शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Sunday, October 12, 2025

वीरगळ भाग ५

वीरगळ भाग ५

 Day / evening / Mumbai City / chaupati

(आजोबा गाडी पार्क करतात. )

अश्विन :

आजोबा, इथे कशाला थांबलोय?

आजोबा :

 चल इथे थोडं चहा पाणी करू.

अश्विन :

 चला घरी, नकोय मला, उघड्यावरच खाऊ नका असे आई म्हणते.

आजोबा :

 ये गप्प, उगाच ट्याव ट्याव करू नको. उतर खाली, तुझ्या या नाजुकते मुळेच तुझं असं शोकेशच बावल झालेय. गप चल तिथे, झाडाखाली बाकावर गुपचुप बस. मला शिकवतोय.

( अश्विन शांतपणे तिथे बाकावर जाऊन बसतो. आजोबा मिसळ पाव घेऊन येतात. पुढ्यात ठेवत.)

आजोबा :

घे सुरु कर.

अश्विन :

नको मला, माझा घसा दुखेल. तब्येत बिघडेल माझी.

आजोबा :

 गप खा, म्हणे तब्येत बिघडेल , मला तुझ्यापेक्षा ती मुलेच जास्त स्ट्राँग वाटलीत.

अश्विन :

 उगाच काहीपण बोलू नका, मी फुटबॉल चॅम्पियन आहे.

आजोबा :

 ते दिसतंय मला, उगाच मोठ्या वल्गना करू नकोस.

चॅम्पियन म्हणे, पायावर ठीक उभारता तरी येतं का?

आज पाहिलेय शाळेत एखाद्या भिजलेल्या उंदरासारखा उभा होतास.

( अश्विन रडू लागतो. )

 आजोबा :

 हेच वागणं पसंत नाही मला, त्या जयाला सांगितलं की गावाकडे ठेव म्हणून, ऐकतो कुठे माझं? म्हणे अँडव्हान्स शिक्षण देतो. हे तुझं अँडव्हान्स शिक्षण होय. माझ्याकडे बघ जरा मी कसा स्ट्राँग आहे. अरे मी या वयात एवढा फिट्ट आहे. तू बघ तुझ्या स्वतःकडे

( अश्विन स्वतःकडे पहातो. नंतर आजोबांकडे पाहतो. )

 आजोबा :

 मी एवढी फौजेची नोकरी केली. प्रसंगी झाडाची पाने पण खाल्ली, कीडे मकोडे देखील खायची पाळी आली. कुठलं ही पाणी प्यायलो. काय झालं, आहे ना ठणठणीत, तू बघ तुझ्या स्वतःकडे. काय तुझी हालत झालेय बघ जरा. स्ट्राँग व्हायचं असेल तर निसर्गात जगायला शिक,

अश्विन :

 पण आईला कळलं तर.

आजोबा :

 कळेलच कसं, तू सांगितल्याशिवाय. माझ्या काय तोंडाला कुलूपच, अन् एवढे लोक खात आहेत. त्यांना नसेल का स्वतःची काळजी?

( अश्विन एक स्माइल करतो. व मिसळ खाऊ लागतो. )

Cut to …..

... …. …. …..

Next day / morning / 6’o’clock inter

मोबाईल गजर वाजतो. आजोबा उठतात. अश्विनच्या रूममध्ये येतात. अश्विन झोपलेला असतो.

आजोबा :

 अश्विन ये अश्विन

( अश्विन डोळे चोळत उठतो. )

 आजोबा :

 चल पार्क मध्ये.

अश्विन पण आजोबा.

आजोबा :

 अरे सकाळच्या ताज्या हवेत फिरलं की बर वाटेल तुला.

( अश्विन उठतो. )

Cut to. …..

…… …… …….

Morning / ६.३० o’ CLOCK /outer / Park

अश्विन एका पार्क मध्ये एका बाकड्यावर बसलेला आहे. आजोबा एक रपेट मारून येतात. व त्याजवळ बसतात.

आजोबा :

 बोल, कसं वाटतंय.

अश्विन :

 मस्त, एकदम फ्रेश

आजोबा :

 तू रोज का येत नाहीस?

अश्विन :

 कोणासोबत येणार?

 आजोबा :

बाबांसोबत तुझ्या.

अश्विन :

 ते तर कामावरून उशिरा येतात. व सकाळी आठ नंतर उठतात. त्यासोबत काय नऊ वाजता येऊ?

आजोबा :

 मग मित्रांसोबत का येत नाहीस?

अश्विन :

 मग झालं, हे काय गाव नाही, हाक मारले की सारे गोळा व्हायला.

आजोबा :

 काय खरं नाही बुवा तुझं!

अश्विन :

 अस काही म्हणू नका ना, तुम्हीच काहीतरी सुचवा की.

आजोबा :

 बर, सुट्टी कधी पडणार तुला?

अश्विन :

 मे महिन्यात.

आजोबा :

 सुट्टी लागली रे लागली की ये माझ्याकडे गावी, बघ तुला कसा रफ आणि टफ बनवतो ते.

अश्विन :

 आता नेणार नाही.

आजोबा :

 तुझी शाळा आहे ना,

अश्विन :

 मला तिथे जाऊस वाटत नाही.

आजोबा :

 का?

अश्विन :

 मला ती मुले पुन्हा मारतील. त्या दिवशी सुदैवाने वाचलो.

आजोबा :

 अरे, पण अस घाबरून कस चालेल. व आता अर्ध वर्ष आहे अजून, असा आधी मधी दाखला काढणं म्हणजे तुझं नुकसान नाही का होणार?

अश्विन :

 मरण्यापेक्षा ते नुकसान झालेल बरं

आजोबा :

 म्हणजे तू ही त्या मंगेश सारखं हार मानून पलायन करणार तर?

 अश्विन :

 प्रतिकूल प्रसंग असल्यावर माघार घेण्यातच शहाणपणा नाही का?

आजोबा :

 लढायच्या आधीच हार मानलीस म्हण.

अश्विन :

 जर ते तिघे एक एकटे आले असते. तर गोष्ट निराळी होती, पण ते एखाद्या तरसा सारखं टोळी करून आल्यावर एकट्याचे काय चालणार? बोला

आजोबा :

 समस्या गंभीर आहे, विचार करून मार्ग काढायला हवा.

बर चल घरी, काढू काहीतरी मार्ग.

( ते निघतात. अश्विन लंगडत चालत आहे.)

Cut to ….

….. ….. …… …

Day / afternoon / inter / dayning holl Ashvin HOME Mumbai

( गंभीर वातावरण, सर्वजण आजोबा, जयवंत, माधवी जेवत आहेत. अश्विन आपल्या रूममध्ये आहे. )

 तात्या आजोबा :

 मला वाटत, यावर काहीतरी उपाय करायला हवा.

जयवंत :

 आपण पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर.

 तात्या आजोबा :

 त्याने काय होईल, त्या मुलांचे नुकसानच ना, व आपला मुलगा कधी स्ट्राँग होणार?

 माधवी :

 मला तरी काही सुचत नाही.

तात्या आजोबा :

 हे चार - पाच महिने त्याला सुरक्षित सोडणे व आणण्यासाठी वेळ काढला पाहिजे.

जयवंत :

 मी केलं असतं, पण माझं ऑफीस टायमिंग व अंतर पाहता ते अशक्य आहे. मी जाताना सोडू शकतो. येताना कस करायचं?

तू का नाही जात.

माधवी :

 माझं आवरुन जायला. मला खूप वेळ लागेल. तोपर्यंत.

जयवंत :

समीरला सांग की. त्याची बदली इथेच झालेय ना?

माधवी :

 नको, त्याला नको, उगाच आयुष्यभर टोमणे कोण खाणार त्याच्या बायकोचे?

तात्या आजोबा :

 हा आहे एक माझ्या ओळखीचा गावातील एक पोलिस इथेच असतो. तो आणेल ना रोज सांगतो मी.

जयवंत :

 कोण काशिनाथ,

 तात्या आजोबा :

 हा, काशिनाथ.

जयवंत :

 हा त्याला जमेल. आणेल तो.

Cut to .

…… ….. ….. ……


Saturday, October 11, 2025

वीरगळ भाग ४

वीरगळ भाग ४

 Night / Ashvin HOME Mumbai / inter / room

तात्या आजोबा आत रुम मध्ये आले. अश्विन तिथे बेडवर झोपलेला आहे. अश्विन उठून अंथरुणावर बसतो. आजोबा शेजारी बसतात. माधवी आत येते.

माधवी :

 अश्विन गोळ्या घे. उद्या चेकपला जायचं आहे. तिथून शाळेत जरा मुख्याध्यापकांनी बोलावले आहे.

( अश्विन गोळ्या घेतो. आजोबांच्या हातावर हात ठेवत. )

अश्विन :

 आजोबा तुम्ही पण येणार ना.

आजोबा :

 हो येईन.

( माधवी आतील खोलीत जाते. )

आजोबा :

 उद्या बोलू आपण मुख्याध्यापकांशी

अश्विन :

 नको नको, ते त्यांना शिक्षा करतील. व पुन्हा मला ती मुले त्रास देतील.

आजोबा :

 भित्रट घाबरतोस कसला? भीड भिकेची बहीण.

अश्विन :

 ते खूप तगडे आहेत.

आजोबा :

 मग त्यात काय एका हातात लोळवायचं त्यांना.

अश्विन :

 नको, मला भीती वाटते त्यांची.

( आजोबांनी अश्विनकडे पाहिले. तो अत्यंत बारीक दिसत होता. चार भिंतीत राहिलेल्या कबुतरासारखी गत त्याची झाली होती. )

आजोबा : ( मनात )

आता मलाच काहीतरी केलं पाहिजे.

बर, चल मी येतोय.

Cut to ….

…… …… …..

