Day / inter / prajkta home
( घड्याळाचा गजर वाजतो. प्राजक्ता उठते. आपले आवरते. जिन्यावरून खाली येते. फोन वाजण्याचा आवाज, सयाजीराव फोनवर उचलून बोलत असतात. ती जिन्यावर थांबते. कान लावून ऐकू लागते. फोन ठेवल्यावर, जवळ जात.)
प्राजक्ता :
कुणाचा कॉल होता?
सयाजीराव :
मित्राचा.
प्राजक्ता :
काय झालं.
सयाजीराव :
आणखी काय होणार, तुझ्या मनासारखं झालं.
प्राजक्ता :
काय मनासारखं.
सयाजीराव :
तो गाईड येणार नाही. त्याच महत्त्वाचं काम आहे.
( प्राजक्ताचा चेहरा आनंदी झाला. पण तस न दाखवता.)
प्राजक्ता :
मी माहिती काढलेय, सगळी, अन् ड्रायव्हर काका आहेत की सोबत, काळजी कशाला करताय?
सयाजीराव :
मुले कितीही मोठी झालीत तरी आई वडलांना ती लहानच असतात. अन् तू तर आमची गोड बाहुली.
काळजी तर वाटणारच बाळ.
प्राजक्ता :
पण बाबा, आता ही बाहुली मोठी झालेय, व सशक्त ही, फक्त आशीर्वाद पाठीशी असू द्या.
( वाकून नमस्कार करते.)
सयाजीराव :
तो तर कायमच तुझ्या पाठीशी आहे. पण टेक केअर.
( प्राजक्ता मान डोलावते , आपल्या रूममध्ये जाते. अन् एस म्हणत नाचू लागते.)
Cut to …….
…… ….. ……
Day / OUTER / prajkta home
गाडी उभा आहे. सर्व साहित्य डीगित ठेवत आहेत. प्राजक्ता आशीर्वाद घेत आहे. सुमती ही सरलाची मुलगी उभा आहे.
सावित्रीबाई :
नीट जा, अन् वेळोवेळी फोन करत रहा.
प्राजक्ता :
करतो बाई,
(प्राजक्ता नमस्कार करते)
सयाजीराव :
यशस्वी हो.
सावित्रीबाई :
परमेश्वर कल्याण करो.
आजी :
विजयी भव.
प्राजक्ता :
असा आशीर्वाद पाहिजे बघ.
प्रदीप :
अन् माझ्या.
प्राजक्ता :
तुझ्या कशाला पडायला हवं?
प्रदीप :
हे काय बोलणं झालं. मोठा आहे मी तुझ्यापेक्षा.
प्राजक्ता :
एवढा कुठं मोठा आहेस, फक्त दोनच वर्षे ना.
प्रदीप :
आई बघितलस का?
आई :
अग, पड ग दादा आहे ना तुझा?
प्राजक्ता :
बर बाई, पडते.
(प्राजक्ता नमस्कार करत.)
प्राजक्ता :
हा, आशीर्वाद दे.
प्रदीप :
लवकर लग्न होऊ दे.
प्राजक्ता :
बघ ना ग आई, मला कसला आशीर्वाद देतोय ते.
आई :
प्रदीप, दे बर सरळ आशीर्वाद.
प्रदीप :
बर घे, भगवा फडकवून ये.
आई :
सरू अग् सरू, कुठं गेली ही.
( सरू येते, तिच्या हातात वाटी आहे, तिची मोठी मुलगी सुमती पण सोबत आहे. ती तिला सूचना देत आहे)
सरू :
हे बघ प्राजक्ता ताई आपल्याच आहेत. त्या निमित्ताने का असेना तुला फिरायला मिळतंय. त्यांचं सगळं एकत जा.
सावित्रीबाई :
काय ग, आत काय करत होतीस.
सरू :
काही नाही, दही साखर आणत होते.
आजी :
हे अगदी छान केलंस, मी तर विसरलेच होते. दे पोरींच्या हातावर.
( सरू दही साखर देते. तिच्या डोळ्यात थोड पाणी येतं.)
आजी :
सरू हसत.
सरू :
कळत हो मला आनंद अश्रू आहेत हे, तुमच्यासारख्या थोरांचा आशीर्वाद असेल तर आपली प्राजक्ता ताई सगळे गड सर करेल.
प्राजक्ता :
हा निघतो आम्ही.
आजी :
निघतो नाही, येतो म्हणावं.
प्राजक्ता :
बर येतो.
( त्या दोघी गाडीत बसतात.)
सयाजीराव : ( ड्रायव्हरला)
नीट घेऊन जा, अन् तिच्या हातात गाडी द्यायची नाही.
ड्रायव्हर :
बर , साहेब.
( गाडी जाताना दिसते.)
Cut to …..
…… ……. …….
DAY / outer- inter / Hostel
(गाडी हॉस्टेल बाहेर उभा आहे. प्राजक्ता ड्रायव्हर शेजारी बाहेर उभा राहून हॉर्न वाजावते. आवाज ऐकून श्वेता खिडकीतून पहाते. )
श्वेता :
ए आवरा चला लवकर गाडी आली.
