शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Thursday, September 18, 2025

मराठी पटकथा : वीरगळ भाग १

 I l श्री गणेशाय नमः l l

मराठी पटकथा : वीरगळ

Day / afternoon / Inter / 1.00o’clock

मुंबई शहरातील दादर मधील एक महाविद्यालयात इयत्ता नववी वर्गात सायन्सची तासिका चालू आहे. शिक्षक शिकवत आहेत. मुले नोट्स लिहून घेत आहेत. शेवट बेंचवर बसलेले समीर, जोसेफ, आरिफ व लाल्या दंगा करत आहेत. त्यांची कुजबुज चालू आहे. प्राध्यापक केशव भटनागर यांचे लक्ष जाते.

प्राध्यापक :

लास्ट बेंच, ओक अप.

( ते उठत नाहीत, पुनः करड्या आवाजात.)

प्राध्यापक :

 शेवट बेंच ऐकू येतंय ना,

जोसेफ : 

( हळू आवाजात )

आता लागली वाट.

समीर :

 बाकीच्यावेळी किंवड्याला ऐकू जात नाही. मात्र लास्ट बेंचवरल बर ऐकू जातं.

लाल्या :

सापाच्या कानाचा आहे म्हातारा, चला उभे रहा.

आरीफ :

आता याचं लेक्चर ऐकावं लागणार म्हणा.

चला उभे रहा.

( ते उभे राहतात. सर्व मुले त्यांकडे पाहू लागतात. सासू लागतात.)

भटनागर :

काय समीर या वर्षी नववी सोडवायची आहे ना. की बसायचं आहे याच वर्गात.

समीर :

माझी काय हरकत नाही.सर पण …..

( सर्व मुले हसू लागतात.)

भटनागर :

कीप क्वाईट

बर सांग एक साधा प्रश्न विचारतो.

आम्ल व आम्लारी यांच्यातील अभिक्रियेतून कशाची निर्मिती होते?

( ते खाली मान घालून उभे राहतात.)

भटनागर :

 काय जोसेफ बोल ना?

जोसेफ :

( खाली मान घालून )

यांना काय फक्त मीच दिसतो.का? सारखे प्रश्न मलाच विचारतात.

( वर्गात दुसरीकडून एक हात वर येतो.)

भटनागर :

 हा बोल आश्विन

आश्विन :

 सर , आम्ल व अम्लारी यांच्या अभिक्रियेतून क्षार निर्माण होतात.

भटनागर :

काय रे, लक्षात आलं का? एक साधा प्रश्न विचारला होता. त्याचं पण उत्तर येतं नाही.

समीर :

सर तुमच्या दृष्टीने तो साधा प्रश्न आहे. पण आम्हाला तो अवघड जातो. त्यापेक्षा वनस्पतीवर विचारा की मला तो धडा संपूर्ण पाठ आहे.

भटनागर सर :

 हो का मग सांग स्पायरोगायरा या वनस्पतीची फुले कोणत्या देवाला घालतात?

समीर :

( हळू आवाजात. तोंड वळवत.)

च्या मायला मी तर नवीनच हे फुलझाड ऐकतोय. या वनस्पतीची फुले …. …. फुले कोणत्या देवाला आवडतात. बर, गणपती लक्ष्मी,शंकर, हा भटनागर सर ….. हा सर गणपतीची पूजा करतात. त्यामुळेच हा प्रश्न विचारला असणार.

समीर :

सर सांगू …. गणपतीला वाहतात.

( सर्व मुले हसू लागतात.)

भटनागर सर :

 गप्प बस मुर्खा, कोण सांगतंय याचं उत्तर.

( अश्विन हात वर करून)

भटनागर :

 हा बोल आश्विन

अश्विन :

 सर स्पायरोगायरा एक शेवाळ आहे, ती एक अपुष्प वनस्पती आहे. तिला फुले कशी येतील?

भटनागर सर :

येतील ना या समीरच्या बुद्धीला आल्यासारखी.

( वर्गात हशा पिकतो.)

भटनागर सर :

 चला बाहेर जाऊन थांबा वर्गाच्या सर्व क्लास डिस्टर्ब केला नालायकांनी.

( ते तिघे वर्गाच्या बाहेर जाऊन उभे राहतात. बाहेर उभे राहिल्यावर )

आरीफ :

 हा आश्व्या स्वतःला लई शहाणा समजतो. याला जरा दाखवला पाहिजे हिसका.

जोसेफ :

 तर काय सर्वांपुढे घालवली अब्रु.

समीर :

 बघू याच्याकडे नंतर.

( बाहेरील व्हरांड्यातून इतिहास विषयाचे घाटपांडे सर जात असतात. ते तिघांना पाहून.)

 घाटपांडे सर :

 याही तासाला बाहेर का? भारी प्रगती आहे तुमची. प्रत्येक तासाला बाहेर . मग वर्गात असता कोणत्या तासाला.

जोसेफ :

असतो ना पी ई च्या तासाला. ग्राऊंडवर .

