वास्तव आणि प्रेम
लेखक : निशिकांत हारुगले
क्रमशः पुढे चालूू
रजनीगंधा बंगला स्वप्नजा आपली बॅग ठेवून साहित्य लावत आहे.
वेळ रात्री
तुळसा,( कामवाली)
उघड्या बॅग मधील फोटो उचलत
“ मॅडम हा फोटो कोणाचा?”
स्वप्नजा, (हसत)
“ माझ्या ममी पपांचा.”
तुळसा,
“ हा दुसरा फोटो कोणाचा?नव्हरा का तुमचा?”
स्वप्नजा,
“नाही ग, भाऊ आहे तो माझा.”
तुळसा,
“ माफ करा हं बाई.”
स्वप्नजा,
“ त्यात काय एवढं. तू तर अनोळखी असे प्रश्न विचारणारच ना. माहिती करून घेणेसाठी.”
तुळसा,
“ तुमचं लग्न झालंय.”
स्वप्नजा,
“ नाही ग,का?”
तुळसा,
“ सहज विचारलं, कोणी बाय फरींड असेल की.”
स्वप्नजा,
“ ए येडाबाई, बाय फिरेंड, नव्हे बॉयफ्रेंड म्हण. माझ काय तस नाही. काय तुझी भाषा ग. “
तुळसा,
“ व्हय बाई आम्हाला काय कळतं यातलं आम्ही अडाणी माणसं. बर जेवणात काय करू.”
स्वप्नजा,
“ कर काहितरी जे असल ते. पण साध हवं ह. नाहीतर करशील चरचरीत. मला साधच जेवण आवडत.”
“ बर तुझ्या घरी कोण कोण असत ग.”
तुळसा,
“ मी अन माझे मालक, माझी सासू अन् दोंन लेकर.”
( एवढ्यात महादू तिथे येतो.)
स्वप्नजा,
“ तुझे मालक काय करतात?”
तुळसा,
“ हेच की आमचं हे. इथच आहेत कामाला शिपाई म्हणून.”
महादेव,
“ ए इथ काय बोलत बसलीस, जा जेवणाच अटप जा. लवकर.”
तुळसा,
“ अग बाई, जाते मी.”
तुळसा किचनमध्ये जाते व जेवणाला लागते.
स्वप्नजा,
“ तुझ नाव काय रे?”
महादेव,
“ तस् महादेव हाय पण समदे महादुच म्हणत्यात.”
इतक्यात तिथे मालक विलासराव येतात. व स्वप्नजेस,
“ मॅडम प्रवास नीट झाला नव्हं. काही त्रास वगैरे.तस काय असल तर सांगा ह. अन् ही दोन माणसं असतील तुमच्या सेवेला. इथच मागल्या बाजूस राहतात. काय पण लागल तरी बे झिजक मागा. तुमचं लई नाव ऐकलंय. तुमचं काम व तडफदारपना याबद्दल खूप ऐकूण आहोत आम्ही. म्हणूनच तुम्हाला बोलावलंय. ही गाळात रुतलेली आमची कंपनी बाहेर काढा. तुम्हाला मी मालामाल करेन बघा. तुम्हाला दुसरीकडं कुठच जायची गरज पडणार नाही.”
स्वप्नजा,
“ आता आलेय मी. पहाते काय प्रोब्लेम हाय ते. तुम्ही निश्चिंत रहा.”
“ बर, मला सर्व फायनान्स व इतर फाईल्स हव्या आहेत. तेवढ्या पाठवून दयायला सांगा.”
विलासराव,
“ अहो, काम काय होतच रहातात. आजच तूम्ही प्रवासातून आलाय. थकला असाल.थोडी घ्या विश्रांती. उद्यापासून लागा कामाला. तोपर्यंत आमच्या सातारकरांना द्या सेवेची संधी.”
“ दोन दिवसांनी आमच्या मित्राचा मुलगा येणार हाय. तो ही हुशार आहे. तो व तुम्ही दोघे मिळून बघा मग कंपनीचं. कस हाय मॅडम ही कंपनी आमच्या आजोबांनी सुरू केली होती. हिच्यावर आमच्या अनेक उद्योगांचा विस्तार झालाय. तेव्हा फायदा तोटा. नसला तरी हा मूळचा सूरवातीचा उद्योग असल्याने या व इथल्या लोकांच्या रोजगारासाठी धडपड चाललेय.”
“ बर का मॅडम मी जरा विदर्भ दौऱ्यावर जात असलेने काय लागलं तर आहेतच माणस सोबतीला. बरं येतो. बर महादू मी मॅनेजरला फोन लावतो. वरच्या ऑफीस मधील लागणाऱ्या फायली तेवढ्या आणून दे..”
स्वप्नजा,
“ मी घेते मागवून. तुम्ही निश्चित राहा.”
ते निघतात.
स्वप्नजा मॅनेजरला फोन लावते
व फायली मागवून घेते.
…. …… …… ……
( सकाळचे अकरा वाजलेत. रजनीगंधा बंगल्यातील एका खोलीत. एका टेबलावर महादेव शिपाई फायली आणून ठेवतो. स्वप्नजा तिथं बसलेली आहे.)
महादेव,
“मॅडम, ह्या घ्या सगळ्या फायली.”
स्वप्नजा,
“ बर, तू जा, बघते मी.”
दोन दिवस ती एकसारखी बसून फायलींचा अभ्यास करते. त्यातील बारकावे पाहते.
…… …… …….. …….
दोन दिवसानंतर,
एक कार येऊन स्वप्नविला बंगलीच्या आवारात थांबते. अमोघ खाली उतरतो.
अमोघ,
“ ड्रायव्हर गाडी पार्क कर.”
अमोघ आतमध्ये येतो.
महादू शिपाई तिथे टेबल पुसत असतो.
महादेव,
“ राम राम साहेब, काय सेवा करू.”
अमोघ,
“ मी जरा फ्रेश होणार आहे. थोडं सरबत किंवा कोकम तयार कर.”
महादेव,
“ बर साहेब.”
(अमोघ तेथील बेडरूम मध्ये जाऊन आपली बॅग ठेवतो. व बाथरूम मध्ये जाऊन अंघोळ करतो. महादेव जवळील रजनीगंधा मधून सरबत करून घेऊन येतो.)
अमोघ,( महादुस येताना पाहून)
तो आपले डोके टॉवेलने पुसत आपली बॅग उघडून कपडे काढून घालताना.
अमोघ,
“ अरे, कुठे गेला होतास. मी मगाशी हाक मारत होतो.”
