शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Tuesday, November 28, 2023

कळत नकळतच जुळले हे बंध भाग ८

 

कळत नकळतच जुळले हे बंध भाग ८


क्रमशः पुढे चालू .....

Night. ९.०० o’ clock. Inter

ईशान जेवण करून रूमवर येतो. आल्यावर तो अण्विकेस कॉल करतो.

ईशान, हॅलो अण्विका

आण्विका, हा बोल.

ईशान, मी गाडी ठरवलीय. उद्याच नक्की हा.

आण्विका, चालेल. पण कुठे जायचय.

ईशान, अलिबाग व परिसर पाहू.

आणखी कोण येणार आहे का?

आण्विका, माझी मावस बहीण. व..

ईशान, व काय.

आण्विका, मावस भावाला पण घेऊ का?

ईशान, चालेल की? तेवढीच कंपनी आपल्याला.

आण्विका, तुझ्यासोबत आणखी कोण आहे.

ईशान, एक सहकारी आहे. ट्रेनिंग साठी आलेला. रवी नाव आहे त्याच.

आण्विका, चालेल.

बर उद्या किती वाजता.

ईशान, सकाळी आठ वाजेपर्यंत या की. मी पत्ता पाठवलाय.

 त्या पत्यावर.

आण्विका, हा पोहोचू आम्ही.

आण्विका फोन ठेवते.व रेवतीकडे पहाते. ती रागीट डोळ्यांनी तिच्याकडे पाहत असते.

आण्विका, काय चुकल काय माझं?

रेवती नाही सर्व बरोबर केलस. काय गरज होती स्वप्नीलला घेण्याची. त्याला घे म्हणजे लग्ना आधी वरात काढेल तुझी.

आण्विका, तस् काही होणार नाही. आम्ही फक्त मित्र म्हणून भेटणार आहोत. बाकी काय नाही. स्वप्नील बरोबर असला म्हणजे घरची काळजी करणार नाहीत.

रेवती, मी सांगितलं असत ना काहीतरी कारण.

आण्विका, तस नसत. एक तर मी पाहुणी. मावशी वर माझी जबाबदारी आहे. तिला अंधारात ठेवून काय करू. जे काही असेल ते उघड उघड.

रेवती, कर तुझ्या मनासारखं. पण आधी त्या स्वप्नाला सांग.

नाहीतर उद्या कायतरी घाट घालायचा.

आण्विका, हो बाई. बर झालं आठवण केलीस.

आण्विका फोन लावते.

आण्विका, हॅलो स्वप्नील का?

स्वप्नील, बोल काय दीदी.

आण्विका, कुठे आहेस. घरी कधी येणार.

स्वप्नील, अग, ताई मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय. येतो थोड्या वेळात.

आण्विका, उद्याच काय नियोजन नाही ना?

स्वप्नील, उद्या मी ट्रेकला जाणार आहे. का?

आण्विका, अरे , माझा मित्र इथे ट्रेनिंगला आलाय. त्याला उद्या सुट्टी आहे. त्याला अलिबाग फिरायच आहे. मी व रेवा दोघी जाणार आहोत. आमच्या सोबत चल तू पण. तेवढीच सोबत.

स्वप्नील, बर ,मी करतो ट्रेक क्यांसल. येतो.

आण्विका, हा चल ठेवते. ये लवकर घरी.

स्वप्नील, फोन ठेवून लगेच दुसरीकडे लावतो.

स्वप्नील, ए बंड्या, उद्या नाय जमणार.

बंड्या, का रे.

स्वप्नील, काही नाही. आमची अणू दीदी आलेय. ना. तिच्यासोबत जरा बाहेर जाणार आहे.

बंड्या, बर. असूदे. जा तू. बघू पुढच्या ट्रेकला. तस तू नाहीच म्हणत होतास.

स्वप्नील, तस नाही भावा.

बंड्या, जा रे बिनधास्त.

स्वप्नील, पुढच्या ट्रेकला नक्की येतो.

बंड्या, चालेल .

ट्रॅफिक मोकळं होऊ लागत.

स्वप्नील, अरे ट्र्याफिक सुटल. ठेवतो.

बंड्या, हा ठेव.

