शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Tuesday, September 20, 2022

वास्तव आणि प्रेम (भाग २)

 वास्तव व प्रेम

लेखक : निशिकांत हारुगले.

एम. ए. बी. एड.

क्रमशः पुढे चालू…

वास्तव आणि प्रेम (भाग २)

वृषालीसंगे भांडून रूमवर त्या येतात. व आपल्या रुमवरील बेडवर झोपतात.

विद्या,

“ ती काय बाई म्हणायची बाप्याच नव्ह. काय खरे कोण जाने.”

स्वप्नजा,

“ एवढे पैत्रे आजमावले बद्नाच. किती दमले बाई. माझ्या प्रत्येक उक्तीला ती उत्तर द्यायची. त्या त्रिकुटाला आता दाखवतेच.”

….. ….. …..

पुढील दिवस कॉलेज कट्ट्यावर अमोघ, संजय, व रोहित बसलेत त्यांपुढे रागाने स्वप्नजा जाते. तिच्या तोंडावर माराचे वण असतात.त्या तिघांकडे पहात.

स्वप्नजा,

“ आता पर्यंत झालं ते चेष्टेवर मी घालवलं. इथून पुढे माझ्या नादाला लागला तर तुमची नदीवरच लाकडं समजल काय. गोट इट.”

ती तेथून निघते. तिचा अवतार पाहून ते टरकतात.

तिसऱ्या सेमीस्टरची परीक्षा होते. व सुट्टी पडते.

…. …. ….. …….

पुढील लास्ट सेमीस्टर कॉलेज सहल काढायची ठरते.

कॉलेज प्राचार्य केबिन, रिंग वाजते शिपाई आत येतो.

प्राचार्य,

“ ही घे नोटीस बाहेरच्या नोटीस बोर्डवर लाव.”

शिपाई,

“ बर.”

( शिपाई नोटीस बोर्डवर ती नोटीस लावतो. सहल तोरणमाळला जाणार असल्याचे लिहिलेले असते. दीपावली सुट्टी नंतर डिसेंबर एंड व हिवाळी थंडी त्यात तोरणमाळ सहल जाणार असल्याने मुलांमध्ये कुजबुज असते.)

कॉलेजमध्ये

स्वप्नजा,

“ चला तर मग खूपच मज्जा असणार.”

सुचित्रा,

“ तिथे काही अगाऊपणा नको. उगीच भांडण काढायची नाहीत.”

स्वप्नजा,

“ ए बाई गप मी काय भांडण वगैरे करत नाही.”

क्रमशः

( सहलीचा दिवस उजाडतो. सकाळी आठ वाजता रेड भगव्या करड्या रंगाची बस कॉलेज मैदानावर हजर झाली.

घाटपांडे सर,

“चला सगळे जण पटापट.”

मुले बस मध्ये चढतात.

शिपाई हजेरी घेतो. व पुढे येऊन

“ घाटपांडे सर अजून अर्चित नाही आला.”

अमोघ,

“ तो काय, उड्या मारत येतोय का बघा.”

रोहित,

“ भजी आणायला गेला असेल फणसाला आवडतात ना ती.”

रत्नागिरीचा माधव डोळे मोठे करून बघत असतो.

संजय,

“ ये गप बसा रे नाहीतर अंगारा फुकेल तो.”

अमोघ,

“ मग काय होईल.”

रोहित,

“ काय होणार नागिनीसारखं डोलयच आणि काय करायचं.”

माधव,

“ ए रोहया गप बस नाहीतर बांगडा सोल्ल्या सारखं सोलिन.”

रोहित,

“ मग सोल ना थांबलास का.”

इतक्यात नाशिकचा अर्चित येतो तो पळत आल्याने धाप लागलेली असते.

घाटपांडे सर,

“ का रे एवढा उशीर.”

अर्चित, हातातील क्यान दाखवतो.

एक मुलगी,

“ झाल चांगभलं, बाळा आपण सहलीला चाललोय रॉकेल आणायला नाही.”

सुचित्रा,

“ अरे आधी बघा तो कसला क्यान आहे ते. पाण्याचा की रॉकेलचा. माझा या कांद्यावर विश्वास नाही ह. हा झोपायचा डाराडूर. व याचा कयान घालायचा सगळ्यांना अंघोळ.”

गर्दीतून एकजण,

“ अरे तो कंडेक्‌टर बघा मघापासून नुसता बिड्या फुकतोय.”

मधूजा,

“ होय नाहीतर काय हा टाकायचा काडी व आम्हाला दाखवायचा यमदेवाची गाडी.”

इतक्यात गर्दीतून एक,

“ शुभ बोल नाऱ्या.”

बस सुरू झाली व वेगवेगळी ठिकाणे पहात तोरणमाळ करून हतनूर प्रकल्प पहात ती सर्वजण नाशिक रोडला लागलीत. खुप प्रवास झाल्याने वाटेत एका नदिकाठी बस थांबवण्यास सर सांगतात. बस थांबते. मुले खाली उतरून नदीकाठी डेरा टाकतात. व अल्पोपहार करत असतात.

जवळील उसाच्या रानातून एका शेतकऱ्याने आणलेले बैल त्यातील एक बैल सुटून तिथे येतो.

सुचित्रा,

“ अग, कसला तरी आवाज येतोय.”

एक मुलगा,

“ अरे बैल सुटलाय पळा.”

बैल बिथरून मागे लागतो.मुले इकडे तिकडे पळतात सगळे साहित्य टाकून मुले धावू लागतात. शेवटी तो बैल अमोघ व स्वप्नजेच्या मागे लागला. स्वप्नजा आपल्या पायातील उंच श्यांडेल काढून टाकून पळू लागली. इतक्या वेगाने की अमोघला देखील मागे टाकले. शेवटी ती नदीच्या काठावर आलीत. बैल त्यांच्या मागे आला. तस अमोघ व स्वप्नजा नदीच्या पाण्यात शिरलीत. तसा तो बैल पण पाण्यात येऊ लागला. तस ती पाण्यात शिरू लागली. कंबर एवढ्या पाण्यात शिरलित. त्यांचे कपडे भिजलेत. तो बैल आणखी पुढे सरकताना पाहून स्वप्नजा अमोघला म्हणाली,

स्वप्नजा,

“ साहेब पोहायला येतंय ?”

(अमोघ मान हालवून नाही असे उत्तर देतो.)

