शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Sunday, July 20, 2025

फ्रेंडशिप एक साहस भाग १२

फ्रेंडशिप एक साहस भाग १२

 Night / outer/ road

In scrpivo

श्वेता :

 सगळ्या पार्टीचा पचका केला त्या बेवड्यान.

अनुजा :

 हॉटेल वाल्याला कळतच नाही असल्या कस्टमरला वेगळा वार्ड असावा ते.

प्राजक्ता :

 उगाच कायपण बोलू नका. त्याने आपल्याला स्पेशल प्लेस दिला होता. काऊंटर तर एकच असणार ना. तिथेच तो कडमडला.

श्वेता :

 तो मुलगा मध्ये पडला म्हणून बर. नाहीतर

प्राजक्ता :

 नाहीतर काय आपला गँग बुलवावा लागला असता 

श्वेता :

आपण थांबायला पाहिजे होत. काय झालं असेल.

प्राजक्ता :

 हो ग आपणं त्या मॅनेजरच ऐकूण आलो. त्या गुंडाने त्या मुलाला मारलं तर.

श्वेता :

 मॅनेजरने काहीतरी जोडणी लावली असेल.

( गाडीच्या चाकास खीळा लागून चाक पक्चर होण्याचा आवाज)

प्राजक्ता :

अरे पंक्चर झाले वाटते.

( गाडी बाजूला घेते.)

श्वेता :

 चला उतरा ग चाक बदलुया.

( चाक काढण्याचा प्रयत्न करू लागतात.)

Cut to

……. ….

Night / outer / road

(आश्विन व जयेश रोडवरून जात असताना)

आश्विन :

 तिचं नाव जरी कळलं असत तर बरं झालं असतं.

जयेश :

 समजेल यार चल.

जयेश :

 अरे त्या बघ, त्या मुलींची गाडी. पंक्चर झालीय वाटत. देवानं ऐकलं तुझं.

( स्कॉर्पिओ दिसते, तिची लाईट चालू बंद होत असते. ते बाईक तिकडे घेतात.)

….

(स्कॉर्पिओ जवळ श्वेता व वेदिका चाक काढत असते.)

श्वेता :

 रेवे मोबाईलची टॉर्च चाकावर पाड, माझ्या तोंडावर नको.

रेवा :

 हा.

श्वेता :

अग, तीन बोल्ट निघाले, हा एकच निघेनासा झालाय.

वेदिका :

 जरा गंजलाय वाटतं. त्यामुळेच निघत नाही.

श्वेता :

( चाकावर लात मारत)

 ड्यामिट , धोकेबाज.

अनुजा व रेवा :

 थांब आम्ही बघतो.

( त्या प्रयत्न करु लागतात. बाइकचा आवाज येतो. लाईट पडते. बाईक जवळ येत )

आश्विन :

 पंक्चर झाले वाटतं.

रेवा :

 हो , मघापासून प्रयत्न करतोय, हा एक बोल्ट निघतच नाही.

आश्विन :

 मी पाहतो.

(चाक काढण्याचा प्रयत्न)

आश्विन :

जयेश पाना दे.

( चाक काढून स्टेफनी काढली जाते.)

आश्विन :

 जरा पाणी मिळेल का, हात धुवायला.

प्राजक्ता :

अनुजा  मागील बाजूस बाटल्या आहेत. घे त्या.

अनुजा :

माधवी तू दे

( माधवी बाटली घेऊन येते.)

प्राजक्ता :

 अग, मला कुठे देतेस, हातावर घाल पाणी.)

( माधवी पुढे होऊन हातावर पाणी घालू लागतो.)

माधवी :

 हा घ्या.

आश्विन :

मॅडम रागवलेत वाटत.

माधवी :

 नियोजन घातलं. अन् सगळं पाण्यात.

आश्विन :

 कुणीकडे निघालाय.

माधवी :

 इथेच कोल्हापूर, हॉस्टेलवर आहोत आम्ही.

आश्विन :

 रात्रीच मुलींनी असं फिरण बर नव्हे.

माधवी :

 रोज कुठे जातोय, आजच आलोय. जेवायला.

आश्विन :

आई ग,

माधवी :

 काय झालं.

आश्विन :

चाक बदलताना जरा पत्रा लागला.

माधवी :

 अरेरे.

प्राजक्ता :

श्वेता त्या पर्स मधील क्रीम काढ व लाव.

