Outer / Day / evening / village road
सूर्य मावळत आहे. अंगत गाई गुरे गावात आणत आहे. साध्या पद्धतीने बांधलेली मातीची गवताने शेकरलेली घरे. प्रत्येक घरी गुरे सोडून तो आपल्या घरी जातो.
Cut to ……
…….. …… ……
Inter / evening / angat HOME
माजघरात एका बाजेवर एक वृद्धा झोपलेली आहे. अंगत घरात येतो.
अंगत :
आईसा…. आईसा….
( आईसाच्या कन्हन्याचा आवाज येतो. अंगत जवळ जातो. व अंगाला हात लावतो. )
अंगत :
आईसा तुला तर ताप वाढलाय.
अंगत :
मालव्वा… मालव्वा …
( आतून आवाज येत नाही. )
मालव्वा बाहेरून येते. एक काळया रंगाची तरुण स्त्री, तिच्या अंगावर चांदीचे दागिने असतात. )
मालव्वा :
आया वो, कधी इल.
अंगत :
कुठे गेली होतीस. घरात लक्ष नाही तुझे. बघ किती अंग तापलंय.
मालव्वा :
आया वो, सकाळ पासून तर ठीक होत्या. दुपारी पेज पाजली तव्हा नव्हतं ओ.
अंगत :
( आउसाच्या पोटावरून हात फिरवत. )
खपाटीला गेलेलं पोट सांगत की खाल्ल की नाही ते. वैद्य बुवाकड जायला हवं. मूल कुठं आहेत. शोभन, हिरण्य. अंधार पडतोय घरी येऊच सोडून कुठं हिंडतयात, रात्रीस निशाचर फिरत, वाघ लांडगे कळत नाही. लक्ष नाही तुझं घरी. मुलांना शोध मी आलोच वैद्याकडून.
( तो उठतो. व निघून वैद्य बुवाकडे जातो. )
Cut to …..
…… ….. ….. ….
Night / outer / village road
अंगत गावातून रस्त्याने जात आहे. वैद्य बुवांच्या दारात आल्यावर.
अंगत :
अण्णा वो वैद्य अण्णा.
( वैद्य बुवा पोथी वाचत बसलेले असतात. आवाज ऐकून कोयनली उठत असते. तिला थांबवून, जोग आंबा बाहेर येते. )
जोग आंबा :
काय रे , काय काम यावेळी काढलं.
अंगत :
आईसाला ताप आलंय. अंग नुसतं इंगळागत भाजतया. औषधी हवी.
जोग आंबा :
( त्रासिक नजरेने )
श्रीफळ आहे का?
अंगत :
आता नाहीये, माझ्याकडे उद्या देईन की.
जोग आंबा :
मग औषधी पण उद्याच ने.
अंगत :
वैद्यबुवा नाहीत का?
जोग आंबा :
भेटू शकत नाहीत. रात्र झाली, ताटी बंद झाली.
अंगत :
द्या की माय.
जोग आंबा :
नाहीये, सकाळी ये.
( त्याचं बोलणं मालाधर बुवा आतून ऐकतात. हातातील पोथी उपडी ठेवून जानवे सरळ करतात. क्षमस्व म्हणून नमन करतात. व उठून बाहेर येत असतात.कोयनली त्यांना थांबवून ती बाहेर येते. अंगत निघालेला असतो. )
कोयनली :
अण्णावो तुम्ही बसा . मी देते. औषधी.
( कोयनली आत जाते. एका द्रोणात औषधी घेऊन त्यात थोडा मध घालते. व बाहेर येते. तिला पाहून. )
जोग आंबा :
तू कशाला आलीस?
कोयनली :
कशाला म्हणजे औषधी द्यायला.
जोग आंबा :
नको तो अगोचरपणा करायला कुणी सांगितला?
कोयनली :
कुणी म्हणजे अण्णावोनी सांगितलं. ते पोथी वाचत आहेत.