स्वप्नजा,

“ मग तो बैलं थोड्या वेळाने ट्रेनिंग देईल.”

ती पोहत निघाली.तसा अमोघ पुढे सरकताना त्याचा पाय घसरला. व पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. पोहताना स्वप्नजाची नजर गेली. अमोघ बसतोय म्हंटल्यावर तिने तेला वाचवायला माग फिरली. व तिने पोहत जाऊन अमोघचे केस पकडले व त्याला किनाऱ्यावर घेऊन गेली. बैल जास्त पाणी पाहून भिजून मागे गेला. पलीकडे गेल्यावर स्वप्नजाने अमोघच्या पोटातील पाणी काढले व कृत्रिम श्वासोच्छवास देऊन त्याला वाचवले. थोड थांबून मग तिने पलीकडील मुलांना इशारा केला. व पुढील पुलावर येण्यास सांगितले. तस मुलांनी सर्व साहित्य गोळा करून ते पुलावर बस घेऊन आले. स्वप्नजा तोपर्यंत अमोघला घेऊन पुलावर आली. तिचे ॲक्टिव वागणे पाहून तो ओशाळला. वाटेतील झाडाची फळे घेत ती त्याला घेऊन तिथे आली. पुलावर आल्यावर स्वप्नजेने गाडीतून आपले कपडे घेतले. मधूजा व ती आडोशाला जाऊन कपडे बदलून आली. अमोघ ने सुद्धा आपले कपडे बदलले. क्यारीब्यागमध्ये ओले कपडे घालून ती गाडीत चढलित. व गाडी पुढे चालली.

  संजय स्वप्नजेकडे पहात,

“ ही बया असताना प्रवास एवढा सुखाचा व्हायचा नाही.”

अमोघ मात्र शांत असतो. पण त्याचे बोलणे ऐकून स्वप्नजा त्याला म्हणाली.

स्वप्नजा,

“ आता इतके दिवस काढलेस थोडे दिवस आणखीन काढ. मग मी तुला तोंडच दाखवत नाही. तू बघतो म्हणालास तरी बघायला मिळणार नाही.”

तिचे बोलणे ऐकून अमोघ मात्र शांत बसला होता. इतक्यात सुचित्रा बोलली

सुचित्रा,

“ काय अभ्यासातून जरा सुटका व मौज करावी म्हणून सहलीचा घाट घातला. तर हा बैलोबा मागे लागला . व कधी मी झाडावर न चढणारी झाडावर चढले.”.

स्वप्नजा,

“ अशा बारीक सारीक गोष्टीवरून अनुभव येतो.”

सुरेश,( मागील बाकावर विव्हळत)

“ पण या अनुभवात माझा पाय मुळगळला तेचं काय.”

मधूजा,

“ कॉलेजच्या क्रीडा महोत्सवात कधी उडी नाही मारलीस आज मात्र मस्त मारलीस हो.”

गर्दीतून एकजण,

पण काही का असेना स्वप्नजेन रनिंगच रेकॉर्ड तोडल काय जीव तोडून पळाली.”

सुचित्रा,

“ स्वप्ने हे घे तुझ श्यांडेल नवीन फॅशनचे झालेत.”

स्वप्नजा श्यांडेलकडे पाहत,

“ काय नकाशा झालाय याचा शोकेशच्या कपाटात ठेवण्यासारखा.”

रोहित,

“ मग ठेव जा की घरात पुढे नवरदेवाला आल्यावर दाखव मेडल तुझ.”

स्वप्नजा,

“ ठेवली असती रे मात्र आमच्या शोकेसमध्ये जागा नाही. तेव्हा तुझ्याच घरी ठेव जा की नेऊन.”

सगळे हसतात.

.... .... .....

 बस कॉलेज मैदानावर येते. सर्व मुले खाली उतरतात.

अमोघ स्वप्नजा जवळ येतो. व तिला विचारतो.

अमोघ,

 “ मी तुला तुझ्या रूमवर सोडतो. चालेल का?”

स्वप्नजा,

“ काही नको, माझं मी जाईन.”

स्वप्नजा व मधुजा आपली रजिस्टर मध्ये नोंद करून निघतात गेटच्या बाहेर येतात. व एक ऑटो बोलावतात. ऑटो येतो त्या बसून निघून जातात.

ऑटो मध्ये

मधूजा,

“ काय ग ही काय भानगड.”

स्वप्नजा,

“ काही भानगड नाहीये. मी बुडताना वाचवलं म्हणून औपचारिक मैत्री ठेवत असेल.”

मधूजा,

“ मग काय ठरवलंस या मैत्रीच्या प्रपोजलच.”

स्वप्नजा,

“ काय ठरवायचं त्यात रिजेक्ट आणखी काय. यांच्या नादाला लागल तर जन्माच खोबर व्हायचं आणखी काय.”

त्या रूमवर येतात. फ्रेश होतात. व बाहेरून जेवण मागवतात व जेवण करतात.

…. ….. . ….. ……

.दुसरा दिवस उजाडला आठ दिवस सुट्टी असल्याने

स्वप्नजा सकाळी उठून आवराआवर करत असते.

विद्या,

“ काय ग गावी निघालीस काय.”

स्वप्नजा,

“ हो.”

विद्या,

“ किती दिवस.”

स्वप्नजा,

“ फक्त आठवडा. सुट्टी आहे. ना.”

इकडे घरातील नवीकोरी बाईक दाखवून इंप्रेस करण्यासाठी तो फ्रेश होऊन बाहेर पडतो. व स्वप्नजेच्या रूमच्या बाहेरील रोडवर घिरट्या घालत असतो. स्वप्नजा गावी जाण्यासाठी साहित्य घेऊन बाहेर पडते. सिटी बस स्टॉप वर येते.

अमोघ तिच्या पुढ्यात गाडी घेऊन येतो. डोळ्यावरचा गॉगल काढत.

अमोघ,

“ कुणीकडे चाललीस.”

स्वप्नजा,

“ गावी चाललेय.”

अमोघ,

“ चल मी सोडतो तुला स्वारगेटला.”

स्वप्नजा,

“ नको त्याची काही आवश्यकता नाही.”

अमोघ,

“ हे बघ सिटी बसचे वेळापत्रक व्यवस्थित नसतं. मी सोडतो. मी तिकडेच निघालोय.”

