Day. राधानगरी. फॉरेस्ट ऑफिस inter
ईशान आपल्या केबिन मध्ये येतो. इतक्यात बाहेरून एक कर्मचारी त्याला एक लेटर आणून देतो.
कर्मचारी, ईशान सर तुमच्यासाठी एक लेटर आलंय पाहा.
ईशान, आपल्या खुर्चीत बसलेला असतो.
ईशान, हा आन इकडे.
कर्मचारी लेटर देतो
ईशान ते उघडतो. व पाहतो.
तो नाराज होतो.
त्याला पाहून कर्मचारी, काय झालं साहेब.
ईशान, काय होणार आणखीन. बदली झालिये माझी.
कर्मचारी, काय सर अडीच वर्षे तर झाल्यात आपल्याला अन् लगेच बदली.
ईशान, काय माहित.
कर्मचारी, कुठे पोस्टिंग झालीय.
ईशान, कोयना अभयारण्य.
कर्मचारी, चांगली जागा आहे सर. मस्त शांत परिसरात, तुम्ही जा तिकडे.
ईशान, हा बर.
इतक्यात त्याला घरून फोन येतो.
बाबा, ईशान कुठे आहेस?
ईशान, कामावर.
बाबा, घरी ये शनिवारी.
ईशान, का काही काम आहे.
बाबा, काही नाही, जरा चर्चा करायची होती.
ईशान, कशा बद्दल?
बाबा, तुझ्या लग्नाबद्दल.
ईशान, इतक्या लवकर कशाला?
बाबा, मग काय तू पळून गेल्याची बातमी पेपरात यायची वाट बघायची. अन् मग तुला विचारू का? ते काही नाही शनिवारी घरी यायचं. ते ही दोन दिवसांची सुट्टी घेऊन.
ईशान, मला एवढ्या लवकर नाही लग्न करायचय.
बाबा, मग काय म्हातारं झाल्यावर बोहल्यावर चढणार आहेस.
ईशान, थोड दोन चार महिने तरी द्या मला.
बाबा, म्हणजे कुठली तरी घेऊन यायला पोरगी. ते काही नाही. शनिवारी यायचं म्हणजे यायचं. बाकी काय आम्हाला माहीत नाही.आम्ही एक मुलगी पहिली आहे.
ईशान, मला ती पसंत नसेल तर.
बाबा, पाहायच्या आधीच कसे ठरवतोस ,ते बघू नंतर. तू जर का आला नाहीस तर मी काहीतरी बरंवाईट करून घेईन
ते फोन ठेवतात.
ईशान खूप चिडतो.
….. …… ……. ……
Day. आण्विकेच्या घरी inter
आईने जेवण वाढलेले असते. बाबा , भाऊ जेवायला येतात.
बाबा, अनु कुठे आहे.
आई, आणखी कुठे असणार, असेल तिच्या खोलीत.
बाबा , जेवली का?
आई, नाही.
बाबा, का?
आई, हे बघा तिच्या मनात तो असेल तर.
बाबा, अग पण तिने आपल्याला आधी सांगायचं नाही का?
आता बघ सगळीकडे बदनामी चालू झालीय.
बाबा, ( हाक मारतात) अनु ये अनु.
आण्विका, आपल्या खोली बाहेर येते. काय बाबा,
बाबा, चटकन जेवायला ये .
आण्विका, भूक नाही.
बाबा, बाहेरच हॉटेलचे जेवायची सवय लागलीय ना. घरचं कसं गोड लागेल. चल झटकन ये.
आण्विका, खाली येते. व जेवायला बसते.
बाबा, वाढ तिला.
आई जेवायला वाढते.
जेवत असताना थोड जेवण झाल्यानंतर.
आपल्या बायकोला,
बाबा, एक छानशी साडी काढून ठेव. दोन दिवसांनी रविवारी एके ठिकाणी आपण स्थळ बघायला जाणार आहोत.
आण्विका, मी फक्त ईशान संगे लग्न करेन.
बाबा, येवढ्या मोठ्या संकटातून वाचलीस तरी देखील डोळे उघडले नाहीत.
आण्विका, वाचवली कुणी त्यानेच ना.
बाबा, हो वाचवली पण बदनामी आमची झाली त्याच काय?
आण्विका, मग तुमची ही बदनाम मुलगी कुणा दुसऱ्याच्या गळ्यात घालण्यापेक्षा त्याच्याच गळ्यात घाला.
बाबा, ते बघू आमचं आम्ही काय करायचं ते. तू लग्नाला उभी राहायचं बघ. स्थळ मी बघितलंय.
आण्विका, मी इशांनसोडून दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही.
आई, अनु एवढी उद्धट बोलायला कुठून शिकलीस. माझी अनु अशी नव्हती. शांत सोज्वळ माझी अनु आज इतकी उद्दट कशी?
आण्विका, माफ कर आई मला. पण तुम्हाला माझ्या भविष्याची काळजी नाही. मला तो आवडतो. व प्लीज मला त्याच्यापासून वेगळ करू नका.
बाबा, ते बघू काय करायचं ते. तू परवा रेडी रहा.
आण्विक रडू लागते.
ती उठते व आपल्या रूममधे जाते.
आई, अहो आयका की बघ नाहीतर करू तिच्या मनासारखं. मला पण मुलगा पसंत आहे. चांगला वाटतोय.
बाबा, बघू विचार करून.
….. …… …. …..
No comments:
Post a Comment