Night / Patil vada / inter room
वैद्यबुवा वेलीच्या पानांचे चेचून रस काढतात. त्यामध्ये मध मिसळून खाऊच्या पानातून म्हातारीस चाटण करुन देतात.
वैद्य बुवा मालाधर :
आता होईल बरे. प्रत्येक अर्ध्या तासाने हे औषध देत रहा. व्याधी हळू हळू कमी होत जाईल.
पाटील :
हा…
वैद्यबुवा :
जड अन्न देवू नका. वरणा भात चालेल.
पाटील :
तुमच्या रुपान देव धाऊन आला. तुमच धन्यवाद कस मानाव.
वैद्य बुवा :
माझ्यापेक्षा अंगतला द्या काहीतरी.
पाटील :
हा देतो की.
पाटील :
( गड्याला)
ए जा रे, अन् एक भाताची गोणी दे त्या अंगतला.
गडी :
हा हो.
( गडी आत जातो. )
Cut to …...
…… ….. …….
Night / vaydybuva HOME / outer
वैद्यबुवा घरात जात असताना पाठीमागून अंगत येतो. आपल्या घोंगडीतील धान्य त्यांसमोर धरत.
अंगत :
बुवा, वैद्य बुवा
वैद्य बुवा :
काय रे, मिळाले ना धान्य.
अंगत :
हो, मिळाले, पण तुम्ही तर काहीच घेतलं नाही. घ्या की थोड तुम्ही यातल.
( आपली धान्याची घोंगडी पुढे करत. )
वैद्य बुवा :
माझ्यापेक्षा तुला याची जास्त गरज आहे.
अंगत :
तरी पण घ्या. थोडं.
वैद्य बुवा :
अरे, तुलाच द्यायला सांगितले मी, घरी ने पोर खुश होतील तुझी.
बर, जेवलास का?
अंगत :
नाही अजून, जातो घरी काहीतरी केलं असलच.
वैद्य बुवा :
अरे, तुझ्या घरी काय आहे, काय नाही मला माहित आहे. तुम्ही कुणबी लोकांच्या शेतात राबता काय मिळतं ते ठाव आहे मला. चल ये बस पडवीत.
वैद्य बुवा :
अहो, ऐकलत का? दोन पाने वाढा.
जोगआंबा :
( स्वयंपाक खोलीतून )
हा वाढते. पण कोण?
( जोग आंबा बाहेर येते. पाने वाढताना अंगतला पाहून )
जोगआंबा :
कोण तू, याला सांगताय होय वाढायला, त्यापेक्षा गावच बोलवा की.आम्हाला काय काम नाही.
अंगत :
बुवा, जातो, राहू दे.
वैद्य बुवा :
गप रे, ये बस, खा थोड माझ्याबरोबर. देतो तो देव, जोगआंबा नाही. समजलं.
( जोगआंबा मुरका मारते. जेवण वाढते. )
अंगत :
बुवा, आंबा आई जरी कठोर बोलत असली तरी आतून प्रेमळ आहे. मला माहित आहे. माघारी माझ्या बायकोला काही बाई देत असते.
वैद्य बुवा :
चल , जेव आता.
( ते जेवतात. जेवण झाल्यावर. हात धुताना. )
जोगआंबा :
थांब, माझे उदकेचे पात्र बाटवशील.
( जोगआंबा गडूनं पाणी घेते. व अंगतच्या हातावर ओतते. तो ओंजळीने पाणी पितो. पाणी पिऊन झाल्यावर तो आपली घोंगडी व धान्य घेऊन निघतो. जोगआंबा आत येते. )
बुवा :
व्यवहार करायचा तसा करता. पण नको ते बोलून सर्व पुण्य घालवता.
जोगआंबा :
घरात कन्या असलेल्या मातेस असच कठोर वागावं लागत.
बुवा :
पाणी पिल्याने पात्र जर बाटत असत. तर नदीचे पाणी सर्व जीव पितात. ते तर आधीच वाटलेले आहे. अन् हो आपला प्रभू रामचंद्र तर निषाद राजाच्या घरी व शब्रीची उष्टी बोर खाऊन कधीच बाटले आहे.
जोगआंबा :
पुरे तत्वज्ञान.
( जोगआंबा आतील खोलीत जाते. )
Cut to …….
….. ….. ……..
No comments:
Post a Comment