शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Sunday, July 13, 2025

फ्रेंडशिप एक साहस भाग १०

 फ्रेंडशिप एक साहस भाग १०

DAY/INTER / PRJKTA HOME / DAINING HOLL

 जेवण डायनिंग टेबलवर ठेवले आहे. प्राजक्ता, तिचा भाऊ, जेवायला बसलेले आहेत. तिचे वडील येऊन बसतात.

सयाजीराव :

घमघमाट सुटलाय, आज काय विशेष बेत आहे का?

सावित्री :

हो बिर्याणी बनवलीय.

सयाजीराव :

 आज अचानक कसं काय?

आजी :

आनंदाची खबरच आहे.

सावित्री :

आज कन्येचा रिझल्ट लागलाय.

 सयाजीराव :

अस होय, माझ्या लक्षातच नव्हत. रिझल्ट काय?

प्रमोद :

काय असणार? असेल फर्स्ट क्लास नुसता, आणखी काय असेल.

प्राजक्ता :

दादाराव, फर्स्ट क्लास नुसता नाही ह, फर्स्ट इन युनि्व्हर्सिटीमध्ये आहे मी समजल काय.

सयाजीराव :

वा छानच, मग पुढे काय करायचं ठरवलेस.

प्रमोद : ( मध्येच)

काढेल एखादं गोळ्या औषधाच दुकानं आणखी काय करणार.

प्राजक्ता :

 अय…. दादाराव ती योजना तुमच्याच सुपीक डोक्यात राहू द्या. मी मेडिकल शॉप नाही. स्वतची फार्मा कंपनीचं काढेन.

प्रमोद :

काय गुडघेदुखी, मानदुखी, कंबर दुखीवर बाम तयार करणार आहेस का?

प्राजक्ता :

हो बनवेन, त्यात काय कमी फायदा नाही, डोकं दुखताना तोच बाम तुझ्या कपाळाला लावशील. मी स्वतः औषधाचा फॉर्म्युला तयार करू शकते. समजल.

सयाजीराव :

 कल्पना चांगली आहे. माझ्या कसं नाही डोक्यात आल हे.

आजी :

येईल कसं, तुला फक्त कॉमर्स केलं की व्यवहार चालतो असं वाटत. फक्त गणिती नफा तोटा समजतो.पण माणूस कोणताही व्यवसाय करु शकतो. हे कुठं ठाव हाय.

प्रमोद :

अरेच्या, माझ्या डोक्यात कसं आल् नाही.

आजी :

 त्यासाठी डोकं जाग्यावर असायला हवं.

कळलं का? माझी नात किती गुणाची आहे ती. अन् ए सावित्री तू पण लई बोलतेस ना, बघ एक् दिवस गडपण सर करेल. घाटी मराठ्याच रक्त आहे ते, उसळी मरणारच बघ. समजलं का?

सावित्री :

हो समजलं.

प्रमोद :

तू खरंच किल्ला सर करणार.

प्राजक्ता :

 हो.

प्रमोद :

हे बघ मार्क काढनं निराळं, ते बुद्धीचं काम, मात्र गड चढण हे शारीरिक श्रम आले, जमेल का तुला.

प्राजक्ता :

 त्यासाठी रोज लवकर उठून एक्सर साईज करते ना मी.

सयाजीराव :

 ते बरोबर आहे ग पण हा सराव  वेगळा, तिथं १४००,१५०० पायऱ्या चढाव्या लागतील, शिवाय भ्रमंती वेगळी.

प्राजक्ता :

 हो चढायचा त्यात काय ? एवढं आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं व मानाने जगायला दिलं, त्या राजासाठी साधा गड आपणं सर करु शकत नाही का?

प्रमोद :

 हा ते ही खरंच.

 सयाजीराव :

 मला अभिमान वाटतो बेटा, तुझा हा निश्चय बघून. तुझी आर्त तळमळ व श्रम पहाता तुला यश मिळेल निश्चित.

