शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Tuesday, November 14, 2023

कळत नकळत जुळलेले बंध भाग ३

 

कळत नकळत जुळलेले बंध भाग ३
क्रमशः पुढे चालू....

चार दिवसांनी….

कालेजला जाताना….

Day. Schools road. Morning. Outer

कॉलेज रोड.

अण्विकाच्या हातास ब्यांडेज गुंडाळलेली आहे. आण्विकाचे दफ्तर वेदांगीच्या हातात आहे. ईशान कॉलेज रोडवरील एका कॉर्नरवर उभा आहे. मान खाली घालून तो तिरकस नजर टाकून तिला वेळोवेळी पहात आहे. व त्यामागून चालत आहे.

थोड्या वेळाने एका झाडाखाली आल्यावर तो जवळ जातो.

ईशान, माफ करा मला, मला माहित नव्हत, चुकून बॉल लागला. त्याबद्दल सॉरी.

त्याला पाहून वेदांगी, माफी मागितली म्हणजे झाली का? एवढं कळत नाही. कॉलेज रोडवर किती रहदारी असते ते.

ईशान, खरंच सॉरी प्लिज माफ करा मला.

संयोगिता, त्याच्याकडे पहात तोंडावर बोट ठेवून गप्प रहा असे सांगते.

त्या पुढे निघून जातात.

…. ….. ….. ….

Day. ईशानच्या घरी evening inter

ईशान घरातील खिडकीत नाराज बसलेला आहे

आतून ईशानची आई, ईशान चल लवकर नाष्टा करून घे.

त्याच लक्ष नसत.

त्याचे बाबा सोफासेटवर बसलेले असतात. ते त्याला शांत पाहून जवळ येतात.

बाबा, काय झालं रे, असा शांत शांत का?खेळायला का गेला नाहीस.

ईशान, काय नाही.

बाबा, हे बघ काहीतरी आहे. जे तू लपवतो आहेस. कारण तुला अस शांत बसलेलं मी पाहिलं नाही कधी. व चेहरा कधी खोटं बोलत नाही. सांग काय झालं ते.

ईशान, चार दिवसा पूर्वी खेळताना मी बॉल मारला व तो एका मुलीला लागला.

वडील, काही लागलं तर नाही ना.

ईशान, त्या मुलीचा तोल गेला. व लागलं ही. मला खूप वाईट वाटत. तिच्या हाताला ब्यांडेज गुंडाळलेले बघून. बिचारी खूप रडत होती.

बाबा, आता कशी आहे ती. तिच्या घरी जावून विचारपूस करायला हवी.

ईशान, आता कॉलेजला येतेय.

बाबा, म्हणजे घाबरण्यासारख काही नाही.

ईशान, पण तिचं औषध पाणी तरी मी करायला हवं.

बाबा, एवढंच ना, अता अस कर. एक माफीपत्र लिही. व मिठाई व खर्चाचे पैसे दे तिला.

ईशान, बर..

…… ……. ……. …

ईशान आपल्या खोलीत जातो. टेबलजवळ बसून त्यावर पत्र लिहू लागतो.

प्रिय…

…. ….. ……

Next Day morning. स संयोगीताच्या घरी

ईशान संयोगिताच्या दारात उभा आहे. त्याच्या हातात एक चॉकलेट बॉक्स व एक लेटर व छोटासा लिफाफा असतो. तो बेल वाजवतो.

संयोगीता दार उघडते. ईशानला पाहून

संयोगिता, कोण ईशान. ये की रे आत.

ईशान, नको राहू दे, फक्त माझं एक काम होत.

संयोगिता, काय रे काय काम होत एवढं.

ईशान, एवढं अन्विकास दे, व सॉरी सांग.

त्याच्या हातात पत्र असते. व त्याखाली चॉकलेटचा एक बॉक्स असतो व त्याखाली एक पत्र

संयोगिता, हे काय आहे.

ईशान, माफीनामा,

संयोगिता, आण इकडे देते मी.

संयोगिता, अरे , आत तरी ये. चहा घेऊन जा.

ईशान, नाही नको, मी चहा घेत नाही.

संयोगिता, अरे , दूध तरी घे.

