Evening / outer – inter / pachad jijau Vada avdhes
( पाण्याचा क्यान हातात आहे. श्वेता, अनुजा विहिरीच्या पायऱ्या उतरताना )
अनुजा :
काय अवस्था झालीय बघ. बघ किती पडझड झालेय.
श्वेता :
वस्ती संपली की कोणत्याही वास्तूची अवस्था अशी खिंडरासारखी होते.
अनुजा :
शिवकाळात किती वैभव असेल ना इथे.
श्वेता :
हो तर, याचा आवार पाहिला की अंदाज येतो वास्तूचा.
अनुजा :
किल्ला सोडून इथं का बरं रहात असतील मासहेब.
श्वेता :
अग, वयोमानानुसार उन वारा सोसत नाही माणसाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रहात होत्या.
अनुजा :
बांधकाम पाहिलंस का? आजच्या सारखी मशनरी नसताना, एवढी मोठी दगड कशी उचलली असतील त्यांनी त्या काळात.
श्वेता :
तेव्हा लोक कष्ट करायचे भरपूर, व धान्य ही होत ताकदीच, आज काल सगळंच संकरित, साधं वार आलं की माणसं उडून जातील. पतंगासारखी.
( खाली पायऱ्या उतरून जातात. )
Cut to …..
Evening /outer /pachad jijau Vada
( प्राजक्ता ने आणलेल्या प्लॅस्टिक वॉटर बलून मध्ये पाणी ओतताना.)
श्वेता :
अंग , बघ की, हा बघ भरेचना. भस्म्या झालाय का बघ तेला.
प्राजक्ता :
सात – आठ क्यान ओता फक्त. पूरे होईल. कशाला जास्त भरताय.
वेदिका :
दोन क्यान काय आणले, लगेचच दमल्या.
श्वेता :
चल की एका खेपेला, डोक्यावर देतो तुझ्या, कसं वाटतंय बघ. दाखव की तुझी पॉवर…
वेदिका :
मी असली काम नाही करत. बघ, इकडं टेन्ट कसा लावलाय ते.
अनुजा :
जरा ताकदीनं बांधा, नाहीतर जायचा उडून.
रेवा :
मी असताना जाईलच कसा? मामा आहेत की मदतीला.
वेदिका :
ये सुमन , जरा हातोडी दे.
(हातोडी सुमन देते. तिला नाराज पाहून.)
वेदिका :
का ग, अशी उदास का?
सुमन :
तुम्ही सर्वजणी काही ना काही काम करताय. पण मला काहीच करु देत नाहीत.
वेदिका :
तुला मदतच करायची आहे ना. मग तिकडे कर.
सुमन :
कूठे?
( वेदिका बोट प्राजक्ता कडे करत.)
प्राजक्ता :
नको इकडे, तिकडे श्वेता व अनुजाला कर जा.
अनुजा :
नको झालंय आमचं. एकच खेप आहे.
सुमन :
असं काय हे, मला द्या ना काहीतरी काम.
प्राजक्ता :
एक काम आहे, पण जमेल का तुला?
सुमन :
सांगा की लगेचच करते.
प्राजक्ता :
ते झाड आहे ना,
सुमन :
हा.
प्राजक्ता :
त्या झाडाखालील वारुळातील मुंग्या मोज जा.
( हसण्याचा आवाज.)
सुमन :
अस काय हे ताई ….
प्राजक्ता :
तिथं फुगून बसू नको, जा तिथलं जेवणाच साहित्य काढ जा. व व्यवस्थीत लाव.
Cut to ……
….. …… ….
Day / evening / pachad mal / outer
(विहिरी पासून थोड्या अंतरावर ओपन जीप येते. त्यातून अश्विन उतरतो.)
आश्विन :
( झोपलेल्या मित्रांना )
ये चला, उतरा रे, मुक्काम आला आपला.
जयेश :
( डोळे चोळत)
आला काय गड.
आश्विन :
गड नाही पाचाड आलंय.
जयेश :
ये उठा रे.
( अमित व उत्कर्ष उठतात.)
आश्विन :
जागा मस्त आहे. इथच मुक्काम करू.
( तोंड धुवायला पाणी घेणाऱ्या उत्कर्षला)
अश्विन :
ये ते पाणी नको सपवू, जेवणाला व प्यायला आहे.