( ते जेवू लागतात.)

Cut to ………

…… …… …… ……

NIGHT / INTER / HOSTEL ROOM

( मुली आपल्या खोलीत बेडवर बसलेल्या आहेत. वेदिक श्वेता जवळ येत.)

वेदिका :

कसला विचार करतेस.

श्वेता :

आज मला खूप आनंद झालाय, अगदी नाचावं वाटतंय.

वेदिका :

मग नाच की, कोणी अडवलय? हो की नाही अनुजा.

अनुजा :

मला तर खूप वाईट वाटतंय एका बिचाऱ्या मुली बाबत.

श्वेता :

 कुणाबद्दल,

अनुजा :

केस कापल्यावर कशी दिसेल?

श्वेता :

कोण

अनुजा :

 आरोही

रेवा :

कशी म्हणजे भुतावाणी.

( त्या हसू लागतात. श्वेताचा फोन वाजतो.)

श्वेता :

ह बोल की.

प्राजक्ता :

हे बघ, उद्या संध्याकाळी सातपर्यंत तयार रहा. आपणं हॉटेल शिवनेरीला जातोय. सर्व ट्रिक माझ्याकडून.

श्वेता :

 वाव, छान मज्जाच की.

प्राजक्ता :

उद्या तयार रहा.

श्वेता :

बर कोण कोण आहेत?

प्राजक्ता :

कोण कोण म्हणजे, आपली सर्व टीम.

( फोन ठेवल्यावर)

श्वेता : 

( फोन कानाला तसाच ठेवून)

हो का दोघीच जायचं बर बर.

( फोन ठेवल्यावर)

अनुजा :

कुणाचा फोन होता ग?

श्वेता :

कोणाचा म्हणजे प्राजक्ताचा.

रेवा :

काय म्हणत होती.

श्वेता :

उद्या जेवायला जाऊया म्हणत होती.

वेदिका :

 कोण कोण.

श्वेता :

 कोण कोण म्हणजे आम्ही दोघीच.

वेदिका :

 आम्ही पण आलो असतो की.

श्वेता :

अग उगाच गाडीत अडचण कशाला?

अनुजा :

 एवढ्या मोठ्या गाडीत एखाद्या कोपऱ्यात बसलो असतो ना मी.

श्वेता :

 असू दे, नाराज होऊ नकोस. बघू पुढे झुणका भाकर केंद्रावर करू एक दिवस आपण पार्टी.

माधवी :

हो का, ती झुणका भाकर काय आम्हाला घरी ही मिळू शकते.

तू तेवढी पार्टी करणार होय, धरा ग हिला.

( त्या गुदगुल्या करू लागतात.)

(पुनः फोन वाजतो. रेवा फोन उचलते.)

रेवा :

 हॅलो.

प्राजक्ता :

 कोण रेवा का?

रेवा :

 हा बोल की,

 प्राजक्ता :

 श्वेताला सांग , उद्या येताना माझा ट्रॅक सूट तेवढा घे. तिच्याकडे आहे तो.

रेवा :

 ते सांगते मी, पण कोण कोण येणार आहे पार्टीला.

प्राजक्ता :

कोण कोण म्हणजे तुम्ही सर्वजणी. व मी, आणखी कोण कशाला?

रेवा :

 बरं , किती वाजता.

प्राजक्ता :

 सात वाजता आवरून बसा मी येईन न्यायला.

रेवा :

 बर बर, ठेव आता.

वेदिका :

काय म्हणाली ग?

रेवा :

 श्वेतीला जरा चोपा म्हणाली, व आपल्या सगळ्यांना ही बोलावलंय. ही खोटं सांगत होती.

सर्वजणी :

 श्वेते s s…

( गुदुगल्या करू लागतात)

श्वेता :

आई ग, मेले मेले….