महादेव,
“ काय काम होत का?”
अमोघ,
“ जरा टॉवेल हवा होता.बस. मिळाला नंतर.”
महादेव,
“ आपल्याला सरबत आणायला गेलो होतो. मागील बंगल्यातून.”
अमोघ,
“ इथच बनवायचं ना.”
महादेव,
“ सगळं साहित्य मागल्या बंगल्यात आहे. रजनीगंधामध्ये. तिथेच जेवण बनवतो.”
अमोघ,
“ तिथे का? इथे का नाही बनवत.”
महादेव,
“ इथे कोण राहते. आज तुम्ही आलाय म्हणून. खालच्या बंगलीत नवीन मॅडम आल्यात बेळगावहून त्यामुळे तिथे जेवण बनवतो.”
अमोघ,
“ कुठल्या आहेत रे त्या.”
महादेव,
“ कोल्हापूरच्या आहेत. पण कामाला अगदी दमदार आहेत. दोनच दिवस झालेत. पण कामाचा सपाटाच आहे त्यांच्या.”
अमोघ,
“ तुला रे एवढी माहिती कशी?”
महादेव,
“ दोन दिवस फायली द्यायला मी आहे नव्ह त्यांच्या हाताखाली.”
“ बर, हा घ्या सरबत.”
अमोघ सरबत घेतो. तो सरबत त्याला खूप आवडतो.
…. …. …. ….
स्वप्नजा आपले काम करत असते.मॅनेजर तिथे येतो.
मॅनेजर,
“ नमस्कार मॅडम.”
स्वप्नजा,
“ नमस्कार.”
मॅनेजर,
“ मॅडम ऑफिसमध्ये आपल्यासाठी केबिन तयार आहे.”
स्वप्नजा,
“मिटिंगला मी तिथे येईन बाकीचे काम इथूनच करेन, आपले क्लार्क कोण आहेत. त्याना सांगून संगणकीय डेटा तेवढा पाठवा. माझ्या या लिंकवर. मी बाकी पाहीन.”
मॅनेजर,
“ ऑफिस मधून काम करण सोईस्कर पडेल आपल्याला.”
स्वप्नजा,
“ उलट इथे मला सोईस्कर आहे.बाकीच्या स्टाफचा व माझा जास्त संबंध येत नाही.”
मॅनेजर,
“ तरी पण.”
स्वप्नजा,
“ मी सांगतो तेवढे कर फक्त.”
मॅनेजर,
“ बर मॅडम.”
तो जातो.
….. ….. …… ……
(रात्रीची वेळ ऑफीस स्टाफ गेल्यावर. ऑफिसमध्ये मॅनेजर, क्लार्क मनोज राऊत, मिश्रण अधिकारी अशोक मेहंदळे एकत्र मिटिंग.)
मॅनेजर,
“ ही बाई फारच हुशार आहे.तिच्या कामाचा जराही मागमूस लागू देत नाही.”
क्लार्क,
“ असे असेल तर सावधगिरी बाळगली पाहिजे साहेब.”
मिश्रण अधिकारी,
“ आपल्याला तर काळजी घ्यायला हवीच.”
मॅनेजर,
“ सर्व फायली दिल्या नाहीत ना.”
क्लार्क,
“ नाही साहेब, त्यातील महत्त्वाच्या आपल्या मनोरमा बंगल्यावर केव्हाच पोहोच झाल्यात.”
मॅनेजर,
“ बघू देत, काय बघायच् ते. काय करतेय बघू. चिमणी नवीन आहे तोपर्यंत फडफडायची. रॉकेल संपल की जाईल विजून.”
मिश्रण अधिकारी,
“ मला तर वेगळीच भीती वाटतेय.”
क्लार्क,
“ आता कसली भीती.”
मिश्रण अधिकारी,
“ अमोघ सर, आले की कारखान्यात फेरी मारणार. तेव्हा मालातील तफावत दिसू शकेल.”
क्लार्क,
“ हे मात्र विचार करण्यासारखं आहे.”
मॅनेजर,
“ मग आपली पंचाईत होऊ शकते.”
मिश्रण अधिकारी,
“ यावेळी दक्षता घेतली पाहिजे साहेब.”
मॅनेजर,
“ आता सगळं रेग्यूलर चालू देत. त्याना वाटल पाहिजे की सर्व नीट आहे.”
मिश्रण अधिकारी,
“ बर, ठीक आहे.”
…. …. …… ….. …..
रजनीगंधा बंगला (दिवस)
स्वप्नजा फाईल चेक करताना तिला काही डॉक्युमेंट गायब दिसतात. त्याची ती नोंद घेते. व फाईल मिटवत धीरगंभीर मुद्रेने चहा देण्यास आलेल्या तुळसेस.
तुळसा,
“ मॅडम लई काम झाल.रात्रीच जेवणही केलं नाही नीट तूम्ही, तसच आहे. चहा तरी घ्या.”
स्वप्नजा,
“ काय ग तू केव्हापासून आहेस इथे कामाला.”
तुळसा,
“ लई दिवसापासून आहोत बघा, जवळ जवळ पाच तरी वर्ष झाली असतील.”
स्वप्नजा,
“ तुला हा मॅनेजर कसा वाटतो.”
तुळसा,
“ मॅडम याच्या गोड बोलण्याला भुलू नका. याच्या मनोरमा विला बंगल्यावर सारख्या पार्ट्या काय, दारू काय, नाचगाणी असायची. सगळी कंपनीच्या कारभारावर मिजास नुसती, तोटा दिसाय लागल्यावर मालकांनी झाडला एकदा. तवापासून यांची थेर थांबली. व याच्या जोडीला मनोज व अमोल साहेब आहेतच घोळ घालायला.”
स्वप्नजा,
“ तुला बरीच माहिती आहे ग.”
तुळसा,
“ असेना तर, त्यांची जेवण शिजवून घाईला आले मी. पुलाव काय, बिर्याणी काय, तंदुरी चिकन काय. नाना तऱ्हा केल्यात त्यांनी.एकदा तर इतकी प्यायले. की जेवण तोंडात की नाकात घालतोय. ते समजेना त्यांना”
स्वप्नजा,
“ बर, महादेव काकांना सांग मला फ्याक्टरी बघायची आहे. जरा सोबत चलायला.”
तुळसा,
“ बर बर.”
(तुळसा चहाची प्लेट घेऊन आत जाते.महादेव तिथे चहा पित असतो.)
तुळसा,
“ हू, आटपा तुमचं. मॅडमना फॅक्टरी बघायची आहे. दाखवा जावा.”
