Day / inter / hostel
(मुली आपापल्या रूममधे अभ्यास करत बसलेल्या व फिरत आहेत.)
Cut to ….
……
Day /Inter / Pariksha holl
(मुली पेपर देत आहेत.)
Cut to…..
…….
Day / Inter / prajakta Home in kitchan
(प्राजक्ता चहा घेत असते. आजी येते.)
आजी :
काय ग, तुझा ग्रुप कधी येतोय.
प्राजक्ता :
अगं, मी सांगत होते. की जाऊ नका, फार्म हाऊसवर थांबुया आपल्या. ऐकतय कोण?
आजी :
अग त्यांचं वर्ष सगळ हॉस्टेल वर गेलं. महिनाभर तरी घरचं खावूया म्हणत असतील. आपल्या आईच्या हातचे.
प्राजक्ता :
ते ही बरोबर आहे म्हणा. पण मी सर्व सोय करते म्हणाले होते.
आजी :
हे बघ तू करशील ही पण उपकराचे ओझे किती घेतील, त्यांना पण मर्यादा आहेतच की,
प्राजक्ता :
अग, चार दिवसांनी रिझल्ट आहे. येतीलच की त्या.थांब फोन करते.
Cut to …..
…… …
INTER - ON PHONE - IN ROOM
श्वेताची आई स्वयंपाक करताना फोन उचलते.
श्वेताची आई :
कोण बोलतंय
प्राजक्ता :
हॅलो, मी प्राजक्ता. श्वेता ची मैत्रीण. श्वेता आहे का?
आई :
आहे की, थांब देते.
(आई घराच्या मागील बाजूस येऊन.)
आई :
श्वेता फोन आलाय.
( परसात लाकडे खोलीत भरत असणारी श्वेता फोन घेऊन.)
श्वेता :
काय ग कशी आहेस?
प्राजक्ता :
हे बरं आहे, मी फोन केलाय. व तू मलाच विचार.किती दिवस झाले, फोन नाही काय भानगड.
श्वेता :
अग, घरातील कामात मदत करत होते. बर बोल.
प्राजक्ता :
चार दिवसांनी रिझल्ट आहे, माहीत आहे ना.
श्वेता :
अग, माहीत आहे मला, येणार आहे मी.
प्राजक्ता :
मला फोन कर हा. यायच्या दिवशी.
श्वेता :
अग, हो बाई, करते.
Cut to….
……. …… …..
ON PHONE /INTER /DAY
वेदिका घरी पापड करताना फोन वाजतो.
प्राजक्ता :
वेदू का ?
वेदिका :
हो , बोला मॅडम.
प्राजक्ता :
काय करतेस.
वेदिका :
नकाशे बनवतेय पापडाचे.
प्राजक्ता :
किती देशाचे बनवलेत.
वेदिका :
भरपूर आहेत. एकेका देशाचे डझनभर मिळतील. आईने कॉनट्रॅक्ट घेतलय ना
प्राजक्ता:
मग रट्टे चांगले घट्ट झाले असतील.
वेदिका :
हो झालेत ना दहा पहिलवान लोळवण्यासारखे.
प्राजक्ता :
मग येतेस ना चार दिवसानी रिझल्ट आहे
वेदिका :
हो, माहिताय ,
प्राजक्ता :
ठीक आहे. चालू राहूदे, तुमचा अटलास संग्रह तयार करणे.
Cut to….
……. …
OUTER / ON WELL / MADHAVI VILLAGE
माधवी विहिरीचं पाणी भरत आहे. ती पाणी घागरीत ओतताना तिच्या शेजारी लहान भाऊ उभा आहे.
फोन वाजतो.
माधवी :
(पाणी घागरीत ओतत)
बोला मॅडम
प्राजक्ता :
काय करतेस.
माधवी :
पाणी भरतेय.
प्राजक्ता :
कधी येतेस कोल्हापूरला.
माधवी :
येते रिझल्ट दिवशी.
Cut to ….
……..
Morning /Day / Anuja home
( अनुजा गोठ्यात धार काढताना. फोन कानाला लावून )
अनुजा :
बोल प्राजू, एवढ्या सकाळी सकाळी फोन केलास.
प्राजक्ता :
तुम्हाला नाही येत आठवण आमची , म्हंटल आपणच करावा फोन.
अनुजा :
तस काय नाही ग, एक दिवस असा नाही जात ज्या दिवशी तुझी आठवण आली असा.
प्राजक्ता :
काय करतेस.
अनुजा :
धार काढतेय.
प्राजक्ता :
दुधात आहेस म्हण.
अनुजा :
हो. येतेस का प्यायला.
प्राजक्ता :
येईन ना . बरं ते जाऊ दे, रिझल्ट आहे माहीत आहे ना.
अनुजा :
हो,
प्राजक्ता :
मग भेटू त्या दिवशी, बाकी चालु दे तुझं गुसळ मुसळ.
Cut to …..
………. …
On phone /Prajakta call Reva
(रेवा हॉटेलमध्ये भांडी धुत असते. कानाला फोन लावत. भांडी धूत.)
रेवा :
बोला मॅडम
प्राजक्ता :
काय करताय.
रेवा :
भांडी धुतेय. तेवढीच बाबांना मदत.
प्राजक्ता :
इकडे कधी येतेयस.
रेवा :
श्वेता व अनुजाचा फोन आला होता. येईन रिझल्ट दिवशी.
प्राजक्ता :
हा चालेल.
Cut to ……
…… ……. …..