स्वप्नजा,( मागून येणाऱ्या बसकडे पहात.)

“ बाकीच्यांसाठी नसेना का पण या अंबाबाईसाठी ती वेळेवर येणार.”

( स्वप्नजा बसमध्ये चढते. व बस निघून जाते. अमोघ तिच्याकडे पाहत राहतो.)

….. ….. …… …..

( सानेगुरुजी वसाहतीतील घरात ( कोल्हापूर) मध्ये डायनिंग टेबलवर जेवताना शैलजा स्वप्नजापुढे लग्नाचा विषय काढते.)

शैलजा,

“ स्वप्ने तुझ्या आत्तीने एक स्थळ आणलेले आहे. तुझ काय मत आहे त्याबद्दल.”

स्वप्नजा,

“ मी काही ठरवल नाही.”

शैलजा,

“ मग कधी ठरवणार.”

स्वप्नजा,

“ मला नोकरी करायची आहे. मग बघू.”

शैलजा,

“ हे बघ तुझी नोकरी तू सासरी गेल्यावर कर. तुझ लग्नाचं वय आहे. तरी माझ मत आहे की तू लवकर निर्णय योग्य वयात घ्यावा. नाहीतर एखाद चांगल स्थळ निघून जायचे. मग एखादा घोडनवरा बघायला लागायचा.”

स्वप्नजा,

“ आपल्या कॉलनीतल्या पाटील काकूंच्या मुलगीच झाल ना लग्न का राहील. तेव्हा ती चांगली तीस वर्षाची होती. माझ तर आता चोविसावे चालू आहे.”

शैलजा,

“ होय, ठरल ना पण त्या बयेच लग्न जमावताना पाटलिन बाईला घाम फुटण्याची वेळ आली. त्यांची परिस्थिती होती म्हणून त्यांनी खर्च केला. तसा तुझ्या बापास जमणार आहे का.”

स्वप्नजा,

“ हे बघ माझं एवढं शेवटचं सेमिस्टर होऊन जाऊ दे. मग बघू पुढचं पुढं. आता मला जेवू दे.”

शैलजा,

“ अग, एवढं सांगितले तर मुलगा बघून तरी जाऊ देत मग बघू पुढचं पुढं. पसंत पडला तर ठरवू नाहीतर देऊ सोडून.”

( तिचं बोलणं ऐकून ताडकन ताट आपटून स्वप्नजा रूममध्ये जाते.”

सुधाकर,

“ हे बघ तुला पण कळत नाही. केव्हा नी कुठला विषय काढायचा ते.”

शैलजा,

“ मला सगळ कळत. केव्हा काय बोलायचं ते. जेवण व नाष्टा सोडला तर बयेचा घरात पाय आहे का? नुसती ह्या मैत्रिणीला भेट. इकडे जा अंन तिकडे जा या शिवाय दुसरा कोणता उद्योग आहे. तिला काय बियाणे करायला ठेवायचं आहे का. मुलीच लग्न वेळेत झालेलं बर नाहीतर.”

सुधाकर,

“ नाहीतर काय?”

शैलजा,

“ मग बसा बाप लेकी सन्यासी होऊन देवळात. त्यामानाने रवीची प्रगती चांगली आहे बघा गॅरेज मस्त चाललंय. व पैसे सुध्दा मस्त मिळतात. काही दिवसात बघा त्याची प्रगती. त्याला चिडवते चेंडू कुरतडत बस म्हणे? अन् ही काय करणार आहे.”

सुधाकर,असतात.त्य

“ अजून तिचं शिक्षण चालू आहे. तिला ही चांगली नोकरी मिळेल. ती ही पैसा कमवेल.”

शैलजा,

“ आमच्या शाळेतील जगदाळे बाईंचा मुलगा पण एम. बी. ए. . एकपण पैसा देत नाही. उलट त्यांना बघत देखील नाही. काल तर पाटीलबाई म्हणत होत्या की त्यांन लग्न केलाय म्हणे.”

सुधाकर,

“ आपली स्वप्नजा तशी नाही.”

शैलजा,

“ हे बघा ती कशी आहे हे मला चांगल माहीत आहे. पण वयात आलेली मुलगी ही काचेच्या भांड्यासारखी असते. केव्हा तडा जाईल हे सांगता येत नाही. मी तिने मला काही मिळवून द्यावे म्हणून नाही तिचं लग्न वेळेवर झालेलं बर. असं मला वाटत. ती रागाने गेलीय ना मग भूक लागल्यावर येईल जेवायला. तिला जेवण नेऊन द्यायचं नाही. नाहीतर मी माहेरी जाईन चार दिवस मग बसा भाकऱ्या बडवत.”

सुधाकर,

“ चालेल आता आहे लेक जेवण करायला. खुशाल जा तू माहेरी.”

शैलजा,

“ मी का जाऊ.तुम्हाला मोकळ रान मिळल की, बसता नाटक करत.”

 दुपार होते. स्वप्नजा जेवत नाही म्हणून शैलजाची घालमेल चालू होती. शेवटी पाणी पिण्यासाठी ती खाली आली. व जेवण खोलीत गेली. व मठातील पाणी घेताना तिचे लक्ष शेगडीवरल्या बुट्टिकडे गेलं. तिथे जाऊन तिन ती उघडली. व त्यातील जेवण घेणार इतक्यात शैलजा आली.

तिला भरभर खाताना पाहून शैलजा,

“ अग हळू खा की. बस इथे मी वाढते. “

स्वप्नजाचे डोळे पाणावले होते. तिच्या जवळ बसत. तिचे डोळे शैलजा पुसते.

“ मी का शत्रू आहे का तुझी, तुझ्या काळजीनं झोप लागत नाही एक एकदा. चल जेव आता.”

स्वप्नजा,

“ तू जेवलीस.”

शैलजा,

“ जेवन मी. नंतर.”

स्वप्नजा,

“ चल दोघी जेवू.”

त्या दोघीजनी जेवतात.

. . …… ….. …… …..

स्वप्नजा कॉलेज मध्ये दाखल होते. ती व मधुजा कॉलेज जिन्यावरून जाताना अमोघ समोरून येतो

अमोघ,

“ कधी आलीस.”

स्वप्नजा,

“ कालच.”

 त्या वरती जाऊ लागतात. वाटेत मैत्रिणी,

“ ही काय भानगड आहे.”