स्वप्नील गाडीची किक मारतो. व निघतो.

…… …… ……. ……

नाईट. ७.०० o’ clock. Inter. मावशी हाऊस

मच्छी आणलेली असते. मावशी रेसिपी बनवत असते. आण्विका जेवण खोलीत जाते.

आण्विकेस पाहून.

मावशी, काय हवय का बाळ.

आण्विका, काही नको मावशी. मला काहीतरी बोलायचय.

मावशी, बोल की.

आण्विका, काही नाही. कसं आहे ना मावशी.

मावशी, बोल की.

आण्विका, कसं सांगू… आ सांगतोच मावशी माझा एक मित्र इथे ट्रेनिंगला आलाय. त्याला उद्या सुट्टी आहे.

मावशी, हा बर मग.

अन्विका, त्यासोबत उद्या जरा अलिबाग फिरायला जाणार आहे. म्हणजे मी, रेवती व स्वप्नील, म्हटल तुझी परवानगी घ्यावी.

मावशी, कुठे लांब तरी जाणार नाही ना.

आण्विका, नाही ग. इथच जवळ जाणार. संध्याकाळी परत.

मावशी, ठीक आहे. स्वप्नील आहे ना. मग काळजी नाही. जावा खुशाल. पण तेला घरी बोलवायचं नाहीस. आमची पण ओळख झाली असती.

आण्विका, अग, त्याच ट्रेनिंग चालू आहे. जाण्याआधी बोलवू की घरी.

मावशी, हा चालेल की. नाव काय ग त्याच.

आण्विका, ईशान… ईशान पाटील.

मावशी, काय काम करतो तो.

आण्विक, फॉरेस्ट ऑफिसर आहे.

मावशी, बर चालतंय जावा.

आण्विक, मी मदत करू.

मावशी, करते मी. उगाच मस्का लावू नकोस. व आल्यापासून बरीच मदत करतेस.

आण्विका, पण मी मच्छी छान करते. बघ जरा.

मावशी, तू मच्छी कर मी बाकीचं आटपते.

आण्विका मदत करू लागते.

इतक्यात रेवती तिथे येते.

रेवती, काय डॉक्टर मॅडम टेथ्यास्कोप सोडून झाराच धरलाय.

काय बेत आहे आचारी होण्याचा का.?

मच्छिकडे रेवतीच लक्ष जातं. ती

रेवती, वाव, मच्छी, पाहुणी आल्यापासून लई सरबराई चाललेय. पण आज हे काय. एक डिश दोन कोल्हापुरी म्याम बंणवताहेत.

मावशी, हो आम्ही बनवतो. तू ये आयती खायला.

रेवती, ते काय येणारच. पण रेसिपी नीट करा. नाहीतर डॉक्टर मॅडम व तू फेराफेरान चटणी मीठ घालून बिगडवू नका म्हणजे झालं.

नाहितर जोराचा ठसका सुटायचा व जेवताना जाळ व्हायचा आमचा.

मावशी, य गप्प ग, एवढ्या काय अडाणी नाही आहोत आम्ही.

रेवती, ते महिताय मला. मामाच्या गावाला तीन वर्षापूर्वी मटण दोघी बहिणींनी बनवल होत ना. सगळा रसा खारट.

मावशी, अग, ते चुकून झालत. ताईला वाटल मी मिठ टाकल नसेल. म्हणून तीनही टाकल.

रेवती, जेवनापेक्षा दोघींचं लक्ष त्या सिरियलीकडेच होत. ती मालिकाच बंद पडायला पाहिजेत. त्या मालिकेमुळे आम्हाला झुणका खाऊन झोपायची पाळी आली. आज अस काय करू नका म्हणजे झालं.

आण्विका हसू लागते.

मावशी, अहो ऐकलंत का. ही रेवा बघा कशी करतेय. स्वयंपाक करू देत नाही.

रेवती, ओ बाई, साहेब लग्न झाल्यापासून एकतच आलेत तुमचं. पण आता ऐकु जाणार नाही. नेने काकांकडे गेलेत. ते. नव्हर्याच भ्या घालतोय मला. बाबा आहेत माझे समजल का? करा जेवण.

