कळतं नकळत जुळलेले बंध.... भाग ४
क्रमशः. पुढे चालू........
बाजाराच्या दिवशी. संध्याकाळी. ७,०’clock. Inter. ईशानच्या घरी
ईशान बाथरूम मध्ये हातपाय धुत आहे. फ्रेश होत आहे. आई जेवणखोलित बसलेली आहे. तिने बाजार सोडलेला आहे. ती
आई, मेल्या एवढा कशाला बाजार केलास. काय महिन्याच माळव एकदम आणलास. की सारी मंडई उचलून आणलीस.
ईशान, का ग, काय झालं एवढं आता.
आई, घरात तीन चार माणस खाणारी. अन् घेऊन आलाय. पोत भरून आणल्यासारखा. किलो किलो साखर घेऊन आलास. पैसे काय झाडाला लागतात.
ईशान, पुढचा बाजार करायचा नाही.
आई, तुझ्या आजान दोन दोन आठवडे फ्रीजला ठेवून भाजी खालती का कधी.
काय मेला सुंभासारखा वाढलाय. काय कळत नाही.साधा बाजार करता येत नाही.
वडील, (बाहेरून आत येत)
का काय झालं.
आई, बघा तुमच्या लेकाचे प्रताप. सुट्टे रुपये नव्हते. म्हणून याला दोन हजाराची नोट दिली. तर सगळी मंडई धुवून घेवून आलाय. तीन माणस खाणारी घरात. व घेऊन आलाय किलो किलोने भाजी. काय म्हामदं घालायचं हाय. का लगीन हाय कुणाचं.
बाबा, अग, तू त्याला लिहून द्यायचस काय काय आणायचं ते.
आई, काय बारका आहे का लिहून द्यायला सगळ.फ्रीजमध्ये बघून जाता येत नाही.
ईशान गप्प ऐकत उभा असतो.
मनात ईशान, एवढं डोकं चाललं नाही. त्या दोघींच्या मागन गेला बाजार करत. सगळे प्रश्न सोडविणारा. कोणताही अडथळा बाजूला करताना डोकं जास्त चालत. इथच कशी पेंड खाल्ली. गाढव झालो शेवटी.
बाबा, हे बघ चूक तुझी आहे. कधी त्याला बाजाराला लावून दिलं नाहीस. का कधी जबाबदारी दिली नाहीस कोणत्याही घरातील कामाची. कशी जमेल त्याला.
बरं आता केलाय ना बाजार सोड .
बाबा, ( ईशानला) हे बघ ईशान वरील काकू आज बाजाराला जाऊ शकल्या नाहीत. त्यांना विचारून ये. व आणलेल्या दरात त्यांना हवं ते देवून पैसे घे. काय?
ईशान, बर बाबा.
आई, माळव देशीला पण या दुधीच करायचं काय. ते कोण घेणार.
ईशान, मी खातो. उगाच घर डोक्यावर नको घेऊस.
आई, खायला आणलीस की व्यायामाला. गदाच आणलीस की जणू.
ईशान, मग हान माझ्या डोक्यात. अन् हो शांत, गाढव झालो मी बाजाराची कटकट मागे घेऊन.
आई, आता तर कुठे सुरवात आहे बाळा. अजून लई आयुष्य आहे पुढे.
ईशान, बर बर बघतो मी.
ईशान बाहेर जातो.
…… …… …… …… …
Flash back
In. Bus. Afternoon. ३.३०
ईशान हसू लागतो.
आण्विका, काय रे काय झालं हसायला .
ईशान, अग तो दुधी भोपळा.
आण्विका, दुधी…. आ….. मला वाटत दुधी भोपळ्याची खीर मस्त होते ना?
ईशान, ए .. बाई गप्प त्या दुधीच एवढं नाव घेवू नकोस. त्या दुधीन मला फक्त मार बसायचा तेवढा राहिलाय.
आई सरळ म्हणाली, एवढा मोठा झालाय साधा बाजार करता येत नाही.
आण्विका, आम्ही काय एवढं वाईट बाजार करतोय का?
ईशान, तस नव्हत म्हणायचं मला. पण तीन माणसे घरात खाणारी व दहा बारा किलो भाजी घेवून गेल्यावर काय होणार. कोण पण सहज म्हणेल.
ईशान, तुला पण बोलले का तुझ्या घरातले. त्या दिवशी एक एक किलो भाजी आणली म्हणून.
आण्विका, छे, मी काही किलो किलो भाजी नव्हती नेली. अरे साधं गणित आहे. किलोभर घेतल. की कमी दरात भेटत. म्हणून आम्ही दोघी ठराविक बाजार एकत्रच घेतो. व नंतर वाटून घेतो.सोप्प आहे.
