Day / inter / kitchan room / Ashvin ajoba home Village
जेवण खोलीत सुमा जेवण वाढत आहे. आजी जवळ बसली आहे.
सावित्री आई :
अरे, घे की आणखी एक पोळी.
अश्विन :
नको,
सावित्री आई :
नको काय नको, घे गप्प तुझ्या सारख्या मुलांनी भरपूर खायला हवं.
अश्विन :
अग, दोन खाल्ल्या की.
सावित्री :
तुझे आजोबा चार चार खातात अजून, तुला काय झालं खायला. सुमा वाढ ग त्याला.
अश्विन :
नको न भरलय पोट माझं.
( एक पोळी वाढली जाते. तो ती खात. )
अश्विन :
आजोबा वीरगळ म्हणजे काय?
आजोबा :
हे बघ आधी जेव, त्यानंतर वरील माझ्या रूममध्ये एक कपाट आहे. त्या कपाटात आहे पुस्तक . त्यामध्ये तुला कळेल सगळं. मात्र पुस्तक नीट लावलेली आहेत. विस्कटायची नाहीत. काय?
अश्विन :
हा.
( अश्विन जेवू लागतो. )
Cut to …..
…. …… …… …
Day /Inter / home Village
( अश्विन जीना चढून वर जातो. खोलीचे दार ढकलतो. आत जाऊन कपाटातील पुस्तक शोधतो. त्याला सापडत नसते.)
अश्विन :
आजोबा, कुठे आहे ते पुस्तक? इथे तर भरपूर पुस्तके आहेत.
आजोबा :
मधल्या कप्यात तिसऱ्या ओळीत असेल बघ कुठेतरी.
अश्विन :
हा
( अश्विन पाहू लागतो. )
अश्विन :
अ …. मधला कप्पा …अ…… हा तिसरी ओळ …… अ… हा सापडले. इथ आहे होय. चला पुस्तक तर मिळाले. चला उघडून पाहू.
( अश्विन तिथे असलेल्या टेबल खुर्ची जवळ जाऊन बसतो. व पुस्तक वाचू लागतो. )
अश्विन :
वीरगळ
वीरगळ म्हणजे शूर वीरांचे स्मृतिचिन्ह.
( खाली चित्रे पाहत तो पान परततो. आतील पानावर गोरक्षक वीरगळ असे लिहिलेले असते. त्या खालील वाचत असताना त्याचे डोळे विस्पारतात. तो बारकाईने पाहतो. )
Flash back ( तो स्वप्न स्फूर्तीत हरवतो.
Cut to ……
……. ……. ……
Day / outer / morning / Village area road
डोक्यावर पाण्याची मातीची कळशी काखेत कळशी घेऊन मुली निघालेल्या आहेत. अंगावर त्यांच्या पारंपरिक दागिने वाकी, कंठा घातलेल्या आहेत. चिंचेच्या झाडाखालून जाताना पायात चिंचा पडतात. पाठीमागे असलेली कोयनली डोक्याची घागर सावरत चिंच उचलण्याचा प्रयत्न करत असते. तिला जमत नाही. ती खट्टू मनाने पुढे जात असते. इतक्यात एक काळ सावळा युवक झाडावरून खाली उतरतो. मागून हाक मारतो.
अंगत :
कोयनली, कोयनली,
कोयनली थांबते. तो समोर पसा करतो. त्याच्या हातात चिंचा असतात.
अंगत :
घे , तुला आवडतात ना,
कोयनली :
नको मला.
अंगत :
तुला आवडतात ना.
कोयनली :
नको मला.
अंगत :
उगाच ताकाला जाऊन भांडे लपवू नये. माणसानं.
कोयनली :
शिकाकाई मागितली होती ती का आणली नाहीस.
अंगत :
या दिवसात नसते ती, फुलोरा उठलाय झाडाला.
पण मागे मी दिली होती की तुमच्या घरी.
कोयनली :
ती होय संपली… आईनं माहेरी पाठवली.
अंगत :
झाडाला लागली की देईन आणून.
बर, या घे चिंचा, मला राखोळीला जायचंय.
( कोयनली इकडे तिकडे पाहत चिंचा घेते. व आपल्या पलकराच्या खिशात ठेवते. )
Cut to ……
….. ……. …
Day / inter / koynali HOME.
कोयनली आपल्या वाड्यात येते. पाण्याची घागर स्वयंपाक घरात घेऊन जाते. जोत्यावर तिचे वडील मालाधर वैद्य रोग्यांना औषध देत आहेत. आई स्वयंपाक करत आहे. चुलीवर गाडग्यात भात शिजत असतो. कोयनली घागर ठेवते.
आई जोग आंबा :
खूप वेळ झाला.
कोयनली :
कळशी जड झाली म्हणून वाटेतील झाडाखाली थोडी विसावले.
जोग आंबा :
कळशी जड झाली की झाडावरील चिंचाणी खुणावले.
कोयनली :
छे.. छे .. या तर अंगतने दिल्या.
जोग आंबा :
तुला कितीदा सांगितलं आहे. की त्या मुलाशी बोलचाल नको म्हणून.
कोयनली :
त्यात काय झाले, लहानपणी आम्ही खेळत होतो की.
जोग आंबा :
लहानपणीच लहानपणी, तू आता मोठी झाली आहेस. समाजात चालत नाही आपल्या.
कोयनली :
स्वार्थी समाजाच तू बोलूच नकोस.
जोग आंबा :
जगाची चाल रीत पाळावी आपण, नाहीतर.
कोयनली :
नाहीतर काय?
जोगआंबा :
समाज वाळीत टाकेल .
कोयनली :
पण आपले बाबा नाही न टाकणार.
जोग आंबा :
ते ही टाकतील.
कोयनली :
मग जंगली औषध कोण देईल?
जोग आंबा :
समाजात आहेत बरेच लोक ते आणून देतील.
कोयनली आपले तोंड फिरवते व मुरका मारते.
कोयनली :
हूं …
Cut to ……..
…… …… …….
Day / evening / village road
अंगत गावातून बासरी वाजवत जात आहे. त्याच्या पुढे जनावरे ज्याच्या त्याच्या घरी गोठ्यात जात आहेत.
प्रत्येक दारात बासरी ऐकून स्त्रिया बाहेर येऊन त्याच्या घोंगडीत भाकर चटणी भाजी देत आहेत. तो ती घेऊन जात आहे.
Cut to :
……. ……. ……..
Day / outer / gayran village
अंगत एका दगडावर बसलेला आहे. त्याच्या अंगावर कांबळी आहे. दंडात अंगाऱ्याचा ताईत बांधलेला आहे. त्याच्या शेजारी त्याची काठी आहे. शेजारी गाई चारत आहेत. एक वासरू त्याच्या जवळ येऊन खेळत आहे. तो त्याच्या अंगावरून हात फिरवत माया करत आहे. वासरू त्याला चाटत आहे.
Cut to …....
. ….. …. …..