शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Saturday, November 18, 2023

कळत नकळतच जुळले हे बंध भाग ५

कळत नकळतच जुळले हे बंध भाग ५

 Night. 11 o’clock. अलिबाग

आण्विका बेडवर झोपली आहे. ती एक सारखी कुशी बदलत आहे. तिला झोप येत नाही. तिला डोळे मिटले की सारखा ईशान दिसत आहे. कॉलेज मधील त्याच्या आठवणी आठवत आहेत. बसमध्ये बोललेल्या घटना आठवत आहेत. सध्याचा त्याचा बांधा, घोटीव शरीर. व इतर सर्व आठवत आहे.

ती मनात, काय होतय मला. झोप का येत नाही. सारखं तो का दिसतोय मला. अस काय होतंय. एक अनामिक ओढ लागल्यासारखी झालेय. काहीच कळत नाही.

पुन्हा ईशान तिला दिसतो.

आण्विका, ( मनात) किती सुंदर व निरागस आहे तो. स्पर्धा परीक्षा दिलीय. व जोबल लागला. तरी देखील त्याच्या चेहऱ्यावर गर्विष्ठपणा कुठेच दिसत नाही. मला कॉलेज मध्ये असताना फूटबॉल लागला. तेव्हा किती अगतिक झाला होता. त्यास किती गिल्टी वाटत होत . अन् मी त्याला घालून पाडून बोलत असे. तरी देखील तो क्षमा मागायचा.

आज ही बसमध्ये मी त्याच्याशी भांडले. चूक केली. गाढवासारखी वागले. एवढी डॉक्टर असूनही बुद्धी कशी काय चालली नाही.

तरी देखील त्याने मेसेज पाठवला. एखादा गर्विष्ठ असता तर ढुंकूनही पहिला नसता. एक अनामिक ओढ तिच्या मनात निर्माण झाली.

तिने मोबाईल ऑन केला व त्याची डी पी पाहू लागली.

आण्विका, (मनात) मस्त आहे. रुबाबदार. देखणा इतका आहे की कोणालाही भुरळ पडेल.

ताकद इतकी की दोन चार पहिलवान लोळवेल. अन् फुटबॉल खेळताना लक्षवेधक खेळी करणारा.

अ ..व्यसन असेल का याला.

नसेल कदाचित. मी त्याला पाहिलंय. त्याच्या ओठांवर अजिबात पांढरट डाग नव्हता. म्हणजे सिगारेट पित नसणार. पण दारू वगैरे . छ नसेल तस काही. आपण आज पाहिलय जवळून तस काही जाणवल नाही. डॉक्टरकीचा एक तरी फायदा झाला.पण याच प्रेमप्रकरण वगैरे कुणावर नसेल ना.

हा ते माहीती करून घ्यावे लागेल.

नाहीतर मी इकडे प्रेमाचे इमले बांधत बसायची. व हा लग्न करून यायचा पुढ्यात.

मगाशी तो बसमध्ये कुणाशी तरी बोलत होता. एखादी महिला असावी. कॉलेज मध्ये मुलींशी बोलण्यास दचकणारा इतका फ्री कोणाशी बोलत असेल.

ती त्याची प्रेमिका असेल तर…

आण्विकेस झोप लागेना. ती उठून बसली. एक अनामिक भीतीयुक्त लहर तिच्या मनात निर्माण झाली.

तिची हालचाल पाहून रेवती उठली.

रेवती, काय झालं दीदी.

झोप येत नाही का?

आण्विका, हो ग.

रेवती, अग, नवीन जागी अस होतच. आण्विका, थोड पाणी देतेस का?

रेवती, हा थांब,

रेवती पाणी बॉटल देते.

आण्विका, थोड पाणी पिते.

रेवती, मला पण करपे ढेकर येत आहेत. मसालेभात मला खूप आवडतो. पण अँसिडिटी लगेच होते बघ.

आण्विका, मग एक वेलदोडा खा. अन् थोडी सोलकढी घे. बर वाटेल.

रेवती, हा, हे चांगल आहे. चल तू पण आपण थोडी सोलकढी पिऊ. व थोडावेळ टेरेसवर जाऊ.मस्त फेरफटका मारू

आण्विका, अग पण बाकी घरातले झोपलेत.

