दोन दिवसांनी inter outer अण्विका व संयोगिताच्या घरी.
अण्विका आवरत असते. आज वेदांगीचा साखरपुडा असतो. तो छोट्याशा स्वरूपात घ्यायचं ठरलेलं असत.
वेदांगी, फोन करते.
वेदांगी, काय ग कुठे आहेस. इकडे ये की लवकर. एवढा कार्यक्रम नीट पार पडू दे.
आण्विका, होईल नीट तू कशाला काळजी करतेस.
वेदांगी, ती संयोगिता पण कधी येते कुणास ठावूक. मगापासून फोन करतेय. उचलतच नाही.
आण्विका, मॅडम घेऊन येते मी.
वेदांगी, ये की लवकर.
आण्विका, अग, फोन ठवलास तर येईन ना . ठेव आधी.
ती फोन ठेवते.
वेदांगीच्या घरी लग्नाची गडबड चाललेली असते.
आण्विका छान साडी नेसते. व आपली स्कूटी घेऊन संयोगिताकडे निघते.
जाताना फोन करते. संयोगिताचा लहान मुलगा फोन उचलतो.
संयोगिताचा मुलगा,
हॅलो कोण बोलतंय.
आण्विका, कोण म्हणजे अनु मावशी.
जरा मम्मी कडे दे.
मुलगा, ती साडी नेसतेय.
मुलगा फोन देत, अनु मावशीचा आहे.
संयोगिता, (फोन कानाला लावत) काय ग.निघलीस
आण्विका, आवर लवकर. मी निघालेय.
संयोगिता, आवरते, ये लवकर.
अण्विका फोन ठेवते. व निघते.
थोड्या वेळात ती संयोगिताच्या घरी पोहोचते.
संयोगिता आपली स्कूटी काढते. आपल्या स्कुटीवर मुलग्याला व अण्विकाच्या स्कुटीवर मुलीला बसवून निघतात.
पुढे एका चौकात गेल्यावर संयोगिता अण्विकाला हाक मारत
संयोगिता , अनु जरा थांब.
आण्विका, (थांबून) का ग इथे काय काम आहे.
संयोगिता गाडी जवळ आणत, चल तिकडे कोर्नरला मागून.
त्या गाडी एका झाडाजवळ येतात. तिथे गाडी लावत.
संयोगिता, चल थोड नाष्टा पाणी करू.
आण्विका, अग तिकडे होईल की. सकाळपासून वेदिन पिडलय फोन करून करून.
संयोगिता, चल गप, लगीन घरात कधी लवकर काय भेटतय.
वेळ लागतो जेवणावळीला.
त्या दोघी जवळील हॉटेल मध्ये जातात.
आण्विका, ( मागून जाताना) तुझं आपल कायतरी असतय. वेळ होईल ना.
संयोगिता, चल गप्प.
त्या होटेलात जातात. संयोगिता चार मिसळ पावची ऑर्डर देते.
संयोगिता, शुक शुक, ओ काका, चार मिसळ द्या.
काका, हा.
मिसळ थोड्या वेळात एक जण आणून ठेवतो.
संयोगिता, हा करा सुरू.
मिसळ खाताना,
संयोगिता, पिंटू, बबली यातलं एक अवाक्षर देखील घरी सांगायचं नाही.
ती दोघे, कळलं.
संयोगिता, कळलं ना नाहीतर रवी दादाच्या लग्नासारखे कराल.
बबली, नाही ग सांगत माहित आहे आम्हाला.
आण्विका, बबली काय झालं ग रवी मामाच्या लग्नाच्या दिवशी.
बबली, काय नाही ग, आम्हाला आईस्क्रीम हवं होत. व आईने दिलं. व हा चोमडा पिंट्या घरी सांगत गेला आजीला. आजी दोन दिवस उठता बसता टोमणे मारत होती आईला. काय तर म्हणे सूनच राज आलय. पुढे माझ्या पोराला बघतील की नाही, आम्ही कुत्र्यासारखे घर राखतो. ही बाहेर जाऊन चैनी करतात.