ईशान, नाही, नको झालंय माझं चहा पाणी.

संयोगिता, मला माहित आहे. ये गप.

तो आत जातो. विचार करत इकडे तिकडे पाहत

त्याच्या मनात नुसता अन्विकाचा विचार घोळत असतो.

संयोगिता चहा आणून देते.

संयोगिता, काय रे, माफी पत्रच आहे ना, की आणखी काही.

ईशान, काय हे तू पण चेष्टा करू लागली का,

संयोगिता, तरी पण मला वाटत त्यापेक्षा तूच दे,

ईशान,, नाही नको, ती वेदू लई वांड आहे.

संयोगीता, चेष्टा केली रे, देते मी.

ईशान चहा घेतो.

ईशान उठत कपबशी ठेवत,

ईशान, निघतो मी, तेवढं आठवणीन दे,

संयोगिता, देते रे मी .

ईशान निघतो.

संयोगिता घराचा दरवाजा लावते.

Cut to

…… ….. ….. …… …… …..

Day. Afternoon. आण्विकाच्या घरी.

संयोगिता अण्विकाच्या घरी जाते. अंगणात अण्विकाची आई वाळवणं उनात घालत असते.

संयोगीता, ( गेट उगडून आत येत)

काकू अनू आहे.

आण्विकाची आई, आहे की वरती गॅलरीत बसलेय.

संयोगिता घरात जाते. व जिन्यावरून वर जात,

अनु ये अनु (हाक देत)

संयोगीताचा आवाज ऐकून

आण्विका, (खाली जिन्यातून पहात)

कोण संयु, ये ना वरती.

ती वर येते.

आण्विका, काय ग.

संयोगीता, (हाताकडे पहात त्याच स्ट्यापिंग काढलेलं असत.)

स्ट्यापिंग काढलं.

आण्विका, हो ,

संयोगिता, कधी काढलं.

अण्विका, कालच संध्याकाळी काढलं.

संयोगिता, आता बर आहे ना, दुखत वगैरे नाही ना.

आण्विका, थोडा थोडा दुखतोय. एक्सर साईज केली की होईल ठीक.

गोळ्या औषधे दिलेत आणखीन.

संयोगिता, बर थांब मी तुला कायतरी द्यायला आलेय.

आण्विका, काय ग,

संयोगिता, चॉकलेट बॉक्स व ते पत्र व त्याखाली असणारे पाकीट देते.

आण्विका, काय ग काय हे.

संयोगिता, बघ तर, मला पण माहीत नाही, उघड तरी बघू.

आण्विका, हे काय तूच आणलस व तुलाच माहीत नाही, कायतरी काय.

संयोगिता, अग बघ तर, मला पण सगळं माहीत नाही.

आण्विका ते पत्र घेते व वाचू लागते.

प्रिय अन्वीकास,

               सप्रेम नमस्कार,

मी आपणा समोर दोन तीन वेळा माफी मागण्यास येण्याचा प्रयत्न केला.आपण कोणताही प्रतिसाद दिला नाही. माझ्यामुळे आपणास अपघात झाला. त्या बद्दल सॉरी. चुकून बॉल लागला. त्याबद्दल हे माफी पत्र मी देत आहे. व तुमच्या नुकसानीची भरपाईही देत आहे. खालील पाकिटात ५००० रुपये आहेत. ते आपण स्वीकार करावेत ही नम्र विनंती.

आपला नम्र

ईशान

आण्विका, पत्र वाचल्यावर खालील पाकीट खोलून पहाते. त्यात पैसे असतात. त्याखालील बॉक्स पण उघडुन पहाते. त्यामधे चॉकलेट असतात. तिला राग आलेला असतो. पण हसुन संयोगिताकडे पाहत

आण्विका, तू पोस्टमन केव्हा पासून झालीस.

संयोगिता, मी काय केलं.

आण्विका, हे काय आहे.

संयोगिता, अग, त्याला तुझी माफी मागायची होती. एवढंच.

आण्विका, ही अशी, पैसे देवून, स्वतला काय समजतो हा, या पैशाने मी सहन केलेल्या वेदना काही कमी होणार नाहीत

संयोगिता, मग काय करायला हवे त्याने.

