फ्रेंडशिप एक साहस भाग २ लेखक : निशिकांत हारुगले.
Outer/ collage Ariya/ Morning
(कॉलेज आवारात प्राजक्ता स्कूटी पार्क करते. तिच्या मैत्रिणी गप्पा मारत कॉलेजच्या लॉन वर बसलेल्या आहेत. प्राजक्ता तिथे जाते.)
प्राजक्ता :
भाव
श्वेता :
काय हे, घाबरले ना.
(प्राजक्ता हसते)
प्राजक्ता :
कशा आहात?
मुली :
तू आलीस मग मजेत.
श्वेता :
तुझी तब्येत कशी आहे.
प्राजक्ता :
आहे ठीक, ह बरं आठवलं,
(प्राजक्ता पर्स उघडते. व चीठ्ठी काढून देत)
हे टाईम टेबल फॉलो करायचं काय?
श्वेता :
टाईम टेबल.
प्राजक्ता :
हो टाईम टेबल, तीन वर्ष आपण फक्त टाईमपासच केलाय. आता थोड सिरियस झालेलं बरं. या टाईम टेबल प्रमाणे वागायचं.
रेवा :
आण बघू,
(रेवा पहाते)
रेवा :
पाचला उठायचं.
प्राजक्ता :
हो
रेवा :
लई लवकर होतेय.
प्राजक्ता :
मग काय सूर्य उगवल्यावर सुरवात करायची.
रेवा :
पण..
प्राजक्ता :
पण बिन काही नाही, या वर्षी सेकंड क्लास नको. फर्स्ट क्लास हवाय. त्या गोडांबेला दाखवून द्यायचं आपली पॉवर.
Cut to…….
…… …… …… ….
Inter/ Hostel /night/१०.o’ clock
(घड्याळात टोले पडतात. वॉर्डन कमला शिरसाट राऊंड करत आहेत. हॉस्टेलची लाईट बंद करत निघालेल्या आहेत.)
श्वेता :
अग, लाईट बंद कर नाहीतर ती शृपनखा येईल ओरडत.
( वेदिका लाईट बंद करते.त्यासर्वजणी एकाजागी अंथरूण डोक्यावर घेऊन टॉर्च लावून अभ्यास करत असतात. झोपेच्या धुंदीत आहेत.)
माधवी :
पाचशे रुपये काय मागितले बया गड चढा म्हणाली. हजार मागितले असते तर,
श्वेता :
एव्हरेस्ट चढा म्हणाली असती.
वेदिका :
प्राजक्ता बाई बोलल्यात तर खऱ्या, पण….. छे बाई.
श्वेता :
प्राजू सहज म्हणाली असेल, दोन दिवसात विसरेल सगळं.
( श्वेताच्या मोबाईल मध्ये मेसेज येतो. रिंग होते.)
माधवी :
कोणाचा मेसेज आहे ग.
श्वेता :
(मोबाईल पहात)
प्राजक्ताचा
वेदिका :
काय पाठवलंय?
श्वेता :
मॅडम टाईम टेबल चिटकवल का? विचारता हेत.
वेदिका :
आणखी,
श्वेता :
सकाळी लवकर उठून पाचला अभ्यास करा म्हणताहेत.
माधवी :
पाचला
श्वेता :
हो पाचला,
माधवी :
मला नाही जमायचं बाई, पहाटेची झोप मला आवरत नाही. मी झोपते आता गुड नाईट.
श्वेता :
झोपला बघ रेडा.
वेदिका :
मॅडमनी गोडांबेला लईच मनावर घेतलेय.
रेवा :
ती काय करेल बिचारी, ती गोडांबे आहेच तशी डोचक्यात जाणारी.
श्वेता :
तिची गंमत करूया का?
वेदिका :
काय करायची.
श्वेता :
बघच तू चल माझ्याबरोबर.
Cut to...
( कृती : श्वेता रेवाच्या व वेदिकाच्या कानात काहीतरी कुजबुजते. त्या तिघी उठून रूमचे दार हळुवार उघडुन अंदाज घेवून बाहेर येतात. जीना पावलांचा आवाज न करता उतरतात. वॉर्डन कमला शिरसाठ यांच्या रूमचा अंदाज घेतात. तिच्या घोरण्याचा आवाज ऐकू येत असतो.)
Cut to..
Night /Vharanda Hostel/ Inter ११,o’clock
वेदिका :
झोपली वाटत महामाया.
श्वेता :
अग,.. हळू बोल. उठेल की ती.
रेवा :
ती कसली उठतेय, चल लवकर.
(कृती : त्या जीना उतरून खाली येतात. स्टोअर रूम मध्ये जातात. तिथे उंदीर पकडायला ठेवलेला साफळा असतो. त्यात पाच ते सहा उंदीर असतात. )
रेवा :
अग, सापळा न्यायचा का?