स्वप्नजा,

“ भानगड नाही ग. त्या दिवशी नदीत बुडताना वाचवले तेव्हा पासून तो अशी सारखी चौकशी करतो.”

मधूजा,

“ म्हणजे तह झाला वाटत. दोघात. मग याला नदीचा तह म्हणायचं की सहलीचा.”

स्वप्नजा,

“ उगाच काहीपण बोलू नको.”

त्या हसत क्लासरूमकडे जातात.

…. ….. …. …..

स्वप्नजाशी बोलण संजय व रोहितला खटकत. ते अमोघला

रोहित,

“ तू बरा आहेस ना.”

अमोघ,

“ का काय झालं.”

संजय,

“ काय झाल काय? त्या स्वप्नजाशी का बोललास? आम्हाला आवडल नाही.”

अमोघ,

“ त्यात काय?”

रोहित,

“ तीनं सतावलेल विसरलास काय.”

अमोघ,

“ हो, पण सूरवात आपण केली होती ना?”

संजय,

“मग काय झाल.”

अमोघ,

“ मला तिचा स्वभाव आवडला. तिने मला बुडताना वाचवल. आज हा जो मी जिवंत तो फक्त तिच्यामुळे नाहीतर केव्हाच राम नाम सत्य झाल असत.”

रोहित,

“ मग काय गुलाम होतोस काय. तिचा.”

अमोघ,

“ होय होणार.”

संजय,

“ अरे रोह्या हे वेड झालय वाटत तिच्या नादात.”

अमोघ,

“ होय झालोय. वेडा.”

….. …… …… ……

दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना ती रूमवरून बाहेर पडते. वाटेत. बस स्टॉपवर अमोघ येतो.

तिला गुलाब देऊ करतो.

ती तो नाकारते.

असं रोज तो करू लागतो. एक दिवस ती एका बागेत बसलेली असताना अमोघ तिथे येऊन तिला गुलाब व प्रेमसंदेशाचे पत्र घेऊन तिच्या पुढे येतो.

अमोघ,

“ स्वप्नजा आई लव्ह यू.”

स्वप्नजा अचानक त्याच्या कृतीन भांबावलेल्या

स्वप्नजा,

“ हे काय करतोयस तू. मला अवघडल्यासारखे वाटत. तू हे असं रॅगिंग माझ्यावर करू नकोस. मी वाटल तर तुझी क्षमा मागते.”

अमोघ,

“ खरोखर मी तुझ्यावर प्रेम करतो. काय माहित पण त्या प्रसंगानंतर माझं मलाच समजेना झालंय. मला तुझ्या विषयी काहीतरी अनामिक ओढ निर्माण झालेय. खरोखरच माझे तुझ्यावर प्रेम आहे.”

स्वप्नजा,

“ हे बघ तू खूप श्रीमंत घरातील मुलगा व मी सर्वसामान्य कुटुंबातील तुझ्यासाठी प्रेम मुली या एक सर्वसामान्य वस्तू आहेत. पण माझं तस नाही. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्यामुळे तू काय माझ्याशी असा खेळ खेळू नकोस. मला माफ कर. मी तुला कधीही त्रास देणार नाही.”

अमोघ,

“ मी सिरीयस आहे. माझ्या मनात त्या प्रसगानंतर एक अनामिक ओढ निर्माण झाली आहे. व खरोखरच माझं प्रेम आहे. व तू असा अनादर करू नकोस.”

स्वप्नजा,.” तुझ्या मनात काय चाललय ते मला नाही माहित. पण मला वाटत. की हे इथच थांबावं. माझा व तुझा मार्ग वेगळा आहे. तो एक कसा होईल. तुझ्या घरातील वातावरण व माझ्या घरातील वातावरण यात खूप अंतर आहे. त्यामुळे तू इथेच थांब. तुझ्यासाठी ही डिग्री म्हणजे शोकेसला फ्रेम करून टांगायची एक वस्तू असेल. पण मी यात माझे करियर पाहते. तेव्हा मी असल्या झमेल्यात पडणार नाही.”

अमोघ,

“ तू समजतेस तस नाहीये. माझ्या घरातील सगळे माझं ऐकतील. तू फक्त हो म्हण.”

स्वप्नजा,

“ हे बघ माझा नकार आहे. तुम्ही मोठ्या बापाची मूल तुम्हाला सगळच आयत पाहिजे. पैसा अडका आयता मिळालेला मला नाही अडकायच. रोज एक पार्टी. तुमचे नाना शोक मला नाही आवडणार. व तस ही मी तुझ्याकडे त्या नजरेनं कधी बघितलं नाही. माझा स्पष्ट नकार आहे.”.

अमोघ,

“ मी तो होकारात बदलेन.”

स्वप्नजा,

“ मी हृदयापासून विचार करत नाही. मेंटली माझे निर्णय असतात..चल बाय मी निघते.”

स्वप्नजा आपली पर्स व इतर साहित्य घेऊन निघते. अमोघ अपसेट होतो. तो तिथून कॉलेजवर जातो. तिथे त्याच्ये मित्र जाताना रोहित,

“ आले देवदास, कुठून या पारोच्या प्रेमात पडले. काय ठेवलंय तिच्यात देव जाणे.”

संजय,

“ प्रेम आंधळ असत अस ऐकले आज प्रत्यक्ष अनुभव घेतला.”

रोहित,

“ हे बघ तिच्या सारख्या छप्पन येतील. काय हाय तिच्यात एवढं.”

अमोघ,

“ रोह्या, व संजा तुम्ही कधी प्रेमात पडलाय का? मी पडलोय. ती फिलिंग अनुभवतोय समजल काय. त्यामुळे जास्त शहाणपण नको. व ती चांगलीच आहे. पण ती कशी माझी होईल याचाच विचार करतोय.”

संजय,

“ मग कर पी एच डी. आमचं काय जातंय. पण तुझ्या घरचे तरी स्वीकारतील का? ते बघ.”

अमोघ,

 “ ते पाहीन माझ मी.”

अमोघ रोज काही ना काही करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तो कधी बुके, कधी गुलाब कधी एखादे गिफ्ट पाठवून देत असे. ती ते रीजेक्ट करी. असे करत एखदाशी लास्ट एक्झाम आली. पेपर चालू झाले. पण अमोघच्या घरी. अचानक वादळ उठले. त्यांच्या कारखान्यात बराच व्यवहारात घोळ चालू झाला व दोन चार फ्याक्ट्री बंद करायची पाळी आली. त्या टेन्शन मध्ये त्यांचे बाबा होते. त्याने पेपर दिले. अचानक त्याच्या वडिलांना अट्याक आला त्यांना दवाखान्यात अडमीट केलं गेलं.