आण्विका, काय म्हणजे, मला तर खूप राग आलाय त्याचा.

संयोगिता, मग कॉलर धर व चार लगाव त्याला. मग तर शांत होशील.

आण्विका, तुझ्याशी बोलायलाच नको, मीच बघते आता त्याला.

…… …… …… ………

Next day. Morning. School ground

ईशान फुटबॉल घेऊन ग्राऊंडवर त्यास पायात खेळवत असतो. त्याची प्रॅक्टिस चाललेली असते. इतक्यात अण्विका तिथे येते.

ईशान तिला पाहून फुटबॉल खेळणे थांबवत.

अण्विका, काय रे तू स्वतःला काय समजतोस.

ईशान, का काय झालं.

आण्विका, हे पैसे पाठवून श्रीमंतीची मिजास दाखवतोस का?

ईशान, तस काही नाही. तुझा गैरसमज होतोय. तुझा हात दुखावला. माझ्यामुळे म्हणून त्याची भरपाई.

अण्विका, बरा आलाय भरपाई देणारा. मला झालेला त्रास व त्याची वेदना भरून देणार आहेस का? युजलेस, हे घे तुझे पैसे.

ती ते पैसे त्याच्या अंगावर फेकते.

Cut to…..

आण्विकेस जाग आली. किणी टोलनाका पार झाला होता. बस वेगाने धावत होती. तिने ईशानला पाहिले. तो अत्यंत सुंदर भासत होता. ती पुन्हा आठवणीत हरवली.

….. ……. …… …..

Happy New year

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कॉलेज मध्ये अकरावीच्या क्लास मध्ये सर्व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.

आण्विका, सर्वांना शुभेच्छा देते. मात्र ईशानला शुभेच्छा देत नाही.

Cut to…..

मकर संक्रांती दिवशी अण्विकाने कॉलेज मधील आपल्या बऱ्याच मित्र मैत्रीणीना भेटकार्ड दिली तिळगुळ देत आहे.

आण्विका, ए अलका हे घे तिळगुळ घे गोड बोल,

अलका, तुला ही शुभेछा,

अण्विका, ए समीर हे घे तिळगुळ , तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

समीर हे घे माझं पण.

अशी बरीच भेटकार्ड व तिळगुळ वाटत. ती ईशान उभा असलेल्या गृपजवळ येते. ईशानच्या सर्व मित्रांना ती देते मात्र ईशानला देत नाही.

ईशान नाराज होतो. बाकी सगळे पहात असतात.व हसतात.

...... ....... ....... ....... ........

Next day. तालिम. Morning

मुले व्यायामशाळेत व्यायाम करत असतात.

श्रीकांत, (इतर मुलांना) काल तुला भेटकार्ड मिळाले का?

मोहन, मिळाले की. तुला,

श्रीकांत, मला पण दिले. फक्त एका मुलाला मिळाले नाही बघ,

मोहन, कुणाला रे,

श्रीकांत नजरेने इशारा करतो.

मोहन, असत एखाद्याच फुटक नशीब. काय करणार. त्याला कोण भाव देतय. मला तर हे लवलेटर सारख वाटतयं.

श्रीकांत एकेकाच्या नशिबात लवलेटर सोड साधं अंतरदेशी पत्र पण नाही बघ, अशांना फक्त एकाच दिवशी भाव मिळतो.

मोहन, कोणत्या रे,

श्रीकांत, रक्षाबंधनाला, राख्या बांधायला.

व्यायाम करणारा ईशान ते बोल ऐकूण चिडतो. तो

ईशान, शिरक्या , मोहन्या जास्त शहाणपणा करायचा नाही, कुणाला चिडवताय हे कळत नाही का मला,.

मोहन, तुला काय झालं चिडायला इथं आमचं दोघांचं बोलण चाललय ना.

ईशान, हे बघ अजूनही सांगतोय. गप्प बस.

नाहीतर,

श्रीकांत, नाहीतर काय करशील रे,

ईशान, माती चारीन तालमीतली.

मोहन, थोबाड बघ आधी तूच माती खाल्यासारख झालंय.