महादेव,
“ बर बर जातो माझे आई.”
…… ….., …… …..
मॅडमची कामाची खोली.
महादेव तिथे येतो.
स्वप्नजा मॅडम,
“ महादेव काका, मला फॅक्टरी पहायची आहे”
महादेव,
“ चला की दाखवतो मी. मला सगळी माहिती आहे बघा. पुण्याचं साहेब पण गेल्यात तिथे. चला.”
ती निघतात.
कंपनीतील प्रत्येक विभाग पहात त्याची माहिती व नोंद घेत ती पुढे जात असते. जाताना सर्व ठिकाणे पहात ती मशिनरी विभागातून पुढे जाते तेथील एक पार्ट एका पिशवीत घालत ती महादेव काकांना.
“ हा पार्ट बंगल्यावर न्या.”
तोपर्यंत भोंगा होतो. तिथे अपघात होतो. एक कामगार किरकोळ जखमी होतो. दारू प्यायल्याने, तिथे गर्दी होते. तोपर्यंत तिथे अमोघ येतो. व अम्बुलेस बोलावून कामगारास दवाखान्यात हलवले जाते. त्याला नेले जात असताना अमोघ व स्वप्नजा ची भेट तिथे होते.
महादेव,
“ मॅडम हे आहेत अमोघ साहेब आपल्या मालकांच्या मीत्रांचा मुलगा, आपल्या कंपनीत नवीन उपक्रम व नवीन प्रोजेक्ट आणणार आहेत.”
महादेव,
“ व अमोघ सर या नवीन फायनान्स विभागाच्या मॅडम बेळगावहून आल्यात.”
स्वप्नजा,
नमस्कार करते, व निघून जाते.
अमोघ, आश्चर्य चकित होऊन तिला पाहतच राहतो. ती निघून जाते.
…, …… …… ……
रजनीगंधा बंगला(खोलीत)
स्वप्नजा लेटर लिहिते. व ते महादेव काकांना देते.
स्वप्नजा,
“ महादेव काका एवढे लेटर साहेबांकडे द्या.”
महादेव,
“ काय आहे त्यात.”
स्वप्नजा,
“ तुम्ही फक्त हे लेटर द्या.”
तोपर्यंत तिथे अमोघ येतो. तो हॉल मध्ये पोहोचतो. महादेव शिपायाच्या हातातील लिफाफा पहात.
अमोघ,
“ काय आहे त्यात.”
महादेव,
“ मॅडमनी हा लिफाफा मालकांना द्यायला सांगितलाय.”
अमोघ,
“ आण तो इकडे.”
अमोघ तो उघडून पाहतो आणि आत जातो.स्वप्नजा आपले आवरत असते
अमोघ,
“ हे काय आहे स्वप्नजा.”
स्वप्नजा,
“ माझा राजीनामा,”
अमोघ,
“ का मी आहे म्हणून, तू असं सोडून जाऊ शकत नाहीस. तुझी या कंपनीला गरज आहे.”
स्वप्नजा,
“ पण मी इथे काम करू शकत नाही.”
अमोघ,
“ पण का. मी आहे म्हणूनच ना. तू म्हणत असशील तर मी निघून जातो पुण्याला.”
स्वप्नजा,
“ नाही, नको. तुम्ही थांबा मी निघते.”
अमोघ,
“ कुठे जाणार. नोकऱ्या अशा काय रस्त्याला पडलेल्या नाहीत.”
स्वप्नजा,
“ जाईन माझ्या घरी.”
अमोघ,
“ तुला अस दाखवायचं आहे का की माझ्यामुळे तुझं करियर खराब झाल ते. अस असेल तर मी निघतो. मी इथे फकत वडिलांच्या मित्राची कंपनी म्हणून आलो नाहीये. तर या कंपनीतील हजारो कामगारांचा विचार करून इथे आलो आहे. हजारभर कुटुंबाचा विचार करून मी इथे आलो आहे. तू ही हा विचार कर. मी भूतकाळात दिलेला त्रास तू विसर आता तुझ्या हाताखाली काम कराय मी तयार आहे. व तुला ते ही मान्य नसेल तर मी जाईन.”
(स्वप्नजा थोडा वेळ शांत बसते. व विचार करते. व तो लिफाफा उघडून ते पत्र फाडते. व कामाला लागते. अमोघ कंपनीतील त्रुटी व जुन्या मशिनरी पाहून नवीन योजना तयार करतो व ती फाईल स्वप्नजाकडे पाठवतो. .)
महादेव,
“ मॅडम अमोघ साहेबांनी ही फाईल दिली आहे.”
स्वप्नजा,
“ ठेव तिकडे.”
स्वप्नजा,फाईल पाहते. त्यातील उपाय योजना व नवीन बदल तसेच आर्थिक रेशो पाहून ती मनाशी.
स्वप्नजा,(मनात)
“ हा तर खूपच हुशार आहे. इतक्या सहज प्रोजेक्ट मध्ये त्याने उपाय योजना सुचवली. व फाईल इतकी चोख व व्यवहारी आहे. हा तोच अमोघ आहे का दंगेखोर. की काय. मस्तच.इतका कामसू व शांत झालाय. काय जादू झालेय कोणास ठाऊक.”
जुन्या फायली व एंट्री व एक्झीट फायलीच्या आधारे. ती व्यवहारातील गलथान कारभार शोधून काढते. व कंपनीतील जुने पार्ट. तसेच नवीन पार्ट. प्रयोग शाळेत पाठवून ती त्यातील भेसळ शोधून काढते. यासाठी अमोघ सहकार्य करतो.
…. …… ….. ….. ….
मनोरमा बंगला वेळ रात्री
मॅनेजर,
“ आपण समजतो त्या पेक्षा ही बाई जास्तच हुशार लागली. तिने सर्व रिपोर्ट पाठवलाय म्हणे.”
क्लार्क,
“ आपल्या कामाचा काही थांगपत्ता लागू देत नाही. आपल्याला कधीही अटक होऊ शकते.”
मिश्रण अधिकारी,
“ माझी तर नोकरी धोक्यात आलेय. त्यापेक्षा मला भीती वाटतेय ती जेलात जायची.”
मॅनेजर,
“ हिला तर विचार करूनच अडकवायला हवी.”
….. …… …… …
अमोघ स्वप्नजेच्या पुढे येत नसे. पण तिला रोज पाहण्यासाठी तळमळत असे. कधी जॉगिंगला ती पार्कमध्ये गेल्यावर तो ही त्या बहाण्याने तिथे घुटमळत असे. स्वप्नजेला ते जाणवत असे. मात्र ती आपल्याला काही माहीत नाही असे दाखवत असे. काही दिवस जातात.