रेवती, झोपू देत. तू चल.

रेवती, चल थोडावेळ वरती टेरेसवरून येवूया.

त्या दोघी उठल्या.स्वयंपाक घरात जाऊन थोडी सोलकढी त्यांनी फ्रीजमधून घेऊन प्याल्या व जिना चढून वरील टेरेस वरती आल्या.

रेवती, मस्त गार हवाय बघ.

रेवती, काय ग, लग्नाचा विचार तर करत नाहीस ना.

आण्विक, छे ग.

रेवती, मग काही प्रेमप्रकरण. तस नसेलच म्हणा.

आण्विका, तस . आ …काय सांगू.

रेवती, म्हणजे आहे. काय ग.

आण्विका, नाही ग. माझं तस काही. पण मला कसतरीच होतंय.

रेवती, अग कसतरीच होतंय म्हणजे काय नेमक होतंय.

आण्विका, बर एक.

आण्विका सर्व काही आठवणी सांगते. व ईशान बाबत बोलते.

रेवती, म्हणजे तू प्रेमात पडलीस तर

आण्विका, तसं काय सांगू शकत नाही. पण..

रेवती, तसंच आहे ते.

रेवती, बर , त्याचा फोटो वगैरे आहे का?

आण्विका, हे बघ मोबाईल मध्ये.

रेवती मोबाईल मधील फोटो डी पी पाहून.

रेवती, मस्त आहे.

आण्विका, पण मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे.

रेवती, हो ते तर आहे.

आण्विका, मग आता काय करायचे.

रेवती, अग, तू जगाला चांगल काय अन् वाईट काय हे पटवून देणारी. तुला काय यात अवघड आहे. मला कसं अल्लड वयात प्रेमप्रकरणात फसण्याआधी वाचवलस.

जीवनातील सर्व व्यवहार बुध्दीने घ्यायचे हृदयाने नाही म्हणणारी तू व स्वतः बाबत एवढी अडखळतेस तुझ्या त्यावेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी आज एवढी टॉपर आहे. सर्व व्यवहारात.

आण्विका, अग ती गोष्ट निराळी. हा लाईफ पार्टनरचा प्रश्न आहे. व मी जगाची कोडी सोडवणारी या ईशान नावाच्या कोड्यात अडकलेय.

रेवती, म्हणून मॅडमला झोप येत नव्हती का? तस पाहता दाजी मस्त आहे.

आण्विका, गप. ग अजुन कशात काय नाही. अन् उगाच मजले रचू नकोस ह. गप्प बस तिथं

रेवती, गप्प काय गप्प. म्हणजे पंच्छी पिंजरे मे फस गया.

आण्विका, नाही अजुन.

रेवती, हे बघ काढू माहिती त्याची. आता झोपुया. चल.रात्र खूप झाली.

आण्विका, तुझ्याशी बोलल्यावर बर वाटल बघ.

रेवती, चला मग. बघू उद्या काय ते.

त्या झोपायला जातात.

…… …… ……. ……. …….


Morning. ७.३०. अलिबाग. Inter

मावशीच्या घरी. सगळे उठले आहेत. व आपापले काम करत आहेत. मावशी स्वयंपाक घरात जेवण करत आहे. काका जोगींगला गेले आहेत. स्वप्नील अजूनही झोपलेला आहे.

डायनिंग टेबलवर अनु बसलेली आहे. रेवती चहा घेऊन येते.

अनु मोबाईल पाहत आहे.

चहा ठेवत. ती चहा अनुला देत.

रेवती, काय मेसेज बघतेस. खास की सामान्य.

आण्विका, दोन्ही पण.

रेवती, दोन्ही पण नसणार खासच असणार.

इतक्यात जेवण खोलीतून मावशी,

काय बहिणींचं चाललय, खास काय ग हे.

रेवती आपली जीभ दातात चावत.

रेवती, अग खास मेजवानीच चाललय आमचं. मोबाईल मध्ये नवनवीन रेसिपी आलेल्या आहेत. त्या शिकायच्या आहेत.म्हणून अनु दीदी त्यातील सामान्य व खास रेसिपी निवडत आहे

रेवती कडे पहात

आण्विका, ये कायपण सांगू नकोस मावशीला.

