शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Sunday, March 30, 2025

फ्रेंडशिप एक साहस भाग ७

 फ्रेंडशिप एक साहस भाग ७

Day -Morning / inter - outer / Hostel

Action :

( सकाळी आरोही उठते. दात घासत टेरेसवर कपडे आणायला जाते. तिचा ड्रेस जागेवर नसतो.)

आरोही :

( काळजीने हळू आवाजात )

माझा ड्रेस. कुठं आहे. काल तर इथेच उन्हात घातला होता. तन्वी ने नेलाय का बघायला हवं

( ती जिना उतरून खाली येत )

 आरोही :

तन्वी ये तन्वी.

तन्वी :

( बेडवरून आळस देत. झोपेतच जांभई देत)

काय ग,

आरोही :

 ( तिच्या जवळ येत.)

झोपलीय आजुन, उठ

( आरोही तन्वीला हलवून )

तन्वी :

 काय हे झोपू पण देत नाहीत नीट.

आरोही :

अग, माझा ड्रेस आणलास काय?

तन्वी :

( झोपेतच)

 कुठला ड्रेस ? कोणता ड्रेस?

आरोही :

 अग काल धुवून उन्हात घातलेला.

तन्वी :

 मी तर कालपासून टेरेसवर गेलेच नाही बाई. मग कुठून आणणार.

आरोही,

(शेजारी उठून बसलेल्या मानसीला)

काय ग तू आणलास काय?

मानसी :

 नाही ग, नीट पाहिलास का?

आरोही :

अग सर्व टेरेसवर पाहिलं नाहीये.

तन्वी :

 एखाद्या कुत्र्या मांजरांन नेलाय का बघ.

मानसी :

 ( तन्वीच्या डोक्यावर टपली मारत.)

ड्रेस टेरेसवर होता. समजलं काय? अन् उंदराचं औषध घातल्यापासून इथं मांजर फिरकत देखील नाही.

आरोही :

मी नाही आणला, तू नाही.

 मग ड्रेस गेला कुठे?

तन्वी :

 बॅगा, पिशव्या चेक कर आधी.

(आरोही बॅग तपासते)

आरोही :

नाही ग यात. पण यात कसा असेल. मी तर धुवून उन्हात घातला होता.

तन्वी :

( चेहऱ्यावर शोधक मुद्रेने )

 मग त्या दोन पायांच्या मांजरीनींचच काम असणार.

आरोही :

 दाखवतेच त्यांना. थांब.

मानसी :

 थांब, विना पुराव्याचे आपण काही करू शकत नाही.

( विचार करून चुटकी वाजवत )

मानसी :

हे बघ आपण त्यापेक्षा मॅडमकडे तक्रार करूया. त्या चेक करतील सर्वांच्या बॅगा.

तन्वी :

 ही आयडिया चांगली आहे.

आरोही :

 चला तर मग.

     ( त्या निघतात.)

                          Cut to 

…… …...... ….. …… ……..

Morning -Day / inter / Hostel office

Action :

आरोही व तिच्या मैत्रिणी एकत्र ऑफिस बाहेर उभा आहेत. मॅडम केबिनमध्ये देवाचा फोटो ओवळत मंत्र म्हणत आहेत.

आरोही :

( दरवाजावर नोक करून )

मॅडम आत येवू का?

(मॅडम कमला शिरसाठ डोळ्याच्या इशाऱ्याने आत येण्याची परवानगी देतात. मुली आत प्रवेश करतात.)

आरोही :

 मॅडम काल माझा ड्रेस कुणीतरी चोरला.

कमला शिरसाठ मॅडम :

(देवपूजा थांबवत.)

काय?

तन्वी :

हो मॅडम काल टेरेसवर उन्हात घातला होता. सकाळी पाहायला गेल्यावर तिथे नव्हता.

मॅडम :

 अग पडला असेल वाऱ्याने उडून इकडे - तिकडे. शोधलास का तू?

आरोही :

 मॅडम मी सगळीकडे पाहिलं. व वाऱ्याने फक्त माझाच उडाला नसता. बाकी शुभ्राचा तर अगदी सुळसुळीत ड्रेस. तो आहे तिथे. पण माझाच नाहीये.

मॅडम :

 तू बॅगेत वगैरे चुकून ठेवलास का? बघ. …

आरोही :

 काल धुतलेला ड्रेस,.. वाळायच्या आधी कसा ठेवेन?

आरोही :

 सर्वत्र पाहिलंय. कुणीतरी चोरलाय.

मॅडम :

 असं कसं चोरतील कोण? अन् से - पाचशेच्या ड्रेससाठी झडती घेत बसू का?

आरोही :

 मॅडम से - पाचशेचा नव्हता तो, चांगला दोन हजाराचा होता. ते काही नाही झडती ही झालीच पाहिजे.

( बाकीच्या तिच्या मैत्रिणी सुद्धा )

 मैत्रिणी :

हो झालीच पाहिजे, झडती झालीच पाहिजे.

मॅडम :

 अग असं कसं लगेच…

मानसी :

 ते काही नाही, झडती झालीच पाहिजे. म्हणजे झालीच पाहिजे.

सर्वजणी :

 हो हो झालीच पाहिजे.

मॅडम :

 बरं बाई घेवू या.

(मॅडम रिंग वाजवतात.)

                   Cut to …….

 ……. ….. …..

Inter / Day / Hostel ground

Action :

  रिंग ऐकूण सर्व मुली ऑफिस जवळ जमा होतात. आपापसात चर्चा.

 Dialog :

एक मुलगी :

 कशाला बोलावलंय ? येवढ्या सकाळी सकाळी.

दुसरी :

 सुट्टीच्या दिवशी पण सरळ झोपू देत नाहीत.

तिसरी :

आरोही बाई आहेत म्हंटल्यावर काहीतरी म्याटर घडला असणार.

दुसरी :

 आणखी काय घडणार? दोन गटात धुमशान झालं असणार.

पाचवी मुलगी :

 आता यांचं रामायण तासभर ऐकाव लागेल. आम्हाला काय कामं नाहीत का?

मॅडम :

( सिटी वाजवून )

हे पहा शांत व्हा जरा. आज सकाळी सकाळी तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या अरोहीचा वाळत घातलेला ड्रेस कुणीतरी चोरला आहे.

एक पोरगी :

 म्हणजे आम्ही काय चोर वाटलो?

मॅडम :

 अगं तसं नाही म्हणायचं. तिचा ड्रेस हरवला आहे. तुम्ही शोधण्यास मदत करा.

एक मुलगी :

 हे घ्या आम्हाला काही कामेच नसल्यासारखं हिचा ड्रेस गेला. अन् आम्ही का बर शोधून द्यावा. पाहिजे तर तिलाच सांगा की शोधायला.

मॅडम :

 अग शंभर पाचशेचा असता तर वेगळ होत. दोन हजाराचा ड्रेस होता. अन् … तुमचा जर गेला असता तर तुम्हाला काय वाटलं असतं.

एकजण :

 मॅडम वाटायचं दिवस गेल्यात आता. मिक्सर आलाय मिक्सर.

मॅडम :

 विनोद पूरे, तसं पाहता काल बाहेरच कोणीही आलेलं नव्हत. ड्रेस आतीलच कुणीतरी घेतला असणार. त्यामुळे सर्व खोल्यांची झडती घेतली जाणार.

मानसी :

ए चिंचपोकळी गप्प बसं, तुझी रिंग हरवली तेव्हा शोधून दिली ना. मग आता गपचुप कोऑपरेट करायचं समजलं का ?