स्वप्नविला बंगला संध्याकाळचे सहा वाजलेत. महादेव शिपाई चहा घेऊन येतो.
तेव्हा अमोघ अंथरुणावर झोपलेला असतो. त्याला ताप असतो. तो ताप चेक करतो.
महादेव,
“ साहेब खूप ताप आहे.”
अमोघ,
“ एवढं काय नाही.थोड अशक्त वाटतंय.”
महादेव,
“ तस कस मालकांना समजल तर मला उभा खातील. थांबा डॉक्टरांना बोलवतो.”
महादेव डॉक्टरांना फोन लावून बोलवतो. डॉक्टर येतात व चेक करुन.
डॉक्टर,
“ घाबरण्यासारख एवढं काही नाही. मी इंजेक्शन व ही औषध देतोय तेवढी घ्या म्हणजे बरे वाटेल. जेवण साध दोन दिवस दिलेलं बर. जरा काळजी घ्या. बाहेर जाऊ नका दोन दिवस.”
डॉक्टर निघून जातात.
महादेव तडक रजनीगंधा बंगल्यात जातो.
महादेव,
“ तुळसा, तुळसा, कुठे गेली ही.”
स्वप्नजा,
“ काय हो काका कशाला पाहिजे. ती आपल्या मावशीला पाहायला गेलीय. का काही हवे होते का?”
महादेव,
“ माझ्या लक्षात नाही आलं. अरे बापरे.”
स्वप्नजा,
“ काय झाल.”
महादेव,
“ काय नाही, जरा अमोघ साहेब आजारी आहेत. त्यांच्या जेवणाच सांगायचं होत.”
स्वप्नजा,
“ काय झालंय.”
महादेव,
“ त्याना ताप आलाय. जरा जेवणाच करायचं होत. राहू दे. बाहेरून मागवतो जातो.”
स्वप्नजा,
“ नको बाहेरच मी करते जेवण.”
स्वप्नजा जेवण बनवते. इतक्यात
तुळसा येते.
तुळसा,
“ मॅडम तुम्ही काय करताय. मी करते ना.”
स्वप्नजा,
“ अग, मला येत जेवण करायला. त्यात काय तू पेशंट पाहायला गेली होतीस. म्हटल वेळ होणार. व आपण ही बघू काय जमतं ते.”
तुळसा,
“ न जमायला काय झालं. एवढं सुरेख जेवण केलयं तुम्ही.”
स्वप्नजा,
“ बर सगळ राहू दे. हे जेवण घे. व साहेबांना नेऊन दे. त्यांची तब्येत ठीक नाही.”
तुळसा,
“ कोणाची, अमोघ साहेबांची.”
स्वप्नजा,
“ हो त्यांचीच.”
तुळसा
“ हे लगेच जाते. उद्या पर्यंत ठीक होतात की नाही बघ.”
“ ह मी नाही म्हणून काम करू नका. मी येऊन अटपते पसारा.”
…. ….. …… ….. ……
स्वप्नविला बंगला महादेव व तुळसा जेवण घेऊन येतात.
महादेव,
“ साहेब, जेवण आणलय, चला उठा बघू बिगी बीगी खावून घ्या.”
अमोघ,
“ भूक नाही, ठेव तिथे नंतर खातो.”
तुळसा,
“ नंतर बिंतर काय नाही बघ, लागलीच चला बघू. उठा बघू.”
अमोघ,
“ तुम्ही काय ऐकणार हाय होय. बर आन इकडे.”
अमोघ जवळील छोट्या टेबलावर बसतो. व जेवू लागतो.
अमोघ,
“ हु मस्त आहे. आज काय घातलस जेवणात निराळी चव आलेय.”
तुळसा
“ माफ करा ह साहेब. आजच जेवण मी नाही मॅडमनी केलय. ते काय झाल बघा. आमच्या वाईच्या मावशीला इथे अडमीट केलय.तवा बघाय गेलते. तोपर्यंत मॅडमनी केलं बघा.”
अमोघ,
“ कोणी स्वप्नजेन केलाय.”
तुळसा,
“ होय, त्यांनीच बघा. मस्त आहे ना.”
अमोघ,
“ अप्रतिम. ( मनात) खरोखर इतक सुरेख जेवण बनवते तर . तेलकट नाही. इतकं साधं व सुरेख. मी उगाच त्रास दिला तिला ज्वानीची नशा होती ना. आता काय कराचंय म्हणा. हिला इंप्रेस करायला काय करू. फोन करू. नको उगाच चिडायची. त्यापेक्षा बघू नंतर काहीतरी गिफ्ट देऊ.”
अमोघ जेवतो. व औषध खाऊन झोपतो.
तुळसा,
“ ह साहेब झोपलेत. तुम्ही चला जेवून या इकड साहेबांच्या सेवेला.”
महादेव,
“ हो चल लवकर.”
ते निघतात.
….. …… …… …
सकाळच्या फ्रेश हवेत. जॉगिंग करायला स्वप्नजा जाते. थोडी रपेट मारल्यावर ती बागेतील बाकावर बसून फुलांवर उडणारी फुलपाखरे न्याहाळत आहे.
इतक्यात तिथे अमोघ येतो.तो ही बाहेर रनींग करून आलेला असतो.त्याची व तिची नजरानजर होते.
अमोघ,
“ सकाळच्या मोकळ्या वातावरणात फिरण्याचा आनंद वेगळाच असतो ना.”
स्वप्नजा,
“ हो,”
स्वप्नजा,
“ म्हणजे पेशंट बरा झाला वाटत.”
अमोघ,
“ कालपासून बर वाटतेय, कंटाळा आला म्हणून आलो. जरा फिरावं. म्हटल.थ्यांकस.”
स्वप्नजा,
“ कशाबद्दल.”
अमोघ,
“ परवाच्या जेवणा बद्दल. जे तू पाठवलं होतस”
स्वप्नजा,
“ त्यात काय एवढं.”
अमोघ,
“ तरी पण मी तुला कॉलेजमध्ये किती त्रास दिला. तरी तू मला जेवण करून पाठवलेस.”
स्वप्नजा,
“ तिथे दुसर कोणी असत तर तेच केलं असत.”
अमोघ,
“ तू मला अहो जावो करू नको.”
स्वप्नजा,
“ मग काय म्हणू.”
अमोघ,
“ मी व तू एकाच वर्गातले. ए जा केलं तरी चालेल.”
