क्रमश पुढे ..., .
Day. Afternoon. १.३०. कुलाबा किल्ला. Outer
आण्विका, व रेवती समुद्र किनारी येतात. भरती आलेली असते. तेथील नावेच्या मालकाशी बोलतात. व रेवती तिकीट काढून येते.
रेवती, जरा थांब. मी तिकीट काढून येते.
रेवती जाते व तिकीट घेऊन येते.
रेवती, चल,
त्या दोघी नावेत बसतात. नावेत अनेक प्रवासी बसतात. नाव निघते.
काही क्षणात नाव कुलाबा किल्याच्या दरवाजा जवळील धक्याला लागते.
त्या किल्याच्या दरवाजा जवळ येतात.
अण्विका, काय भव्य दरवाजा बांधलेला आहे नाही. एकामागून एक सुरेख गोमुख रचना दिसतेय.
रेवती, एवढे मोठे दगड कसे उचलले असतील ग.
आण्विका, अग त्यावेळच्या लोकांचं अन्न व काम ही तसच जोश पूर्ण होत.
रेवती, अन् हल्लीची माणस साधं पंचवीस किलोच टिक्क उचलताना दम भरतो यांना.
आण्विका, अग हल्ली सगळ संकरीत धान्य आलय. ते फक्त पोत भरते. ऊर्जा नाही.
रेवती, म्हणूनच अकाली मृत्यूच प्रमाण वाढलेल आहे.
त्यावेळची माणस काम पण तसीच करत असत. हे बांधकाम बघ की ,
आण्विका, हल्ली कष्ट कमी झालेत ग. लोक आळशी झालेत.
रेवती, चल जरा तटावरून फेरफटका मारू.
आण्विका, चल.
त्या धावत जातात.
आण्विका, किती मस्त वाटतंय ना.
रेवती, हो समुद्री वाऱ्याने गारवा जाणवतोय ना.
आण्विका, हो.
रेवती, चल तुला भवानी देवी व गणपती मंदिर दाखवते.
त्या पाहतात.
मंदिराच्या बाहेर आल्यावर.
आण्विका, अग, हे बघ तुळशीवृंदावन दगडच कोरून बनवलेलं मस्त आहे ना.
रेवती, हो तर कलाकुसर पाहण्यासारखी आहे. किती वर्ष झाले अजूनही सुस्थितीत आहे. व हल्लीची वृंदावन एक दोन वर्षातच मोडून पडतात.
त्या सर्व किल्ला, बुरुज, तलाव ,तोफा बघून फिरून येतात. रेवती जागोजागी एखाद्या गाईड प्रमाणे संपूर्ण माहिती सांगत असते. संपूर्ण किल्ला पाहिल्यावर त्या दोघी एका बुरुजाच्या तटबंदी वर बसल्या. समुद्राच्या लाटा येवून जवळील खडकावर तसेच किल्याच्या तटावर आदळत होत्या. किल्ल्यावरील तटावर उगवलेले गवत सुकलेले दिसत होते. अनेक पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आलेले होते. ते इकडे तिकडे फिरत आहेत.
आण्विका, चल थोडावेळ तिथे बसुया.
रेवती, थांब मी काहीतरी घेऊन आले
रेवा तिथे एक फेरीवाला असतो. त्याकडून काही पदार्थ घेण्यासाठी जाते
आण्विका, निरीक्षण करत. ( मनात)
काका उगाच काळजी करतात. रेवा किती हुशार व ब्रिलियंट झालीय. इयत्ता आठवीत भरकटलेली. वेड्या प्रेमात पडलेली हीच का? घरातील सर्वांना दमावणारी हट्टी अशी ही. इतकी कशी बदलली. खरंच आश्चर्य आहे. किल्ल्याची खोलवर माहिती अत्यंत काटेकोरपणे व इतिहास तिने सांगितला. सकाळी लवकर उठून योगा प्राणायाम करते. लहान मुलांची शिबिरे घेऊन आपला पोकेटमनी व इतर खर्च चालवणारी खूप डेव्हलप झालीय.
इतक्यात रेवा काहीतरी खायला घेऊन येते.
तिला मुद्दामच
आण्विका, रेवा कशाला उगाच खर्च करतेस. डबा आणलाय ना.
