क्रमशः पुढे चालू ........
Morning. ७.३०. Inter. स्वयंपाक खोली. अलिबाग
मावशी सकाळी जेवणाच्या तयारीला लागलेली असते. इतक्यात अण्विका चहा ट्रे ठेवण्यास आलेली असते. मावशीला
आण्विका, मावशी आज तू आराम कर जा. मी करते स्वयंपाक.
इतक्यात मागून रेवती येते.
मावशी, अग राहू दे. थोड्या दिवसाच्या सुट्टीवर आलीस तू उगाच कशाला. करते मी.
रेवती नको म्हणतेय तर कशाला करतेस मदत तिला.
आण्विका, गप्प ग तू. आज मी करते स्वयंपाक.
असे बोलून ती मावशीकडील भांडे काढून घेते.
मावशी, करशील ना नीट.
मावशी तिला साहित्य दाखवत.
हे बघ तिखट मीठ तेल या इथे आहे. व भाजी सर्व फ्रीजला आहे. अन्, हा इथे बाजूला पीठ, तांदूळ व इतर साहित्य आहे बघ.
आण्विका, हो करते मी,
मावशी आत निघून जाते. व टीव्हीला जाऊन बसते.
रेवती मदतीला येते. त्या दोघी स्वयंपाक तयार करायला लागतात.
मावशी , (मनात) या काय करतात ते बघायला पाहिजे. नाहीतर सगळाच बट्याबोळ करायच्या.
ती जेवण खोलीत वाकून बघते.
रेवाला काम करताना पाहून.
मावशी, आज शुक्राची चांदणी कशी काय उगवली. होय आनु.
रेवा, कळतात टोमणे मॅडम, काय. मी कधीच मदत करत नसल्या सारखेच बोलतेस. सुट्टी लागली की मलाच स्वयंपाक करायला लावतेस. ना.
मावशी, हो बाई हो.
करा कायतरी.
मावशी निघून टिव्ही पाहायला जाते.
इतक्यात मेसेज अणुच्या मोबाईलवर वाजतो.
रेवती पाहते.
मस्त मेसेज ईशानने पाठवलेला असतो.
रेवती , लगेच अन्विकाचा फोटो काढते स्वयंपाक करताना व सेंट करते.
ईशान मेसेज पाहून
काय स्वयंपाक चालू आहे वाटत.
येवू का जेवायला.
रेवती, ये.
अण्विका रेवतीच्या हातातील फोन काढून घेते.
ईशान मेसेज पाठवतो. काय मेनू आहे.
आण्विका, कारल्याची भाजी व भाकरी.
ईशान, कारले कडू, नको मला.
आण्विका, आठवड्यातून एकदा तरी कारले खावे. शरीरासाठी चांगले असते.
ईशान, डॉक्टर मॅडम खावा तुम्ही व निरोगी राहा.
आण्विका, अच्छा.
ईशान,ठीक आहे.
तो चॅटिंग थांबवतो त्या जेवण करण्यात मग्न होतात.
…… …….. ……. ……..
That day. Afternoon. Outer. १२. O’clock
जेवण झाल्यानंतर
रेवती, अनु दीदी झालं ना जेवण. चल आता.
काका, आज कुणीकडे दौरा.
रेवती, काही नाही जवळच बागेतून येतो फिरून.
काका, बर, या जाऊन.
आण्विका, व रेवती निघतात. तिथेच कॉलनीतील बागेत जातात. तिथे एका झाडाखाली जाऊन त्या दोघी बसतात.
बाग फिरून आल्यावर.
आण्विका, काही म्हण, अस बागेत फिरल्यावर खूप बरे वाटते
कामाचा संपूर्ण ताण निघून जातो.
रेवती, हो तर. काय मग दाजी काय म्हणतात.
आण्विका, ए काय पण चिडवतेस बघ.
रेवती, अग माहिती काढायची आहे ना. थांब, बघ कशी मी काढते?
रेवती आपल्या मोबाईल मधील फेक फेसबुक अकाऊंट काढते. व पुन्हा चॅटिंग सुरू करते.
रेवती, (मेसेज) मग काय ठरलं.
ईशान, कशाबद्दल.
रेवती, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे.
ईशान, सॉरी मी नाही करू शकत.
