Day evening. कॅफे हाऊस
आण्विका व संयोगिता दोघी कॅफे हाऊस मध्ये एका टेबलवर बसून कॉफी घेत आहेत.
संयोगिता, तुझी काही हरकत नसेल तर एक विचारू.
आण्विका, विचार. ( पुढ्यात कॉफित चमचा फिरवत.)
संयोगिता, माझ्यापासुन तू काही गोष्टी लपवल्या आहेस. अस मला वाटत.
आण्विका, काय लपवलेय.
संयोगिता, ईशान तुझ्या एवढा क्लोज कसा.
आण्विका, काही नाही. बोलतो आम्ही त्यात काय नवीन.
संयोगिता, शाळेत असताना साधं बोलण देखील नव्हत तुमच्यात. अन् ..
आण्विका, अन् काय..
संयोगिता, आज मी पाहिलं एखाद्या प्रियकरा सारखं त्याच वागणं मला जाणवलं.
तुझं व त्याच प्रेम वगैरे नाही ना.
आण्विका, अस काही सांगता येत नाही मला. माझं मलाच काही कळेनास झालंय.
संयोगिता, तुझी व त्याची मुलाखात कशी झाली? इतक्या क्लोज कसे काय आलाय तुम्ही.
आण्विका सगळी हिस्ट्री सांगते. ते कसे भेटले वगैरे.
आण्विका, अस आहे बघ, त्याने मला विचारायला हवं. खर सांगायचं तर मला आवडतो तो. पण प्रपोज करत नाही तो मला.
संयोगिता, हे बघ तू आहेस डॉक्टर, व तो फॉरेस्ट खात्यात. तस तुमचं क्षेत्र जरी भिन्न असल. तरी जुळवून घेतल पाहिजे. तस पाहता तो तुझ्यासाठी योग्य वर आहे. अस मला वाटत. मी त्याला लहानपणापासून पाहत आलेय. तो खूप कष्टाळू, प्रामाणिक, जिद्दी व धाडशी मुलगा आहे. रंगानं सावळा जरी असला तरी स्मार्ट व देखणा आहे. शिवाय नोकरी पण चांगली आहे. माझं मत आहे की तू हा चान्स सोडू नकोस. लग्न कर त्याच्याशी.
की कुठला डॉक्टर बघुया?
आण्विका, नाही नको, मला तोच हवा. पण घरात कसं सांगू.
संयोगिता, हे बघ तुझं आधी ठरव. तळ्यात मळ्यात असं काही नको. आण्विका, मी स्टेडी आहे ग. पण त्याने मला प्रपोज करायला नको काय?
संयोगिता, अग तो धाडशी असला. तरी या बाबत शंभर पावले मागे आहे. अन् तो येईल प्रपोज करेल याची वाट पाहत राहिलीस तर झालं लग्न.
मग बस म्हातारी होईपर्यंत वाट पाहत.
आण्विका, हा,.. मी बसते, बघच तू.
संयोगिता, ए लई तानू नकोस तुटेल.
आण्विका, ही सोन्याची तार आहे. ताणली तरी तुटायची नाही. काय?
संयोगिता, तोपर्यंत दुसरी कोणतरी येवून तार तोडायची व घेऊन जायची त्याला.
मगाशी ध्यानात आलं नाही का?
आण्विका, काय.
संयोगिता, आजू बाजूला पाहिले नाहीस, करवल्या कशा मिरवत होत्या.त्याच्या बाजूला, अन् ते एड बांबू त्याच्या ध्यानात नाही आलं. तू जशी तसाच तो. एक दुजे के लिये.
आण्विका, एकदा त्याने प्रपोज करू दे. बस मला.
संयोगिता, हे बघ, तुला मी हे प्रकरण जुळवायला तीन महिने मुदत देते. यात जर तुझं व त्याचं जुळल नाही. तर मी स्वतः साखर घेऊन जाईन तुझ्या बाजूने बोलणी करायला. कळलं काय?
आण्विका, हो बाई कळलं, चला कॉफी घ्या, थंड होईल.
त्या कॉफी घेतात व निघतात.
….. ….. ….. ……
काही दिवसानंतर
Day. राधानगरी ग्रामीण रूग्णालय. Outer inter
आण्विका आपल्या भावासोबत राधानगरी रुग्णालय आवारात टू व्हीलर वरून येते.
तिथे ती दोघे रुग्णालयात जातात. आत गेल्यावर
आण्विका, (तेथील एका नर्सेला)
संजय वाघवेकर यांची केबिन कुठे आहे?
नर्स, हा तिकडे जा त्या बाजूला गेल्यावर लेफ्ट वळा तिथून पाच नंबर केबिन. तिथे पाटी आहे.
आण्विका, थ्यांकस.
आण्विका रुमजवळ जाते.
आत ते एक पेशंट तपासणी करत असतात.
आण्विका, थोडा वेळ बाजूला थांबते. व आत जाणाऱ्या नर्सकडे एक लेटर देते.
आण्विका, हे येवढं सरांना द्या.
नर्स आत जाते.
डॉक्टर पेशंट चेक करून आपल्या जागेवर येतात.
पेशंटचे सोबत आलेल्या मेंबरला.
काही जास्त काळजी करायचं काम नाही. औषध लिहून देतो. ती वेळेवर घ्या.
बाई वय काय तुमचं.
पेशंट, असल की पस्तीस चाळीस.
डॉक्टर, मसेरी लावता ना.
बाई, व्हय.
डॉक्टर, मग बंद करा ती. नाहीतर पोटात ढेप होईल.