ईशान, हुशार आहात. एवढं साधं ध्यानात आल नाही माझ्या.
आण्विका, अरे, सुरवातीला होतो झोलमाल, नंतर होत अनुभवाने नीट. बरं एक विचारू.
ईशान, काय?
आण्विका, आता पण किलो किलोने भाजी नेत नाहीस ना?
ईशान, एवढा पण वेडा नाही ह मी. अरे. हो. सांगायचं राहिलं तुला की त्या दिवसानंतर घरातील सर्व व्यवहार आईने मला शिकवण्यास सुरवात केली. व आज तुम्हाला बाजार करायला शिकवीन मी.
आण्विका, बर चालेल की. हे घे आमच्यामुळे तुझी फजिती झाली ना. त्याबद्दल. ( ती चणे समोर करते. ईशान ते घेत.)
ईशान, कुण्या नवशिक्यान ट्युशन लावायला हवी तुमच्याकडे त्याची सॉलिड वाट लावाल तुम्ही.
आण्विका, तस काही नाही, सांगून सवरून ट्युशन असेल तर आम्ही ज्ञानाचे भांडार खुले करतो. चोरुन असेल तर …
ईशान, चोरुन असेल तर काय देता.
आण्विका, दुधी भोपळ्याची शिक्षा.
ते दोघे हसू लागतात.
…… ….. ….. ……. ……. …..
बस टनेल पार करते. व बायपास रोडला लागते. तेथून पुढे अलिबाग कडे जाणाऱ्या रोडला लागते.
एका धाब्याजवळून जाताना तिथे स्पीकर चालू असतो. स्पिकरवर मराठी गाणे लावलेले असते.
लिंबोनीच लिंबू… टच देठात भरलं….
गाणे ऐकून ती दोघे एकमेकांना पाहून हसू लागतात.
आण्विका, काय, रे, माझ्या मनात जे आल् ते तुझ्या पण आल काय?
ईशान, हो, हे गाणं कसं विसरेन.
बारावीत तुमचं स्नेहसंमेलनाचे साँग होते ना.
आण्विका, हो, या गाण्यावरून आम्हाला चिडवत होतात ना, लिंबू सरबत लेलो भाई…
ईशान, तुम्हाला जस चिडवता येतच नाही. तस बोलतेस. मला पण चिडवत होता ना सासरच धोतर फिटल म्हणून.
आण्विका, हे बघ, ते मी नव्हते चिडवत, संयोगिता चिडवत होती.
अरे, कसले रे पुरुष तुम्ही, साधं धोतर बांधता येत नाही. अन् म्हणे शिवरायांचे मावळे.
ईशान, मॅडम धोतर निसटले होते ते मधुकरचे, अन सांगायचं म्हणजे तुझ्या मैत्रिणीमुळे तिनेच धोतराच्या सोग्यावर नाचताना पाय दिला होता.
तुमची ती डान्स क्वीन श्याल्मली जुवेकर.
आण्विका, ती काही आमची लाडकी नव्हती तुम्हीच तिच्यामागे गोंडा घोळत फिरत होता.
ईशान, इतर मुले फिरत असतील मी नाही ह..
आण्विका, मुलींची नावे अडनावासकट पाठ अन् म्हणे मी फिरत नव्हतो.
तिचा पाय पडला अन् धोतर निसटल म्हणे. खंडोबाच्या गाण्याची पुरती वाट लावली तुम्ही.
ईशान, हो का, अन् मला वाटत तुमचं गाणं तरी कुठे नीट होत. पुढील चार जनी सोडल्या तर मागल्या बाकीच्यांना कुठे डान्स नीट येत होता. त्यांचे लिंबूनीच लिंबू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात होते.
अन् काय शेवटी लिंबू फेकून मारलेत अस मारत का कुणी.
ही काय पद्धत म्हणायची. त्या गाण्यात कुठे लिंबू मारलेले पाहिलेस का कधी.
आण्विका, शेवटी काहीतरी नवीन करून दाखवायचा उद्देश होता आमचा. बाकी काही नाही.
अन् आमच्या काही स्टेपस चुकत नव्हत्या. ती मागे होती ना तुमची लाडकी हेमांगी तिच्या चुकत होत्या.
कामावर ध्यान कुठ होत तीच. सदा नि कदा त्या नितिशकडे लक्ष. जसा काय वरमालाच घेऊन लागलाय तिच्या मागं. तीच अस वागणं.