स्वप्नजा,
“ नको अहो जावो चांगल. नाहीतर तुम्ही मालक व आम्ही नोकर.आपण आपली मर्यादा जपावी. नाहीतर लोक म्हणायचे जरा काय हक्क दिले. मालकिनच झालीय.”
अमोघ
“ मग सांगायचं मालकीण आहे म्हणून.”
स्वप्नजा,
“ बर मी निघते.”
तिचा हात धरत,
अमोघ,
“ रागावलीस मालकीण म्हटल म्हणून.”
स्वप्नजा,
“ त्यात काय रागवायचे. आणखी काही महिने आहे मी इथे. नंतर..”
अमोघ,
“ नंतर काय.”
स्वप्नजा,
“ मी दुसरीकडे काम पाहणार आहे.”
अमोघ,
“ का? इथे काही त्रास आहे.”
स्वप्नजा,
“ नाही बघायचं दुसर कुठेतरी कोल्हापूरकडे.”
अमोघ,
“ मी आहे म्हणून ना. अस, करू नको. मी जातो इथून वाटल तर.”
स्वप्नजा,
“ नाही, नको त्याची काही गरज नाही.”
अमोघ,
“ असा विचार करू नकोस. खर सांगू. माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण तू समजूनच घेत नाहीस. मी तुला गुलाम म्हणून नाही. तर मी तुझा गुलाम व्हायला तयार आहे. अजूनही होकार असेल तर मी लग्नाला तयार आहे.”
स्वप्नजा काही न बोलता तिथून निघून जाते. अमोघ नाराज होतो.
…. ….. ….. ….. ..,..
अमोघ शांतपणे बंगल्याच्या टेरेसवर बसलेला आहे. हसणारा, लाघवी बोलणारा, अमोघ शांत , तुळसा चहा द्यायला जाते. त्याला नाराज पाहून
तुळसा,
“ साहेब, काय झाल. एवढं नाराज का.”
इतक्यात महादेव देखील तिथे येतो.
अमोघ सगळ त्यानां सांगतो.
तुळसा,
“ म्याडमंच तस चुकत नाही. पण आता तुम्ही इतक्यावेळा माफी मागता म्हंटल्यावर त्यांनी पण माफ करायला हवं. तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत दोघ तुमच्या माग.”
इतक्यात फोन वाजतो. अमोघ रूम मध्ये जाऊन फोन उचलतो.
फोनवर
स्वाती,
“ कोण अमोघ, का?”
अमोघ,
“ हो, स्वाती का.”
स्वाती,
“ आवाज ओळखलास म्हणायचा.”
अमोघ,
“ काय आहेस ना बरी, वरुण व घरातील सर्व आहेत ना बरी.”
स्वाती,
“ ती आहेत बरी.त्याना काय झालंय. इथ माझ्याच सुट्टीच वांद झालंय. परीक्षा संपली कुठे फिरायला जायचं म्हटल तर कोणीच नाव घेईन झालंय. तूच सांग की मम्मी ला.”
अमोघ,
“ हे बघ आत्या व काकांना सांगून त्यांचं भारुड ऐकण्यापेक्षा तू व वरूण या ना इकडे. साताऱ्याला. आपण फिरायला जाऊ महाबळेश्वर अजिंक्यतारा. वगैरे.”
स्वाती,
“ चालेल. निघतो उद्याच मज्जा. कंटाळा आला होता बघ. बर झाल.सांगते व उद्याच निघतो आम्ही.”
….. …… …… …..
रजनीगंधा बंगला किचनमध्ये तुळसा जेवण करतेय.पलीकडे स्वप्नजा पुस्तक वाचत आहे.
तुळसा,
“ हे बघा स्वाती ताई व वरूण दादा येणार आहेत. तेव्हा त्यांच्या जेवणाच बघाव लागेल. तेव्हा वाणसामानाची यादी देते. तेवढं आणा.”
स्वप्नजा,
“ तुळसा ए तुळसा.”
तुळसा,
“ आले आले, काय ते मॅडम.”
स्वप्नजा,
“ कसली गडबड चाललेय.”
तुळसा
“काही नाही. अमोघ साहेबांचे पाहुणे येणार आहेत.”
स्वप्नजा,
“ कोण येणार आहेत.”
तुळसा,
“ स्वाती ताई येणार आहेत. अमोघ साहेबांच्या आत्तीची मुलगी. तिची परीक्षा झालेय ना.”
स्वप्नजा,
“ बर झालं मला पण सोबत होईल.”
तुळसा,
“ त्या तर पलीकडे राहणार.”
स्वप्नजा,
“ तिला इथेच सांग राहायला.”
तुळसा,
“ त्या तिकडेच राहतील. वरूण भाऊ सुद्धा अमोघ साहेब पाहुणे मग ते जास्त तिथेच राहतील. ”
स्वप्नजा,
“ ठीक आहे.शेवटी त्यांची इच्छा.”
….. ….. …. ….
ऑफीसमध्ये सर्व एकत्रित बसले आहेत. मीटिंग चालू आहे.
मुख्य साहेब चेअरमन व मालक विलासराव,( हातातील फाईल पाहून बंद करतात)
“ एकंदरीत. सर्व कागदपत्र व रिपोर्ट पाहता तुम्ही दोषी सापडता काय पालकर, काय राऊत स्पष्टीकरण द्या विचारलेल्या प्रश्नांची. व मेहंदळे ते तर गायबच आहेत. मटेरियल सर्व वापरले. तर अपघात झालेल्या गाडीतील पार्ट वरून लक्षात आले. अनेक डीलरच्या तक्रारी आल्यात. वाहणांबद्दल.”
मॅनेजर पालकर,
“ मेहंदळे रजेवर आहेत. साहेब तो विभाग त्यांच्याकडे आहे.”
चेअरमन,
“ उगाच सशाला खळगा जामीन नको. ते काम करतात व तुम्ही काय झोपा काढल्यात. तुम्ही तुमची जबाबदारी झटकलित. व यात तुम्ही ही सामील आहात हे सिद्ध होतंय. तुमचे ब्यांक डिटेल पण बघितलेत कुठून कसा व्यवहार झाला हे पणं निघालय. झालं ते नुकसान झालं. यासाठी तुम्हाला जेलात पाठवलं पाहिजे खडी फोडायला. पण तुमच्या वडिलांच्या व आमच्या हितसंबंधामुळे ते टाळतोय. तूम्ही स्वतः राजीनामा देताय. की लिहून घेऊ कोर्टातून.”
मॅनेजर,
“साहेब एक डाव माफी करा.”