(दंगा ऐकूण)

कमला शिरसाट :

कोण दंगा करतेय झोपा आता, रात्र झालीय, पोरी आहेत का राक्षसीणी. रात्रीचे बारा वाजाय आले तरी झोपत नाहीत.

 श्वेता :

अग, झोपा आता, नाहीतर कमळोबा येईल,

( सर्वजणी अंथरुणात घुसतात. लाईट ऑफ होते.)

Cut to …

…… …… …….

NIGHT / INTER / PRJKTA HOME / IN ROOM

(प्राजक्ता मेकप करत असताना, आई येते.)

सावित्री :

काय एवढी लगबग कशासाठी चाललेय?

प्राजक्ता :

जरा बाहेर चाललेय.

सावित्री :

 या वेळी रात्री.

प्राजक्ता :

 रिझल्ट बद्दल पार्टी आहे. आम्हा मुलींची.

सावित्री :

 कुणीकडे जातेयस, घरी सांगायचं नाही.

प्राजक्ता :

 इथेच तर निघालोय, व सरुला सांगितलेय मी, माझं जेवणं करू नकोस म्हणून.

सावित्री :

 दादा स्कुटी घेऊन गेलाय. तुझी.

प्राजक्ता :

 माहितेय मला, मी फोर व्हिलर नेणार आहे ना.

सावित्री :

 बाबांना सांगितलस का?

 प्राजक्ता :

 हो मॅडम, कालच परवानगी घेतली.

सावित्री:

आ s s….

 प्राजक्ता :

( मध्येच आईला थांबवत.)

सर्व विचारून झाले असेल तर आवरू का?

सावित्री :

आवर की, मी कूठे अडवतेय, पण एवढ्या रात्री बाहेर जाणार ड्रायव्हरला बोलावू का?

प्राजक्ता :

 नको, नेईन मी येते मला चालवता.

सावित्री :

 नको, रात्रीची वेळ आहे, तारुण्याच्या धुंदीत घालशील कुठेतरी, मी बोलावते.

प्राजक्ता :

हे बघ, ड्रायव्हर काकांचे काम आहे. ते गावी गेलेत. मी हळू चालवते, मग तर झालं.

सावित्री :

 बघ बाई,…

प्राजक्ता :

काळजी करू नको, एकदम हळू नेते .

सावित्री :

बर…

Cut to …..

……. ……..

 NIGHT/ OUTER / PRJKTA HOME

( गाडी बाहेर गेटमधून निघते. प्राजक्ता गाडी चालवत आहे.)

Cut to ……

…….. …… ….

 NIGHT/ HOSTEL/ ROOM

( श्वेता व तिच्या इतर मैत्रिणी आवरत आहेत. मुलींचा मेकअप करणे पाहून.)

श्वेता :

 अग, ये बायांनो, आवरा लवकर. पावणे सात वाजाय आलेत. साधं जेवाय जातोय. कुठं लग्नात मिरवायला नाही.

येईल ती एवढ्यात.

माधवी :

श्वेते, गप ह.. तुझं माहितेय आम्हाला, प्यांट व ट्राऊझर चढवला, की झालं आम्हाला तरी नटू दे.

रेवा :

अग, इकडे बघा ग, हा मला ड्रेस चांगला दिसेल का?

अनुजा :

( ड्रेसकडे पाहत)

 हा आणखी कुणाचा घेतलास.

रेवा :

 मागल्या रुमच्या ज्योतीचा आणलाय.

वेदिका :

काय ग तो रंग? सारखं हिरव हिरव काय घालतेस. जरा चॉईस बदल की , गुलाबी, चॉकलेटी घालत जा, तुला सूट होईल.

रेवा :

( नाराजीने)

आता या वेळी कुठून आणू?

माधवी :

माझ्या ब्यागेतील घाल तो गुलाबी.

रेवा :

मला टंच होईल, तू किती बारीक आहेस.

