शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code
Showing posts with label कळत नकळत जुळले हे बंध १७. Show all posts
Showing posts with label कळत नकळत जुळले हे बंध १७. Show all posts

Monday, December 18, 2023

कळत नकळत जुळले हे बंध १७

 कळत नकळत जुळले हे बंध भाग १७

क्रमशः पुढे चालू.....

Night. ७.३०. Inter. कोल्हापूर अण्विका हाऊस.

आण्विका बाबा बरोबर गाडीवरून येते.

बंगला आवारात आल्यावर वरील गॅलरीत ताई व बाळ बसलेलं असत.

ती अण्विकास पाहून.

ताई, ते बघ कोण आलंय. मावशी खाऊ घेऊन आलेय हो. आता आपण खूप खूप खाऊ खायचा काय.

आण्विका घरात येते. फ्रेश होऊन आल्यावर.

आई, काय मावशीच घर सुटतं नाही होय. गेली स्वारी ते तळच ठोकून बसली.

अण्विका हसते.

ती आपली बॅग उघडते. व साहित्य काढून देते.

आई, काय काय दिलंय मावशीनं.

आण्विका, हे घे, ही मिठाई, आगळ व हे तुमचे मसाले.

आई, बर झालं, आगळ संपलच होत.

आण्विका, अन् हा बघ बाळासाठी ड्रेस दिलाय. अन् हे खेळणे.

ताई, (खेळणे उचलून) बघ आजीनं काय पाठवलंय.

ती बाळाला खेळवू लागते.

Cut to. ….

…. ….. …

ईशान ट्रेनिंगवरून थेट गावी जातो. तेथील घराचे बांधकाम पाहतो. कामावरील कंत्राटदारांचे बिल पेड करतो. व घराच्या बाकीच्या कामाची जोडणी लावतो.

Day. Inter. राधानगरी. जवळील एक खेडेगाव घर.

 जेवणखोलीत ईशानची आई जेवण वाढत असते.

आई, गावाकडलं घर गावाकडलं घर झालं एकदास बांधून. आता लग्नाचं तेवढं बघायला हवं.

बाबा, बघुया की.

ईशान, थांब जरा. आणि दोन चार महिने.

बाबा, का दोन चार महिन्यांनी काय म्होतूर आहे.

ईशान, तस नाही. जरा घराचं काम होऊ दे. मग बघू.

आई, तोपर्यंत बघून ठेवू एखादी.

ईशान, बघुया. आता जेवू.

आई, जेव की तुझा काय हात धरलाय की पाय.

ईशान रागाने बघतो. व जेवू लागतो.

…… …… …….

Day. Inter ऑफिस राधानगरी

ईशान ड्युटीवर हजर होतो.

कामावरील मधल्या सुट्टीत स्वप्नीलला फोन करतो.

 ईशान, हॅलो स्वप्नील,

स्वप्नील, हॅलो, बोल की, काय कसा आहेस. काय राव गेल्यापासून फोन नाही की काय नाही.

ईशान, अरे कसं करणार फोन खराब झाला होता. मगाशी मिळालाय रिपेरी करून.

बर तू कसा आहेस.

स्वप्नील, आहे मजेत.

ईशान, घरातील बाकी कसे आहेत.

स्वप्नील, घरातील इतर म्हणजे, नेमकी कोण पपा ,ममी की आणखी कोण?

ईशान, सर्वच रे.

स्वप्नील, इकडून गेल्यापासून स्वारी गायबच झाली.

ईशान, जरा घराच्या कामात गुंतलो होतो.

स्वप्नील, बर फोन सहज केला होता की आणखी काही काम. आ..

ईशान, तुझ्यापासून काय लपलय, कशी आहे अनू.

स्वप्नील, म्हणजे तुला माहित नाही.

ईशान, काय रे.

स्वप्नील, अरे तिच लग्न ठरलं की.

ईशान, काय, अस कस लगेच ठरलं.

स्वप्नील, बाकीची लग्न ठरतात तस.

ईशान, गप चेष्टा करू नकोस. सांग खर काय ते.

स्वप्नील, मग फोन कर व विचार की.

ईशान, ये प्लीज , असं काय बोलू नकोस.

स्वप्नील, का? काळीज दुखतय.

ईशान, अरे चेष्टा थांबवं व काय ते सांग.

स्वप्नील, मॅडम कोल्हापूरला गेल्यात. दोन दिवस झाले. इट्रनशीप आहे ना.

ईशान, कधी आली, मला काही बोलली नाही.

स्वप्नील, तू तिला मेसेज करत नाहीस, फोन करत नाहीस. कशी सांगेल तुला?

ईशान, अरे फोन बंद होता. आता कॉल करतो.

स्वप्नील, मग वाट कसली बघतोयस, कर.

ईशान, तू ठेवलास तर करेन ना.

स्वप्नील, बर ठेवतो.बाबा.