 Day / afternoon ३ o’ clock / school

मुख्याध्यापकांच्या केबिन बाहेर एका बाजूला ते तिघे समीर, आरिफ, जोसेफ उभा आहेत. अश्विन व आजोबा तिथे येतात. त्याकडे पहात मनात

जोसेफ : ( मनात )

 एवढं लागलं तरी याची जिरली नाही. ते तक्रार करतोय.

आरिफ : (मनात )

वरून पडून देखील पांगळा नाही झाला.

समीर : ( मनात )

 एका बुक्कीत टेंगुळ काढीन

( आश्विन आजोबांच्या हाताला घट्ट पकडतो. आजोबा आपली करारी नजर त्या तिघांकडे टाकतात. त्यांना पाहून ते तिघे मान खाली घालून उभे राहतात. )

( शिपाई केबिन मध्ये जातो. व एक लेटर देतो. )

शिपाई :

 सर बाहेर अश्विन व त्याचे आजोबा आलेत.

मुख्याध्यापक :

 पाठवून दे त्यांना आत.

( शिपाई बाहेर जातो. )

शिपाई :

 आत बोलावलंय तुम्हाला.

( आजोबा व अश्विन आतमध्ये जातात. ते आत आल्यावर)

मुख्याध्यापक :

त्या तिघांना पण पाठव आत.

( शिपाई बाहेर जातो. त्या तिघांना )

शिपाई :

 चला आत .

( ते तिघे आत येतात. )

मुख्याध्यापक :

 केशव ही फाईल सिंत्रे सराना नेऊन दे. व पी. इ. च्या रगडे सरांना लाऊन दे.

( केशव जातो. आठवीच्या वर्गाबाहेरून सिंत्रे सरांना हाक मारून फाईल देतो. सर ती घेतात. केशव पुढे ग्राऊंडवर जातो. व तिथे रगडे सर पाचवीच्या मुलांना लेझिम शिकवत असतात. तेथे जाऊन )

केशव शिपाई :

 रगडे सर तुम्हाला घरपणकर सरांनी आपल्या केबिनमध्ये बोलावले आहे.

 रगडे सर :

( सिटी वाजवून थांबवतात व सुशांतला जवळ बोलावून)

सुशांत, इकडे ये.

( सुशांत येतो. )

रगडे सर :

मघापासून मी शिकवलेल्या स्टेप्सचा सराव घे. मी आलोच इतक्यात.

रगडे सर निघतात.

Cut to …

…….. …… …..

Inter / mukhadyapak Kebin / day

समीर, आरीफ, जोसेफ एका बाजूला उभे आहेत. बाजूला अश्विन व त्याचे आजोबा बाजूला बसलेले आहेत.

रगडे सर दाराजवळ येतात.

घरपणकर सर ( मुख्याध्यापक ) :

नालायक आहात तुम्ही तिघे. अभ्यासाच्या नावानं बोंब, कुठे खेळात नाही, स्पर्धेत नाही. व शाळेत इतर विद्यार्थ्यांना पण शिकू देत नाही.

समीर :

 एवढं काय केलंय आम्ही सर.

घरपणकर सर :

काय केलंय, थांबा दाखवतोच तुम्हाला, लाल शेरा दिला म्हणजे समजेल.

( रगडे सर आत येण्याची परवानगी मागतात. )

रगडे सर :

 सर आत येऊ का?

घरपणकर सर :

 या

( रगडे सर आत येतात. )

रगडे सर :

 सर आपण बोलावलंत.

 घरपणकर सर :

 हो, सर, मला सांगा त्या दिवशी आश्विन संगे हा जो अपघात झाला त्यासाठी हे तिघे दोषी आहेत. असे मला वाटते.

जोसेफ :

 आम्ही काय केलंय. तो तर अपघात झालाय. कुठेतरी रस्त्यावर त्यासाठी आम्ही दोषी कसे?

घरपणकर सर :

सर तुम्ही अश्विनला ओळखता की नाही.

रगडे सर :

 हो सर, खूप हुशार व प्रामाणिक मुलगा आहे तो.

घरपणकर सर :

 त्या दिवशी खेळाच्या मैदानावर काय घडलं.

रगडे सर :

 काही नाही, थोड खेळताना मुलांमध्ये बाचाबाची झाली. थोडस पडल्याने लागलं अश्विनला.

घरपणकर सर :

सर, तुम्ही तिथे असून देखील तिथे काय घडलं हे माहित नाही तुम्हाला.

रगडे सर :

सर मला समजलं नाही, आपल्याला काय म्हणायचं आहे ते.

घरपणकर :

 सर फक्त बाचाबाची झाली नाही. या तिघांनी जाणून बुजून आश्विनशी त्यावेळी भांडण काढलं. व अश्विनला पाडलं. व त्याच्याशी हुज्जत घातली.

रगडे सर :

माझं लक्ष होतं सर

घरपणकर सर :

 सर तुमच्या लक्षात नाही आलं त्या दिवशी काय घडलं ते. हे बघा, सी सी टिव्ही कॅमेऱ्यात सगळ दिसत आहे. हे तिघे काय काय कारस्थान करत होते ते. व मला वाटत, याच भांडणाचे उट्टे यांनी बाहेर शाळा सुटल्यावर काढले.

( सर सी सी टिव्ही कॅमेऱ्यात असलेला सीन दाखवतात. )

रगडे सर :

 सर खेळताना धक्का लागलाय फक्त.

घरपणकर सर :

सर पुढील फुटेज पहा. तुम्ही सर्व त्याला उठवत असताना हे तिघे हसत एकमेकांना टाळ्या देत आहेत.

( सर सीन पाहतात व त्या तिघांकडे डोळे वटारून पाहतात. )

घरपणकर सर :

 सर ही तिनं मूल म्हणजे आपल्या शाळेला कलंक आहेत. यांच्यामुळेच गेल्यावर्षी तो हुशार मंगेश शाळा सोडून गेला. हे फक्त मैदानावरच प्रताप करत नाहीत. पहा या फुटेज

( सर्व फुटेज पाहतात. एके ठिकाणी आरीफ मुलांच्या पायाखाली काचेच्या गोठ्या टाकताना दिसतो. तर जोसेफ पिशवीतून आणलेले कबूतर घेऊन मुलींवर उडवताना दिसतो. )

घरपणकर सर :

 मला खात्री आहे. अश्विनच्या अपघातमाग यांचाच हात असावा. काय आश्विन बोल. तू फक्त एक तक्रार कर. लगेच यांच्यावर कारवाई करतो.

( अश्विन काही न बोलता खाली मान घालून रडू लागतो. तो काही बोलत नाही.)

घरपणकर :

 तू फक्त एक तक्रार दे. बाकी आम्ही पाहतो.

( अश्विनला ते मारत असलेला सीन आठवतो. व तो शांत होतो. व आजोबांकडे नंतर त्यांकडे व मग खाली पाहू लागतो. )

अश्विन :

 माझी काही तक्रार नाही सर.

( अश्विन बाहेर पडतो व चालू लागतो. )

तात्या आजोबा :

 सर, अपघाताने त्याच्या मनावर आघात झालेला आहे. समजून घ्या. बर मी येतो.

( आजोबा त्या मुलांकडे एक नजर टाकतात. नंतर ते ही लगेच मागोमाग त्यांच्या जातात. )

आजोबा :

 अश्विन… अश्विन ….

( पाठीमागून जाऊन अश्विनचा हात धरून घेऊन जातात. )

Cut to ……

… ….. .


Thursday, October 9, 2025

वीरगळ भाग ३

वीरगळ भाग ३


 तानाजीराव ( तात्या आजोबा) :

 थांब मी जातो. त्याच्याकडे

( तात्या आजोबा गॅलरीत जातात. आजोबाना पाहून )

आश्विन :

 कोण तात्या आजोबा

( अश्विन वाकून नमस्कार करतो. )

तात्या आजोबा :

 राहू दे रे, बघू तुझा पाय.

अश्विन :

आहे आता बरा, थोड अवघडल्या सारख वाटतंय. उद्या बोलावलंय डॉक्टरांनी चेकपला निघेल स्टेपिंग

तात्या आजोबा :

 पण असा कसा पडलास तू?

 ( आश्विन रडू लागला. )

तात्या आजोबा :

अरे, अस काय हे अपघात होतच असतात. त्याने अस खचून नाही जायचं बाळ.

अश्विन :

 अपघात घडला असता तर मी मान्य केलं असतं. पण .

 तात्या आजोबा :

 पण काय आणखीन.

अश्विन :

 माझ्या शाळेत तिनं खोडकर मुले आहेत. नेहमी मला काही ना काही चिडवत असतात. घाट्या, बाट्या अस काही न काही बोलतात. त्या दिवशी फूटबॉल खेळताना तर मुद्दाम भांडण उकरून काढले. मी पण चिडून त्याशी वाद घातला. तेव्हा शाळा सुटल्यावर दाखवतो म्हणाले.

तात्या आजोबा :

 मग काय झालं?

आश्विन :

 त्या दिवशी मी व शेजारील कॉलनीतील गणेश शाळेतून येत असताना ते आपले गुंड मित्र घेऊन आले. मला मारायला. मी तेथून गणेशकडे दफ्तर देऊन पळालो त्यांनी मला एका बोळात गाठलं. व बेदम मारलं. मी कसा बसा त्यांच्या तावडीतून निसटलो. व पुलाकडे पळालो. ते ही माझ्या मागे लागले. शेवटी मी पुलावरून उडी टाकली. कसा बसा पोहत काठाला आलो. मात्र या सगळ्यात माझा पाय दुखावला.

तात्या आजोबा :

 बाबांना सांगितलं नाहीस.

अश्विन :

 त्यांना सांगून काय उपयोग ते तर आपल्याच कामात दंग असतात. मागे मी त्यांना सांगितले होते. पण त्यांनी त्या मुलांपासून दूर रहा एवढेच सांगितले.

तात्या आजोबा :

 शाळेतील शिक्षकांना सांगायचं नाहीस.

