क्रमशः पुढे चालू.....
Day. Outer. Morning. ८.३०
ईशान राहिलेल्या रुमजवळ
काही मिनिटात स्वप्नील, रेवती व अण्विका तिथे हजर होतात.
ईशान, आपले बुट चढवत असतो.
स्वप्नील, अनु दिदी पार्किंग कुठे आहे
इतक्यात त्याला बोर्ड दिसतो.
स्वप्नील, गाडी पार्क करतो. रेवती पण आपली गाडी पार्क करते.
ईशान आपले बुट चढवून तिथे बाहेर येतो.
बाहेर येताना क्यांटिंगवाल्यास फोन करून
ईशान, पाच चहा पाठवून द्या.
तो फोन ठेवतो. व अण्विकेस.
ईशान, केव्हा पासून वाट पाहतोय.
आण्विका, अरे ,काय करणार, एवढ्या सगळ्यांच्या अंघोळी वगैरे आटपण म्हणजे वेळ होतोच.
इतक्यात चहावाला येतो.
ईशान, हा, चहा घ्या सगळी. या आत मध्ये.
आण्विका, मस्त आहे की निवास व्यवस्था.
ईशान, मस्त आहे. पण सरकारी आहे मॅडम.
आण्विका, हो ते तर आहेच.
ईशान, घ्या चहा.
सर्वजण चहा घेतात.
तो चहावाला कप जमा करतो.
व निघतो.
ईशान, चला वेळ होतोय. वाटेत ओळख करून घेऊ.
ईशान रुमला लॉक करतो.
थांब आलोच किल्ली देवून.
ईशान रिसेप्सनिष्टकडे आपली किल्ली देतो व येतो.
ते सगळे गाडी जवळ येतात. पुढे ईशान व रवी व त्याच्या शेजारी स्वप्नील बसतो.
आण्विका व रेवा मागे बसतात.
रेवा अनुस कोचून.
बोटांनी इशारा करत मस्त आहे हा.
आण्विका, डोळे मोठे करत. गप्प असा इशारा देते.
गाडी स्टार्ट होते.
शांत गाणी ईशान लावतो. व ती निघतात. थोडे पुढे गेल्यावर.
ईशान, काय अनु ओळख करून देतेस का नाही.
आण्विका, अरे हो, थांब ओळख करून देतो.
हा माझा मावस भाऊ स्वप्नील, व ही रेवती.
ईशान, स्वप्नील काय. मुळचे अलिबागचे की.
स्वप्नील, छे नाही, आम्ही मूळचे बेळगावकडील. बाबांची बदली झाली इकडे व त्यामुळे इकडे , माझं नाव तस पाहायला गेलं तर स्वप्नील भोसले.व ही माझी बहिण रेवती. व अनु दीदी तर आपल्याला माहीतच आहे.
बर आपल नाव काय सर.
ईशान, मी ईशान…. ईशान पाटील. मी कोल्हापूरचा, तस पाहायला गेलो. तर अण्विका व मी दोघे क्लासमेट. आमचं तस पाहायला गेलं तर मुळगाव कोकण साइडला राधानगरीकडील. पण वडलांच्या नोकरीमुळे कोल्हापूरला स्थाईक झालोय.
स्वप्नील, आता तुम्ही काय करता.
ईशान, मी सध्या फॉरेस्ट ऑफिसर म्हणून कामाला आहे. दाजीपूर साईटला. इकडे आमचे ट्रेनिंग आहे. म्हणून आलोय. आज सुट्टी आहे. म्हटल मस्त एन्जॉय करूया. पुन्हा या नोकरीतून आलिबाग पाहायला मिळेल न मिळेल.
स्वप्नील, हे सर कोण?
ईशान, माझ्या खात्यातील आहेत. ते पण ट्रेनिंगला आलेत. म्हटल सुट्टी आहे. चला आपण फिरून येवू.
बर तुला माहीत आहे ना अलीबागची. मग आम्हाला गाईड कर की जरा.