माधवी :

अग, तो बसेल तुला, बघ घाल.

रेवा :

बर.

( रेवा ड्रेस घेते. व घालते. केस विंचरु लागते.)

श्वेता :

अग, आटपा लवकर, साडे दहाच्या आत परत यायला हवं. नाहीतर बाई गेट बंद करेल.

रेवा :

हे बघ जरा वेळ झाला तरी चालेल. सांगितलेय आम्ही मॅडमना.

श्वेता :

अरे व्वा, काय सांगितलेय.

रेवा :

पार्टीला जातोय म्हणून.

श्वेता :

सांगितलस, मग बाई खोडा घालणार, बघ.लॉक लावते की नाही गेटला. पुन्हा ती मागली भिंत चढून यावं लागणार.

रेवा :

 नाही यावं लागणार. हे बघ.

( गेटची किल्ली दाखवत.)

श्वेता :

किल्ली, अन् ती ही गेटची, कसं काय ती मांजर भाळली. अन् गेटची किल्ली दिली.

माधवी :

काय नाही ग, परवा आपण खरेदी केली होती ना.

श्वेता :

मागील आठवड्यात ना.

माधवी :

त्यावर एक कूपन मिळालं होत. इथल्या जवळच्या हॉटेलच दम बिर्याणीच, म्हंटल आपणं देवू या एखादी ट्रीट बाईला. व देवून टाकली.

रेवा :

 असू दे ग, बिचारीला साधं चहा पाण्याला देखिल कोण विचारत नाही.

वेदिका :

हो का, राणी उधार झाली, अन् बिर्याणी भरून पावली. बाई गंडेल रेवा, आम्ही नाही, तुझी बिर्याणी आली ध्यानात आमच्या.

( हॉर्नचा आवाज ऐकू येतो.)

श्वेता :

 हॉर्न ऐकू आला ना. आता या नाहीतर बसा. मी निघाले.

वेदिका :

 ये चला ग लवकर.

( सगळ्या वेगाने बाहेर पडतात, चप्पल घालून खाली जातात. अनुजा कुलूप लावते. व किल्ली बॅगेत टाकते.)

Cut to …

…….. …… …….. ….

 NIGHT /OUTER / ROAD

( प्राजक्ता गाडीजवळ उभा आहे. येणाऱ्या मैत्रिणीकडे पहात)

प्राजक्ता :

 काय वेदे, रेवा, आज चकाचक हाय. नवीन ड्रेस भारी आहे बुवा.

वेदिका :

 तेच तेच ड्रेस घालून कंटाळा आलाय, म्हंटल नवीन होऊन जाऊ देत.

प्राजक्ता :

श्वेता, तू का ग नाही घातलास तुझा नवीन ड्रेस.

रेवा :

हे तीच कायमचंच ठरलेलं आहे. मला अनफिट वाटतंय.

पोलिस स्टाईलची आहे मॅडम.

श्वेता :

ये पोलीस बिलीस नाय ह… आपल एकच लक्ष्य, फॉरेस्ट ऑफिसर. दोन परीक्षा झाल्यात, तिसरी पण बघ कशी झट्याक दिशी पार करते बघ.

वेदिका :

मग बरोबर आहे तुझं, जंगलात फिरायच म्हणजे असाच पेहराव हवा. पण.... मॅडम, आपणं जेवायला जातोय. जंगल सफरीला नाही.

श्वेता :

ए बायांनो, तुमचं ते पुराण थांबवा व चला वेळ होईल.  जेवायला जायचंय, वेळेवर जाऊया. नाहीतर भांडी घासायला जायला लागायचे.

माधवी :

हे अगदी बरोबर बोललीस.

प्राजक्ता :

 चला ग बसा.

( गाडी स्टार्ट होते. त्या बसतात. गाडी निघते.)

Cut to …… ……

……. ……. ……


No comments:

Post a Comment

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...