Day / outer / jangal
मावळे एकत्र जमलेले आहेत. केदार त्यांना बोलत आहे.
केदार :
सवंगड्यानो आज आपल्याला एक जोखमीचं काम दिलंय. गनिमाने तळ ठोकलाय गडाखाली. अन वर गडावर आपले बांधव अडकलेत. आन् पाण्यबिगर उपाशी मारताहेत. ते जगले तरच आपण व आपला हा मुलुख तरुण जाईल. नायतर या यवनी सत्तेला आपला घास घ्यायला. वेळ लागणार नाही. तवा ही मोहीम आपण फत्ते करायची. चला.
( ते निघतात. लपत, छपत शत्रूला चकमा देऊन रसद गुप्त मार्ग पोहोचवतात. व परत येतात. )
केदार :
जरा गंमत करूया काय?
मल्हारी :
कुणाची?
केदार :
कुणाची? काय कुणाची? झोपलेल्या यवनांची.
मल्हारी :
गुमान चल उगाच वाट दाऊ नकोस गनिमाला.
केदार :
यांना आमच्या वाटा गावायला , यांची खोकड होतील. शोधून शोधून.
रंग्या अआन तो चाप व बाण.
रंग्या :
हा घे.
केदार :
( बाण तेलात बुडवून आग लावतो.)
आता बघा माझा नेम
( केदार बाण सोडतो. तो थेट गनिमाच्या तळावरील दारू गोळ्यावर लागतो. मोठा भडका उडतो. गोंधळ उडतो. ते निघतात. )
Cut to …..
…… ….. ……
Day / vada / inter
वाड्यात लोकांची ये जा होत असते. ज्योत्यावर सरदार फेरी मारत असतात. केदार व त्याचे साथीदार येतात. वाकून मुजरा करतात.
केदार :
राम राम
राम राम, कामगिरी फत्ते झाली, गडावर रसद पोहोचती केली.
सरदार :
वा… छानच, चांगली बातमी दिलीस.
हनमंता…
( हणमंत तबकात तलवार घेऊन येतो. ती तलवार हातात घेत.)
सरदार :
मुला, ये...इकडे…
केदार :
कोण मी?
सरदार :
हा तूच. ही घे समशेर. वीराच्या हातातच शोभते. आजपासून पडवीत असलेला घोडा तुझा. आजपासून तू शिलेदार. व तुझे सहकारी सुद्धा चाकरीत दाखल करून घेत आहोत. स्वराज्यासाठी राजांना तुमच्यासारख्या वीरांचीच गरज आहे.
( केदार तलवार घेतो. व लवून मुजरा करतो.)
Cut to …...
……. ……. ……. ……..
Day / outer / road
मोठ्याप्रमाणात सैन्याचे आगमन होते. किल्ल्याला वेढे पडू लागतात. असाच एका गडाला वेढा घातला जातो
…. …… …..
Night / ek tal / outer
मुघल सरदार:
( फिरत एका शिपायाजवळ येत. )
आंखो मे तेल डालकर ध्यान रखो l गनिम खतरनाक है l
शिपाई :
जी हुजुर.
( तो पुढे जातो. )
Cut to ….
…….. ……. …….
काही दिवसा नंतर …
Day / morning / fort room
दळण खोलीत स्त्रिया जात्यावर बसलेल्या आहेत. अर्धी बुट्टी भरून धान्य दळण्यास आणल्यावर.
सगुणा :
एवढंच धान्य.
शिपाई :
काय करणार. अंबारखान्यान तळ गाठलाय. आणणार कुठून? सात महिनं झालं. वेढा हालना झालाया, काय करावं.
सगुणा :
मेल कुठंन येऊन उलतल्यात. देवाला ठाव. एक एक राकुसच हाय जणू. पाण्यातल्या जळू वाणीच चिकटून बसल्यात गडाला.
कनकाई :
या महिन्यात जर तळ हलला नाही. तर उपाशीच मरावं लागलं.
शिपाई :
आता आई भवानीलाच काळजी.
कनकाई :
लागलं सरळ, तिनं डोळ झाकलं नाहीत, कराल कृपा.
( पूर्वेला तोंड करून हात जोडते.)
बघ बाई आता, तूच पाठीराखी.
( त्या जातं ओढू लागतात. पीठ गळू लागतं. त्या गीत गाऊ लागतात. )
“ उगव दिशेला सुरव्या देव आला, कृपा कर ग माय आंबा. लाल ग कुंकू ठेव ग भाळा, रक्षण कर माझ्या धन्याला. आहेव मरण लाभू दे आम्हा. कृपा कर तुझ्या लेकरा. सरगाची पायरी नको ग मला. रक्षण कर तू शिवबाच्या राज्या.
Cut to……
…… …… …… ……
No comments:
Post a Comment