ईशान, मोहन्या

मोहन, ये जा तुला दाखवीन अस्मान,

ईशान, बघूच कोण कोणाला दाखवतय ते.

ईशान त्या दोघांशी हातापाई करतो. व दोघांनाही तालमीत लोळवतो.

ते दोघे कुठं याया बोललो व तालमीतील माती खायची पाळी आली

Cut. To…

Next day.

किराणा दुकानातून काही सिधा विकत घेऊन येणाऱ्या संयोगीताला वाटेत थांबवून…

ईशान, ये…. संयोगीता,

संयोगीता, हा बोल ईशान, काय रे..

ईशान, एक सांगायचं होत.

संयोगीता, बोल की,

ईशान, नाही तुझ्या मैत्रिणीकडे पैसे जास्त झालेत का?

संयोगीता, कुणाकडे काय झालं,

ईशान, आणखी कोण, ती अण्विका,

संयोगीता, तिन आता काय केलं.

ईशान, नाही हल्ली ती जास्त भेटकार्ड वाटतेय.

संयोगीता, त्यात काय एवढं, नवीन वर्ष अन् मकर संक्रातील तर सगळेच वाटतात.

ईशान, पण मैत्रीणीना वाटायचे सोडून मुलांना कशाला वाटायची.

संयोगीता, अरे अस काय नसतं त्यात, ग्रीटिंग कार्ड, तर सारेच वाटतात.

ईशान, पण सगळीच पोर ईशान सारखी नसतात, साधा सरळ अर्थ काढणारी.

फक्त सावध कर.

संयोगिता, बर सांगते. अरे हो तुला भेटकार्ड द्यायचेच राहिले.

ईशान, नको मला.

संयोगीता, नको कसं, येवढे चांगले विचार असणाऱ्या नवयुवकास भेटकार्ड मिळायलाच हवे. ते फक्त डायरेक्ट नाही भेटत, इंडायरेक्त भेटल एवढच.

संयोगीता, त्याला एक भेटकार्ड व तिळगुळ आपल्या पर्स मधून देते.

तो निघतो.

संयोगीता, (मनात) खरंच अनुसाठी असाच चांगला जोडीदार मिळाला तर बर होईल, पण हा काय आता होऊ शकत नाही.

Cut to…

….. …… ……

Morning. १० o ‘clock outer in bus. कराड शहर.

बस कराड शहरात येते, अनेक दुकानांच्या पाट्या जात असतात. कराड स्ट्यांड वर येते, बस येण्याजाण्याची वर्दी चालू असते. बाजूला लोक कुजबुजत असतात.

बसमध्ये अण्विकास जाग आली, ती हसू लागली. ईशान जागा होतोय याची जाणीव होताच तीने डोळे बंद केले. व झोपण्याच नाटक करू लागली.

 इतक्यात इशान जागा होतो.

खिडकीतून बाहेर पाहिले. कराड बस स्थानक लिहिलेली पाटी त्याला दिसली. त्याचे लक्ष अण्विकाकडे गेले. तो तिला एकटक पाहू लागला,

ईशान, (मनात) खरंच खूपच सुंदर आहे ही. चापेकळी नाकाची, गहुवरणी रंगाची, खरंच हिला पाहताच मला एक वेगळी ओढ जाणवते. पण काय करू.

इतक्यात कंडक्टर व ड्राइव्हर येतात. बस सातारच्या दिशेने निघते.

इतक्यात त्याला फुटबॉल मारलेला प्रसंग आठवतो. , ती पडलेली, तो माफी मागतानाचा, तिने इतरांना ग्रीटिंग कार्ड देताना त्याच्याकडे तिरकस चिडून पाहतानाचा प्रसंग त्याला आठवतो.

शाळेच्या व्हरांड्यात अन्विका भेटकार्ड वाटताना

आण्विका, सुशांत

सुशांत, काय अनु, अण्विका, हे घे, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

सुशांत ग्रीटिंग घेऊन दंगा करताना व सगळ्यांना ग्रीटिंग दिले पण आपणास दिले नाही याचा त्याला राग आलेला आठवतो.

तो स्वप्नातून बाहेर येतो.