जोग आंबा :
अशा फुकटच्या देयकाने दारिद्रय आणाल एक दिवस.
कोयनली :
अंगत हे घे चाटण, चाटव तुझ्या आऊले बरे वाटेल.
अन् हो थांब जरा.
कोयनली आत जाते. एका पत्रावळीवर भात व सारं घेऊन येते. व त्याला देत.
कोयनली :
हा ने थोड घाल, म्हातारीला बरं वाटेल मऊ भाताने.
( तिला भात देताना पाहून )
जोग आंबा :
एवढच काय देतेस, सर्व घरचं दान करून टाक की.
कोयनली :
हो, अण्णावोनी सांगितलं तर ते ही देईन. तू जा रे.
Cut to ……
…… …… …
Night / angt che Ghar / majghr
अंगत घरातील आतील दालनात येतो. तिथे लहान पणती लावली आहे. तिच्या उजेडात आऊसेला उठवून बसवतो. तिला थोड भात चारवू लागतो.
अंगत :
घे, हे थोडं खाऊन बरे वाटेल.
आईसा :
कशाला इतकी धडपड तुझी, लेकरांना दे त्या. माझं काय झाड व्हायचंय, मी मरतो आता.
अंगत :
आऊसा, अस नको काही बोलू. घे हे
( अंगतची लहान मुले हिरण्य व शोभन)
शोभन :
आम्हाला ही हवा भात. खूप दिवस झाले खाऊन.
अंगत :
आज नाही, आऊसेला बर नाही ना.
( ती दोघे हिरमुसून बसतात. )
आईसा :
ये इकडे ये घे.
( ती दोन्ही लहान मुले जवळ येतात. )
आईसा आपल्या थरथरत्या हाताने एक घास घेऊन त्यांना भरवू लागते. )
मुले :
नको, तू खा. मी बोर खूप खाल्लेत.
आईसा :
मला काय माहित नाही काय? बोरांनी काय पोट भरत हो. घे एक घास मला बर वाटेल.
( ती दोघे एक एक घास घेतात. आईसा त्यांना चारवते. )
इतक्यात बिरवा तिथे येतो. व अंगतला हाक मारतो. )
बिरवा :
अंगत ये अंगत
अंगत :
कोण ते.
बिरवा :
आवाज पण वळकणा व्हय.
अंगत :
कोण बिरवा.
बीरवा :
व्हय बिरवा, आज वस्तीची पाळी तुझी हाय, ठाव हाय नव्ह
अंगत :
व्हय, माहीत हाय, जाईन मी.
बिरवा :
जाताना हणमंताला हाळी दे.
अंगत :
हा देतो.
( बिरवा निघून जातो. अंगत आईकडे पाहत. )
अंगत :
हा घे, खा तू, औषध पण घे हे. बर वाटेल
Cut to …..
…… ….. …….
Outer / village / on road
अंगत व हनुमंत दोघे मशाल घेऊन फिरत आहेत. अधून मधून ते घोषणा देत आहेत.
‘ होशियार, ‘
जागते राहो.
Cut to …..
…… ….. ……
Day / outer / gayran
गाई चारत आहेत. अंगत खडकावर बसून बासरी वाजवत आहे. काही चोर तिथून निघालेले असतात. ते बासरी ऐकून बारकाईने न्याहाळत.
सीतू चोर :
कोणत गाव र.
राजवा :
नांदगाव हाय.
करमा :
गाई हाईत वाटत, राखोळ्या चारतोय.
( ते तिघे पाहतात. )
राजवा :
बरेच दिवस झाले. मोठा झोल करून.
सीतू :
मग काय योजना.
करमा :
या गावावर धाड टाकायची.
राजवा :
रेकी करायला पाहिजे.
सीतू :
करमा, जमलं का?
करमा :
न जमायला काय झालं.
सीतू :
ठरलं तर मग पुढची चोरी नांदगाव.
Cut to ….......
…… …… …..
No comments:
Post a Comment