मॅडम :

 चला ग प्रत्येक रुमची झडती घ्या.

     Cut to …..

…. ….. …….

 Inter / Hostel room / Day

( प्रत्येक खोलीची झडती घेतली जात असते. सर्व ब्यागेतील साहित्य विस्कटले जात असते.)

First room

Dialog

एक मुलगी :

अगं, सगळ काय विस्कटतेस. वरुन पाहिल्यावर समजत की.

( दुसऱ्या मुलीच्या बॉक्सला हात लावल्यावर )

दुसरी मुलगी :

 त्यात काय शोधतेस.त्यात क्लिनिंग सामान आहे. त्यात असेल का ड्रेस. नॉनसेन्स एवढं समजत नाही.

( ती पुढे होते. व तन्वीच्या हातातील साहित्य काढून घेते.)

 तन्वी :

 काय ग आम्हाला पण कधीतरी युज करायला देत जा की.

मुलगी :

 काय पण मागायचं. कळतच नाही बघ. चल ठेव.

आरोही :

 चला ग इथ काही नाही पुढील खोलीत पाहू.

Action :

( श्वेता व वेदांगीच्या रुमजवळ आल्यावर श्वेता रुमच्या दरवाजा समोर उभी असते. )

मॅडम :

 श्वेता बाजूला हो झडती घेवू दे.

श्वेता :

 मॅडम हे चुकीचं चाललय. अशी झडती म्हणजे चोरीचा आळ घातल्यासारखा आहे.

आरोही :

 का चोरी सापडेल अशी भीती वाटतेय.

वेदिका :

पाच रुपयाचा ड्रेस, तो ही वापरलेला कोण चोरेल.

आरोही :

 पाच रुपयाला दोरी तरी येते का? चांगला दोन हजाराचा होता तो.

श्वेता :

 छापील किंमत सांगतेस का?आम्ही पण खरेदी करतो बुवा.

वेदिका :

ती ही छापील किमतीवर भरघोस सुट घेवून.

दुकानदार सांगेल एवढी किंमत तुझ्यासारखे बिनडोकच देतात.

आरोही :

ये वेदे जास्त बोलू नकोस. गपचूप तपासणी घेवू दे नाहीतर चोरी पत्कर.

श्वेता :

 म्हणे चोरी पत्कर, अडलय आमचं खेटर. पुढे हो.

आरोही :

पुढे हो काय पुढे हो.

मॅडम :

हे बघ श्वेता, झडती घेऊ दे. उगाचच वाद नको मला, तीचं समाधान होईल.

श्वेता :

 परवानगी देवू. पण एक अट आहे माझी, सर्व साहित्य जस काढेल तसं ठेवायचं.

आरोही :

 ठीक आहे.

( आरोही आत जाते बॅगा तपासत काही सापडत नाही. ती हताश होते. खिडकीत फरशी पुसत्याल्या रुमालकडे बोट दाखवत वेदिका)

Dialog :

वेदिका :

 काय ग हा काय बघ तुझा ड्रेस?

आरोही :

( रागाने पहात)

वेदे लई शहाणपण करू नकोस?

आरोही :

( श्वेताकडे पहात )

श्वेते हे तुझंच काम आहे. तुला बघून घेईन.

श्वेता :

 ते बघायचं, ठरवायचं नंतर बघू आधी बॅगा आवर त्या नीट. नाहीतर.

आरोही :

 नाहीतर काय करशील?

 श्वेता :

( हातात स्टिक काठी घेवून तिला दुसऱ्या हातावर खेळवत. )

 तू अन् तुझा छपरी गँग आलाय चालत , रांगत बाहेर जाल.

मॅडम :

श्वेता भांडणे नकोत. आरोही भर बॅगा. आवरा पसारा.

आरोही :

 श्वेता मर्यादा राख.

श्वेता :

 आधी तू सुधार स्वतः ला दुसऱ्याला नेहमी पाण्यात बघत असते नुसती.

वेदिका :

तू आवर इथल अन् निघ, अन् पोरी वो पट्टी काढून एक झबला घेवून द्या, नाहीतर रातभर रडत बसायची. माझा ड्रेस….. माझा ड्रेस…..

(आरोही वेदीच्या अंगावर धावून जाते. मुली मध्ये पडून सोडवतात.. )

तन्वी :

 आरोही गप बस, उगाच वाद नकोत. इथं वाद घालून काही उपयोग नाही. आता चल इथून नंतर बघू काय करायचं ते.

श्वेता :

ऐकलस ना तुझी चमची काय म्हणते ते, चल निघ….

( आरोही निमूटपणे निघते. मुली सिटी वाजवून वेडे वाकडे नाचून चिडवतात. )

     Cut to ….. …..

…….. …….. ……. ……


Saturday, February 22, 2025

फ्रेंडशिप एक साहस भाग ५

 फ्रेंडशिप एक साहस भाग ५

Day /. Morning / prajakta home garden / outer

कृती:

प्राजक्ता बंगल्याच्या आवारात गार्डन मधील बाकड्यावर बसली आहे. काहीशा नाराज अवस्थेत, तिची आजी तिला पाहून जवळ येते.

 संवाद :

आजी :

( खोकल्याचा आवाज काढते)

खु खू….

प्राजक्ता :

( मागे वळून पाहत)

कोण ? आजी, ये बस.

आजी :

काय ग अशी गप्प का बसलीयेस?

प्राजक्ता :

काही नाही,

आजी :

हे बघ तुझा चेहरा सर्व सांगतोय की तू नाराज आहेस, अस मनात काही ठेवू नये. बोलून मोकळं व्हावं.

प्राजक्ता :

आजी मला जमेल का हे सगळ.

आजी :

का नाही,.. जमेल की , ..अस का वाटत तुला.

प्राजक्ता :

तस नाही मी एक मुलगी आहे. आजपर्यंत जास्त अस शारीरिक कष्ट मला माहितच नाहीत. गड चढणे व स्वसंरक्षण जमेल का मला?

आजी :

का नाही जमणार, या जगात कोणी आईच्या पोटातून शिकून आलेलं नाही.संस्कार जरी बाळ पोटात असताना होत असले तरी प्रत्यक्ष कृती ही बाळ पोटातून बाहेर आल्यावरच करते ना?

प्राजक्ता :

मी बऱ्याच ठिकाणी पहाते, ऐकते की स्त्रिया म्हणजे मुले जन्माला घालायचे व जेवण करायचे मशीन याच दृष्टीने पाहिलं जातं.त्यांच्याकडे.

आजी :

हे बघ तूझ हे बोलणं म्हणजे शाळा शिकून अडाणी असल्यासारखं आहे बघ.

प्राजक्ता :

असं कसं,

आजी :

अगदी तसच आहे. मला सांग छत्रपती. शिवरायांची आई जिजामाता या कोण होत्या? एक स्त्रीचं ना.

प्राजक्ता :

हो.

आजी :

त्यानी मुलांना जन्म देणं, त्यांचा सांभाळ कारण, राज्यकारभार करण हे केलंच ना. शिवराय जेव्हा आग्र्याच्या कैदेत सापडले तेव्हा आलेल्या स्वराज्यावरील संकटांवर बुध्दीच्या बळावर मात करणे हे सारं केलच ना,

प्राजक्ता :

हो.

आजी :

मग यातून सर्व काही ध्यानात येईल बघ तुझ्या, की एखादी स्त्री काय काय करू शकते. प्रसंगी सर्व सृष्टी देखील चालवू शकते.