( रेवा बॅग घेऊन जाताना )
अनुजा :
ए माझी पण घे ना.
रेवा :
माझीच जड झालेय, अन् तुझी कशी घेऊ?
वेदिका :
एवढं काय काय घेतलय?
रेवा :
यात तिघिंच साहित्य आहे.
वेदिका :
चल आता.
( मुली बाहेर पडतात, गाडीकडे जातात )
वेदिका :
श्वेता कुलूप लाव.
( खिडकीतून कुलूप घेते. रुम लाईट बंद करून कुलूप गडबडीने लावते. त्यांना जाताना पाहून.)
तन्वी :
आज कसं हॉस्टेलच वातावरण आनंदी आहे ना.
मानसी :
का ग.
तन्वी :
काही नाही, हॉस्टेल मधील उनाडकी कमी होईल.
मानसी :
हो ग, किती बरं वाटतेय.
श्वेता :
तनु बाळ ती चिमणीची चोच उघडुन लई चिवचिव करू नकोस काय? अन् आम्ही आहोतच उनाड, म्हणून तर तुझ्यापेक्षा पाच टक्यानी पुढे आहोत.
( मानसीला उद्देशून )
अन् तू ग कोथंबिरीची पेंडी, आधी त्या झिपर्या बांध, सारख्या वेणीतून बाहेर आलेल्या असतात.
अन् हो सांगायचं राहिलंच आम्ही चाललोय स्वराज्याची राजधानी सर करायला.
मानसी :
काय ग तन्वी, एक् गड चढायला एक वर्ष घालवला, बाकीचे चढेपर्यंत पाक म्हातारी व्हायचीस .
श्वेता :
म्हातारी तू अन् तुझी आजी, मी एका वर्षात सगळे गड सर करेन, अन् हिम्मत बघायची असेल तर येतीस का कुस्ती खेळायला.
मानसी :
कुस्ती खेळायला मी काय बापय नाही तुझ्यासारखा.
श्वेता :
हो का, लगीन झाल्यावर खेळ मग.
( वेदिका खो खो असते. हॉर्न वाजतो)
वेदिका :
चल लवकर, उगाच यांच्या नादाला लागायला नको, मांजरीनी कुठल्या. चांगल्या कामाला निघालो की आल्या लगेच आडव्या.
खालून प्राजक्ता :
श्वेता श्वेता , लवकर ये. अजून काय करतेय ही.
श्वेता :
तुम्हा चीचुंद्र्याना नंतर बघते.
Cut to …
…… ……
Day / outer / hostel road
(श्वेता व वेदिका येत आहेत. श्वेता चिडलेली आहे. बाकीच्या मुली सीटवर बसत आहेत. श्वेताला पाहून)
प्राजक्ता :
ए बाई, हसून प्रवासाची सूरवात कर.
श्वेता :
हसणार कसं, जाताना दोन मांजरी आडव्या आल्यावर.
प्राजक्ता :
कोण.
श्वेता :
ती मानसी अन् तन्वी.
प्राजक्ता :
त्यांच्याकडं कशाला लक्ष द्यायचं?
( गाडीत बसलेली रेवा )
रेवा :
तिकडे लक्ष द्यावं लागत नाही. त्या देण्यास भाग पाडतात.
प्राजक्ता :
आता चालुया का?
( श्वेता गाडीत बसले. हळू आवाजात प्राजक्ता खुणावते.)
श्वेता :
कूठे आहे तो?
प्राजक्ता :
त्याचं येणं रद्द झालं.
श्वेता :
( आनंदाने )
या s s किती गुड न्यूज दिलीस तू.
( ड्रायव्हर गमतीने पाहतो.)
श्वेता :
काका, काही नाही, आमची दंगा मस्ती चालयचीच.
( ड्रायव्हर क्यारेजवर साहित्य फिट्ट करतो. गाडी चालू होते. निघते. त्या एकमेकींच्या कानात कुजबुजतात. व गाईड न येण्याचे सांगतात. त्या हसतात. गाडी जाताना दिसते.)
Cut to ……
…… ….. …..
Day / outer / on road
( गाडी हायवेला धावत आहे. वारे मारत आहे. प्राजक्ता इशारा करते. श्वेता खिडकीची काच खाली करते. रेवा वेदांगीच्या अंगावर झोपत आहे.)
वेदिका :
ये झोपाळू, लागली लगेच पेंगायला.
रेवा :
असू दे ना ग, थोडा वेळ मस्त वाटतंय.
वेदिका :
तुला मस्त वाटतंय पण मला अवघडल्यासारखं झालंय.
श्वेता :
असू दे ग वेदे.
( गाडी धावताना दिसते. संगीत सॉफ्ट ऐकू येत आहे.)
Cut to …..
…… …… ……..
Day / Karad Citi / outer
गाडी कराडमध्ये जाताना दिसते.
Cut to ……
….. …… …..
DAY / OUTER / karad Citi Sangam ghat.
( प्रीतिसंगम घाटावर मुली जात आहेत. हसण्याचा आवाज. रेवा धावत जाते.)
