श्वेता त्याला ढकलते. )

दुसरे गुंड :

 काय हे बॉस

गुंड :

मला धकलते काय? थांब दाखवतो तिला माझा हिसका.

श्वेता :

ये बघू कोण दाखवते ते.

( त्या गुंडांशी फाईट करू लागतात. तो रामपुरी काढतो. )

आश्विन :

लई झाली दादागिरी, थांब दाखवतो यांना.

जयेश :

 अरे …

(आश्विन मध्ये येतो. व त्या गुंडांशी फाईट करू लागतो.)

मॅनेजर :

मॅडम तुम्ही निघा लवकर.

श्वेता :

 याला चोपूनच जाऊ.

मॅनेजर :

 हे बघा हे तुम्ही आता निघा हेच चांगल. या पिंडक्यांच्या नादाला कुठे लागतं. आम्ही बघतो यांकडे.

प्राजक्ता :

चल ग

Cut to…

( प्राजक्ता श्वेताला घेवून बाहेर येते व गाडीत बसतात गाडी निघते.)

Cut to…

( आश्विन त्या गुंडाला व त्याच्या सहकाऱ्यांना चोप देतो. त्यांची गचांडी धरून काऊंटर जवळ येतो.)

आश्विन :

 चल जेवणाचे बिल दे.

मॅनेजर :

 जाऊ द्या साहेब.उगाच भांडणं नको.

आश्विन :

चल काढ

गुंड :

 नाहीत माझ्याकडे.

आश्विन :

 फुकटच खायला आलास काय, चल आत भांडी घासायला.

( मॅनेजरकडे पाहत)

 भांडी घासायची खोली कुठे आहे.

( मॅनेजर नजरेने खुणावतो, )

आश्विन :

 चल आत.

(आत आल्यावर भांड्याजवळ नेत तेथील कर्मचाऱ्यास उठवून)

आश्विन :

  चला उठा हो तुम्ही,

( गुंडास)

 चल रे तू घास भांडी.

गुंड 2 :

बॉस घासा भांडी नाहीतर तो आणखी चोपेल.

तिसरा गुंड :

दणका लई मोठा हाय, दाडवान हालल माझं.

गुंड :

बघून घेईन तुला.

आश्विन :

 घे काय बघायचं ते बघून , आधी घास.

Cut to ….

……. ……. ……

NIGHT / OUTER/ in car

रेवा :

 काय ग, आत दंगा कसला चालू होता.

श्वेता :

 रामायण सुरू झालं होत.

अनुजा :

 कसल रामायण.

श्वेता :

 एक पिंडक आलं होत त्रास द्यायला, प्राजक्ताच्या ओढनीला हात पुसला

वेदिका :

 काय? थोबडवल नाहीस. चल दणकुया.

प्राजक्ता :

 काय दणका दणकी नको, चला आता.

( गाडी निघते.)

Cut to …..

……. ……. ……

Night / Inter/ hotel

( मॅनेजर जवळ येत)

आश्विन :

 त्या मुली कुठे आहेत?

मॅनेजर :

मी जायला सांगितलं त्यांना.

आश्विन :

 काही लागलं वगैरे नाही ना?

 मॅनेजर :

 नाही.

आश्विन :

 तुम्हाला पण कळत नाही. अशा लोकांना वेगळा वार्ड ठेवावा ते.

मॅनेजर :

 म्हणून मघाशी आम्ही स्पेशल वार्ड त्यांना दिला होता सर.

आश्विन :

बर, जयेश हे कार्ड घे, बील भागव व ये बाहेर.

Cut to….

….

 Night/ outer / parking

(बाईक जवळ अश्विन इकडे तिकडे पाहत असतो.)

जयेश :

 काय झालं

आश्विन :

 गेल्या त्या.

जयेश :

मूड हाफ झाला वाटत, स्वारी जास्तच चिडलिय.

आश्विन :

त्याला आणखी चोपावसं वाटतंय.

 जयेश :

 प्रेमात पडलास की काय

आश्विन :

प्रेम वगैरे नाही यार, थोडी सहानुभूती वाटली.

जयेश :

मग काय काढायची माहिती?

आश्विन :

 कोणाची?

जयेश :

तुझ्या माणसाची.

आश्विन :

 गेली ती आता कशी मिळणार.

जयेश : 

थांब आलोच.

(तो आत् जाऊन येतो.)

जयेश :

चल जाऊया.

 ( टू व्हीलर वरून ते निघतात.)

Cut to ….

……. …… ……


वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...