शेवटी झालं काय. तो गेला मुंबईला. तिकडच्या मुलीसी लग्न करून झाला मोकळा. अन् हिच्या गळ्यात कोण पडल, तर तो दातक्या किशा. म्हणून म्हणते. बाईन कधी मृगजळामागे लागू नये. नाहीतर सितेसारखं रामायण घडत.
ईशान, सगळीच मुले तशी नसतात. इथं चांगल्या मुलाना कोण विचारतय. त्यांच्या संगे नुसत भांडणाच करतात. तुमच्या सारख्या मुली.
आण्विका, हो का? ऐकल कोणतरी, वर्गात एक तरी नग सरळ होता का. सगळ्या वह्या बदामान भरलेल्या.
ईशान, होता ना.
आण्विका, कोण तो.
ईशान, कोण म्हणजे, मी होतो. माझं वर्तन किती स्वच्छ होत. आहे का डाग एखादा तरी.
आण्विका, गॉगल लावून भर वर्गात शायनिंग मारणारा तू.
ईशान, मॅडम, डोळे आलते म्हणून लावला होता ग्वागल वर्गात कोणी हौसे साठी गॉगल लावत नाही.
आण्विका, त्या नखरेल श्याल्मलीला गाडीवरून फिरवत होतास ना.
ईशान, ए बाई, चुकीचा अर्थ काढू नकोस.
तिचे बाबा व माझे बाबा एके ठिकाणी कामाला आहेत. त्यांनी पेपरला वेळ होतोय. व त्यांना वेळ नाही म्हणून मला न्यायला सांगितल होत तिला. एवढंच.
आण्विका, तिचा भाऊ नव्हता का. की कुठे गेला होता. तू सोडायला तिला.
ईशान, तिचा भाऊ पाहिलास का तू. तो किती लहान आहे. व मी तिला नेत होतो. तेव्हा तिच्या वडिलांनी पेट्रोल चार्ज दिला होता. उगाच कायपण बोलू नको.
आण्विका, म्हणून जोड्याने गेला होता वाटत. पाया पडायला ज्योतिबाला.
ईशान, तू अती बोलतेस हा. मला तिला फिरवायला आवडत नव्हत.
आण्विका, का रंगानं काळी आहे म्हणून, तू कुठे गोरा आहेस. सावळा तर दिसतोस.
ईशान, ( नाराजिन) बर… बर.. असुदेत. मी काळा सावळा.
तो नाराज होतो. व गप्प बसतो.
आण्विका ही गप्प होते. आजूबाजूची लोक पाहू लागतात. त्यांच्या लक्षात येत. ती दोघे शांत बसतात.
…… ……. ……. …….
ते दोघेही आता शांत होते.
आण्विका, (मनात) मी काही जास्तच बोलले त्याला. अरे कळतच नाही मला. समजून घ्यायचं सोडून उगाच वाद घालतेय. त्याला प्रत्यक्ष दुखावले मी. किती दिवसांनी भेटलो होतो. आता काय करू. बाहेर पाहू का? नाही नको तो खिडकीकडेला आहे. उगाच त्याचा मूड हाफ नको व्हायला. आ…. काय करू. हा… पेपर वाचत बसते.
आण्विका, पेपर काढून वाचत बसते.
ईशान, (मनाशी आपल्या) अजूनही राग आहे. तिच्या मनात माझ्याविषयी. शांत बसलेलं बरं. नाहीतर खूप दिवसांनी भेटलीय थोडावेळचा प्रवास आहे. उगाच पुन्ह राग धरून जायला नको.
आपण जरा बाहेर पाहूया. निसर्गाचा आस्वाद घेऊ.
तो बाहेर पाहू लागतो.
थोड्याच वेळात अलिबाग येणार अस दिसतय. ही आपल्यापासून वेगळी होणार. पून: भेट होते की नाही देवालाच ठाव.
इतक्यात ईशानचे लक्ष तिच्या हातातील मोबाइलकडे जाते.
ईशान, ( आपल्या मनाशी)
नंबर कसा घ्यायचं. रागावली तर आहे. पण घ्यायलाच हवा. आ… काय करू.
आयडिया
ईशान आपला मोबाईल हळूच कुणी पहायच्या आधी बाकड्या खाली सरकवतो. व थोड्या वेळाने.
ईशान, अरे, माझा मोबाईल कुठे आहे. बापरे, पडला की काय कुठे! अरे. काय करायचं आता…
तो आपली बॅग किशे तपासू लागतो.
ते पाहून
आण्विका, असेल इथेच कुठेतरी. थांब मी कॉल करते.
आण्विका, नंबर सांग.
ईशान नंबर सांगतो.
आण्विका फोन डायल करते.
आण्विका, शिट खालून आवाज येतोय घे.