अश्विन :

 इथे घरचे लक्ष देईनात. तिथे शाळेतील शिक्षक काय लक्ष देणारं. हे काय गावाकडील शाळा आहे, शिक्षकांना रिस्पेक्ट द्यायला. इथली मुले जरा काही बिनसले की लगेच हाणामारी सुरू करतात.

तात्या आजोबा :

पुढे काय करणार आहेस?

 अश्विन :

 तेच काही सूचत नाहीये. प्रत्येक वेळी त्यांच्या तावडीतून सुटेनच असे नाही. व असे वाटते की नको हे, बास करावे सगळे.

तात्या आजोबा :

 शाळेचं काय करायचं ठरवलं आहेस?

 अश्विन :

 काय माहित.

( इतक्यात माधवी चहा घेऊन येते. व तात्या आजोबांना देत. )

 माधवी :

 तात्या चहा घ्या. जेवणाच बघते.

तात्या आजोबा :

 तू घेणार आहेस का चहा?

 अश्विन :

 नाही, … नको ….. तुम्ही घ्या.

( तात्या चहा पिऊ लागतात. )

Cut to ……

 …...... …… ….

Day / Ashvin HOME / dayning holl

( फोन वाजतो. जयवंत फोन उचलतो. अश्विनच्या शाळेतून असतो.)

 जयवंत :

 हॅलो सर , बोला

मुख्याध्यापक :

मी घाटपांडे सर न्यू हायस्कूल.

 जयवंत :

हा बोला, सर

मुख्याध्यापक :

अश्विनची तब्येत कशी आहे.

जयवंत :

 आता आहे बरी, उद्या चेकपला जाणार आहे.

मुख्याध्यापक :

 थोड येऊन जाताय का उद्या?

जयवंत :

 उद्या … आ… उद्या महत्त्वाची मिटिंग आहे माझी सर, मला नाही येता येणार. काही महत्वाचं असेल तर त्याच्या आजोबांना लाऊन देऊ का ?

मुख्याध्यापक :

 हो चालेल. तसेच अश्विनला ही पाठवा, जमत असेल तर.

जयवंत :

 उद्या चेकअप झालं की पाठवेन तसेच आजोबा सोबत येईल तो.

मुख्याध्यापक :

 ठीक आहे.

Cut to

…. …… …… ……

Day that time/ Ashvin HOME/ dayning holl

माधवी :

( टेबलवरील ग्लास मध्ये पाणी ओतत.)

काय म्हणत होते सर.

जयवंत :

 काय म्हणतील, अश्विन कसा आहे विचारत होते? उद्या शाळेत यायला जमेल का ?

माधवी :

 मग काय ठरलं.

जयवंत :

उद्या चेकपला नेतोय. तसंच शाळेत जाऊन या, उद्या गाडी ठेवून जातो. बाबांना सांगतो मी? माझी उद्या महत्त्वाची मिटिंग आहे. आधीच चार दिवस दांडी पडली आहे. उगाचच बॉस वाजवत बसेल.

माधवी :

 बर चालेल.

( ती नाष्ट्याची भांडी उचलून आत नेते. )

Cut to …..

…. …. …… ….


मराठी पटकथा : वीरगळ भाग २

मराठी पटकथा : वीरगळ भाग २

 ( माधवी फोन जवळ जाते. फोन घेते. फोन वर तिची सासू असते. )

सावित्री आई :

 हॅलो माधवी का?

माधवी :

 हो आई बोलतेय.

सावित्री आई :

 अग, काल जयवंत येणार होता ना.

माधवी :

 हो येणार होते पण ….

सावित्री आई :

 पण काय आणखीन.

( माधवी रडू लागते. )

सावित्री आई :

 रडायला काय झाले ग …

माधवी :

 काल आश्विन शाळेतून येताना काय माहित काय झालं. समुद्रकिनारी काही कोळ्यांना जखमी सापडला. देवी आईची कृपा म्हणून वाचला.

सावित्री आई :

 काय सांगतेस, असा कसा गेला तो व समुद्र किनारी गेला मग. जखमी झाला म्हणजे काय? आता कसा आहे तो?

माधवी :

 उपचार चालू आहेत. जरा पायाला मार लागलाय. मी विचारले परंतु काहीच सांगत नाही. व घाबरलेला आहे. दफ्तर कुठे आहे ते ही बोलत नाही. उगाचच आक्रस्ताळेपणा करतोय.

सावित्री आई :

 तू काल का फोन केला नाहीस. आम्ही आलो असतो ना? माझ्या पण ध्यानात नाही आलं. मला वाटलं ऑफिसच काम असेल म्हणून आला नसेल जयवंत.

माधवी :

 मी करत होते. पण फोन लागत नव्हता. व मग सगळी उस्तवारी करत वेळ गेला.

सावित्री आई :

 आता कसा आहे तो?

माधवी :

 आहे इथे बेडवर बसलाय टी व्ही पाहत.

सावित्री आई :

 जरा दे त्याच्याकडे.

माधवी :

 हा देते,

( माधवी फोन अश्विनला देऊ लागते. )

( आश्विन इशारा करून कोणाचा विचारतो. )

माधवी :

 आहे, सावित्री आईचा.

आश्विन :

( फोन घेऊन सुस्कारा टाकत )

हा बोल आज्जी.

सावित्री आई :

काय रे कसा आहेस ? तिकडे समुद्र किनाऱ्यावर कशाला गेला होतास ? व जास्त लागलंय का?

( आश्विन सुस्कारे देत रडू लागतो. )

सावित्री आई :

 काय रे काय झालं रडायला. बोल ना,

आश्विन :

 तू व तात्या आजोबा कधी येणार. या की प्लीज,

सावित्री आई :

 अरे , रडतोस कशाला? हे बघ आम्ही येतोय उद्याला.

काळजी करू नकोस.

आश्विन :

 हा, आईकडे देऊ.

सावित्री आई :

 हा दे.

( आश्विन आईकडे फोन देतो. )

सावित्री आई :

 हे बघ आम्ही येतोय उद्या तिकडे.

माधवी :

 हा

Cut to …..

…… ….. ..

Day /Morning / Ashvin HOME / inter

बेल वाजते. अश्विनची आई दरवाजा उघडते. दारात लहान मुलगा उभा असतो.

माधवी :

 काय रे,

मुलगा :

काय नाही, हे आशू दादाचं दप्तर द्यायला आलो होतो.

माधवी :

 तुझ्याकडे कसं काय?

 मुलगा :

 काल आम्ही शाळेतून येताना आश्विन दादाच्या मागे काही मुले लागली होती. तेव्हा त्याने आपलं दप्तर माझ्याकडे दिलं. व तो पळाला. त्याच्या मागे पाच सहा मुले मारायला पाठी लागली होती.

माधवी :

 काय? मग काय झालं.

मुलगा :

 मी अश्विन दादाला पुलाकडे जाताना पाहिलं. व ते पण त्याच्या मागे लागले होते.

माधवी :

 मग काय झालं?

 मुलगा :

 मी घाबरलो व घरी पळत आलो. मला काय सुचत नव्हते. आज आई म्हणाली कुणाच दप्तर आणलास, नेऊन द्यायचं नाही का?

 म्हणून मी ते द्यायला आलो. दादा कुठे आहे.

माधवी :

 बर झालं आलास ते, बस आत आहे तो, जा जाऊन बस दादा जवळ मी सरबत आणते.

( तो मुलगा अश्विनजवळ जाऊन बसला.)

मुलगा :

 कसा आहेस?

आश्विन :

 आहे ठीक आता, ये बस, क्रिकेट बघूया.

पत्ता कसा सापडला.

मुलगा :

 वहीवर होता ना तुझ्या, त्याच्या आधारे पाहत आलो.

( माधवीने सरबत आणला. तो पिऊ लागला.)

Cut to ……

…… ….. ….

Night / 8.30p.m. / outer inter

रात्रीची वेळ तात्या आजोबा म्हणजे तानाजीराव गाडी घेऊन येतात. सावित्री त्यांची पत्नी वाट पहात असते. एक जीप दरात येऊन थांबते. तानाजीराव गाडीतून उतरतात. डबा उघडल्याचा आवाज ऐकू येतो.

सावित्री आई :

 खूप वेळ झाला यायला.

तानाजीराव :

 काय करणार मळणी आटपायला नको.

सावित्री :

 झालं ना नीट सगळं 

( तानाजीराव बाहेरील बागेतील पाण्याची पाईप चालू करून हात पाय धूत.. )

तानाजीराव :

 होय झालं. जयवंत आला नाही.

सावित्री :

 अग बाई, सांगायचं राहिलंच की. अहो आश्विन शाळेतून येताना समुद्र किनाऱ्यावर गेला. व काय माहित कोण जाणे अपघात घडला. काही कोळ्यांनी आणून सोडला दवाखान्यात. त्याच गडबडीत जयवंत होता.

तानाजीराव :

 पोराच नुसत बावल करुन ठेवलंय यांनी. गाडीतील पिशवी आण. व फोन काढून दे इकडे.

( तानाजीराव फोन करतात. जयवंत फोन उचलतो. )

 तानाजीराव :

 हॅलो जयवंत.

जयवंत :

 हा बोल बाबा, आज ..

तानाजीराव :

( बोलण तोडत )

कळलय मला, बर फ्रॅक्चर वगैरे नाही ना.

जयवंत :

 नाही पण थोड दुखावलय.

तानाजीराव :

डॉक्टर काय म्हणाले?

जयवंतराव :

फ्रॅक्चर वगैरे काही नाही, फक्त पायाच स्नायू दुखावलाय फक्त. स्टापिंग केलंय. चार दिवसांनी दाखवायला या म्हणून सांगितलंय.

 तानाजीराव :

 फ्रॅक्चर नाही ना, मग देव पावला. तुम्हाला सांगत असतो मी नेहमी व्यायाम करत जा. व्यायाम करत जा. शरीर चपळ करा, ऐकताय कुठे, जरासं पडल की तुमचे हात पाय दुखावतात. नाजूक बाहुल्यासारखे झालाय नुसते.

