Night / inter/ loj
प्राजक्ता व श्वेता रीसेप्सनिस्ट जवळ येतात.
प्राजक्ता :
इथे जेवणाची सोय.
रिसप्सनिस्ट :
पुढे कॉर्नरला आहे.
( प्राजक्ता फोन वाजतो. ती पहाते. आईचा असतो. कानाला लावत.)
प्राजक्ता :
बोल,
सावित्रीबाई :
अग, केव्हापासून ट्राय करते. लागत नव्हता फोन. कुठं ठेवला होतास.
प्राजक्ता :
अगं, घाटात असताना रेंज नसते. कसा लागेल?
सावित्री बाई :
पोहोचल्यासा नीट.
प्राजक्ता :
आलोय पोलादपूरला.
सावित्रीबाई :
कूठे थांबलाय.
प्राजक्ता :
आहे एका लॉजवर.
सावित्रीबाई :
अग, लॉजवर राहण्यापेक्षा पपांच्या मित्राचा फार्म हाऊस होता ना तिथे जवळच.
प्राजक्ता :
तुझ झालं सुरू, अग.. इथ ठीक आहे. दुसरीकडे मुक्कामाचं असत तर ….
सावित्री बाई :
पण आपली सोय असताना..
प्राजक्ता :
हे बघ, इकडे सर्व व्यवस्थित आहे. गाडी, ड्रायव्हर काका, सुमा, मी मैत्रिणी सगळ नीट आहे. काळजी करू नकोस. बर ठेवते. जरा जेवणाच बघतो.
सावित्री :
चांगल्या हॉटेलात जा, अन् हा अक्वाचं पाणी पी काय.? मागे डिग्गित बाटल्या ठेवल्यात बघ.
प्राजक्ता :
बरं बाई … जातो. आजीला तेवढं सांग. नाहीतर काळजी करत बसायची.
सावित्रीबाई :
सांगाय लागत नाही, बातमी पोहोचली.
प्राजक्ता :
म्हणजे स्पीकर ऑन ठेवून बोलत होतीस तर.
सावित्री बाई :
मग काय, सगळे काम ठेवून बसलेत.
प्राजक्ता :
मग त्यांना सांग जेवा आणि झोपा. प्राजक्ता आहे खंबीर.
( कॉल कट करते. )
श्वेता :
काय घरून फोन का?
प्राजक्ता :
हो, उगाच काळजी करत बसायचं, यांच्या काळजीने आमची कुकुली बाळ व्हायची पाळी आलेय. बर त्यांना बोलावं वेळ होईल, जेवा य जाऊ.
Cut to ……
…… …… ……. ….
Night / inter /prajkta home
( फोन ठेवल्यावर )
सयाजीराव :
काही म्हणा, पोरगी धीट झालीय
आजी :
मग नात कुणाची आहे?
सयाजीराव :
होय बाई तुझीच आहे.
आर, आठवण झाली. आलोच ….
सावित्रीबाई :
आता तुम्ही अन् कुठे निघालाय. की जाताय पोलादपूरला,
सयाजीराव :
मला जायची गरज नाही. माझी लेक मोठी झालेय आता.
Cut to ……
…… ….. …..
Night / inter / prajkta home gyalari
सयाजीराव फोन लावतात.
पलीकडून
मल्हारराव :
हॅलो ,...काय, एवढ्या रात्री.
प्रतापराव :
कन्या कोकणात आहे. पोलादपूरला जरा लक्ष ठेवा.
मल्हारराव :
चांगल आहे की, काळजी करू नका. पाठवून देतो.
सयाजीराव :
पण जरा लांबूनच हा, नाहीतर मॅडम चीडायच्या.
मल्हारराव :
लोकेशन कुठे?
सयाजीराव :
थांबा पाठवतो, ड्रायव्हर कडून अताच घेतलंय.
( सयाजीराव लोकेशन सेंड करतात. मल्हारराव ते पाहतात.)
Cut to …… …
….. ….. ……..
Night / outer / gova - Mumbai road
( प्राजक्ता व मैत्रिणी बाहेर पडतात.)
श्वेता :
ये चला लवकर
अनुजा :
माझ्या तर पोटात कावळ्यांनी धुडगूस घातलाय. केव्हा एकदाची जेवते असं झालंय.
सर्वजणी :
चला …चला…
(प्राजक्ता मागे आहे. )
श्वेता :
प्राजक्ता चल..
प्राजक्ता :
अग, ड्रायव्हर काकांना बोलावते.