ईशान, (मनात) पण आपल्यामुळे तिला त्रास झाला. महिनाभर तिचा हात दुखत होता. वर्गातील ती तासाला काही ना लिहिता बसलेली आठवलं व तो दुःखी झाला.

 पण तिला आता जवळ बसलेली पाहून तो स्थिरावला.

ईशान , ( मनात ) खरोखर अत्यंत सुंदर व सद्गुणी आहे ही. माझ्या मुळेच दुखावली गेली ही.

इतक्यात अण्विका उठली, तिने आपले लक्ष नाही असे दाखवले. तिने इकडे तिकडे पाहिले.

ईशान, काय झोप झाली का?

आण्विका, बसमध्ये कुठली लागते झोप. कराड गेले का?

ईशान, हो आता सातारा येईल, थोड्या वेळाने.

आण्विका, किती लांब असेल तरी.

ईशान, अ…..वीस किलोमीटर असेल

आण्विका, सातारला बस थांबेल ना थोडावेळ.

ईशान, थांबेल की. का?

आण्विका, काही नाही फ्रेश होता येईल.

ईशान , हो.

Cut. to…..

….. …… …….. …….

Day. Morning. सातारा बसस्थानकात

एस टी येऊन फलाटला लागते.

कंडक्टर, बस पंधरा मिनिटे साताऱ्याला थांबणार आहे. कुणाला काही खायला प्यायला घ्यायचे असेल तर घेऊ शकता.

आण्विका, माझ्या ब्यागकडे लक्ष देतोस. मी जरा फ्रेश होऊन येते.

ईशान, हो (मान हलवत)

आण्विका खाली उतरून फ्रेश होऊन येते. येताना पॉपकॉर्न व भडंग व काही खायला घेऊन येते.

बसमध्ये आल्यावर,

ईशान, मी पण आलोच.

ईशान फ्रेश होऊन तो काही वडे व पाव घेऊन येतो

बसमध्ये आल्यावर ते आपापला नष्टा शेअर करतात.

आण्विका, हे घे.

ईशान, तो तिने दिलेले पॉपकॉर्न घेतो.

ईशान, अरे थांब, मी पण आणलाय, हे घे गरमागरम वडे.

ते दोघे नाष्टा करत असतात.

कंडक्टर येतो बेल वाजवतो.

कंडक्टर, आले का रे सगळे.

ड्रायव्हर बस चालू करतो. बस पुण्याच्या दिशेने रवाना होते.

….. …… ……. …..

बसमध्ये

ईशान, तुला माझा खूप राग येतो ना?

आण्विका, नाही का?

ईशान, त्या फुटबॉल प्रकरणानंतर .

आण्विका, ते होय, तस सांगायच तर तेव्हा होता. आता कशाला तो विचार. झालं,.. गेलं ते भूतकाळात.

ईशान, ते काय मी जाणून बुजून केलं नव्हत. चुकून बॉल लागला होता.

आण्विका, हो, ते अचानक घडल होत.

ईशान, मग तेव्हा का एवढ्या रागावला होता.

आण्विका, हो ते खर आहे. की अचानक घडले होते. पण त्यावेळी तू मला मदत करायची सोडून तेथून पळून गेलास. व जवळजवळ सहा महिने तो हात मला तेव्हापासून दमवत होता.

ईशान, त्यावेळी मी काय करणार , त्या वेदांगीने ताडकन माझ्या कानशिलात लगावली. मला काही सूचेनाच. व पब्लिक पण जाम जमली. व तुला माहिताय कोल्हापूरकर म्हणजे रट्टे द्यायला कसे पुढे असतात. व मदतीला ही. म्हणून मी पळालो.

नाहीतर माझं काही खर नव्हतं.

आण्विका, कारणे सांगायला मस्त जमतात तुला.

ईशान, नाही खरंच.

आण्विका, लबाडच आहेस.

ईशान, तू पण काही कमी नाहीस. तोर्यातच पैशाचं पाकीट माझ्या तोंडावर फेकलस.

आण्विका, फेकू नाहीतर काय करू. माझी अवस्था काय झाली. मला पेपर सुद्धा परीक्षेचा धड लिहिता नाही आला. वर तू पैशाची मिजास दाखवत होतास.