रेवा, अस कस म्हणतेस. थोडाफार आपल्यावर खर्च केला तर काय बिघडलं. तू नाही का मी सुट्टीला चार वर्षामाग कोल्हापूरला आले होते तेव्हा माझ्यासाठी खूप खर्च केला होतास
आण्विका, म्हणून परत फेड करतेस काय.
रेवती, छे, त्या निमित्तानं मला ही एन्जॉय मिळतोय.
आण्विका, रेवा खरंच तुझ्यात खुपच बदल झालाय. मला एक सरप्राइजच आहे.
रेवती, तुझ्याच कडून तर शिकले मी. व माझ्यासाठी तू खरा आदर्श आहेस.
आण्विका, उगाच कौतुक नको करुस. काय ते सांग.
रेवती, तुला आठवतंय का? मी तू बारावीत असताना कोल्हापूरला आले होते.
आण्विका, हा आठवलं. तू खूप डिस्टर्ब होतीस ना तेव्हा.
रेवती, हा हो त्याच वेळी. मी तुझ्यासोबत राहिले होते. तेव्हा मी तुझं टाइमटेबल पाहिलं. व तू केव्हा उठतेस. तुझा योगा, इतर कामातील तत्परता व अभ्यासाचं नियोजन. पैशाची बचत, अन् महत्त्वाचं तुझं ते पोस्टर जे तू तुझ्या खोलीत लावलं होतस बोर्डवर एका कडेला ईकीकाई. मला त्यामुळेच खर यशाचं गमक व रहस्य समजल.
व मी ते इकडे आल्यावर फॉलो केलं.
व आज ही तुझ्यापुढे उभी आहे. आधुनिक रेवा.
आण्विका, अस हाय होय. तरीच सारखी फोन करून त्रास देतेस होय.
रेवती, हा. त्यात काय.बहिणीसाठी तेवढा तरी त्रास घ्यायचा.
आण्विका, बर वाटल बघ. काय ते आठवीत असताना तुझे नखरे आठवले. की मला अजूनही हसू येत.
रेवती, खरंच ताई तुला काय मला पण हसू येतय. वेड्यासारखी वागळले होते ना.
आण्विका, मावशी व काका किती टेन्शन मध्ये आले होते. आता काय करतो तो.
रेवती, बसलाय बिन लग्नाचा.पण तुझं समुपदेशन कामी आल. फक्त थोडा खर्च करावा लागला. पण एक चांगला मित्र पण भेटला. संदेश, ज्याने मला त्याची सर्व हिस्ट्री काढून दिली. तेव्हा कटापच करून टाकला.
आण्विका, आता कोण दुसरा तर नाही ना.
रेवती, छे त्यापासून कानाला खडा. आपल्या करियर वर प्रेम करते मी.
बर ते जाऊ दे. चल थोड जेवून घेऊया.
काढ डब्बा. बघुया काय रेसिपी केली आहे ते.
आण्विका डब्बा उगडते. डब्यात चपात्या व तळलेले मासे असतात.
रेवती, वाटल होत मला सकाळी चटर चट्रर आवाज येत होता.
आण्विका, अग, पण हे केव्हा केलं मावशीनं.
रेवती, हीच खरी खासियत आहे तिची. सातवी पास असली तरी जेवण मस्त बनवते. मध्यंतरी पपांच्या ओढातानीच्या काळात आंबोळ्या, उताप्पा विकून खर्च चालवला होता. आजही कित्येक लोक म्हणतात हॉटेल काढ वो म्हणून.
आज सकाळी पहाटे बनवली असणार ही रेसिपी.
चल खा,
तिथे काही पर्यटक आलेले असतात. त्यातील एक मुलगा लहान त्यांच्याजवळ येतो. अनु तेला चपाती व मास्याचा तुकडा कुस्करून खायला देते. तो भुकेलेला असतो.
तो मुलगा आनंदाने उद्या मारत आपल्या मम्मीकडे जातो.
त्या डब्बा खातात. हात धुत असताना अचानक मेसेज येतो.
आण्विका लगबागिन मेसेज पहाटे. तो संयोगिताचा असतो.
ती तो वाचून रिप्लाय देते.
व शांत बसते.
तिला शांत बसलेली पाहून.
रेवती, सब्र रखो मेरे यार, सब्र का फल मीठा होता है.
त्या थोडावेळ तेथे बसल्या. फेसाळ लाटा आपटत खडकावर होत्या. अनेक छोट्या नौका समुद्रात फिरत होत्या. आण्विकाने आपण आणलेल्या कॅमेऱ्याने बरेच फोटो शूट केले.