रेवती, का, लग्न झालंय तुमचं.
ईशान, नाही अजून.
रेवती, मग कुठे प्रेमात पडलास का?
ईशान, हो,
रेवती, कोण आहे ती?
ईशान, तुम्हाला का सांगू. माझ्या जीवनातील सिक्रेट गोष्ट.
रेवती, माझ्या इतकी सुंदर नसेलच ती.
ईशान, ते तुम्हाला काय करायचय.
रेवती, म्हणजे खरंच.
ईशान, नाही ती खूप सुंदर आहे माझ्यासाठी.
रेवती, काही पण सांगू नकोस. तुझं फुटबॉल वर प्रेम आहे ना.
ईशान, हो,
रेवती, मग काय फुटबॉलशी लग्न करणार आहेस.
ईशान, नाही हो. सोडा तुम्ही हा विषय.
असे म्हणून तो ऑफलाईन जातो.
रेवती हसू लागली.
आण्विका, नको ग बाई, भलत सलत पाठवूस
रेवती, का ग बाई, तुला लगेच आला पुळका. लागलीय लगेच काळजी करायला.
आण्विका, काही नाही ग तो सरळ मुलगा आहे.
रेवती, दिसत तस नसत मॅडम म्हणून जग फसत.समजल का?
सोन पण घ्यावं पूर्ण झळाळी देवूनच.
अणू नाराज पाहून
रेवती, हे बघ मी कालपर्यंत सर्च केलीय प्रोफाईल त्याची. त्याला फक्त सहा स्त्रिया अँड आहेत. त्यातील तीन नात्यातील आहेत. व दुसऱ्या तीन खात्यातील.
त्यातील एखादिशी जरी सुत जुळलेल असल, तर तू कट्टाप.
आण्विका, कट्टाप तर कट्टाप.
रेवती, काय कट्टाप म्हणतेय. चेहरा सांगतो तुझा.
आण्विका, काय सांगतो.
रेवती, तू प्रेमात पडलीस तेच्या.
इतक्यात अण्विकेस फोन येतो.
ईशान, हॅलो अण्विका,
आण्विका, हा ईशान बोल.
ईशान, उद्या भेटूया का?
आण्विका, काही काम आहे का?
ईशान, उद्या सुट्टी आहे. फिरायला जाऊ मस्त.
आण्विका, रेवाला, हळूच फिरायला जाऊ या का म्हणतोय.
रेवती , (हळूच कानात) मला तस कसं येता येईल. मी पाहुण्यांकडे आहे. एकटीला कसे लावून देतील.
आण्विका, मला तस कसं येता येईल. मी पाहुण्यांकडे आहे. एकटीला कसे लावून देतील.
ईशान, मग कोणाला तरी सोबत घेऊन. ये.
आण्विका, अरे तिघेजण बाईकवर कसे जाणार.
ईशान, मी अरेंज करतो की फोरव्हिलर.
आण्विका, मी व माझी मावस बहीण येतो. माझं काम पण आहे. किहीमला किहिम बीच पण बघायला जाऊ.
ईशान ठीक आहे. चालेल. उद्या सकाळी मी न्यायला येतो. पत्ता तेवढा सांग.
आण्विका, रेवाला, तो घरी येतो म्हणतोय.
रेवती,(हळू आवाजात) अग नको म्हण आम्हीच येवू.
आण्विका, इकडे नको. आम्हीच येतो. बर गाडी कुठे बघणार.
ईशान, आहे इथे एक ओळखीन घेऊ, तू ये तर खर.
आण्विका, बर येते बाबा. तुझा पत्ता पाठव.
ईशान, हा.
आण्विका, ओके डण
ईशान, हा ओके. बाय.
ईशान फोन ठेवतो.
ईशान मोबाईल वर पत्ता पाठवतो.
आण्विका मेसेज रेवतीला दाखवते.
रेवती मग आज पार्टी पाहिजे
आण्विका, का ग.
रेवती, काही नाही तुझ्या मनासारखं घडतंय.
आण्विका, तस काही नाही. बघ उद्या तो यावर काही बोलला तर.
रेवती, कशावर.
आण्विका, प्रेमाविषयी, तो प्रथम विचारणार नाही मला.
रेवती, असे का म्हणतेस.
आण्विका, मी ओळखते त्याला. तो शांत व संयमी आहे.