बाई, काय करू मग साहेब. मला इंग्लिश पेस्ट आवडत नाही.
डॉक्टर, आवडत नसेल तर आवड निर्माण करा. व ते जमत नसेल तर आयुर्वेदिक पावडर मिळते की. बाजारात ती लावत जा.
बाई, माग आणली व्हती मालकानं तांबडी पावडर. खर तोंड लई जळत तेन.
डॉक्टर, मग सॉफ्ट पावडर लावा.
तिच्या नवर्याला, हे बघा मिस्री लावण चांगल नाही. मी एक पावडर लिहून देतोय ती घ्या.
पेशंटचा नवरा, बर.
डॉक्टर औषध लिहून देतात. ती चीठ्ठी घेऊन ती दोघे निघतात. तोपर्यंत नर्स लिफाफा देते.
तो घेऊन
डॉक्टर, तो लीफाफा खोलून वाचतात.
डॉक्टर, (नर्सेला) मॅडमना आत लावून दे.
नर्स जाऊन बोलावते.
नर्स मॅडम आपल्याला बोलावलं आहे.
आण्विका आत जाते.
आण्विका, गुड मॉर्निंग सर.
डॉक्टर, या बसा. मला प्राचार्य सरांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलय तुमच्या बद्दल. चालेल कधी जोईन होताय.
आण्विका, उद्या पासून होते. बर राहण्याची सोय कुठे होईल.
डॉक्टर, तशी सोय नाहीये पण एक रूम अड जेस्ट होईल. इथे जवळच एक नर्स जॉईन झालीय. तिच्या क्वाटरमध्ये अडज्येष्ट होईल.
डॉक्टर, (एका वार्ड बॉयला) अरे , जरा जाधव नर्स बाईना बोलावं.
तो जातो थोड्याच वेळात जाधव नर्स येते.
जाधव नर्स, बोला सर.
डॉक्टर, जाधव बाई तुमच्या क्वार्टर च्या मागील बाजूची रूम या मॅडम ना द्या. या आपल्या इथे नवीन टेम्पररी डॉक्टर म्हणून रुजू झाल्या आहेत.
त्यांची राहण्याची सोय पण होईल. व तुमच्या शेजारी असल्याने तुम्हाला सोबत देखील होईल. बर त्यांना रूम दाखवा.
जाधव नर्स, चला मी दाखवते.
जाधव मॅडम त्यांना रूम दाखवणेस नेते.
आण्विका रूम पाहते.
बाथरूम हे सेपरेट असल्याने त्या दोघींना सोईचे असते.
जाधव बाई, केव्हा जॉईन होणार.
आण्विका उद्या होईन.
जाधव मॅडम, बर विचारायचं म्हणजे, जेवणाच काय करणार.
आण्विका, म्हणजे,
जाधव मॅडम,बनवून खाणार की डबा लावणार.
आण्विका, डबा लावेन, कारण एकट्या साठी करण्यात वेळ जाऊ शकतो. व तोच वेळ मी माझ्या इतर कामासाठी वापर करू शकेन, म्हणजे अभ्यास इतर प्रोजेक्ट.
जाधव नर्स, मग आहे इथे एक मेस. एक आजीबाई चालवतात. त्या देतात डब्बा, चांगली आहे, मस्त घरगुती जेवण मिळत तिथे. एका महिन्याला दीड हजार द्यावे लागतील.
आण्विका, चालेल.
आण्विकेचा भाऊ, भेटून घेऊया का?
आण्विका, दाखवा कुठे आहे ती.
नर्स खाणावळ दाखवते.
तिथे एका आजीचे शेजारीच घर असते. आजी जेवण बनवत असते.
जाधव नर्स, मावशी अहो मुकता मावशी,
मुक्ता मावशी, कोण आहे.
त्या बाहेर दरवाजा जवळ येतात.
आजी, कोण जाधव बाई, बोला काय काम होत. डबा हवाय काय.
जाधव नर्स, मला नको आज डबा, मावशी या नवीन डॉक्टर मॅडम आहेत. यांना जेवणाचा डबा लावायचा आहे.
आजी, एका महिन्याला पंधराशे घेते. मी, घरगुती जेवण असत.
आण्विका, काय काय मेनू असतो?
आजी, रोजचंच, चपाती भाजी भात आमटी, गुरुवारी गोड खीर देते. रविवारी फक्त मसालेभात असतो.
जेवण पाहणार असाल तर बघा.
आण्विका आत जाते, तेथे एक डबा भरलेला असतो. आजी डबा खोलून जेवण दाखवते. अनुला आवडते. ती लगेच खाणावळ ठरवते.
तिथली आजी, कधी पासून डबा द्यायचा.
आण्विका, उद्या संध्याकाळ पासून द्या.
आजी, चालेल.
आण्विका तिथून निघते.
….. ……. ….
Next day. राधानगरी रुग्णालय,. Inter
आण्विका कामावर रुजू होते. ती प्रत्येक वार्ड नीट व्यवस्था लावत असते. तिथे काही तरुण डॉक्टर असतात.
एक डॉक्टर, मॅडम जास्त धडाडीच्या दिसतात.
दुसरा डॉक्टर, नवीन आहेत. तोपर्यंत.
पहिला डॉक्टर, पण नियोजन भारी करते.
दुसरा, तिच्याकडे एक डायरी आहे. काय नोंदवते ती.
पहिला, काय माहित, काय तरी असेल. बघू कळेलच थोड्या दिवसात.
….. ……. …
nishmarathishortfilmskrift1983
No comments:
Post a Comment