फोन वाजू लागतो. ईशान खाली वाकून फोन घेतो.
ईशान, हा सापडला. थॅन्क्स ह.
आण्विका, त्यात काय थ्यांक्स म्हणण्यासारखं आहे.
ईशानला आनंद झाला. त्याला तिचा नंबर मिळाला होता.
त्याने प्रथम तो अन्विकाच्या नकळत सेव केला.
थोड्याच वेळात बस अलिबागला पोहोचली.
सर्व पेसेंजर उतरू लागले.
आण्विका, आपलं साहित्य घेत होती.
ईशान, थांब मी बॅग घ्यायला मदत करतो.
आण्विका, थ्यांक्स.
ईशान, थ्यांक्स काय त्यात मानायचे. चल… बस रिकामी झाली.
आण्विका, ( मनात) खरंच किती निरागस आहे हा. मी थोड्यावेळा पूर्वी नको ते बोलले याला. अन् हा तरीही माझ्याशी नम्रतेने वागतोय. मी याच्या रंगावरून याला बोलले. किती देखणा आहे हा. याच्या मनात आल तर तो कित्येक मुलींशी फलर्ट करू शकतो. या संपूर्ण प्रवासात याने माझा जराही गैर फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. अन् मी….काय काय बोलले.
ती दोघे खाली उतरली. आण्विकास त्याच्या चेहऱ्यावरील तगमग जाणवत होती. त्याला ही तिच्या चेऱ्यावरचे भाव उमगत होते.
आण्विका तिचे साहित्य बाजूला हलवत.
मला जरा रिक्षा स्टॉप पर्यंत सोबत करतोस का?
ईशान, का नाही. चल…
ईशान तिच्या बॅगा उचलून रिक्षा स्टॉप पर्यंत सोबत घेऊन जातो.
ती रिक्षात साहित्य ठेवते.
आण्विका, तू कुठे जाणार आहेस.
ईशान, इथून थोड्याच अंतरावर आमचा ट्रेनिंग कॅम्प आहे. तिथे जाणार आहे.
आण्विका, जर का फ्रेश व्हायचं असेल तर चल आमच्या मावशीकडे. तिथून जा की.
ईशान, नाही नको. इथेच तर जवळ आहे. व बसमध्ये एकसारखं बसून कंटाळा आला आहे. व थोड गरगरायला लागलय. बर मग भेटू पुन्हा..
आण्विका, बर ठीक आहे. येते मी.
आण्विका, बर , काका चला मग.
रिक्षावाला, मॅडम कुठे जायचे.
आण्विका पत्ता देते.
रिक्षा निघते. आण्विका बाय बाय करते.
रिक्षात बसल्यावर अन्विका मावशीला फोन करते.
आण्विका, हॅलो मावशी मी आलेय अलिबाग मध्ये. रिक्षा धरलिय.
मावशी, अग फोन नाही का आधी करायचं. त्यांना लावून दिलं असतं की.तुझी वाट बघून त्यांना फोन आला ऑफिसचा ते तिकडे गेले ग. थांब मीच आले.
आण्विका, अग त्याची काही गरज नाही.
हे बघ तू पत्ता फक्त नीट सांग रिक्षेवाल्याला.
आण्विका फोन देते. रिक्षेवाल्यास मावशी पत्ता सांगते आहे.
शेवटी
मावशी, नीट लक्षात आलं ना.
रिक्षेवाला, हो आल.
मावशी, उगाच इकडे तिकडे फिरू नकोस. मी पैसे देणार आहे. मला माहिती आहेत. बस स्टँड ते इथपर्यंत किती चार्ज होतो तो.
रिक्षावाला, हा मॅडम.
…. ….. …… …….
५.४० evening outer अलिबाग बस stop
आण्विका गेल्यावर ईशान लगेच तिथे एका कंडक्टरला पत्ता विचारतो.
ईशान, हा जरा पत्ता सांगता का?
कंडक्टर, हा होय. इंथ जवळच तर आहे.
ईशान, कसं जायचं सांगाल का? की रिक्षा करावी लागेल.
कंडक्टर, नको रिक्षा, जवळच आहे. इथून फाटकातून पुढे सरळ जायचं पुढे दोन चौक ओलांडल्यावर एक गणेश मंदिर लागते. तेथून जवळच आहे.
ईशान, थ्यांक्स.
ईशान निघतो.
…… …… …. …
Evening. ६.०clock. Apartment अलिबाग. Outer. Inter
रिक्षा अपार्टमेंट मध्ये येते.
आण्विका साहित्य उतरू लागते.
मावशी रिक्षाचा आवाज ऐकून बाहेर येते.
व लगबिगीन खाली येते.
