शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code
Showing posts with label फ्रेंडशिप एक साहस भाग ४. Show all posts
Showing posts with label फ्रेंडशिप एक साहस भाग ४. Show all posts

Saturday, February 22, 2025

फ्रेंडशिप एक साहस भाग ४

 फ्रेंडशिप एक साहस भाग ४

क्रमशः : पुढे चालू.....

Day/Inter/ Hostel 

कृती :

(वॉर्डन कमला शिरसाठ राऊंडला येतात. श्वेता व तिच्या मैत्रिणींना एक्सरसाईजा करताना पाहून)

कमला शिरसाठ :

 आज काय सूर्य पश्चिमेला उगवला वाटत.

श्वेता :

(दोरीच्या उड्या मारताना थांबून )

मॅडम,पूर्वेलाच उगवला आहे.

वेदिका :

व रोजच उगवणार.

कमला शिरसाठ :

मग काय चांगलंच आहे. की, चालू द्या तुमचं.

( मॅडम निघून जातात. मुली व्यायाम करू लागतात. )

                                          Cut to….

……. …… …… …… …….

Next day. / Morning 5, o’clock / inter - outer

(प्राजक्ता सकाळी लवकर उठून व्यायाम करत असते. ती योगा, प्राणायाम करत असते. तिचे आई व बाबा उठून गॅलरीत येतात. खाली बघत व्यायाम करत असलेली प्राजक्ता त्यांना दिसते.)

     आई :

प्राजक्ताने खूपच मनावर घेतलय चॅलेंज.

वडील :

मग चांगलच आहे की.

आई :

पण एक दोन दिवस एक्सर साईज करण व गड पायी चढण यात खूप फरक आहे. मला तर काळजी वाटतेय.

वडील :

त्यात काळजी करण्यासारखं काय आहे. जेव्हा आपल्यावर संकटे, अनेक अडचणी येतात. तेव्हाच माणूस खरा उभा राहतो. व त्याची बुद्धी सक्रिय होते , असं म्हणतात

( आपल्या हातातील घड्याळ दाखवत )

 पाहिलस किती वाजलेत.

आई :

सकाळचे पाच,

वडील :

आजूबाजूला कोण उठलाय का?

आई :

इथे कोण उठत एवढ्या सकाळी सकाळी, हे काय गाव आहे..

वडील :

पण गावाकडे उठतात ना, आपापल्या कामाला लागतात. त्यांचं आरोग्य किती चांगल असत.

आई :

हो पण.

वडील :

पण बिन काही नाही. एवढ्या सकाळी लवकर उठून एक वर्षांनंतरच चॅलेंज पूर्ण करण्यासाठी ती जे काही करत आहे.यातून ती किती प्रज्वलित झालेय ते समजते.

आई :

ते आहे खरं, सुरवात तर केलेय मॅडमनी, पण कड लावतील का? सवय नाही हो याची.

वडील :

काळजी करू नका, ती जिद्दी आहे. करेल म्यानेज सगळ.

हीच आहे हो ठीक ठाक. पण आपले चिरंजीव, त्यांचं काय.

आई :

झोपलाय तो. रात्री उशिरा झाला त्याला यायला.

वडील :

त्याला पण सांगा कसरत करायला. हल्ली त्याचा व्यायाम कमी व फिरण जास्त आहे.

आई :

तो आहे फिट, त्याची काळजी नही मला. हीचच जरा टेंशन असत.

                                   Cut to…….

….. …. . ….. ….

Day. Morning. Inter / prajakta Home dayning Holl

कृती :

प्राजक्ता अंघोळ करून आपले आवरते. व खाली डायनिंग हॉल मध्ये येते. येताना देवघरात पूजा करणाऱ्या आजीच्या पाय पडून ती डायनिंग हॉल मध्ये येते.जवळच किचन खोलीत तिची आई व सरू आपली कामे करत असतात. डायनिंग टेबलवर तिचा प्रमोद दादा नाष्टा करीत असतो. ती नष्टा करण्यास बसत.

प्राजक्ता :

आई मला पण दे.

आई :

हा देते.

(आई दूध आणून टेबलवर ठेवते.)

आई :

हा घे,

दादा :

(प्राजक्तास दूध पिताना पाहून,)

आई, वासरू दूध पीतय की.

आई :

ये गप्प पिऊ दे तिला, दृष्ट लावू नकोस.

प्रमोद :

हे बघ आई, उठेल जास्तीत जास्त दोन चार दिवस,नंतर कंटाळून सुरू करेल उठायल सूर्य उगावल्यावर.

( प्राजक्ता लक्ष न देता दुध पिऊ लागते.)

प्रमोद :

उड्या मारून दमल वाटत.

प्राजक्ता :

 ( दूध पिऊन झाल्यावर चिडून रागीट नजरेने पहात )

ये मोठा आहेस म्हणुन खूप बोलू नकोस. तोंड आवर तुझं. वासरू काय? दूध काय? सगळ समजत मला, आपल्याला एखाद्याला स्पिरीट द्यायला जमत नसेल तर उगाच पाय आडवा घालून पाडू नये माणसानं. समजलं काय.

प्राजक्ता रागाने निघून जाते. तोपर्यंत तिथे देवपूजा करून झालेली आजी येते व खुर्चीवर बसत.)