हॉस्पिटल मध्ये त्याचे बाबा बेडवर आहेत. त्याची आई शेजारी रडत आहे अमोघ बाहेर संजय व रोहित बरोबर एका ठिकाणी मौज करत असताना त्याला फोन येतो.

फोन वाजतो.

पलीकडून आई रडत असते.

अमोघ,

“ काय झाल. “

अमोघची आई,

“ तुझ्या बाबांना अटॅक आलाय. त्यांना हॉस्पीटल मध्ये अडमिट केलय लवकर ये.”

अमोघ,

“ काय, मी आलोच.”

अमोघ मित्रांना,

“ रोहित संजय निघतो मी बाबांना कसतरी होतेय त्याना हॉस्पीटल मध्ये अडमिट केलय. मला निघायला हवं.”

अमोघ आपली बाईक घेतो व निघतो.

…. …… …..

हॉस्पिटलमध्ये अमोघचे बाबा बेडवर आहेत. डॉक्टर व नर्स तपासत आहेत.

अमोघ,

“ काय झालंय बाबांना.”

आई,

“ त्यांना घरात चक्कर आली. तेव्हा इथे आणल. डॉक्टर म्हणतात त्यांना धक्का बसलाय.”

तिथे त्यांच्या कंपनीतला विश्वासू नोकर मॅनेजर रघुनाथ काका असतात.

थोड्या वेळानं डॉक्टर तिथे येतात. ते त्याना सांगतात.

“ काही काळजी नसावी धोका टळला. पण इथून पुढे त्याना जपायला हवं.”

अमोघ रघुनाथ काकांना विचारतो.

अमोघ,

“ एवढं टेन्शन येण्यासारखं काय घडलंय.”

रघुनाथ काका,

“ तुझ्या पासून बऱ्याच गोष्टी लपवल्यात बाळ आपली पुण्याच्या व नाशिकच्या कारखान्यात अफरा तफर झालिये. त्यामुळे ते कारखाने दिवाळखोरीत गेलेत. व कामगारांचे पगारही दिले गेले नाहीत. व अचानक कामगारांचा संप चालू झाला. त्यामुळे. आणखी तोटा झाला. देनेकर्यानी पिच्छा लावलाय. त्यामुळे त्याना अट्याक आला. आता तुला इथून पुढे लक्ष घालाय हवं. बेळगावचा कारखाना तुझ्या काकांकडे आहे. त्यांनी पण मदत करायच टाळलेय. तुमचा प्रॉब्लेम तूम्ही सोडवा अस ते म्हणतात.”

अमोघ,

“ ठीक आहे. मी उद्याच येईन ऑफिसमध्ये. आता जरा बाबांना बर वाटू देत .”

अमोघ आत जातो. त्याला पहात वडील नाराज असतात.त्यांचा हातात हात घेऊन तो

अमोघ,

“ सगळ व्यवस्थित होईल. मी करेन आपली कंपनी पुन्हा फॉर्मात आणेन.”

त्याचे मित्र ही तेवढ्यात तिथे आलेले असतात ते ही काकांना म्हणतात

“ काका आम्ही मदत करू. काही काळजी नसावी.”

….. ….. ……

दुसऱ्या दिवशी अमोघ ऑफिसमध्ये केबिनमध्ये बसून तो टेबलवरील बेल वाजवतो. शिपाई आत येतो.

अमोघ,

“सबनिसांना बोलवा.”

शिपाई जातो. सबनीस जवळ जात

शिपाई,

“ साहेबांनी बोलावलंय.”

सबनीस आत जातात.

अमोघ,

“ फायनान्सच्या सर्व फाईल्स आणा.”

सबनीस जातात व फाईल्स घेऊन येतात.

अमोघ दिवसभर फाईल्स ओपन करून बघतो. संगणकावर ऑडिट तपासतो. त्यातील अफरातफर बघून तसेच कामगारांचा हलगर्जीपणा त्याच्या लक्षात येतो. तो त्यावर काही नियम बनवतो. त्याला कंपनी आवारात फिरताना तसेच ऑफिस स्टाफ कामकाज सोडून गप्पा मारताना दिसतो. त्यावर विचार मंथन करून तो कडक नियम करून तो दुसऱ्या दिवशी जातीन स्टाफला व कामगारांना बोलवतो.

कारखान्याच्या बाहेर ग्राऊंडवर कामगार व स्टाफ उभा आहे. त्यापुढे नियमावली तो वाचून दाखवतो.

• विनाकारण रजा कोणालाही मिळणार नाही. रजेच कारण योग्य वाटले नाही. तर पगार कपात होईल.

• प्रत्येक कामगाराने ठरून दिलेलं टार्गेट पूर्ण के्याशिवाय त्यास पगार नाही मिळणार.

• ओव्हर टाईम करणाऱ्यांना जादा वेतन.

• इथून पुढे ऑफिस हे कंपनी कारखान्यात असेल. कामचुकार करणाऱ्यांना कामावरून कपात केलं जाईल.

• कारखान्याची आर्थिक परिस्थतीमुळे तीन महिने पगारात थोडी कपात होईल. जर तुम्ही काम चांगले केलं व फायदा झाला तर दिवाळी बोनस डब्बल दिला जाईल.

• कंपनीचे नुकसान करणारे. व आर्थिक नुकसान करणाऱ्यांना इथून पुढे कामावरून कमी तसेच त्यावर गुन्हा दाखल केला जाईल.

अशा प्रकारे नियम लावून त्याची अम्मल बजावणी त्याने सुरू केली. व थोड्याच दिवसात कंपनी पुन्हा फॉर्मात आणली.

त्याचे बाबा एकदिवस कंपनीत आले.

ऑफीसमध्ये बसत.

अमोघ,

“ तिथे कुठे बसताय या खुर्चीवर बसा. ही तुमची आहे.