त्या रिक्षावाल्याला
मावशी, काय रे किती झाले.
रिक्षावाला, पंच्याहत्तर रुपये मॅडम.
मावशी, हे घे.
आण्विका, थांब ग मावशी मी देते.
मावशी, गप्प बस. घे रे.
रिक्षावाला निघून जातो.
मावशी, काय ग कसा प्रवास झाला.
आण्विका, मस्त
मावशी, अग काका येणारच होते. पण अचानक ड्युटी वरून कॉल आला. व त्यांना जाव लागलं.
आण्विका, मावशी रेवा व स्वप्नील कुठे दिसत नाहीत.
मावशी, अग ते दोघे क्लासला गेलेत. नाहीतर स्वप्नीलला लावून देणार होते.
शेवटी मी स्वतः निघाले होते. इतक्यात तुझा फोन आला बघ.
आण्विका, अग जाऊ दे ग. मावशी मला सवय झालीय प्रवासाची. त्यात काय.
मावशी, तरीपण काळजी वाटते न बाई.
अग बोलत काय उभारलोय. चल.
त्या साहित्य घेऊन आतमध्ये जातात.
चालत …
मावशी, बर अक्का व दाजी कसे आहेत..
आण्विका, आहेत बरे.
मावशी, बर तुझी डॉक्टरकीची एक्साम कशी झाली?
आण्विका, छान झाली.
मावशी, म्हणजे एकदाची डॉक्टर झालीस म्हणायची तू. आता घरातच डॉक्टर म्हंटल्यावर बाहेर जायलाच नको.
आण्विका, स्वप्नीलच काय चाललय. अन् रेवती कधी येणार.
मावशी, अग येईलच थोड्या वेळात.
बर, दमून आलीस . जरा फ्रेश हो जा.
आण्विका फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये जाते.
Cut. To……..
Evening. Outer. अलिबाग शहर on road
ईशान थोडे पुढे चालत जातो. पुढे एक सारखे चौक बघून
ईशान, (मनाशी) अरे, हे तर एकसारखं दिसत आहेत. कोणता चौक समजायचा. कुणाला विचारू. आ…. आईड्या.
ईशान गुगल ओपन करतो. त्यामध्ये आपल्याला दिलेले ठिकाण टाकतो. व सर्च करतो. व म्यापच्या साहाय्याने तिथे जातो.
फॉरेस्ट ऑफिस अलिबाग
ईशान ऑफिस आवारात पोहोचतो. सुट्टी झालेली असते. एक शिपाई ऑन ड्युटी असतो. त्याकडे जात.
ईशान, हॅलो, मी ईशान… ईशान पाटील फॉरेस्ट डिपार्टमेंट कोल्हापूर..
शिपाई, हा बोला काय हवंय.
ईशान, मी उद्यापासून सुरू होणाऱ्या वन परिषद ट्रेनिंग साठी आलोय.
शिपाई, हा आल ध्यानात.
ईशान, बर इथ राहायची सोय कुठे आहे.
शिपाई, तुमच्या साठी राहण्याची व जेवणाची सोय दुसरीकडे केली आहे.
ईशान, कुणीकडे नेमकी केलीय.
शिपाई, हे बघा आदी इथं आतील बाजूस रजिस्टर आहे त्या ठिकाणी सही करा. मग तुम्हाला तिथे पत्ता देतील त्यावर जाऊ शकता.
थांबा दाखवतो तुम्हाला.
ईशान व शिपाई आतील बाजूस असलेल्या रजिस्टर असणाऱ्या ठिकाणी जातात. ईशान आपली एन्ट्री टाकतो.
तेथील दुसरा शिपाई त्याला पत्ता देतो. व जायचे कसे ते सांगतो.
ईशान, थ्यांक्स.
शिपाई, इटस ओके.
…. ….. ….. …….
Eveving. ७.०० क्लॉक. अलिबाग inter
अलिबाग येथील निवासी भवनात.
ईशान काऊंटर जवळ जातो.
ईशान, हॅलो, मी ईशान, वन परिषद ट्रेनिंग साठी आलोय. आवक जवक रजिस्टर कुठे आहे?
तो रिसेप्सनिस्ट, सर आपल लेटर दाखवा. व आधारकार्ड पण द्या.
रिसेप्सनिस्ट नोंद घेतो.
व मागील बाजूस असणाऱ्या बोर्ड वरील किल्ली काढून देत.
ईशान, कसं जायचं.
रिसेप्सनिस्ट, हे बघा सर, येथून बाहेर गेल्यावर आपल्याला एक पुढे क्यांटिंग लागेल. तेथून खालिल बाजूस एक मोठी बिल्डिंग आहे. तिथे आहे शिपाई तो दाखवेल तुमची रूम.
