Night / inter / Kedar home
बैलगाडी दारात उभी राहते.
गडी :
अक्कासाब गाडी आली बघा.
सखू :
आली. जीव भांड्यात पडला. काळजी मिटली म्हणायची.
( गाडीतून केदार व इतर मित्र व ती स्त्री उतरते. केदार पुढे येतो. )
सखू :
काय र, लई वकूत झाला.
( त्याच्या हाताकडे लक्ष जाते. )
सखू :
काय र हे हाताला?
केदार :
काय नाही, वाईच खरचटलं.
सखू :
खरचटलं म्हणे, मला नको शिकवू. जखम हाय ही. सांग काय ते. आव जरा बाहेर या.
( केदारचं वडील बाहेर येतात. केदार पाया पडतो. )
केदार :
बाबा आशीर्वाद द्या, ही बघा गदा व कड जिंकलीय मी कुस्तीत.
बाबा :
आर वा, भारी हाय की,
सखू :
ते हाय, पण हाताला बघा.
बाबा :
काय रे केदार, हाताला काय आणखीन.
मल्हारी :
पाळेगाराशी झटापट झाली वाटत. त्या झटापटीत फरशी लागली.
सखू :
आर माझ्या कर्मा. त्यो अन कुठून उलटला म्हणायचा.
वडील :
हाणमा, वैद्यबुवाना बोलाव जा..
केदार :
काय नाही, जरासं लागलंय.
वडील :
जरासं होय, चांगलच लागलंय की.
वडील :
अन् ही कोण मंडळी.
जीवा :
यांच्या पाईच रामायण घडलं संमद.
मुलगी :
मी शेवंता, गडवाडीच्या पाटलांची पोर, जत्रसंन येताना पाळेगारान हल्ला केला. हे होते म्हणून वाचले. नाहीतर माझं काही खरं नव्हतं. माझ्या मुळेच घडलं सगळं.
( ती रडू लागते.. )
केदारचे वडील :
रडू नको बाळ, देवीआईची कृपा म्हणून वाचलीस. आजच्या या युगात अस रडून चालत नाही पोरींनी, त्यांनी पण भवानी सारखं शस्त्र उचलाय पाहिजे. व स्वतःच रक्षण केलं पाहिजे. तरच हे स्वराज्य वाचेल. अस प्रत्येक वेळी कोण वाली भेटलच अस नाही.
केदार वडील :
( सखूकडे पाहत. )
हे बघा, त्या मुलीला आत न्या. व तिच्या सोबत असणाऱ्या माणसांचं पण जेवणाच बघा. वैद्य बुवांना बोलावणं धाडलंय. येतीलच ते एवढ्यात. काय काळजी करू नका. एवढ्याशा वारान घायाळ होऊन पडायला. तो शेळपट नाही. ढाण्या वाघ हाय, शंभर वीर लोळविल .
सखू :
जी…चल ग आत.
(वैद्यबुवा येतात. व उपचार करून जातात. )
Cut to …..
…… …… ……
Day / morning / kedar home
बैलगाडी झुंपलेली दारात उभी आहे. शेवंता व तिचे सहकारी गाडीत बसतात. गाडी निघते. केदारीस गुंगी असते. जाताना शेवंता पाया पडते.
बाबा :
संस्कारी आहे पोर.
आई सखू :
हा बरं, चला गाडी आली.
शेवंता :
जी येते.
( गाडीत बसते. गाडी निघते. )
Cut to …..
…… ……. ……..
Day / evening / home )
केदारची औषधाची गुंगी उतरते. केदारी उठतो. घरात इकडे तिकडे फिरत असतो. त्याची आई तिथे येते.
आई सखू :
काय हवं बाळ.
केदार :
नाही नको.
आई :
बर.
केदार :
आई
आई :
काय ते.
केदार :
ती पावनी कुठे गेली?
आई :
कोण?
केदार :
ती काल आम्ही वाचवली. ती नाही का गडवाडीची.
आई :
ती होय, गेली की तिच्या तिच्या गावाला.
केदार :
लवकर
आई :
लवकर म्हणजे,… लोकांची पोर, कशाला ठेवून घ्यायची? ज्याची त्याच्याकडे सुरक्षित दिलेली बरी. उगाच नसत लचांड कशाला मागे?
केदार :
अग, दोन दिवस तरी ठेवून घ्यायची की नाही. किती घाबरली होती ती?
आई सखू :
म्हणूनच धाडली जेची तेच्या घरला. तिला घरात ठेवून घेतो. अन् गाव चिखल उडवू दे. तू उगाच गुळमुळू करू नको. का मनात भरली तुझ्या?
केदार :
आ …
( लाजतो. )
सखू आई :
आ,,, लाजतोस काय? एका खेपत तिनं बाप्याची शेळी केली. दुसऱ्या खेपत गुलामच करायची. अहो, ऐकलत का?
बाबा :
काय ते?
केदार :
ए गप्प की उगाच कशाला विषय वाढवतोस.
आई सखू :
मी वाढवते होय. अरे वा,
आव, ….. शेवंता रुतली बघा तुमच्या लेकाच्या काळजात.
केदार :
ए ., गप ग …
Cut to …… ….
…… …. …..
Day / outer / home mandal
लग्न समारंभ
केदार व शेवंताचे लग्न होत. अक्षता टाकल्या जातात.
Cut to ….
….. …… ….