घाटपांडे सर :

 मग पी ई च्या विषयाचाच पेपर सोडवा. अन् होऊन दाखवा पास.

( घाटपांडे सर निघून जातात. इतक्यात बेल वाजते.)

Cut to …. …

….. .

Day / outer / ground - ३.३० o’ clock

( मुले ग्राउंडवर फुटबॉल खेळत आहेत. समीर आरीफकडे बघून इशारा करतो. फुटबॉल खेळताना ते अश्विनशी ती धक्का बुक्की करतात. अश्विनला पाय आडवा घालून पाडण्याचा प्रयत्न करु लागतात. अश्विन पडतो.  त्याला इतर मुले उठवतात. अश्विन  पुन्हा खेळू लागतो. खेळताना.)

आश्विन :

 आरिफ नीट खेळ, उगाच माझ्याशी मस्ती करू नको.

आरिफ :

खेळतोच आहे ना, खेळ म्हटलं की धक्का बुक्की होणारच.

( समीर जोसेफला इशारा करतो. बॉल मारायला आलेल्या अश्विनला मुद्दाम पाय घालून आडवा पडतो. आश्विन उठून पुन्हा खेळू लागतो. तर हे तिघे त्याच्याशी झोंबाझोंबी करू लागतात. त्यामध्ये वाद होतो. पी ई चे शिक्षक त्या तिघांना ग्राउंड बाहेर काढतात. )

आश्विन :

 जोसेफ उगाच का त्रास देतोयस. नीट खेळ, नाहीतर जा बाहेर.

जोसेफ :

 तुलाच खेळता येत नाही. उगाच आम्हाला कशाला बोलतोस.

आश्विन :

 लई शहाणा आहेस.

 आरिफ :

  तुझ शहाणपण फक्त वर्गातच काय घाट्या.

आश्विन :

 मी घाटी तर तू कोण चौपाटीचा ऑक्टोपस का ?

 आरिफ :

 ऑक्टोपस कुणाला म्हणतोस, घाट्या. थांब दाखवतो.

( त्यामध्ये भांडण लागते. बाजूला उभा असणारे पी ई चे सर येऊन त्यांना.)

पी ई चे सर :

चला बाहेर ग्राउंडच्या. मूर्ख कुठले?

आश्विन :

 सर माझी काही चूक नाही हा आरिफ व जोसेफ उगाच दादागिरी करत असतो. नेहमी.

पी ई चे सर :

 ते काही सांगू नका. व्हा बाहेर.

( ते बाजूला जाऊन उभे राहतात. ते तिघे त्याच्या जवळून जाताना. खुन्नस देत पाहत.)

लाल्या :

 शाळा सुटू दे मग तुला दाखवतो. हिसका.

( आश्विन त्याकडे पाहतो. )

Cut to … …… …

…… …… …….

Day / evening / Outer / on road Mumbai City

बेल वाजते. मुले बाहेर पडली. वाटेत आश्विन एका लहान मित्रासवे जाताना ती आपले काही टारगट मित्र घेऊन अश्विनला मारायला आलेत. आश्विनने आपले दप्तर शेजारील गणेशकडे दिले.

आश्विन :

तू जा मी येतो.

( आश्विन पळू लागतो. ते सर्व त्याच्या मागे लागतात. तो गल्ली बोळातून धावू लागतो. अरुंद पूल व रस्त्याने पळत तो समुद्र किनाऱ्यावर येतो. तो खूप दमलेला आहे. ते त्याला गाठतात. खूप बुकलतात. तो त्यांच्या तावडीतून सुटतो. व पळू लागतो. पळत समुद्र पुलावर येतो. ती त्याला गाठून पाण्यात ढकलतात.)

Cat to ….,

…… ….. …….

Night / outer /samudr kinara Mumbai

 आश्विन पोहत पोहत कसा बसा समुद्र किनाऱ्यावर येतो. तिथे तो काठावर येऊन बेशुध्द होऊन पडतो. काही कोळी पाहतात. व त्यास हॉस्पिटल मध्ये नेतात. त्याचा एक पाऊल दुखावलेला असतो. त्याच्या गळ्यातील शाळेच्या लॉकेटवर घरील फोन नंबर असतो. तो घेऊन नर्स कॉल करते.

नर्स :

 हॅलो, 

फोन वाजू लागला.

अश्विनची आई काम करत होती. रिंग ऐकून तिने फोन उचलला.

( नर्सने अश्विन बाबत माहिती सांगितली. आश्विनची आई तडक निघाली. )

Cut to ……

……. …….. …….

Night / inter / hospital

दारात कार थांबते. माधवी व जयवंत पाटील गाडीतून उतरून हॉस्पिटलकडे जात.

आश्विनची आई व बाबा हॉस्पिटल मध्ये येतात. ते काउंटर जवळ आल्यावर

आश्विन आई माधवी :

अश्विन कुठे आहे?

नर्स :

पुढे केबिन मध्ये

( ती तिकडे धावत जातात. वॉर्ड बॉय त्यांना थांबवतो.)