चेअरमन,
“ काय माफी नाही. इथ मुकाट्यानं सही करा व निघा इथून. चूक माफ करतात. गुन्हा नाही. सपशेल फसवाफसवी केलीय तुम्ही. मांजराला वाटत की आपण डोळे झाकून दूध पीतो जग आंधळ आहे. पण असा बडगा पडला की समजत की जग डोळस आहे ते.”
चेअरमन,
“ बिडकर, यांचे राजीनामे घ्या. व सगळी अथॉरिटी स्वप्नजा मॅडमना द्या.”
चेअरमन,
“ खरोखर तुम्ही खूपच हुशार आहात. इथून पुढे या कंपनीचा सर्व लेखाजोखा तुम्ही पाहा. तसेच अमोघ आहेच तुमच्या मदतीला”
….. …. ….. ….. …..
स्वप्नविला बंगल्याच्या आवारात एक कार थांबते. कारमधून स्वाती व तिचा भाऊ वरुण खाली उतरतो. महादेव शिपाई बॅगा त्यांच्या आत घेतो. स्वाती धावत आत जाते.
अमोघ आपल्या रूममध्ये टेबलाशेजारी. बसलेला असतो फायली चेक करत .
स्वाती धावत जाऊन
स्वाती,
“ अमोघ ,”
ती मागून त्याच्या मानेभोवती हात घालत.
“ काय हे आम्ही आलोय सुट्टीला व तुझ आपल चाललय कामाचं. आता सुट्टी घे. कामबिम काही नाही.”
अमोघ,
“ तुझी झालेय परीक्षा आमची नाही. दोन दिवसात आटपतील कामे मग जाऊ फिरायला. तो पर्यंत इथलं सगळा परिसर फिरा.”
अमोघ,.” हे बघ महादेव, तुळसाला सांग यांना काय हवं ते करून घालायला. व लागेल ते सामान आणा. कोपर्योवरील मॉल मधुन मी खर्चाचे बघेन नंतर, सांगून ठेवलंय.”
महादेव,
“ बर साहेब.”
अमोघ सर्व फायली तयार करतो.
तोपर्यंत स्वाती व वरुण सगळा परिसर दोन दिवसांत फिरून येतात.
…. ….. ….. …..
दोन दिवसानंतर.
स्वप्नविला बंगला,
अमोघ,
“ महादेव काका, एवढ्या फायली म्याडमकडे द्या. त्यानां सांगा चार पाच दिवस सर जरा फॅमिली टूरवर असणार आहेत. तरी. या फायली नजरेसमोर घालून घ्या.”
महादेव,” बर साहेब.”
महादेव फायली. रजनीगंधा बंगल्यातील स्वप्नजेच्या ऑफिसात टेबलावर ठेवत.
महादेव,
“ मॅडम साहेबांनी ह्या फाईल दिल्यात. व सांगितले की ते फॅमिली टूरवर दोन दिवस असणार आहेत. तेव्हा या फायली बघून ठेवा.”
स्वप्नजा,
“ साहेबांना सांग मॅडम पण दोन दिवस महाबळेश्वरला जाणार आहेत. पण दोन दिवसांनी.”
स्वप्नजा त्या फाईली दोन दिवसात चेक करत असताना तिला एका फाईलमध्ये गडबडीत त्रुटी अढळते. अमोघ टूरवर असतो. ती त्याला फोन करते.
स्वप्नजा,
“ हॅलो, अमोघ सर का?”
अमोघ,
“ हो बोला की मॅडम. काय काम होत.”
स्वप्नजा,
“ मला मेंटनस फाईल मध्ये जरा चूक जाणवते. तो हिशेब व्यवस्थित नाही.”
इतक्यात रेंज प्रॉब्लेम संपर्क तुटतो ती पुन्हा कॉल करते. असे दोन तीन वेळा होते. शेवटी कनेक्ट होतो .
स्वाती चिडते. व फोन काढून घेते. सुट्टीला आलोय. अन् या कशाला डिस्टर्ब करतात. ती फोन घेते.
“ मॅडम साहेब सुट्टीवर आहेत. काम होतच असतात. काय वाटले तर क्लार्कशी बोलाना आम्हाला कशाला सुट्टीत त्रास देताय माणूस सुट्टी का घेतो. एवढं तरी समजत ना. तुमच्या जीवनात एन्जॉय नसेल पण आम्ही करतो.बर ठेवा आता गुड बाय.” ती फोन ठेवते.
अमोघ,
“स्वाती अस काय बोलतेस. तिला कस वाटेल. तुला काही काळत नाही. महत्त्वाचं असेल म्हणूनच केला असेल. थांब आण फोन.”
तो फोन लावतो पण संपर्क होत नाही.तो चिडतो.
“तुला कळत नाही. कुणाशी काय बोलायचं.”
स्वाती,
“ एवढं काय चिडतो रे. काय नाही म्हणणार त्या. तू का चिडतो? काय गुंतला की काय.”
अमोघ,
“ होय गुंतलोय.”
स्वाती,
“ काय खरंच अरेरे मला आधी तरी सांगायचं. तस मी पाहिलंय तिला जॉगिंग करताना सकाळी. मस्त आहे. आग इकडेच आहे की दोन्हीकडे.”
अमोघ,”
“इकडच आहे. तिकडे जरा धागे जुळवतोय तर कोण ना कोण तरी ते तोडते. तुझ्यासारखं.”
स्वाती,
“ मग एवढं वाटतं. तर तिला तिथे ठेऊन आमच्या बरोबर फिराय आलास. मूर्ख कुठला. तुला प्रेमातल काही कळत नाही बघ.”
अमोघ,
“ अरे होय माझ्या लक्षातच नाही आलं. “
स्वाती,
“ चला आता.”
…. ….. …..
स्वप्नजा इकडे क्लार्कला बोलावून फाईल नीट करून कामाची व्यवस्था लावते. व स्वतः ही सुट्टी घेते व ममहाबळेश्वला जायचं ठरवते.
रूम मध्ये छोटी बॅग भरत
स्वप्नजा,
“ तुळसा ये तुळसा.”
तुळसा,
“ काय मॅडम.”
स्वप्नजा,
“हे बघ मी दोन दिवसासाठी बाहेर जातेय. सर आले की सांगा. काय तस मी ऑफीसला निरोप ठेवलाय. बर निघते मी.”
तुळसा,
“ बर बर मॅडम.”
स्वप्नजा निघते.
…… …… …
अमोघ व स्वाती व वरुण ट्रिप वरुण येतात. अमोघ स्वप्नजेला भेटायला जातो. माफी मागण्यासाठी. तेव्हा तुळसा मॅडम सुट्टीला महाबळेश्वरला गेल्यात असं सांगते.
