शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Saturday, October 11, 2025

वीरगळ भाग ४

वीरगळ भाग ४

 Night / Ashvin HOME Mumbai / inter / room

तात्या आजोबा आत रुम मध्ये आले. अश्विन तिथे बेडवर झोपलेला आहे. अश्विन उठून अंथरुणावर बसतो. आजोबा शेजारी बसतात. माधवी आत येते.

माधवी :

 अश्विन गोळ्या घे. उद्या चेकपला जायचं आहे. तिथून शाळेत जरा मुख्याध्यापकांनी बोलावले आहे.

( अश्विन गोळ्या घेतो. आजोबांच्या हातावर हात ठेवत. )

अश्विन :

 आजोबा तुम्ही पण येणार ना.

आजोबा :

 हो येईन.

( माधवी आतील खोलीत जाते. )

आजोबा :

 उद्या बोलू आपण मुख्याध्यापकांशी

अश्विन :

 नको नको, ते त्यांना शिक्षा करतील. व पुन्हा मला ती मुले त्रास देतील.

आजोबा :

 भित्रट घाबरतोस कसला? भीड भिकेची बहीण.

अश्विन :

 ते खूप तगडे आहेत.

आजोबा :

 मग त्यात काय एका हातात लोळवायचं त्यांना.

अश्विन :

 नको, मला भीती वाटते त्यांची.

( आजोबांनी अश्विनकडे पाहिले. तो अत्यंत बारीक दिसत होता. चार भिंतीत राहिलेल्या कबुतरासारखी गत त्याची झाली होती. )

आजोबा : ( मनात )

आता मलाच काहीतरी केलं पाहिजे.

बर, चल मी येतोय.

Cut to ….

…… …… …..

 Day / afternoon ३ o’ clock / school

मुख्याध्यापकांच्या केबिन बाहेर एका बाजूला ते तिघे समीर, आरिफ, जोसेफ उभा आहेत. अश्विन व आजोबा तिथे येतात. त्याकडे पहात मनात

जोसेफ : ( मनात )

 एवढं लागलं तरी याची जिरली नाही. ते तक्रार करतोय.

आरिफ : (मनात )

वरून पडून देखील पांगळा नाही झाला.

समीर : ( मनात )

 एका बुक्कीत टेंगुळ काढीन

( आश्विन आजोबांच्या हाताला घट्ट पकडतो. आजोबा आपली करारी नजर त्या तिघांकडे टाकतात. त्यांना पाहून ते तिघे मान खाली घालून उभे राहतात. )

( शिपाई केबिन मध्ये जातो. व एक लेटर देतो. )

शिपाई :

 सर बाहेर अश्विन व त्याचे आजोबा आलेत.

मुख्याध्यापक :

 पाठवून दे त्यांना आत.

( शिपाई बाहेर जातो. )

शिपाई :

 आत बोलावलंय तुम्हाला.

( आजोबा व अश्विन आतमध्ये जातात. ते आत आल्यावर)

मुख्याध्यापक :

त्या तिघांना पण पाठव आत.

( शिपाई बाहेर जातो. त्या तिघांना )

शिपाई :

 चला आत .

( ते तिघे आत येतात. )

मुख्याध्यापक :

 केशव ही फाईल सिंत्रे सराना नेऊन दे. व पी. इ. च्या रगडे सरांना लाऊन दे.

( केशव जातो. आठवीच्या वर्गाबाहेरून सिंत्रे सरांना हाक मारून फाईल देतो. सर ती घेतात. केशव पुढे ग्राऊंडवर जातो. व तिथे रगडे सर पाचवीच्या मुलांना लेझिम शिकवत असतात. तेथे जाऊन )

केशव शिपाई :

 रगडे सर तुम्हाला घरपणकर सरांनी आपल्या केबिनमध्ये बोलावले आहे.

 रगडे सर :

( सिटी वाजवून थांबवतात व सुशांतला जवळ बोलावून)

सुशांत, इकडे ये.

( सुशांत येतो. )

रगडे सर :

मघापासून मी शिकवलेल्या स्टेप्सचा सराव घे. मी आलोच इतक्यात.

रगडे सर निघतात.

Cut to …

…….. …… …..

Inter / mukhadyapak Kebin / day

समीर, आरीफ, जोसेफ एका बाजूला उभे आहेत. बाजूला अश्विन व त्याचे आजोबा बाजूला बसलेले आहेत.

रगडे सर दाराजवळ येतात.

घरपणकर सर ( मुख्याध्यापक ) :

नालायक आहात तुम्ही तिघे. अभ्यासाच्या नावानं बोंब, कुठे खेळात नाही, स्पर्धेत नाही. व शाळेत इतर विद्यार्थ्यांना पण शिकू देत नाही.