प्राजक्ता :

पण त्या लहान असल्यापासून सर्व शिकल्या होत्या.

आजी :

तस काही नसत बाळ, माणूस हा आयुष्यभर शिकतच असतो.

 तुला ही जमेल हिम्मत हारू नकोस म्हणजे झालं.

तुला अस का वाटतं?

प्राजक्ता :

मला एक्सर साईज करायची सवय नाही व काल थोड केल्यावर अंग दुखू लागलेय. व शस्त्र चालवता नाही येत .

आजी :

अग, अचानक सुरू केल्यावर थोडा त्रास होणारच, पण दोन - चार दिवस जाऊ देत तुला सवय होऊन जाईल. व शस्त्र चालवण शिकायच ना. ते टेंशन तू सोड माझ्यावर. आहे माझ्या ओळखीचा एक ट्रेनर तो शिकवेल तुला.

प्राजक्ता :

काय खरंच?

आजी :

हो अगदी खरंच.

प्राजक्ता :

माझी लाडकी आजी, आता बघच त्या गोडांबेला दाखवतेच मी माझी हिम्मत.

आजी :

अस बोलायचं नाही.त्या मुलीचं काही चुकल नाहीये. आपण आशी अढी धरू नये.

प्राजक्ता :

तुझं म्हणणं पटतंय मला ग. पण ती कायम माझ्याशी तिरकसच वागत असते. येडछाप.

आजी :

आणि परत तेच.

प्राजक्ता :

सॉरी ,पुन्हा नाही बोलणार.

                             Cut to …...

……… …….. ………

Sunday /night/ Inter / hostel

कृती:

हॉस्टेलचे हॉल मध्ये सिनेमा दाखवला जात आहे. मुलींची चुळबुळ चालू आहे. सिस्टिम जोडली जात आहे. मुलींचा दंगा चालू आहे.

        Dialog :

एकजण :

अरे होतय की नाही, की लावता एक तास.

एवढ्याशा पिना जोडायला किती वेळ?

  कमला शिरसाठ :

जोड बाबा लवकर, पोरीनी डोकं खाल्ल मघापासून,

जोडणारा :

झालं झालं.

( कृती : लाईट ऑफ केली जाते. डिम लाईट चालू करतात. स्क्रीन चालू करतात. सिनेमा चालू केला जातो, स्क्रीनवर नावे पडू लागतात. शेर शिवराज सिनेमा चालू असतो. थोडया वेळातच आरोही व तन्वी उठते. व मॅडम जवळ जाते. )

      Dialog :

    आरोही :

मॅडम जरा पोट बिघडलं आहे. जरा जाऊन येवू का?

      मॅडम :

( हात हलवत)

जा बाई जा.

( कृती : त्या दोघी उठून जाऊ लागतात. त्यांना जाताना पाहून मुलींची कुजबुज सुरू होते. )

माधवी गडकर :

ही बया अन् कुठं निघाली म्हणायची.

    श्वेता :

निघाली असेल घोरत पडायला.

रेवा :

 हिच्या जीवनात रसच नाही बघ.

वेदिका :

नाही कसा, आहे की ठासून भरलेला बिभत्स रस,

चेष्मा काढ,.. अन् बघ तिचं थोबाड. म्हणजे कळेल.

 अनुजा :

साधं शिवजयंतीला केवढा अकांडतांडव केला तिन, हिला काय कळणार शेर शिवराज.

( मुलींची कुजबुज ऐकूण मॅडम)

        कमला शिरसाठ मॅडम:

ए.. गप्प बसा… कोण बोलतंय ते? या पोरी पिक्चर लावला तरी बोलतात. पुढे काय करतील कुणास ठाऊक?

    शेजारील शिपाई :

 काय करतील हो.

    मॅडम :

खातील नवऱ्याचं डोकं. आणखी काय करतील.

      वेदिका :

( हळू आवाजात)

 ही खाते का ग हिच्या नवऱ्याचं डोकं?

           रेवा :

तो आहे कुठं इथे?

    श्वेता:

   म्हणजे?

   रेवा :

 स्त्री छळाला कंटाळलेला जीव काय करील बिचारा…

           वेदिका :

   काय करेल?

       रेवा :

पळून जाईल, हिच्या नवऱ्यासारखा आणखीन काय करेल.

     अनुजा :

तुम्हाला या बाईचं वागणं खटकत नाही का ग?

    श्वेता :

     काय.

        अनुजा:

हा गणू लई चिकटूनच असतो बाईला, सारखं उंदराच्या शेपटी सारखं माग माग. हिच्या नवऱ्यानं सुध्दा कधी ऐकलं नसेल हिचं तेवढं ऐकतो तिचं, साधा एखादा शब्द खाली पडू देत नाही बाईचा.

     रेवा :

काय करेल बिचारी बकरी, काही नाही खायला मिळालं, तर बाभळीच्या शेंगा तरी खाऊन पोट भरत असेल.

( मुली हसू लागतात. मुलींची कुजबुज ऐकूण बाई )

      मॅडम :

गणू जरा बॅटरी मार बघू , कोण बोलतंय ते.

         श्वेता :

ए गप्प बसा ग, बाई तापलीय.

( कृती : गणू बॅटरी मारतो सर्व शांत बसतात. तो बॅटरी बंद करतो. मुली सिनेमा पाहू लागतात.

                                      Cut to…..

……. ……. ………

Night / ledies Hostel / inter – outer

कृती :

आरोही व तन्वी हॉस्टेलचा जिना चढून जातात. त्यांच्या पावलातील श्यांडेलचा आवाज येवू लागतो त्या आपल्या रुम मध्ये जातात. लाईट चालू करतात.

              संवाद :

      आरोही :

ए आटप लवकर. बॅटरी काढ तुझी. मी कात्री घेते.

       तन्वी :

      हा.

( त्या शोधू लागतात. त्या कात्री व बॅटरी घेतात. एकमेकींकडे पहात )

         आरोही :

चल तिला आलसेशियन कुत्रं काय काय करु शकत ते दाखवू.

( कृती : तोंडातील जीभ बाहेर काढतात. चालू लागतात. चार पावले चालल्यावर )

आरोही :

थांब.

तन्वी :

आता आणखी काय ?

आरोही :

 दोन स्टिकर्स घेते.

 तन्वी :

ती आणखीन कशाला ?

( कृती : आरोही मागे वळते. व आपल्या वहितील दोन स्टिकर्स घेते. )

आरोही :

त्यांना जाणवून द्यायचं आहे. मला की पंगा कोणाशी घेतलाय यांनी ते.

 ( कृती : त्या टेरेसवर जातात. तेथे अनेक मुलींचे कपडे उनात घातलेले असतात. तेथे गेल्यावर )

      संवाद :

      तन्वी :

माहित आहे ना… त्यांचा ड्रेस, नाहीतर दुसऱ्याच कुणाचा तरी कात्रायचा.

      आरोही :

थांब ग एक मिनिट. जरा तो टॉर्च ऑन कर बघू व काल काढलेला फोटो बघ. त्यातील ड्रेस … दाखव जरा..

 हा… हा बघ वेदीचि अन् तो तिकडचा स्वेतीचा.

         तन्वी :

हुशार आहेस ह.. अन् हा फोटो केव्हा काढलास.

       आरोही :

काल काढला… सायंकाळी, त्या दोघी फिरायला बाहेर निघाल्या होत्या तेव्हा, बर चल होऊन जाऊ दे…

  ( कृती : त्या दोघी ड्रेस कातरतात. त्यावर उंदराचे स्टिकर्स लावते. )

             आरोही :

माझा डेमो करतात का ? आता घाला म्हणावं झ्यालरीचा ड्रेस.. अन् करा कॅब्रे डान्स अन क्याट वॉक.