स्वप्नील, हा सांगतो. …..
स्वप्नील इशानला अलीबाग मधील पॉइंट सांगू लागतो. तो सर्व ऋत समजावत.
ईशान व स्वप्नीलच्या गप्पा चाललेल्या पाहून
रेवती, (हळू आवाजात)
काय मेव्हन्या पावण्यांच्या गप्पा मस्त रंगल्यात नाही.
आण्विका, गप्प ग.
आण्विका, काय झाली का ओळख स्वप्नील.
स्वप्नील, हो झालीय. तसे पाहता आम्ही दोघे मूळचे एकाच भागातले आहोत ना.
ईशान, बर तू काय करतोस हल्ली.
स्वप्नील, माझं होय. बी बी ए कंप्लीट झालंय. आता एम. सी. ए. ला आहे. त्याबरोबर डाक्युमेंट्रीची कामे. ट्रेकिंगची देखील आवड आहे.
ईशान, मस्त आहे की. म्हणजे शिकत शिकत कमाई सुरू.
इथच झालं का शिक्षण?
स्वप्नील, छे नाही, बाबांच्या बदलीमुळे एक ठिकाण नाही. पण बी बी ए माझं पुण्याला झालं. तिथे काही काळ हॉस्टेलवर होतो. मात्र एम सी ए इकडे करतोय.
अरे तुम्हाला ओळख करून द्यायची राहिली. ही माझी बहिण रेवा, आयमीन रेवती. सध्या बारावी कंप्लेंट झालेय तुझी. तसेच तिने ऑनलाईन कोर्स देखील केलेत. अनेक पोस्ट व व्हिडिओज तिचे असतात यु ट्यूब वरती.
अन् या मॅडम काय ओळकीच्या आहेतच की.
आण्विका, नाहीये माझी ओळख करून दे की मग.
सर्वजण हसतात.
स्वप्नील, काय साहेब आपली ओळख करून घ्यायची राहिली.
रवींद्र, मी मूळचा मराठवाड्यातील औरंगाबाद विभागातील एक छोटस आमचं गाव. सध्या गौताळा अभयारण्यात कामाला आहे. फॉरेस्ट खात्यात. लग्न झालंय. पत्नी साधी सरळ गृहिणी आहे. दोन मुले आहेत मला. असा सुखी संसार चाललाय.
या की कधीतरी आमच्या इकडे. मस्त अभयारण्य पाहू, किल्ले लेणी मस्त आहेत बघण्यासारखे पॉइंट आमच्याकडे.
स्वप्नील, नक्की येवू. दरवर्षी आम्ही ट्रेकला कोणता न कोणता पॉइंट निवडतो. जर का तिकडे येणं झालं. की नक्की येवू आम्ही.
ईशान, स्वप्नील आता कुणीकडे जायचं.
स्वप्नील, हा पुढील चौकातून डावीकडे तिथे आहे एक पॉइंट. मस्त बघण्यासारखा.
स्वप्नील त्यांना अलीबाग मधील निरनिराळ्या देवळे. व ठिकाणे दाखवतो. त्यानंतर ते नाष्टा करतात. व पुढे अलिबाग समुद्र किनाऱ्यावर येतात.
….. ….. ….. …..
अलिबाग किनारा. Afternoon. Outer
स्वप्नील , चला आपण पाण्यात खेळू.
स्वप्नील आपला शर्ट काढून रेवतीकडे देतो.
व ईशानला चल की. एन्जॉय करू
ईशान, अरे पण मी कपडे आणली नाहीत बदलायला.
स्वप्नील, पाण्यात भिजण्यासाठी कपडे कशाला. चल.
(रविकडे पाहत) सर तुम्ही पण चला.
ईशान पण कपडे काढतो. व त्यासोबत पाण्यात जातो. तो, रवी व स्वप्नील मस्त एन्जॉय करतात.
इकडे रेवा व अण्विका वाळूमध्ये किल्ला बनवू लागतात.
थोड्या वेळानं ती अण्विका व रेवाला ही नेतात. पण त्या जास्त पाण्यात न जाता थोड्याच पाण्यातून परततात.
भिजलेली कपडे बदलण्यासाठी. एका किनाऱ्यावरील एका दुकानातून स्वप्नील त्या दोघांना एक शर्ट व प्यांट घ्यायला लावतो.
…… …… …… ……. …
Day. Afternoon. २.०० outer
स्वप्नील व ईशान रवी त्या दोघी जवळ येतात.
स्वप्नील, चला आपण कुलाबा किल्ला पाहायचा.
रेवती, पाहिलाय परवा.
स्वप्नील, पुनः पाहायचा.
ईशान, चला की आम्ही नाही पाहिलाय पुन्हा पाहा.
ते किल्ला पाहायला जातात. आण्विका त्यांना जागोजागी सर्व माहिती सांगते. किल्ला त्याची बांधणी. व इतर.
ते पुढे तोफा पाहायला पुढे जातात.
रेवा व अण्विका मागे असतात.
रेवती, (अण्विकेस) मस्त गाईडच काम केलंस ह.
आण्विका, हो खरंच.
रेवती, चॉइस चांगली आहे मॅडम, शारीरिक दृष्ट्या फिट्ट आहे. व बोलण व स्वभाव देखील चांगला आहे.
याच्याशीच विवाह कर.
आण्विका, एवढ्या लवकर रिझल्ट. कमाल आहे बाई तुझी.
रेवती, अग, असली अपोरचूनिटी सोडायची नसते.
त्या दोघी मागे राहिल्यावर ईशान व स्वप्नील हाक मारतो.
आण्विका, अग चल ती बोलवताहेत
एका तासात किल्ला पाहून ते परत गाडी जवळ येतात.
ईशान, स्वप्नील इथे चांगल जेवण कोठे मिळेल.
स्वप्नील, तस पाहता या ठिकाणी भरपूर हॉटेल्स आहेत. पण माझ्या पाहणी नुसार एक मस्त रेस्टॉरंट आहे. आपण तिथे जावूया.
ती सर्व रेस्टॉरंट मध्ये जातात.
ते सर्व जेवण करतात.
Afternoon. ३.०० o’ clock.
जेवण झाल्यावर
रेवती, मस्त जेवण होत नाही.
आण्विका, हो ग.
आण्विका बिल देवू लागते. ईशान तिला अडवतो व स्वतः बिल देतो.
ईशान, मॅडम थांबा देतो मी.
आण्विका, अरे, देते की मी.
ईशान, नको म्हणजे नको. मी देतो.
वेटर येतो ईशान त्याकडे बिल पेड करतो.
..,… ……. …… … …..
Day. Evening. ४.३० o’ clock. Outer in गाडी
ईशान गाडी चालवत आहे.
ईशान, आता बोला कुणीकडे जायचय.
स्वप्नील, आता शेवटचा जवळील पॉइंट म्हणजे किहीम बीच.
ईशान, चला तर मग स्वप्नील रस्ता तेवढा सांग.
स्वप्नील, हा हा घे.
स्वप्नील गुगल मॅप ने दाखवतो.
आण्विका, स्वप्नील माझं एक काम आहे इकडे. अरे आपली वेदांगी आहे ना. तिला इकडील एक स्थळ आलं आहे. त्याची माहिती काढायची आहे. हा बघ बायोडेटा.
स्वप्नील, हा, एवढंच ना. थांब सांगतो.
ईशान, वेदू लग्न करतेय.
आण्विका, हो.
ईशान, नव्हरा जरा स्ट्राँग बघा. नाहीतर महिन्यात मारून खुळखुळा करेल.
आण्विका, एवढी काही वाईट नाही हो ती. अत्यंत साधी आहे.
ईशान, ती साधी, भांडण करण्यासाठी नेहमी तयार असते. की.
स्वप्नील फोन लावतो. व आपल्या मित्रास.
“ हॅलो, कोण मोहण्या काय?