तिने पुन: मोबाईल न्याहाळला.
रेवती, सकाळपासून खूप पाहिलस सोड आता.
आण्विका, तुझं म्हणणं पटतय. त्याच्या मनात माझ्याविषयी काही फिलिंगच नसाव्यात.
रेवती, अस काही नाही. पॉजीटिव्ह विचार कर.
बर मला सांग तू त्याला नंबर दिला होतास का?
आण्विका, नाही.
रेवती, मग तुझा नंबर त्याच्याकडे कसा?
आण्विका, बसमध्ये त्याचा मोबाईल सापडत नव्हता. तेव्हा मी कॉल केला. व बाकड्याखाली सापडला. त्यावेळी.
रेवती, हा, व तो त्याने सेव् केला.
म्हणजे सुरवात तिकडून झाली आहे.
आता तू काही मेसेज करू नको. बघुया तो पुन्हा करतो का ते.
आण्विका, अन् त्याने केला नाहीतर.
रेवती, तर. राम राम,.. हम हमारे रास्ते तुम तुम्हारे रास्ते.
रेवती, हे बघ, चल आता निघायला हवं. खूप वेळ झालाय.
संध्याकाळ होत आली होती. त्या तेथून निघाल्या.
व त्या आपली पार्किंग मधील स्कूटी घेऊन घरी निघाल्या.
….. …… ……. ….
Night. ६.३०. Inter. अलिबाग मावशी हाऊस
स्कूटी वरून त्या अपार्टमेंट मध्ये पोहोचल्या.
रेवतीची आई (मावशी) तांदूळ निवडत होती.
मावशी, काय मग अनु कसं वाटतंय. पाहिलास ना किल्ला.
आण्विका, हो मावशी पाहिला. मस्त वाटलं. व तुला सांगायचं तर तुझं पिल्लू आता मोठं झालंय. व आकाशात भरारी मारू लागलेय.
मावशी, तुम्ही दोघी फ्रेश व्हा मी चहा करते.
आण्विका, हो
त्या दोघी फ्रेश होतात. व चहा घेत टिव्ही पाहू लागतात.
…… …….. ….. …….
Night. ईशान. Room अलिबाग inter
आण्विकाने गुड नाईट मेसेज टाकला. व इशांनेही टाकला.
ईशान, अरे. यार हिने गुड नाईट टाकला. मला खूप बोलायचं होत.
काय करू. जरा संयमाने घेऊ. नाहीतर मॅडम चिडतील.
बर आता काय करू. ह पुस्तक वाचतो. पण मन लागत नाही.
शेवटी तो पांघरून घेतो. व झोपतो.
….. ….. ….. …..
Morning,. ६.०० o’ clock. Inter outer.
पक्षी किलबिलाट करत आहेत. उजेड अंधुक पडू लागलेला आहे. ईशान उठतो. आपली कसरत करतो. व थोडे रनिंग करून येतो. ध्यान करून मग स्नान करतो.
शेजारील क्यांटींन मध्ये जाऊन आपल्या ओळख झालेल्या मित्रासवे चहा नाष्टा करतो.
कॅन्टीन. ८.०० o’ clock. Morning. Inter.
चहा घेत.
रवींद्र, काही म्हणा राव. बॉडी मस्त रखलीय तुम्ही.
ईशान, ( चहा घेत) आपल्या खात्यात अपडेट रहावच लागत.
रवींद्र, ते खरंच आहे म्हणा. आपली ड्युटी आहेच तशी. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी मुळात आळशीच होतो. पण खात्यात आल्यापासून जराही चरबी वाढली नाही. सारखं डोंगर व जंगल चालून इतका व्यायाम होतो. की दुसऱ्या व्यायामाची गरजच नाही. पण तुमच्यासारखी व्यायाम वगैरे नाही जमत आपल्याला.
ईशान, मला सवयच आहे. लहानपणापासून अपडेट राहायची.
रवींद्र, लग्न वगैरे झालंय की नाही.
ईशान, नाही अजुन, आता सेटल झालोय आता बघायचं.
रवींद्र, मग मुलगी एखादी पाहिलीय का? की काही प्रेमप्रकरण वगैरे.
ईशान, घरचे बघताहेत. चालू आहे.