रेवती, (हळू आवाजात) मग सांगू का अनु दी प्रेमात पडलीय म्हणून.

आण्विका, नको, (हळू आवाजात) खाणाखुणा करते.

रेवती, गप्प तू तिला काय कळतंय. सातवी झालीय ती.

आण्विका, पण हुशार आहे ती. व्यवहारात काकांपेक्षा तीच हुशार आहे ह.

रेवती, म्हणजे बाबा मठ्ठ आहेत अस म्हणायचेय तुला, सांगू का?

आण्विका, ए बाई मी तस कुठं म्हंटल. गप्प बस. काय कोंबड झुंजवते आहेस.

रेवती, त्यांना काय कळतंय. ते गेलेत जोगिंगला.

तू आवर आपण जाऊ नंतर अलीबाग दर्शन घ्यायला. मी फक्त एका तासात आले क्लासवरून.

अन् हो टेन्शन घेऊ नकोस. काढू कुंडल दोघी जणी मिळून.

इतक्यात मावशी बाहेर स्वयंपाक खोलीतून येत.

काय चर्चा चाललेय बहिणींची. व रेवे सातवी झाली तरी मला व्यवहार कळतो. ह. त्यावेळी आमच्या वेळी शिक्षणाची जास्त सोय नव्हती जवळपास शाळा नव्हती नाहीतर…..

रेवतीचा कान धरत.

रेवती, आई ग…. ये सोड बाई दुखतोय ग कान. रींगा ओढून काढतीस काय माझ्या.

कान सोडत.

मावशी, हे बघ ती आलेय दोन चार दिवस सुट्टीला तेव्हा तिला सर्व परिसर दाखवून घे. व तू ही शिक काहीतरी तिच्याकडून…

रेवती, ( हात जोडत) बर माझे आई, शिकतो.

रेवतीची आई आत जाते. रेवती नाष्टा करून आपली बॅग घेऊन निघते.

….. …….. ……. ……. …


Morning. ८.३० o’ clock. Inter

काका बाहेरून जॉगिंग वरून आलेत. ते अंघोळ करून आपले कपडे परिधान करून आलेत. डोक्याचे केस विचरत आहेत. अन्विका पेपर वाचत बसलेली आहे.

काका, काय अनु नाष्टा पाणी झालं का.

आण्विका, हो काका, तुम्हाला आणू.

काका, आणेल ग ती. तू बस. मला गप्पा मारायच्या आहेत.

इतक्यात मावशी चहा आणते.

मावशी, हा घ्या.

मावशी चहा देते.

मावशी, अनु तुला पण आणू का आणखी चहा.

आण्विका, नको बाई.

काका, बर घरची सगळी कशी आहेत.

आण्विका, आहेत ठीक.

काका, मामाकडे गेली होतीस का?

आण्विका, नाही जायला एक्झाम असल्याने जाता नाही आलं. आई गेली होती. आजीला जरा बरं नव्हत. मावशीची आठवण काढत होती.

काका, आम्हाला पण जाता आलं नाही. खूप कामे असल्याने सुट्टी मिळत नव्हती. या सुट्टीला नक्की जाणार आहे. तेव्हा येवू बघून.

काका, अनु तू खूप धाडशी आहेस. हुशार पण, सारासार विचार करून निवड करून शिक्षण पूर्ण केलेस. जरा तुझ्या प्रेरणेने मार्गदर्शन कर रेवती व स्वप्नीलला.

आण्विका, काका त्यांची काळजी करू नका. मी कायमच मार्गदर्शन करते. त्या दोघांनी माझ्या सल्यानेच आपलं करियर नीवडलय.

व मला पुरेपूर खात्री आहे. ती दोघेही छान यश मिळवतील.

काका, अस झाल की बरच होईल. देव पावला म्हणायचा.

 बर रेवती आली की फिरायला जा. मी माझं आवरून ड्युटीला जातो. रेवाण आधीच नियोजन केलय. तू आल्यावर काय काय करायचं ते.म्याप व टाईम टेबल पन केलेय.

एवढंच काय स्कुटीची टंकी फूल करून घेतलीय मॅडमनी.

आण्विका, मला बोलली नाही ती. मॅडम नियोजन करू लागल्या म्हणायच्या.