फोन ठेवल्यावर ईशान अण्विकास कॉल करतो.

फोनची रिंग वाजत असते. फोन रुमामधील बेड वर वाजत असतो. आण्विका बाल्कनीत उभा असते. फोनची रिंग ऐकून ती आत येते फोन पाहते.

त्यावर ईशानचे नाव पडलेलं असत.

आण्विका, (मनात) आता आठवण झाली होय स्वारींना. इतकी दिवस कुठे होता. उचलतच नाही. व ती फोन ठेवून देते.

रिंग वाजते. व बंद होते.

इकडे ईशान, मॅडम उचलत नाहीत वाटत. रागवलेल्या दिसतात.

बर मेसेज तरी करतो.

तो मेसेज पाठवतो. आण्विका मुद्दाम मेसेज पाहत नाही.

थोड्या वेळाने ती तेथून उठते. व गाडी घेऊन कॉलेजला निघते.

….. ……. ……. ……

Day outer. कोल्हापूर शहर १२.o’ clock

आण्विका स्कुटीवरून वेदांगीच्या घरी जाते. लग्नाच्या खरेदीची व इतर लगबग चालू असते.

बाहेर रोडवर उभा राहून ती हॉर्न वाजवते व वेदांगीला बोलावते. ती येते.

आण्विका, (हॉर्न वाजवून) वेदे, ये वेदे,

वेदांगी आवाज ऐकून बाहेर येते.

वेदांगी, थांब आले आले.

 वेदांगी बाहेर अण्विकाच्या गाडीजवळ येते.

आण्विका, काय झालं ना मनासारखं.

वेदांगी, झालं, आहे चांगल स्थळ.

आण्विका, तारीख फिक्स झाली.

वेदांगी, नाही अजून, गावाकडील पाहुणे आल्यावर जाणार आहेत.

आण्विका, इंटरशिपच कसं करणार.

वेदांगी, काल गेले होते कॉलेजवर तेव्हा प्राचार्यांशी बोलण झालय.

त्यांना कल्पना दिली आहे. तेव्हा त्यांनी पुण्याकडील रुग्णालय देण्याचं मान्य केलय. कागदपत्र पण सबमिट केलेत.

आण्विका, निकाल पाहिलास.

वेदांगी, ऑनलाईन पाहिलाय, झाले पास. तू मात्र बाजी मारलीय.

आण्विका,बर निघते मी तुझं झालं काम माझ पाहायला नको. का येतेस बरोबर.

वेदांगी येते की. थांब जरा. मला पण कंटाळा आलाय.

वेदांगी, घरात जाते. आईला

वेदांगी, मी जाऊ अनु बरोबर कॉलेजला.

आई, जा की, नाहीतर लग्न झाल्यावर कुठे फिरायला मिळणार आहे.

 वेदांगी आपली पर्स घेते. व अण्विका सोबत निघते.

….. …… …… …….

मेडिकल कॉलेज. Day. Inter २.०० o’ clock

आण्विका प्राचार्यांच्या केबिनकडे जाते.

आण्विका, मै आय कम इन सर.

प्राचार्य, कम इन.

आण्विका व वेदांगी दार उघडुन आत आल्यावर.

प्राचार्य, कोण अण्विका , अभिनंदन

आण्विका, थ्यांक्स सर.

प्राचार्य, कमाल केलीस. टॉपर आहेस तू. अन् वेदांगीला पण चांगले मार्क्स भेटलेत. तुझं ही अभिनंदन.

आण्विका, सर इंटरशिपच कसं करायचं.

प्राचार्य, सांगायचं म्हणजे पूर्वी लास्ट इअर परीक्षा झाली की आम्ही मुलांना त्यांच्या सोईने हॉस्पिटल निवडण्यास देत होतो. पण बरेचशे विद्यार्थी आप आपल्या परीने हॉस्पिटल निवडायचे. पण हल्ली सरकारी दवाखान्यात डॉक्टर कमी असलेने. व तिथे जास्त गरज असेल ने आपल्या जवळील दवाखाना निवडण्यास सांगितले आहे.

आण्विका, मग मला इथे कोल्हापूर व जवळील पी ए सी मिळेल ना.

प्राचार्य, हे बघ अनु, इंटरशिप म्हणजे उगाच टाईमपास नको. अन् सांगायचं म्हणजे बऱ्याच जणांचे रेक्रूपमेंट कोल्हापूर आहे. व तू चांगल्या डॉक्टरांच्या सहवासात असावेस असे मला वाटते. यासाठी तुला दोन ठिकाणे दिली होती एक आजरा व दुसरे राधानगरी.

आण्विका, पण ती लांब आहेत.

