शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Thursday, October 19, 2023

कळत नकळत जुळले ते बंध भाग १

 कळत न कळत जुळले ते बंध 

 : निशिकांत हारूगले.

Day/ राधानगरी अभयारण्य  morning  

अभयारण्यात नऊ तस्करांचे टोळके रानात एके ठिकाणी जेवण करत आहेत. त्यांच्या पुढ्यात पत्रावळी वर भात व मच्छि ते खात आहेत.

भिवा, बातमी क्लिअर हाय ना?

सदा, म्या काल स्वतःच्या कानान ऐकलय, आज कुठेतरी ट्रेनिंगला जाणार हाईत म्हणून.

तुक्या, हे बघ खर सांग नायतर सापडायचो , अन् सगळं केलेलं काम फुकटात जायचं.

भिवा, चल बघू सकाळचे सात वाजलेत कोण येतय एवढ्या सकाळी मरायला. आफिसर पडलं असतील डाराडूर होऊन.

तुक्या, बर किशा तू जा टेकावल्या जांभळीवर,

किशा, जी दादा.

बाकीचे एकामागून एक निघतात, काळ्याशार रंगाचे पांढरे धोतर घातलेले ते आपला गुप्त माल लपवलेल्या ठिकाणी निघालेत.

Cut to

……. ……. ……. …….

Today that time  morning

राधानगरी फोंडा रोडवरून एक फॉरेस्ट खात्याची जीप निघाली आहे. ती राधानगरीत रोडवर एका चहाच्या टपरीवर येऊन थांबते. त्यातील एक तरुण सावळ्या रंगाचा ऑफिसर उतरून टपरीकडे गेला. तिथे गेल्यावर

ऑफिसर ईशान, आज काय गरमागरम.

टपरीवाला, सॉलिड गरमागरम म्हणाल तर चहा आहे,

ईशान, द्या मग सहा गरमागरम चहा. आज थंडी पण खूप आहे. होऊ द्या गरम.

टपरीवाला, (चहा ओतत इशारा करतो. व एक चिठी पुढे सारतो. ईशान ती चीठी उचलून नकळत नजर टाकून पहातो. व गाडीत बसलेल्या सुरेशला )

सुरेश चहा दे.

सुरेश जीपमधून उतरुन चहा देतो. सगळे चहा घेतात.

ऑफिसर ईशान, “ मोहन स्टार्टर मार. आज शिकार्यांची शिकार करूया. लई दिवस दमवत होते. आज बरोबर सापडले.

मोहन जीप चालू करतो. जीप निघते.

…..

थोड्याच वेळात ती एका रानवाटेस लागते. पुढे एक नाला पार करते. हिवाळा चालू झाल्याने नाल्यास

पाणी कमी असते. नाला पार करून जीप पुढे जाताना कोकिळ हाक ऐकू येते.

ईशान, गाडी थांबवं, पांडू, महादू उतरा व ती झाडावरील कोकिळ पकडा आधी.

ते दोघे उतरतात व झाडाकडे पळतात.

.... ..... ..... .... ..... 

कोकिळ कुक ऐकू येताच

भिवा व इतर साथीदार कान टवकारून एकमेकांकडे पाहतात.

भिवा, ये झाका लवकर,

ते तो माल झाकून त्यावर माती लोटतात व झाडाचा पाचोळा टाकतात. व रानातील लाकडे गोळा करून छोटा बिंडा बांधू लागतात.

...........

गाडी पूढे जाते. एका वळणावर धावत्या जीपमधून उडी मारून ईशान धावू लागतो. ड्रायव्हर जीप थांबवतो बाकीचे वनरक्षक त्या मागे धावू लागतात. तो एका आडव्या वेलीवरून झेप घेऊन धावत टेक चढून त्या ठिकाणी येतो.

इशान, (तिथे गेल्यावर)

'काय करताय इथं येवढ्या सकाळी.'

भिवा,

काय नाही साहेब, वाईच लाकड गोळा करताव, चुलीच सरपण संपलय, तवा म्हंटल…

तुका, ( तिथे बसून एक छोटीशी मोळी बांधत असतो. जरा दचकूनच असतो.)