ईशान तिकडे जातो.
शिपाई रूम दाखवतो. ईशान रूम उघडतो. व आत मध्ये आपली बॅग ठेवतो. व फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये जातो. फ्रेश होऊन निवासी क्यांटिंग मध्ये जातो. नाष्टा करून आपल्या रूम मध्ये येतो. बेडवर लोळू लागतो. त्याला दिवसभरातील गप्पा आठवू लागतात.
आण्विकाचा लाघवी चेहरा डोळ्यासमोरून तरळू लागतो.
डोळे मिटल्यावर देखील तीच त्याला दिसते. तो उठतो.
ईशान, हे काय होतंय मला. सारखी ती का दिसते.
एखादे पुस्तक तरी वाचूया.
ईशान आपली बॅग उघडतो. त्यातील एक बुक काढतो. ते वाचण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचे मन लागत नाही. वाचताना सारखी अन्विका त्याला समोर दिसू लागते.
कसाबसा त्याने तास ढकलला. व तो उठून क्यांटिंग मध्ये जेवणास गेला.
…. …… ……. …….
अलिबाग. Night. क्यांटिंग Inter
ईशान क्यांटिंग मध्ये प्रवेश करतो. तेथील टेबलवर जेवणास बसतो.
त्याच्या शेजारी दुसऱ्या टेबलवर इतर दुसऱ्या ठिकाणाहून लांबून आलेले अनेक वन ऑफिसर देखील जेवणासाठी आलेले असतात.
त्यातील एक
रवींद्र, हॅलो, ट्रेनिंगला आलाय का?
ईशान, हो. आपण .
रवींद्र, हो, मी पण , बर माझं नाव रवी.. रवींद्र देशमुख. आपण.
ईशान, मी ईशान… ईशान पाटील.
रवींद्र, बर कोठून आहात आपण.
ईशान, मी कोल्हापूर दाजीपूर विभाग राधानगरी.
रवींद्र, हा आलं ध्यानात.
तुम्हीच ना ज्यांनी तस्कर पकडले होते.
ईशान, हो.
रवींद्र, आपणास भेटून आनंद झालं. एक सरप्राइज आहे.
ईशान, बर आपण कोठून.
रवींद्र, मी नाशिक विभागातील आहे. तेथील नाशिक औरंगाबादमधील सीमेवरील गौताळा अभयारण्य, तिथे मी असतो. या कधीतरी सुट्टीला आपण, तिकडील पितळखोरा लेणी. व किल्ले पाहायला जाऊ आपण.
ईशान, चालेल की. पहिल्यांदा तुम्ही या आमच्या राधानगरीला मस्त धमाल करू
रवींद्र, हो नक्की.
इतक्यात वेटर जेवण घेऊन येतो.
वेटर, साहेब जेवण..
रवींद्र, हा ठेव..
वेटर, साहेब तुम्हाला काय अनु.
ईशान, पुढ्यातील मेनू कार्ड बघतो. व एक व्हेज थाळी मागवतो.
रवींद्र, काय राव कोल्हापूरकर तुम्ही अन् नॉनव्हेज मागायच सोडून हे काय.
ईशान, तस काही नाहीय माझं, गेली दोन चार दिवस झालंय जास्त नॉनव्हेज म्हणून जरा व्हेज मागवलं.
रवींद्र, हा..
ईशानचे जेवण येते. ते दोघे जेवतात. तेथे आलेल्या इतर डिपार्टमेंच्या लोकांशी ओळख करून घेतात. व
व विश्रांती घेण्यासाठी आपल्या रूमकडे जातात.
Cut to….
…… ….., ……. …… ….
Night. ९.३० o clock. Inter
ईशान रूममध्ये येतो. व आपल्या बेडवर आडवा होतो. त्याला पुनः अण्विका आठवू लागते. तो झोपण्याचा प्रयत्न करतो. पण झोप येत नाही.
ईशान, काय करू. काही सुचत नाही. आ…. आयडिया
तो मोबाईल घेतो. त्यावर व्हॉट्स ॲप काढतो. त्यावरून नंबरच्या साहाय्याने अन्विकाचे अकाऊंट ओपन करतो. व एक छानसा हाय गूड नाईटचा मेसेज पाठवतो.
व अंथरुणावर झोपल्या झोपल्या. तिचा डी पी मोठा करून त्याचा स्क्रीनशॉट घेतो.
व पाहत झोपतो.
…… …… …… …… …… ……. ….
