( माधवी फोन जवळ जाते. फोन घेते. फोन वर तिची सासू असते. )
सावित्री आई :
हॅलो माधवी का?
माधवी :
हो आई बोलतेय.
सावित्री आई :
अग, काल जयवंत येणार होता ना.
माधवी :
हो येणार होते पण ….
सावित्री आई :
पण काय आणखीन.
( माधवी रडू लागते. )
सावित्री आई :
रडायला काय झाले ग …
माधवी :
काल आश्विन शाळेतून येताना काय माहित काय झालं. समुद्रकिनारी काही कोळ्यांना जखमी सापडला. देवी आईची कृपा म्हणून वाचला.
सावित्री आई :
काय सांगतेस, असा कसा गेला तो व समुद्र किनारी गेला मग. जखमी झाला म्हणजे काय? आता कसा आहे तो?
माधवी :
उपचार चालू आहेत. जरा पायाला मार लागलाय. मी विचारले परंतु काहीच सांगत नाही. व घाबरलेला आहे. दफ्तर कुठे आहे ते ही बोलत नाही. उगाचच आक्रस्ताळेपणा करतोय.
सावित्री आई :
तू काल का फोन केला नाहीस. आम्ही आलो असतो ना? माझ्या पण ध्यानात नाही आलं. मला वाटलं ऑफिसच काम असेल म्हणून आला नसेल जयवंत.
माधवी :
मी करत होते. पण फोन लागत नव्हता. व मग सगळी उस्तवारी करत वेळ गेला.
सावित्री आई :
आता कसा आहे तो?
माधवी :
आहे इथे बेडवर बसलाय टी व्ही पाहत.
सावित्री आई :
जरा दे त्याच्याकडे.
माधवी :
हा देते,
( माधवी फोन अश्विनला देऊ लागते. )
( आश्विन इशारा करून कोणाचा विचारतो. )
माधवी :
आहे, सावित्री आईचा.
आश्विन :
( फोन घेऊन सुस्कारा टाकत )
हा बोल आज्जी.
सावित्री आई :
काय रे कसा आहेस ? तिकडे समुद्र किनाऱ्यावर कशाला गेला होतास ? व जास्त लागलंय का?
( आश्विन सुस्कारे देत रडू लागतो. )
सावित्री आई :
काय रे काय झालं रडायला. बोल ना,
आश्विन :
तू व तात्या आजोबा कधी येणार. या की प्लीज,
सावित्री आई :
अरे , रडतोस कशाला? हे बघ आम्ही येतोय उद्याला.
काळजी करू नकोस.
आश्विन :
हा, आईकडे देऊ.
सावित्री आई :
हा दे.
( आश्विन आईकडे फोन देतो. )
सावित्री आई :
हे बघ आम्ही येतोय उद्या तिकडे.
माधवी :
हा
Cut to …..
…… ….. ..
Day /Morning / Ashvin HOME / inter
बेल वाजते. अश्विनची आई दरवाजा उघडते. दारात लहान मुलगा उभा असतो.
माधवी :
काय रे,
मुलगा :
काय नाही, हे आशू दादाचं दप्तर द्यायला आलो होतो.
माधवी :
तुझ्याकडे कसं काय?
मुलगा :
काल आम्ही शाळेतून येताना आश्विन दादाच्या मागे काही मुले लागली होती. तेव्हा त्याने आपलं दप्तर माझ्याकडे दिलं. व तो पळाला. त्याच्या मागे पाच सहा मुले मारायला पाठी लागली होती.
माधवी :
काय? मग काय झालं.
मुलगा :
मी अश्विन दादाला पुलाकडे जाताना पाहिलं. व ते पण त्याच्या मागे लागले होते.
माधवी :
मग काय झालं?
मुलगा :
मी घाबरलो व घरी पळत आलो. मला काय सुचत नव्हते. आज आई म्हणाली कुणाच दप्तर आणलास, नेऊन द्यायचं नाही का?