मेहबूबा मेहबूबा गाण्यावर…..

( कृती : ती विचित्र ॲक्शन करते. ते पाहून तन्वी हसते.)

         संवाद :

       आरोही :

चल लवकर, नाहीतर त्या मांजरी येतील वासावर माग काढत….

( त्या निघत असताना )

अग , थांब त्यांचा फोटो डिलीट करते.

( कृती : आरोही फोटो फोन गॅलरीतून डिलीट करते. त्या सर्व साहित्य जागच्या जागी ठेवून परत हॉलकडे निघतात. त्या हॉलमध्ये येतात. व आपल्या जागेकडे जाऊ लागतात. त्यावेळी )

        वेदिका :

आली उंदरीन उंडारून, आता बसेल मॅडमच पायात. आज्ञा धारक सेवका सारखी.

         श्वेता :

उंदीर नव्हे ग पालटू टॉमी म्हण..

      वेदिका :

 सोड जाऊ देत… चला सिनेमा बघू…. उगाच तिचं नाव नको…

                                   Cut to…….

……. …… ……….



फ्रेंडशिप एक साहस भाग ४

 फ्रेंडशिप एक साहस भाग ४

क्रमशः : पुढे चालू.....

Day/Inter/ Hostel 

कृती :

(वॉर्डन कमला शिरसाठ राऊंडला येतात. श्वेता व तिच्या मैत्रिणींना एक्सरसाईजा करताना पाहून)

कमला शिरसाठ :

 आज काय सूर्य पश्चिमेला उगवला वाटत.

श्वेता :

(दोरीच्या उड्या मारताना थांबून )

मॅडम,पूर्वेलाच उगवला आहे.

वेदिका :

व रोजच उगवणार.

कमला शिरसाठ :

मग काय चांगलंच आहे. की, चालू द्या तुमचं.

( मॅडम निघून जातात. मुली व्यायाम करू लागतात. )

                                          Cut to….

……. …… …… …… …….

Next day. / Morning 5, o’clock / inter - outer

(प्राजक्ता सकाळी लवकर उठून व्यायाम करत असते. ती योगा, प्राणायाम करत असते. तिचे आई व बाबा उठून गॅलरीत येतात. खाली बघत व्यायाम करत असलेली प्राजक्ता त्यांना दिसते.)

     आई :

प्राजक्ताने खूपच मनावर घेतलय चॅलेंज.

वडील :

मग चांगलच आहे की.

आई :

पण एक दोन दिवस एक्सर साईज करण व गड पायी चढण यात खूप फरक आहे. मला तर काळजी वाटतेय.

वडील :

त्यात काळजी करण्यासारखं काय आहे. जेव्हा आपल्यावर संकटे, अनेक अडचणी येतात. तेव्हाच माणूस खरा उभा राहतो. व त्याची बुद्धी सक्रिय होते , असं म्हणतात

( आपल्या हातातील घड्याळ दाखवत )

 पाहिलस किती वाजलेत.

आई :

सकाळचे पाच,

वडील :

आजूबाजूला कोण उठलाय का?

आई :

इथे कोण उठत एवढ्या सकाळी सकाळी, हे काय गाव आहे..

वडील :

पण गावाकडे उठतात ना, आपापल्या कामाला लागतात. त्यांचं आरोग्य किती चांगल असत.

आई :

हो पण.

वडील :

पण बिन काही नाही. एवढ्या सकाळी लवकर उठून एक वर्षांनंतरच चॅलेंज पूर्ण करण्यासाठी ती जे काही करत आहे.यातून ती किती प्रज्वलित झालेय ते समजते.

आई :

ते आहे खरं, सुरवात तर केलेय मॅडमनी, पण कड लावतील का? सवय नाही हो याची.

वडील :

काळजी करू नका, ती जिद्दी आहे. करेल म्यानेज सगळ.

हीच आहे हो ठीक ठाक. पण आपले चिरंजीव, त्यांचं काय.

आई :

झोपलाय तो. रात्री उशिरा झाला त्याला यायला.

वडील :

त्याला पण सांगा कसरत करायला. हल्ली त्याचा व्यायाम कमी व फिरण जास्त आहे.

आई :

तो आहे फिट, त्याची काळजी नही मला. हीचच जरा टेंशन असत.

                                   Cut to…….

….. …. . ….. ….

Day. Morning. Inter / prajakta Home dayning Holl

कृती :

प्राजक्ता अंघोळ करून आपले आवरते. व खाली डायनिंग हॉल मध्ये येते. येताना देवघरात पूजा करणाऱ्या आजीच्या पाय पडून ती डायनिंग हॉल मध्ये येते.जवळच किचन खोलीत तिची आई व सरू आपली कामे करत असतात. डायनिंग टेबलवर तिचा प्रमोद दादा नाष्टा करीत असतो. ती नष्टा करण्यास बसत.

प्राजक्ता :

आई मला पण दे.

आई :

हा देते.

(आई दूध आणून टेबलवर ठेवते.)

आई :

हा घे,

दादा :

(प्राजक्तास दूध पिताना पाहून,)

आई, वासरू दूध पीतय की.

आई :

ये गप्प पिऊ दे तिला, दृष्ट लावू नकोस.

प्रमोद :

हे बघ आई, उठेल जास्तीत जास्त दोन चार दिवस,नंतर कंटाळून सुरू करेल उठायल सूर्य उगावल्यावर.

( प्राजक्ता लक्ष न देता दुध पिऊ लागते.)

प्रमोद :

उड्या मारून दमल वाटत.

प्राजक्ता :

 ( दूध पिऊन झाल्यावर चिडून रागीट नजरेने पहात )

ये मोठा आहेस म्हणुन खूप बोलू नकोस. तोंड आवर तुझं. वासरू काय? दूध काय? सगळ समजत मला, आपल्याला एखाद्याला स्पिरीट द्यायला जमत नसेल तर उगाच पाय आडवा घालून पाडू नये माणसानं. समजलं काय.

प्राजक्ता रागाने निघून जाते. तोपर्यंत तिथे देवपूजा करून झालेली आजी येते व खुर्चीवर बसत.)

आजी :

( प्रमोदला उद्देशून )

काय प्रमोदराव वासरान धडक मारली वाटत. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होत. उठ सुठ येता जाता माझ्या नातीला टोचून बोलत असतोस, तुला काय वाटल शहरी वातावरणात राहिली म्हणजे तिच्यात उर्मीच नाही काय? हे बघ बाळा वाघ पिंजऱ्यात जरी असला तरी गवत खात नाही.

प्रमोद :

मग इतकी दिवस ही उर्मी कुठे झाकून ठेवली होती. चेष्टाच तर केली मी.

आजी :

अरे चुलीतल्या विस्तवाला पण फुंकर मारली तर तो जास्त धगधगतो . आजपर्यंत साऱ्यांनीच तिचे लाड केले. पहिल्यांदा कोण तरी भेटलेय तिचा स्वाभिमान डीवचणार, याने ती कठीण होणार एवढं मला माहित झालाय. आपणं फक्त तिला निखार्यासारखं फुलवायचं बघ. नको ते बोलायचं नाही काय?

प्रमोद :

बर बाई, नाही चिडवत,

आजी :

चीडवू नकोस असे मी म्हणत नाही, चिडव, पण तिला प्रमोट करणारं.