Day / OUTER – INTER / COLLEGE
रिझल्ट बाह्य फलकावर लावलेला आहे.मुलांची गर्दी उसळली आहे.
तिथे कट्यावर
श्वेता :
प्राजू, काय रिझल्ट लागला असेल? फर्स्ट क्लास मिळाला असेल का?
प्राजक्ता :
चल बघू तर.
श्वेता :
तूच ये आमचे नंबर बघून.
( प्राजक्ता रिझल्ट पाहायला जाते. श्वेता व मैत्रिणी कट्यावर जाऊन बसतात. इतक्यात तिथे आरोही गोडांबे, तन्वी घोरपडे, व मानसी येते. श्वेताला पाहून.)
आरोही :
काय तन्वी, निकाल पाहायला काहीजण बी पी च्या गोळ्या खावून आलेत का बघ. नाहीतर अटॅक यायचा रिझल्ट बघून.
मानसी :
तर काय, किती जरी झालं तरी घोड काय पहिल्या टप्प्यात येतच नाही.किती दुसऱ्या टप्प्यात राहायचं. कंटाळा येत असेल बुवा.
आरोही :
कसं आहे? रेल्वेच्या सेकंड क्लासच्या डब्यातील मानसं कितीही गरम होतंय म्हणाली तरी ए सी काय त्यांच्या नशिबात नसतेच ना.
शेवटी बाहेरच्या खिडकितल्या हवेवरच समाधान मानावं लागतं.
( अरोहीच्या बोलण्याने चिडून )
श्वेता :
आरे, तुझं ते चिमणीच तोंड केवढं ? टाळा उघडतेस केवढा? तू लई माहितीये पहिल्या नंबरची. यावर्षी बघ तुला प्राजक्ता मागे टाकते की नाही.
आरोही :
प्राजक्ताच सोड गं, तिला मी दोन ते तीन मार्कात मागेच ठेवलीय. तू तुझं बघ, जनता गाडीने सुपर एक्स्प्रेसची तोड करु नये. तू व तुझ्या या टवाळ ग्रुपने फर्स्ट क्लास जरी मिळवला ना , तरी बोटभर केस कापून घेईन मी, समजल काय?
तन्वी :
ए गप अशी पैज लावू नये.
आरोही :
गप ग, या वशिल्याच्या कुबड्या घेऊन आलेल्या मला काय हरवणार.
अनुजा :
( चिडून)
ए सारखं वशिला वशिला काय म्हणतेस, होय मिळाली मला सवलत, माझ्या बापाने देशसेवा केली म्हणून मला दोन टक्के काय सवलत मिळाली, म्हणून सारखे कसले टोमणे मरतीस. ओपन मिरिट तर माझ्या मार्काच्या खालीच लागलंय. माझ्या बापाने देशसेवा केली, तुझ्या बापासारखे नाही कांदे काढत बसला.
आरोही :
माझा बाप कांदे काढतो, म्हणून तर फोडणी देतेस नाहीतर काय? बघू किती मार्क मिळालेत.
अनुजा :
जा, माहितीये तू लई तारे लावलेस , अन्, जा या तूझ्या दोन चोमड्यांना घेऊन.
तन्वी :
ये चोमडी कुणाला म्हणतेस?
अनुजा :
तुम्हाला म्हणतेय, घाबरते का? जा.
(मध्येच माधवी बोलते.)
माधवी :
ये बायांनो उगाच भांडणे नकोत.
( प्राजक्ता रिझल्ट घेऊन येते.)
श्वेता :
काय झालं ग, मिळाला का फर्स्ट क्लास.
प्राजक्ता :
अग फर्स्ट क्लासच काय घेवून बसलीस. डिस्ट्रीक्शन मिळालंय. तुम्हा सगळ्यांना.मागचा वचपा निघाला.
श्वेता :
काय खरंच, अरे व्वा, अन् तुला.
प्राजक्ता :
फर्स्ट नंबर इन स्टेट अँड कॉलेज. प्राजक्ता पाटील.
सर्व एकदम :
हुर्रे
( आनंदाने जल्लोष करत नाचतात.)
श्वेता :
एक मिनिट एक मिनिट, थांबा जरा ग.
( अरोहीला पहात वेडेवाकडे तोंड करत.)
बुरी नजर वाले तेरा मुह काला.
( वेदिकाकडे पाहत)
श्वेता :
वेदे कात्री तयार ठेव, बयेचे केस कापायचेत. आम्ही जिंकलो.
( आरोही चिडून आपला रिझल्ट पाहायला जाते.)
Cut to ……
……. ……. …
DAY / INTER/ HOSTEL /IN ROOM
( आरोही पाय जोराने आपटत हॉस्टेल वरील आपल्या रूममधे जाते. व साहित्य इस्कटते. डोकं बडवून घेते.)
तन्वी :
अग, अशी काय करतेस.
आरोही :
अस कस झालं. ती माझ्यापुढे कशी गेली?
तन्वी :
अग, एकाच पॉईंटने पुढे आहे ती,
आरोही :
तो ही कसा मिळाला तिला, माझं काय चुकलं, आजपर्यंत तिला पुढे जाऊ दिलं नाही. व आत्ताच असं कसं घडलं.
मानसी :
हे बघ, पुढच्या परीक्षेत जाशील तू, शांत हो. उगाच त्रागा करून घेवू नकोस.
( मानसी व तन्वी समजावत आहेत. ती चिडलेली आहे. )
Cut to ….
…… ……. ……..