श्वेता :
अग , ये हळू , पायऱ्या निसरट आहेत.
रेवा :
या दिवसात कुठं असतं शेवाळ.
श्वेता :
अग, नदीला पाणी भरपूर असत या , बघ पुढे जरा.
( रेवा पहाते. )
रेवा :
खरचं की.
( त्या पाण्यात उतरतात व पाय धुवू लागतात. व नदीस नमस्कार करतात.)
वेदिका :
थंडगार पाणी पायावर पडलं की किती बर वाटत ना.
माधवी :
हो ना, उन्हाळ्याच्या दिवसातच पाण्याची किंमत समजते.
थकवा निघून गेला बघ….
( थोडावेळ फिरतात. व नमस्कार करुन गाडीकडे जातात. प्राजक्ता घड्याळात पहाते.)
प्राजक्ता :
ये चला आटपा, पुढे जायचय.
श्वेता :
हो चला ग,.. पटकन जागा पकडा, वेळ नको.
( गाडीमध्ये बसू लागतात. गाडी निघताना दिसते.)
Cut to …..
…… ……
Day / outer in bolero/ road
( ड्रायव्हर जुनी गाणी लावतो. ते ऐकून )
श्वेता :
ओ मामा, काहीतरी नवीन लावा. ते रडव गाणं नको.
( गाणी चेंज करतात, मुली गाडीत डान्स करू लागतात. रेवा प्राजक्ताला खुणावते. प्राजक्ता नजरेने सहमती देते. ती पॉपकॉर्न खाऊ लागते.)
Cut to …….
….. …… …..
Day / outer / satara Citi
( साताऱ्यात गाडी येते. महाबळेश्वर रोडला आल्यावर.)
प्राजक्ता :
थांबवा पुढे एका बाजूला.
ड्रायव्हर :
हा.
श्वेता :
इथ काय काम आहे?
प्राजक्ता :
काहीतरी नाष्टा पाणी करूया की
श्वेता :
नको उगाच खर्च, व वेळ पण होईल, वडापाव घेऊ फक्त.
प्राजक्ता :
त्यापेक्षा तिकडे हॉटेल आहे की.
श्वेता :
नाही, नको. वडेच घेऊया.
( त्या वडे घेतात. प्राजक्ता बील भागवताना )
श्वेता :
थांब , मी देते.
प्राजक्ता :
गप.....
(टपरीवाल्याकडे वळून )
भाऊ, पे . टी .एम कुठे आहे?
( टपरीवाला इशारा करतो. )
( प्राजक्ता ऑनलाईन पेमेंट करते.)
श्वेता :
काय , हे, मी केलं असत ना.
प्राजक्ता :
चल, बस गाडीत.
Cut to …….
….. ….. ….
Day / outer / on road /in bolero
( महाबलेश्र्वर रोडला गाडी निघाली आहे. )
माधवी :
थोड पुढं गेल्यावर घेतल असत ना.
प्राजक्ता :
पुढे कुठे? इथ कराड पासून माणूस व्याकूळ झालंय.
माधवी :
कोण?
प्राजक्ता :
आणखी कोण असणार, रेवा आपली.
श्वेता :
मघापासून म्हटल, कोण चिमटे काढतय. काय ग रेवे, सांगता येत नाही.
रेवा :
तुम्ही तर नाष्टा पाण्याचं नावच काढेनासा. काय करू, सकाळी तर थोडासाच केला होता.
वेदिका :
काय, थोडासा नाष्टा, चांगल्या पाच चपात्या हादडल्यास एकटीनं. तुझ्या एकटीच्या नाष्ट्यामध्ये आम्ही चौघी नाष्टा करतो . भुजंग शिरला नाही ना पोटात.
प्राजक्ता :
ए खाण्यापिण्यावरून काही बोलायचं नाही हं , खाऊ देत, आणखी आणते.
श्वेता :
माधवे, वेदे , पोटगी जास्त भरल्यासा ना, नाहीतर निम्या रस्त्यातच संपायची.
वेदिका :
काळजी नको, नियमापेक्षा जास्त नाही मिळणार कुणाला, देईल ते घ्या, व मिळेल ते खा.
श्वेता :
म्हणजे रेवा कठीण आहे तुझं?
प्राजक्ता :
मी असताना घाबरु नकोस रेवा.
श्वेता :
नवरा तेवढा मळेवाला भेटाय पाहिजे हिला.
वेदिका :
म्हणजे शेतातील निम्मं उत्पन्न हिच्याच पोटात.
रेवा :
एवढी पण खादाड नाही हं… चांगल निर्जळ व्रत करु शकते. दोन दोन दिवस.
वेदिका :
मग करच तू आजपासून दोन दिवस.
अनुजा :
होय, या बाई व्रत करायच्या, आणि आम्हाला हिला डोक्यावर घेऊन गड उतरायला लावायच्या. त्यापेक्षा काय खायच ते खा बाई, तुला माझी फुल्ल परमिशन.
( हसण्याचा आवाज. )
Cut to …....
….. …….. ……
No comments:
Post a Comment