ईशान, अग पैसे द्यायला मला बाबांनी सांगितले होते. कारण माझ्यामुळे तुझ्या बाबांना आर्थिक भुर्दंड पडला होता.

आण्विका, हो, ते तर आहेच.

ईशान, तू पण काही कमी नाहीस. सर्वांना संक्रातीची ग्रीटिंग वाटलीस पण मला साधं तिळगुळ सुद्धा दिले नाहीस.

आण्विका, मी दिलं होत.

ईशान, छे नाही दिलं.

आण्विका, संयोगिता ने दिलं होत की.

ईशान, हो संयोगितान दिलं, पणं तू का नाही दिलस.

आण्विका, ये त्यावरील अक्षर तरी बघितलस का, कुणाच ते.

ईशान, मला कस समजणार तू दिलं की संयोगितान . व तुला द्यायला काय झालं होत.

आण्विका, हुशारच आहेस, मला तुझ्यामुळे एवढा त्रास झाला. ते सर्व विसरून मी तुला शुभेच्छा द्यायच्या. हे तर हास्यास्पद आहे.

आण्विका, व येवढं बोलतोयस तुझ्या वाढदिवसाला आणलेल्या लेमनच्या गोळ्या सगळ्या वर्गाला दिल्यास मला दिल्यास का.

ती मधुरा मला दाखवून चगळत होती. व चिडवत होती. माझ्या खूप आवडीच्या होत्या.

ईशान, नाही ग, मी नाही वाटल्या, त्या सुरेशने घेतल्या होत्या वाटायला. वर्गात सर्वांना वाटतो म्हणून, पण तुलाच काय आठ दहा मुलांना चुकवला व अर्धी पिशवी स्वतः घेऊन गेला घरला आपल्या. खादाड बोका. व मी पुन्हा चॉकलेट्स वाटल्या. त्या नंतर.

आण्विका, त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या पण नाहीत.

ईशान, संयोगिताकडे दिल्या होत्या की.

आण्विका, त्या पारले.किस्मी

ईशान, हो तिने दिल्या नाहीत.

आण्विका, हो दिली की एक.

ईशान, एक का मी चांगल्या दहा बारा दिल्या होत्या. तिन सांगितल नाही तुला.

आण्विका, कशी सांगणार म्हणा, शेवटी तुझीच कड घेणारी. रक्षाबंधनचा भाऊ ना तिचा.

ईशान, मग बहिण आहे ती माझी, व तुझ्या बाजूने लढणारी कमी आहेत का, ती वेदांगी.

आण्विका, ती काय शांत स्वभावाची, ती काय करते.गरीब बिचारी.

ईशान, ती गरीब, ठोसा भारी लागवते की, तिचा तो ठोसा अजूनही आठवतो की मला, दाडवान हलवल माझं.

हे एकताच ती हसू लागली.

….. ….. ….. …… …..

बस खंबाटकी बोगदा पार करते. ईशान बाहेर पाहतो.

ईशान, कात्रज येणार लवकरच.

त्या दोघांना एकत्र बोलताना पाहून शेजारील आजी, तुम्ही दोघ नवरा बायको आहात काय.

आण्विका, नाही हो, अजून आमचं लग्न नाही झाल अजून.

आजी, (हळू आवाजात स्वतः शी) लग्ना अगोदर एकत्र कसे काय फिरू देतात घरचे, देव जाणे, कलियुग बाई ग घोर कलियुग आलंया.

आजीच बोलणं अन्विकास ऐकु जातं.

आण्विका, अहो आजी आम्ही मित्र आहोत. खूप दिवसांनी भेटलोय म्हणून गप्पा मरतोय एवढंच. दुसर भलत सलत काही नाही.

आजी, तुमचं आपलं तरण्या पोरांचं बर हाय बाई. अगोदर घरच्यांना मित्र म्हणून ओळख करून द्यायची. अन् नंतर घरच्यांच्या डोळ्यावर पांघरून घालून पळून जायचं. अन् लग्न करायचं.