म्हणून मी ते द्यायला आलो. दादा कुठे आहे.
माधवी :
बर झालं आलास ते, बस आत आहे तो, जा जाऊन बस दादा जवळ मी सरबत आणते.
( तो मुलगा अश्विनजवळ जाऊन बसला.)
मुलगा :
कसा आहेस?
आश्विन :
आहे ठीक आता, ये बस, क्रिकेट बघूया.
पत्ता कसा सापडला.
मुलगा :
वहीवर होता ना तुझ्या, त्याच्या आधारे पाहत आलो.
( माधवीने सरबत आणला. तो पिऊ लागला.)
Cut to ……
…… ….. ….
Night / 8.30p.m. / outer inter
रात्रीची वेळ तात्या आजोबा म्हणजे तानाजीराव गाडी घेऊन येतात. सावित्री त्यांची पत्नी वाट पहात असते. एक जीप दरात येऊन थांबते. तानाजीराव गाडीतून उतरतात. डबा उघडल्याचा आवाज ऐकू येतो.
सावित्री आई :
खूप वेळ झाला यायला.
तानाजीराव :
काय करणार मळणी आटपायला नको.
सावित्री :
झालं ना नीट सगळं
( तानाजीराव बाहेरील बागेतील पाण्याची पाईप चालू करून हात पाय धूत.. )
तानाजीराव :
होय झालं. जयवंत आला नाही.
सावित्री :
अग बाई, सांगायचं राहिलंच की. अहो आश्विन शाळेतून येताना समुद्र किनाऱ्यावर गेला. व काय माहित कोण जाणे अपघात घडला. काही कोळ्यांनी आणून सोडला दवाखान्यात. त्याच गडबडीत जयवंत होता.
तानाजीराव :
पोराच नुसत बावल करुन ठेवलंय यांनी. गाडीतील पिशवी आण. व फोन काढून दे इकडे.
( तानाजीराव फोन करतात. जयवंत फोन उचलतो. )
तानाजीराव :
हॅलो जयवंत.
जयवंत :
हा बोल बाबा, आज ..
तानाजीराव :
( बोलण तोडत )
कळलय मला, बर फ्रॅक्चर वगैरे नाही ना.
जयवंत :
नाही पण थोड दुखावलय.
तानाजीराव :
डॉक्टर काय म्हणाले?
जयवंतराव :
फ्रॅक्चर वगैरे काही नाही, फक्त पायाच स्नायू दुखावलाय फक्त. स्टापिंग केलंय. चार दिवसांनी दाखवायला या म्हणून सांगितलंय.
तानाजीराव :
फ्रॅक्चर नाही ना, मग देव पावला. तुम्हाला सांगत असतो मी नेहमी व्यायाम करत जा. व्यायाम करत जा. शरीर चपळ करा, ऐकताय कुठे, जरासं पडल की तुमचे हात पाय दुखावतात. नाजूक बाहुल्यासारखे झालाय नुसते.
जयवंत :
तस नाही बाबा, मी सांगतो नेहमी त्याला व्यायाम कर, व्यायाम कर म्हणून, पण अभ्यास असतो ना त्यामुळे
तानाजीराव :
कारण सांगायला मस्त जमतात. मुलाने आदर्श घ्यायला बाबाने आधी कसरत करायला हवी. नाही का?
( इतक्यात मागून सावित्री )
सावित्री:
गप, बसा हो, तुमच आपलं नेहमी असत, व्यायाम करा, व्यायाम करा, करतील ते. तुम्ही काय बघायला असता तिथे.
तानाजीराव :
इथेच चुकतं तुम्हा बायकांचं मुलाच्या प्रगतीतील लोडना आहात. नुसत्या.
सावित्री :
काही लोडना वगैरे नाही हं, त्या शिवाय का तो लाखभर पगार घेतोय?