अमोघ, आपल्या बंगल्यावर येतो. व तिथे पुन्हा सामानाची आवराआवर करून आपली प्रवाशी बॅग भरतो.
अमोघ,
“ काका इथे बाईक भाड्याने मिळेल का?”
महादेव,
“ खाली पार्किंगला आहेत की. मालकांच्या मुलाच्या जा घेऊन.”
अमोघ,
“ बरं झाल.”
“ जरा बाहेर काढा. मला महाबळेश्वरला जायचंय.”
स्वाती,
“ काय आम्ही पण येतो.”
अमोघ,
“ तुम्ही इथेच रहा. मी जाणार आहे फक्त एकटाच.”
वरुण,
“ हे योग्य नाही हं आम्ही पण येणार.”
अमोघ,
“ तुम्ही घातलेला घोळ निस्तरतोय.”
स्वाती,
“ कसला घोळ.”
अमोघ,
“ कसला नाही. बाई.”
अमोघ गाडी घेतो व निघतो.
…. ….. …… …..
महाबळेश्वरला तो सगळीकडे शोधतो. सर्व हॉटेल बघतो. शेवटी तो खूप थकून सनसेट पॉइंट वर येतो. तिथे एका ठिकाणी ती कड्याच्या शेजारील ब्र्याकेट शेजारी उभा राहून सनसेट पहात असते.
अमोघ तिथे जातो. व शेजारी उभा राहतो .
अमोघ,
“ किती छान दृश्य आहे की नाही.”
स्वप्नजा,.” हो”
ती मन वळवते तिला अमोघ दिसतो. तो हसतो. ती आश्चर्यचकित होऊन.
स्वप्नजा,
“ कोण अमोघ, सॉरी, सर तुम्ही इथे कस काय.”
अमोघ,
“ का तुम्हीच फक्त हॉलिडे साजरा करू शकता. आम्ही पण जाऊ शकतो. . व सर का म्हणतेस.”
स्वप्नजा,
“ मग काय म्हणावं.”
अमोघ,
“अमोघ म्हण. मला बोलावलं असत तर मी पण आलो असतो. बर असुदेत. निसर्ग बघ किती छान वाटतोय. ह्या डोंगररांगा. किती सुरेख आहेत. व सुंदरतेन नटलेल्या. ”
स्वप्नजा,
“ काही काम होत का.”
अमोघ,
“ काम असेल तरच भेटायचं का.”
स्वप्नजा,
“ माफ करा हं मी तुम्हाला कॉल करून डिस्टर्ब केलं.”
अमोघ,
“ त्यात काय माफी मागण्याच.”
स्वप्नजा,
“ माझ्यामुळे तुमच्या ट्रीप ….”
अमोघ,
“ काही नाही. ती स्वाती तापटच आहे. तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. अल्लड आहे ती.”
स्वप्नजा,
“ तिचं काही चुकलं नाही. माझच चुकलं. मी असा फोन नको करायला हवा होता.”
अमोघ,
“ मी इथे यावर बोलायला आलो नाहीये.”
स्वप्नजा,
“ मग काय आहे काम.”
अमोघ,
“ तुझ्यासाठी आलोय. तुला मागणी घालायला.”
तो तिच्या समोर बसतो व आपल्या बॅग मधून एक गुलाब काढून तिच्या समोर धरत.
“ आय लव्ह यू.”
“ मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्याशी लग्न करशील का.?”
आजू बाजूचे पर्यटक त्यानां पाहात असतात. ते हसतात त्यातील एक.
“ बघताय काय मॅडम हो म्हणा की.”
स्वप्नजा,
“ हे काय चाललंय. लोक पाहतायत.उठा चला इथून.”
अमोघ,
“ मला होकार हवाय.”
स्वप्नजा,
“ मला थोडा वेळ दे विचार करायला.”
अमोघ,
“ ते काही नाही. खूप वाट पाहिली. तू आज होकार दे नाहीतर तू वाचिवलेल हे शरीर मी आज इथून उडी मारून संपवून टाकेन.”
स्वप्नजा,( अमोघचा हात धरते. व त्याला मागे खेचत.)
“ लोक, बघतायत.”
अमोघ,
“ पाहुदेत.”
स्वप्नजा,
“ थोडा वेळ द्या मी सांगतो.”
तो काही न ऐकता उडी माराय जातो. इतर लोक धरतात.”
स्वप्नजा,
“ फक्त दोन दिवसाची मुदत दे.”
अमोघ,
“ फक्त दोनच दिवस हा. नाहीतर तिसऱ्या दिवशीच पेपर तुला माझी… ….”
ती त्याच्या तोंडावर हात ठेवते. व त्याला ओढत घेऊन जाते.
….. …… …… …..
रजनीगंधा बंगला, रात्रीची वेळ स्वप्नजा आपल्या रूममध्ये झोपलेली आहे. तिला डोळ्यासमोर अमोघ व त्याच्या आठवणी दिसत आहेत. इतक्यात खिडकीचा दरवाजा वाजतो. दोन दाढीवाले इसम घुसतात. सावध व्हायच्या आतच स्वप्नजेच्या तोंडावर रुमाल ठेवला जातो. ती बेशुद्ध होते. तिला चादरीत लपेटून बाहेर लावलेल्या गाडीत टाकले जाते. गाडी निघते. तिच्या आवाजाने तुळसा नोकरानीस जाग येते. ती खिडकीतून पाहते. एक पांढरी गाडी जाताना तिच्या मागील नंबर प्लेट तिला डांबाच्या प्रकाशात दिसते. ती आपल्या नव्हर्यास जाऊन उठवते.
तुळसा,
“ अहो उठा, गाडीचा आवाज आलाय मला.”
महादेव,
“गेली असेल कुणाची तरी.”
तुळसा,
“ अहो रात्रीचे तिन वाजलेत.”
महादेव,
“ झोपू दे मला,”
तुळसा,
“ काय करायचं या माणसाला मलाच बघायला पाहिजे.”
ती उठून जाऊन पाहून येते.तिला दोन दाढीवाले इसम गाडीत काहीतरी ठेवताना दिसतात. ती सर्व खोल्या तपासते व पुन्हा आपल्या नव्हऱ्याजवळ येते.
तुळसा,
“ अहो उठा लवकर, मॅडम नाहीत रूममध्ये. व त्यांच्या रुमची खिडकी पण उघडी आहे.”
महादेव उठून ब्याट्री घेऊन पाहतो व लगेच फोन अमोघ सरांना करतो.