इतक्यात एक वनरक्षक तिथे येतो.

फॉरेस्ट एरीयात वीना परमीशन सरपन गोळा करताय, कायतरी गौडबंगाल तर नाय ना.

भिवा, काय पण नाही साहेब बघा की काटक्याच गोळा केल्यात फक्त.

इशान बारकाईने पाहतो. त्यांचे हात पाय मातीने लाल झालेले असतात. घामावलेल अंग, तो इकडे तिकडे पाहतो. काही अंतरावर मातीचा उकिर दिसतो. तो हसतो.

इशान, (वनरक्षकास )काय रे सरपन जमिनीच्या खाली सापडत की झाडावर

वनरक्षक, झाडावर.

इशान, मला तर इथ जमिनी खालीच दिसतंय.

इशानचे बोलणे ऐकूण ते एकमेकांकडे पाहू लागतात.

इशान पुढे होतो व तेथील माती उकरल्या ठिकाणी असणारी माती बाजूला सारून त्याखाली असणारी तरटी उघडी करतो. तिथे प्राण्यांची शिंगे, जंगली औषधी, व कातडी असते.

इशान, सरपण गोळा करतात मग हे काय आहे.

पाठीमागे असणारा वनरक्षक, अरेर हे असलं सरपण मी तरी कधी चुलीत घालताना नाही पाहिलं.

दुसरा वनरक्षक, साहेब हे सरपन आता कुणीकडून चुलीत घालायचं.

वनरक्षक, धरा रे यांना

ते दोघे त्याना पकडण्यास पुढे जातात. त्यातील आडदांड हाताने त्या दोघांचे गळे पकडून त्यांना रेटत एका झाडाकडे नेतो.

ते ओरडू लागतात.

बाकीचे तस्कर हसू लागतात.

इतक्यात एकजण इशानला पकडण्यास जातो. त्याला एक रट्टा बसतो. त्याला सगळ धुंद होऊन जात. मग दुसरा त्यावर धावून जातो. इशान एक एक करत सगळ्यांना चेचतो.

थोड्या वेळात बाकीचे जमिनीवर लोळत असतात.

तो मग त्या आडदांड माणसाकडे बघतो. ज्याने दोन वनरक्षकांना पकडले होते. त्याजवळ येऊन त्यास ही एक रट्टा देतो. तो देखील खाली पडतो.

ते वनरक्षक

एक वनरक्षक, साहेब होते म्हणून बर झाल,  नाही तर त्या रेड्यान यमाकडेच पाठवलं असत.

दुसरा वनरक्षक, तर काय त्याचा तो काय हात म्हणायचा. हत्तीचा पायच जणू. वाचलो बुवा.

ईशान, आता बघत बसू नका पकडा त्याना व चला बघू त्यांचा हिशोब.

इतर वनरक्षक त्यांना जेरबंद करून नेतात.ईशान स्टाईलने गॉगल आपल्या चेहऱ्यावर लावतो.

Cut to….

..... ..... ..... ..... .....

Day next day. Morning ११.३०

Inter – outer- inter.

फॉरेस्ट ऑफिस शिरीष साळुंखे फॉरेस्ट ऑफिसर केबिन

शिरीष साळुंखे बेल वाजवतात बाहेरील कर्मचारी पांडू आत येतो.

शिरीष साळुंखे, पांडू ईशान सर आलेत का?

पांडू, मघाशी केबिन झाडताना दिसले नाहीत. येतील इतक्यात साडे अकरा झालेत.

साळुंखे, ते आले की पाठव केबिनमध्ये. अन् हो ही फाईल क्लार्क देशपांडेंच्या टेबलावर नेऊन दे.

पांडू, जी सर.

इतक्यात ईशान आपल्या मोटारसायकल वरून तिथे येतो.

बाहेर एक कर्मचारी

कर्मचारी, नमस्कार सर,

ईशान, नमस्कार.

ईशान ऑफिस मधील आपल्या केबिनकडे जाताना. पांडू तिथून जात असतो.

पांडू, ईशान सर,

ईशान, काय रे.

पांडू, साळुंखे साहेब बोलावत होते.

ईशान, बर, हा.. ह.. कुठे निघालास.