जयवंत :

 तस नाही बाबा, मी सांगतो नेहमी त्याला व्यायाम कर, व्यायाम कर म्हणून, पण अभ्यास असतो ना त्यामुळे

तानाजीराव :

कारण सांगायला मस्त जमतात. मुलाने आदर्श घ्यायला बाबाने आधी कसरत करायला हवी. नाही का?

( इतक्यात मागून सावित्री )

सावित्री:

 गप, बसा हो, तुमच आपलं नेहमी असत, व्यायाम करा, व्यायाम करा, करतील ते. तुम्ही काय बघायला असता तिथे.

तानाजीराव :

इथेच चुकतं तुम्हा बायकांचं मुलाच्या प्रगतीतील लोडना आहात. नुसत्या.

सावित्री :

 काही लोडना वगैरे नाही हं,  त्या शिवाय का तो लाखभर पगार घेतोय?

तानाजीराव :

त्याचा ताला माला पाहून आठवीनंतर बाहेर काढला शिक्षणाला म्हणून, नाहीतर घरातच बसला असता तुझं कुकुल बाळ होऊन.

जयवंत :

( फोन वर)

 काय हे बाबा तुमचं पुन्हा सुरू झालं.

तानाजीराव :

तुम्हाला माझ्या बोलण्याच महत्व आज नाही समजणार, कळेल पुढे.

जयवंत :

( विषय बदलतो.)

बर, ते असू दे, मळणीच काय झालं. उद्या येतो मी.

तानाजीराव :

 उद्या बीद्या काय नको, तू तिथेच रहा. मी येतो. दोन दिवसात इकडंल आटपून.

जयवंत :

 बर चालेल.

( फोन ठेवला जातो. )

सावित्री आई :

 हे आणखी काय, मी तर माधवीला उद्या येताय म्हणून सांगितलंय.

तानाजीराव :

 इकडला पसारा लावतो नीट व जातो.

सावित्री आई :

 ते पडू देत. नातवापेक्षा महत्वाचं आहे का ते.

तानाजीराव :

 उद्या सगळी व्यवस्था लावतो. व रात्रीला निघतो.

सावित्री आई :

 हा चालेल.

तानाजीराव :

चला पाने वाढा आता, खूप भूक लागलीया.

सावित्री आई :

 हा, घेते वाढायला, सुमे ऐ सुमे

नोकरांनी सुमा :

 काय सावित्री आई?

 सावित्री आई :

तो लाडू खाऊन झाला असेल तर जेवायला वाढ.

सुमा :

 म्हातारीला गरुडाच डोळ लावल्यात की काय? जेवण खोलीतील सुद्धा दिसतं.

सावित्री आई :

 जेवण खोलीतील काही दिसत नाही. मघाशी लाडवाचा डबा उघडत्याला आवाज आला, त्यावरून ओळखलं जाताना त्यातले दोन लाडू पोरांना ने, नाहीतर एकटीच खाशील.

तानाजीराव :

किती बोलखल तिला?

सावित्री आई :

मीच म्हणून तिला ठेवलीय तिच्या पोरांकडे बघून समजलं नाहीतर ….

तानाजीराव :

नाहीतर काय?

सावित्री आई :

 माधवी असती तर केव्हाच हाकलली असती. चला आता जेवायला.

Cut to …….

…. ….. ……

Day / afternoon / 11o’ clock / Mumbai / Ashvin HOME

जयवंत कामावर जायच्या गडबडीत आहे. डायनिंग टेबलवर बसून नाष्टा करत आहे. माधवी त्याचा डबा आणून देते. आश्विन गॅलरीत उभा राहून बाहेरील गाड्यांची रहदारी पाहत आहे. माधवी नाष्टा आणून ठेवते.

माधवी :

 हा घ्या.

जयवंत :

 हा, आश्विन कुठे आहे?

माधवी :

 आहे गॅलरीत बसलाय.

( इतक्यात बेल वाजते.)

माधवी दार उघडते.

माधवी :

आ तात्या तुम्ही

तात्या आजोबा ( तानाजीराव ) :

हो काय करणार, अश्विनच कळल्यावर त्याची आजी कुठे थारा करू देते.

 माधवी :

  आई नाही आल्या.

तानाजीराव :

ती तयारच होती. पण शेताकडील गड्यांना भाकरी द्यायच्या होत्या. म्हणून मी म्हटलं तू थांब मी जाऊन येतो. बर ते सोड, आधी ही पिशवी घे पाहू.

( आपल्या हातातील बॅग व पिशवी माधवीकडे देत. )

माधवी :

 काय आहे यात?

तानाजीराव :

 शेतातील भाजी व लाडवाचा डबा आहे. बर आश्विन कुठे आहे?

माधवी :

 आहे गॅलरीत उभा राहून समुद्र पाहतोय.

 माधवी :

 आश्विन .. आश्विन ….. पाहिलस का कोण आलय ते.

क्रमशः पुढे ......

Thursday, September 18, 2025

मराठी पटकथा : वीरगळ भाग १

 I l श्री गणेशाय नमः l l

मराठी पटकथा : वीरगळ

Day / afternoon / Inter / 1.00o’clock

मुंबई शहरातील दादर मधील एक महाविद्यालयात इयत्ता नववी वर्गात सायन्सची तासिका चालू आहे. शिक्षक शिकवत आहेत. मुले नोट्स लिहून घेत आहेत. शेवट बेंचवर बसलेले समीर, जोसेफ, आरिफ व लाल्या दंगा करत आहेत. त्यांची कुजबुज चालू आहे. प्राध्यापक केशव भटनागर यांचे लक्ष जाते.

प्राध्यापक :

लास्ट बेंच, ओक अप.

( ते उठत नाहीत, पुनः करड्या आवाजात.)

प्राध्यापक :

 शेवट बेंच ऐकू येतंय ना,

जोसेफ : 

( हळू आवाजात )

आता लागली वाट.

समीर :

 बाकीच्यावेळी किंवड्याला ऐकू जात नाही. मात्र लास्ट बेंचवरल बर ऐकू जातं.

लाल्या :

सापाच्या कानाचा आहे म्हातारा, चला उभे रहा.

आरीफ :

आता याचं लेक्चर ऐकावं लागणार म्हणा.

चला उभे रहा.

( ते उभे राहतात. सर्व मुले त्यांकडे पाहू लागतात. सासू लागतात.)

भटनागर :

काय समीर या वर्षी नववी सोडवायची आहे ना. की बसायचं आहे याच वर्गात.

समीर :

माझी काय हरकत नाही.सर पण …..

( सर्व मुले हसू लागतात.)

भटनागर :

कीप क्वाईट

बर सांग एक साधा प्रश्न विचारतो.

आम्ल व आम्लारी यांच्यातील अभिक्रियेतून कशाची निर्मिती होते?

( ते खाली मान घालून उभे राहतात.)

भटनागर :

 काय जोसेफ बोल ना?

जोसेफ :

( खाली मान घालून )

यांना काय फक्त मीच दिसतो.का? सारखे प्रश्न मलाच विचारतात.

( वर्गात दुसरीकडून एक हात वर येतो.)

भटनागर :

 हा बोल आश्विन

आश्विन :

 सर , आम्ल व अम्लारी यांच्या अभिक्रियेतून क्षार निर्माण होतात.

भटनागर :

काय रे, लक्षात आलं का? एक साधा प्रश्न विचारला होता. त्याचं पण उत्तर येतं नाही.

समीर :

सर तुमच्या दृष्टीने तो साधा प्रश्न आहे. पण आम्हाला तो अवघड जातो. त्यापेक्षा वनस्पतीवर विचारा की मला तो धडा संपूर्ण पाठ आहे.

भटनागर सर :

 हो का मग सांग स्पायरोगायरा या वनस्पतीची फुले कोणत्या देवाला घालतात?

समीर :

( हळू आवाजात. तोंड वळवत.)

च्या मायला मी तर नवीनच हे फुलझाड ऐकतोय. या वनस्पतीची फुले …. …. फुले कोणत्या देवाला आवडतात. बर, गणपती लक्ष्मी,शंकर, हा भटनागर सर ….. हा सर गणपतीची पूजा करतात. त्यामुळेच हा प्रश्न विचारला असणार.

समीर :

सर सांगू …. गणपतीला वाहतात.

( सर्व मुले हसू लागतात.)

भटनागर सर :

 गप्प बस मुर्खा, कोण सांगतंय याचं उत्तर.

( अश्विन हात वर करून)

भटनागर :

 हा बोल आश्विन

अश्विन :

 सर स्पायरोगायरा एक शेवाळ आहे, ती एक अपुष्प वनस्पती आहे. तिला फुले कशी येतील?

भटनागर सर :

येतील ना या समीरच्या बुद्धीला आल्यासारखी.

( वर्गात हशा पिकतो.)

भटनागर सर :

 चला बाहेर जाऊन थांबा वर्गाच्या सर्व क्लास डिस्टर्ब केला नालायकांनी.

( ते तिघे वर्गाच्या बाहेर जाऊन उभे राहतात. बाहेर उभे राहिल्यावर )

आरीफ :

 हा आश्व्या स्वतःला लई शहाणा समजतो. याला जरा दाखवला पाहिजे हिसका.

जोसेफ :

 तर काय सर्वांपुढे घालवली अब्रु.

समीर :

 बघू याच्याकडे नंतर.

( बाहेरील व्हरांड्यातून इतिहास विषयाचे घाटपांडे सर जात असतात. ते तिघांना पाहून.)

 घाटपांडे सर :

 याही तासाला बाहेर का? भारी प्रगती आहे तुमची. प्रत्येक तासाला बाहेर . मग वर्गात असता कोणत्या तासाला.

जोसेफ :

असतो ना पी ई च्या तासाला. ग्राऊंडवर .

घाटपांडे सर :

 मग पी ई च्या विषयाचाच पेपर सोडवा. अन् होऊन दाखवा पास.

( घाटपांडे सर निघून जातात. इतक्यात बेल वाजते.)

