Day -Morning / inter - outer / Hostel
Action :
( सकाळी आरोही उठते. दात घासत टेरेसवर कपडे आणायला जाते. तिचा ड्रेस जागेवर नसतो.)
आरोही :
( काळजीने हळू आवाजात )
माझा ड्रेस. कुठं आहे. काल तर इथेच उन्हात घातला होता. तन्वी ने नेलाय का बघायला हवं
( ती जिना उतरून खाली येत )
आरोही :
तन्वी ये तन्वी.
तन्वी :
( बेडवरून आळस देत. झोपेतच जांभई देत)
काय ग,
आरोही :
( तिच्या जवळ येत.)
झोपलीय आजुन, उठ
( आरोही तन्वीला हलवून )
तन्वी :
काय हे झोपू पण देत नाहीत नीट.
आरोही :
अग, माझा ड्रेस आणलास काय?
तन्वी :
( झोपेतच)
कुठला ड्रेस ? कोणता ड्रेस?
आरोही :
अग काल धुवून उन्हात घातलेला.
तन्वी :
मी तर कालपासून टेरेसवर गेलेच नाही बाई. मग कुठून आणणार.
आरोही,
(शेजारी उठून बसलेल्या मानसीला)
काय ग तू आणलास काय?
मानसी :
नाही ग, नीट पाहिलास का?
आरोही :
अग सर्व टेरेसवर पाहिलं नाहीये.
तन्वी :
एखाद्या कुत्र्या मांजरांन नेलाय का बघ.
मानसी :
( तन्वीच्या डोक्यावर टपली मारत.)
ड्रेस टेरेसवर होता. समजलं काय? अन् उंदराचं औषध घातल्यापासून इथं मांजर फिरकत देखील नाही.
आरोही :
मी नाही आणला, तू नाही.
मग ड्रेस गेला कुठे?
तन्वी :
बॅगा, पिशव्या चेक कर आधी.
(आरोही बॅग तपासते)
आरोही :
नाही ग यात. पण यात कसा असेल. मी तर धुवून उन्हात घातला होता.
तन्वी :
( चेहऱ्यावर शोधक मुद्रेने )
मग त्या दोन पायांच्या मांजरीनींचच काम असणार.
आरोही :
दाखवतेच त्यांना. थांब.
मानसी :
थांब, विना पुराव्याचे आपण काही करू शकत नाही.
( विचार करून चुटकी वाजवत )
मानसी :
हे बघ आपण त्यापेक्षा मॅडमकडे तक्रार करूया. त्या चेक करतील सर्वांच्या बॅगा.
तन्वी :
ही आयडिया चांगली आहे.
आरोही :
चला तर मग.
( त्या निघतात.)
Cut to
…… …...... ….. …… ……..
Morning -Day / inter / Hostel office
Action :
आरोही व तिच्या मैत्रिणी एकत्र ऑफिस बाहेर उभा आहेत. मॅडम केबिनमध्ये देवाचा फोटो ओवळत मंत्र म्हणत आहेत.
आरोही :
( दरवाजावर नोक करून )
मॅडम आत येवू का?
(मॅडम कमला शिरसाठ डोळ्याच्या इशाऱ्याने आत येण्याची परवानगी देतात. मुली आत प्रवेश करतात.)
आरोही :
मॅडम काल माझा ड्रेस कुणीतरी चोरला.
कमला शिरसाठ मॅडम :
(देवपूजा थांबवत.)
काय?
तन्वी :
हो मॅडम काल टेरेसवर उन्हात घातला होता. सकाळी पाहायला गेल्यावर तिथे नव्हता.
मॅडम :
अग पडला असेल वाऱ्याने उडून इकडे - तिकडे. शोधलास का तू?
आरोही :
मॅडम मी सगळीकडे पाहिलं. व वाऱ्याने फक्त माझाच उडाला नसता. बाकी शुभ्राचा तर अगदी सुळसुळीत ड्रेस. तो आहे तिथे. पण माझाच नाहीये.