रवींद्र, घरच्यांनी बघण्यापेक्षा तूच बघशील की नाहीस. का काढू एखाद स्थळ आमच्या भागातील.
ईशान, (हसतच) माझी पसंती असल्याशिवाय ते काही बोलणारच नाहीत.
सर्व जण हसतात. व
रवींद्र, चला लवकर जायला हवं नऊ वाजेपर्यंत रिपोर्टींग करायला हवं.
ती सर्व निघतात.
…… …. ….. ….. …..
ट्रेनिंग कॅम्प. Day. Inter
जंगली प्राणी व पक्षी तसेच वनस्पती विषयी पहिल्या दिवशी माहिती व बुकचे वाटप होते. तसेच पाणवठे संवर्धन करण्याविषयी मार्गदर्शन केलं जातं. तसेच जंगली उत्पादन व वन्य पशुपक्षी नियोजन समजावले जाते.
प्रत्येकाला माहितीपट असणारी एक फिल्म प्रत्येकाच्या मेमरी कार्ड द्वारे भरून दिली जाते.
संध्याकाळी सहा वाजता सुट्टी होते.
ईशान रूमवर जाऊन फ्रेश होतो. नाष्टा करून दिवसभरातील कार्यक्रम व त्यातील माहिती अभ्यासून एक रिपोर्ट तयार करतो. तसेच काही उमगणारे प्रश्न ही काढतो. ते काढत असताना.
रुमची बेल वाजते.
ईशान दरवाजा उघडतो. रवी आलेला असतो.
रवी, साहेब आठ वाजलेत चला जेवण करू. नाहीतर क्यांटिंग बंद व्हायचं व उपाशी राहायला लागायचं.
ईशान, हो, एक मिनिट. सर्व आवरून आलो.
ईशान सर्व आवरतो. व जेवणास जातो.
…… …… ……….
Night. ९ and १० ,३०.o’ clock. In room. Inter
ईशान सर्व अभ्यास करून आपली माहिती एकत्र करतो. व घडयाळाकडे पाहतो. १०.३० वाजलेले असतात.
That time
आण्विका मावशीच्या घरी. रेवतीच्या रूम मध्ये. Inter night
रेवा, सगळी माहिती कलेक्ट केलीस ना.
आण्विका, हो, व हे फोटो पण अपलोड कर.
रेवती, मस्त प्रोजेक्ट जमलाय. ब्रीलियंट आहेस यार. शेवटी डॉक्टरी दिमाग है तेरा
त्या सुद्धा १०.३० पर्यंत आपले काम पूर्ण करतात.
इकडे ईशान आपल आवरून मोबाईल पाहतो.
व्हॉट्स ॲप चे मेसेज चेक करतो.
आण्विकाचा मेसेज आलाय का?
तो पाहतो ती ऑनलाईन आहे.
एक मॅसेज मस्त निवडतो. व सेंट करतो.
आण्विका, मेसेज पहाते. व रेवतीस दाखवत.
आण्विका, काय रेवती बघ.
रेवती, आण पाहू. ती मेसेज चेक करते. व डीपी पाहते.
आण्विका, काय कसा आहे.
रेवती, खूपच छान आहे मॅडम. शेवटी तुमची चॉइस.पण मला पण बघायचे आहे. की त्याला काय आवडतं.
थांब जरा गंमतच करते.
आण्विका, ए बाई कायतरी चुकीचं पाठवशील
रेवती, एक गुड नाईटचा मेसेज निवडते. व तो पाठवून त्यासोबत फिरायला गेलेले अण्विका व आपले फोटो पाठवते.
त्या दोघी बुरुजावर बसलेल्या. तसेच तोफेशेजारी उभा असलेल्या
ईशान त्यांनी पाठवलेला फोटो दोन मिनिटे पाहतच राहतो. व आपला जॉगिंगचा एक फोटो निवडतो. व पाठवतो.
त्यापूर्वी अलिबाग सफर का?
असे लिहून पाठवतो.
आण्विका मोबाईल रेवतीकडून काढून घेते. व पहाते.
आण्विका, हो आज गेले होते. तुझं ट्रेनिंग कसं चालू आहे.
ईशान, हो चाललय ना मस्त.
आण्विका, जोगिंगला गेला होतास का?
ईशान दररोज जातो.
आण्विका, जेवण झालं तुझं?
ईशान, हो.
तुझं.
आण्विका, हो. झालं.
ईशान, मग आता काय करतेस.