श्वेता :
लई शहाणी आहेस, उगीच शंका यायला काय?
वेदिका :
मग कसं
श्वेता :
डंटढ्यान …. हे बघ.
(श्वेता पिशवी दाखवते)
रेवा :
अग कातरतील की ते.
श्वेता :
नायलोंनची आहे, लगेच कातरतील.
चल टाक… एक एक,
रेवा :
ई ….. नाही ग बाई चावला तर.
श्वेता :
उठ,.. हो बाजूला बावळट, बघ मी कशी घेते.
(कृती : श्वेता हळूच पिंजर्याच तोंड उघडुन त्याच्या तोंडास पिशवी लावते व उंदीर काढून पिशवीत घेते.)
श्वेता :
ह… चल दाखवते.
(त्या हसतात.)
Cut to…….
….. …… …… …….
Night / Hostel/ Inter
( कृती: श्वेता व रेवा अन् वेदिका ते उंदीर खिडकीतून वरील झाप उघडुन आरोहीच्या खोलीत सोडतात. व आपल्या रुम मध्ये जातात. झोपतात.)
श्वेता :
(उंदीर सोडताना मनात)
आता कळेल आरोही तुला आमच्याशी पंगा अन् हॉस्टेल वरती दंगा.
Cut to….
….. …. …. …. ….
Morning/ Hostel /inter - outer
( मुलींचा दंगा ऐकू येत असतो. अनुजाची झोप मोड होते. आरोहीच्या खोलीतून आवाज ऐकू येत असतो. काही मुली झाडू घेऊन उंदीर मारण्यासाठी पळत होत्या)
एकजण :
अग मार, मार लवकर, फरशी खाली जाईल बघ तो.
दुसरी :
भईबग……. मेला. आर… पळाला वाटत.
तिसरी :
या ब्याट्रीला साधा उंदीर मारता येत नाही.
दुसरी :
मग तू मार की, लई मोठं बोलू नकोस.
(अनुजा डोळे चोळत बाहेर येते.)
अनुजा :
काय हे सकाळी सकाळी चाललय यांचं.
(इतक्यात रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागतो.)
अनुजा :
कोण रडतंय सकाळी सकाळी,
एक मुलगी :
आरोही गोडांबे रडतेय.
अनुजा :
तिला नी काय झालं सकाळी सकाळी गळा काढायला. कोण मेल की काय.
दुसरी मुलगी :
कोण मेल बिल नाही, फक्त अरोहीचा ड्रेस कातरला उंदरांनी.
अनुजा :
मग एवढंच ना, त्यात काय एवढं दुसरा घ्यायचा.
तिसरी :
अग तो तिचा आवडता होता. तिच्या मावशीनं घेतलेला.२००० रुपयाचा
( इतक्यात माधवी देखील उठून रुमच्या बाहेर येते. त्या दोघी चालत अरोहीच्या रुमकडे जातात. तिथे आरोही रडत बसलेली दिसते , मुलींचा दंगा पाहून वॉर्डन कमला शिरसाठ व शिपाई गणू देखील येतो.)
आरोही :
(रडत..)
माझा ड्रेस, किती प्रेमानं मावशीनं घेतला होता.चांगला दोन हजाराचा होता.
(वॉर्डन कमला शिरसाठ व गणू तिथं येतात)
वॉर्डन कमला शिरसाठ,
नुसता डोक्याला ताप आहेत या मुली. जरा कुठं सकाळी डोळा लागला होता. तोपर्यंत सुरू झालं यांचं.
(गर्दी जवळ येत)
वॉर्डन :
ये व्हा बाजूला,
वॉर्डन :
काय झालं कशाला गर्दी जमवलीय. अन् ही का रडतेय सकाळी सकाळी.
माधवी :
मला वाटत कोण मेल.
(आरोही तिरकस नजरेनं पहाते माधवी गप उभा राहते आरोही रडू लागते)
वॉर्डन कमला शिरसाठ :
ये गप ग सकाळी सकाळी उगीच कायपण बोलू नकोस.
बर, मला हे सांगा सकाळी सकाळी येवढं दंगा कशासाठी करताय.
अन् हा काय रूमचा अवतार केलाय. मुली आहात की राक्षशीणी.
एक मुलगी :
आम्हाला काय बोलताय. उंदराचा बंदोबस्त करा आधी. किती वेळा सांगितलेय. आता केवढ्याला पडलंय
दुसरी मुलगी :
बघा आता कातरला ना ड्रेस
वॉर्डन :
गणू, तुला सांगितल होत ना. उंदराचा बंदोबस्त करायला.
गणू :
अहो मॅडम घातलं होत औषध, सर्व हॉस्टेल मधील बुटीभर उंदर टाकलीत मी. फक्त स्टोवर रुम मध्ये तेवढी राहिलीत. औषध संपल म्हणून तिथे सापळा लावला होता.