Cut to …. …

….. .

Day / outer / ground - ३.३० o’ clock

( मुले ग्राउंडवर फुटबॉल खेळत आहेत. समीर आरीफकडे बघून इशारा करतो. फुटबॉल खेळताना ते अश्विनशी ती धक्का बुक्की करतात. अश्विनला पाय आडवा घालून पाडण्याचा प्रयत्न करु लागतात. अश्विन पडतो.  त्याला इतर मुले उठवतात. अश्विन  पुन्हा खेळू लागतो. खेळताना.)

आश्विन :

 आरिफ नीट खेळ, उगाच माझ्याशी मस्ती करू नको.

आरिफ :

खेळतोच आहे ना, खेळ म्हटलं की धक्का बुक्की होणारच.

( समीर जोसेफला इशारा करतो. बॉल मारायला आलेल्या अश्विनला मुद्दाम पाय घालून आडवा पडतो. आश्विन उठून पुन्हा खेळू लागतो. तर हे तिघे त्याच्याशी झोंबाझोंबी करू लागतात. त्यामध्ये वाद होतो. पी ई चे शिक्षक त्या तिघांना ग्राउंड बाहेर काढतात. )

आश्विन :

 जोसेफ उगाच का त्रास देतोयस. नीट खेळ, नाहीतर जा बाहेर.

जोसेफ :

 तुलाच खेळता येत नाही. उगाच आम्हाला कशाला बोलतोस.

आश्विन :

 लई शहाणा आहेस.

 आरिफ :

  तुझ शहाणपण फक्त वर्गातच काय घाट्या.

आश्विन :

 मी घाटी तर तू कोण चौपाटीचा ऑक्टोपस का ?

 आरिफ :

 ऑक्टोपस कुणाला म्हणतोस, घाट्या. थांब दाखवतो.

( त्यामध्ये भांडण लागते. बाजूला उभा असणारे पी ई चे सर येऊन त्यांना.)

पी ई चे सर :

चला बाहेर ग्राउंडच्या. मूर्ख कुठले?

आश्विन :

 सर माझी काही चूक नाही हा आरिफ व जोसेफ उगाच दादागिरी करत असतो. नेहमी.

पी ई चे सर :

 ते काही सांगू नका. व्हा बाहेर.

( ते बाजूला जाऊन उभे राहतात. ते तिघे त्याच्या जवळून जाताना. खुन्नस देत पाहत.)

लाल्या :

 शाळा सुटू दे मग तुला दाखवतो. हिसका.

( आश्विन त्याकडे पाहतो. )

Cut to … …… …

…… …… …….

Day / evening / Outer / on road Mumbai City

बेल वाजते. मुले बाहेर पडली. वाटेत आश्विन एका लहान मित्रासवे जाताना ती आपले काही टारगट मित्र घेऊन अश्विनला मारायला आलेत. आश्विनने आपले दप्तर शेजारील गणेशकडे दिले.

आश्विन :

तू जा मी येतो.

( आश्विन पळू लागतो. ते सर्व त्याच्या मागे लागतात. तो गल्ली बोळातून धावू लागतो. अरुंद पूल व रस्त्याने पळत तो समुद्र किनाऱ्यावर येतो. तो खूप दमलेला आहे. ते त्याला गाठतात. खूप बुकलतात. तो त्यांच्या तावडीतून सुटतो. व पळू लागतो. पळत समुद्र पुलावर येतो. ती त्याला गाठून पाण्यात ढकलतात.)

Cat to ….,

…… ….. …….

Night / outer /samudr kinara Mumbai

 आश्विन पोहत पोहत कसा बसा समुद्र किनाऱ्यावर येतो. तिथे तो काठावर येऊन बेशुध्द होऊन पडतो. काही कोळी पाहतात. व त्यास हॉस्पिटल मध्ये नेतात. त्याचा एक पाऊल दुखावलेला असतो. त्याच्या गळ्यातील शाळेच्या लॉकेटवर घरील फोन नंबर असतो. तो घेऊन नर्स कॉल करते.

नर्स :

 हॅलो, 

फोन वाजू लागला.

अश्विनची आई काम करत होती. रिंग ऐकून तिने फोन उचलला.

( नर्सने अश्विन बाबत माहिती सांगितली. आश्विनची आई तडक निघाली. )

Cut to ……

……. …….. …….

Night / inter / hospital

दारात कार थांबते. माधवी व जयवंत पाटील गाडीतून उतरून हॉस्पिटलकडे जात.

आश्विनची आई व बाबा हॉस्पिटल मध्ये येतात. ते काउंटर जवळ आल्यावर

आश्विन आई माधवी :

अश्विन कुठे आहे?

नर्स :

पुढे केबिन मध्ये

( ती तिकडे धावत जातात. वॉर्ड बॉय त्यांना थांबवतो.)

माधवी :

 मला भेटू द्या, आत माझा बाळ आहे.

वॉर्ड बॉय :

 आत ऑपरेशन चालू आहे. उगाच दंगा करू नका.

माधवी :

 अहो सांगा ना, एकदा पाहतो. त्याला पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही.

जयवंत :

 थांब, शांत हो. मी बघतो आधी,

( वॉर्ड बॉयला )

जास्त लागलं तर नाही ना? कशामुळे झालं हे?

 वॉर्ड बॉय :

 ते काही माहीत नाही आम्हाला, काही कोळी घेऊन आले होते. ते बघा तिथे आहेत

म्हणत होते. की समुद्र किनाऱ्यावर सापडला. श्वास चालू होता म्हणून उचलून इथे घेऊन आले.

माधवी :

 पाया पडते. आज तुमच्या रुपान अगदी देवच धाऊन आला.

कोळी :

 अस काय करतेस पोरी संकटात सापडलेल्याला मदत करण हाच खरा धर्म हाय. होईल बघ निट समद. आई एकवीरेची कृपा म्हणून सापडला. काही काळजी करु नकोस. थोड वरून पडल्यानं पाय दुखावला हाय. मला वाटत. पुलावरून पडला असावा. होईल नीट. बर आम्ही जाताव कामाला. रामराम.

( ते निघून जातात. )

जयवंत :

 आम्हाला पाहू तरी द्या?

वॉर्ड बॉय :

 होत आलंय. थोड्या वेळानं भेटू शकाल. तुमच नशीब चांगलं म्हणून बरं. नाहीतर काही खर नव्हतं

Cut to ……

….. ….. ….. ….

Night / inter / vard

आश्विन हॉस्पिटलमध्ये खाटेवर झोपला आहे. त्याच्या पायाला व डोक्याला बॅन्डेज बांधले जाते. त्याची आई माधवी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे. तो कण्हत असतो

 डॉक्टर तपासणी करायला येतात.

आश्विनची आई माधवी :

 डॉक्टर कधी शुद्धीवर येईल हो माझा बाळ.

डॉक्टर :

 येईल थोड्या वेळात. औषधांची गुंगी उतरेल.

माधवी :

 होईल ना हो नीट सगळं.

डॉक्टर :

 काळजी करू नका. हाड काही मोडल नाही. थोड दुखावलं आहे. स्ट्यापिंग केलंय, या काही गोळ्या औषध लिहून देतोय त्या द्या होईल नीट. परत आठ दिवसांनी आणा पुन्हा  चेकपला.

जयवंत :

 काही सिरियस नाही ना.

डॉक्टर :

 नाही. पण उंचावरून हा पडला आहे. असे प्राथमिक तपासणीत जाणवते. जरा काळजी घ्यावी लागेल.

जयवंत :

 हा घेऊ काळजी.

Cut to …....

…… …… …. ……

Night / Ashvin HOME / inter room

आश्विन बेडवर विश्रांती घेत आहे. समोर टी व्हि चालू आहे. माधवी स्वयंपाक घरातून खीर घेऊन येते. व चारवू लागते.

आश्विन :

 ठेव ग मी खाईन.

माधवी :

 नको चारते मी.

आश्विन :

 अग खातो म्हटलं ना नंतर. मी काय लहान बाळ नाही.

माधवी :

 अस म्हणतोस तर ठेवते. खा नंतर.

बर मला सांग तिकडे पुलाकडे काय करायला गेला होतास.

आश्विन :

 काही नाही.

माधवी :

 काही नाही कस. रोज शाळेतून थेट घरी येणारा तू अस काय झालं की पुलाकडे गेलास. व खाली पडलास.

( अश्विनच्या डोळ्यासमोर सगळा प्रसंग उभा राहतो. तो काहीच बोलत नाही. घाबरलेला असतो. माधवी पुन्हा विचारते.)

अश्विन :

तुला कशाला हवे. सोड तो विषय.

माधवी :

 सोड कस.

आश्विन :

 मला सांगायचं नाही.

माधवी :

 ते काही नाही मला सांगच .

 आश्विन चिडतो. व ती खिरीची डिश फेकून देतो.

( आवाज ऐकून बाबा आत येतात. )

जयवंत :

 आश्विन काय चाललंय,

 आश्विन :

 मग काय करू,  काल पासून सारखं विचारतेय काय करायला गेला होतास म्हणून. एकदा सांगितलेलं हिला समजत नाही का? का सारखं तेच तेच.

माधवी :

 अरे मी सरळ..

जयवंत :

( बायकोच्या खांद्यावर हात ठेवून)

 उगाच त्याला त्रास देऊ नकोस. बघू. आश्विन तू गोळ्या घे. व विश्रांती घे.

बर मी येतो. उशीर होतोय मला.

जयवंत कामावर जातो. माधवी स्वयंपाक खोली आवरू लागते. इतक्यात फोन वाजतो.

क्रमशः पुढे .....











Friday, August 22, 2025

फ्रेंडशिप एक साहस भाग २२

 फ्रेंडशिप एक साहस भाग २२


( आरशात पहात)

सतिश :

 काय रे बीट्ट्या गावात नविन पाखरं दिसाय लागल्यात.

बिट्ट्या :

 व्हय र, नविनच आहेत. पावन्या हाईत वाटतं.