आण्विका, एक प्रबंध तयार केलाय अलिबाग सफरीवर.
ईशान, डॉक्टरांना काय उपयोग त्याचा.
आण्विका, का डॉक्टर काही दुसर करू शकत नाहीत.
ईशान, काय पेशंटना वाचून दाखवणार.
आण्विका, हो, शेवटी पेशंट ना फ्रेश करण डॉक्टरचंच काम असतं.
रेवती बाजूला बसून त्यांचे चॅटिंग पाहत होती. ती
आण्विका, आता काय आमची कंपनी जुनी झाली बुवा.
आण्विक, गप्प ग, काहीतरी बोलू नको.
रेवती, ये बाई लई हवेत उडू नकोस. विचार करून पाय ठेव.
आण्विका, बर बाई.
इतक्यात मेसेज येतो
ईशान, बरोबर आहे, झालं का अलिबाग दर्शन.
आण्विका, अजून आहे भरपूर. आता कुठे कोपराच पाहिलाय नुसता.
ईशान, म्हणजे फिरलाच नाही.
आण्विका, नाही, कुलाबा किल्ला पाहिलाय नुसता.
ईशान, मज्जा आहे बुवा तुमची.
आण्विका, तुझी नाही का? तू ही आला असशिल बीचवर फिरून.
ईशान, नाही जायला. परवा सुट्टी आहे. तेव्हा बघू.
आण्विका, अच्छा.
ईशान पण प्रॉब्लेम आहे. गाडी पाहिजे.
आण्विका, घ्यायची एखादी भाड्याने. मिळेल की अलिबागमध्ये.
मी आमच्या पाहुण्यांच्या ओळखीने बघू का?
ईशान, चालेल की.
आण्विका, सरकारी ट्रेनिंग त्यात एक दिवस सुट्टी बर आहे तुमचं.
ईशान, मॅडम सूट्टी आहे कारण उद्या सकाळी सात पासून रात्री आठपर्यंत ट्रेनिंग आहे.
समजल का? विश्रांतीसाठी सुट्टी आहे.
आण्विका, मग काय तू फिरतोयस झोपशिल डाराडूर.
ईशान, मला कितीही काम असूदे , मी सकाळी फ्रेशच असतो. सुट्टी असो वा नसो. माझा दिनक्रम ठरलेलाच असतो.
किती दिवस मुक्काम आहे.
आण्विका, फक्त पंधरा दिवस.
ईशान, मला वाटल सर्व सुट्टी इथ राहतेस की काय?
आण्विका, नाही रे, माझी इंट्नशिप आहे. राधानगरी व आजरा ही दोन ठिकाणे पाठवली आहेत.
ईशान, राधानगरी असेल, तर आपली भेट होईल की.
आण्विका, अजुन ठरलं नाही. राधानगरी की आजरा ते.
ईशान, आजरा कशाला. राधानगरी घे. जवळ आहे
आण्विका, मी म्हणते की त्यापेक्षा कोल्हापूर आपल बर. जवळ होईल.
ईशान, ए गप राधानगरी घे जा. सगळ आयुष्य कोल्हापुरात तर गेलंय. जरा सोड जागा. उगीच गुळा भोवती मुंग्या फिरतात तसे कोल्हापूरच्या भोत्यान फिरू नकोस. गोल गोल.
अन् राधानगरी उत्तम आहे. सुंदर शांत परिसर. व आरोग्यदायी वातावरण.
आण्विका, पण माझी मैत्रीण म्हणते. आजरा घे. राहायची सोय होईल.
ईशान, हे बघ त्यापेक्षा राधानगरी घे. तुझी राहायची व्यवस्था मी करतो. ओळखी आहेत माझ्या.
आण्विका, बघू ते नंतर, जाऊ दे, अजून पंधरा ते वीस दिवस आहेत अजुन.
ईशान, ठीक आहे.
आण्विका, खूप वेळ झालाय. गुड नाईट.
ईशान ,चालेल , गुड नाईट.
दोघांनी चॅटिंग बंद केले.
रेवती, काय मॅडम, कसं काय, जमल वाटत.
आण्विका, कशात काय, नाही अजुन, उगाच पतंग उडवू नकोस.
रेवती, हे बघ दीदी, तो सावळा जरी असला तरी हँडसम आहे. व चांगल्या नोकरीवर देखील. तसेच तुझ्या ओळखीचा देखील. मला त्याच्या चॅटिंग वरून वाटतेय की त्याला तुझ्यात इंटरेस्ट आहे.