आजी :

( प्रमोदला उद्देशून )

काय प्रमोदराव वासरान धडक मारली वाटत. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होत. उठ सुठ येता जाता माझ्या नातीला टोचून बोलत असतोस, तुला काय वाटल शहरी वातावरणात राहिली म्हणजे तिच्यात उर्मीच नाही काय? हे बघ बाळा वाघ पिंजऱ्यात जरी असला तरी गवत खात नाही.

प्रमोद :

मग इतकी दिवस ही उर्मी कुठे झाकून ठेवली होती. चेष्टाच तर केली मी.

आजी :

अरे चुलीतल्या विस्तवाला पण फुंकर मारली तर तो जास्त धगधगतो . आजपर्यंत साऱ्यांनीच तिचे लाड केले. पहिल्यांदा कोण तरी भेटलेय तिचा स्वाभिमान डीवचणार, याने ती कठीण होणार एवढं मला माहित झालाय. आपणं फक्त तिला निखार्यासारखं फुलवायचं बघ. नको ते बोलायचं नाही काय?

प्रमोद :

बर बाई, नाही चिडवत,

आजी :

चीडवू नकोस असे मी म्हणत नाही, चिडव, पण तिला प्रमोट करणारं.

प्रमोद :

हुशार आहेस बघ.

आजी :

( डोक्यातील केसाला हात लावत.)

हे काय उगाच पांढरे झालेले नाहीत अनुभवाने झालेत हो.

मग काय ठरलं.

प्रमोद :

( हात जोडत )

तुमची आज्ञा शिरसावंद्य बाई.

(सर्व हसू लागतात.)

                               Cut to…..

……. …… …… ……

Morning 5,00 a.m. / in Hostel bathrum /

कृती :

(श्वेता व वेदिका लवकर उठून अंघोळ करत असतात.)

श्वेता :

किती ग थंड पाणी

वेदिका :

हॉस्टेलची फी घेतात ढीगभर पिशवी भरून यांना काय झालंय गरम पाण्याची सोय करायला.

श्वेता :

चालायचंच घर नाही हे मॅडम. लई टू टू करायचं नाही. गपगुमान सगळी बारडी एकदम भरून घ्यायची अन् ओतायची अशी.

(श्वेता बादली एकदम अंगावर ओतून घेते.)

   ( कृती : अंघोळीनंतर कपडे बदलून रुमालाने केस पुसत असतात त्याच वेळी पलीकडे बाथरूमला मानसी कोंढाणे पोट दुखत असल्याने टॉयलेटला आलेली असते.)

श्वेता :

( केसातून रुमाल फिरवत )

भारी गम्मत झाली ना गोडांबेची

वेदिका :

( आपल्या केसांना रुमालाने बांधत )

तर काय, आली मोठी शहाणी, स्वतला विद्येची देवीच समजते.

श्वेता :

 आता बस म्हणावं उंदराने कातरलेला ड्रेस घालून,

 कशी दिसेल ग ती त्या ड्रेसात.

वेदिका :

कशी म्हणजे झालर लावलेल्या झिप्र्या कुत्र्यासारखी.

( त्या हसू लागतात. इतक्यात घड्याळाचे ठोके वाजतात.)

श्वेता :

ये आटप लवकर देवळात जायचय. लवकर गेलं तर बरं. नाहीतर गर्दी होईल.

वेदिका :

चल चल…..

( मानसी त्यांचं बोलणे पलीकडे टॉयलेट मध्ये बसून ऐकूण )

मानसी :

( मनात)

हे सगळ मला अरोहीला सांगायला हवं.

( मानसी आवरुन रुम मध्ये जाते. व झोपलेल्या आरोहीला हलवून उठवत.)

मानसी :

 ए अरोही उठ की ग. उठ लवकर, तूला कायतरी सांगायचय

आरोही :

(त्रासिक चेहऱ्याने)

काय ग हे, उगाच झोप मोड करु नकोस. आजून उठायला तास - दोन तास आहेत.

मानसी :

झोपलीस काय म्हशीसारखी. तिकडे ती श्वेता व वेदी तुझी टिंगल करताहेत.

( आरोही झटकान उठून अंथरुणावर बसते.)

आरोही :

काय म्हणालीस.

मानसी :

ती श्वेता व वेदी तुझ्याबद्दल काय बाय बोलत होत्या.

आरोही :

काय बोलत होत्या.

( मानसी कानाजवळ जाऊन कुजबुजते आरोही मान हलवते. व सर्व ऐकूण रागाने चिडून)

आरोही :

ती वेदी व श्वेता खूप शेफारल्यात त्या प्राजूच्या जीवावर लई उड्या माराय लागल्यात. तो सातारा अन् बेळगाव लई त्या कोल्हापूरकर प्राजूच्या चमचा होऊन फिरतात. मला झिप्री कुत्री म्हणतात का? नाही यांना झालर लावून क्याब्रे डान्स करायला लावला तर नाव नाही लावणार ही आरोही गोडांबे, मी पण काही कच्ची नाही म्हणावं, फलटण कर आहे, फलटणकर.

                                    Cut to…..

……. ……. …….


वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...