उत्कर्ष :
तोंड कशान धुवू.
आश्विन :
तिकडं विहीर आहे बघ, जा तिकडे. व हा येताना एक क्यान भरून आण.
( उत्कर्ष व अमित जातात.)
Cut to ….
Evening / inter / Vada vihit
( उत्कर्ष व अमित पायऱ्या उतरून येतात. श्वेता क्यान भरून घेत असते.)
श्वेता :
( पाण्यात पाय धुणाऱ्या उत्कर्षला )
ओ.. मावळे…
(उत्कर्ष वर तोंड करून. हसत )
उत्कर्ष :
मला काय म्हणालात?
श्वेता :
हो तुम्हालाच.
उत्कर्ष :
काय ते?
श्वेता :
इथ पाय नका धुवू, पाणी बाहेर आणा व मग धुवा.
उत्कर्ष :
त्याला काय होत, इथ धुतलं तर ….
श्वेता :
चांगल्या पाण्यात तुमची पायधूळ नको.
उत्कर्ष :
मी इथच धूणार.
श्वेता :
मग मी मोठा दगड गळ्यात बांधून तुला विहिरीत ढकलणार.
( ते वाद घालू लागतात..)
अमित :
ए गप्प, भांडू नकोस. घे हा क्यान भरुन आणि चल वर बाहेर धुवू…
अनुजा :
आता कसं, शहण्यासारख बोललात.
( तो पाण्याचा क्यान घेऊन वर तिच्याकडे बघत जातो.)
Cut to …..
Evening / outer / pachad Vada
उत्कर्ष व अमित बाहेर पाणी आणून पाय धूत आहेत. त्या क्यान मधून पाणी घेऊन जाताना
अनुजा :
अंग, तो बघ आपल्याला कोल्हापुरात भेटलेला.
श्वेता : ( त्याकडे पहाते.)
चल, वेळ नको, उगच लांबड लाविल. दुरून डोंगर साजरे.
अनुजा :
पण त्याने मदत केली होती ना.
श्वेता :
एड बांबू, मदत कुठली, लाईन मारत होता तो. चल गप, त्याला दिसायच्या आधी जाऊ. नाहीतर यायचा मागून.
Cut to ….
….. ..
( त्या दूर आपल्या टेन्टवर गेल्यावर अश्विन विहिरीकडे येतो. उत्कर्षला वटवट करताना पाहून.)
आश्विन :
( गॉगल काढत)
काय झालं. चिडलास का येवढा.
अमित :
चिडेल नाहीतर काय करील. मघाशी एका मुलीनं झाडला.
आश्विन :
काय झालं
अमित :
स्वारी खाली विहिरीत पाय धूत होती. तेव्हा दोन मुली पाणी न्यायला आल्या होत्या. त्या म्हणाल्या बाहेर धू. विहिरीत नको. म्हणून चिडलाय.
आश्विन :
बरोबर आहे त्यांचं. एवढं कळत नाही. मला पण ठेव, थोड पाय धुयाला.
( तो पाय धुवू लागतो.)
Cut to
…… …….. …
Day / outer / road
आसिफ :
बॉस अब कहा धुंडे उन्हे. वो तो कहा है मालूम कैसे होगा l
सादिक :
जायेगी कहा, मिलेगी जरुर l
अमजद :
रायगड पर गई तो पकडना मुश्किल होगा l वहा पर मरगट्टों का जुलूस होगा ना l
सादिक :
वो रात को पाचाड मे रुकेगी समजे.
सहकारी :
लेकीन उन्हे धुंडेगे कैसे? कहा रूकेगी मालूम ही नहीं l
सादिक :
इसलिये ही तुम गुलाम हो ऑर मैं तुम्हारा बॉस, कल खाना खाते समय सूना था ना की ओ जिजाबाई के महल के पास उतरेगी l और वहा रुकेगी l आज रात दाबोच लेंगे l एक नही पाच हूरे भेजेंगे |
( ते हसू लागतात)
सादिक :
अबे गधो हसो मत. अब चलो l
( गाडी निघते.)
Cut to …
……...
DAY / outer / road
( दाढी काढलेले वेशभूषा बदललेले ते चौघे गाडीतून जाताना)
सादिक :
आसिफ गाडी झाडी मे ले लोl
( आसिफ मान डोलवतो.)
