शेंट
जिल्हा परिषदेच्या शाळेतील वातावरण सकाळचे अकरा वाजले. शाळा सुरू झाली मुले वेगवेगळ्या घरातील व आर्थिक स्तरातील हजर झाली आहेत. इयत्ता चौथीच्या वर्गातील मुले वर्गात एका बेंचभोवती उभा आहेत. त्यांचे शाळेचे ड्रेस सुंदर व नीटनेटके आहेत पांढरा शर्ट व काळी पँट. काहींनी सुगंधी अत्तर लावलेले आहे. इतक्यात एक मुलगा वर्गात प्रवेश करतो.त्याच्या हातात साधी पिशवी आहे त्या्च्या अंगावरील ड्रेस मळलेला आहे. खेडवळ आहे. तो वर्गात आल्यावर गोंधळतो . त्याचे वर्गबंधू अंगाचा वास एकमेकाला देत व आपला ड्रेस दाखवत असतात. त्या मुलाने त्यांकडे पाहिले व आपला पेहराव पाहिला व आपल्या हाताचा वर उचलून वास घेतला. घामाचा वास येत होता. शेजारी मुलांजवळ बसण्याचे सोडून तो एका बाजूस असलेल्या बाकावर बसतो. शिक्षक आलेले नसतात.मुलांमध्ये चर्चा चालू असते..
त्यातील एक,” अरे, सोहम चार दिवसांनी १५ ऑगस्ट आहे..”
सोहम, “मी नवीन शर्ट घालणार.”
समीर, “ मी कडक ईत्री ड्रेसला करणार, व मामाच्या लग्नातील अत्तर लावणार.”
थोड्या वेळाने त्यांचे लक्ष शेजारील त्या मळके कपडे घातलेल्या श्यामकडे जाते ते त्याकडे पाहतात व हसतात व त्याकडे पहात,
सोहम, “अरे हा कोणते अत्तर लावेल.”
वेदांत, “त्याच्या अंगाला रोजच अत्तर असते.”
सोहम, “त्याचा घाम.”
समीर, “कपडे तरी बघ त्याचे किती मळलेत किती साबण लावला तरी स्वच्छ निघणार नाहीत.”
श्याम सर्व काही ऐकत असतो. मनात ‘ यांना काय माहीत माझी परिस्थिती, माझ्या घरची हालत रोज मजुरी केल्यावर घरातील चूल पेटते. ते काही नाही आज पासून आपण काहीतरी काम करायचं व आपला शाळेचा ड्रेस व इतर खर्च भागवायचा. एवढे ठरवून तो मनात ठेवतो. सर्व तास संपतात. शाळा सुटते. तो शाळेच्या फाटकातून बाहेर पडतो व धावत जातो. जाताना एका कारखान्याचे गोडाऊन जवळून जाताना तेथे
“काही काम आहे का?”
एक छोटा मुलगा काम मागत्याले पाहून मॅनेजर “काय पाहिजे तुला.”
“काहीतरी काम हवंय.”त्याला जवळ बोलवत “बाळ आम्ही लहान मुलांना कामावर ठेवत नाही. लहान मुलांना कामावर ठेवणे गुन्हा आहे.”
“पण मला पैसे पाहिजेत गरज आहे."
“किती पाहिजेत.”
“पन्नास रुपये.”
“कशाला?”
“साबण घ्यायला,”
“हे घे मी देतो.”
“नको, मला फुकटच काही, काहीतरी काम द्या त्यापेक्षा.”
त्या गोंडस मुलाचे बोलणे एकूण मॅनेजर अवाक झाला. व थोडा विचार करून त्याला म्हणाला, “ हे बघ तू इथे रोज संध्याकाळी येऊन या गोडाऊन मधील ही पडलेली रिकामी पोती गोळाकरून झाडायची व पलीकडील रूममध्ये ठेवायची. श्यामला खुप आनंद झाला. त्याने रोज यायचे ठरवले, व तो उड्या मारत घरी गेला. दुसऱ्या दिवसापासून तो शाळा सुटल्यावर त्या गोडावून मध्ये काम करू लागला दोन दिवसांनी त्याने कामावर गेल्यावर गोडावून मॅनेजरकडून दोन दिवसाचे कामाचे पैसे मागितले.
श्याम, “साहेब, मला दोन दिवसाचे कामाचे पैसे मिळतील का?”
मॅनेजर, “का रे लगेच.”
श्याम, “परवा १५, ऑगस्ट आहे ना. त्यासाठी.”
मॅनेजर, “ बर.”
मॅनेजर काऊंटर मधून ६०रुपये काढतो व त्याला देतो. श्याम ते आनंदाने घेतो, व घराच्या वाटेला लागतो. वाटेतील दुकानातून एक वासाचा मैसूर श्यांडेल सोप घेतो. व दुसरा ओके साबण व टाईड पावडर दहावाली त्याकडे आता दहा रुपये राहिले. त्याला काहीतरी खाऊ घ्यायचा असतो; पण तो आपल्या भावनांना आवर घालून फुलवाल्याच्या दुकानाजवळ येतो दुकानात फुलवाला हार गुंफत असतो त्याकडून काही निशिगंधाची फुले घेतो व घरी येतो. घरी आल्यावर तो आपले कपडे काढून स्वच्छ साबण लावून धुतो. व सुकल्यावर तांब्यात चुलीतील विस्तव टाकून इस्त्री करतो. व माळ्याकडील आणलेली फुले कपड्यात अलगत ठेवतो. सकाळी त्याला सुंदर वास सुटतो. सकाळी ती फुले काढून टाकतो. व दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्टला तो ड्रेस घालून शाळेत जातो. शाळेला जाताना एक समाजसेवक वाटेत त्याच्या खिशाला एक बिल्हा लावतो. श्याम हास्य मुद्रेने शाळेच्या फाटकातून प्रवेश करतो. सर्व मुले त्याच्याकडे पहात असतात.त्याच्या ड्रेसला निशिगंधाच्या फुलांचा वास येत असतो. तो खूप आनंदी असतो. कारण सर्व मुले त्यांच्या वडिलांवर अवलंबून आहेत. तो मात्र स्वतच्या पायावर उभा आहे. स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा सुगंध सर्वत्र सुटला आहे.
nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com
निशिकांत हारुगले
No comments:
Post a Comment