अस्तित्व पटकथा भाग ९
अस्तित्व पटकथा भाग ९ मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
क्रमशः पुढे चालू ........
उमाचा रिझल्ट लागला. दहावी झाली. उमा व मैत्रिणी पास झाल्या. शाळेतून बाहेर पडल्या. घरी आल्यावर. उमा पाया पडू लागली.
आई, “ माझी गुणी बाय.”
गणपतराव, “ उमा तुला कॉलेज करत आश्रमात शस्त्र प्रशिक्षण देऊया का?”
शकुंतला, “ कशाला हवे पोरीच्या जातीला, उद्या नवऱ्याचे हात - पाय मोडायची. कायतरीच तुमचं आपलं.”
आजी, “ तिचं काय ऐकतोस. घाल पोरीला. शिकु देत.”
शकुंतला, “ लग्न झाल्यावर नवऱ्याच डोकं फोडून माहेरी नाही आली म्हणजे झालं.”
आजी, “ ती काही अर्ध्या डोक्याची नाही. अन् आली तर खाऊन संपणार नाही तिला आयुष्यभर इथं. इतकं हाय.”
शकुंतला, “मग बस घेऊन घरात.?”
ती रागाने आत गेली. आजीने गणपतराव ना इशारा केला.
….. …….
दिवसांची वेळ बारा वाजले. कॉलेजमध्ये फॉर्म भरायला गर्दी उसळली. उमाने कॉलेजमध्ये फॉर्म भरला. तसेच गुरुकुल मध्ये तिने शस्त्र व धार्मिक शिक्षण घ्यायला तिने सुरुवात केली. तिच्या मैत्रिणींना त्यांच्या घरातील मंडळींनी शिक्षण थांबवले होते. त्या फक्त कॉलेज करत असत. उमा आश्रमात शिकलेले सर्व ज्ञान आपल्या मैत्रिणींना रविवारी शिकवत असे. तिने चांगले मार्क मिळवले. व शस्त्र कला ही शिकली. तिच्या मैत्रिणींची मात्र दोन वर्षात लग्न उरकली गेली.
……….. …………..
सकाळची वेळ, मल्हारी घरातून गाडी घेऊन शेताकडे निघालेला होता. वाटेत एक स्त्रीने लिफ्ट साठी हात केला.
स्त्री, “ अहो, थांबा, थांबा.”
मल्हारी, “ काय हाय?”
स्त्री, “ मला थोडं पुढे सोडता का? बाकीच्या स्त्रिया पुढे गेल्यात. मला वेळ झालाय.”
मल्हारी, “ बरं, बसा.”
तो गाडी चालवू लागला. अचानक थोडं पुढे गेल्यावर त्या स्त्रीने त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मल्हारीने गाडी थांबवली.
मल्हारी, “ ये, चल उतर.”
स्त्री, “ अस काय हे , तुम्हाला काहीच वाटत नाही का?”
मल्हारी, “ मला काय वाटू अगर न वाटू देत, तू उतर खाली.”
ती गाडीवरून उतरली. मल्हारी गाडी घेऊन पुढे गेला. पण या सर्व धामधुमीत नदीला निर्माल्य सोडायला गेलेल्या पुजाऱ्याने पहिले.
….. ……. ……….
मल्हारीचे वडील दुसऱ्यादिवशी सकाळी गावातून फेर फटका मारायला गावातून चाललेले होते. ते देवळात देवदर्शनासाठी गेले असताना. देवळात जाऊन घंटी वाजवून पाया पडले.
पुजारी प्रसाद देत.
पुजारी, “हा घ्या.”
सदाशिवराव, “ जी “
प्रसाद घेतल्यावर.
पुजारी, “मला थोड बोलायचं होतं.”
सदाशिवराव, “ बोला की.”
पुजारी, “नाही म्हटलं, मल्हारी आता मोठा झालाय, लग्नाचं बघता की नाही त्याच्या.”
सदाशिवराव, “ चाललंय पहायचं. बघू कुठे जुळते का?”
मधुकर पुजारी, “ तसं नाही, काल मी नदीहून येताना बसवण्णाची पोर बघितली मल्हारीच्या गाडीवर, तुम्हाला माहित आहे ना ती कशी आहे ती. नाहक बदनामी नको. वेळीच निर्णय घेतलेला बरा. “
सदाशिवराव, “बर झालं सांगितलं तुम्ही ते. तुम्ही पण बघा एखादं स्थळ. टाकू उडवून बार.”
पुजारी, “बरं, बरं, बघतो.”
सदाशिवराव, “ बर निघतो आता.”
पुजारी, “जी “
देवळातील घंटी वाजल्याचा आवाज होतो.
….. …… …….
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा