मोफत राशन
| मोफत राशन |
ग्रामीण भागातील एका गावातील गल्लीतून एक जीप गाडी स्पीकरद्वारे पुकारत जाते. कोरोनामुळे बाहेर जाणेस मज्जाव. व सरकार सर्वांना मोफत धान्य वाटणार आहे.दुसऱ्याच दिवशी राशन दुकानात गर्दी होते.सर्व स्वस्त धान्य मिळणारे कार्ड धारक जमतात. सर्व आनंदी आहेत.मोफत धान्याची पोती घरी घेऊन जात आहेत.
श्रीपती मोफत धान्य घेऊन घरी येताना राजारामभाऊ वाटेत भेटतो.
“ काय श्रीपतराव मोदी न पाठवलेलं धान्य वाटत.”
“व्हय कोरोनाची कृपा, तुम्ही नाही आणलं.”
“आमच्या आज्याला पेन्शन मिळते, आम्हाला कसं मिळणार.”
“पण मोफत धान्य तर सर्वांना मिळत.”
“मी गेलो होतो विचारायला पण “आमच्या केसरी कार्डाला लाल दिवा दाखवला त्या दुकानदाराने.”
“बरं येतो आता रामराम.”केसरी कार्डाला
“रामराम.”
तो घरी येतो घरात धान्याची पोती ठेवतो.त्याची बायको खूप खुश असते.
काही दिवस जातात.काही कामधंदा नसल्याने घर खर्च चालवणे कठीण जाते. जनावरांचे दुधाचे पैसेच फक्त घरखर्च चालवत असतात.मोफत मिळणाऱ्या धान्यामुळे त्याचे शेताकडे लक्ष नसते .बिन कष्टाच्या धान्यामुळे शेताकडे तो लक्ष देत नाही.त्यामुळे शेतात तण वाढू लागते.त्याचाच कित्ता अनेकजण शेतकरी गिरवतात.
त्याची बायको शेत करायचा विषय काढते तेव्हा तो आळसाने तिला म्हणतो,
“फुकटच धान्य मिळतंय. शेत कशाला करायचे.”
“आव, पण शेत कराय नको का?लोक नाव ठेवतील.”
“ठेवुदेत त्यांना बघवत नाही. आम्हाला धान्य मिळतंय ते.आवंदा मी शेत करणार नाई.”
“कळंल, सरकार काय आयुष्यभर पोसणार नाही.”
“जा लई शहाणी हाईस.”
त्याचे मित्र पण समजावतात पण तो लक्ष देत नाही. त्यांना नको ते बोलतो.
शंकर,"अरे ,श्रीपती वावर कस पुढे फायदा होईल."
श्रीपती,"जा तू मी अवंदा काय करणार नाय. पडून राहू दे."
तो कोणाचंही एकत नाही.
थोड्या दिवसांनी लॉकडाऊन उठते. व मोफत चे धान्य बंद होते. व मोजकेच धान्य मिळू लागते. तेव्हा श्रीपती शेतातील तण काढू लागतो. तेंव्हा इतर मित्र त्याला बघून हसत असतात. तेव्हा त्यांकडे पहात,
शंकर,"अर , सदा आता सरकार देत की नाई र गहू, तांदूळ."
सदा,"आर देणार की एखादा रोग आल्यावर."
शंकर,"पण मी म्हणतो शेत करण्यापेक्षा वाट बागितली तर..."
सदा, "बघायची बायका पोरासणी सांगायचं कशाला राबाय पायजे , एखादा रोग आला की कस फुकट सरकार पोसत बघ."
त्यांचे टोमणे एकूण श्रीपती लाजतो.
“खरं आहे बाबांनो तुमचं फुकटच गावल व बापलेक धावल, थोडेच दिवस ते , आपलं कष्टाचंच बर त्याची गोडी न्यारीच.”
तो कष्ट करू लागतो. थोड्याच दिवसात तणकट वाढलेल्या शेतात चैतन्य येते व हिरव्या ताटातून कणसे उभी रहातात. व घर धान्यानेभरून जात.
निशिकांत हारुगले
No comments:
Post a Comment