काका, सरप्राइज देणार आहे तुला. तू कसे दिलेस तुमच्याकडे आल्यावर तसे.

आण्विका, हो का. तरी मला मघाशी म्हणाली होती की फिरायला जाऊ म्हणून.

बघुया मॅडम काय सरप्राइज देतात त्या.

काका आपल आवरण्यास आत जातात.

Cut. To….

…… …… …. ……..

Morning. १०.०० o’ clock. Inter and outer

रेवती क्लास वरून आली. ती आपले श्यांडेल काढून श्यांडेल रॅक वर ठेवत

रेवती, अनु दीदी, ये अनु दीदी.

रेवतीचा आवाज ऐकून अनु रेवतीच्या खोलीतून वाचत्याले पुस्तक मिटवत

ओ, आले .

रेवती, ये वेडाबाई आटप लवकर आपण बाहेर जायचं आहे. मघाशी बोलले होते ना.अलिबाग दर्शन.

आण्विका, अग हो पण स्वप्नील कुठ आहे? तो येतोय ना.

रेवती, तो नाही, आपण दोघी जायचं. स्कूटी वरून , त्याचा आता क्लास आहे. तो नाही येणार आपण दोघी फक्त.

आण्विका, जायचं कुणीकडे ते तरी सांग.

रेवती, कुणीकडे म्हणजे अलिबाग दर्शन करायला.

चल ये जेव लवकर.

मावशी जेवण वाढते. त्या जेवू लागतात.

रेवती, जेव लवकर.

मावशी, काय वाघ बिघ माग लागला की काय. एका दिवसात सगळ अलिबाग दाखवणार आहेस काय.

रेवती, हो.

रेवतीला ठसका लागतो.

आई(मावशी) पाणी देते.

अग, हळू जेव.

तिच जेवण लगबीगीन होत. ती आईच्या पदराला हात पुसते. ह … चला आता.

मावशी, अग थांब आले.

मावशी आत जाऊन डबा बांधते. व

लगेच मावशी एक डबा बांधून आणते.

त्यांकडे डबा व पाण्याच्या बाटल्या देत.

रेवती, हे आणि कशाल ?

मावशी, कशाला म्हणजे फिरल्यावर भूक नाही का लागणार. त्यासाठी थोडीशी पोटपुजा.

रेवती, अग, काय हे, इथ जवळच तर निघालोय. बाहेर खाऊं काहीतरी

मावशी, तू काय बाहेरच काहीतरी खासिल बिसिल. अनुच काय? धड जेवू पण दिलं नाहीस. बसलीस लगेच घोड्यावर.

अन् तस काय जास्त दिलं नाही. व जास्त वेळ लावू नका. सहा पर्यंत परत या.

व हो विचारायचं राहिलं, मोबाईल घेतलाय ना दोघींनी.

रेवती, घेतलाय ग. किती काळजी करशील, इथ जवळच तर जातोय ना. कुलाबा किल्ला पाहायला.

मावशी, बर जा नीट. अनु काळजी घे. व तू पुढे स्कूटी घे. नाहीतर ही नेईल तुला मुंबईला.

रेवती, ते मुंबईला जायचं की राहायचं बघतो आम्ही. एव्हाना सगळ अलिबाग पाठ झालंय मला.

बाहेर पडताना

अणू मावशीच्या पाय पडते.

ते पाहून

मावशी, ये शिक जरा ताईकडून मोठ्यांशी कसं वागायचं ते. नाहीतर तू बघावं तेव्हा असतेस घोड्यावर स्वार.

रेवती, अग ये इकडे लवकर

मावशी(रेवतीची आई) काय ते.

रेवती जवळ जाते.

रेवती एका हाताने वाकून नमस्कार करते.

रेवती, ह.. झालं आशीर्वाद दे आता.

रेवतीला धप्पाटा मारत….

असा आशीर्वाद मागतात काय. जा आता. व या लवकर.

रेवती, अनुला घेऊन बाहेर पडते व स्कूटी स्टार्ट करते. त्या दोघी बसतात. त्यापूर्वी जेवणाचा डब्बा व पाण्याची बॉटलची पिशवी ती डिकीत गाडीच्या ठेवते.