प्रमोद :

हुशार आहेस बघ.

आजी :

( डोक्यातील केसाला हात लावत.)

हे काय उगाच पांढरे झालेले नाहीत अनुभवाने झालेत हो.

मग काय ठरलं.

प्रमोद :

( हात जोडत )

तुमची आज्ञा शिरसावंद्य बाई.

(सर्व हसू लागतात.)

                               Cut to…..

……. …… …… ……

Morning 5,00 a.m. / in Hostel bathrum /

कृती :

(श्वेता व वेदिका लवकर उठून अंघोळ करत असतात.)

श्वेता :

किती ग थंड पाणी

वेदिका :

हॉस्टेलची फी घेतात ढीगभर पिशवी भरून यांना काय झालंय गरम पाण्याची सोय करायला.

श्वेता :

चालायचंच घर नाही हे मॅडम. लई टू टू करायचं नाही. गपगुमान सगळी बारडी एकदम भरून घ्यायची अन् ओतायची अशी.

(श्वेता बादली एकदम अंगावर ओतून घेते.)

   ( कृती : अंघोळीनंतर कपडे बदलून रुमालाने केस पुसत असतात त्याच वेळी पलीकडे बाथरूमला मानसी कोंढाणे पोट दुखत असल्याने टॉयलेटला आलेली असते.)

श्वेता :

( केसातून रुमाल फिरवत )

भारी गम्मत झाली ना गोडांबेची

वेदिका :

( आपल्या केसांना रुमालाने बांधत )

तर काय, आली मोठी शहाणी, स्वतला विद्येची देवीच समजते.

श्वेता :

 आता बस म्हणावं उंदराने कातरलेला ड्रेस घालून,

 कशी दिसेल ग ती त्या ड्रेसात.

वेदिका :

कशी म्हणजे झालर लावलेल्या झिप्र्या कुत्र्यासारखी.

( त्या हसू लागतात. इतक्यात घड्याळाचे ठोके वाजतात.)

श्वेता :

ये आटप लवकर देवळात जायचय. लवकर गेलं तर बरं. नाहीतर गर्दी होईल.

वेदिका :

चल चल…..

( मानसी त्यांचं बोलणे पलीकडे टॉयलेट मध्ये बसून ऐकूण )

मानसी :

( मनात)

हे सगळ मला अरोहीला सांगायला हवं.

( मानसी आवरुन रुम मध्ये जाते. व झोपलेल्या आरोहीला हलवून उठवत.)

मानसी :

 ए अरोही उठ की ग. उठ लवकर, तूला कायतरी सांगायचय

आरोही :

(त्रासिक चेहऱ्याने)

काय ग हे, उगाच झोप मोड करु नकोस. आजून उठायला तास - दोन तास आहेत.

मानसी :

झोपलीस काय म्हशीसारखी. तिकडे ती श्वेता व वेदी तुझी टिंगल करताहेत.

( आरोही झटकान उठून अंथरुणावर बसते.)

आरोही :

काय म्हणालीस.

मानसी :

ती श्वेता व वेदी तुझ्याबद्दल काय बाय बोलत होत्या.

आरोही :

काय बोलत होत्या.

( मानसी कानाजवळ जाऊन कुजबुजते आरोही मान हलवते. व सर्व ऐकूण रागाने चिडून)

आरोही :

ती वेदी व श्वेता खूप शेफारल्यात त्या प्राजूच्या जीवावर लई उड्या माराय लागल्यात. तो सातारा अन् बेळगाव लई त्या कोल्हापूरकर प्राजूच्या चमचा होऊन फिरतात. मला झिप्री कुत्री म्हणतात का? नाही यांना झालर लावून क्याब्रे डान्स करायला लावला तर नाव नाही लावणार ही आरोही गोडांबे, मी पण काही कच्ची नाही म्हणावं, फलटण कर आहे, फलटणकर.

                                    Cut to…..

……. ……. …….


Saturday, January 18, 2025

फ्रेंडशिप एक साहस भाग ३

 फ्रेंडशिप एक साहस भाग ३

Inter / outer /In collage / Morning.

(बेल वाजते. तासिका सुटलेली आहे. कॉलेजच्या व्हरांड्यात प्राजक्ता जिन्यावरून वर येताना आरोही समोरून जाते. तिचा चेहरा नाराज असतो. वर एका बाजूला मुली एकत्र येऊन गप्पा मारत आहेत.)

 माधवी :

लेक्चर प्रॅक्टिकल झालं एकदास.

वेदिका :

 तर काय,... वेताग आला होता.

(पाठीमागून प्राजक्ता येते. तिच्या हातात पिसव्या असतात. त्यामधे आईस्क्रिम असते. त्या समोर धरत.)

प्राजक्ता :

हा घ्या. व्हा जरा थंडगार.

(प्रत्येक मुलगी एक एक आईस्क्रिम घेते. व थॅन्क्स बोलते.)

प्राजक्ता :

 (वेदिकाकडे पहात )

काय ग मघाशी जिन्यावरून येताना पाहिलं. त्या अरोहीचा चेहरा पडलेला का होता.

वेदिका :

मॅडम दुःखात आहेत.

प्राजक्ता :

काय ग, काय झालं?.. सगळ ठीक आहे ना. की घरी कोण?

( प्राजक्ता वर हात करून इशारा करत )

वेदिका :

ये बाई तसं काही नाहीं ह.

प्राजक्ता :

मग काय झालंय?

वेदिका :

काल रात्री दुःखद निधन झालं. मॅडमच्या लाडक्या ड्रेसचं.

प्राजक्ता :

म्हणजे काय, नीट सांग की रेड्या.

वेदिका :

अरोहि मॅडमचा ड्रेस हॉस्टेलच्या उंदरांनी कुर्तडला.

प्राजक्ता :

अरेरे, वाईट झालं.

सर्व जणी एकदम :

काय म्हणालीस…..

रेवा :

प्राजे तिची दया माया करायची नाही काय, आख्या कॉलेजात विरुद्ध पार्टी कोण असेल तर फक्त तिच.

प्राजक्ता :

अग पण असं शत्रूच ही होऊ नये ग..

वेदिका :

ये गप्प उगाच माठातल्या पाण्यासारखी पाझरू नकोस हं..

प्राजक्ता :

बरं मॅडम तुम्ही म्हणाल तस्.

एक सांगा काल पाठवलेलं वेळापत्रक पाहिलात का? ते फॉलो करायचं काय?

श्वेता :

ते जरा कडक वाटतयं.

जरा झोपायची वेळ वाढवली तर बरं होईल.

प्राजक्ता :

जरा स्वाभिमान बाळगा उगाच वेळ घालवू नका . घाटी मुली अन् एवढा आळस बरा नाही. सूर्य उगवे पर्यंत घोरत पडायला पाहिजे. ते काही नाही आज कॉलेज सुटल्यावर मी सांगते तिकडे चलायचं.

अनुजा :

 कुठे जायचं. फिरायला का?

प्राजक्ता :

हो जायचय इथल्या महादेवाच्या देवळात. शपथ घ्यायला.

वेदिका :

आम्ही फॉलो करतो की, उगाच शपथ कशाला.

प्राजक्ता :

ते काही नाही, शपथ घ्यायची म्हणजे घ्यायची. मला व माधवीला सोडली तर ग्रुप मधील बाकीच्या मुलींची मार्कांची गाडी कायम खालीच असते.तेव्हा काही कडक नियम पाळले पाहिजेत.

श्वेता :

असं काय बोलत आहेस. तब्येत ठिक आहे ना तुझी.