वॉर्डन कमला शिरसाठ :
मग हे काय आभाळातून टपकलेत.
गणू :
पण मी तर…
वॉर्डन कमला शिरसाठ :
पण काय पण.
गणू :
मॅडम स्टोअर रुम मध्ये लावलेला सापळा मी मगाशी पहिला त्यात उंदीर नाहीत. रात्री होते उंदीर त्यात. सकाळी बघतो तर दार उघड सापळ्याच.
वॉर्डन कमला शिरसाठ :
मग काय उंदीर दार उघडून पळालेत.
ते काही नाही. त्या उंदरांचा आजच्या आज निकाल लाव.
वॉर्डन कमला शिरसाठ :
(मुलींकडे वळत)
तुम्ही पण मुली अशा आहात. की आपल्या वस्तू नीट ठेवत नाहीत. नंतर अशी फजिती झाली की लगेच हॉस्टेलच्या नावानं खड फोडत बसता. देव जाणे, काय होणार तुमचं
चला झालं ते झालं. पूस आता डोळे,
हा काय ड्रेस.
आरोही :
हा,
वॉर्डन कमला शिरसाठ :
अरेरे, चाळणच केलीय.
असुदे झाल ते झालं, नवीन घे.
आरोही :
नविन घ्या काय नवीन, एवढं सोपं आहे का ते. माझ्यासाठी.
वॉर्डन कमला शिरसाठ :
अग, पण आता आपणं काय करू शकतो.
ये पोरिवो चला आता आपापल्या कामाला लागा.
(सर्व मुली पांगतात.)
Cut to………
.... ..... ....
Inter / Hostel/In room morning
(अनुजा रुम मध्ये येते. रूमचा दरवाजा बंद करते. )
अनुजा :
हुश…
(पळत जाऊन मैत्रिणीची पांघरून ओढुन काढते.)
अनुजा :
ए रेवा उठ, ये श्वेता उठ लवकर.
रेवा :श्वेता :
ऊ…. झोपू दे ना…
अनुजा :
ये रेड्या उठ लवकर एक बातमी सांगायची आहे.
(त्या उठत नाहीत. तेव्हा ती हलवते.)
अनुजा :
ए बायांनो ऐकलात काय. आरोहीचा ड्रेस कुर्तडला उंदरांनी.
(श्वेता व रेवा उठतात.)
श्वेता :
काय म्हणालीस परत सांग.
अनुजा :
अग, त्या आरोहिचा ड्रेस कुरतडला उंदरांनी.
रेवा :
स्वातंत्र्याचे उपकार फेडले म्हणायचे
अनुजा :
काय ग… काय म्हणालीस.
(श्वेता डोळे मोठे करुन रेवाकडे पहाते.व तोंडावर बोट ठेवत.)
श्वेता :
काय नाही ग.. तिचं म्हणणं इतकचं होत की शिवजयंतीला तिन खोडा घातला. म्हणून देवाने शिक्षा केली बिचारीला.
वेदिका :
अग, रडून रडून डोळे गोटिवाणी मोठे झालेत आरोहिचे.
काय तर माझा ड्रेस, दिड हजाराचा होता. आ…आ….
मला तर बाई तो सहाशेचाच वाटला. काय ते भोकांड पसरल होत.
माधवी :
जाऊ दे तो विषय, उगाच आपलीं सकाळ खराब नको. आरोही अन् तिचा ड्रेस, ती जाणे नाहीतर तिचे रडे जाणे, आपल्याला काय करायचे त्याचं . उठा… लवकर आटपा. करंजफेण मॅडमच लेक्चर आहे. महत्वाच्या नोटस देणार आहेत.
वेदिका :
हुं….. तिच्या सगळ्या नोटस महत्वाच्याच असतात. कुठून आणते कुणास ठाऊक. तिच्या नोटसनी तर संपूर्ण कपाटच भरलय. कॉलेज मधील पुस्तकातील पानापेक्षा हिच्या नोटसची पानेच जास्त.
श्वेता :
ते काही असू देत, तिच्या लेक्चरला गेलं नाहीतर डोकं खाईल बाई. व प्राचार्यांच्या केबिन पर्यंत ओरडत जाईल, काय तर…. हल्ली कॉलेजच्या मुली बिघडल्यात, लेक्चर अटेंड करत नाहीत. तासिका बुडवितात, माझा तर मुडच हाफ होतो बाई, हे सगळ ऐकण्यापेक्षा पाऊण तास झेललेल बरं बाईला. तिचा नवरा कसा हिच्यासोबत नांदतो देव जाणे.
…. बरं ते सोडा चला आटपा लवकर
( त्या अंथरूण काढू लागतात.)
Cut to……