पांडू, देशपांडे साहेबाना फाईल द्यायला.

ईशान, बर, माझं एक काम कर, एवढी बॅग माझ्या केबिन मध्ये टेबलावर नेऊन ठेव.

पांडू, बर, द्या ती इकडे.

पांडू बॅग घेऊन जातो.

ईशान साळुंखे सरांच्या केबिनकडे जातो. बाहेरून नोक करून,

ईशान, सर आत येऊ का?

साळुंखे साहेब टेबल वरील फाईल तपासत, वर तोंड करून पहात.

साळुंखे साहेब, कोण ईशान ,ये ये, अभिनंदन .

ईशान, कशाबद्दल,

साळुंखे साहेब, अरे तू एवढी मोठी तस्करी पकडलीस, त्याबद्दल.

ईशान, ती तर माझी ड्युटी होती सर.

साळुंखे साहेब, पण आजकाल तुझ्यासारख्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांची कमी आहे. तू ज्या कौशल्याने काम करतोस मला तर नवलच वाटत.

ईशान, काय पण सर, येवढं काय मोठ काम केलं नाहीये मी.

साळुंखे साहेब, नाही कस, अरे बऱ्याच वर्षापासून आम्हाला गुंगारा देवून हे तस्कर बऱ्याच प्राण्यांची, त्यांच्या अवयवांची, जंगली औषधांची तस्करी करत आहेत. बऱ्याचदा सापळा रचून ही सापडत नव्हते. आपल्यातील काही महाभाग सामील आहेत त्यांना म्हणा, पण तू मोठ धाडस केलस.

ईशान, उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका सर,

साळुंखे साहेब, उगाच नाही.खरंच

ईशान, बर आणखी काय काम होत का माझ्यासाठी, मघाशी पांडूने सांगितल तुम्ही बोलावल म्हणून.

साळुंखे साहेब, हा हे बघ ही ऑर्डर घे.

साहेब एक लिफाफा ईशान कडे देतात. तो घेत

ईशान, यात काय आहे.

साहेब, अरे आपल्या फॉरेस्ट खात्याची मोठी परिषद अलिबागला आयोजित केली आहे. प्रत्येक विभागातील एक कर्मचारी तिकडे ट्रेनिंग व मार्गदर्शन घेण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. यासाठी फोरेनहून अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक येणार आहेत. आपल्या ऑफिसतर्फे तुझी निवड केली आहे. या लिफाफ्यात सर्व माहिती आहे.ती बघून घे.

ईशान, बर सर, आणखी काही.

साळुंखे साहेब, आणखी काय, याबरोबरच अलिबाग सफर पण करून ये.

ईशान , (हासत) बर सर येतो,

साहेब, हा.

Cut to.

……. ……. ……. ……. …… ….

Day inter outer

कोल्हापूर मेडिकल कॉलेज परीक्षा हॉल पेपर मुले लिहीत आहेत. बेल वाजते.पेपर गोळा केले जातात. मुले बाहेर पडत आहेत. अन्विका आपल्या स्कूटी जवळ पार्किंग एरियात येते. आपल्या स्कूटीच्या डिग्गीत ती पेपर ठेवत आहे. इतक्यात मागून येत

सौरभ, काय मॅडम पेपर कसा गेला.

अन्विका, मस्त सोपा गेला.

इतक्यात वेदांगी तिथे येते.

वेदांगी, हाय अनु, हाय सौरभ,

सौरभ, हाय, काय वेदांगी पेपर कसा गेला.

वेदांगी, ठिक गेला.

सौरभ, मग आता परीक्षेच्या अभ्यासातून सुट्टी ना.

वेदांगी, हो यार, काय सांगू खूप टेन्शन होत ,गेलं एखदास.

इतक्यात सात्विक तिथे येत

हाय वेदांगी, हाय अनु,

त्या दोघी, हाय.

सात्विक, पेपर कसा गेला,

अन्विका, मस्त, सोपा होता. तुला रे.

सात्विक, चांगला गेला.

बर एनिवे गाईज आपण उद्या एक छोटीशी ट्रीप काढतोय हा.