रेवा :

काही लागिर बिगिर झालं नाही ना?

प्राजक्ता :

होय लगिरलं आहे मला स्वाभिमानी वृतीन. अरोहीने दिलेल्या आव्हानानं. ते काही नाही, मी आज संध्याकाळी शिव मंदिरापाशी सहा वाजता वाट पाहीन. तुम्ही आलात तर ठिक नाहीतर मी एकटी पैजेला सामोरी जाईन.

                                     Cut to……

......‌....... ........... ............ ..........

Evening/ Outer – inter / shiv temple

प्राजक्ता आपल्या मैत्रिणीची वाट पाहत आहे. त्या आजुन आलेल्या नाहीत. ती इकडे तिकडे फिरत आहे. घड्याळात सहाचे ठोके वाजणार आहेत.

प्राजक्ता :

अजून कशा आल्या नाहीत. आता पर्यंत यायला पाहिजे होत्या.

(ती मोबाईल फोन करते. रिंग वाजते.)

येतात की नाहीत. की गेल्या कुठे.

जाऊदे सहापर्यंत वाट पाहू नाहीतर आपण स्वतः शपथ घेवू.

(घड्याळात सहाचे टोले पडतात.)

प्राजक्ता :

येत नाहीत वाटत.

जाऊ दे, मी जाते.

(मागून हाक येते.)

श्वेता :

प्राजू…

(त्या सर्व एकापाठोपाठ एक येतात. त्या सर्व मंदिरात जातात. दीप प्रज्वलन करुन शपथ घेतात.)

ऐकत्र सामुहिक:

आम्ही सर्वजणी आज् या महादेवस साक्षी मानून अशी शपथ घेतो की शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होऊन आपली प्रगती करून या वर्षी होणाऱ्या परीक्षेत यशस्वी होऊ. व छत्रपती शिवरायांच्या तत्वाने पुढे जाऊ. व प्रगती करुन यश संपादन करू. व जीवनात शिवरायांचे तत्व अंगिकरू व रायगड पायी सर करू.

(प्राजक्ता त्यांना खडीसाखर व पेढे वाटते.)

                                 Cut to…….

…….. ……. ………. …

Next day / morning ५.०० clock / hostel and ground. / Inter – outer

मुली झोपलेल्या आहेत. घड्याळाचा अलार्म वाजतो. श्वेता उठून केस बांधून मुलींना उठवण्याचा प्रयत्न करते. हाका मारते. त्या उठत नाहीत. तेव्हा त्यांच्या अंगावर पाणी आणून ओतते.

त्या उठतात.

रेवा :

श्वेता काय हे. अस करतात का?

श्वेता :

मग पहिल्या हाकेला उठत जा. शपथ घेतलीये ना. मग तिचे पालन करा.

चला लवकर.

(त्या हॉस्टेलच्या प्रांगणात येतात. व एक्सरसाईज करु लागतात. सकाळी वॉश रुमला जाणारी आरोहीची रुममेट मानसी कोंढाणे त्या मुलींना एक्सर साई ज करताना पाहते व)

मानसी कोंढाणे :

(मनात)

कसला आवाज येतोय. कोण आहे.

(मानसी गच्ची मध्ये येते.)

मानसी :

( मनात)

काय करताहेत या. आ…, एक्सरसाईज अरोहिला सांगितलं पाहिजे .

( मानसी रुमकडे धावत जाते. मानसी आरोहीला हलवत,)

मानसी :

ऐ आरोही उठ लवकर. चल लवकर बाहेर बघ चल काय चाललेय ते.

आरोही :

काय चाललंय, झोप मोड करू नकोस. उगीच किरकिर सकाळी कशाला करतेस.

मानसी :

चल तरी, ती श्वेता व तिचा गँग बघ चल काय करताहेत.

आरोही :

काय करताहेत.

मानसी :

बघ तरी.

आरोही :

 चल पाहू.

(आरोही आपला चष्मा डोळ्यावर लावते. व उठून हॉस्टेलच्या गॅलरीत येते. श्वेता व तिच्या मैत्रिणींना एक्सरसाईज करताना पाहून,)

आरोही :

काय मानसी पोलीस भरतीत उतरणार आहेस वाटत? मला वाटलेच होते की हे फार्मसी बीर्मसी तुझ काम नव्हे.

(श्वेताच्या लक्षात अरोहीचें बोलणे येते. पण लक्ष न देता ती एक्सरासाईज करत ती लक्ष देत नाही.

इतक्यात आरोहीची दुसरी रुममेट तन्वी तिथे येते.)

आरोही :

( रेवाकडे पहात)

काय तन्वे किती केलं तरी सरड्याची धाव कुंपणापर्यंत बघ. आपणं केवढं, आपल वजन केवढं. लई आपटून घेवू नकोस. नाहीतर फुटशील भोपळ्या सारखी.

(तन्वी व मानसी हसतात. तिचे बोलणे ऐकून रेवा,)

रेवा :

ये आरे, तोंड सांभाळ, कुणाला भोपळा म्हणतेस, मला कळत नाही का? ऐका गुच्चीत गार करीन.

आरोही :

तुला कोण म्हणत. मी तर तन्वीला बोलले. तुला भोपळा म्हणणे म्हणजे भोपळ्याचा अपमान वाटतो. काय ग तनु

रेवा :

त्या खिडमीडीच्या अंगात केळ्या एवढं तरी मास आहे का? तुझे टाँटस् कळतात मला. एक बसली की फिरसिल गरगर.

आरोही :

ए जाडे, आधी पकडून दाखव मला, काल माझा ड्रेस उंदरांनी कूर्तडला तेव्हा मला पाहून कॉलेजमध्ये खिदळत होतीस ना. मला काय कळत नाही का?

अनुजा :

( मध्येच बोलत)

कोण म्हणते तुला बघुन हसत होतो, तुझं कसं आहे. कावीळ झालेल्या माणसागत, त्याला कसं सगळ जग पिवळच दिसतं. तसचं तुला पण दिसतं बघ.

आरोही :

ए सातारकर. लई नकचडीच आहेस की. जास्त बोलू नकोस, आधी फर्स्ट क्लास मिळवून दाखव. सेकंड क्लासची गाडी मला बोलतेय. मला नाही तुलाच झाली असेल कावीळ

(मानसी व आरोही हसतात.)

वेदिका :

ए बंदर छाप बिडी, चल सटक हितून, तुला दिसत नाहीं का आम्ही एक्सर साईज करत आहोत ते. अन् आम्हाला किती मार्क पडतात याचे तुला काय लागलेय. बघुया की तू फर्स्ट क्लासची गाडी कुठं जाती ते. पुढली परीक्षा झाली की बसशील जाऊन माळावर काटक्या गोळा करत. अन् तुझ्या या दोन माकडिणींना पण सोबत घेवून जा. झोळी वाल्या कुठल्या.

आरोही :

तरी म्हंटल प्राजूची चिमणी कशी बोलली नाही अजून, तिच्या हमाली करणारी तू. मला शिकवतेस, तुझं मार्क लिस्ट बघ आधी. मग ठरव मी काटक्या गोळा करते. की तू जाळीतील करवंद काढून विकत बसतेस राधानगरीच्या बाजारात ते.

(त्या सर्व चिडून आरोहीकडे पहात असतात.)

वेदिका :

थांब दाखवते तुला

(त्या जिना चढू लागतात. इतक्यात श्वेता)

श्वेता :

ए मागे फिरा, तिच्या नादाला लागू नका. आपल टार्गेट मिस नको व्हायला.