आण्विका मग काय झालं,
बबली, मग आईन मोठा आईस्क्रीमचा पॅक आणून दिला आजोबा अन् आजीला.
आण्विका, मग तर झाली ना शांत.
पिंटू बोलू लागला, शांत , कुठली शांत
पाच – सहा जणांच आईस्क्रीम दोघांनी हादडल व बसला घसा, बोलायचं येईना.
आण्विका, मग काय झालं.
पिंट्या, मग पुन्हा बाबांच्या शिव्या मामीला खाव्या लागल्या. तुला कळत की नाही. म्हातारपणी असल खायला देतात का? सरसर प्यायचं वय आहे त्यांचं. बिनडोक असल्यासारखं आइस्क्रीम काय देतेस खायला त्यांना.
आई म्हणाली की त्यांना हवं होत.
तेव्हा बाबा म्हणाले, ते काय पण मागतील, तुझी अक्कल काय गवत खायला गेलती काय.
आण्विका, मग तुम्ही काय ठरवलंय.
बबली, आम्ही ठरवलंय, मम्मीन दिलेलं खायचं, पण कुठेही काय खाल्ल म्हणून ओकायच नाही. व जर पोटात गुपित थांबेना झालं की शाळेला जाताना आम्हाला वाटेत एक भलं मोठ्ठं वडाच झाड लागत. त्याला जाऊन सांगायचं. ते काही कुणाला सांगणारच नाही. कारण ते बोलतच नाही ना.
आण्विका, वा शाब्बास, बरेच हुशार झालाय आईच्या तालमीत.
पिंटू, मग व्हायलाच पाहिजे, बाबांच्या मंडळाच्या तालमीत शरीर तंदुरुस्त होते. व ममीच्या तालमीत मेंदू तल्लख करायचा.
संयोगिता, बर चला आता अटपल असेल तर नाहीतर वेदी मावशी फोन सारखे करून कानाच्या पडद्यांना भगदाड पाडायची.
ते सगळे निघतात.
…… …… ……
Day outer inter वेदांगीच्या घरी
आण्विका व संयोगिता आपापल्या स्कूटी वरून वेदांगीच्या अपार्टमेंट मध्ये पोहोचतात. तिथे आल्यावर.
स्कुटी त्यानी पार्क केली.
आण्विकेस पाहून कालची मुले.
आकाश, अरे, ती आलेय. मस्त ड्रेस घातलाय.
राजेश, चल बघुया.
ती एका गॅलरीत येतात. वर पायऱ्या चढून येणाऱ्या आण्विका व संयोगिताकडे पाहत.
सुजित, काय मस्त दिसते राव.
संग्राम, मस्त आहे पण आपल्याला नाय भेटणार.
राजेश, तर काय.
आकाश, अरे, डॉक्टर आहे ना ती.
सुजित, हो यार, आपण बारावी पास. मव्हर पकडणार. अन् ही कोल्हापुरी मिरची. कसं जुळणार.
राजेश, वेदांगी अक्कान काय सांगितलय माहित आहे ना.
संग्राम, ती सांगते म्हणून काय झालं. प्रयत्न तरी करूया. कुणाला कटली तर काटली.
आकाश, तर काय, माव्हर पकडतो म्हणून काय झालं. आपण आपल्या एरियात दादा आहोत.
राजेश, चला मग प्रयत्न तरी करू.
सगळे, चला चला…
आण्विका व संयोगिता वर वेदांगीच्या घरात येतात.
तिचे बाबा शांत विचार करत असतात. कारण बरेच प्रयत्न करून देखील साखरपुड्याच्या कामाचे नियोजन लागत नसते. आचारी ऐनवेळी लेट झालेला असतो.
ते फोन करतात.
तेव्हा त्याची गाडी पंक्चर झालेली असते. हे कळतं.
आण्विका, (त्यांजवळ जात) काय काका शांत का?