माधवी :

 मला भेटू द्या, आत माझा बाळ आहे.

वॉर्ड बॉय :

 आत ऑपरेशन चालू आहे. उगाच दंगा करू नका.

माधवी :

 अहो सांगा ना, एकदा पाहतो. त्याला पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही.

जयवंत :

 थांब, शांत हो. मी बघतो आधी,

( वॉर्ड बॉयला )

जास्त लागलं तर नाही ना? कशामुळे झालं हे?

 वॉर्ड बॉय :

 ते काही माहीत नाही आम्हाला, काही कोळी घेऊन आले होते. ते बघा तिथे आहेत

म्हणत होते. की समुद्र किनाऱ्यावर सापडला. श्वास चालू होता म्हणून उचलून इथे घेऊन आले.

माधवी :

 पाया पडते. आज तुमच्या रुपान अगदी देवच धाऊन आला.

कोळी :

 अस काय करतेस पोरी संकटात सापडलेल्याला मदत करण हाच खरा धर्म हाय. होईल बघ निट समद. आई एकवीरेची कृपा म्हणून सापडला. काही काळजी करु नकोस. थोड वरून पडल्यानं पाय दुखावला हाय. मला वाटत. पुलावरून पडला असावा. होईल नीट. बर आम्ही जाताव कामाला. रामराम.

( ते निघून जातात. )

जयवंत :

 आम्हाला पाहू तरी द्या?

वॉर्ड बॉय :

 होत आलंय. थोड्या वेळानं भेटू शकाल. तुमच नशीब चांगलं म्हणून बरं. नाहीतर काही खर नव्हतं

Cut to ……

….. ….. ….. ….

Night / inter / vard

आश्विन हॉस्पिटलमध्ये खाटेवर झोपला आहे. त्याच्या पायाला व डोक्याला बॅन्डेज बांधले जाते. त्याची आई माधवी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे. तो कण्हत असतो

 डॉक्टर तपासणी करायला येतात.

आश्विनची आई माधवी :

 डॉक्टर कधी शुद्धीवर येईल हो माझा बाळ.

डॉक्टर :

 येईल थोड्या वेळात. औषधांची गुंगी उतरेल.

माधवी :

 होईल ना हो नीट सगळं.

डॉक्टर :

 काळजी करू नका. हाड काही मोडल नाही. थोड दुखावलं आहे. स्ट्यापिंग केलंय, या काही गोळ्या औषध लिहून देतोय त्या द्या होईल नीट. परत आठ दिवसांनी आणा पुन्हा  चेकपला.

जयवंत :

 काही सिरियस नाही ना.

डॉक्टर :

 नाही. पण उंचावरून हा पडला आहे. असे प्राथमिक तपासणीत जाणवते. जरा काळजी घ्यावी लागेल.

जयवंत :

 हा घेऊ काळजी.

Cut to …....

…… …… …. ……

Night / Ashvin HOME / inter room

आश्विन बेडवर विश्रांती घेत आहे. समोर टी व्हि चालू आहे. माधवी स्वयंपाक घरातून खीर घेऊन येते. व चारवू लागते.

आश्विन :

 ठेव ग मी खाईन.

माधवी :

 नको चारते मी.

आश्विन :

 अग खातो म्हटलं ना नंतर. मी काय लहान बाळ नाही.

माधवी :

 अस म्हणतोस तर ठेवते. खा नंतर.

बर मला सांग तिकडे पुलाकडे काय करायला गेला होतास.

आश्विन :

 काही नाही.

माधवी :

 काही नाही कस. रोज शाळेतून थेट घरी येणारा तू अस काय झालं की पुलाकडे गेलास. व खाली पडलास.

( अश्विनच्या डोळ्यासमोर सगळा प्रसंग उभा राहतो. तो काहीच बोलत नाही. घाबरलेला असतो. माधवी पुन्हा विचारते.)

अश्विन :

तुला कशाला हवे. सोड तो विषय.

माधवी :

 सोड कस.

आश्विन :

 मला सांगायचं नाही.

माधवी :

 ते काही नाही मला सांगच .

 आश्विन चिडतो. व ती खिरीची डिश फेकून देतो.

( आवाज ऐकून बाबा आत येतात. )

जयवंत :

 आश्विन काय चाललंय,

 आश्विन :

 मग काय करू,  काल पासून सारखं विचारतेय काय करायला गेला होतास म्हणून. एकदा सांगितलेलं हिला समजत नाही का? का सारखं तेच तेच.

माधवी :

 अरे मी सरळ..

जयवंत :

( बायकोच्या खांद्यावर हात ठेवून)

 उगाच त्याला त्रास देऊ नकोस. बघू. आश्विन तू गोळ्या घे. व विश्रांती घे.

बर मी येतो. उशीर होतोय मला.

जयवंत कामावर जातो. माधवी स्वयंपाक खोली आवरू लागते. इतक्यात फोन वाजतो.

क्रमशः पुढे .....











वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...