गाडी आडरानात घेतात. पाटी चेंज करतात. व गाडी पुन्हा झाडीतून काढून पुढे जातात.)
( काही अंतरावर पोलिस असतात. सादीक गाडी मागे घेतो.)
अमजद :
बॉस अब क्या करे.
बॉस सादीक :
तुम चूप बेठो l मुझे दुसरा रास्ता मालूम है l
( सादिक दुसऱ्या मार्गाने गाडी घेतो. व पाचाड जवळील आड रानात घेऊन जातो. )
Cut to …….
Evening/ outer/ pachad jijau Vada parisar
सादिक गाडी थांबवतो.
अमजद :
बॉस गाडी क्यो रोकी ?
सादिक :
आबे, उतर मंजिल आ गई l
आसिफ :
कहा है l
सादिक :
उतर गाडी से. और वह दुर्बीण ला l
( एकजण दुर्बीण देतो. सादिक दुर्बीण घेऊन पाहतो. त्याला पाणी आणायला निघालेली श्वेता व अनुजा दिसते.)
सादिक :
मिल गई l
अमजद :
कहा है l
सादिक :
आबे देख
( तो दुर्बीण देतो. सहकारी पाहतात.)
सहकारी :
हा ……
आसिफ :
चलो पकडते है l
सादिक :
अक्कल है के नही l अब जायेंगे l तो पकडे नहीं जायेंगे l जरा सब्र करो l रात तो होणे दो l फिर पकड लेंगे l आसिफ गाडी घुमाके झाडी मे छिपा l और बिर्याणी ला भूक लगी है l
आसिफ :
जी हुजुर.
Cut to …… …..
….. ….. ….
Evening / outer / tent place
अनुजा व श्वेता टेन्टवर आल्यावर.
अनुजा :
अंग, ऐकलं का?
( सर्वजनी जवळ गोळा होतात.)
अनुजा :
तुम्हाला कळलं का? तो कोल्हापुरात रात्री जेवायला गेल्यावर भेटलेला.
वेदिका :
काय झालं त्याच.
अनुजा :
तो इथ आलाय. तिकडे त्या बाजूला आहेत. विहिरीच्या साइडला.
रेवा :
तो अन्, इथे , इकडे कशाला आलाय?
वेदिका :
आला असेल शिवजयंती साजरी करायला.
रेवा :
चल बघुया. कुठं आहे.
अनुजा :
ती बघ , ती दूर जीप दिसते ना,
रेवा :
हा…
अनुजा :
ती त्याची आहे.
श्वेता :
झालं, अनुजाबाई सांगून, शेवटी, बाई आहात हे सिद्धच केलंत. पोटात काय राहायचं नाही तुमच्या. सांगून झालं असेल, तर लागा स्वयंपाक करायला. त्या टीचभर नाष्ट्यामध्ये काही पोट भरायचं नाही.
( सर्वजणी कामाला सुरुवात करतात.)
Cut to …….
…… ……. …..
Night / 7 o’ clock / pachad / outer
सगळीकडे धूर पसरला आहे. रेवा चूल फुंकत आहे.
श्वेता :
अंग, विझवा ती नाहीतर फायर ब्रिगेड बोलवायची पाळी यायची.
अनुजा :
धूर फुकत बसण्यापेक्षा छोटीशी शेगडी व गॅस आणला असता म्हणजे बरं झालं असत.
रेवा : ( खोकत )
ही चुलीची आयडिया कोणाची होती.
( सगळ्या वेदिकाकडे बोट दाखवतात.)
वेदिका :
ये बाई आयडिया माझी असली तरी मी काय केलंय.
प्राजक्ता :
मग जा फुक व पेटिव.
Cut to …..
….. …
Night / outer / pachad jijau Vada parisar
( धूर पसरतो. अश्विनच्या एरियात जातो. ती खोकु लागतात.)
उत्कर्ष :
या बाया गड फिरायला आल्यात की गड पेटवायला.
अमित :
धूर केलाय की धुमी घातलीय बघ जरा.
आश्विन :
ये , जा बघून ये.
उत्कर्ष :
मी तरी नाही, इथ येवढा त्रास होतोय तिथं गेल्यावर बेशुध्दच व्हायचो.