काका, काय सांगू बाळ अजून कामाचे काही नियोजन लागेना झालेय. तीन तासांनी साखरपुडा आहे.
त्यांचे सगळे ऐकूण घेऊन
आण्विका, थांबा मी लावते.
आण्विका, संयो तू आतमध्ये जा. व वेदूला तयार कर जा. मी पाहते इकडे.
संयोगिता वेदुच्या रूममधे आपल्या मुलांना घेऊन जाते.
आण्विका, पाहुण्याच्या असणाऱ्या सर्व तरुण मुला मुलींना बोलावते. त्यांना वेगवेगळी कामे निवडून देते. कुणी रांगोळी काढायची, कुणी सतरंजी अंथरायची. यासाठी वरील टेरेसवर छोटं मंडप घालायला. गणपती मंडळातील मुलांना सांगते. काही मुलींना रांगोळी घालायला लावते.
तर वेदूच्या आई व आजीला साहित्याची जबाबदारी देते. शेजारील काकूंना वेगवेगळ्या जेवणातील घटक वाटून देवून त्याच्या मदतीला पाहुण्यातील इतर स्त्रियांना लावून देते.
वेदीच्या भावाला व पाहुण्यातील मुलांना राहिलेलं साहित्य आणायला लावून देते. थोड्याच वेळात जय्यत तयारी होते.
नवरदेव येतो. व साखरपुड्याचा विधी चालू होतो. त्यावेळी आण्विका वेदूचं आवरायला जाते.
संयोगिता तिथे तीच आवरत असते.
आण्विका, काय ग आवरलं की नाही.
संयोगिता, अग चाललय.
आण्विका, आवर लवकर, तिकडे भट बोलावतोय.
संयोगिता, झालंच.
आण्विका, चला एक काम झालं.
संयोगिता कुठल ग.
आण्विका, कुठल म्हणजे बाईसाहेबांच्या लग्नाचं.
संयोगिता, आता तुझं बघायच राहिलय.
आण्विका, हे बघ आधी या बाईचं आवरुया मग बघू माझं काय करायचं ते.
वेदांगी, मला घालवायलाच बसलाय जणू. इतक्या लवकर कंटाळल्यासा,
आण्विका, आम्ही कुठे कंटाळलोय. तूच कंटाळलीस म्हणून हा खटाटोप चाललाय.
वेदांगी, ये गप कायपण बोलतेस. मला रडू येतय.
आण्विका, तू अन् रडणार, गप मगरीच रडू ते, बसत असशील रात्रभर नवऱ्याशी गप्पा मारत फोनवर.
वेदांगी, मग मारायला नकोत.
तू मारत असशील की
आण्विका, माझं अजून ठरलं नाही.
संयोगिता, काय ग कुणाशी प्रेमबिम आहे का?
आण्विका मोठे डोळे करून, जाऊ का मी घरी, काय वेदू,
वेदू, नको मी गप्प बसते.
संयोगिता, काय ग काय लपवत आहात.
वेदू, काही नाही ग.
इतक्यात बाहेरून मुलगी येते.
ताई भटजी काका बोलवत आहेत.
संयोगिता, हा झालं आलोच.
अग, चला लवकर.
त्या दोघी वेदांगीला साखरपुडा चालू असलेल्या ठिकाणी नेवून सोडतात.
व त्या दोघी मंडपात एके जागी बाजूला थांबतात.
इतक्यात
संग्राम तिथे येतो, अण्विकेस,
हॅलो मिस,
आण्विका, काय.
संग्राम, काय नाही आपला फोन नंबर मिळेल का?
आण्विका, का कशाला,
संग्राम, (घाबरून) काही नाही. म्हटल डेकोरेशनच काम मस्त केलं तुम्ही एखादी ऑर्डर आली तर द्यायला बर.
आण्विका, मी डेकोरेशनच काम करत नाही. डॉक्टर आहे. चिरफाड करते. येतोस.