बाबा,

“ नाही बाळ आता ती जागा तुझीच आहे. तू या सगळ्याचा आता ओनर आहेस. आजपासून सर्व अथॉरिटी मी तुला देतोय.रसातळाला गेलेली कंपनी तुझ्यामुळे आता नावारूपाला आलेय. आता आपल्या विलासराव काकांच्या सातारच्या कारखान्यात जरा लक्ष घाल. त्याचा फोन आला होता. तुझ काम व तुझ्या कंपनीतल्या सुधारणा परवा आल्यावर त्यांनी पहिल्या तू तेव्हा मीटिंगला मुंबईला गेला होतास. त्यांनी तुला पाठवायला सांगितलय. त्या कंपनीतल्या हजारो कुटुंबासाठी तू त्यात लक्ष घालावे अस मला वाटते. व त्यांचे आपल्यावर बरेच उपकार आहेत. ही कंपनी त्यांच्याच मदतीने मी सुरू केली . तेव्हा तू लक्ष घाल.. ”

अमोघ,

" हे, काय सांगायला हवं का बाबा, मी जाईन थोड इथल काम  या दोन चार दिवसात सुरळीत लावतो. अन् मग जातो तिकडे."

इतक्यात शिपाई नाष्टा घेऊन येतो. ते नाष्टा करतात.

…. ….. ….. …..

पेपर संपले, लास्ट पेपरच्या वेळी मुले बाहेर पडली.

अमोघ पेपर सुटल्यावर स्वप्नजेस एकदा पाहिले. इतक्यात त्याला फोन आला. व तो निघून गेला. पेपर झाल्यावर स्वप्नजा आपल्या गावी निघाली. तिने सर्व साहित्य पॅकिंग केलं. व तिने आपल्या मैत्रिणींचा निरोप घेतला. व घरमालकाला त्याचे राहिलेले पैसे देऊन. ती स्वारगेटला गेली. व कोल्हापूरला जाणारी बस तिने पकडली. व निघून गेली.

…. …. …. …. ….

कोल्हापूर मधील घरात जेवण हॉल मध्ये डायनिंग टेबलवर ती व तिचे आई बाप छान चहा घेत आहेत.

शैलजा,

“ आता शिक्षण झाल. पुढे काय”

स्वप्नजा,

“ काहीतरी काम पहायचं.”

शैलजा,

“ आत्तीने आणलेल्या स्थळाचं काय.”

स्वप्नजा,

“ मला पसंत नाही. तो फावडा.”

शैलजा,

“ तुला कुठला राजकुमार हवाय. चांगला नोकरदार आहे तो. जरा डाव उजव असायचच.”

स्वप्नजा,

“ काय ग सारखं लग्न लग्न करतेस. अजून काय एवढी वयस्कर नाही झालेय मी. माझं मी बघेन तू नको काळजी करुस.”

सुधाकर,

“ हे बघ थोड दिवस थांब.”

शैलजा,

“ आणखी किती थांबायचं. चांगलं स्थळ आलेय. हीच काही वेगळच चाललय. कुणी भामट्या आणून उभा करायची दारात. मला चालणार नाही.”

सुधाकर,

“ माझा विश्वास आहे तुझ्यावर. चांगलीच निवड करेल ती.”

शैलजा,

“ आमच्या शाळेतील मगदूम मॅडम सुद्धा असच सांगत होत्या. त्यांची मुलगी गेली पळून कुणा मारवाड्याला घेऊन.”

सुधाकर,

“ दुसऱ्यांच्या मुलासंगे आपल्या मुलांची तुलना करू नकोस”

स्वप्नजा आत आपल्या रूममध्ये रागाने जाते.

रूममध्ये स्वप्नजा आपल्या मनाशी गप्पा मारत.

“ ही तर पाठीच लागलेय. या आधी अशी वागत नव्हती. अस कस झालं. त्या अमोघचा विचार केला असता पण तो श्रीमंत आपल्यालाच पुढे मांजरीसारखे राहायला लागेल त्याच्याकडे. तसा तो वाईट नव्हता.”

इतक्यात वडील सुधाकर ताट घेऊन येतात.

सुधाकर,

“ अग तिझी बदली झाली. तिथे आलेल्या बाई आहेत ना त्या हिला काहितरी चीचवतात. व ही इथे येऊन भडास काढते. तू काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी काम बघितलय. आपल्या मोहन काकांच्या पाव्हण्याने त्याच्या बेळगावकडील कंपनीत तुझे कागदपत्र काल पाठीवलेत. काळजी करू नकोस. व आपण एखादा चांगला मुलगा पाहू.”

 स्वप्नजा, हसते. व वडील सुधाकर यांना बिलगते.

…. ….. …..

मोहन काका व तिचे बाबांबरोबर ती एका कॅबने जाताना

मोहन काका,

“ हे बघा कंपनी चांगली आहे.पण सध्या मंदीच्या दौर मधुन जाते. व त्यांकडील फायनान्स विभागात जागा रिक्त आहे. म्हणून तुला मिळतेय. तेव्हा लगेच जास्त पगाराची अपेक्षा करू नकोस.”

स्वप्नजा,

“ अनुभव मिळाला तरी पुष्कळ आहे काका. चालेल मला. त्या पेक्षा त्या लग्नाच्या कटकटीतून तरी सुटले.”

मोहनकाका,

“ तस म्हणू नकोस. आम्ही पाहतो एखादा चांगला मुलगा तुझ्या लेवलचा. कारण तुझ्या आईच काही चुकत नाही. तिला काळजी वाटते. व आजकाल मुले ही बघतेस ना आई वडिलांना विचारत नाहीत. नवीन काय ते लिव्ह इन आलेय. त्यामुळे आपण संस्कृती जपणारे जरा काळजी घेतोच. तेव्हा तू काही स्ट्राँग आहेस म्हणा. आईचं बोलण ही मनावर घे.”

सुधाकर,

“ आम्ही समजूत काढून तिला पटवले. तू मात्र आपल्या कामावर फोकस कर.”

…….. …… ….

गाडी कंपनी बाहेर थांबते. वेटींग रुममध्ये ते थांबतात. स्वप्नजा कंपनी ऑफिस मध्ये जाते.

स्थळ बेळगाव कंपनी ऑफिस

कंपनी मे व्यवस्थापक,

“ आपली कागजपत्र पाहिली. व आपले प्रोजेक्ट विषयी, आम्ही तुम्हाला जॉईन करून घेतो. पण आपल्या योग्यतेप्रमाणे आपल्याला मानधन देता येणार नाही. सध्या कंपनी मंदीच्या दौर मधून जातेय. तरी तुम्हाला आमच्या अटी मान्य असतील तर बघा जॉईन करायचं की नाही.”