श्वेता :

( क्रीम घेते माधवीस )

माधवी  जरा लाव ग.

 (  माधवी क्रीम लावते. तो प्राजक्ताकडे पहात असतो.)

जयेश :

 असं रात्रीचं मुलीनी फिरन बर नव्हे. तुम्ही ती फिल्म पहिली नाही का?

रेवा :

 कोणती?

 जयेश :

 सातच्या आत घरात.

माधवी :

पाहिलीय ना.

 जयेश :

 मग सावधगिरी बाळगायला हवी.

प्राजक्ता :

हो घेतो आम्ही काळजी.

जयेश :

एखादा ड्रायव्हर घेत जा. कसं आहे मुलींना पंक्चर चाक काढायला जमत नाही.

श्वेता :

 सल्ला दिल्याबद्दल आभारी आहोत.

प्राजक्ता :

 चला, वेळ होतोय.

( त्या गाडीत बसतात. गाडी निघते. अश्विन गाडीकडे पहात असतो.)

जयेश : ( तोंडासमोर हात फिरवत)

 शुक s s शुक s s

 साहेब गेल्या त्या. या आता शुद्धीत.

आश्विन :

 किती छान आहे ना ती!

जयेश :

 हो का? नाव काय तिचं.

आश्विन :

 नाव, काय तिचं,…. च्यायला विचारायचंच राहील.

तू तरी आठवण करायचिस ना.

जयेश :

 कोण मी? पुढ्यात आल्यावर तुझी मती गुंग होते. ऐकण्याच्या मनस्थितीत तरी असतोस का?

 अन् हो या पोरी साध्या मॅरेज टाईप नव्हेत हा. रात्रीच स्कॉर्पिओ घेऊन फिरणाऱ्या सिंपल नाहीत हा.

आश्विन :

 आपल्याला तर अशीच घर मालकीण पाहिजे.

जयेश :

चल गप्प, तुझ्या बाबाला चालेल का? आधी तुझी इंटर्र्शिप संपव व घरचा बिझनेस सांभाळ, मग पाहू लग्नाचं. चला आता …. भारी स्वप्न बघताय.

( अश्विन हसतो, बाईक जातांना दिसते)

Cut to …

….. …… ….

Night / outer/ in Scorpio

माधवी:

एवढी मदत केली त्यानं. आपणं धन्यवाद मानायला हवे होते.

श्वेता :

मग आडवल होत कुणी? मानायची होतीस,… धन्यवाद.

अनुजा :

 बिचाऱ्याला लागलं ग.

श्वेता :

एवढं वाटत तर मघाशी क्रीम का देत नव्हतीस.

अनुजा :

अग, एखाद्या अनोळखी माणसाशी कस लगेच बोलायचं. अवघड वाटत.

माधवी :

चाक बदलून घेतलंस ना, तेव्हा नव्हता अनोळखी.

रेवा :

सोडा तो विषय.

प्राजक्ता :

 सोडा काय सोडा, या घटनेनं काही शिकायला मिळालं का?.

वेदिका :

 काय शिकायला मिळालं.

 (गाडी बाजूला घेते. ब्रेक दाबल्याचा आवाज. थांबवते)

प्राजक्ता :

 आपणं अजूनही परावलंबी आहोत.

वेदिका :

ते कसं काय?

प्राजक्ता :

हे बघ त्या हॉटेलमध्ये आपण त्या तरुणा मुळे त्या बेवड्या गुंडाच्या भांडणातून  सुटलो. साधं गाडीच चाक बदलता नाही आल्ं आपल्याला, यासारखं दुर्दैव काय?

वेदिका:

अग, जगात कोणच परिपूर्ण नसत.

प्राजक्ता :

हे बघ जग व आपली तुलना करन सोडून दे.

वेदिका :

मग काय करायचे?

प्राजक्ता :

स्वतचे काम स्वतः करता आलं पाहिजे. तसेच शरीर संरक्षण करता आलं पाहिजे. तरच आपल्या गड चढण्याचे सार्थक होईल.

श्वेता :

 अगदी बरोबर आहे. मग लागायचं का तयारीला.

प्राजक्ता :

(हात पुढे करत)

डन ना.

( सर्वजणी हात हातावर ठेवत.)

डन

( गाडी जातांना दिसते.)

Cut to ….