महादेव,
“ हॅलो, साहेब का.”
अमोघ उठून फोन घेतो.
अमोघ,
“ हा बोला,”
महादेव,
“ साहेब मॅडम आपल्या रूम मध्ये नाहीत सगळीकडे शोधलं.”
अमोघ,
“ काय थांब मी आलोच.”
अमोघ , स्वाती व वरुण तिथे येतात. सर्व तपासतात. स्वप्नजा नसते.
अमोघ,
“ ती असे न सांगता कधी जाणार नाही.”
तो वरील खोली चेक करतो. तेव्हा त्याला तिथे एक रुमाल दिसतो. तो हातात घेताच. तो इथ कोण आल होत का.”
तुळसा,
“ नाही साहेब.पण मी एक गाडी पाहिली दोन बापे दाढीवाले त्यात काहीतरी ठेवत होते.”
अमोघ,
“ हा रुमाल म्याडमचा आहे.”
तुळसा,
“ नाही साहेब, मला मॅडमच्या वस्तू ओळखतात. साहेब एक गाडी गेली बघा पांढ-या रंगाची मर्सिडीज होती.”
अमोघ खाली येतो. वाचमेनला फोन करतो. वाचमेन फोन उचलतो.
अमोघ,
“ हॅलो, वाचमेन.”
वाचमेन,
“ बोला साहेब.”
अमोघ,
“ पांढ-या रंगाची मर्सिडीज गेली का.”
वाचमेन,
“ नाही साहेब.”
अमोघ,
“ तू लगेच इथे ये रजनीगंधामध्ये.”
वाचमेन तिथे येतो.
अमोघ,
“ मेन गेट सोडून दुसरी वाट आहे का”
वाचमेन,
“ तशी नाही मागील गेट लॉक आहे. पण..”
अमोघ,
“ पण काय?”
वाचमेन,
“ पावसाळ्यात मागील अंगाची एक भिंत पडली होती. तिथून जाता येते मी तक्रार नोंदवून ही त्यावर काम झाल नाही साहेब.”
अमोघ,” चल बघू.”
ते जातात व पाहतात. त्याना टायरीचे ताजे निशाण दिसतात. अमोघ लगेच जाऊन गाडी काढतो. व वाचमेनला पोलिसांना फोन करून सांगाय सांगतो. व ते सर्व गाडीत बसून टायरीच्या मागाने जातात.
मेनरोडला गाडी येताना टायरीचा मग कुठे आहे तपासून तो त्या दिशेला गाडी वळवतो. थोड अंतर गेल्यावर त्यांना एक गाडी भेटते..
अमोघ,
“ तुम्हाला एक पांढरी मर्सिडीज दिसली का?”
ड्रायव्हर,
“ हो आताच पास झाली बघा. लई वेगात होती. महाबळेश्वर रोडला गेली”
अमोघ आपली गाडी वेगाने त्या दिशेला मारतो.
….. …… …… ……
स्वप्नजेला शुद्ध येऊ लागते. ती उठण्याचा प्रयत्न करते. तिचे हात पाय व तोंड बांधलेले असतात.इतक्यात एक दाढीवाला इसम तिला म्हणतो.
“ लई फडफडलीस तर इथच काम तम्माम करेन.”
ड्रायव्हर,
“ काय मॅडम सातारची हवा बरीच मानवलेली आहे.”
स्वप्नजा शांत पडून राहते. आता यांच्याशी भांडणे योग्य नाही.
थोड्याच वेळात गाडी एका फार्म हाऊसवर येते. तिला ओढत एका रूम मध्ये घेऊन जातात.
मॅनेजर,
“ काय मॅडम कस वाटतंय.”
मिश्रण अधिकारी,
“ आमच्याशी पंगा लई जड बघा.”
क्लार्क,
“ आमच्या पोटावर पाय आणतेस काय? लई मेमरी चालते तुझी. बघुया आता. दरीत मारून टाकल्यावर काय करतेस ते.”
मॅनेजर,
“ घरच्यांना हाडे पण मिळायची नाहीत.”
ते सगळे हसतात.
…. ….. ….. …
अमोघ गाडी चालवत विचार करतो. व फोन घेत. वरूणला गाडी चालवायला सांगतो. व आपण महादेव शिपायाकडून मॅनेजरचा फोन नंबर घेतो. त्याचे लोकेशन पाहतो. नंतर क्लार्क व मिश्रण अधिकारी यांचे फोन लोकेशन पाहतो. त्याला ते महाबळेश्वर पासून थोड्या अंतरावर ते लोकेशन दिसते. स्क्रीन फोटो द्वारे फोटो घेतो. व पोलिसांना पाठवतो व घटनेची कल्पना पाठवतो. वरुणला गाडी त्या दिशेला चालविण्यास सांगतो.
………… …. …. . ..
इकडे मॅनेजर सर्वांना,
“ अपापापले मोबाईल ऑफ करा.”
सगळे मोबाईल ऑफ करतात. अमोघ लोकेशन वरील तिन्ही मोबाईल नंबर दिसेनासे झाल्यावर.
अमोघ,
“ वरुण गाडी पळव. त्यांनी मोबाईल ऑफ केलेत. दुसरीकडे जायच्या आधी. चल.”
वरुण गाडी वेगाने पळवतो. थोड्याच वेळात सकाळ होऊ लागते. थोड्याच वेळात ते तिथे पोहोचतात. गाडी सुरक्षित अंतरावर लावून ते हळूहळू तेथे पोहोचतात. तिथे त्यांमध्ये जोरदार हाणामारी चालू होते. शेवटी स्वाती स्वप्नजेस सोडवते. इतक्यात पोलीस तिथे येतात. व गुंडांना पकडतात. या सर्व घडामोडीत अमोघ एका गुंडांशी सामना करत दरीकडे सरकून घसरतो. व खाली एका झाडावर अडकतो. त्याला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करू लागतात. स्वप्नजा साडीवर असते. ती आपली साडी फेडून देते. सर्व त्या साडीने अमोघला बाहेर काढतात. स्वाती स्वप्नजेस. आपल्याकडील कोट देते. तो ती घेते. अमोघ तिला साडी देतो. ती साडी घेऊन स्वप्नजा एका जाळीआडाला जाऊन परिधान करते.
अमोघ, शांत उभा असतो. स्वप्नजा त्या समोर येते.
स्वप्नजा,
“ मला तुझ्या जिवनात थोडी जागा मिळेल का?”
अमोघ हसतो. व तिला प्रेमाने मिठी मारतो.
समाप्त