अनुजा :

बघतेस ना श्वेता कशी चुरूचुरू बोलते ती बेडकी.

श्वेता :

बोलू देत, आज तिचा दिवस आहे. उद्या आपला असेल.

( पावलांचे आवाज येवू लागतात.)

(वॉर्डन कमला शिरसाट राऊंडला येत असते.)

तन्वी :

आरोही, चल गप उगाच भांडण नको सकाळी सकाळी, कमळाबाई येतेय.

(आरोही कुस्तीत नजरेने पहात जाते.)

                                        Cut to……

……… …….. …….. …….


Monday, January 13, 2025

फ्रेंडशिप एक साहस भाग २

  फ्रेंडशिप एक साहस भाग २ लेखक : निशिकांत हारुगले.

Outer/ collage Ariya/ Morning

(कॉलेज आवारात प्राजक्ता स्कूटी पार्क करते. तिच्या मैत्रिणी गप्पा मारत कॉलेजच्या लॉन वर बसलेल्या आहेत. प्राजक्ता तिथे जाते.)

प्राजक्ता :

 भाव

श्वेता :

 काय हे, घाबरले ना.

(प्राजक्ता हसते)

प्राजक्ता :

 कशा आहात?

मुली :

 तू आलीस मग मजेत.

श्वेता :

तुझी तब्येत कशी आहे.

 प्राजक्ता :

 आहे ठीक, ह बरं आठवलं,

(प्राजक्ता पर्स उघडते. व चीठ्ठी काढून देत)

हे टाईम टेबल फॉलो करायचं काय?

श्वेता :

टाईम टेबल.

प्राजक्ता :

हो टाईम टेबल, तीन वर्ष आपण फक्त टाईमपासच केलाय. आता थोड सिरियस झालेलं बरं. या टाईम टेबल प्रमाणे वागायचं.

रेवा :

आण बघू,

(रेवा पहाते)

रेवा :

पाचला उठायचं.

प्राजक्ता :

हो

रेवा :

लई लवकर होतेय.

प्राजक्ता :

मग काय सूर्य उगवल्यावर सुरवात करायची.

रेवा :

पण..

प्राजक्ता :

पण बिन काही नाही, या वर्षी सेकंड क्लास नको. फर्स्ट क्लास हवाय. त्या गोडांबेला दाखवून द्यायचं आपली पॉवर.

Cut to…….

…… …… …… ….

Inter/  Hostel /night/१०.o’ clock

(घड्याळात टोले पडतात. वॉर्डन कमला शिरसाट राऊंड करत आहेत. हॉस्टेलची लाईट बंद करत निघालेल्या आहेत.)

श्वेता :

अग, लाईट बंद कर नाहीतर ती शृपनखा येईल ओरडत.

( वेदिका लाईट बंद करते.त्यासर्वजणी एकाजागी अंथरूण डोक्यावर घेऊन टॉर्च लावून अभ्यास करत असतात. झोपेच्या धुंदीत आहेत.)

माधवी :

पाचशे रुपये काय मागितले बया गड चढा म्हणाली. हजार मागितले असते तर,

श्वेता :

एव्हरेस्ट चढा म्हणाली असती.

वेदिका :

प्राजक्ता बाई बोलल्यात तर खऱ्या, पण….. छे बाई.

श्वेता :

प्राजू सहज म्हणाली असेल, दोन दिवसात विसरेल सगळं.

( श्वेताच्या मोबाईल मध्ये मेसेज येतो. रिंग होते.)

माधवी :

कोणाचा मेसेज आहे ग.

श्वेता :

(मोबाईल पहात)

प्राजक्ताचा

वेदिका :

 काय पाठवलंय?

श्वेता :

मॅडम टाईम टेबल चिटकवल का? विचारता हेत.

वेदिका :

आणखी,

श्वेता :

 सकाळी लवकर उठून पाचला अभ्यास करा म्हणताहेत.

माधवी :

पाचला

श्वेता :

हो पाचला,

माधवी :

मला नाही जमायचं बाई, पहाटेची झोप मला आवरत नाही. मी झोपते आता गुड नाईट.

श्वेता :

झोपला बघ रेडा.

वेदिका :

मॅडमनी गोडांबेला लईच मनावर घेतलेय.

रेवा :

 ती काय करेल बिचारी, ती गोडांबे आहेच तशी डोचक्यात जाणारी.

श्वेता :

तिची गंमत करूया का?

वेदिका :

 काय करायची.

श्वेता :

बघच तू चल माझ्याबरोबर.

Cut to...

( कृती : श्वेता रेवाच्या व वेदिकाच्या कानात काहीतरी कुजबुजते. त्या तिघी उठून रूमचे दार हळुवार उघडुन अंदाज घेवून बाहेर येतात. जीना पावलांचा आवाज न करता उतरतात. वॉर्डन कमला शिरसाठ यांच्या रूमचा अंदाज घेतात. तिच्या घोरण्याचा आवाज ऐकू येत असतो.)

Cut to..

Night /Vharanda Hostel/ Inter ११,o’clock

वेदिका :

झोपली वाटत महामाया.

श्वेता :

अग,.. हळू बोल. उठेल की ती.

रेवा :

ती कसली उठतेय, चल लवकर.

(कृती : त्या जीना उतरून खाली येतात. स्टोअर रूम मध्ये जातात. तिथे उंदीर पकडायला ठेवलेला साफळा असतो. त्यात पाच ते सहा उंदीर असतात. )

रेवा :

अग, सापळा न्यायचा का?

श्वेता :

लई शहाणी आहेस, उगीच शंका यायला काय?

वेदिका :

मग कसं

श्वेता :

डंटढ्यान …. हे बघ.

(श्वेता पिशवी दाखवते)

 रेवा :

अग कातरतील की ते.

श्वेता :

नायलोंनची आहे, लगेच कातरतील.

चल टाक… एक एक,

रेवा :

ई ….. नाही ग बाई चावला तर.

श्वेता :

उठ,.. हो बाजूला बावळट, बघ मी कशी घेते.

(कृती : श्वेता हळूच पिंजर्याच तोंड उघडुन त्याच्या तोंडास पिशवी लावते व उंदीर काढून पिशवीत घेते.)

श्वेता :

ह… चल दाखवते.

(त्या हसतात.)

Cut to…….

….. …… …… …….

Night / Hostel/ Inter 

( कृती: श्वेता व रेवा अन् वेदिका ते उंदीर खिडकीतून वरील झाप उघडुन आरोहीच्या खोलीत सोडतात. व आपल्या रुम मध्ये जातात. झोपतात.)

श्वेता :

 (उंदीर सोडताना मनात)

आता कळेल आरोही तुला आमच्याशी पंगा अन् हॉस्टेल वरती दंगा.

Cut to….

….. …. …. …. ….

Morning/ Hostel /inter - outer

 ( मुलींचा दंगा ऐकू येत असतो. अनुजाची झोप मोड होते. आरोहीच्या खोलीतून आवाज ऐकू येत असतो. काही मुली झाडू घेऊन उंदीर मारण्यासाठी पळत होत्या)

एकजण :

अग मार, मार लवकर, फरशी खाली जाईल बघ तो.

दुसरी :

भईबग……. मेला. आर… पळाला वाटत.

तिसरी :

या ब्याट्रीला साधा उंदीर मारता येत नाही.

दुसरी :

मग तू मार की, लई मोठं बोलू नकोस.

(अनुजा डोळे चोळत बाहेर येते.)