सतीश :

काय र सूरज ओळख करून घेऊया काय?

 सूरज :

 घेऊया की तेवढंच आपल जमलं तर जमलं रवी सारखं.

सतीश :

 तस बघायला गेलं तर रव्यान चांगलच पाखरू पटकावलं.

बिट्टू :

 तो रव्या काय पटकावतोय  , मामा मुळेच घडलं समद. नाहीतर ती आरोही याला कसली भीक घालतेय.

सूरज :

 मग आपणं पण बघू की

सतीश :

मग चला तर.

( त्या गाडी जवळून जाताना)

सतीश :

 राम राम पावनी बाई, कुणीकडे चाललाय म्हणायच्या?

मानसी :

 आरोही गोडांबे माहीत आहे का, आम्हीं त्यांच्याकडे आलोय.

सतीश :

 आरोही वहिनीच्या तुम्ही कोण? म्हणजे पावन कोण अस म्हणायचं होतं.

माधवी :

आम्ही तिच्या मैत्रिणी आहोत.

बीट्ट्या :

 मग काय लईच भारी. वहिनीच्या मैत्रिणी काय आमच्याच मैत्रिणी.

सुरज :

बघतोस काय बिट्टू पावण्या लांबून आल्यात. सिटीतनं, पाय भाजत असतील बिचाऱ्यांच बसवा गाडीत त्यांना.

माधवी :

 नको नको त्याची काही गरज नाही.

बीट्ट्या :

 नाही कसं, आमच्या गावात आलाय थोडा तरी पाहुणचार करु द्या की आम्हाला.

सतीश :

बोलत काय बसलाईस, उचल बॅगा अन् टाक गाडीत. बसा पावनी बाई.

( त्या गाडीत बसल्या. श्वेताला वागणं खटकल होत. पण तिने बाकीच्यांना गप्प रहाण्याचा इशारा केला. गाडी निघाली.)

 

सतीश ( आरशात बघत)

 बीट्ट्या, पावणीबाई कुठल्या गावच्या म्हणायच्या.

 बीट्टू :

 आव कॉलेजला हाईत, कोल्हापूरकडल्या असतील.

सतीश :

आपल्याला कोल्हापूर लई आवडत राव. काय ते शहर, काय तिथंल जेवण, काय वातावरण लई भारी राव. अन् …

सूरज :

 अन् तिथल्या लवंगी मिरच्या पण मस्तच असतील.

( ते हसू लागतात.)

सतीश :

 बर पावनी बाई, गाव कसा वाटला?

मानसी :

 आधी बघतो तरी, अजून येऊन टेकलो पण नाही. मग काय सांगणार….

 बीटटु :

ते पण खरंच आहे म्हणा.

बीटटू :

 मग असल की चार पांच दिवस मुक्काम.

माधवी :

 चार पाच दिवस नाही. एक दोन दिवस आहोत.

बीटटू :

 अस कस हे, आव् जरा बघा गाव हे, एकदा बघितल्यासा तर पुनः जायचं नाव काढायच्या नाहीसा.

श्वेता :

 बर बघू, आधी लग्न तरी होऊ द्या.

सतीश :

 कुणाचं?

श्वेता :

 कुणाचं म्हणजे आरोहीच आणखी कुणाचं?

बीटटू :

 आरोहीच होय, मला वाटल …

श्वेता :

 काय वाटलं.

बीटटू :

 काय नाही..... काय नाही....

( श्वेता रागाने पहाते. तो ओशाळतो, जिप गावात येते. एका वाड्यासमोर थांबते.)

सतीश :

 हा आला तुमचा मुक्काम …उतरा खाली.

( त्या खाली उतरतात. आत वाड्यात जातात. तिथे अनेक जण आपापल्या कामात होती. आरोहिचा मामा, मित्र व रवी बसलेले होते. अंगणात अरोहिच्या मैत्रिणी पाहून )

आरोहीचे मामा :

 राम राम मानसी मॅडम, तुम्ही आलात बरं झालं, अन् ह्या कोण?

 मानसी :

या माझ्या मैत्रिणी ही श्वेता अन् ही माधवी.

सतीश :

 मामा पाहुण्या पोहचवल्यात काळजी घ्या.

मामा :

तुमच्या सारखी दोस्त मंडळी असताना कशाला काळजी करू. बर आता गाव फिरणं थांबवा अन् जोडीदाराला घोडीवर बसवायच्या तयारीला लागा.

सतिश :

 आम्ही आहोतच मामा, जरा आम्हाला पण घोडीवर बसवायची तयारी करा.

मामा :

पुढचा नंबर तुमचाच आता.

मानसी :

 मामा आरोही कुठे आहे?

मामा :

असल आत खोलीत, जावा जरा. फ्रेश व्हा, विश्रांती घ्या. दमला असाल.

( त्या  तिघी आत जातात.)

Cut to …

Day /Inter /Arohi  mama home

 आरोही पलंगावर बसली आहे. ती नाराज आहे.   रडू लागते. तिची आई शेजारी बसलेली आहे.

आरोही आई :

 हे बघ आपल्यावर मामाचे उपकार आहेत. तो काही शत्रू नाही.

आरोही :

 तर लई मोठा हितचिंतक आहे. म्हणून मला मेहूनीच्या त्या बेवड्या पोराच्या गळ्यात बांधतोय.

आई :

 तो एकुलता एक् व श्रीमंत आहे. तू सुखात राहशील.

आरोही :

 त्याच्या पहिल्या बायकोला दिलं ना सुख त्यानं, मग का उडी घेतली विहिरीत तीन.

आई :

 तुझ्या बाबत अस काही होणार नाही.

आरोही :

 होणार नाही, म्हणून हा बिजोरा पाहिलास. मी स्पष्ट सांगून ठेवतोय तुला मला त्याच्याशी लग्न करायचं नाही.

आई :

 गप्प बस , कोणतरी ऐकेल.

( मानसी व श्वेता तिथं येतात.)

अरोहीची आई :

 तूच सांग आता समजावून.

मानसी :

 तुम्ही जा बाहेर मी समजावतो तिला.

(आरोही मानसीला मिठी मारते. व रडते. माधवी व श्वेताला पाहून चकित होऊन काही बोलणार इतक्यात मानसी तिच्या तोंडावर हात ठेवत.)

 मानसी :

 गप बस. आम्ही तुला या पिंजऱ्यातून सोडवायला आलोय.

उगाचच दंगा करु नकोस. एक माझं.

( मानसी तिच्या कानात कुबुजत.)

आरोही :

 अंग पण इथे कडक बंदोबस्त आहे.

मानसी :

 तू गप्प ग, …. तू फक्तं फ्रेश रहा. शंका येऊ देऊ  नकोस.

 ( आरोही फ्रेश राहण्याचे नाटक करू लागते, दिवसभर मेहंदी झाली. साखरपुड्याचे वेळी तयार होताना.)

आरोही :

 श्वेता तुला या पेहरावात पाहून हसू येतय.

श्वेता :

 का ग.

आरोही :

 तुला नेहमी पुरुष पेहराव्यात पहायची सवय झालीय. ना.

श्वेता :

 त्यात काय? हळूहळू होईल या पेहराव्याची देखील सवय.

आरोही :

 काही म्हण, तू त्याच कपड्यात मस्त दिसतेस.

बर, सॉरी ह … मी तुमच्याशी नेहमी भांडतच राहिले.

माधवी :

 सोड ग तो विषय आता पुढे जाऊ.

( रविचे मित्र अधून मधून लाईन मारण्याचा प्रयत्न करतात. संध्याकाळी हळदीचे जेवणं असते. गोड खीर केली जाते. श्वेता त्या खिरीत गुंगिच औषध नजर चुकवून टाकते. ती त्या तिघींनी जाऊन सांगते.)

 श्वेता :

 काही झालं तरी खीर खावयाच नाही.

Cut to .......

….. ….. …..

Night / inter / home

(लोक जेवू लागतात. जेवल्यावर सर्वांना झोप येते. श्वेता प्राजक्ताला मीस्क्वाल  देते. प्राजक्ता गाडी घेऊन गावाबाहेर अड वाटेला मैत्रिणीसोबत येते. हॉर्न करते. या तिघी झटपट आवरून बाहेर पडतात. रवी व त्याच्या मित्रांनी खीर खाल्ली नाही. ते दारु प्यायलेले असतात. हॉर्न ऐकुण ते उठतात. बिबट्या त्या   चौघिंना पळताना पाहतो. )

बीट्ट्या :

 अरे भावांनो उठा लवकर. वहिनी पळाली.

( ते उठून मागे लागतात. गावाबाहेर झटापट करून त्या निघतात. रवी व त्याचे मित्र गाडी घेऊन मागे लागतात. वाटेत आश्विन आपली गाडी आडवी घालतो. त्याच्याशी फाईट करतो. तोपर्यंत प्राजक्ता व मैत्रिणी अरोहिला घेऊन जातात.. व आश्विन रवी व त्याच्या मित्रांना हरवून.गाडी घेऊन निघतो. रवी पाहतच राहतो.)

……….. ……..

Day / morning / inter / home

 मामा व घरातील सर्व बसलेले आहेत.

रवी :

 सोडणार नाही त्यांना.

 मामा :

 गप बस, पहिली नांदवता आली नाही, अन् दुसरीची स्वप्न बघतोय. पोरीच्या मनात नाही, तर उगाच जबरदस्ती कशाला. बघू दुसरी एखादी. कमल इकडे ये.

एक् काळी मुलगी येते.

मामा :

 बघ चालती का?

 रवी :

 त्यापेक्षा मी बिन लग्नाचा राहीन. तो रागाने आत जातो.

मामा :

 काय नवाबी नखरे. बस तसाच मग

 …… …… …….

Next day / Cort / inter

 जज्य समोर आरोही व राजेश चे कोर्ट मॅरेज होते. व सगळे जल्लोष करतात. प्राजक्त व आश्विन एकमेकाकडे पहात हसतात.