अनु तुला कुणी सांगितलं जेवण करायला. ये इकडे.

आण्विका, अग थोडी मदत करूया. सकाळपासून कामातच आहे ती. जरा भाकरी तरी कर ग.

मावशी, ती भाकरी. मग झालच.

आण्विका, का ग.

मावशी, बोल की ग आता.

सांगू का.

अनु आमची रेवा आपल्या नव्हऱ्याला भाकरी व चपातीतून जगातील सगळे नकाशे करून घालेल बघ.

आण्विका, मावशी काही काळजी करू नको. मी शिकवीन रेवाला. भाकरी करायला.

रेवती, कळलं काय. काय अणू दीदी म्हणाली. माझा नव्हरा गोल गोल भाकऱ्या खाणार.समजल.

Cut to ….. ……..

Night. १०.o’ clock. अली बाग. Inter. रेवती रूम.

आण्विका बेडवर पहुडली आहे. रेवती पाण्याचे भांडे व ग्लास आणून टेबलवर ठेवते. अनुला विचार करताना बसलेलं पाहून.

रेवती, काय दिदी कसला विचार करतेस येवढा.

आण्विका, काही नाही ग.

रेवती, काही नाही कसं.

आण्विका, काय ग, कसा असेल तो. त्याच माझं जमेल का? विचार कसे असतील. उद्या भेटल्यावर काय त्याची प्रतिक्रिया असेल.

रेवती, म्हणजे मॅडम हा विचार करताहेत होय.

आण्विका, हो.

रेवती, पण हे बघ लगेच इमल्यावर इमले बांधू नकोस. आता आपण जस्ट फ्रेंड म्हणून भेटतोय. बाकी काहीच नाहीये. पण उद्या तुझी व त्याची एकमेका दृष्टीने परीक्षा आसेल.

अण्विका, कसली परीक्षा?

रेवती, व्यवहारिक परीक्षा.

आण्विका, म्हणजे मला काही समजले नाही.

रेवती, हे बघ, सध्याच्या काळात मुले आणि मुली लग्नाअगोदर ढिगाण प्रेमात पडतात. व एकमेकांना शेंड्या लावतात. मग भेटन आल. फिरण, नाष्टा ,पाणी व इतर खर्च. यात वर्षभर घालवायचे. भेटून गुण उधळायचे. अन् मग घ्यायचा ब्रेकअप. अन् मग मोकळे एकमेकांची बदनामी करायला. अन् लग्न झालं. की थोड्या दिवसात यांचं मन भरत. मग लगेच प्रकरण येत सोडचिठ्ठिवर. मग होतो काडीमोड. राहतो मुलांचा प्रश्न. मग त्यांची होते ससेहोलपट.

आण्विका, हो ते पण खरंच आहे.

रेवती, म्हणून मी उद्या एक डॉच मारणार आहे.

आण्विका, कोणता ?

रेवती, कळेलच.तुला.

आण्विका, काय ते सांग ना?

रेवती, कळेल ग उद्या. त्यावेळी मात्र तू शांत राहायचं.

आण्विका, आश्चर्याने पाहू लागली.

तेव्हा. रेवती, मॅडम झोपा आता. लई विचार करू नका. तुमच्या हिताचच बोलते.

लाईट ऑफ होतो.

……. …… ……. ……. …….. …….

Next day. Morning. अलिबाग inter outer.

Part१

सकाळ झाली आहे. रेडीओवर धार्मिक गीते वाजत आहेत. मावशी नाष्ट्याची जोडणी करत आहे. बाहेर पक्षांचा किलबिलाट ऐकु येत आहे.

समुद्राच्या पाण्याचा आवाज ऐकू येत आहे.

आण्विका, अंघोळ आटपून केस विंचरत आहे. रेवती अंघोळ करून आली आहे. काका अंघोळीला निघालेत

काका, सुधा ये सुधा माझा टॉवेल कुठे आहे.

मावशी, (सुधा) अहो काढून ठेवलाय ना तिथे बाजूला टेबलवर.

काका, पाणी काढलय.

मावशी, काढून घ्या आज. मला वेळ झालाय. कामे आटपायची आहेत.

 इतक्यात स्वप्नील येतो.

