| केरोसीन |
ग्रामीण भागातील एक घर एक स्त्री स्वयंपाक करत आहे. जवळ लहान मूल खेळत आहे. थोड्या वेळाने तिचा नवरा तिथे येतो. ती चहा बनवून देते.
“अहो ऐकल का घरातील रॉकेल संपलय.”
“अग, कधी तरी घरात आल्यावर चांगली बातमी देत जा. रोज काही ना काही संपलेल असत.”
“आम्ही काय पित नाही, जावा, आज सुटी आहे. घरीआहात. मागील महिन्यात काहीच आणल नाही.”
तो तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. चहा घेतल्यावर केरोसीनचा रिकामा केन व स्वस्त धान्य दुकानाचे कार्ड घेतो व दुकानाच्या दिशेने जातो. दुकानाच्या बाहेर पाटी असते.
रॉकेल संपले आहे.
तो माघारी येतो येताना वाटेत सिलेंडरची गाडी जाताना दिसते. त्यावर लिहिले होते .
‘उज्वला गॅस योजना धूरमुक्त भारत .’
तो घरी येतो त्याच्या हातातील रिकामा क्यान पाहून त्याची बायको चिडते .
“आलात रिकामे.”
"मग काय करू रॉकेल संपले आहे ना."
" अहो, ते तसच म्हणतात, पवाराची सूमी आली नव्ह काल घेऊन."
" बरं उद्या बगु."
जेवण करून ती दोघे रात्री झोपी जातात.
त्याची बायको त्याला सकाळी उठवते. व बंब
तापवणेस सांगते. तेव्हा तो उठून जातो. काडेपेटी घेतो व चिमणी हातात घेऊन हलवतो.
“अरे, यात तर रॉकेल नाही.”
तरी देखील तो बंब पेटविण्याचा प्रयत्न करतो.
शेण गोळे टाकून लाकडे टाकतो;पण रॉकेल नसलेने बंब पेटत नाही वैतागतो व आजूबाजूचा पाला पाचोळा गोळा करून कसा बसा बंब पेटवतो.
थोड्या वेळाने राशन दुकानात जातो.
“साहेब रॉकेल मिळेल का?”
“बाहेर पाटी वाचली का नाही. की अडाणी आहात.”
“पण साहेब आम्ही या महिन्याच रॉकेल नेल नाही.”
“आहो, रॉकेल सरकारंन बंद केलंय.”
“पण असं का?”
“उज्वला योजने अंतर्गत आपण सिलेंडर घेतलय ना.”
“आहों. भारनियमामुळे कंदीलात घालण्यापूरत तरी द्या.”
“ते काही नाही उजेडासाठी दुकानात मेणबत्त्या मिळतात ना.”
“आहों ,पण रात्री रानात पाणी पाजय गेल्यावर कंदील उपयोगी पडतो. मेणबत्ती नाही.”
“मग चार्जिंग ब्याट्री घ्या.”
“चूल व बंब पेटवण्या पुरत तरी द्या.”
“ते काही नाही तुम्ही जा बरे.”
तो निराश होऊन घरी येतो तेव्हा त्याची बायको विचारते.
“रॉकेल मिळाले का?”
“नाही.”
“मग आता?”
“बघायचा दुसरा पर्याय.”
“आव, आता उन्हाळ्यात बर पालापाचोळा चूल व बंब पेटवण्यासाठी वापरू, पावसाळ्यात काय करायचं बोला..”
“पावसाळ्यात बघू काहीतरी.”
दुसऱ्या दिवशी तो बंब पेटवण्यासाठी उठतो. काही कागद कपटे फाडून बंबात टाकतो व त्यावर शेण गोळे टाकून लाकडे घालतो व जाळ लावतो व पाणी तापवतो. व हसत
“अडचणी येतात तर मार्ग मिळतो.”
निशिकांत हारुगले
No comments:
Post a Comment