वेदांगी, अरे यार मला आधी नाही का सांगायचं, घरी वांदे होतात रे, आमचे पप्पा जाम कडक आहेत,

सात्विक, ये वेदे, उगाच खोडा घालू नकोस ह. तू फक्त हजर रहा.

अग हे आपल शेवटचं वर्ष, परत कधी भेटू न भेटू. तुम्ही उद्या या. सगळ्यांचं ठरलंय.

अन्विका, बर कुठ जायचयं.

सात्विक, पन्हाळ्याला

अन्विका, चालेल आम्ही येवू.

वेदांगी, अरे इथे कुठेतरी जवळ काढुया की.

सौरभ, ये जवळ काय जवळ, हॉस्टेलवर कराय पाहिजे मग ट्रीप.

इतक्यात अन्विका फोन लावते.

अन्विका, हॅलो काका,

पलीकडून

काका,हा बोल,

अन्विका, काका मी अन्विका बोलतेय.

काका, हा बोल की अनु बाळ पेपर झाला का?

अन्विका, हो काका,

काका, बर कसा गेला, वेदांगी कुठे आहे.

अन्विका, चांगला गेला , व ती माझ्या सोबत आहे. बर का काका उद्या एक आम्ही छोटीशी ट्रीप काढतोय. पन्हाळ्याला, वेदुला घेऊन जाऊ ना.

काका, अ..हो.. चालेल की, लगेच येणार ना.

अन्विका, हो काका सात पर्यंत येऊ संध्याकाळी.

काका, तू असलीस तर ठिक आहे. चालेल.

काका, बर तिच्याकडे दे.

वेदांगी, कावरी बावरी होऊन फोन घेते.

वेदांगी, हॅलो बाबा,

बाबा, पेपर कसा गेला.

वेदांगी, ठिक गेला बाबा.

बाबा, मग आता घरी ये. उद्या जा ट्रीपला पण सात पर्यंत घरी ये. समजल काय.

वेदांगी, हो बाबा.

बाबा, बर आईला घरी गेल्यावर सांग मला जरा वेळ होईल, मी बाहेरच जेवून येईन म्हणावं.

वेदांगी, बर सांगते. ठेवू का.

बाबा, ठेव, व अनु बरोबर घरी जा.

वेदांगी, जी.

वेदांगी फोन ठेवते. व अन्विकास आनंदाने

वेदांगी मिठी मारत,

थॅन्क्स अनु, तू असलीस म्हणजे सगळं कोड सोडवतेस. म्हणून मला जाम आवडतेस तू.

अन्विका, उगाच मस्का नको लावूस.

सौरभ, मिळाला वाटत हिरवा सिग्नल.

वेदांगी, अनु असली की मिळतो लगेच.

अन्विका, बर किती वाजता निघायच, कस.

सात्विक, सकाळी ८ वाजता निघुया. व प्रत्येकी दोघांमध्ये एक गाडी घेऊ.

अन्विका, चालेल. मी व वेदांगी येतो दोघी. साडे आठला आहोत आम्ही शिवाजी पुलावर. तुम्ही सगळे या तिथे मग निघू.

सात्विक, चालेल, मी सांगतो सगळ्यांना.

अन्विका, बर बाय.

सात्विक, बाय.

 त्या सर्वांना भेटून निघतात.

…. ….. …… …… …… …..

Day morning inter

कोल्हापूर शहर ‘ शिव -सदन बंगला सकाळचे सहा वाजलेत घड्याळाचा अलार्म वाजतो, अन्विका जागी झाली. तिने एक जोराचा आळस दिला. घड्याळाचा अलार्म बंद करून तिने केसांचा बुचडा बांधून तेथील टेबलवरील पिन लावली. उठून जिना उतरून खाली आली. स्वयंपाक घरात आल्यावर. तिथे तिची आई तिच्या वडिलांच्या डब्याची तयारी करत होती. तिची धावपळ पाहून,

अन्विका, काय सकाळी सकाळी लई धावपळ चाललीये,

आई, काय सांगू आज जरा उठायला वेळ झाला ग, त्यांना डबा द्यायचाय, जराशी मदत करतेस का? चार चपात्या तेवढ्या लाट, तोपर्यंत मी भाजीला फोडणी देते.