रेवती गाडी स्टार्ट करते. त्या दोघी मावशीला बाय करून निघतात.

…… …… …….. ……… …….

Day. ११. O’ clock. Outer. अलिबाग शहर रोड.

रेवती अनुला घेऊन अलिबाग शहरातील मंदिरे, बागा दाखवत निघालेली असते. वाटेतील मंदिरात जाऊन त्या पाया पडून येत असत. त्या स्कुटीवरून अलीबाग शहर फिरत असतात.

गाडी चालवत.

रेवती, काय अनु दीदी, मजनूचा फोन आलता का. काही मेसेज वगैरे.

आण्विका, नाही ग, रात्री नंतर नाही आला. मला वाटत तस नसेलही कदाचित मला वाटत औपचारिक मेसेज पाठवला असेल.

रेवती, तुझ म्हणन बरोबर आहे. पण मला सांग तू प्रती मेसेज केला होतास की नाही.

आण्विका, गुड नाईट हा पाठवला होता. तो ही तसच म्हणाला. एवढंच.

रेवती, अग तू इनिंग सुरू व्हायच्या आधीच बोल्ट उडवलास कसं होईल.

आण्विका, म्हणजे, काय?

रेवती, अग, सरळ साधं गणित आहे बघ. तू त्याला बोलायला संधीच दिली नाहीस. मग काय होईल. डायरेक्ट गुड नाईट मेसेज पाठवलास म्हणजे तो झोपणाराच ना.

आण्विका, मग काय करायला हवं होत.

रेवती, थांब बोलू …. आधी गाडी पार्क करून जाऊ किल्ला पाहायला.वाटेत सांगते तुला.

रेवती मैत्रिनीस फोन करते. ती अपार्टमेंट मधून खाली येते.

रेवती मैत्रिणीकडे गाडी पार्क करते. व डिकीतल्या पिशव्या काढून घेते.

रेवती, ह बर ओळख करून देते. ही स्वरा स्वरा अग्रावकर माझी मैत्रिण .

अन् हो स्वरा ही माझी अनु दीदी. कशी वाटली. मस्त आहे ना.

स्वरा, भेटून आनंद झाला. ताई. तुमचं खूप कौतुक ऐकते. आमची अनु डी अशी आहे. आज भेटून बर वाटल.

आण्विका, काय खरंच. उगाच काहीतरी सांगत असते. अन् हो मी काही कुणी मोठी अंब्यासिडर नाही हा. तुमच्यासारखी साधी सरळ आहे . बर तुझ्याशी भेटून बर वाटल.

स्वरा. चला घरी चहा पाणी घेऊ.

रेवती, आता नको ग. वेळ झालाय. खूप किल्ला बघून येतो आधी. मग बघू.

स्वरा , चालेल.

आण्विक, तू येतेस का बरोबर.

स्वरा, आले असते ग. मला पण तुमच्या संगे वेळ घालवायला आवडला असता. पण घरी खूप काम आहे ग. व आई पण बाहेर गेली आहे.

रेवती, बर चल येतो आम्ही फिरून

स्वरा, बर चल.

आण्विका, बर येते.

त्या दोघी निघतात. वाटेला

आण्विका, काय ग मला हरभर्याच्या झाडावर चडवतेस का.

रेवती, खर सांगायला काय हरकत आहे.

आण्विका, चल.

रेवती, चल सांगते तुला. आपलं मघाशी बोलण अर्धच राहिलं ना.

त्या किल्याच्या दिशेने चालू लागतात.

रेवती, हे बघ आधी जेवलास का. कसा आहेस. अस काहीतरी बोलून त्याला बोलत करायचं होतस. डायरेक्ट गुड नाईट म्हणजे जेवण राहिलं बाजूला, बडीशेप घ्या आधी असं झाल बघ.

आण्विका, अग, एवढं साधं लक्षातच आलं नाही.

रेवती, चल किल्ला पाहूया आधी… मग पाहू रोमिओकडे.

त्या दोघी किल्याच्या दिशेने निघतात. समोर समुद्र आहे. व त्या किल्याकडे निघाल्या.

Cut. to …….

……. ……. ……. …….. ……nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com

क्रमशः पुढे......


No comments:

Post a Comment

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...