Day / inter / afternoon / hospital
हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आश्विनचे बॅन्डेज काढून टाकतो.
डॉक्टर :
( हाताने तपासत )
दुखतंय का,
अश्विन :
नाही.
डॉक्टर :
इथं.
अश्विन :
नाही.
डॉक्टर :
आता इथे.
अश्विन :
थोडं थोडं.
डॉक्टर :
तेवढं दुखणारच.
डॉक्टर :
( नर्सेला )
एक्स रे आण इकडे.
( नर्स एक्स रे देते. )
डॉक्टर :
( एक्स रे पहात. )
हा आहे आता नीट. अन् सूज ही उतरलीये.
जयवंत :
डॉक्टर काही घाबरूण्या सारखं.
डॉक्टर :
छे नाही .
जयवंत :
नाही म्हणजे भरती वेळी मेडिकल प्रॉब्लेम वगैरे.
डॉक्टर :
छे हो, झालंय नीट, एवढ्या गोळ्या लिहून देतोय त्या कंटिन्यू करा म्हणजे झालं.
जयवंत :
हा.
डॉक्टर :
उतर बाळ खाली आता.
( अश्विन उतरून चालू लागतो. तो नाजूक पाऊल टाकताना पाहून )
डॉक्टर :
चल भर भर. काय होत नाही
(अश्विन तरीदेखील हळू हळू चालू लागतो. )
Cut to …..
……. …… …… …..
Day / outer / morning / Ashvin HOME/ out side
( आजोबा निघालेले असतात. )
अश्विन :
आजोबा जाऊ नका ना.
तात्या आजोबा :
हे बघ घाबरायचं नाही. आज पासून बाबा तुला रोज नेऊन सोडतील. व आपला काशी मामा आणेल तुला.
अश्विन :
पण तुम्ही थांबा ना,
तात्या आजोबा :
अरे, अस कसं थांबून चालेल. तिकडे कामं पडलेत. व तुझी आजीही एकटी आहे.
अश्विन :
तरी पण .
आजोबा :
असा हट्ट नाही करायचा काय, अन् सुट्टी पडली की थेट गावी यायचं. मग आपण धम्माल करू, काय?
अश्विन :
हा.
Cut to …… …..
…… …. …… …..
Day / outer / school morning
अश्विनचे बाबा त्याला शाळेत सोडतात.
दुपारी शाळेतून इकडे तिकडे जाताना आरिफ, जोसेफ, समीर त्याकडे रागाने पाहत असतात.
Day / evening / school /outer
संध्याकाळी शाळा सुटल्यावर आश्विन स्कूल बाहेर आल्यावर ते तिघे एकमेकांना इशारा करत असतात. अश्विन बाजूला उभा असतो. समीर रागाने त्याच्याकडे जातो. इतक्यात पाठीमागून एक हवालदार येऊन त्याला पकडतो.
काशिनाथ :
या पकडला. काय रे, काय करतोस.
समीर :
काही नाही, मी तब्येत कशी आहे विचारत होतो.
काशिनाथ :
मला माहितीये तुझं विचारणं, आई शपथ सांगतो. हा हाथ बघितलास का? एका चापटीत लोळवेण समजलं का?
इथून पुढे अश्विन पासून शंभर फूट लांब राहायचं.
काय म्हणत होतास त्याला घाटी?
एक बसलीना सगळ्या कानात घाट्या वाजाय लागतील.
चल सट्क इथून.
( काशिनाथ पोलिसाला पाहून ते तिघे काढता पाय घेतात. काशिनाथ अश्विनच्या खांद्यावर हात ठेवून चालू लागतो. )
काशिनाथ :
हे बघ अश्विन, अस घाबरायच नाही, दुसऱ्याला घाबरवून सोडायचं समजल काय?
अश्विन :
हा
काशिनाथ हवालदार :
अन् हे काय, खातोस की नाही, कसा हडक्या दिसत आहेस बघ. जरा खात जा, माझ्यासारखा होशील.
चल तुला चौपाटीवर गोल गप्पे खायला देतो.