अन्विका, तुला लवकर उठायला काय होत.

आई, आजच उशीर झालाय, उगाच शहाणपणा करू नको, आधी तू कितीला उठलीस बघ.

अन्विका, माझं काय आहे, माझी तर कालच परीक्षा झालीय.

आई, अग, काल बचत गटाच्या मीटिंगमुळे थोडा वेळ झाला उठायला.

अन्विका, पुरे तुमचा तो बचत गट, त्या मीटिंग पाहिल्यात मी, आर्थिक व्यवहारापेक्षा तुम्हा बायका नटून थटून आपल्या साड्यांची व त्यांच्या दरांचीच चर्चा करता.

आई, तू उगाच नको ते बोलू नकोस, चपात्या लाटणार की नाही ते सांग.

इतक्यात बाथरूम मधून अन्विकाचे वडील

वडील, झाला की नाही डबा,

आई, झालाच, थोडा वेळ अजून.

आई अन्विकाकडे मदतीच्या नजरेने पहाते,

ते पाहून अन्विका बेशिनला हात तोंड धुवून रुमालाने पुसून किचन कट्याजवळ जाते व चपात्या लाटू लागते.

…… …….. …….

Day. Morning. Inter

अन्विकाचे बाबा आवरून डायनिंग हॉल मध्ये येतात अन्विकाची आई चहा नाष्टा देते.

ते तो घेतात,

ते नाष्टा झाल्यावर

बाबा, अग, डबा कुठे हाय,

आई, अरे, देवा थांबा हं,

अन्विका जेवणखोलितून येत

अन्विका, हा हे घ्या,

बाबा, हसतात व डबा घेऊन घाईने निघून जातात.

…….. …….. …… ……

Inter. Morning.

अन्विका अंघोळ गडबडीत आटोपून आपला नाष्टा गडबडीने करत असताना

आई, अग एवढी गडबड कसली आहे. सुट्टी आहे ना? हळू कर नाष्टा.

अन्विका, मी जरा बाहेर जाणार आहे, ऐनीवे आमची छोटी ट्रीप आहे.

आई, काय ट्रीप, हे आणि कधी ठरलं, सांगायचं नाही का?

अन्विका, त्यात काय सांगायचं, इथं जवळच तर जाणार आहे.

आई, अग ,जवळ म्हणजे कुठे?

अन्विका, जवळ म्हणजे पन्हाळा, त्यात काय एवढं आश्चर्य करण्यासारखं.

आई, हे बघ ते रागावतील, उगाच लांब नको.

अन्विका, पन्हाळा कुठे लांब आहे, इथं जवळच तर आहे.

आई, अगं पण,

इतक्यात तिचा भाऊ वाकून पहात,

अन्विकाचा भाऊ, मी ऐकलंय सांगणार बाबांना,

अन्विका, ये, जा सांग जा चोमड्या, मी घाबरत नाही.

आई, ये तू गप रे,( अनूकडे पाहत) हे बघ अनू बाबांना तरी फोन करून सांग.

भाऊ, मला जर पाचशे रुपये देत असशील तर मी मदत करेन बाबांची परवानगी घ्यायला.

अन्विका, काय पाचशे रुपये, ये भिकारड्या, जा तुला देतोय मी पाचशे, कधी ओवाळणीत तरी घातलेस का पाचशे रुपये.

आई, गप काय पण काय बोलतेस, तो कुठला देईल अजून ज्योबला लागायचाय तो.

अन्विका, माझं ऐकशीस तर उगाच जोबच सोडून दे, मी सांगते ते ऐक बिझनेस कर बिझनेस.

अन्विकाचा भाऊ, ये दिदे, दे की ग, मला हवेत, नवीन स्पोर्ट्स टी शर्ट घेणार आहे मी, सांगत नाही बाबांना तुझ्या ट्रीपच, वाटलं तर शपथ घेऊ का?

अन्विका, हे बघ तू बाबांचं भ्या मला घालू नकोस, मी आधीच परवानगी घेतलीये, व कपड्याचे म्हणत असशील तर ती तिजोरी भरलिये ना तुझ्या कपड्यांनी तिथं नवीन कपडे ठेवायला जागा नाही त्याच बघ आधी.