अनुजा :

काय हे सकाळी सकाळी चाललय यांचं.

(इतक्यात रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागतो.)

अनुजा :

कोण रडतंय सकाळी सकाळी,

एक मुलगी :

आरोही गोडांबे रडतेय.

अनुजा :

तिला नी काय झालं सकाळी सकाळी गळा काढायला. कोण मेल की काय.

दुसरी मुलगी :

कोण मेल बिल नाही, फक्त अरोहीचा ड्रेस कातरला उंदरांनी.

अनुजा :

मग एवढंच ना, त्यात काय एवढं दुसरा घ्यायचा.

तिसरी :

अग तो तिचा आवडता होता. तिच्या मावशीनं घेतलेला.२००० रुपयाचा

( इतक्यात माधवी देखील उठून रुमच्या बाहेर येते. त्या दोघी चालत अरोहीच्या रुमकडे जातात. तिथे आरोही रडत बसलेली दिसते , मुलींचा दंगा पाहून वॉर्डन कमला शिरसाठ व शिपाई गणू देखील येतो.)

आरोही :

(रडत..)

माझा ड्रेस, किती प्रेमानं मावशीनं घेतला होता.चांगला दोन हजाराचा होता.

(वॉर्डन कमला शिरसाठ व गणू तिथं येतात)

वॉर्डन कमला शिरसाठ,

नुसता डोक्याला ताप आहेत या मुली. जरा कुठं सकाळी डोळा लागला होता. तोपर्यंत सुरू झालं यांचं.

(गर्दी जवळ येत)

वॉर्डन :

ये व्हा बाजूला,

वॉर्डन :

काय झालं कशाला गर्दी जमवलीय. अन् ही का रडतेय सकाळी सकाळी.

माधवी :

मला वाटत कोण मेल.

(आरोही तिरकस नजरेनं पहाते माधवी गप उभा राहते आरोही रडू लागते)

 वॉर्डन कमला शिरसाठ :

ये गप ग सकाळी सकाळी उगीच कायपण बोलू नकोस.

बर, मला हे सांगा सकाळी सकाळी येवढं दंगा कशासाठी करताय.

 अन् हा काय रूमचा अवतार केलाय. मुली आहात की राक्षशीणी.

एक मुलगी :

आम्हाला काय बोलताय. उंदराचा बंदोबस्त करा आधी. किती वेळा सांगितलेय. आता केवढ्याला पडलंय

दुसरी मुलगी :

बघा आता कातरला ना ड्रेस

वॉर्डन :

गणू, तुला सांगितल होत ना. उंदराचा बंदोबस्त करायला.

गणू :

अहो मॅडम घातलं होत औषध, सर्व हॉस्टेल मधील बुटीभर उंदर टाकलीत मी. फक्त स्टोवर रुम मध्ये तेवढी राहिलीत. औषध संपल म्हणून तिथे सापळा लावला होता.

वॉर्डन कमला शिरसाठ :

मग हे काय आभाळातून टपकलेत.

गणू :

पण मी तर…

वॉर्डन कमला शिरसाठ :

पण काय पण.

गणू :

मॅडम स्टोअर रुम मध्ये लावलेला सापळा मी मगाशी पहिला त्यात उंदीर नाहीत. रात्री होते उंदीर त्यात. सकाळी बघतो तर दार उघड सापळ्याच.

वॉर्डन कमला शिरसाठ :

मग काय उंदीर दार उघडून पळालेत.

ते काही नाही. त्या उंदरांचा आजच्या आज निकाल लाव.

वॉर्डन कमला शिरसाठ :

(मुलींकडे वळत)

तुम्ही पण मुली अशा आहात. की आपल्या वस्तू नीट ठेवत नाहीत. नंतर अशी फजिती झाली की लगेच हॉस्टेलच्या नावानं खड फोडत बसता. देव जाणे, काय होणार तुमचं

चला झालं ते झालं. पूस आता डोळे,

हा काय ड्रेस.

आरोही :

हा,

वॉर्डन कमला शिरसाठ :

अरेरे, चाळणच केलीय.

असुदे झाल ते झालं, नवीन घे.

आरोही :

नविन घ्या काय नवीन, एवढं सोपं आहे का ते. माझ्यासाठी.

वॉर्डन कमला शिरसाठ :

 अग, पण आता आपणं काय करू शकतो.

ये पोरिवो चला आता आपापल्या कामाला लागा.

(सर्व मुली पांगतात.)

                   Cut to………

.... ..... ....

Inter / Hostel/In room morning

(अनुजा रुम मध्ये येते. रूमचा दरवाजा बंद करते. )

अनुजा :

हुश…

(पळत जाऊन मैत्रिणीची पांघरून ओढुन काढते.)

अनुजा :

ए रेवा उठ, ये श्वेता उठ लवकर.

रेवा :श्वेता :

ऊ…. झोपू दे ना…

अनुजा :

ये रेड्या उठ लवकर एक बातमी सांगायची आहे.

(त्या उठत नाहीत. तेव्हा ती हलवते.)

अनुजा :

ए बायांनो ऐकलात काय. आरोहीचा ड्रेस कुर्तडला उंदरांनी.

(श्वेता व रेवा उठतात.)

श्वेता :

काय म्हणालीस परत सांग.

अनुजा :

अग, त्या आरोहिचा ड्रेस कुरतडला उंदरांनी.

रेवा :

स्वातंत्र्याचे उपकार फेडले म्हणायचे

अनुजा :

 काय ग… काय म्हणालीस.

(श्वेता डोळे मोठे करुन रेवाकडे पहाते.व तोंडावर बोट ठेवत.)

श्वेता :

काय नाही ग.. तिचं म्हणणं इतकचं होत की शिवजयंतीला तिन खोडा घातला. म्हणून देवाने शिक्षा केली बिचारीला.

वेदिका :

अग, रडून रडून डोळे गोटिवाणी मोठे झालेत आरोहिचे.

 काय तर माझा ड्रेस, दिड हजाराचा होता. आ…आ….

 मला तर बाई तो सहाशेचाच वाटला. काय ते भोकांड पसरल होत.

माधवी :

जाऊ दे तो विषय, उगाच आपलीं सकाळ खराब नको. आरोही अन् तिचा ड्रेस, ती जाणे नाहीतर तिचे रडे जाणे, आपल्याला काय करायचे त्याचं . उठा… लवकर आटपा. करंजफेण मॅडमच लेक्चर आहे. महत्वाच्या नोटस देणार आहेत.

वेदिका :

हुं….. तिच्या सगळ्या नोटस महत्वाच्याच असतात. कुठून आणते कुणास ठाऊक. तिच्या नोटसनी तर संपूर्ण कपाटच भरलय. कॉलेज मधील पुस्तकातील पानापेक्षा हिच्या नोटसची पानेच जास्त.

श्वेता :

ते काही असू देत, तिच्या लेक्चरला गेलं नाहीतर डोकं खाईल बाई. व प्राचार्यांच्या केबिन पर्यंत ओरडत जाईल, काय तर…. हल्ली कॉलेजच्या मुली बिघडल्यात, लेक्चर अटेंड करत नाहीत. तासिका बुडवितात, माझा तर मुडच हाफ होतो बाई, हे सगळ ऐकण्यापेक्षा पाऊण तास झेललेल बरं बाईला. तिचा नवरा कसा हिच्यासोबत नांदतो देव जाणे.

…. बरं ते सोडा चला आटपा लवकर

( त्या अंथरूण काढू लागतात.)

                                    Cut to……


वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...