Day / External / in car / village road
जयवंत कार चालवत आहे. अश्विन खिडकीतून बाहेरील शेतीचे निरीक्षण करत आहे. ( सुंदर म्युझिक वाजत आहे.
Cut to ……
….. ….. …..
गाडी कच्च्या रस्त्याने गावात शिरते. व एका बंगल्याच्या आवारात येते. जयवंत हॉर्न वाजवतो. कोणी येत नाही. तेव्हा.
जयवंत :
अश्विन गेट उघड जा.
( अश्विन खाली उतरतो. व जाऊन गेट उघडतो. जयवंत कार आत घेतो. व आश्विन गेट लावतो. गाडी आत आल्यावर जयवंत हॉर्न वाजवतो. तात्या आजोबा व सावित्री आई बाहेर येतात. अश्विन आजोबांना पळत जाऊन मिठी मारतो. )
अश्विन :
तात्या आजोबा, सरप्राईज
तात्या आजोबा :
आलास, पेपर कसे गेले.
अश्विन :
सोपे.
चला, रानात जाऊया.
सावित्री :
अरे, हो हो, एवढी काय घाई लागलीय. फ्रेश तरी हो. काहीतरी खा आधी.
आजोबा :
चल आत…
( ते आत येतात. जयवंत डिग्गीतुन साहित्य बाहेर काढतो. आत आल्यावर )
सावित्री :
फ्रेश हो, मी तुझ्या आवडीचे बटाटे वडे केलेत.
अश्विन :
तुला कसं कळलं. मी येणार आहे ते.
सावित्री आई :
सरप्राईज का तुलाच फक्त देता येत. आम्हालाही येतं की.
Cut to ……
…… …… …..
Day / inter / dayning holl
( सावित्री चपाती, बटाटेवडे व चहा आणून टेबलवर ठेवते. व प्रत्येकास देते. अश्विन गडबड करत खात असतो. )
सावित्री आई :
अरे, हळू हळू गडबड कसली करतोयस, हळू खा. काही कुत्र वगैरे पाठी लागलंय का?
जयवंत :
अश्विन आजोबांना व आजीला अजिबात त्रास द्यायचा नाही काय? व रानात फिरताना जपून,
अश्विन :
हो,
सावित्री आई :
अरे, काय हे सुरु झालं, तुझं. किती सूचना देशील. सुट्टी तरी मजेत घालवू दे त्याला.
तात्या आजोबा :
आज थांबणार ना.
जयवंत :
नाही,
सावित्री आई :
का रे, आज सुट्टी होती ना तुला.
जयवंत :
हो, पण मघाशी बोरिवली क्लाइंटचा फोन आला होता. मला जायला हवं.
सावित्री आई :
परत कधी येणार?
जयवंत :
महिना अखेरला येईन सुट्टी घेऊन.
सावित्री आई :
कशाला हव्यात असल्या नोकऱ्या. धड आराम नाही. की स्वास्थ्य. कशाला हवं ते. देवाच्या कृपेनं काय कमी आहे आपल्याला. उगाच नुसती धावपळ
जयवंत :
अग, अस का म्हणतेस. मी काय हौस म्हणून करत नाही.
बर ते सोड, चहा दे पटकन.
सावित्री आई :
हा देते.
( ती चहा कपात ओतते. )
Cut to ……..
…… ….. ….. ……
Day / inter – outer / Ashvin villege home
जयवंत निघालेला असतो. अश्विन हसून पाहत असतो.
जयवंत :
काय रे, असा हसतोस काय?
अश्विन :
मघाशी आजी तुम्हाला जादा वडे देत होती. अन् तुम्ही नको नको म्हणतं होता.
जयवंत :
त्यात काय एवढं, माझी आई आहे ती. माझे लाड करणारच. तुझी मम्मी नाही करत तुझे लाड.
अश्विन :
इतक नाही करत.
जयवंत :
गप, सांगू का?
अश्विन :
सांगा, पण आजी तुमचे जास्तच लाड करते.
जयवंत :
मग आई कोणाची आहे?
बर, ते सोड, नीट रहा, आजोबा, आजीला अजिबात त्रास द्यायचा नाही.
अश्विन :
हा.
( बोलत बाहेर येतो. तात्या आजोबा व सावित्री आईच्या पाया पडत. )
जयवंत :
येतो आई बाबा.
सावित्री आई :
नीट जा रे, उगाच गाडी पळवू नकोस. अन् हो पोहोचल्यावर फोन कर काय.
जयवंत :
हो हो, करतो. जातो आता.
सावित्री आई :
जातो म्हणू नये बाळा येतो म्हणावं.
जयवंत :
हो माझे आई, येतो.
( जयवंत कार मध्ये बसतो. कार निघते. कार गेल्यावर)
तात्या आजोबा :
काय मग काय ठरलं. आल्या का सूचना ध्यानात.
( अश्विन तिरकस पहात हसतो. )
तात्या आजोबा :
चल, थोडा वेळ आराम कर, नंतर ठरवू आपले नियोजन.
अश्विन :
हा चला,
Cut to …..
…… …… …..
Morning / inter – external / village / 6.00 o’ clock
गजर वाजतो , आजोबा अश्विनला उठवतात.
तात्या आजोबा :
अश्विन ये अश्विन
( अश्विन उठतो. )
आजोबा :
चल रपेटला.
( अश्विन उठतो. आपले तोंड धुतो व आवरतो. गावाकडील डोंगर वाटेला ते धावत जातात. उंच टेकडीवर सुर्य उगवत आहे. ते धावत जातात. अश्विन दमून गवतावर पहुडतो. आजोबा जवळ येतात. )
अश्विन :
हरवल की नाही.
तात्या आजोबा :
असा जोश रोज राहु दे म्हणजे झालं.
अश्विन :
नातू कुणाचा आहे.
तात्या आजोबा :
चल थोडी एक्सर साईज करु.
( ते व्यायाम करू लागतात. )
Cut to …
…… ……. …….