(प्राजक्ता गाडीजवळ जाते.)
प्राजक्ता :
काका चला जेवायला.
( सर्व गेटबाहेर जाताना, स्कोरपिओ मागे जाते. )
ड्रायव्हर :
गाडी काढू का?
प्राजक्ता :
नको, इथं जवळच तर जायचं आहे. तेवढीच शतपावलं.
रेवा :
मस्त , किती फ्रेश वाटतंय नाही का?
माधवी :
तो अभ्यासाचा कामाचा ट्रेस कमी झाल्यासारखं वाटतंय.
अनुजा :
हो ना, रोज रोज ती जाडी , जाडी पुस्तक बघुन भोवळ येईल.
प्राजक्ता :
नोकरी , व्यवसाय करण्यासाठी तीच जाडी पुस्तकं उपयोगी पडतील. , काय मॅडम.
रेवा :
हा पडतील, पण आत्ता तरी त्याची चर्चा नको.
( कॉर्नर येतो, हॉटेल पाटी दिसते.)
प्राजक्ता :
चला पेट पूजा करायची जागा आली.
( त्या आतमध्ये जातात.)
Cut to …..
….
Night/ inter /hotel
(त्या हॉटेलमध्ये बसल्या आहेत.)
वेटर :
बोला काय देऊ.
वेदिका :
( मेनू कार्ड पहात )
आठ शाकाहारी थाळी द्या.
(वेटर निघून जातो.)
रेवा :
महोदया, आपणं अप्रांत देश म्हणजे कोकणात आलो आहोत. एखादी फिशकरी अथवा एखादा साधा बंगडा तरी मागवा, या आत्म्यास बरं वाटेल.
वेदिका :
आपली इच्छा पुर्ण होईल, पण …
रेवा :
पण काय देवी …
वेदिका :
आपणं गड रोहन व अवरोहन करा, त्या पश्चात आपली इच्छा पुर्ण होईल. समजलं का?
रेवा :
हो समजलं समजलं…..
( वेटर येतो, जेवणं सर्व करतो.)
श्वेता :
( जेवण पाहून )
काय राव ही सोलकढी केवढी पातळ , पाणी वाढवलेलं दिसतंय. व ही काय डाळ आहे.
( वेटर संकोचतो व आत जातो.)
प्राजक्ता :
कोल्हापूर नव्हे हे. जेव गप्प.
श्वेता :
गप काय गप, पैसे घेतात, तसं द्यायला नको का?
प्राजक्ता :
तुमच्या सारख्या सुपीक जमनी नाहीत इकडे.
( श्वेता शांत होते. व गप्प जेवू लागते. )
Cut to …..
…… ….. ……
( स्कॉर्पिओ हॉटेल आवारात थांबते. सादिक व सहकारी आत येतात. व जेवणाची ऑर्डर देतात. व वेटर ऑर्डर आणून देतो, ते जेवू लागतात. जेवताना मुलींकडे यांचे लक्ष असते.)
माधवी :
पुढील मुक्काम कूठे करूया? गडावर का?
श्वेता :
गडावर नाही, गडाखाली पाचाडला.
अनुजा :
गडावर जाऊया की राहायला.
वेदिका :
नको, तिथं गर्दी असेल.शिवजयंती निमित्त, त्यापेक्षा पाचडला राहायचं. व आपल ठरलंय ना की गड चढून जायचं.
रेवा :
मग उद्याचं जाऊ की, म्हणजे परवा सोईस्कर होईल.
प्राजक्ता :
ते काही नाही, उद्याची रात्र पाचाडला, राजमाता जिजाऊच्या सहवासात. घालवायची. व परवा गड चढून उतरायचे समजलं.
रेवा :
बर …
श्वेता :
जेव आता, उगाच इथे चर्चा नको.
( सादिक आपल्या साथीदारांना नजरेने खुणावतो.)
Cut to ……
……. …… …..
Night / outer / hotel road
( ते जेवून बाहेर पडतात.)
अमजद :
दिखने मे लडकीयां बहुत ही कमाल है l लेकीन जरा तिखी है l
आसिफ :
हात मे असानीसे नहीं आयेगी l
सहकारी :
रायगड जानेवाली है l अब क्या करे?