Night. ८.०० clock. Dinar time. Inter
आण्विका मावशीच्या घरी. जेवण खोलीत जेवणासाठी काका बसलेत. रेवा वॉश रूम मध्ये आहे. व स्वप्नील टीव्ही पाहत आहे. पुढे जेवणाच्या डिशेस ठेवलेल्या आहेत. त्यामधे नाचणी भाकरी, घाटी पद्धतीने बनवलेला मसाले भात, सोलकडी, मालवणी पद्धतीने बनवलेली सुरमई. असे जेवण ठेवलेले आहे.
मावशी सर्वांना पाने वाढत आहे. रेवती अजुनही वाशरूम मध्ये आहे.
मावशी, अग, रेवा आटपल की नाही. इथे पान मांडलेत. स्वप्नील तो टिव्ही आधी बंद कर. व ये लवकर जेवायला.
अनु जेवण वाढण्यासाठी मदत करत आहे.
इतक्यात रेवा व स्वप्नील तिथे येतात.
रेवती, काय आज खास बेत आहे वाटत.
मावशी ( रेवाची आई) खास बेत आहे. इथ पाहुणी लागलीय काम करायला. व तुम्ही नुसत या हादडायला.
रेवती, ते तरी काम काही सोप नाही.
मावशी, हो का.
स्वप्नील, वास तर छान सुटलाय. काय आहे खास.
मावशी, सुरमई बनवलीय.अनुसाठी
स्वप्नील, खास पाहुनी आलेय म्हणून खास बेत होय ,
मावशी, नाही तर काय रोज तुम्हाला उपाशीच ठेवतेय.
रेवती, तस नाही ग. पण अशा रेसिपी रोज झाल्या तर बर होईल अस नाही का वाटत तुला.
मावशी, अनु तू बस जेवायला. मी वाढते.
रेवती, ए बस ग, ती वाढते ना. तुला कळतच नाही. पाहुनी आलोय म्हंटल्यावर आराम करायचा, मस्त फिरायच. उगाच हे जेवण वगैरे कशाला करायचं.
मावशी, ती पाहुणी आहे. पण तुला काम करता येत नाही.
रेवती, हे बघ मी मदत करते ह कामात. उगाच बोलू नकोस. सकाळी वॉशिंग मशिनची कपडे कोणी उनात घातलीत.
मावशी, हो बाई खूप काम करतेस. बर जेव आता.
अहो , करा सुरू. अनु तू पण कर.
जेवत काका अनुला,
काका, काय आनु मेडिकलच शिक्षण पूर्ण झालं ना.
आण्विका, हो झालं. फक्त आता इंट्रानशिप बाकी आहे.
काका, पेपर छान गेलेत ना?
आण्विका, हो.
काका, बर, आता पुढे काय करणार आहेस. लग्नाचा विचार काही. म्हणजे काय ठरवलस.
इतक्यात मावशी, तुमचं आपल काहीतरी आता कुठे रिकामी झालीय लगेच विषय नको लग्नाचा. जरा फ्री होऊ दे.
तू जेव बाळ.
आण्विका, अजुन काही तस ठरल नाहीये पण..
काका, स्थळ बघायला चालू आहेत.
आण्विका, नाही अजुन
मावशी, बघाय येईल डॉक्टर नाहीतर इंजिनियर. पुढें अजुन माप वय आहे.
उगाच घाई कशाला. तुम्ही गप बसा हो.
अण्विका, मावशी काका काय चुकीचे बोलत नाहीत. त्यात काय लग्न तर केव्हा पण करावेच लागणार. आज नाहीतर उद्या. डॉक्टर आहे म्हणून थोडेच जास्त वेळ थांबणार, बाबा पण विचारत होते.
मावशी, साडवांच बोलण झालं वाटत.
काका, नाही हं, आमचं काही या विषयावर बोलन झाल नाही. मला वाटल म्हणून विचारलं. एखाद स्थळ चांगल बघायला बर.
मावशी, जेवण थंड होतय. जेवा आता.
ते जेवतात.
…. …. ……. ……
Night. १०.o, clock. Outer
जेवण झाल्यावर बाहेर बसलेल्या अनुजवळ येत रेवती.
रेवती, अनु दीदी चल जरा बाहेर थोड फिरून येवू.
आण्विका, चल बर..
त्या दोघी फिरायला बाहेर जातात.
फिरताना
रेवती, काही म्हण दिवसा जरी कोकणात उकडत असले. तरी रात्रीचा गारवा विलक्षण मोहून टाकतो. नाई का.
आण्विका, हो तर. मस्त वाटतंय. खरंच
रेवती, त्या चांदण्या बघ किती मस्त वाटत्यात.