………… ……

Inter / night / kantenar

(किडन्याप केलेल्या एका मुलीस शुद्ध येते.- अपहरण झाल्याचे जाणवते.रडण्याचा आवाज, कंटेनर दरवाजा उघडण्याचा आवाज. आवाज ऐकून मुग्धा पुनः बेशुध्द नाटक करते. दाढी वाढलेला, सुरमा घातलेला जावेद आत येतो. रडणाऱ्या मुलीचे तोंड हाताने धरतो.)

जावेद :

बडी प्यारी लगती हो, मुझे तो भा गई हो. अनारकली , लेकीन…..

मुलगी :

 सोडा, मला सोडा जाऊ द्या…

जावेद :

छोडणे के लिये नहीं पकडा है l तेरे को, रुक ना जरा, शोर मत मचा. खाना खायेगी l

 अमजद खाना ला l

( अमजद बिर्याणी आणतो. ती बिर्याणी तिला जबरदस्ती चारवतो. ती थुंकते.)

मुलगी :

नालायक, मास चारतोस.

( एक् राक्षसी हास्य)

जावेद :

 अमजद लगा दे सुई.

( अमजद इंजेक्शन देतो. ती ओरडत असते.)

मुलगी :

सोड मला, नालायक  माणसा, चांडाळा सोड मला.

( इंजेक्शन देतात. ती बेशुध्द , इतर मुलीचे  चेकप करतात)

मुलीकडे पहात.

जावेद :

आज रात को ये पार्सल अंगुरो वाले कंटेनर मे डाल दो

अमजद :

जी हुजुर.

( कंटेनर दरवाजा बंद होण्याचा आवाज.)

(मुग्धा अंदाज घेते, उठते, इकडे तिकडे पहाते. एक् धारदार पट्टी दिसते. अंतर्वस्त्रात लपवते. भूक लागलेली आहे. ती बाजूला पडलेल्या बिर्याणीतील भात शिताचे दोन चार घास मास वगळून खाते. गचके लागतात. कोपऱ्यात जाऊन बसते. मनात.)

मुग्धा :

हे परमेश्वरा उचकी थांबवं, मला यातून निसटायचं आहे. शक्ती दे. वाट दे.

( त्या बेशुध्द मुलीत जाऊन आडवी पडते.)

Cut to ….. …..

…… ….. …….

Night / outer / Hostel

( मुली स्कॉर्पिओ मधून उतरतात.)

वेदिका :

 किती वाजलेत.

श्वेता :

 साडे दहा.

वेदिका :

एकटी जाऊ नकोस. श्वेता जा बरोबर, तेवढीच सोबत होईल.

प्राजक्ता :

 दहा मिनिटांचा रस्ता आहे.

वेदिका :

 तरी पण.

श्वेता :

 हे बघ येते मी, येईन उद्या सकाळी परत.

प्राजक्ता :

 नाही नको, तू मला सोडाय ये, नंतर मी तुला येते. असं किती दिवस चालणार. मला ही धाडशी व्हायचेय.

श्वेता :

आपली तयारी झाली ना, मग ठरवू.

प्राजक्ता :

 ते काही नाही, उद्या वाट पाहणं संपल. आज व आता पासून सुरू.

( स्कॉर्पिओ चालू होते. गाडी निघण्याची क्रिया.)

श्वेता :

पोहोचल्यावर फोन कर

प्राजक्ता :

हा करते. जाऊ आता.

वेदिका :

 जा…

Cut to …… ..

……. ….. ……

Night / prajakta Home / Inter.

(वडील हॉल मधून फेऱ्या मारत आहेत. ते आपल्या पत्नीस)

सयाजीराव :

 तुम्हाला कळत कसं नाही. एकटीला कसं पाठवलं.

सावित्री :

मला तर म्हणाली, परवानगी दिलीय तुम्ही. मी तरी पण म्हणाले, ड्रायव्हर काकांना बोलावते म्हणून.

सयाजीराव :

 जेवायला हॉटेलला परवानगी दिली मी, एकटीला गाडी घेऊन जाण्यास नाही.

सावित्री :

 काय लबाड कार्टी आहे. मला पण बोलण्यात गुंडाळलं.

सयाजीराव :

 तुम्हाला पण कळायला पाहिजे, ती रात्रीचं जातेय म्हंटल्यावर आपण ड्रायव्हरला बोलवायला हवं.