ते ऐकूण आण्विका काही बोलणार इतक्यात तिला ईशान शांत राहण्यास सांगतो.

ईशान, शांत हो जाऊ दे तो विषय.

आण्विका, अरे बघ ना ती काय पण बोलतेय.

ईशान, जाऊ दे ग सगळ.

इकडे आजी आपल्या नातवाला केळ खायला घालते.

थोड्याच वेळात आज्जी एका स्टॉपवर ती अन् तिचा नातू बसमधून उतरतात.

आण्विका धीरगंभीर झाली. तिचा चेहरा पाहून..

ईशान, आजीच्या बोलण्याचा राग आला का?

आण्विका, राग नाही, पण जरा वेगळच वाटल. आपण जास्ती क्लोज बोलतोय का? असं वाटू लागलंय.

ईशान, ये वेडाबाई लई विचार करू नकोस त्याचा.

आजीच्या प्रवासा बरोबर तो विचार पण विरून जाईल वार्यावर.

ईशान, ते सोड, हे घे. ( आपल्या कडील शेंगदाणे व फुटाणे असलेली पुडी समोर करत.)

आण्विका, (त्यातील थोडे शेंगदाणे घेतले. व मनात विचार करू लागली)

खरंच मी जास्त बोलते का? मी याच्याशी अत्यंत क्लोज झाले का.

….. …… …………..

Afternoon. That day..

बस स्वारगेट स्थानकावर दाखल झाली.

बसमध्ये फेरीवाले फिरून माल विकू लागले.

आण्विका, ओ भाऊ,इकडे या.

फेरीवाला, बोला मॅडम काय देवू.

आण्विका, काय आहे. विकायला.

फेरीवाला, चने आहेत, फुटाणे आहेत, पॉपकॉर्न, शेंगदाणे, भडंग केळीचीप्स , फरसाण व आलेपाकवडी आहे मॅडम काय घेणार.

 दोन पॉपकॉर्न, व काही चने द्या. व आलेपाक वडी सुद्धा.

फेरीवाला, ( साहित्य देत)

मॅडम आलेपाक वड्या किती देवू.

आण्विका, दे चार पाच.

तो देतो. आण्विका पैसे पर्स उघडून काढत असते. इतक्यात ईशान पैसे देतो.

आण्विका, हे काय देते की मी थांब.

ईशान, गप ग. सारख थोडच भेटतोय आपण.

थोड्या वेळात बस निघते. पुणे मुंबई रोडला लागते.

पुढील टणल पार करते.

आण्विका अचानक हसू लागते.

ईशान, काय झालं एवढं हसायला.

आण्विका, काही नाही मला एक प्रसंग आठवला.

ईशान, कोणता .

आण्विका, काही नाही रे, बाजारातला.

ईशान, सांग की कोणता तो.

आण्विका, तू घेतलेला दुधी भोपळा.

ईशान हसू लागतो.

ईशान, खरंच तुम्ही मुली एक कोडच आहात. एखाद्या नवशिक्याची वाट लावालं.

फ्लॅश बॅक….

कोल्हापूर. रविवार. बाजारपेठ afternoon

रोडच्या कडेला वेदांगी आण्विकाची वाट बघत असते. इतक्यात आण्विका तिथे आपल्या स्कुटीवरून येते.

वेदांगी, काय ग किती वाट बघायची. इतका वेळ, बाजार उठायची वेळ झाली.

आण्विका, गप्प ग, चल जाऊ. बाजार काय पळून जातोय थोडा.

वेदांगी, तो जावो न जावो मला घरी खूप काम आहे. चल लवकर आटप.

आण्विका, आज सुट्टी तर आहे.

वेदांगी, तस नाही ग आई बारशाला जाणार आहे. घरातील सर्व कामे मलाच करावी लागणार आहेत.

आण्विका, बर चल लवकर आटपू.

त्या बाजारात भाजीचा दर भाव विचारत पुढे जातात.

काही बाजारातील माळव पण घेतात.

त्याच वेळी. …..

ईशान बाजारात आलेला असतो. घरच्यांनी त्याला बाजार करायला सांगितलेलं असत. त्याचा तो प्रथमच बाजारचा प्रसंग होता. त्याला काय घ्यावे काय नको हे सुचत नव्हते.