आश्विन :
अरे, अडचणीत सापडलेल्या ना मदत करावी.
अमित :
आम्ही काय नाही बुवा, तूच काय ती कर जा.
आश्विन :
आलो.
( अश्विन ड्राइव्हर काकांजवळ येतो.)
आश्विन :
मामा, काय झालं, धूर का एवढा?
ड्रायव्हर :
पोरीनी चूल पेटवलीय पहिल्यांदाच.
आश्विन :
सरकारला आता जेवणं बनवण्याचे क्लास काढायची पाळी येते की नाही बघा.
थांबा जरा मी पाहतो.
( अश्विन पुढे येऊन, चुलितील लाकडे नीट लावतो. अन् त्यावर गाडीतील डिझेलचा एक बोळा ठेवतो. अन् पेटवतो. लाकडे पेटू लागतात. प्राजक्ता त्याला पाहून चीडते. तो जाऊ लागतो. त्याला पाहून माधवी.)
माधवी :
थ्यांकस हा. मदत केल्याबद्दल.
आश्विन :
त्यात काय एवढं. अडचणीत सापडलेल्याला मदत करावी.
श्वेता :
बर ते जाऊ द्या. तुम्ही इकडे कसे?
आश्विन :
उद्या शिव जयंती आहे ना.
प्राजक्ता :
अस कस विचारतेस, जिकड संकट तिकडे लगेचच पोहोचतात ते. हनुमान उडी टाकून.
आश्विन :
माझं काही चुकलं का?
रेवा :
नाही हो, तुमचं काही चुकलं नाही. इथ वेगळंच दुःखन आहे. कसं आहे, आम्ही एक चॅलेंज स्वीकारलंय. गड सर करण्याचे, तसेच आत्मनिर्भर बनण्याचे. त्या दिवशी हॉटेलमध्ये, वाटेत गाडी पंक्चर झाल्यावर व आता इथे तुम्ही मदतीस आलात त्यामूळे आमच्या कर्तुत्वावर पाणी पडले.
आश्विन :
मला यातलं काही माहीत नव्हत. नाहीतर मी मध्ये आलोच नसतो. व सांगायचं म्हणजे जगात कोणी ही संपूर्ण आत्मनिर्भर नसत. प्रत्येकास गरज असते. असो, माझं काही चुकलं असेल तर त्यासाठी माफ करा.
अनुजा :
तुमची काही चूक नाही हो…
( अश्विन नाराज होऊन आण्विककडे प्रेमाने पाहतो. व निघून जातो.)
Cut to…..
…… …… ….
Night / outer / pacahd Vada parisar
मध्यभागी शेकोटी पेटत आहे. त्या शेजारी जेवनास सर्वजनी बसलेल्या आहेत.
अनुजा :
त्या मुलांनी जेवणं केल असेल की नाही कुणास ठावूक?
माधवी :
केली असेल की काहितरी सोय.
रेवा :
आज इकडे गर्दी असल्याने होईल काहीतरी त्यांची सोय.
श्वेता :
ए जा विचारून ये. व दे जा काहीतरी.
अनुजा :
तुम्हीच जावा, मघाशी नको तसं बोलल्यासा अन् आता वरून कशाला साखर पेरणी करताय.
मी काही नाही.
रेवा :
मी पण नाही.
वेदिका :
माझ्याकडे काय बघू नका. मी काय जाणार नाही.
( प्राजक्ता चिडते. व स्वतः जाते.)
Cut to ….
…… ….. ….
Night / outer /pachad jijau Vada parisar
( आश्विन व त्याचे मित्र टेन्ट लावत असतात. प्राजक्ता सोबत सुमनला घेऊन तिथे येते. तिला इशारा करते.)
सुमती :
एक्सूजमी
( आश्विन त्याकडे पाहतो. व पुन्हा खाली पाहतो.)
सुमती :
एकताय ना.
आश्विन :
बोला.
सुमती :
जेवणाचं काय केलंय?
आश्विन :
बाहेरून पार्सल आणायचं काहीतरी.
प्राजक्ता :
आम्ही जेवणं केलंय, या म्हण तिकडे.
(सुमन काही बोलणार इतक्यात )
आश्विन :
कशाला तुम्हाला त्रास.
