Outer / Day/ vangav boricha mal /
कुस्तीचा आखाडा अनेक लोक जमलेले आहेत.
एक व्यक्ती :
काय पाटील अवंदा पण कुस्तीत रंगत येणार नाही वाटतं.
पाटील :
अस का र.
व्यक्ती :
अहो , गेली चार वर्षे झाली. भैरवाडीचा सत्तू पहिलवानच बक्षीस घेऊन जातो. त्याच्याशी लढायला कोणच पुढें येत नाही.
पाटील :
आर, आपल्या मावळात काय पहिलवानांची कमी हाय का?
जा जाऊन पुकार जो कोणी सत्तू पहिलवानाला हरवलं त्याला वनगावचा पाटील सोन्याचं कडं बक्षीस म्हणून देणारं म्हणून.
व्यक्ती :
अस म्हणता.
( तो पुढे आखाड्यात जाऊन )
ऐका हो ऐका जो कुणी चार वर्ष सलग जिंकलेल्या सत्तू पहिलवानास हरवलं. त्येला स्पर्धेतील मानाच्या गदे सोबत पाटील सोन्याचं कड देणारं हाइती हो ….
( एकजण तबकात धोतर उपरन व कडं घेऊन मैदानातून फिरतो. )
केदार :
मी जातो.
मल्हारी :
काय अवगलास काय, तो बघ केवढा रेडा हाय, अंगावर बसला तर आतडीच बाहेर यायची.
केदार :
ह, बघू तरी.
जीवा :
गप्प उगाच असंगाशी संग नको. माणसानं आपल्या ताकदीच् काम करावं.
केदार :
तू गप्प बघ कसा लोळवतो तेला ते.
( केदार मैदानात येतो. )
इसम :
बघ आजुन पण, गडी ताकदीचा हाय.
केदार :
चालल.
इसम :
नाव काय पावन.
केदार :
केदार
इसम :
गाव कोणत?
केदार :
मालेवाडी.
दवंडी वाला :
ऐका हो ऐका आजचा जंगी सामना हा भैरवाडीचा कसलेला पैलवान व सलग पाच वर्षाचा मानकरी सत्तू पैलवान व हा मालेवाडीचा तरुण पठ्ठ्या केदार यांच्यात होणार आहे हो …..
व्यक्ती :
चल हो सुरू.
( केदार कुस्ती खेळतो. व त्या पैलवानास अस्मान दाखवतो. हरवतो. )
पाटील केदारीला मानाची गदा व कडे देतात. लोक केदारला उचलतात.
Cut to ….......
…… …………
Day / evening / outer / road
यात्रेवरुन परत येताना
वाटेत एक बैलगाडी उभा असते. एक माणूस कण्हत असतो. केदार आवाज ऐकून आपली बैलगाडी थांबवत. गाडीतून उतरतो. व त्या ठिकाणी जातो.
म्हातारा :
पाणी … पाणी …
केदार :
जीवा पिशवी दे ती.
( जीवा कातडी पिशवी देतो.)
केदारी :
बाबा, घ्या पाणी.
( म्हातारा अडखळत पाणी पितो. )
केदार :
काय झालं?
म्हातारा :
देवीच्या जत्रसन येताना पाळेगारानं हल्ला चढवला.
मल्हारी :
च्यामारी भिकारी कुठले लुटमार करायला सोकावलेत , राबून खायला काय होतं यांना.
म्हातारा :
लुटमार झाल्याचं काही नाही. पण पोरी पळवल्यात बाबा त्यांनं.
( आवाज ऐकू येतो. वाचवा ….. वाचवा…)
केदार :
मल्हारी, जीवा, काढा तलवारी. चला बघू…..
जीवा :
कशाला या भानगडीत पडायचं. ज्याचं ते त्याला निस्तारु दे. वेळ होतोय. लुटारुंची खिंड हाय ही. वाचवायला जायचो अन आपलीच थडगी सजायची.
केदार :
चल हट, भित्रट कुठला , गरीब अबला आया बहिणींची अब्रु वाचवू शकत नाही. तो मर्द कसला.
मल्हारी :
चल बाबा, बघूया काय ते. जीवा तू बैलं सांभाळ. आम्ही बघतो. काय ते.
( केदार गाडीच्या कन्याखली असणारी तलवार काढतो. व मल्हारीकडे लगोरी देतो. ते दरीकडे जातात. तिथे त्यांना एक पाळेगार एका महिलेला उचलून नेताना दिसतो.)
स्त्री :
सोड, सोड, मला
पाळेगार :
जास्त बोलशील तर इथंच खांडोळी करीन. चल गप गुमान.
स्त्री :
कर हवं तर. अब्रुला बट्टा लागण्या परिस मराण बर.
पाळेगार :
तुला मारायला नाही. तर विकायला नेतोय. हबश्याकडे.
तुझ्या बाचा बदला घ्यायचाय मला, बघितलास का हा वण.
( डोक्यावरील घाव दाखवत. )
तुझ्या बान दिलाय मला. बरच दिस पाळत ठेवून व्हतो. आज सापडलीस तावडीत.
स्त्री :
सोड सोड मला.
( केदार व मल्हार दरडे जवळ येतात. )
केदार :
ये सोड तिला.
पाळेगार :
कोण तू? जा गुमान नाहीतर खपशील उगाच.
काळू पाळेगार म्हणत्यात मला.
केदार :
केदार चल ह्यो काळू पाळेगार हाय. यानं लई लोकांना मारलंय आजपतूर. उगाच नको त्या भानगडीत पडायला नग.
( पाळेगार ओढू लागतो. )
स्त्री :
वाचवा… वाचवा…. मला.
केदार :
ये सोड तिला. नायतर.
पाळेगार :
नायतर काय करशील र?
केदार :
इथंच थडगं बांधीन.
पाळेगार :
तू कालच पोर, ह… माझं थडगं बांधणार. थांब आधी तुलाच बघतो.
ये धर हिला, याला दावतो माझा चांगलाच इंगा
( दुसरा पाळेगार त्या महिलेस धरतो. केदार व पाळेगार यांच्यात हातघाई होते. मल्हारी एक दगड लगोरीत घेतो. व मारतो. पाळेगार जखमी होतो. मल्हारी त्यास ठार मारतो.
दुसरा पाळेगार घाबरतो. अन् निघून जातो. या झटापटीत केदारीच्या हाताला थोडा घाव होतो. रक्त ओघळू लागते.)
स्त्री :
( केदारीस )
आई ग , रक्त
( ती आपल्या साडीचा पदर फाडून त्याचा दंड बांधते.)
स्त्री :
खूप उपकार झाले. आज, तुम्ही नसता तर.
( ती पाया पडू लागते. )
केदार :
अहो , हे काय करताय. मी आपल्याच वयाचा आहे.
स्त्री :
तरी पण आज तुमच्या रुपान देवच धावून आला बघा.
केदार :
दीन दुबळ्याचं संरक्षण करण यातच खरा पुरुषार्थ असतो माणसाचा.
स्त्री :
हा आपल्या मनाचा मोठेपणा झाला. नाहीतर. आजकाल या यवनांच्या राज्यात सर्व काही बाटलं जात आहे.
असा कोण वाली भेटतो आजच्या युगात.
मल्हारी :
बर, चला आता अंधार होतोय. नाहीतर पाळेगाराच्या तावडीतून सुटायचो अन् वाघाच्या तावडीत सापडायचो.
केदार :
( हसत )
बर चला …
( एक सरदार दुरून घोड्यावरून पहात असतो. )
Cut to …..
….. …. … ….
No comments:
Post a Comment