आई, काय ग? कधी घेतलीस परवानगी?

अन्विका, कालच,

आई, अग पण त्यांना रात्री उशीर झाला न यायला, तू तेव्हा झोपली होतीस.

अन्विका, मोबाईल कशाला पुजायला आहे. पेपर झाल्यावर मुलांच ठरलं ट्रिपच तेव्हाच बाबांची परवानगी घेतली मी.

अन्विकाचा भाऊ, चला नवीन टीशर्ट क्यांसल.

आई, तुझा टि शर्ट, गप्प बस, अन् थांबावं ते विनाकारण पैसे खर्च करायचं. कामाचं बघ आदी.

अन्विकाचा भाऊ, माझा तेवढा खर्च दिसतो, हिचं ट्रीपच दिसत नाही तुला, ती तेवढी लाडकी अन् मी दोडका काय?

आई, तिचा नाद करू नकोस, ती अभ्यास करत ओपीडी करते व स्वतःचा खर्च चालवून आम्हाला मदतही करते, समजलं काय.

अन्विका नाष्टा करत बाहेरील हॉल मध्ये येत आपली मैत्रिण वेदांगीला फोन लावते.

वेदांगी फोन उचलते

अन्विका, काय मॅडम कालच लक्षात आहे ना,

वेदांगी, आहे, तयार होते,

अन्विका, आवरून बस मी येते न्यायला.

वेदांगी, बरं बरं,

अन्विका फोन ठेवते व आपले आवरून आपली स्कूटी घेऊन निघते.

Cut to...

….. …… …… …….

Out. Int Rode kolhapur citi vedangi collani. Day morning

अन्विका स्कूटी घेऊन निघते. तिने पंजाबी ड्रेस घातलेला आहे, डोक्यावर हेल्मेट ती वेदांगी अग्रावकरच्या अपार्टमेंटच्या बाहेरील बाजूस थांबून हॉर्न वाजवत तिचा हॉर्न ऐकून वेदांगी बाहेर गॅलरीत येते, तिला पाहून

अन्विका, चल लवकर,

वेदांगी, आले, आले.

वेदांगी आपली छोटीशी बॅग घेऊन तिच्या घरून निघताना तिचे सोफासेटवर पेपर वाचत बसलेले बाबा तिला जाताना पाहून,

बाबा, वेदांगी अन्वीका आहे म्हणून जाऊ देतोय, पण सातच्या आत घरात परत आली पाहिजेस समजलं काय?

वेदांगी, जी बाबा.

बाबा, हं आणखी एक, मी तुझं लग्न ठरवतोय, आता भरपूर शिकणं झालं.

वेदांगी, बरं,

बाबा, अन् फोन घेऊन जा,

वेदांगी, हा,

वेदांगी बाहेर येते. जिना उतरून अन्विकाच्या गाडीकडे जाते तिला पाहून

अन्विका, काय सुरमई, इतका वेळ,

गाडीवर बसत

वेदांगी, तुझ्यासारख आहे होय, शंभर सूचना ऐकाव्या लागतात इथे.

अन्विका, असे काय ग तुझे बाबा, काय तर म्हणे, ये वेदे लवकर घरी ये, फोन करत जा. अन् काय , कुठल्या मुलासोबत दिसलीस तर याद राख, मासा सोलल्या सारखं सोलीन,

कुणी या बाबाला ऑफिसर बनवलं देव जाणे, त्या पेक्षा मासळी बाजारात पाठवल पाहिजे मासळी बोलायला, एवढं शिकला तरी जुनाट विचार,

वेदांगी, ये गप,

अन्विका, गप काय गप, स्वतःच्या पोरीवर जरा देखील विश्वास नाही, काय पळून जाते की काय?

वेदांगी, ये बाई पुढे रस्त्याने तुझे रामायण लाव , चलं इथनं, ऐकतील ते.

गाडी स्टार्ट करत चालवत

अन्विका, जा घाबर जा तू, मी नाही घाबरत त्या हिटलरला, म्हणूनच मी तुमच्या घरी येत नाही, त्या सूचना ऐकूण कान किटलेत माझे, एक सूचना कोश होईल त्यांचा संचय केला तर.