( ते रस्त्याने चालू लागतात. )
Cut to …..
…… ……. …….
Inter / school exam day / १२ o’ clock /afternoon
बेल वाजते, स्कूल मध्ये परीक्षा चालू आहे. पर्यवेक्षक पेपर देत आहेत. अश्विन पेपर लिहित आहे. समीर, आरिफ, जोसेफ यांना नीट पेपर लिहिता येत नाही. ते कॉपी करत आहेत. बेल वाजते. पेपर सुटतो.
मुले शाळेतून बाहेर पडतात. अश्विनचे बाबा गाडी घेऊन येतात. अश्विन गाडीमध्ये जाऊन बसतो. गाडी निघते.
गाडीमध्ये.
जयवंत :
झाला पेपर
अश्विन :
हो
जयवंत :
कसा गेला?
अश्विन :
सोपा. काशिनाथ काका आले नाहीत.
जयवंत :
त्याच काम निघालं अचानक. म्हणून आला नाही तो.
अश्विन :
उद्या पासून सुट्टी. मला भेळपुरी खायची आहे. तो नेणार होता.
जयवंत :
नको, वेळ होतोय जाऊया
अश्विन :
ते काही माहीत नाही. मला पाहिजे म्हणजे पाहिजेच.
जयवंत :
ठीक आहे. चल..
Cut to …..
…… …… …….
Inter / Ashvin HOME / evening
अश्विनची आई जेवण खोलीत कपाटात डबे ठेवत असते. दरवाजाची बेल वाजते. ती जाऊन दार उघडते. अश्विन आईसक्रीम खात आत येतो.
अश्विन :
आई.
माधवी :
काय रे हे, आईसक्रीम , अरे, घसा बसेल की.
काय हो तुम्हाला पण कळत नाही का?
जयवंत :
गप ग, खाऊ देत. किती बंधनात ठेवायचं त्याला.
माधवी :
अहो, पण …
(मागे वळून)
आश्विन… अश्विन …
( अश्विन जवळ जातो. )
अश्विन :
आज आम्ही धम्माल केली. चौपाटीवर गेलो. पाणीपुरी खाल्ली, भेळ खाल्ली. अन् हे बघ आईसक्रीम.
माधवी :
अरे, तुला कितीदा सांगितलेय. की उघड्यावरच काय खाऊ नकोस म्हणून.
अश्विन :
त्याला काय होतं, सगळे लोक खातात. ते नाही आजारी पडत, मी तेवढा पडतो. बर ते सोड माझं पॅकिंग कर.
माधवी :
( आश्चर्य चकित होऊन )
का?
अश्विन :
मी सुट्टीला गावी जाणार?
माधवी :
अरे, सानेबाईंचा श्री समर कॅम्पला जाणार आहे. तू पण जा की.
अश्विन :
ते काही नाही, मी गावी जाणार आहे.
माधवी :
अरे, क्लासेस तुझे,
अश्विन :
ते काही नाही, मी गावी जाणार म्हणजे जाणारच.
आजोबांना मी प्रॉमिस केलंय ,
( बाबांकडे पहात )
बाबा मला नेऊन सोडा, नाहीतर गाडीत बसवा. जाईन मी.
माधवी :
गावी जाऊन काय करणार. त्यापेक्षा इथच काहीतरी कर.
अश्विन :
ते काही नाही. मी जाणारच.
बाबा, मला सोडा.
जयवंत :
हे बघ …आज नाही, उद्या माझं महत्वाचं काम आहे. परवा सोडेन.
अश्विन :
चालेल. हे….हे….
( अश्विन नाचू लागतो. व आतील खोलीत जातो. टिव्ही पहायला. )
माधवी :
तुम्ही पण, काय हे ,
जयवंत :
जाऊ देत, तू गप्प बस, मला पण जाणवू लागलंय. की आपण त्याचे पंख कापत आहोत. मला पण तो गावी जावा अस वाटतंय.
माधवी :
ठीक आहे
( मान हलवते.)
Cut to …....
. ……. …… …. …….