मोहन, बोल की.
ईशान, मी तुला बायोडेटा पाठवला आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती हवी होती
मोहन, येवढच होय. काढुया की. त्यात काय?
तो ठेवतो.
…. …… ….. …..
Evening,. ५.०० o'clock. किहीम बीच.
किहीम बीचवर गाडी पार्किंग करून. सर्वजण खूप मौज करतात.
आण्विका, व रेवती पण थोडावेळ खेळतात. आण्विका, व ईशान एकमेकांकडे पाहत असतात. हे स्वप्नील व रेवतीस जाणवत. पण ती दोघं तस दाखवत नाहीत. आण्विका स्वतः ला आवर घालते.
आण्विका, रेवा चल मस्त वाळूत घर बांधूया.
रेवती ,चल.
त्या दोघी जातात. ते तिघे लाटांवर खेळू लागतात.
ती लांब असल्याचे पाहून रेवती
काय अनु दीदी आता पासून मालकाचे पैसे वाचवायला लागलीस.
आण्विका, काय ग, मला नाही समजल. असं का म्हणतेस.
रेवती, हॉटेलमध्ये जेवणाचे बिल भागवत होतीस.
आण्विका, मग भागवायला नको. सकाळ पासून सर्व खर्च तोच करतोय. गाडीचार्ज, नाष्टा, जेवण वगैरे. सार काही तोच करतोय.
तो काही जमीनदार घरातील नाहीये.
रेवती, अग, हो. किती बाजू घेशील. खरंच आजच्या मुली एकेका मुलाला प्रेमात पाडून वर्षभर खेळवून त्याला एका दोन लाखाला बुडवून ब्रेकअप करतात. व तू मात्र अजून कशात काय नाही अजून, लगेच होकार देशील. गप्प बस जरा.
आण्विका, हे बघ रेवा. त्याला माझ्याबाबत काय वाटत. किंवा मला त्याच्या बाबत काय वाटत हे महत्त्वाचं नाही. हा साधा व्यवहार आहे.
रेवती, अग हो मला कळतंय. म्हणून मी पैसे आणलेत. पण नंतर करू की पेड.
आण्विका, नंतर तो घ्यायचा नाही, नाईटच जेवणं आपण द्यायचं.
रेवती, बर बाई. पण लई भाळू नकोस. आवर घाल भावनांना आजच्या दिवस तरी.
आण्विका, ए काही विपरीत तरी करणार नाहीस ना.
रेवती, नाही ग, बघ तुझा प्रेमी पागल होईल तुझ्या मागणं प्रपोज करायच्या आधीच निकाल कळेल.
आण्विका, ते कस काय?
रेवती, बघच, थांबवं आता बोलण, स्वप्नील येतोय.
अण्विका, अग तो आपलाच आहे ना?
रेवती, गप बस. स्वप्नील आहे तो. त्याच्या तोंडात तीळ देखील राहत नाही. सगळ्या घरभर करील तो.
स्वप्नील येतो. त्यांजवळील बाटलीतील पाणी पिवून जातो.
ईशानच लक्ष संपूर्ण अण्विकाकडे होते.
रेवती, चॉइस चांगली आहे तुझी
आण्विका, कसा वाटला.
रेवती, पहिलवान क्याप्चर केलास की. आता काय घरातच तालीम.
आण्विका, ये तो काही पैलवान नाही. ऑफिसर आहे.
रेवती, मग जावा जंगलात दोघेजण. झाडे व प्राणी बसा मोजत.
आण्विका, तू ये की ठसे व दात मोजायला.
रेवती, मला काय बिर्याणी बनवायचा बेत आहे.
ती तिघे पाण्यातून बाहेर येतात.
गोड्या पाण्याचे स्नान करून कपडे बदलू लागतात. अण्विका ईशानला कपडे देवू लागते.तेव्हा रेवती डोळे मोठे करून पहाते.
…… ……. …… ……. …..
क्रमशः पुढे.....
No comments:
Post a Comment