रेवती, मॅरेज मटेरियल म्हण की.
आण्विका, तस का म्हणतेस. खूप चांगला आहे तो.
रेवती, म्हणून शाळेत व कॉलेजला असताना भांडत होतीस का त्याच्याशी.
आण्विका, भांडण हे आपल्या माणसाशीच करतात.
रेवती, उद्या पाहू की तुझी आवड. कळेलच घोडा मैदन जवळ आहे.
आण्विका, बघच.
रेवती, ते उद्या बघू, पण आज काय करूया.
आण्विका, एका रोपवाटिकेला भेट देवू या.बरेच दिवस झाले माझा प्रोग्राम लिहायचा राहिलाय.
रेवती, हे चांगल आहे.
आण्विक, हो तेथील रोपे व इतर माहिती घेऊ.
इथे म्युझिअम आहे का?
रेवती, आहे की करमरकर म्युझिअम
आण्विका , मग चला जाऊ.
त्या दोघी निघतात. व सुंदर अलिबाग मधील रोपवाटिका व करमरकर म्युझिअमला भेट देतात. तेथील माहिती नोंद करून वहीत घेतात. तसेच आपल्या कॅमेऱ्यात अन्विका फोटो काढून घेते.
व त्या परत घरी येतात. व अण्विका प्रोजेक्ट तयार करू लागते.
….. ……. ……. ………
Morning. ८.०० o'clock. Inter.
चहा क्यांटिंग तेथील मॅनेजरशी ईशान बोलत आहे. नाष्टा केलेलं बिल देत आहे. त्यासोबत रवींद्र देखील आहे.
ईशान, बिल किती झालं.
मॅनेजर, १७० रुपये सर.
ईशान बिल पेड करतो.
इथ एक दिवसासाठी कार भाड्याने मिळेल का?
मॅनेजर, मिळेल की. इथ जवळच आहे. त्रिमूर्ती गॅरेज. तिथे मिळेल तुम्हाला पाहिजे तसी गाडी.
ईशान, बर इथे काही बघण्यासारखी ठिकाणे.
मॅनेजर, भरपूर आहेत. किहीम बीच, अलिबाग बीच, खांदेरी, उंदेरी तसेच कुलाबा किल्ला. अशी अनेक स्थळे आहेत.
जवळ स्टॉल वर माहिती पुस्तिका देखील मिळेल.
ईशान, थ्यांक्स.
ते बाहेर पडतात.
रवी, काय दौरा आहे का?
ईशान, उद्या सुट्टी आहे. म्हटल तेवढाच एन्जॉय करू. अरे,.हो तुम्ही पण या की. मला पण तेवढी कंपनी होईल.
रवींद्र, पण यासाठी फोर व्हीलर कशाला. टू व्हीलर ठरवू की.
ईशान, माझ्या मैत्रिण देखील येणार आहे. ती सुट्टीला आलेय इथं.
रवींद्र, मैत्रिन की आणखी कोण.
ईशान, सध्या तरी मैत्रिन आहे. पाहू पुढे. माझी तर खूप इच्छा आहे. पण तिच्या मनातील देखील जाणून घ्यायला हवं.
रवींद्र, म्हणून हा सर्व खटाटोप चाललाय होय.
ईशान, हो. तेवढाच वेळ एकत्र घालवता येईल.
बर चला आता. आपल्याला वेळ होतोय.
ते निघतात.
….. ……. ……. ……. …..
That day. Morning. ९,०० o clock inter ट्रेनिंग सेंटर
ट्रेनिंग सेंटर मध्ये एक विशाल पडदा लावलेला आहे. त्यावर जगातील अरण्य वातावरण व वनसंपदा याविषयी माहिती दिली जात आहे. तसेच इंडिया क्लायमेंट विषयी देखील माहिती दिली गेली. वसुदेव कुटुंबकम यावर माहिती दिली गेली.
यावेळी. ईशानने आपल्या शंका विचारल्या.
भारतीय वनसंपदा व त्याचा देशासाठी उपयोग. तसेच उद्योग. स्थानिक अभयारण्य परिसरात राहणारे आदिवासी व त्यांचा उदर निर्वाह या समस्या व प्राणी अवयव. तसेच औषधी वनस्पती तस्करी. त्यावर उपाय योजना त्याने मांडली.