( उत्कर्ष व अमित डोळे मोठे करून अश्विनकडे पाहतो.)
अमित :
त्याचं अस आहे की…..
प्राजक्ता :
कूठे बाहेर जाणार आहे का?
उत्कर्ष :
होय, हॉटेलला.
( अमित त्याच्या तोंडावर हात ठेवतो.)
अमित :
काही नाही… येतो आम्ही, इथल आवरतो व येतो.
प्राजक्ता :
लगेच या, आम्हीं बसलोय. जेवायला.
अमित :
हा, येतो आम्ही.
प्राजक्ता :
( ट्यांक् लावणाऱ्या अश्विनला पाहून )
यांना पण घेऊन या.
( त्या जातात.)
….. ….. …..
( त्या गेल्यावर )
आश्विन :
काय रे, कधी खायला मिळालं नसल्यागत, हावरटपणा. जाऊन आणणार होतो ना पार्सल.
अमित :
ये गप्प, किती वाजलेत बघ. इथं जवळ फाईव्ह स्टार हॉटेल असल्यागत बोलू नकोस. माझ्या पोटात कावळे ओरडू लागलेत आता. तुमच्या नादान कुपोषण होईल माझं.
मी तर चाललो बुवा जेवायला, जेला यायचं तेनं या.
उत्कर्ष :
ये थांब, मी पण येतो.
अश्विन :
अरे … मला ठेवून कूठे?
उत्कर्ष :
मग ये तर…
आश्विन :
थांबा आलो मी पण….
Cut to ….
…. … ….
( वाटेत जाताना )
उत्कर्ष :
काय असेल बेत.
अमित :
बेत होय, मस्त बिर्याणी कबाब असेल. बघ.
अमित :
ए चल, काय केलं असेल ते खायचं व येऊन झोपायच.
Cut to …….
…… ….. …..
Night / outer / tent place
प्राजक्ता आल्यावर.
माधवी :
काय बोलले ग ते. येतायेत ना.
प्राजक्ता :
सांगितलेय, येतो म्हणालेत.
श्वेता :
बोलवायचं काम केलंय. चला पाने वाढा.
( ते तिघे येतात.)
प्राजक्ता :
रेवा वाढ सर्वांना.
( रेवा जेवणं वाढते. एकमेकींना पास सर्व्ह करतात.त्या तिघांना पण जेवणं देतात. जेवत असताना. श्वेता नजरेने इशारा करते.)
प्राजक्ता :
आपली ओळख करून घ्यायचंच राहील.
मी ओळख करुन देते.
ही श्वेता भोसले. ही माधवी आ…. माधवी गडकर, ही रेवा परांजपे, अन् ही अनुजा सरंजामे, या मॅडम वेदिका काटकर, ही आमची सुमन अन् हे ड्रायव्हर काका, व मी प्राजक्ता पाटील, आम्ही सर्वजणी बी फार्मसीचे स्टुडंट्स आहोत. आताच आमचे कॉलेज पुर्ण झालेय. आपली ओळख ….
आश्विन :
मी अश्विन, … अश्विन इनामदार …. हा अमित देशमुख अन् हा उत्कर्ष पालकर. आम्ही सर्व जण मित्र आहोत. एकत्र कोल्हापूरला होतो.
श्वेता :
होतो म्हणजे आता नाही. काय?
आश्विन :
शिक्षण पुर्ण झालेय, त्यामुळे आपापल्या कामात असतो.
रेवा :
काय काम करता तुम्ही.
आश्विन :
मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सातारला असतो कंपनीत, अमित पुण्याला आयटी कंपनीत आहे. तर उत्कर्ष चे हॉटेल आहे. कोल्हापूर - बेळगाव रोडला.
श्वेता :
मग आता अचानक ट्रिप आहे का?
आश्विन :
तसं समजा हवं तर …पण …..
अमित :
त्याचं अस आहे की गेली चार वर्षे आम्हीं या दिवसात एखादा किल्ला ठरवून त्यावर जात असतो. यावेळी रायगडाची निवड झाली. म्हणून इकडे.
प्राजक्ता :
अस…
रेवा :
(हसत)
जेवण छान झालेय ना.
उत्कर्ष :
हो झालेय ना.
रेवा :
तुमच्या हॉटेलसारखं नसेल, साधं सोपं केलंय.