आण्विका, तू काय यामधे पी एच डी केल्यासारखी बोलतेस.
रेवती, अनेक मित्र मैत्रिणींची प्रकरणे पाहिलीत मी. हा बरा वाटतो. पण.
आण्विका, पण काय आणखीन?
रेवती, त्याच्या विषयी जाणून घ्यायला हवं.
तो व्यसनी आहे का? त्याच एखाद प्रेमप्रकरण आहे का? त्याचा स्वभाव कसा आहे.
आण्विका, तो व्यसनी नक्कीच नाही. हे मी खात्रीने सांगू शकते. स्वभावाच म्हणत असशील तर मी त्याची क्लासमेट त्याविषयी मला माहिती आहे. फक्त त्याच प्रेम वगेरे काही आहे का कुणाशी ते जाणून घ्यायला हवे. आता त्यासाठी काय करायचं.
रेवती, काही नाही त्यासाठी एक शक्कल लढवायची.
आण्विका, कोणती, काय करायचं.
रेवती, आईड्या.
असे म्हणून रेवती आपला मोबाईल घेते. त्यामधे फेसबुक अकाऊंट उघडते. त्यावर वेगळी माहिती भरून एका सुंदर मुलीचा फोटो लावते.
व ईशानच्या फेस बुक आयडी वर hi पाठवते.
ईशान लगेच मोबाईल मध्ये पाहून
ही कोण आणखी. मला हाय पाठवणारी. कोण तरी असेल
असे समजून तो दुर्लक्ष करतो.
रेवती लगेच पुढे दुसरा मेसेज पाठवते.
हाय, लाईक हँडसम.
लगेच दुसरा आलेला मेसेज पाहून तो चपापतो.
तो thanks हा संदेश परत पाठवतो.
लगेच रेवती, तुम्ही मला आवडता.
हा मेसेज पाहूनन ईशानची झोपच उडाली.
तो लगेच मेसेज पाठवतो.
सॉरी मिस मला तुमची ओळख नाही. आपण कोण?
रेवती, तू मला ओळखतोयस मी कोल्हापूरातील आहे.
असे पाठवून ती ऑफलाईन होते.
तीच हे चॅटिंग पाहून
आण्विका, धन्य आहे बाई तुझी काय करशील याचा नेम नाही, बिचाऱ्याची झोप उडविलीस.
रेवती, ये वेडाबाई, ही उडणारी झोप आहे ना. ती उद्याचा अंधार की उजेड सिद्ध करेल.
उगाच गांधारी स्टाईलची पट्टी बांधून बसू नकोस. हा किती पाण्यात आहे. ते तरी बघुया.
आण्विका, बर बाई, बघुया. पण माझं मन सांगतय. तो हिराच आहे.
रेवती, ये मेंढी बाई, हुरळून लांडग्याच्या मागे जाऊ नकोस. हाकनाक शिकार होईल तुझी.
आण्विका, तो लांडगा नाही. वाघ आहे वाघ. समजल काय?
रेवती, तुझा रस्सा होईल बघ. लागली लगेच कड घ्यायला. झोप आता. गुड नाईट सांगितलस ना. बघू उद्या पुढे काय करायचं ते.
त्या दोघी झोपी जातात.
अनु कांबरुन अंगावर घेते.
Cut to …..
…… …… ……. ……. …….
Day. Afternoon. राधानगरी कोर्ट. १.०० clock outer.
घड्याळात टोल वाजतो. अनेक लोक इकडे तिकडे जात आहेत. राधानगरी कोर्टाच्या बाहेर वकील व ईशानने पकडलेले तस्कर उभे आहेत. वकील त्याकडे पाहून हसतो.
कोर्ट भरते.
आरोपीच्या पिंजऱ्यात ते तस्कर उभे आहेत.
ज्यज, आजच्या सुनावणीस सुरवात करा.