आण्विका, हो, आम्ही लहानपणी मामाकडे गेल्यावर अशाच चांदण्या मोजत होतो. आठवलं काय.
रेवती, हो, तर मस्त वाटायचं. यावेळी जाऊया का ग मामाकडे.
आण्विका, मी तयार आहे. तू ठरव. गेली चारपाच वर्षे चकवते आहेस.
रेवती, यावेळी नक्की.
अचानक अण्विका शांत झालेली पाहून
रेवती, काय ग बाबांचं बोलण जास्त मनावर घेतलेलं दिसतय.
आण्विका, तस काही नाही ग. त्यांचं काय चुकीचं आहे.
रेवती, हे बघ मी तुला सांगते. आता सुट्टीला आलीस. बाकी कशाचा विचार करू नकोस. लग्नाच बघू पुढे. आता एन्जॉय कर सुट्टी काय?
आण्विका, बर.
त्या दोघी परत घरी येतात.
….. …….. …….. ……. …
Night……. Inter. अलिबाग. मावशीच्या घरी.
रेवती अंथरूण लावते. पाण्याची बॉटल आणून ठेवते.
बाहेरून आल्यावर अन्विका आपलं हात पाय धुते व रेवाच्या रुमकडे जात.
आण्विका, काका गुड नाईट, मावशी गुड नाईट.
ते दोघे, तुला ही गुड नाईट.
रेवतीच्या खोलीत गेल्यावर तिथे आपली पर्स खोलते व आपल्या अंथरुणावर बसत. आपला मोबाईल काढते. इतक्यात रेवती जवळ येते.
आण्विका नेट ऑन करते. मॅसेज येवू लागतात.
रेवती, काय ताई काय करतेस.
आण्विका, अग, आल्यापासून पहिलच नाही बघ. घरी फोन सुध्दा केला नाही. थांब करते. लक्षातच नाही राहिलं माझ्या.
आण्विका फोन लावते.
तिकडून आई फोन घेते.
आण्विका, हॅलो आई,
आई, बोला लवकर आठवण झाली. फोन करायला.
आण्विका, अग गडबडीत राहूनच गेलं.
आई, कल्याण आहे. मी जर सुधाला फोन केला नसता तर कळलच नसत. व तुझा का ग नेटवर्कच्या बाहेर आहे असे सांगत होता.
आण्विका, अग, गाडी घाटात असताना लागत नाही एकेकदा.
आई, मी केला होता मावशीला फोन. तीनच सांगितलं पोहोचली म्हणून.
काळजी वाटते बेटा.
आण्विका, बर सॉरी ह.
आई, ठीक आहे. काळजी घे.
सर्व साहित्य सुधाला दिलस की नाही.
आण्विका, हो ग, दिलं. बर ठेवू का.
आई, ठेव ह.
रेवती, अंथरूण लावत.
काय म्हणत होत्या आई साहेब.
आण्विका, काय म्हणतील पोहोचली का वगैरे.
रेवती, बर मी जरा आलेच.
अण्विका, बर.
रेवा बाहेर जाते.
आण्विका आपल्या बेडवर बसून मेसेज तपासू लागते.
मेसेज वाचताना एक अनोन नंबर पाहून त्यावरील गुड नाईट मेसेज वाचते.
आण्विका, (मनाशी) हा कुणाचा नंबर आहे. असेल ओळखीच्या कुणाचा तरी. आपण पण गुड नाईट देवू या.
ती मेसेज पाठवते.
आण्विका मेसेज रिप्लाय आल्यावर ईशान पाहून पुन्हा
एक नवीन वैचारिक मैत्रीचा लेख पाठवतो.
आण्विका, लगेच पाहून ती तो लेख वाचते. कोण आहे. हे जाणून घेण्यासाठी.
आण्विका, नाईस व आपली ओळख असा संदेश पाठवते.
ईशान, (रिप्लाय) आपला मित्र.
आण्विका, आपला मित्र बरोबर आहे. पण नामकरण विधी झालाय की नाही.
ईशान, ईशान पाटील.
आण्विका, तू आहेस होय.
ईशान, जेवण झालं का?
आण्विक, हो, आताच. झोपायची तयारी चाललेय. बर, तुझं झालं.
ईशान, आताच आलोय. बर गुड नाईट.
आण्विका, गुड नाईट असा मेसेज पाठवते.
आण्विका डी पी पाहते.
छानसा त्याचा फोटो. तिला दिसतो.
त्याला पाहून ती फोन बाजूला ठेवते. इतक्यात रेवा येते.
रेवती, गुड नाईट अनु दी.
आण्विका, गुड नाईट.
लाईट बंद होते.
…… ……. …….. ……..
क्रमशः… पुढे….