उत्कर्ष :
चांगल आहे हो.
( वेदिक खाकरते.)
Cut to …..
( जेवून झाल्यावर )
आश्विन :
थ्यांकस् खूप आभारी आहे.
अमित :
येतो, जवळच आहोत आम्ही, काही घाबरु नका. काही अडचण वाटली तर बोलवा.
उत्कर्ष :
येतो …
( रेवा हसते.)
( जातांना वाटेत. )
आश्विन :
काही म्हणा, हॉटेलपेक्षा मस्त जेवणं मिळालं.
अमित :
हो रे, पाहुणचार मस्त केला.
उत्कर्ष :
पण आपणास का बोलावलं.
अमित :
मघाशी चूल पेटवून दिली म्हणून….
( हसतात)
आश्विन :
ये चला गप्प ….
Cut to …..
…. … …
Night / outer / pachad jijau Vada parisar
मुली टेन्ट मध्ये बसलेल्या आहेत.
वेदिका :
काय प्राजक्ता मॅडम खूप सी आय डी चौकशी चालली होती.
प्राजक्ता :
काय.
वेदिका :
त्या मुलांचा बायो डेटा चेक करत होता.
प्राजक्ता :
एक तर आपण इथे एकट्या आहोत. उगाचच रिस्क नको.
रेवा :
अरे देवा, … इतकी घाबरलीस, की नाटक करतेस. सांग की सरळ जिओग्राफी जाणून घ्यायची होती म्हणून …
प्राजक्ता :
काय समजायचं ते समजा.
श्वेता :
बोलणं आटपल असेल तर, झोपूया, उद्या पहाटे उठून आवरून गड चढणी करायची आहे.
( प्राजक्ताच्या घरून फोन येतो. प्राजक्ता चिडून )
प्राजक्ता :
आता परत सुरू होणार. ए आले ग.
( ती फोन घेते. व बाहेर जाते.)
Cut to ….
….. ……
Night / outer / open place pachad
( जीप जवळ बाहेर अश्विन व मित्र अंथरूण टाकतात. व पहुडतात, आकाशाकडे पहात.)
आश्विन :
किती मस्त रात्र आहे ना,
अमित :
हुं …..
अश्विन :
चंद्र बघ किती छान दिसतोय.
अमित :
हुं ….
आश्विन :
हवा पण मधुर सुटली आहे.
उत्कर्ष :
हो तर …. गार वारं लागलंय झोंबायला अन् म्हणे मधुर हवा सुटलेय. ते ब्ल्यांकेट दे मला व झोप तसाच हवा घेत. ….
आश्विन :
तुला ना कशाची आवडच नाही बघ.
अमित :
हुं …..
आश्विन :
हुं काय हुं …
( अमितकडे पाहतो. तो झोपेत असतो.)
आश्विन :
मी पण कुणाला सांगतोय. या बिनडोक्यांत रसच नाही.
उत्कर्ष :
आहे की विररस, मारामारी करायला.
अश्विन :
झोप मग आता….
Cut to ….
….. …… ….
Night /outer open place pachad
( अमित घोरू लागतो, उत्कर्ष जाबडू लागतो. अश्विनला झोप येत नाही. तो बर्ड्स घेतो. त्याचे कापूस काढून कानात घालतो. तरी झोप येत नाही. आपले अंथरूण बाजूला नेऊन अंथरतो. व झोपतो.)
Cut to ….
….. …. …..
Night /12.00 o’ CLOCK / Outer / pachad jijau Vada parisar
( मुली झोपलेल्या आहेत. सादिक व सहकारी तिथे हळूच येतात. वाटेत.)
अमजद :
बॉस ब्याट्री लगाये क्या?
सादिक :
आबे चूप . पकडवायेगा क्या?
अमजद :
अंधेरा बहुत है l
सादिक :
यह क्या तेरी अम्मा की शादी है l जो लाईट लगाये. चल चूप चाप l
( मुलींच्या तळावर येतात. ड्रायव्हरला प्रथम बेशुध्द करतात. नंतर रेवा व सुमती यांना बेशुध्द करतात. रेवाच्या हातातील टेडी बाजूला फेकतात. व त्या दोघींना उचलून नेऊ लागतात. वाटेत.)