सावित्री बाई :

अहो, तो सुट्टीवर गेलाय, काही काम आहे म्हणे.

सयाजीराव :

 हे आणि कोणी सांगितलं तुम्हाला?

सावित्रीबाई :

 प्राजक्ता ने.

सयाजीराव :

झालं… ड्रायव्हर सुट्टीवर आहे. हे देखिल तिने सांगितले.मघाशी मी फोन केला होता त्याला. तर तो म्हणाला, त्याला ताई साहेबांनी सुट्टी घ्यायला सांगितलेय व इतकचं नाही. स्टँड वरील हॉटेलच फॅमिली पॅक कूपन ही दिलंय. जेवाय जायला. बोला आता एवढा पैसा हिच्याकडे येतो कुठून.

सावित्री बाई :

मी तर दिले नाहीत. तुम्ही देता. व मला कशाला बोलता?

( आजीच्या खोलीतून रामरक्षा म्हणण्याचा आवाज येतो.)

प्राजक्ता भाऊ प्रमोद :

घ्या अर्थमंत्र्यांचा आवाज आला,

सयाजीराव :

 कोण आई.

सावित्रीबाई :

हं, तरी म्हटल दुपारी गच्चीवर आजी व नात कुठल्या बागेला खतपाणी घालत होत्या. ही गुपित शिजलित तर

( सयाजीराव आईच्या रुमकडे जाऊ लागतात.)

(स्कॉर्पिओ आल्याचा आवाज.)

सावित्रीबाई :

 आली वाटत.

Cut to ….....

….. …… …

Night / outer/ prajkta home

( वाचमेन गेट उघडतो. स्कॉर्पिओ आत येते. पार्किंग होते. प्राजक्ता दरवाजाकडे जाते. बेल वाजवते. बाबा दरवाजा उघडतात. आत येत.)

प्राजक्ता :

 अय्या बाबा अजून जागे.

सयाजीराव :

लेक बाहेर गेलीय म्हंटल्यावर कोणता बाप स्वस्थ झोपेल.

प्राजक्ता :

 हे काय, जेवायला तर गेलते.

( पायातील बूट काढून ठेवत.)

सयाजीराव :

 बाळ प्राजक्ता, जेवायला जाण्याबद्दल काही दुमत नाही, पण ड्राइव्हरला तरी घेऊनन जायचं.

प्राजक्ता :

 कशाला वाचमेनकी करायला. ते काही नाही आता मोठी झालेय मी.

सावित्री :

 ऐकलत ना, मोठी झालेय. , मग काढा एखादं स्थळ.

प्राजक्ता :

 घालवायलाच बसलाय. एवढी जड झालेय का मी.

सावित्री :

 तस नाही बाळ.

प्राजक्ता :

 तस नाही तर मग कसं. एक तर आजचा दिवसच पणवती. अन् इथे आल्यावर घरातल्यांची बोलणी.

सावित्री :

 काय ग,  काय झालं?

प्राजक्ता : (मनात)

यांना न सांगितलेलाच बर. नाहीतर बाहेर फिरायला अटकाव बसायचा.

प्राजक्ता :

 काही नाही, गाडी पंक्चर झाली होती.

( आपल्या रूमकडे जाऊ लागते.)

सावित्री :

 काय गाडी पंक्चर झाली.

प्राजक्ता :

 सोडा आता विषय, आलेय ना मी, आता काळजी नको, झोपा जावा.

( प्राजक्ता रुममध्ये जाते. दार बंद करते.)

सयाजीराव :

हे आपलं बर आहे हिच.

प्रमोद :

चडवा आणखी डोक्यावर.

सावित्री :

 तू गप्प बस, उगाच काहीतरी बोलू नकोस, किती लाड केले तरी आमच्या हाताबाहेर काही जाणार नाही ती. तुझ्यासारखी.

प्रमोद :

मम्मी उगाच शेफारु नकोस हं तिला.

सयाजीराव :

 प्रमोद विषय बंद, जा झोप जा तू.

प्रमोद :

 हे आपल बरं आहे.

सयाजीराव :

चल ग तू पण, झोपू दे तिला दमली असेल ती.

सावित्री :

हो.

( आपल्या खोलीत बाहेरील बोलणे प्राजक्ता ऐकत आहे. व हसत आहे.)

Cut to....

No comments:

Post a Comment

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...