Night / inter / room
शेवंता दूध घेऊन येते. दार लावते. केदार इकडे तिकडे फिरत असतो. ती दूध ठेवते. व केदारच्या पाया पडते.
केदार :
हे काय नवीन.
शेवंता :
नवीन काय, जुनीच चाल रीत हाय ही. नवरा देवासमान असतो. अन् तुम्ही तर मला नवीन जिवदान दिलं.
नाहीतर….
केदार :
नाहीतर काय?
शेवंता :
त्या पाळेगारानं मला त्या हबश्याच्या हवाली केलं असतं.
केदार :
पण मला तर तो देवच वाटतो.
शेवंता :
काय?
( ती वर पाहते. )
केदार :
हो तर, नाहीतर आपली भेट झाली असती काय?
शेवंता :
पोरी बाळी पळवणारा देव नव्हे राक्षस असतोया. , देवाचा योग म्हणन आपली भेट झाली.
केदार :
देताय ना,
शेवंता :
काय?
केदार :
दूध, थंड होतंय.
शेवंता :
अग बाई, राहिलंच की,
हा हे घ्या.
( केदार दूध घेतो. अन् पिऊ लागतो. )
Cut to …..
…… ….. …….
Day / outer / Hanuman talim
घोड्यावरून एक सरदार येतो. आखाड्यात आत येतो. मुले दंड बैठका मारत असतात. सरदार आत येऊन नमस्कार गुरुजींना करतो.
सरदार :
जय सदगुरू.
गुरुजी :
जय सदगुरू.
गुरुजी :
अचानक ऐन केलं. काय सेवा आहे.
सरदार :
गडाभोवती कडं पडलय. वेडा नव्ह मरीआई आलीय. वरील शिबंदीत रसद पण संपत आलीय. फौज पण जागोजागी गुंतलीय. त्यामुळे कुमक येऊ शकत नाही. रसद पोहोचवायची हाय. वर हजार मावळा अडकून पडलाय. निकराचा लढा चालू हाय. पण उपाशी पोटी कसं लढणार.
गुरुजी :
चांगले वीर तर एक मास झाले घेऊन गेलात. आता तर ही कवळी पोर हाईत, अजून मिसरुट पण फुटलं नाही यांना. अन् …. पाठवायच म्हणजे ……
सरदार :
काय पण करा गुरुजी, पन्नास पोर जरी झाली तरी बास. एकदा रसद पोचती झाली की लगेच माघारी पाठवतो. मग चांगल वरीसभर गनिमाला झुलवू.
गुरुजी :
ठीक आहे. बघतो काहीतरी करून.
Cut to ….
….. ….. …..
Day / inter / kedar home
मल्हारी वाड्यात येतो.
मल्हारी :
केदार … केदार…
केदारचे बाबा :
काय रे, काय काम हाय?
मल्हारी :
राम राम तात्या.
केदार बाबा :
राम राम येरवाळीच आलास , आता केदारी कुठला भेटतोय. झोपला असल वळकटीत अजून.
मल्हारी :
सांगावा आलाय.
केदारचे बाबा :
कुणाचा र.
मल्हार :
आखाड्यातून
( केदारी बाहेर येतो. )
केदार :
काय रे,
मल्हारी :
सांगावा आलाय, लई जोखमीच काम हाय…. तवा …..
केदार बाबा :
अरे, लगीन होऊन चार दिस पण झाले नाहीत अजून , अन् लगेच कुठ चाललास.
केदार :
काय तरी महत्वाचं काम असलं. म्हणूनच बोलावलं असलं.
बाबा :
अरं पण….
( इतक्यात आई बाहेर येते. )
आई :
अरं कुठं निघालास?
केदार :
काम हाय, आखाड्यात.
आई सखू :
अरं, पण अस वल्या हळदीन.
( केदार आपली ढाल, तलवार, भाला घेऊन बाहेर पडू लागतो. )
शेवंता :
थांबा…..
केदार :
काय?
शेवंता :
जोखमीच्या कामगिरीवर निघालास, औक्षण करते.
( केदार जवळ येऊन टिळा लावतो. ओवाळतो.)
केदार :
येतो.
( तो बाहेर पडतो.)
Cut to …..
……. ….. …..