अमजद :
बॉस भारी है l यह लडकी l
सादिक :
आबे एक सिधी साधी लडकी नहीं उठाई जा रही l खाके सांड हो गये है l चल चूप….
( त्या दोघींना गाडीत नेऊन ठेवतात. व पुनः तळावर येतात. तळावर त्याचा पाय टेडीवर पडतो. आवाज होतो. प्राजक्तास जाग येते. तिला आहट जाणवते. ते प्राजक्ता व श्वेताला क्लोरोफाम सुंगवायला आल्यावर एकाचा तोल जातो. प्राजक्ता सावध झाली. व पुर्ण तकदीनिशी तिने लाथ मारली. अवघड जागी लाथ लागून तो विवळू लागला. )
प्राजक्ता :
सावधान
( मुली जाग्या होतात. व जवळ येतात. )
प्राजक्ता :
श्वेता रेडी आहेस का?
श्वेता :
हो, पण ओळख.
प्राजक्ता :
रेडियम बेल्ट….
श्वेता :
चल सुरू.
( त्या फाईट करतात. मुलींचा आवाज ऐकून आश्विन जागा होऊन. सहकर्याना उठवतो. )
अश्विन :
अरे उठा रे. तिकडे काहीतरी गडबड चालू आहे.
उत्कर्ष :
कुठे?
आश्विन :
मुलींच्या तळावर.
अमित :
चल बघुया.
Cut to …..
….. ….. ……
( आश्विन व मित्र मुलींच्या टेन्ट कडे येतात. सादिक चाकू काढतो. वेदिका दगड मारते. चाकू पडतो. अश्विन व मित्र येतात. फाईट करतात. प्राजक्ता एक लाकूड उचलून मारु लागते. ते अश्विनला लागते. प्राजक्ता स्वारी म्हणते. गाडीचे लाईट ऑन करतात. त्यांना पकडून टेन्टच्या रस्सिने बांधतात. बांधल्यावर.)
प्राजक्ता :
( हातातील लाकूड उगारत.)
कोण आहेस.
(अनुजा खाली पडलेली बाटली उचलत)
अनुजा :
अंग हे तर गुंगीच औषधं आहे. एकतर हे चोर आहेत. नाहीतर.
श्वेता :
चोरी करायला आपल्याकडे आहेच काय? मला तर वेगळीच शंका येतेय.
माधवी :
अंग रेवा व सुमती कुठे दिसत नाहीत. त्यांच्या ट्यंकमध्ये पण नाहीत. व ड्रायव्हर काका पण
श्वेता :
यांनीच काहितरी केलं असणार. चला हाना यांना.
( दोन दणके देते.)
श्वेता :
सांग रेवा व सुमती कुठे आहे ते
सहकारी :
( रडवेल्या स्वरात.)
उधर गाडी मे …..
श्वेता :
अश्विन, प्राजक्ता तुम्ही जावा तिकडे. आम्ही बघतो यांना.
( अश्विन व प्राजक्ता रेवा व सुमती यांना सोडवून आणतात. वेदिका पोलिसांना कॉल करते. पोलिस येतात. त्यांना पकडून नेतात. )
Cut to …..
……. ……. ….
Day outer/ MORNING / tent place
(सूर्य उगवला आहे. सर्वत्र साहित्य विस्कटलेले आहे. बेशुध्द झालेल्या रेवा, सुमती व ड्रायव्हर काकांचे अंगावर पाणी शिंपडून उठवत आहेत.
श्वेता :
थांब ती अशी नाही उठायची.
( श्वेता उठते. पाणी आणून मारते.)
रेवा :
आई ग, वाचवा… वाचवा …. बुडाले …. बुडाले …
वेदिका :
बाई , शुध्दीत ये. नाही बुडालीस …. जमिनीवर आहेस.
रेवा :
काय झालं होत मला …..
माधवी :
काही नाही, फक्त पार्सल होऊन जाणार होता. …
रेवा :
कुठे?
वेदिका :
( माधवीच्या तोंडावर हात ठेवत.)
काही नाही ग, गडावर पोहोचवणार होतो. तुझे पाय दुखतात ना म्हणून. …
अनुजा :
त्याचं अस आहे रेवा बाई ….
( अनुजा सर्व वृतांत सांगते.)
Cut to …..
….. …… …. ……
No comments:
Post a Comment