आसिफ :
इन को पकडना है l तो बहुत सावधानी बरतनी पडेगी l
अमजद :
वही तो है l लेकीन पकडेंगे कहा l ये तो एकसाथ है l
सहकारी :
यह तो मुश्किल बात है l
सादिक :
थोडी देर पहले वह किधर रुकने की बात कर रही थी l
अमजद :
आ….. हा याद आया l वह पाचाड मे रुकने वाली है l
सादिक :
हमे अब वही पर ही जुगाड करना होगा l
आसिफ :
रात को ही दबोच लेंगे l दूसरे दिन सब लोग शिवजयंती मे सब मशगुल होंगे. किसी को खबर लगने से पहले काम करेंगे l
अमजद :
शेरनी पिंजरे मे आने के बाद…..
सहकारी :
भेज देंग उसी रात समंदर पार….
सादिक :
आखो मे तेल डालकर नजरे रखो l ये क्या, क्या करती है l कब यहा से निकलती है l सब कुछ देखना पडेगाव |
सभी ( एकसाथ ) :
जी..
सादिक :
लग जाओ काम पे l और रात को रहने का इंतजाम करो l
अमजद :
उसी लॉज मे रहे क्या ?
सादिक :
क्या जान पहचान करवानी है l अबे शक हो जायेगा l उधर देख l सी सी टिव्ही ….
अमजद :
( कॅमेरा सी सी टिव्ही वर जातो. अमजद मान हलवतो.)
हा …..
सादिक :
सामने के लॉज मे मेरे रहने का इंतजाम करो और…..
आसिफ :
और क्या ?
सादिक :
तुम लोग गाडी मे ही रुकना l और ध्यान देना l अगर काम ठीक नही हुवा तो ….
सहकारी :
तो क्या …
सादिक :
तुम लोगोका पार्सल मैं करुंगा l वो भी सिधे कब्रस्तानl
( सादिक लॉजकडे जातो. बाकीचे त्याकडे पाहात असतात.)
Cut to …..
… ….. …..
Night / inter / loj
( रुमची लाईट लागते. मुली आत येतात. )
अनुजा :
खूप कंटाळा आला. चला झोपुया.
रेवा :
माझं तर अवघडून अंग दुखत आहे.
वेदिका :
दोन सिटची जागा देऊन ही तुझं आपलं बरं आहे की. अंग अवघडलं म्हणे. झोप आता.
रेवा :
आपल्याला कसं ऐसपैस लागतं.
वेदिका :
दहा बाय दहाच्या रूममधे कशी रहाशील.
रेवा :
त्यात काय ? इथे नाही का अडजेस्ट करत… तुम्हा संगे.
माधवी :
ओ मॅडम , तू नाहीं करतं. आम्ही करतो स्वतःला,.. अडजेस्ट करते म्हणे.
( ड्रायव्हर काका बाहेर जाऊ लागतो.)
प्राजक्ता :
काका कुठे निघालाय?
ड्रायव्हर :
खाली गाडीत झोपतो.
प्राजक्ता :
नको गाडीत, इथेच झोपा.
ड्रायव्हर :
खाली गाडी बाहेर आहे.
प्राजक्ता :
पार्किंग मध्ये आहे ना, उगाच कशाला. झोपा इकडेच, भरपूर जागा आहे.
ड्रायव्हर :
बर , आलो एक रपेट मारून गाडी जवळून.
प्राजक्ता :
बरं ठिक आहे .
Cut to ….
…. …. …..
Night /outer – inter skorpio / on road
(स्कॉर्पिओ बाहेर रोड साइडला उभा आहे. शेजारी कचराकुंडी आहे. डास फिरत आहेत. आसिफ, अमजद, व सहकाऱ्यांना चावत आहेत. त्यांचे लक्ष मुली राहिलेल्या रूमकडे आहे. रुमची लाईट बंद ..)
अमजद :
लाईट बंद हो गई है l लगता है, सो गई l
चलो, हम भी सो जाते है l
आसिफ :
मालूम है ना, बॉस ने क्या कहा है l
अमजद :
आबे वो सो गई, रातभर जग कर क्या करेंगे l और मच्छर भी यह पर है l
( एका हातावर मच्छर मारतो.)
साथीदार :
तो क्या करे.
अमजद :
बॉस को पूछ कर लॉज पर जाते है l
आसिफ :
कॉल करके पूछ तो.
( फोन लावतो. बॉस घोरत असतो. उठतो.)
अमजद :
बॉस..
सादिक :
क्या है l
अमजद:
बॉस वह सो गई है l लाईट बंद है l हम आ जाये क्या?
सादिक :
यहाँ क्या काम है l चूप चाप रहो वाहा पर…
अमजद :
लेकीन यहा पर मच्छर काट रहे है l
सादिक :
तो क्या होगा?