स्वप्नजा,

“ काही हरकत नाही. मला माहितेय. मला सगळी कल्पना आहे. मला एक संधी देताय. मी नवीन असून यातच सगळ आलं.”

व्यवस्थापक,

“ आपल्या राहण्याची व्यवस्था कंपनी कॉटरमध्ये होईल.”

स्वप्नजा,

“ ठीक आहे. मला मान्य आहे.मग मी केव्हा जॉईन होऊ.”

व्यवस्थापक,

“ आजच जॉईन होऊ शकता.”

 स्वप्नजा,

“ मी फक्त मुलाखतीस आले होते. राहण्याच्या तयारीने नाही. तरी मी दोन दिवसात जॉईन करेन.”

व्यवस्थापक,

“ ठीक आहे चालेल. मग तुमची एंट्री डेट पर्वाची टाकतो.

स्वप्नजा,

“ बर येते मी.”

… …. …. …

स्वप्न जॉईन करते. व फायनान्स विभागातील त्रुटी शोधते. तसेच त्यात काही बदल शोधून सुचवते. त्या प्रमाणे तिथे व्यवस्थापन राबवले जाते. थोड्याच दिवसात कंपनी नावारूपाला आली.

कंपनीचा ऑफिसमध्ये

व्यवस्थापक,

“ अभिनंदन मॅडम, तुम्ही आमच्यासाठी लकी आहात. तुमच्या कर्तबगारीने आज आपली कंपनी फॉर्मात आली आहे.”

स्वप्नजा,

“ थ्यांक्स. पण हे सगळ कामगार व इतर स्टाफच्या कामामुळे झालं.”

व्यवस्थापक,

“ स्टाफ काय पहिल्यापासून होताच. पण तुमचं नियोजन इतकं चांगल. त्यात तुमची जिद्द व चिकाटी पाहता आमचे मालक खुश आहेत. व आपला पगार व इतर सवलती तुम्हाला द्यायचं ठरवल आहे त्यांनी.”

स्वप्नजा,

“ इतर कामगारांचं ही बघा म्हणावं. कारण त्यांचे ही कौशल्य आहे. व ते खुश असतील तर आणखिन काहीतरी मोठ आपण करू शकू.”

व्यवस्थापक,

“ हो , खरंय तुमचं. मालकास पटलंय तुमचं. त्यांनी कामगारांना वेतनवाढ द्यायचं ठरवलय. लवकरच ते अमलात येईल. पण..”

स्वप्नजा,

“ पण काय.”

व्यवस्थापक,

“ काही नाही, तुमच्या बाबत एक निर्णय घेतलाय. पण तुमचे मत आदी घेऊन ठरवायचे आहे.”

स्वप्नजा,

 “ काय आहे ते.”

व्यवस्थापक,

“ काय आहे त्याच, आमची एक कंपनी आहे. जी साताऱ्याला आहे. तिथं ही असाच प्राब्लेम आहे. की तिथला फायनान्स प्रॉब्लेम झालाय. तो देखील स्वाल्व झाला. तर तुम्हाला तिथल्या मेन व्यवस्थापक म्हणून आम्ही निवडायचं ठरवलय. पण तुमचे मत जाणून. घ्यायच आहे. तुम्ही इथे काम करणार की तिथे ते तुम्हीच ठरवा. कंपनी या बाबत तुम्हाला पूर्ण मोकळीक देते. यासाठी पुण्याचा एक मालकांचाच नातेवाईक येणार आहे म्हणे. पण तुम्ही तिथे जाव अस मालकाला वाटत. कारण तुम्ही एक होतकरू व प्रामाणिक आहात. व तुम्ही एक नेतृत्व करू शकता.”

स्वप्नजा,

“ तुम्हाला काय वाटत.”

व्यवस्थापक,

“ माझं मत घ्यायचं म्हटल तर तू तिथे जावस. कारण ती तुझ्यासाठी एक नामी संधी आहे. तू ती सोडू नकोस. मी त्या ठिकाणी या पूर्वी काम केलय. तेव्हा तू काय ते ठरव.”

स्वप्नजा,

“ चालेल सर. मी तयार आहे. तिथले आव्हान स्वीकारलं. मला तिकडील जोईनिग लेटर द्या.”

व्यवस्थापक,

“ नक्कीच, तू ते यशस्वी करशील. चालेल मी मग तस कळवतो साहेबांना.”

 … …. …. …

दोन दिवसानंतर जोईनिंग करायचे असल्याने स्वप्नजा गावी कोल्हापूरला जाते.

घरी रूम मध्ये साहित्य भरत असताना आई तिथे येते. तिच्या हातात घरी बनवलेल्या खाऊच्या बरण्या असतात.

त्या दोघीमध्ये अबोला आहे.

शैलजा,

(हातातील बरण्या ठेवत)

“ थोड लोणचं व लाडू आहेत. ते घे व्यवस्थित. “

स्वप्नजा,

“ कशाला उगाच त्रास घेतेस. काही गरज नव्हती. मी घेतलं असत विकत.”

शैलजा,

“ हो, तर आता पैसेवाली झालीस ना. मग आमच्या हातचं गोड कस लागेल.”

स्वप्नजा,

“ तस नाही. घरी तुला सगळ एकटीला करावं लागत. व शिवाय शाळा आहे . इतर काम.”

शैलजा,

“ अजून राग धरून दाढेत बसलीस तर….”

स्वप्नजा,

“ नाही तस नाही.”

शैलजा,

“ काल रात्री एवढं तुझ्या अवडीच केलं. धड जेवली नाहीस आल्यापासून धड बोलत नाहीस. काय एवढं मी पाप केले. ते असं वागतेस. मी शत्रू असल्यासारखं.”

स्वप्नजा,

“ हे बघ मी काही तुझ्यावर राग धरून नाही. मला काळजी आहे की माझ्या लग्नाची. पण त्यासाठी कुणालाही मी धोंडा म्हणून गळ्यात मारून घेणार नाही. समजल. व अशी रडवेली होऊ नकोस. मला रुखरुख लागेल. तुझी. व कितीही झाल तरी मी तुला विसरणार नाही. कारण तुझी व बाबांची जागा माझ्या र्हद्यात कोणीही घेऊ शकणार नाही.”