समाप्त


फ्रेंडशिप एक साहस भाग २१

फ्रेंडशिप एक साहस भाग २१

 Day / outer / tent parisar

मुली पॅकिंग करत आहेत. पोलिस व्ह्यन आली. फौजदार उतरतो.

फौजदार :

 अभिनंदन

 श्वेता :

 कोण होते ते.

इन्स्पेक्टर :

तुमचे प्रथम अभिनंदन करतो. खूप दिवसापासून या परिसरात मुलींच्या मिसिंग केस मध्ये या मुली कुठे जातात. हे शोधत होतो. आज तुमच्यामुळे आम्हाला या मुलींचे अपहरण कर्ते सापडले. आज शिवजयंतीच्या दिवशी आपण स्वराज्यातील मावळ्यांचे काम केले. याबद्दल अभिनंदन. तुम्हाला या कामांबद्दल लवकरच बक्षीस देऊ. बर येतो आम्ही. आमच्यावर आज बंदोबस्ताची मोठी जबाबदारी आहे. काही मदत लागल्यास कळवा.

प्राजक्ता :

 हा कळवतो.

(पोलिस गाडी निघून जाते.)

Cut to …….

……. …… …

वेदिका :

 काय करायला आलो, व काय घडतंय?

अनुजा :

 अंग आता कुठे सुरवात आहे. आयुष्यात अनेक चढ - उतार आहेत अजून…

माधवी :

जर प्राजक्ता सावध झाली नसती तर ….

श्वेता :

 तर असता एका अरबाच्या घरात क्याब्रे डान्स करत.

प्राजक्ता :

 छत्रपती शिवरायांनी आपल्याला सांगितलच आहे. की आपल्याला खरा धोका हा समुद्र मार्गे आहे म्हणून. व आज मला ते पटू लागलंय.

वेदिका :

 पोलिसांच्या हवाली करण्यापेक्षा त्यांना आपण चांगलीच अद्दल घडवायल हवी होती.

रेवा :

झोपेत असताना भ्याड हल्ला करतात. जागी असताना या म्हणावं. दाखवला असता इंगा…

प्राजक्ता :

 त्यासाठी आपली झोप पण सावध हवी.

श्वेता :

 झोपेपेक्षा नजर सावध हवी. काल त्याबाबत बोलले होते. तेव्हाच लक्ष द्यायला हवं होत….

प्राजक्ता :

 आम्हाला काय माहित हे बोके शिकारीला टपून बसले आहेत.

माधवी :

शिकार करायला आले अन् स्वतःच शिकार झाले.

सुमा :

 मला तर काहीच सूचत नाहीये.

प्राजक्ता :

(आश्विन जवळ जात.)

माफ करा मला, तुमच्या विषयी गैरसमज झाला होता.

 ( त्याच्या हाताला लागलेलं पाहून )

 अरे हे काय, तुमच्या हाताला लागलेय.

रेवा फर्स्टटेड बॉक्स आण,

( रेवा बॉक्स आणते. प्राजक्ता स्वतः मलम पट्टी करते.)

श्वेता :

 ये सोडा आता विषय, आपल्याला गड चढून राजांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत.

प्राजक्ता :

 पण त्या आधी जिजाऊ मातांचे घ्यायला हवेत. कारण आज त्यांच्या या वाड्याने आम्हाला आत्मनिर्भर बनवले.

माधवी :

 चला तर मग

Cut to …..

…… ……. …..

Day / outer / raygad parisar

मुली जिजाऊ समाधीचे दर्शन घेतात. त्यानंतर गडाकडे जातात. पहिल्या पायरीला वंदन करून आशीर्वाद घेतात. व एकमेकींच्या हातात हात  घेऊन उभा राहतात.

श्वेता :

 मग काय ठरलं, गडावर रोपवेने जायचे की पायऱ्या चढून.

प्राजक्ता :

 पायऱ्या चढून.

 सर्वजनी एकदम

 छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव घोषणा देत. पायऱ्या चढू लागतात.

Cut to ……

……. …. …….

Day / outer / raygad

गडाचा मुख्य प्रवेशद्वारावर आल्यावर

श्वेता :

 काय प्राजक्ता, आलो ना गडाच्या मुख्य दरवाजा जवळ.

प्राजक्ता :

 माझा अजून ही विश्वासचं बसतं नाही.

वेदिका :

 इथं पर्यंत आलोय म्हंटल्यावर एक शेल्पी तर झालीच पाहिजे.

माधवी, अनुजा :

 हो तर झालीच पाहिजे.

श्वेता :

 चला तर मग घेऊयात.

( त्या शेल्फ घेतात. व पुढे जातात.)

Cut to …..

…. ….. ….

Day/ outer/ raygad

वाटेत असणाऱ्या पाण्याच्या छोट्या झरीवर. प्राजक्ता पाणी पिऊ लागते.

रेवा :

अंग, थांब मी बिसलेरी आणलिये.

प्राजक्ता :

 ये गप्प..

( ती तेथील एक पान लावते. व पाणी पिऊ लागते. वेदिक फोटो काढते.पाणी पिल्यावर. )

प्राजक्ता :

फोटो कशाला काढलास.

अनुजा :

तुझ्या घरी पाठवायला.

प्राजक्ता :

 वेदे उगाच नाटकी करु नकोस. सारखं ते बिसलेरीच पाणी पिऊन पिऊन कूकुल बाळ व्हायची पाळी आलीय. गप इथे तरी मोकळे जगू द्या.

वेदिका :

 नको प्राजू बाळ ते पाणी पिऊ नकोस. तुला सर्दी होईल, पोट दुखेल, डॉक्टरला बोलवावे लागेल.

प्राजक्ता :

 वेदे फोटो डिलीट कर, नाहीतर टकमक टोकावरून ढकलेन बघ.

श्वेता :

 अन् तरीसुद्धा घरी कळलं तर.

प्राजक्ता :

 घरी कोण सांगतंय. कोण तु की तू हा, ड्राइव्हर काका तर खाली आहेत. ते काय सांगणार. हा सुमन तू सांगणार…., हे बघ सुमे यातलं एक जरी सांगितलस तर याद राख. तुझ प्रेम प्रकरण सगळ्या कोल्हापूरभर करेन.

सुमन :

 मी काही नाही सांगत, पण तेवढं गुपित ठेवा.

श्वेता :

 काय सुमा , काय भानगड ….

सुमन :

 काही नाही ….

( त्या हसू लागतात.)

Cut to …..

….. ….. …..

Day / outer / raygad

( शिरकाई देवी मंदिर, बाजारपेठ , हत्ती तलाव परीसरात त्या येतात.)

सुमन :

 काही म्हणा, शिवरायांच्या प्रत्येक गडावर पाण्याची सोय आहे.

प्राजक्ता :

 हे अगदी बरोबर बोललीस. पण ही निसर्ग निर्मित नाहीत , विचार करून बनवली आहेत.

( त्या पुढे जात असतात. मागून आश्विन येतो. )

 आश्विन :

 काय यार, आम्हाला मागेच ठेवून आलात.

प्राजक्ता :

 आम्ही प्रतिज्ञेने येवढे भारावून गेलो होतो. की लक्षातच नाही राहिलं.

रेवा :

 चला जाऊया पुढे….

Cut to ……

…… ….. ……

Day / outer / holicha mal raygad

( छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करतात.)

रेवा :

 हा भाग सपाट व विस्तृत आहे ना.

वेदिका :

 हे होळीचे मैदान आहे.

रेवा :

 काय.

वेदिका :

 इथे होळी पेटवत. व पेटत्या होळीतून जो नारळ काढून दाखवेल त्यास सोन्याचं कड दिले जायचे.

माधवी :

 आजच्या पोरांना सांगितल. तर..

प्राजक्ता :

 कडं राहु दे, माझे हात भाजतील असे सांगतील ते.

आश्विन :

 आम्हाला कमी समजू नका. आमच्या पण धमण्यात सळसळत रक्त आहे. आम्ही सुद्धा काढू शकतो. होळीतून नारळ.

प्राजक्ता :

उगाचच वावड्या उठवू नकोस.

अश्विन :

 बघ आजमावून.

प्राजक्ता :

 हो का, तू नारळ काढायला जाऊन हात भाजायचा. अन् तुझ्या घरचे पोराचा हात भाजला म्हणून आम्हाला शिव्या घालायचे.

आश्विन :

मी तयार आहे. नारळ काढायला. पण मलाही सोन्याचं कडं बक्षीस हवं.

प्राजक्ता :

 सोन कसं आहे. हे तरी माहीत आहे का?

आश्विन :

 माहित आहे की.

वेदिका :

 ये बाबा, तुझी ती होळी पण नको, अन् नारळ ही.

तुझ्या एकाच्या कड्यात. आमच्या लग्नाचे दागिने होतील.

अमित :

 पैज लावायला पण जिगर लागते.

श्वेता :

 ओ जिगरवाले. लई बोलू नका. एवढी जिगर आहे ना, तर जावा टकमक टोकावरून उडी टाका जावा. बघतो आहे का जिगर.

अमित :

 तू घे की, मी सुध्दा बघतो. तुझी हिम्मत.

श्वेता :

 मी घ्यायला तयार आहे. काय पैज देणारं बोल.

अमित :

 देईन की तुला सोन्याचं कडं.

वेदिका :

 ए श्वेता उगाचच मोठ बोलू नको, हाडे तरी मिळतील का?

श्वेता :

 तु गप ग, जरा, मी उडी टाकाय तयार आहे. पण माझी एक अट आहे.

अमित :

 ती कोणती?

श्वेता :

 मला प्यारागायडींग आणून दे. मारतो उडी बघ.

उत्कर्ष :

 अशी उडी काय आम्हालाही मारता येते.

श्वेता :

 मग मार की. आम्ही कुठे नको म्हणालो.

( सर्वजण हसू लागतात.)

Cut to …..

 DAY / outer / rajwada parisar raygad

सर्वजण पाहात राजवाडा परिसरात येतात. मुजरा करतात.