अमजद :
डेंग्यू मलेरिया हुवा तो.
सादिक :
आबे वहा डिग्गी मे ओडोमास है l लगा कर सो जा | इधर मत आना l
अमजद :
लेकीन बॉस
सादिक :
आबे एक रात की तो बात है l तेरा पुरा खून नहीं चुसेंग मच्छर….
और चुसा भी तो पुण्य मिलेगा नेकी का तुम्हे, अब रख और नजर रख….
( साथीदार एकमेकाकडे पाहतात.)
साथीदार :
क्या हूवा.
अमजद :
बॉस ने कहा की ओडोमास लगाकर सो जा वही पर…..
आसिफ :
अब क्या करे ….
अमजद :
ओडोमास लगा , और दो पहरा…
Cut to ……
...... ..... ....
Day / morning / road
(टपरीवर चहा घेताना.)
प्राजक्ता :
चहा घ्या.
( रेवा प्राजकतास इशारा करते.)
प्राजक्ता :
दोन बिस्कीट पुडे द्या.
श्वेता :
रेवा एखाद्यावेळी बिस्कीट पाव नसेल तर कसे होईल तुझं.
रेवा :
चहाच घ्यायचा नाही.
श्वेता :
मग ठेव तो.
रेवा :
मग नाष्टा मागव, चालेल मला.
अनुजा :
ए खादाड गप्प, घे तो चहा….
उठसुठ काहीतरी खात अन् त्या पोम पॉम् टेडिशी खेळत असते.
( ब्लॅक स्कॉर्पिओ जाते.)
श्वेता :
अग ही गाडी कालपासून इथे आहे. अन् त्यातले तिघे सारखं इकडे तिकडे फिरताहेत. काय शोधताहेत कुणास ठाऊक?
वेदिका :
काय तरी करेनात का? चला आवरा पुढे जायचय.
( त्या गाडीत बसतात, गाडी निघते.)
Cut to …..
……
DAY / outer / on road
( स्कॉर्पिओतून कॉल करतात. बॉस अंघोळ करत असतो.)
अमजद :
बॉस ओ जा रही है l
सादिक :
जाणे दो l
अमजद :
उनको पकडणा है ना l
सादिक :
मालूम है ना, किधर जानेवली है l
अमजद :
मालूम था l तो हमको कायको रखा इधर रात को l
सादिक :
वाहा पे रखा इसलिये सुकून से सोया, वर्णा तुम्हारे खराटे रातभर कोण सूनता l अब आ जाओ इधर फ्रेश होकर आगे चलते है l
Cut to …….
…….. …..
Day / outer /road gova – Mumbai / mahad
वाटेत घाटात गाडी थांबवून त्या थोडा आनंद घेतात. मोठ्यानं हूक्या घालतात.
…… …… …
Evening / 4 .00 clock / pachad
( पाचाडला मोकळ्या जागेवर ट्यांक बांधत आहेत. साहित्य शोधताना)
प्राजक्ता :
अंग, सगळं घेतल. पण शेगडी घेतली नाही.
श्वेता :
ती कशाला हवी.
प्राजक्ता :
जेवणं करायला नको.
श्वेता :
चूल पेटवायची.
प्राजक्ता :
अंग लाकड नकोत त्यासाठी.
श्वेता :
तिकडं बघ.
( रेवा व अनुजा रानातील लाकड आणताना दिसते. )
श्वेता :
बायांनो बास करा. वर्षभर राहायचं नाहीये.
अनुजा :
तू गप ग. ही काय जास्त वेळ जळायची नाहीत. नंतर काय अंधारातून उडकायच.
वेदिका :
तर काय?
रेवा :
आता बास झालं. आता पाण्याचं बघुया.
प्राजक्ता :
गाडीत आहे ते प्यायला व जेवणाला पुरेल. पण खर्चाचं काय करायचं.
श्वेता :
इथ वाड्यात आहे ना विहीर. तिथलं घेऊ.
माधवी :
मोबाईल जरा व्यवस्थित युज करा. इथ चार्जिंग नाही.
प्राजक्ता :
गाडीमध्ये आहे ना.
माधवी :
तरी पण…..
श्वेता :
बरोबर बोलतेय. आपण बाहेर आहोत. जपूनच राहायला हवं.
वेदिका :
अनुजा श्वेता , तुम्ही पाणी आणायला जा. प्राजक्ता व माधवी जेवणाचं साहित्य काढा. मी व रेवा टेंक उभा करतो.
Cut to …......
….. …… …….
No comments:
Post a Comment