 व ती आईला बिलगली. व तिने बनवलेलं सार काही बॅगेत भरून ती निघाली. थोड्या वेळात तिच्या बाबांनी एक रिक्षा मागवली.

रिक्षा दारात उभी राहिली. ती आपले सर्व साहित्य त्यात ठेवते. तिचा भाऊ ही असतो. त्याला भेटते.

स्वप्नजा,

“ आई बाबांची काळजी घे. मी येते.”

….. …… …… …….

सातारा येथील कंपनी हाऊस. तेथील मॅनेजर अशोक तेथील कर्मचाऱ्यांना बोलवतो.

मॅनेजर अशोक,

“ हे पहा आपल्या कंपनीत आज नवीन म्याडम येणार आहेत. तसेच दोन दिवसांनी मालकांचे पुतणे ही येणार आहेत. तरी जरा जपून सगळ. मालकाला आपली शंका आली आहे. तरी मला वाटतं आपल्यातच कोणतरी हेर आहे. आपल्या भेसळीचा सुगावा कसा लागला कोणास ठावूक.

क्लार्क मनोज राऊत,

“ तरी साहेब मी सांगत होतो. अमन साहेबांना की चाळीस टक्के भेसळ बस. पण त्यांनी हावं करुन ती वाढवली. व त्यामुळे तक्रारी आल्या गाडीच्या,”

अमन साहेब,

“ तुम्ही जसे यात नसल्या सारखं बोलू नका. तो घाटातील अपघात झाला नसता तर. आज ही वेळ आली नसती.”

क्लार्क मनोज,

“ चूकही करणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही गप्प केलय साहेब . पण आणखी पैसे मागतोय तो.”

मॅनेजर,

“ मग त्याच्या तोंडावर मारा ते पैसे. व गप्प बसवा तेला.”

क्लार्क मनोज,

“ पण हे येणार कोड कसं सोडवायच.”

मॅनेजर,

“ ते सर्व माझ्यावर सोडा. मॅडमना एवढं खुश करूया . की आपलच राज्य चाललं पाहिजे. तरी सर्व व्यवस्थित करा. आता थोड दिवस आपल्याला कोणतीही लाप्रवाही करून चालणार नाही. कारण मालकाचा पुतण्याही येतोय. तेव्हा तर फार अवघड. आपली चूक त्याच्या लक्षात आली तर मग आपली खैर नाही. तो कुठला इथे राहतोय. पुण्यात वाढलेला तो. जाईल एकदोन महिन्यात. मग या बाईचं बघू. लागली सरळ ठीक नाहीतर.”

क्लार्क,

“ नाहीतर मग आपण तिला फ्रोड मध्ये फसवायचे कस.”

सगळे हसतात.

…….

मॅनेजर,

“ जा रे त्या मालकाच्या पालतू कुत्र्यास बोलावं.”

क्लार्क,

“ कोण महादू.”

मॅनेजर,

“ मग आणखी कोण.”

महादुस( महादेव) निरोप पोहोचतो तो तिथे येतो.

महादेव

बोला साहेब.”

मॅनेजर,

“ नवीन मॅडम येत आहेत. कंपनी चे व्यवस्था पण करायला तेव्हा त्यांची राहण्याची सोय.”

महादेव,

“ आपला रजनीगंधा बंगला आहे की रिकामा.”

मॅनेजर,

बर चालेल. तिथे सगळी व्यवस्था नीट कर. व दोन दिवसांत मालकांचे पुतनेही येतील त्यांसाठी पूर्वेच्या बाजूच्या स्वप्नविला बंगलीत त्यांची रहाणेची सोय करायची आहे. ते जरा शिस्तीचे वाटतात तेव्हा तू तिकडचं सगळ बघ. व तिथे. तुळसाला सांग दोन्ही कडील जेवण विभाग बघायला.”

महादेव,

“ हो चालेल की. मी सांगतो तिला.”

इतक्यात फोन वाजतो

मॅनेजर अशोक फोन उचलतो.

“हॅलो, मी आपली नवीन व्यवस्थापिका स्वप्नजा बोलते.”

मॅनेजर अशोक,

“ हो मॅडम बोला मी कंपनीचा मॅनेजर बोलतोय.”

स्वप्नजा,

“ मी आताच साताऱ्यात पोहोचले आहे.बस स्टॉपवर आहे.तुम्ही गाडी पाठवणार होता ना.”

मॅनेजर,

“ थोड्याच वेळात पोहोचेल तिथे मॅडम. काही काळजी नसावी. पण आपण कोठे थांबलात.”

स्वप्नजा,

“ मी फलाट नंबर पाचवर आहे. व गुलाबी पंजाबी ड्रेस घातलाय.”

मॅनेजर,

“ लगेच पोहोचेल. मॅडम”

स्वप्नजा,

“ बर, ठीक आहे.”

मॅनेजर अशोक,

“ महादू ड्रायव्हरला बोलावं,”

ड्रायव्हर येतो.

मॅनेजर,

 “ हे बघ गणेश मॅडम आल्यात त्याना सी टी एस टी स्टॉप वरून घेऊन यायच्यय. त्या फलाट नंबर पाच वर आहेत. व त्यांनी गुलाबी ड्रेस घातलाय. त्यांची रहाणेची सोय आपल्या रजनीगंधा बंगलीत केली आहे तरी त्याना आणायला जा.”

थोड्याच वेळात ड्रायव्हर जातो. व स्वप्नजेला घेऊन येतो. ते सरळ रजनीगंधा बंगलीत

कार मधून स्वप्नजा उतरते. महादू तिथे असतो तो साहित्य आत नेतो.

महादेव,

 “ नमस्कार मॅडम.”

स्वप्नजा,

“ नमस्कार,”

ड्रायव्हर,

“ महादू मॅडमचे लगेज आत मध्ये घेऊन जा.”

महादेव,

“ बर.”

ड्रायव्हर,

“ मॅडमची व्यवस्था लावून जेवणाच तुळसेला सांग.”

महादेव,

“ काळजीच करू नका. अशी बडदास्त ठेवताव की मॅडम आमच्या साताऱ्याच्या प्रेमातच पडतील.”

स्वप्नजा,

“ बर, आता चल साहित्य आत घे. मग बघू बडदास्तीच.”

महादेव  साहित्य आत घेतो.

क्रमशः पुढे ....

No comments:

Post a Comment

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...