वेदिका :

 आपले प्रेरणास्थान.

प्राजक्ता :

 जगाच्या पाठीवर मानाने जगण्याचं बळ, स्फूर्ती देणारा  इतिहास आपल्या राजांचाच आहे.

श्वेता :

 मग पुनः मुजरा झालाच पाहिजे.

( त्या वाकून मुजरा करतात.)

आश्विन :

 फक्त मुजरा नको, तर काहितरी प्रेरणा घ्या. काहीतरी बनून दाखवा.

रेवा :

 हो का, तू काय होणार आहेस.

आश्विन :

 मी आहे मराठा वीर सरदार.

प्राजक्ता :

 मग सदरा व धोतर कुठे गेलं. शर्ट व प्यांट दिसतेय अंगात.

आश्विन :

 सदर व कोटाचा जमाना गेला.

श्वेता :

हो का.

 चला अजून पुष्कळ पहायचं आहे.

( राणीवसा, सदर, धान्यकोठारे  , जगदीश्वर मंदिर अशी बरेच ठिकाणे पाहत आहेत.)

Cut to ……

…… …… …….

Day / outer / raygad

( शिवराय समाधी जवळ आल्यावर त्यांनी फुले वाहिली व नमस्कार केला.)

Cut to …....

 …… ….. …….

Day / outer / tent place

( त्यांनी सर्व साहित्य पॅक केल आहे. रेवा फोटो सेंट करते. )

Cut to …..

…… …… ……

Day / outer / hotel

( हॉटेल मध्ये त्या आल्या आहेत. जेवत आहेत.)

अनुजा :

खूप गरम होतंय नाही. भूक पण जाम लागलेय.

( त्या जेवू लागतात.)

( रेवा मोबाईल मध्ये मेसेज पाठवत असते.)

श्वेता :

 रेवा जेव, काय करतेस.

रेवा :

 फोटो पाठवतेय.

श्वेता :

 कुणाला.

रेवा :

 कुणाला म्हणजे त्या बिनडोक आरोहिला. व तिच्या लोमड्या मैत्रीणीना.

श्वेता :

 ते पाठवायला हवंच का?

रेवा :

 अरे वा, कळायला नको का त्यांना.

आम्ही गड सर केला ते.

वेदिका :

 पाठव तिला व फोन कर …

(रेवा फोटो सेंट करते. व कॉल करते. रिंग वाजते पण कोण उचलत नाही. दोन तिन वेळा करते. पण कॉल उचलला जात नाही.)

रेवा :

 उचलत नाही.

 वेदिका :

 कशी उचलेल. नाव पाहिलं असेल, ट्रू कॉलरवर.

अनुजा :

 मग तन्वी नाहीतर मानसीला लाव.

( मानसीला फोन लावते. बिझी येतो.)

रेवा:

 नेटवर्क बिझी येतेय.

माधवी :

 तन्वीला लाव.

( तन्वीला फोन लागतो. ती उचलते.)

तन्वी :

 हॅलो कोण?

रेवा :

 लागला, लागला…

वेदिका :

 आण इकडे ….

वेदिका :

 हॅलो कोण तन्वी का?

 तन्वी :

 हो, आपणं कोण?

वेदिका :

मी वेदिका काटकर बोलतेय.

तन्वी :

 बोल काय काम आहे?

वेदिका :

तुझी मैत्रीण फोन उचलत नाही, म्हटल तुला कळवाव.

 तन्वी :

 काय ते?

वेदिका :

 आम्ही रायगड चढून उतरलो म्हणून सांग तुझ्या त्या नकचडी अरोहीला. व खोटं वाटत असेल तर फोटो पाठवलेत बघ म्हणावं प्रत्येक ठिकाणचे. लई मोठं बोलत होती ना, प्राजक्ताला. एखादा गड चढून दाखव म्हणून.. दाखवला तिने आता तू तुझं बघ म्हणावं…..

तन्वी :

 ये गप्प, हे बघ वेदे तुझं अती होतंय. काय गड चढला, गड चढला, व उतरला. म्हणजे उपकार केले नाहीत अरोहीवर व आमच्यावर. तो चढायसाठी जी तयारी केलीय ना ती आरोहीमुळेच. नाहीतर मळगळलेल्या.  त्या बाहुलीकडून काय झालं असत. तिच्या अंतरप्रेरणेला काडी अरोहीने लावली. म्हणून तुम्ही चढलात तो गड, नाहीतर अजूनपर्यंत अंथरुणात लोळणाऱ्या तूम्ही तिची काय बरोबरी करणार. व राहता राहिला अरोहिचा प्रश्न, तर एवढं लक्षात घे की जी तुम्हाला चिडवून चेतना देऊन गेली. ना, तिचं लग्न लावताहेत येत्या चार पाच दिवसात ते ही त्या बिनडोक गुंडांशी, तुला काय ग त्याचं. ज्याचं जळत त्यालाच कळतं, चार पैशाची बिदागी काय नाही दिली तूम्ही इतकं पाण्यात बघताय तिला. लाज वाटली पाहिजे. आपल्या वर्गातील होतकरू अरोहीस त्या गुंडांशी लग्न करावं लागतंय. अन् तुम्ही तमाशा पाहात हसता,. तिला फोन करुन त्रास देऊ पाहताय. शेम ऑन यू, परत फोन करु नकोस,   ठेव बिनडोक ….

( फोन ठेवल्या नंतर )

रेवा :

 काय झालं ग, काय म्हणाली, चिडली का?

वेदिका :

 हो खूपच, आपल चुकतंय.

प्राजक्ता :

 काय झालं?

वेदिका :

 अरोहीच जबरदस्ती लग्न लावताहेत ते पण एका गुंडांशी. या चार पांच दिवसात.

माधवी :

 तिला तसच पाहिजे, चांगला दारु पिऊन बडवणारा मिळाला ते बरं झालं.

वेदिका :

गप्प बस, तिने डिवचलं म्हणून आपण अभ्यास केला, चांगले मार्क्स काढले. शरीर क्षमता विकसित केली, व आज जे त्या गुंडांना पकडुन देण्याचे आपणं धाडस केले व गड सर केला ना, ते कुणामुळे झालं, आरोही मुळे, आपल्यात आत्मविश्वास पेरण्याचे काम तिने केले. जसे शिवराय सांगत प्रत्येक मावळा हा शिवाजी आहे. तसेच आपल्यात शिवराय निर्माण करणारी शिवाजी ती आहे. व आपला हा शिवाजी आपण त्या जुलमी मामाच्या ताब्यातून सोडवून आणण्याचे काम आपणं केलं पाहिजे.

प्राजक्ता :

हो खरचं, आहे, तिन डिवचल म्हणून आपण पेटून उठलो व घडलो.

रेवा :

 मग काय ठरलं.

श्वेता :

 अरोहीला सोडवायची व तिच लग्न लावून द्यायचं. ते ही तिच्या आवडीच्या मुलाशी.

प्राजक्ता :

 मग चला तर… पुढचं मिशन आरोही गोडांबे.

( त्या जेवणं करतात. व गाडीत बसून निघतात. )

Cut to ……

….. ……

Day / inter / Tanvi home

तन्वीच्या घरी बाहेरील हॉल मध्ये सर्व बसले आहेत.

चहा घेत…

श्वेता :

 आरोहीच लग्न केव्हा ठरलं?

तन्वी :

 लग्न कसलं, जबरदस्ती आहे नुसती. मामाच्या उपकराखाली दबलेली काय करेल बिचारी.

प्राजक्ता :

 उपकार कसले, मामाचे कर्तव्य आहे ते. अन् जरी असले तरी काय ,मनाविरुद्ध लग्न करायचे.

तन्वी :

 मग काय करेल बिचारी.

रेवा :

अग पण तिचं पुढल्या ब्याचच्या राजेशवर प्रेम होते ना.

तन्वी :

 तो काय करणार, तिचा मामा आधी गुंड आहे. एकदा त्या दोघांना पाहिलं त्यानं, दुसऱ्या दिवशी होता हॉस्पीटलमध्ये.

प्राजक्ता :

 लग्न कुठे आहे?

तन्वी :

 उंबरणीला, चोवीस तारखेला, तिच्या मामाच्या गावी.

श्वेता :

 बघू कसं लग्न होतंय ते, चला लागा तयारीला.

( त्या कुजबुज करतात. व योजना आखतात.)

Cut to ….

….. ….. …..

( सर्व जनी निश्चय करतात. अश्विन व त्याच्या मित्रांना ही बोलावतात. मानसी ही येते. व ती सर्व उंबारणीला निघतात.)

…. …. …….

Day / outer / road

बस उंबर्णी स्टॉपला थांबते. मानसी, श्वेता , माधवी मेकपच साहित्य घेऊन उतरतात.

माधवी :

 माहित आहे ना तुला,

 मानसी :

 हो मी आले होते. या आधी एकदा यात्रेत जेवायला.

 श्वेता :

 चला तर मग …

( चैताचा महिना असतो, सगळी शेते उजाड असतात. झाडांना पालवी फुटली आहे. वाट छोटी असते. तिथे जवळ बांबूचे बेट पुढे वाटेला लागते. त्या पुढे एक पाटी आहे. त्यावर उंबार्णी दोन किलोमीटर असे लिहिले आहे. उन वाढलेलं असल्याने. मानसी डोक्यावर ओढणी घेते व चालताना हसू लागते.)

श्वेता :

दात काढायला काय झालंय?

मानसी :

 दात काढू नाहीतर काय करू? तुला कधी पंजाबी ड्रेस मध्ये मी पाहिली नाही ना, कायम ट्रॅक सूट घालणारी अवघडल्यासारखं वाटत असेल.

श्वेता :

 हो तर, खूपच वाटतंय.

( एक जीप जवळून पास होऊन थोडं पुढे जाऊन थांबते. )

माधवी :

 ये गप बसा ग.

( त्या पुढे चालू लागतात.)

क्रमशः.....


वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...