मॅडम :
तू बॅगेत वगैरे चुकून ठेवलास का? बघ. …
आरोही :
काल धुतलेला ड्रेस,.. वाळायच्या आधी कसा ठेवेन?
आरोही :
सर्वत्र पाहिलंय. कुणीतरी चोरलाय.
मॅडम :
असं कसं चोरतील कोण? अन् से - पाचशेच्या ड्रेससाठी झडती घेत बसू का?
आरोही :
मॅडम से - पाचशेचा नव्हता तो, चांगला दोन हजाराचा होता. ते काही नाही झडती ही झालीच पाहिजे.
( बाकीच्या तिच्या मैत्रिणी सुद्धा )
मैत्रिणी :
हो झालीच पाहिजे, झडती झालीच पाहिजे.
मॅडम :
अग असं कसं लगेच…
मानसी :
ते काही नाही, झडती झालीच पाहिजे. म्हणजे झालीच पाहिजे.
सर्वजणी :
हो हो झालीच पाहिजे.
मॅडम :
बरं बाई घेवू या.
(मॅडम रिंग वाजवतात.)
Cut to …….
……. ….. …..
Inter / Day / Hostel ground
Action :
रिंग ऐकूण सर्व मुली ऑफिस जवळ जमा होतात. आपापसात चर्चा.
Dialog :
एक मुलगी :
कशाला बोलावलंय ? येवढ्या सकाळी सकाळी.
दुसरी :
सुट्टीच्या दिवशी पण सरळ झोपू देत नाहीत.
तिसरी :
आरोही बाई आहेत म्हंटल्यावर काहीतरी म्याटर घडला असणार.
दुसरी :
आणखी काय घडणार? दोन गटात धुमशान झालं असणार.
पाचवी मुलगी :
आता यांचं रामायण तासभर ऐकाव लागेल. आम्हाला काय कामं नाहीत का?
मॅडम :
( सिटी वाजवून )
हे पहा शांत व्हा जरा. आज सकाळी सकाळी तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या अरोहीचा वाळत घातलेला ड्रेस कुणीतरी चोरला आहे.
एक पोरगी :
म्हणजे आम्ही काय चोर वाटलो?
मॅडम :
अगं तसं नाही म्हणायचं. तिचा ड्रेस हरवला आहे. तुम्ही शोधण्यास मदत करा.
एक मुलगी :
हे घ्या आम्हाला काही कामेच नसल्यासारखं हिचा ड्रेस गेला. अन् आम्ही का बर शोधून द्यावा. पाहिजे तर तिलाच सांगा की शोधायला.
मॅडम :
अग शंभर पाचशेचा असता तर वेगळ होत. दोन हजाराचा ड्रेस होता. अन् … तुमचा जर गेला असता तर तुम्हाला काय वाटलं असतं.
एकजण :
मॅडम वाटायचं दिवस गेल्यात आता. मिक्सर आलाय मिक्सर.
मॅडम :
विनोद पूरे, तसं पाहता काल बाहेरच कोणीही आलेलं नव्हत. ड्रेस आतीलच कुणीतरी घेतला असणार. त्यामुळे सर्व खोल्यांची झडती घेतली जाणार.
मानसी :
ए चिंचपोकळी गप्प बसं, तुझी रिंग हरवली तेव्हा शोधून दिली ना. मग आता गपचुप कोऑपरेट करायचं समजलं का ?
मॅडम :
चला ग प्रत्येक रुमची झडती घ्या.
Cut to …..
…. ….. …….
Inter / Hostel room / Day
( प्रत्येक खोलीची झडती घेतली जात असते. सर्व ब्यागेतील साहित्य विस्कटले जात असते.)
First room
Dialog
एक मुलगी :
अगं, सगळ काय विस्कटतेस. वरुन पाहिल्यावर समजत की.
( दुसऱ्या मुलीच्या बॉक्सला हात लावल्यावर )
दुसरी मुलगी :
त्यात काय शोधतेस.त्यात क्लिनिंग सामान आहे. त्यात असेल का ड्रेस. नॉनसेन्स एवढं समजत नाही.