तानाजीराव :
त्याचा ताला माला पाहून आठवीनंतर बाहेर काढला शिक्षणाला म्हणून, नाहीतर घरातच बसला असता तुझं कुकुल बाळ होऊन.
जयवंत :
( फोन वर)
काय हे बाबा तुमचं पुन्हा सुरू झालं.
तानाजीराव :
तुम्हाला माझ्या बोलण्याच महत्व आज नाही समजणार, कळेल पुढे.
जयवंत :
( विषय बदलतो.)
बर, ते असू दे, मळणीच काय झालं. उद्या येतो मी.
तानाजीराव :
उद्या बीद्या काय नको, तू तिथेच रहा. मी येतो. दोन दिवसात इकडंल आटपून.
जयवंत :
बर चालेल.
( फोन ठेवला जातो. )
सावित्री आई :
हे आणखी काय, मी तर माधवीला उद्या येताय म्हणून सांगितलंय.
तानाजीराव :
इकडला पसारा लावतो नीट व जातो.
सावित्री आई :
ते पडू देत. नातवापेक्षा महत्वाचं आहे का ते.
तानाजीराव :
उद्या सगळी व्यवस्था लावतो. व रात्रीला निघतो.
सावित्री आई :
हा चालेल.
तानाजीराव :
चला पाने वाढा आता, खूप भूक लागलीया.
सावित्री आई :
हा, घेते वाढायला, सुमे ऐ सुमे
नोकरांनी सुमा :
काय सावित्री आई?
सावित्री आई :
तो लाडू खाऊन झाला असेल तर जेवायला वाढ.
सुमा :
म्हातारीला गरुडाच डोळ लावल्यात की काय? जेवण खोलीतील सुद्धा दिसतं.
सावित्री आई :
जेवण खोलीतील काही दिसत नाही. मघाशी लाडवाचा डबा उघडत्याला आवाज आला, त्यावरून ओळखलं जाताना त्यातले दोन लाडू पोरांना ने, नाहीतर एकटीच खाशील.
तानाजीराव :
किती बोलखल तिला?
सावित्री आई :
मीच म्हणून तिला ठेवलीय तिच्या पोरांकडे बघून समजलं नाहीतर ….
तानाजीराव :
नाहीतर काय?
सावित्री आई :
माधवी असती तर केव्हाच हाकलली असती. चला आता जेवायला.
Cut to …….
…. ….. ……
Day / afternoon / 11o’ clock / Mumbai / Ashvin HOME
जयवंत कामावर जायच्या गडबडीत आहे. डायनिंग टेबलवर बसून नाष्टा करत आहे. माधवी त्याचा डबा आणून देते. आश्विन गॅलरीत उभा राहून बाहेरील गाड्यांची रहदारी पाहत आहे. माधवी नाष्टा आणून ठेवते.
माधवी :
हा घ्या.
जयवंत :
हा, आश्विन कुठे आहे?
माधवी :
आहे गॅलरीत बसलाय.
( इतक्यात बेल वाजते.)
माधवी दार उघडते.
माधवी :
आ तात्या तुम्ही
तात्या आजोबा ( तानाजीराव ) :
हो काय करणार, अश्विनच कळल्यावर त्याची आजी कुठे थारा करू देते.
माधवी :
आई नाही आल्या.
तानाजीराव :
ती तयारच होती. पण शेताकडील गड्यांना भाकरी द्यायच्या होत्या. म्हणून मी म्हटलं तू थांब मी जाऊन येतो. बर ते सोड, आधी ही पिशवी घे पाहू.
( आपल्या हातातील बॅग व पिशवी माधवीकडे देत. )
माधवी :
काय आहे यात?
तानाजीराव :
शेतातील भाजी व लाडवाचा डबा आहे. बर आश्विन कुठे आहे?
माधवी :
आहे गॅलरीत उभा राहून समुद्र पाहतोय.
माधवी :
आश्विन .. आश्विन ….. पाहिलस का कोण आलय ते.
क्रमशः पुढे ......