सरकारी वकील भांडारकर, मिलॉर्ड आज आपल्या पुढे आलेल्या या कथड्यात उभा असलेल्या आरोपींमध्ये आरोपी भिवाजी तसेच तुकाराम व कीशा व त्याचे सहकारी. यांच्यावर जंगली प्राण्यांची हत्या करणे, त्यांच्या अवयवांची तस्करी करणे. तसेच जंगली औषधी दुर्मिळ वनस्पतीची व नरक्याची तस्करी करणे यासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. फॉरेस्ट खात्यातील अधिकारी ईशान पाटील व अन्य वनरक्षक यांना यांच्या या कृत्याचा सुगावा लागला. त्यांनी तत्काळ कार्यवाही करून यांना रंगेहाथ पकडले. त्यावेळी या आरोपींना वन अधिकारी व वनरक्षक यांवर जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी यांना जेरबंद करण्यात आले. व आज आपल्यासमोर सादर करण्यात येत आहे. राष्ट्रीय वन संपत्तीची अनधिकृत तस्करी करण्याच्या गुन्ह्याखाली तसेच वन्य प्राण्यांच्या शिकारी बाबत त्यांवर कार्यवाही करून योग्य ती शिक्षा करावी ही मी आपल्यासमोर मागणी करत आहे.
मोगार्डे आरोपीचे वकील, मिलोर्ड माझ्या मित्र वकील भांडारकर यांनी अत्यंत बालिश अशी दंतकथा रंगवून युक्तीवाद चालवला आहे. माझ्या निरपराध अशिलांना विनाकारण या गंभीर आरोपाखाली गुंतवले जात आहे.
मी याबाबत सत्य कथन करू इच्छितो. त्याची आपण परवानगी द्यावी.
जज्य साहेब, परवानगी आहे.
आरोपी वकील मोगार्डेकर , तर याच काय आहे साहेब, माझे अशील भिवाजी, तुकाराम व कृष्णात व त्यांचे अन्य मित्र हे अत्यंत गरीब घरातले आहेत. त्याच्या घरात दिवसभर राबले तरच संध्याकाळी चूल पेटते. नाहीतर उपाशी झोपाव लागत. व घरातील परिस्थिती गरीब असलेने जेवणं बनवण्यासाठी सरपण लागत. मग माझ्या अशिलाने व त्याच्या मित्रांनी जळावू सरपंच काढण्यासाठी जंगलात गेले होते. त्यावेळी त्यांना पकडण्यात आले. व खोटा गुन्हा दाखल केला साहेब. तेव्हा मला अस वाटत आपल पोट भरण्यासाठी त्यांनी काही सरपण गोळा केले यामध्ये त्यांचा काय दोष. व जगण्याचा नैतिक अधिकार घटनेने सगळ्यांना दिला आहे. व त्या नुसार मला अस वाटत की त्यांना माफी मिळावी.
सरकारी वकील, ऑब्जेक्शन मीलॉर्ड
ज्यज, ऑब्जेक्शन ओवर रुल.
सरकारी वकील भांडारकर, मीलोर्ड माझ्या वकील मित्रांना दृष्टी भ्रम झालाय असे वाटते. वन खात्याने जेव्हा यांना पकडल तेव्हा त्यांच्याजवळ वनौषधी तसेच नर्क्या या बंदी असलेल्या अमली पदार्थांचा साठा सापडला. इतकेच नाही तर काही जंगली प्राण्यांची कातडी, शिंगे देखील सापडली. या वस्तू काही सरपणात येत नाहीत. याचे काही फोटो देखील आहेत. जे मी कोर्टात सादर करतोय. हे घ्या.
वकील कोर्टात पुरावे सादर करतो.
याच स्पष्टीकरण माझ्या मित्र वकिलांनी द्यावं.
मोगार्डे वकील, स्पष्टीकरण आहे. मिलोर्द माझ्या अशिलानी हा गुन्हा केला नाही हे सिद्ध करण्यासाठी मी वन अधिकारी ईशान पाटील यांना बोलावण्याची परवानगी मागतो.
सरकारी वकील, ते अधिकारी ट्रेनिंगला गेलेत. मिलॉर्डे. आता येवू शकत नाहीत.
मोगार्डे वकील, काही हरकत नाही सर, मला त्यावेळी हजर असणारा कोणीही वन खात्यातील कर्मचारी चालेल.
अन् तसे अधिकारी आहेत इथे, मिस्टर सातपुते.
मी त्यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवू इश्चीतो.
त्याची तरी परवानगी मिळेल का?
ज्यज, परवानगी आहे.
नाव पुकारले जाते.
सातपुते वनरक्षक हाजिर हो.
सातपुते वनरक्षक हजर होतात.
मोगार्डे वकील, आपल पूर्ण नाव,
सातपुते कर्मचारी, मी सातपुते, गजानन सातपुते.