ईशान, घरच्यांनी बाजार करायला सांगितलेय. काय घ्यायचं कस घ्यायचं काहीच सांगितलं नाही. आता काय करू…

इतक्यात त्याला आण्विका व वेदांगी दिसते.

त्यांना पाहून

ईशान, ( मनात) या बाजार कसा करतात तसच करूया. म्हणजे झालं.

तो त्या जिथे भाजी घेतात तिथेच तो देखील भाजी घेवू लागतो.

त्या भाजी घेत चौकशी करत जात असतात.

टोमॅटो वाल्याला पाहून

वेदांगी, ओ, भाऊ, टोमॅटो कसे दिले.

टोमॅटोवाला, पन्नास रुपये किलो,

वेदांगी, पलीकडे तर चाळीसला आहेत.

टोमॅटोवाला, क्वालिटी तरी बघा त्याच्या मालाची व माझ्या व मग ठरवा काय ते मॅडम.

वेदांगी, दे की चाळीसन,

टोमॅटोवाला, बर, घ्या.

त्या किलोभर टोमॅटो घेतात. व पुढे जातात. ईशान टोमॅटो घेतो.

तो त्यांच्या पाठोपाठ बाजार करू लागतो.

त्याचे आपल्या मागोमाग बाजार करणे वेदांगी बारकाईने पहाते. व बाजूला आण्विकास घेऊन जाते. व तिला.

आण्विका ,काय झालं ग. इकडे का ओढून आणलेस.

वेदांगी, अग, तो ईशान पाहिलास काय? आम्ही जिथे बाजार घेतो तिथंच येतो.

आण्विका ,मग त्यात काय एवढं. बाजाराला आलाय म्हणजे बाजारच करणार ना.

वेदांगी, पण आम्ही घेतो तीच भाजी का विकत घेतो.

आण्विका, मग त्यात काय एवढं घेतली असेल. आपल्याला काय करायचय.

वेदांगी, काय करायचं म्हणजे. त्याची गंमतच करायची.

आण्विका, काय करणार आहेस तू.

वेदांगी, तू गप चल. दाखवते तुला, त्याची गंमतच करायची.

ती पुढे एका माळवेवाल्याजवळ जाते.

वेदांगी, अहो दुधी कशी दिली. माळवेवाला, वीस रुपये एक नग.

वेदांगी, अनु दुधी भोपळ्याची खीर कधी खाल्लीस का तू.

आण्विका, हो खालीय की,

वेदांगी, किती मस्त होते सांगू. उद्या घरी खीर करतात ना. त्यासाठी दुधीच चांगली.

आण्विकि, मग बघतेस काय,, घे की एक मस्त.

वेदांगी, हो घेते.

त्या दुधी घेतात व पुढे जातात.

ईशान पण लागोलग दुधी घेतो. व पैसे देतो.

तो थोडा पुढे आल्यावर वेदांगी परत मागे जाते.

वेदांगी, ओ, काका, घरी फोन केलाता. दुधी आहे शिल्लक नको मला.

ती दुधी ठेवते. व त्या बदल्यात मेथी घेऊन परत येते.

ते पाहून ईशान ही परत करायला जातो. पण माळवेवाला काही ऐकत नाही.

ईशान, ओ भाऊ मला पण दुधी नको.

माळवेवाला, ए गप्प जा एकदा विकलेला माल मी परत घेत नाही.

ईशान, पण..

माळवेवाला, पण बिन काही नाही.

ईशान, त्या बदल्यात मेथी द्या.

माळवेवाला, ए नाही जा.

शेवटी नाईलाजाने दुधी घेऊन तो पुढे आला. तेव्हा त्याने एका ठिकाणी त्या दोघी माळव विभागून घेत होत्या. ते पाहिलं. व हातातील पिशव्या उचलून तो पाहू लागला. त्याच्या लक्षात आले की त्याने वाजवीपेक्षा त्यांचं पाहून माळव जास्त घेतल ते.

…… ……. …… …….

क्रमशः पुढे......

nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com


No comments:

Post a Comment

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...