शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code
Showing posts with label वीरगळ कथा भाग १४. Show all posts
Showing posts with label वीरगळ कथा भाग १४. Show all posts

Friday, November 14, 2025

वीरगळ कथा भाग १४

 वीरगळ कथा भाग १४

Day / evening / 4.00 o’clock . / Inter / Ashvin HOME

घड्याळात टोल वाजतात. अश्विन विचारातून बाहेर येतो.

घड्याळाकडे पहात.

अश्विन :

 चार वाजले वाटत. आजोबांसोबत बाहेर जायचंय. तो वरील रुम मधून खाली येतो.

Cut to …..

…… ….. …..

Inter / Day - evening / Ashvin villege home /

अश्विन खाली येतो.

तात्या आजोबा :

 काय मग, मिळाली का माहिती.

 अश्विन :

 हो थोड वाचलं.

तात्या आजोबा :

 आवडली का?

 अश्विन :

हो आवडली.

अश्विन :

 बर आजोबा आपण फिरायला जाणार होतो ना?

आजोबा :

 हो जाऊया की? पण थोडास चहा घेऊन.

Cut to ……

…… …… ……

Day / outer / evening / village

अश्विन व आजोबा देवळात जातात. देवास नमस्कार करतात. अश्विन उडी मारून घंटी वाजवतो. प्रदक्षिणा घालून देवळा बाहेरील झाडाखाली कट्यावर बसतात. पुजारी येऊन प्रसाद देऊन जातो. अश्विन झाडाखालील दगड निरखू लागतो. तिथे एक वीरगळ असते. कॅमेरा विरगळीवर…..

Cut to …...

….. …… …… …..

प्रसंग दुसरा :

Day / outer / nadichya kathi maidanavr / madhyyugin kal

नदीच्या काठी मुले चेंडू मारून खेळत आहेत. एक तरुण मुलगा चेंडू मारतो. दुसरा चकवतो व एका झाडीत चेंडू जाळीत जातो.

गणू :

काय हे केदार, तुला कळत नाही, गेला ना चेंडू जाळीत.

केदार :

 त्यात काय? जाऊन आणुया परत.

मल्हार :

 आणू काय आणू, म्हाईताय नव्ह, ती जाळी कशाची हाय?

महादू :

 अरं, घोरपड हाय तिथं, सापाची पिलावळ, परवा हरबाच्या गाईला पायाखालचं झालंत , व पलीकडच्या बुरुंडीचा पाला मिळाला म्हणून वाचली. नायतर…..

गणू :

 आता काय करायचं.

मल्हारी :

हा केदारी पण ……

ज्योतिबा :

 तर काय , याचं कायमच अस आहे.

( केदार रागाने चेंडू अना याला जातो. तिथे चेंडू शोधताना एक साप फिस करुन अंगावर येतो. केदार त्याला शिताफीने पकडतो. )

ज्योतिबा :

 अर, सोड… सोड… तेला चावल की,

केदार :

 मला चावतोय. दातच् काढीन त्याचं. एका बुक्कित गार करीन.

गणू :

 आर ठेचा तेला. डूक धरलं तर बरं नाही व्हायचं.

केदार :

डूक धरायला, तो काय तुझ्यासारखा नाही. चिरकुट चेंडूसाठी भांडण करायला. तेला पण भ्या हाय की.

केदार :

चला सोडू याला डोंगरात लांब, यायला नको पुन्हा गायरानात,

( ते सापाला लांब जंगलात नेऊन सोडतात. साप सोडल्यावर निघून जातो. )

...... ..... ......

Day / evening / inter home

गणू आपल्या गोठ्यात गायी बांधून दारात पाय धूत असतो. आई घंगाळात पाणी ओतत असते.

गणू :

 ( हात पाय धूत )

आऊ आज गंमतच झाली रानात.

आऊ :

 काय रे झालं.

गणू :

 केदारी न भला मोठा नाग पकडला.

आऊ :

( पाण्याची घागर काखेत घेत. )

 काय म्हणतोस काय? आर चावला असता तर …..

गणू :

 लई धाडशी गडी, गावात त्याच्यासारखा कोण नाही बघ.

आऊ :

असलं आगाऊ धाडस करतोया, सखुच्या कानावर घालायला हवं.

गणू :

 ये बाई, गप्प बस, उगाच कळ नको लाऊस.

आई :

 गप तू.

गणू :

 च्यामारी सांगुनच चूक झाली. ते म्हणतात ना बायकांच्या तोंडांत तिळ रहायचा नाही. गप खाऊन गिळायच्या नाहीत. गावभर बोलत फिरायच्या ते पण बीन हालगीच्या.

Cut to …..

….. ….. …

Evening / Kedar home Village / inter

गणूची आई घरात प्रवेश करते.

आऊ :

 सखू ये सखू….

 केदारची आई सखू :

( ओट्यावर दुधाची चरवी ठेवत. हाक ऐकून मागे पाहत.)

 सखू :

काय व आऊसा

आऊ :

 काय सांगाव, तुझ्या केदारी न साप धरला म्हण. तो भी अस्सल नाग.

सखू :

 काय म्हणतेस. पण तो तर आत मोरीत हाय. हात पाय धूत.

आऊ :

 आव, आता नाही दुपारच्या वक्ताला गाय रानात.

सखू :

 काय म्हणतेस

सखू :

 केदार…. केदार …..

( केदार हात पाय पुसत आत येत. )

केदार :

 आहे इथंच, ऐकतोय मी.

सखू :

 काय ऐकते मी हे.

केदार :

 तू पण आऊ, गण्याच्या शब्दात गावलीस. अग, मेलेला होता तो.

सखू :

 उगाच काय पण बोलू नकोस, घे माझी शपथ.

केदार :

तूझं पण काहीतरी खुळ्यागत असतं बघ, अग, तो सापाचं भ्या घालत असतो सगळ्यांना. म्हणून म्या त्याला घातलं. अग, मेलेल होत ते पिल्लू.

सखू :

 अस, भयंकर कृत्य करत जाऊ नकोस ह. साप कधीपण धाकला म्हणू नये. तोच खरा घात करतो. जपून जात जा गायरा माग.

केदार :

बर बाई, घेईन काळजी. भूक लागलीय जरा दूध तरी दे.

सखू :

 आधी सांजवात लाव देवा म्होरं. सुरव्यादेव बुडालाया थोडा दम धर अस लक्ष्मी यायच्या वेळी खाव खाव करू नये. दारिद्र्य येतं.

केदार :

हं दारिद्र्य येतं म्हण तिला कळत नाही होय. बाळराजा भुकावला आहे. त्याला जेवण वाढावं ते. तुझं पण.

सखू :

 मला ज्ञान शिकवू नकोस. पूर्वीची माणसं चांगल तेच सांगत्यात.

( इतक्यात दवंडी वाजू लागते. सर्वजण अंगणात येतात. )

दवंडीवाला :

 ऐका हो ऐका, परवा वनगावच्या माळावर जखुबाईच्या यात्रेच्या निमित्तानं स्पर्धा भरविण्यात आल्यात हो. यामधी कुस्ती, दांडपट्टा, तलवार बाजी हाय, तवा जो कोणी यासाठी इच्छुक असेल त्याने परवा बोरीच्या माळावर हजर राहायचंय हो.

( दवंडीवाला पुढे जातो. गावातील मुले त्यामागे जातात. )

 केदारी :

 काय र जायचं काय, स्पर्धला.

मल्हारी :

 जायचं की, बघूया की जाऊन काय ते.

Cut to …

………… ….. ….. …….


वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...