वेदांगी, ये बाई तुझी चावचाव बंद कर व बाकीचे कुठं आहेत ते बघ आदी.

अन्विका गाडी चालवत फोन लावते,

अन्विका, ( फोन वर)

अरे, सात्विक आम्ही निघालोय पंचगंगा पुलावर पोहोचू थोड्या वेळेत.

अन्विका मोबाईल वेदांगीकडे देते. व गाडी चालवते.

Cut to..

…. ….. …… …… ….. ………

 Morning. day outer

आण्विका गाडी चालवू लागते. थोडे अंतर गेल्यावर वेदांगीचा हाफ मुड बघून

आण्विका, काय झालंय तोंड पडून बसायला.

वेदांगी, काय नाही, उगाच तुझा मुड जायला नको.

आण्विका, सांग तरी काय झालय ते. पेपर गेलेत ना नीट.

वेदांगी, पेपरच काय नाही ग, गेलेत सोपे, पण इथं वेगळच वादळ घोंगावतय.

आण्विका, कसलं वादळ, सांग तर, व कोड्यात बोलायचं सोड अन् सांग तुझा विषय.

वेदांगी, लग्न जमवतायत घरी.

आण्विका, कुणाचं ग,

वेदांगी, कुणाचं म्हणजे माझं आणखी कुणाचं.

आण्विका, मग छान आहे की लग्न कर अन् बस सुखान संसार करत.

वेदांगी, तुला तर नेहमीच चेष्टा सुचतेय नाही.

आण्विका, अग, तस नाही थोडी गंमत केली.

वेदांगी, तुला काय गंमत करायला.

आण्विका, तुझ्या घरच्यांना कसली घाई झालीय गं. इंटरशिप तरी होऊ द्या म्हणावं.

वेदांगी, इंटरशीप वगैरे काही नाही. आधी लग्न कर म्हणतात.

आण्विका, कोण म्हणतंय आई की बाबा.

वेदांगी, बाबा आणखी कोण?

आण्विका, तुझ्या बाबाला कसली घाई झालीय. सदान कदा घाईतच असतात. तुझी आई कशी नांदत असेल देव जाणे.

 बर ते सोड अचानक कसं काय ठरवतायेत.

वेदांगी, कालपर्यंत वातावरण ठीक होत. काल कामावरून आल्यापासून चाललय.

कालपासून कसल्यातरी टेन्शन मध्ये आहेत.

आण्विका, काल काय झालं एवढं, डायरेक्ट लग्नावर आल्यात.

वेदांगी, अग ती तन्वी आहे ना.

आण्विका, ए बाई थांबवं तुझ तन्वी पुराण. कंटाळा आलाय ते सारखं ऐकूण.

तुझे बाबा नेहमी तिचेच गोडवे गात असतात.

काय तर म्हणे, तन्वी लवकर उठते, डब्बा करते, कॉलेजला जाते, पोळ्या करते. वगैरे वगैरे, विट आलाय नुसता सारखं तेच तन्वी पुराण ऐकूण.

वेदांगी, अग, ते पूराण सोड, महाभारत घडलय, ऐकल्यावर हसशील.

आण्विका, काय झालंय आणखीन.

वेदांगी, अग त्या तन्वीला पृथ्वीराज घोड्यावर बसवून घेऊन गेला ना!

आण्विका, काय म्हणतेस, तन्वी गेली पळून

थोड्याच वेळात त्या पंचगंगा पुलावर येतात. तिथे त्या दोघींचे मित्र व मैत्मैत्रिणट पाहत असतात.

त्यांना येताना पाहून

सात्विक, त्या बघ आल्या त्या

त्या येताच

एकजण, काय हे किती उशीर.

आण्विका, अरे बाबा, काय सांगू तुला वेदीच्या घरी जाऊन तिला घेऊन यायचं म्हणजे

सात्विक, ते आपण नंतर बोलू, चल बाकीचे पुढे गेलेत. उगाच आणखी वेळ नको.

आण्विका, चला तर मग

 ते निघतात.

….. ….. ….. ….. …. ….

क्रमशः पुढे......

No comments:

Post a Comment

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...