समीर :

 एवढं काय केलंय आम्ही सर.

घरपणकर सर :

काय केलंय, थांबा दाखवतोच तुम्हाला, लाल शेरा दिला म्हणजे समजेल.

( रगडे सर आत येण्याची परवानगी मागतात. )

रगडे सर :

 सर आत येऊ का?

घरपणकर सर :

 या

( रगडे सर आत येतात. )

रगडे सर :

 सर आपण बोलावलंत.

 घरपणकर सर :

 हो, सर, मला सांगा त्या दिवशी आश्विन संगे हा जो अपघात झाला त्यासाठी हे तिघे दोषी आहेत. असे मला वाटते.

जोसेफ :

 आम्ही काय केलंय. तो तर अपघात झालाय. कुठेतरी रस्त्यावर त्यासाठी आम्ही दोषी कसे?

घरपणकर सर :

सर तुम्ही अश्विनला ओळखता की नाही.

रगडे सर :

 हो सर, खूप हुशार व प्रामाणिक मुलगा आहे तो.

घरपणकर सर :

 त्या दिवशी खेळाच्या मैदानावर काय घडलं.

रगडे सर :

 काही नाही, थोड खेळताना मुलांमध्ये बाचाबाची झाली. थोडस पडल्याने लागलं अश्विनला.

घरपणकर सर :

सर, तुम्ही तिथे असून देखील तिथे काय घडलं हे माहित नाही तुम्हाला.

रगडे सर :

सर मला समजलं नाही, आपल्याला काय म्हणायचं आहे ते.

घरपणकर :

 सर फक्त बाचाबाची झाली नाही. या तिघांनी जाणून बुजून आश्विनशी त्यावेळी भांडण काढलं. व अश्विनला पाडलं. व त्याच्याशी हुज्जत घातली.

रगडे सर :

माझं लक्ष होतं सर

घरपणकर सर :

 सर तुमच्या लक्षात नाही आलं त्या दिवशी काय घडलं ते. हे बघा, सी सी टिव्ही कॅमेऱ्यात सगळ दिसत आहे. हे तिघे काय काय कारस्थान करत होते ते. व मला वाटत, याच भांडणाचे उट्टे यांनी बाहेर शाळा सुटल्यावर काढले.

( सर सी सी टिव्ही कॅमेऱ्यात असलेला सीन दाखवतात. )

रगडे सर :

 सर खेळताना धक्का लागलाय फक्त.

घरपणकर सर :

सर पुढील फुटेज पहा. तुम्ही सर्व त्याला उठवत असताना हे तिघे हसत एकमेकांना टाळ्या देत आहेत.

( सर सीन पाहतात व त्या तिघांकडे डोळे वटारून पाहतात. )

घरपणकर सर :

 सर ही तिनं मूल म्हणजे आपल्या शाळेला कलंक आहेत. यांच्यामुळेच गेल्यावर्षी तो हुशार मंगेश शाळा सोडून गेला. हे फक्त मैदानावरच प्रताप करत नाहीत. पहा या फुटेज

( सर्व फुटेज पाहतात. एके ठिकाणी आरीफ मुलांच्या पायाखाली काचेच्या गोठ्या टाकताना दिसतो. तर जोसेफ पिशवीतून आणलेले कबूतर घेऊन मुलींवर उडवताना दिसतो. )

घरपणकर सर :

 मला खात्री आहे. अश्विनच्या अपघातमाग यांचाच हात असावा. काय आश्विन बोल. तू फक्त एक तक्रार कर. लगेच यांच्यावर कारवाई करतो.

( अश्विन काही न बोलता खाली मान घालून रडू लागतो. तो काही बोलत नाही.)

घरपणकर :

 तू फक्त एक तक्रार दे. बाकी आम्ही पाहतो.

( अश्विनला ते मारत असलेला सीन आठवतो. व तो शांत होतो. व आजोबांकडे नंतर त्यांकडे व मग खाली पाहू लागतो. )

अश्विन :

 माझी काही तक्रार नाही सर.

( अश्विन बाहेर पडतो व चालू लागतो. )

तात्या आजोबा :

 सर, अपघाताने त्याच्या मनावर आघात झालेला आहे. समजून घ्या. बर मी येतो.

( आजोबा त्या मुलांकडे एक नजर टाकतात. नंतर ते ही लगेच मागोमाग त्यांच्या जातात. )

आजोबा :

 अश्विन… अश्विन ….

( पाठीमागून जाऊन अश्विनचा हात धरून घेऊन जातात. )

Cut to ……

… ….. .


No comments:

Post a Comment

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...