त्याने सुचवलेल्या उपाय योजना ऐकून व आपला प्रोजेक्ट त्याने सादर केला. तो सर्वांना आवडला.
कार्यक्रम झाल्यावर.
अनेक लोक ईशानचे अभिनंदन करतात.
एक ऑफिसर, मस्त माहिती सांगितलीत सर,
ईशान, थ्यांक्स.
दुसरा एक जण, आपला यातील अभ्यास खूप दिसतो. हे कधी केलात.
ईशान, त्यात काय आपली ड्युटी करत हे सगळं केलं
दुसरा एकजण, पण तुम्ही तर नवीनच जॉईन आहात ना?
ईशान, साहेब एक वर्ष झाल. मला येवून या खात्यात. अरण्यातून फिरताना तसेच स्थानिक लोकांच्या सहवासातून या विषयी जाणून घेऊन रिसर्च केलं. व हा प्रोजेक्ट साकार झालाय.
रवींद्र, खरंच तुम्ही ग्रेट आहात सर.
ईशान, येवढं काही जास्त केलं नाहीये हो. थोडच रिसर्चींग केलय.
रवींद्र, हे थोड नाहीये सर खूप खोल रिसर्च आहे हे. यामुळे आपल्या खात्याला अरण्यात राबवायचे वेगळे उपक्रम याविषयी प्रेरणा मिळालीय.
ईशान, हो ते तर आहेच.
Cut to …....
….. …… ….. …… ….. …
Evening. ६.०० त्रिमूर्ती गॅरेज. अलिबाग.
ईशान ट्रेनिंग संपल्यावर त्रिमूर्ती गॅरेज मध्ये येतो. तिथे गॅरेज मालक गाडी दुरुस्त करत असतो.
ईशानला पाहून
मालक, बोला काय काम होत साहेब.
ईशान, मला उद्या एक फोर व्हीलर हवी होती भाड्याने.
मालक, (कर्मचाऱ्यास)
बबलू गाडी दाखव सहेबांना व सांग
बबलू, चला साहेब.
बबलू गाडी दाखवतो.
साहेब या गाड्या आहेत. कारकडे बोट दाखवत ती लाल गाडी दिवसभर १२०० रुपये भाडे, ती सुमो असेल तर, १५००, अन् हा ती पांढरी ती तर आलिशान आहे. तिच्यासाठी १७०० रुपये पडतील. पेट्रोल चार्ज तुमचा. अन् हो. फक्त ३० किलोमीटर एरियात फिरवण्यास हा चार्ज आहे. त्याच्या बाहेर डब्बल चार्ज असेल. व जर ड्रायव्हर पाहिजे असल्यास वेगळा चार्ज.
ईशान पाहतो. चार्ज जास्त आहे आम्ही जवळच जाणार, जास्तीत जास्त १०-१२ किलोमीटर. जाणार आहोत. जवळीलच तर ठिकाणे पाहणार.
बबलू, गाडी तरी बघा.
ईशान, गाडी पाहून पांढरी कार निवडतो.
ईशान, हा ही असु देत.पण चार्ज जरा जास्त होतोय.
बबलू, काय साहेब, एवढी चांगली गाडी नेणार १७०० काही जास्त नाहीत. व गाडीचा मेंटणंस खर्च पण येतो.
ईशान, काही तरी कमी करा. पेट्रोल चार्ज पण आहे ना. आम्हाला ही परवडायला हवं.
बबलू, पंधराशे द्या व न्या गाडी. बर ड्रायव्हर हवा का?
ईशान, नको मला येते चालवता.
बर जरा ट्रायल तरी घेऊ.
ईशान , गाडी चालवून ट्रायल घेतो.
गाडी फिरवून आणून लावतो.
व मालका शेजारी येऊन
ईशान, चालेल ,ही फायनल करा.
मालक, गाडी कधी नेणार.
ईशान, उद्या सकाळी.
मालक, चालेल. बर टोकण म्हणून पाचशे रुपये भरा. व गाडी नेताना आधारकार्ड जमा करावे लागेल.
ईशान, पाचशे रुपये देतो.
गाडी ठरवतो.
Cut to …….
….. ……. ……. …… …..
nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com
No comments:
Post a Comment