प्राचार्य, हे बघ जरी लांब असली तरी तिथे चांगले सर्जन डॉक्टर आहेत. माझ्या ओळखीचे. व तू तिथे जावेस अस मला वाटते. त्यांच्या ज्ञानाचा फायदा तुला होईल. व लांबच म्हणत असशील तर राधानगरी घे. ते आजर्यापेक्षा जवळ आहे. व तुझ्या सोईचे पण. तिथल्या कॉटर मध्ये तुझ्या राहण्याची सोय पण होईल.

व त्या परिसरात अनेक वनौषधी असतात. त्याना बाबतच तुझं संशोधन देखील पूर्ण होईल.

वेदांगी, घे जा गप राधानगरी. कोल्हापूर काय सुटतं नाही होय.

आण्विका, चालेल सर.

प्राचार्य, हे लेटर घे. ऑफिस मधून सही शिक्का घे. अन् हा फोन नंबर तिथल्या डॉक्टरांचा आहे. संजय पाटील त्यांचं नाव. माझा रेफरन्स सांग.

आण्विका, चालेल सर.

प्राचार्य, काय वेदांगी लग्नची तयारी जोरात चालू असेल.

वेदांगी, चालू आहे.

प्राचार्य, पत्रिका छापल्या की नाहीत.

वेदांगी, तारीख आजुन फिक्स करायची आहे. दोन- चार दिवसात मिळेल.

प्राचार्य, तुला परवानगी दिलेय. पूण्याकडील तुझ्या सोईन मिळेल हॉस्पिटल.

आण्विका, लेटर घेते. व निरोप घेते.

बर, येते सर.

प्राचार्य, ते येणं जाणं तर आहेच. तुझ पण बघायला चालू आहे का? की काढू एखाद स्थळ.

आण्विका, नको सर, अजून वेळ आहे.

प्राचार्य, वेदांगीच चालू आहे. म्हणून म्हटल. तुला पण पहावा एखादा डॉक्टर.

आण्विका, करायच्या वेळी सांगेन सर.

प्राचार्य, अजून किती थांबणार?

आण्विका, फक्त काही महिने.

प्राचार्य, कोण पाहिलास काय?

आण्विका, म्हणायला गेलं तर हो, अन् नाही सुद्धा.

प्राचार्य, कोड्यात बोलायला तू काही ऐकायची नाहीस. बर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

आण्विका, हा थ्यांकयू सर.

प्राचार्य, वेदांगी तुला पण शुभेच्छा

वेदांगी, थ्याकयू सर.

त्या निघतात.

आण्विका ऑफिस मध्ये जाते. तेथील कारकुनाकडे लेटर देत.

आण्विका, यावर कॉलेजचा सही शिक्का द्या.

तो क्लार्क घेतो. सही शिक्का देतो.

त्या बाहेर येतात.

बाहेर आल्यावर.

Outer. कॉलेज रोड. Evening. ४,०० o’clock

वेदांगी, काय ग अस काय सांगितलस सरांना.

आण्विका, काय.

वेदांगी, म्हणायला गेलं तर हो अन् नाही सुद्धा.

 अण्विका, ते मजेत म्हटल.

वेदांगी, काय प्रेमात वगैरे नाही ना पडलीस.

आण्विका, काय सांगू तुला.

वेदांग, म्हणजे पडलीस म्हणायची.

कोण ते तरी सांग.

आण्विका, नाही नको, तू रागवशील.

वेदांगी, नाही रागावणार.

आण्विका, तुझ व त्याच भांडण झालंय.

वेदांगी, कोण सांग की कोड्यात नको बोलू.

आण्विका, मोबाईल वर डी पी दाखवत.

हा बघ.

वेदांगी, बारकाईने पाहत.

याला बघितलय कुठेतरी.

कोण बर.

आण्विका, बघ कोण ते.

वेदांगी, अग, हा तर ईशान आहे ना.

आण्विका, हो.

वेदांगी, बापरे मला धक्काच बसला बाई ग तू याच्या प्रेमात पडलीस.

आण्विका, हो,

वेदांगी, अग तो किती वांड आहे माहित आहे ना.

आण्विका, हो,

वेदांगी, अग तुझं अन् त्याच जमेल का?

आण्विका, न जमायला काय झालं. जमवून घेतल तर जमेल.

वेदांगा, फिरकी तर घेत नाहीस ना.

आण्विका, नाही ग. पण कुणाला सांगू नकोस. अजून काही स्वारींनी कबूल केलेले नाही.

वेदांगी, एकतर्फी नाही ना.

आण्विका, नाही.

वेदांगी, तुझ बोलण एक कोडंच आहे बाई. होय पण, नाही पण, कबूल करायला नाही अजून, काय समजत नाही.

आण्विका, गप तू चल.

 त्या दोघी निघतात.

…. …… …… ….. …..

वेदांगीला घरी ड्रॉप करून अण्विकाच्या घरी निघाली. जाताना तिच्या लक्षात संयोगिताला भेटायला जायचे आठवले.

ती तिकडे गाडी वळवते.

…… …… …

क्रमशः पुढे.....

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...