( ती पुढे होते. व तन्वीच्या हातातील साहित्य काढून घेते.)
तन्वी :
काय ग आम्हाला पण कधीतरी युज करायला देत जा की.
मुलगी :
काय पण मागायचं. कळतच नाही बघ. चल ठेव.
आरोही :
चला ग इथ काही नाही पुढील खोलीत पाहू.
Action :
( श्वेता व वेदांगीच्या रुमजवळ आल्यावर श्वेता रुमच्या दरवाजा समोर उभी असते. )
मॅडम :
श्वेता बाजूला हो झडती घेवू दे.
श्वेता :
मॅडम हे चुकीचं चाललय. अशी झडती म्हणजे चोरीचा आळ घातल्यासारखा आहे.
आरोही :
का चोरी सापडेल अशी भीती वाटतेय.
वेदिका :
पाच रुपयाचा ड्रेस, तो ही वापरलेला कोण चोरेल.
आरोही :
पाच रुपयाला दोरी तरी येते का? चांगला दोन हजाराचा होता तो.
श्वेता :
छापील किंमत सांगतेस का?आम्ही पण खरेदी करतो बुवा.
वेदिका :
ती ही छापील किमतीवर भरघोस सुट घेवून.
दुकानदार सांगेल एवढी किंमत तुझ्यासारखे बिनडोकच देतात.
आरोही :
ये वेदे जास्त बोलू नकोस. गपचूप तपासणी घेवू दे नाहीतर चोरी पत्कर.
श्वेता :
म्हणे चोरी पत्कर, अडलय आमचं खेटर. पुढे हो.
आरोही :
पुढे हो काय पुढे हो.
मॅडम :
हे बघ श्वेता, झडती घेऊ दे. उगाचच वाद नको मला, तीचं समाधान होईल.
श्वेता :
परवानगी देवू. पण एक अट आहे माझी, सर्व साहित्य जस काढेल तसं ठेवायचं.
आरोही :
ठीक आहे.
( आरोही आत जाते बॅगा तपासत काही सापडत नाही. ती हताश होते. खिडकीत फरशी पुसत्याल्या रुमालकडे बोट दाखवत वेदिका)
Dialog :
वेदिका :
काय ग हा काय बघ तुझा ड्रेस?
आरोही :
( रागाने पहात)
वेदे लई शहाणपण करू नकोस?
आरोही :
( श्वेताकडे पहात )
श्वेते हे तुझंच काम आहे. तुला बघून घेईन.
श्वेता :
ते बघायचं, ठरवायचं नंतर बघू आधी बॅगा आवर त्या नीट. नाहीतर.
आरोही :
नाहीतर काय करशील?
श्वेता :
( हातात स्टिक काठी घेवून तिला दुसऱ्या हातावर खेळवत. )
तू अन् तुझा छपरी गँग आलाय चालत , रांगत बाहेर जाल.
मॅडम :
श्वेता भांडणे नकोत. आरोही भर बॅगा. आवरा पसारा.
आरोही :
श्वेता मर्यादा राख.
श्वेता :
आधी तू सुधार स्वतः ला दुसऱ्याला नेहमी पाण्यात बघत असते नुसती.
वेदिका :
तू आवर इथल अन् निघ, अन् पोरी वो पट्टी काढून एक झबला घेवून द्या, नाहीतर रातभर रडत बसायची. माझा ड्रेस….. माझा ड्रेस…..
(आरोही वेदीच्या अंगावर धावून जाते. मुली मध्ये पडून सोडवतात.. )
तन्वी :
आरोही गप बस, उगाच वाद नकोत. इथं वाद घालून काही उपयोग नाही. आता चल इथून नंतर बघू काय करायचं ते.
श्वेता :
ऐकलस ना तुझी चमची काय म्हणते ते, चल निघ….
( आरोही निमूटपणे निघते. मुली सिटी वाजवून वेडे वाकडे नाचून चिडवतात. )
Cut to ….. …..
…….. …….. ……. ……