तो घाबरून जातो
संयोगिता, अग अस काय करतेस. तो सरळ सरळ विचारत होता.
आण्विका, ये बाई गप्प उगाच बाजू घेऊ नको. जेवढा वर आहे ना तो कोकणी, तेवढाच खाली आहे. काल तुला माहित नाही. एकावर एक चिठ्ठी देत होता. आपला फोन नंबर लिहून.
अन् खोटं वाटतंय तर तिकडे बघ लाईन कशी उभा आहे. गॉगल घालून.
संयोगिता, तिकडे पाहते. तिला शायनिंग मारताना चार पाच मुले दिसतात.
अग, खरंच की. ती हसू लागते.
व बघ एखादा पसंत पडतो का, कंपाऊंडर म्हणून ठेवून टाकू
आण्विका, तुझ्याच दुकानात ठेव जा.
संयोगिता, तो बघ दातक्या माव्हरा कसा दिसतोय.
आण्विका, मी जाऊ का इथून.
ती अण्विकेचा हात धरते.
आण्विका, इथे साहेब फोन उचलत माझा त्यामुळे टेन्शन आलंय अन् ही दाखवतीय मला फुलकोबी.
संयोगिता, काय म्हणालीस.
आण्विका, काही नाही, नशीब माझं म्हणाले.
संयोगिता, अग बस ग, बर सांग लग्नाचं काय ठरवलं आहेस.
आण्विका, काही नाही अजून.
संयोगिता, माझ्यापासून काही लपवू नकोस.
आण्विका, काही नाही ह. इंटरशिप झाल्यावर बघायचं आहे.
संयोगिता, कोण आहे का मनात.
आण्विका, आहे पण आणि नाही पण.
संयोगिता,आहे पण आणि नाही पण याचा अर्थ काय? सांग कोण असेल तर.
आण्विका, कळेल तुला, तुला चोरुन करणार नाही.
संयोगिता, हे बघ कोड्यात बोलू नको, मला कळेलच. सांग.
आण्विका, मॅडम आपण बोलू यावर पुन्हा कधीतरी. इथे साखरपुडा आटपूया.
थोड्या वेळात साखर घातली जाते.
आण्विका कामाचा लेखाजोखा देवून जायच्या तयारीत असते.
वेदांगी, आज राहा की इकडे. (सारखी विनवणी असते.)
आण्विका, राहायचं येवढं बोलू नकोस बाई, लग्नाला वाटल्यास लवकर येते.
व बाय येते मी असे म्हणून ती निघते.
तिच्याबरोबर संयोगिता पण निघते.
वाटेत गाडीवर
संयोगिता आपली स्कूटी अण्विकाच्या स्कुटीजवळ आणत,
संयोगिता, का ग थांबायची होतीस.
आण्विका, ये बाई, तिथं कामापेक्षा नको तो त्रास होता. कुठ वॉशरूमला देखील जायची पंचायत होती. नुसती भुतावळ मग.
संयोगिता, मग करायचा त्यातला एक पसंत.
आण्विका, कशाला?
संयोगिता, कशाला म्हणजे लग्नाला, नेला असता की कोकणात एखाद्यानं म्हावर खायला.
आण्विका, इकडे मिळतात मासे. त्यासाठी कोकणात कशाला जायला हवे.
संयोगिता, मग कोल्हापूर सोडत नाहीस म्हण.
आण्विका, ते बघू चल.
ती संयोगिताच्या दारात जाते. तिच्या मुलीला उतरते. इतक्यात मागून संयोगिता येते.
आण्विका, हा झालं, चल बाय मी निघते.
संयोगिता, अग, चहा तरी घेऊन जा.
आण्विका, बस पित तूच .
व ती सुसाट जाते.
संयोगिता, मॅडम काहीतर लपवत आहेत. ही अन् कुणाच्या जाळ्यात गावली. की हिने कुणाला ओढल बघायलाच पाहिजे.
Cut to …..
……. ……. ……. ……
,nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com
No comments:
Post a Comment