स्वप्नील, बाबा, मी आधी आटोपतो. मला बाहेर जायचय.

काका, अरे …

स्वप्नील, बाबा माझे लाडके बाबा.

तो बाथरूम मध्ये जातो.

व दार बंद करत वाकून

गुड मॉर्निंग बाबा.

असे म्हणून दार बंद करतो.

काका, हा गेला. झाल मग. आज काय अंघोळ लवकर नाही बघ.

काकी, असू दे हो. थोडा वेळ आज अडजेस्ट करा. ती बाहेर जाणार आहेत.

काका, कोण,

काकी, विसरलात काल रात्री झोपताना सांगितलं होत ना. आण्विका व तिचा मित्र यांच्या बरोबर रेवा व स्वप्नील फिरायला जाणार आहेत ते.

काका, हा, बर पण दौरा कुणीकडे आहे.

काकू, इथ जवळच आलीबाग परिसर बघणार आहेत.

काका, अग नास्ट्याच बघ, तो येईलच.

काकू, तो कुठला इकडे येतोय. हीच मंडळी चाललेत त्याच्याकडे.

काका, मग चहा पानाला तरी बोलवा बिचाऱ्याला.

काकू,मी पण तेच म्हणत होते. आता जाऊन येऊ देत. उद्या परवा बोलवू आपण.

काका, त्यानिमित्ताने का असेना भेट होईल.

काकू, हो.

इकडे रेवती आपल्या खोलीत.

रेवती, अग ताई दादा उठलाय का बघ नाहीतर वेळ व्हायचा.

आण्विका, तो गेलाय अंघोळीला.

रेवती, कधी.

आण्विका, आताच.

रेवती, बाबांना कल्पना दिलीस की नाही.

आण्विका, मावशी सांगतो म्हणालीय.

बर, तुझं आवर लवकर.

Part२

ईशान उठला , त्याने आपले आवरले. अंघोळ करून तो बाहेर आला.

त्याने गॅरेज वाल्याला फोन केला.

ईशान, त्रिमूर्ती गॅरेज

मालक, हा बोला साहेब.

ईशान, गाडी पाठवून देणार होता ना?

मालक, लावून दिलेय साहेब. पोहोचेल थोड्या वेळात.

ईशान, हा ठीक आहे.

इतक्यात गाडी बाहेर लावून बबलू गाडीची चावी घेऊन येत असतो.

ईशान लगेच बाहेर जाऊन किल्ली घेतो.

इतक्यात तिथे रवी आपले आटोपून येतो. ईशान लगेच अण्विकास फोन करतो.

ईशान, हॅलो अण्विका,

आण्विका, आपले आटोपून चहा घेत असते. ती फोन उचलते.

हॅलो बोल

ईशान, कुठे आहात. या लवकर.

आण्विका, निघतोय. बर तुझं इथला पत्ता सेंट कर.

ईशान, हा करतो.

बर या लवकर.

आण्विका, हो.

ईशान पत्ता सेंट करतो.

आण्विका पत्ता स्वप्नील व रेवाला पाठवते. हा आटपा लवकर निघायला हवं.

आण्विका, बर मावशी काका येतो आम्ही.

मावशी, हा नीट जा. अन् त्याला पण बोलवा इकडे चहा पाण्याला.

रेवती, डोळा मिचकावत आणुला.

काय दीदी बोलवूया ना. सगळच होईल.

आण्विका, तुझ आपल काय तरीच.

काकू, काय ग काय ते.

आण्विका, काही नाही. त्याला बोलवणार आहोत आम्ही. पण त्याला ट्रेनिंग मधून सुट्टी नाही. आज आहे.व आम्ही फिरायला बाहेर निघालोय. दोन - चार दिवसांनी बोलवू त्याला.

काका, बर , नीट जावा.

रेवती, बाबा इथच तर निघालोय.

स्वप्नील, ये चला लवकर.

स्वप्नील, रेवती गाड्या काढतात. आण्विका स्वप्नीलच्या गाडीवर बसते. ती तिघे निघतात.

…… …….. ……. ……. ….

क्रमशः पुढे.....

nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com


No comments:

Post a Comment

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...