मोगार्डे, बर सर सांगू शकाल का, त्यादिवशी काय घडल.
सातपुते, त्या दिवशी आमच्या ईशान साहेबांना समजल होत. की काही तस्कर वन्य प्राण्यांच्या अवयवांची व वनस्पतीची तस्करी करणार आहेत. तेव्हा साहेबांनी आम्हा पाच सहा वनरक्षकांना घेऊन अचानक जंगलात धाड टाकली. तेव्हा सदर आरोपी आम्हाला तेथील जमिनीत लपवलेला साठा काढताना दिसले तेव्हा आम्ही झडप घालून त्यांना पकडले.
मोगार्डे वकील, झडप घालून पकडले अस तुम्ही म्हणता. मग मला सांगा. एवढी मोठी तस्करी करताना काहीतरी शस्त्र बाळगत असतीलच की तस्कर.
सातपुते, अर्थातच.
मोगार्डे वकील, मग मला सांगा माझ्या अशिलांकडे काही बंदूक वगैरे मिळाली का?
सातपुते, नाही, बंदूक नाही पण काही कोयते व कुराडी अन् दोर्या सापडल्या.
मोगार्डे वकील, नोट करून घ्या मीलो्र्डे.
मोगार्डे वकील, बर, कोयते, कुराडी सोडुन आणखी काय सापडलं.
सातपुते कर्मचारी, नाही, काही नाही.
मोगार्डे वकील, मीलॉर्डे यावर काही बोलायचे आहे. आताच वनरक्षक यांनी सांगितल्या प्रमाणे माझ्या अशीलांकडे कोयता, कुराडी ही आयुधे सापडली. कसं आहे. माझे अशिल त्यावेळी लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात गेले होते. त्यावेळी त्यांना अचानक तिथे पूर्वी कुणीतरी लपवून ठेवलेला अनधिकृत साठा सापडला. त्यावेळी अचानक वन ऑफिसर तिथे आले. व त्यांना वाटले की हे कृत्य माझ्या अशिलानी केले आहे. पण वास्तव पाहता माझे अशिल सर्पण गोळा करायला गेले होते. त्यासाठी कोयता व कुराडी आवश्यक आहेत. पाहा तरी यांच्याकडे किती निरागस आहेत ते. व गरीब सुद्धा.
सरकारी वकील भांडारकर, निरागस व गरिबांनी मग वन खात्यातील कर्मचाऱ्यांवर हल्ला कसा केला. व यांची शरीरयष्टी पाहता कोणत्या अंगाने ही गरीब वाटतात? तुम्हीच पाहा.
मोगार्डे वकील, एखाद्याच्या शरीरावरून समजत नसते गरिबी.
सरकारी वकील, मग कशावरून समजते.
खूप वेळ वादविवाद चालतो. शेवटी ज्जज निर्णय देतात.
ज्यज, काही ठोस पुरावा आहे काय?
त्यांना प्राण्याची शिकार करताना पकडलेला. वगैरे.
सरकारी वकील, नाही.
ज्यज, तमाम सादर केलेल्या साक्षी पुरव्या नुसार आरोपी भीवाजी, तुकाराम व कृष्णात व त्यांचे अन्य सहकारी घटना स्थळी योगायोगाने आढळले. त्यांना प्रत्यक्ष वन संपत्तीतील औषधी वनस्पती गोळा करताना. व वन्य प्राण्यांची हत्या करताना पाहिलं गेलं नाही, तसेच त्यांनी वन हद्दीत सरपण गोळा करण्यासाठी ते विना परवानगी गेले. जे कायद्याने गुन्हा आहे. तरी हे कोर्ट आरोपींना दीड महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावत आहे.
आरोपी जल्लोष करतात.
बाहेर जाताना, आपल्या वकिलाच्या हातात हात देवून,
भिवा, काला कोट लई कमाल केली. मस्त
वकील मोगार्डे, ते ठीक आहे. तेवढं माझ्या फीच व खर्चाच बघा.
तुकाराम, ते होईल हो.
पोलिस घेऊन जाताना वनरक्षका जवळून जाताना
भिवा, त्या तुमच्या अधिकाऱ्याला सुटून आल्यावर बघतो.
असे बोलून निघतो.
Cut to…. ……
…… ……. …… ……
क्रमशः पुढे.....
nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com