लिफ्ट
| लिफ्ट |
पाटगावकडून तालुक्याला जाणारा रस्ता गावातील एका घरातील मुलगा, अंघोळ करून नीटनेटके कपडे घालून डोळ्यावर गॉगल घातलेला केसांवर कंगवा फिरवून कोमडा स्टाईलने भांग पाडून आपल्या मित्राला फोन करतो व सांगतो की आवरून तयार हो
“अरे रम्या जाऊया का तालुक्याला?”
“जाऊया की सच्या मला पण काम नाही शेतातल, आवरतो दोन मिनिटात.”
थोड्याच वेळात बेलबॉटम पँट घातलेला सचिन दारात टू व्हीलर हिरो गाडी घेऊन हजर होतो.
“आवरल का रे.”
घरातील आरशात केस विचरत, “आवरल की थांब आलोच.”
रमेश आपलं आवरून घरा बाहेर येतो. दोघे गाडीवर बसतात. व तालुक्याच्या दिशेने गाडी चालवतात.
थोडे अंतर गेल्यावर पुढील गावाबाहेर वाटेवर एक माणूस उभा असतो. त्याच्या हातात खुरपे असते. खांद्याला रुमाल गुंडाळलेला या दोघांना गाडीवरून येताना पाहून हात करुन लिफ्ट मागतो.
सचिन, “घेऊया का त्या माणसाला शेताला चाललाय वाटत.”
रम्या, “ नको, नको, त्याच्या हातात खुरप आहे,त्याचा चेहरा बघ राकट दिसतो. पुढं वाटला नेऊन खूरप मानवर ठेऊन लुटायचा, चल जाऊदे.आजकाल लुटणारे लई झालेत जाऊदे चालत पायजेतर.”
“ बर,बर.”
असे म्हणत सचिन गाडी पुढे दामटतो.
पुढे थोडे अंतर गेल्यावर वाटेत एक म्हातारी लिफ्ट मागत उभा असते
सचिन, “अर्, पुढे म्हातारी आहे बघ, लिफ्ट मागतेय, देऊया का?”
रम्या, “ नको, नको, म्हाताऱ्या बाया गाडीवर नीट बसत नाहीत. या कच्या रस्त्यावर हादरे जास्त, कुठतरी घसरायची व दवाखान्यात पळवायची पाळी यायची. नको बा चल.”
थोड अंतर गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक बेवड दारू पिऊन उभा असतं. तो लिफ्ट मागत असतो. तो प्यालेला असल्यानं सारखा डुलत डुलत असतो त्यांची गाडी पाहून, “ लिफ्ट ए लिफ्ट.”
“आर, रम्या तेला लिफ्ट देऊया का?”
“हे बघ तेलाच घेऊन जा तालुक्याला वासान कसा परमाळतोय बघ , आंघोळच केलाय बघ दारुन, त्यालानी कुठं धरून बसू , गाडीवर बसल्यावर लाड लाड हालयचा व हंडेल लडबडायच व गाडीवरील ताबा सुटून कुपात जायचो, चल गप.”
ते पुढे जातात. पुढे एक बाई तरुण असते ती लिफ्ट मागत असते. तेव्हां
सचिन, “ या बाईला लिफ्ट देऊया का? बिचारी उनात उभा हाय.”
रम्या, “ ए बाबा गप चल, या आड रानात ही काय करते. वाटेच वडाचं झाड सोडून उनात काय करत आहे ही, मिरवते कशी बघ. एखाद्या नवरीपेक्षा जास्त नटलीय बघ. तुलाच न्यायची वडून आडरानात त्यापेक्षा मी माघारी जातो. तू तिलाच घे, व तालुक्याला जा, म्हणजे गावभर बदनामी पसरेल.”
सचिन पुढे गाडी मारतो. थोडं अंतर गेल्यावर वाटेत. एक समाजसेवक दिसतो. तो येणाऱ्या गाड्यांना हात करत असतो. सचिन रम्याला म्हणतो. “हे बघ याला घेऊया का गाडीवर हा काही म्हातारा नाही की , बेवडा नाही.”
रम्या, हे बघ तालुक्याचं ठिकाण फक्त दोन किलोमीटर आहे.याला घेतल्यावर तिब्बल सीट होईल पुढे पोलिस अडवतील. मग फाड पावती त्यापेक्षा चल गप्प…” थोडं अंतर गेल्यावर एक गाडी सुसाट वेगाने त्यांना घासून जाते व पुढे झाडावर आदळते. तेथे पोचल्यावर.
रम्या, “आर थांब अपघात झालाय नव्ह...”
सचिन, “ गप जाऊया उगीच ती भानगड कुणी निस्तरायची.”
रम्या, “ए थांब एखादा जीव वाचलं.”
रम्या रुग्णवाहिकेला फोन लावतो. व स्थळ व घटना सांगतो. तसेच पोलिसांना कॉल करतो, व सर्व हकीकत सांगतो. पाच मिनिटात रुग्णवाहिका हजर होते. तोपर्यंत अनेक लोक जमतात. व जखमींवर प्राथमिक उपचार करतात.रुग्णवाहिका आल्यावर जखमींना रुग्णालयात हलविण्यात येते. पोलिसांना प्राथमिक माहिती देऊन ते निघतात.
गाडी चालवताना..
सचिन, “ लिफ्ट द्यायला नकार व अपघातावेळी तयार, तुझ काय अंतरंग कळतच नाही बघ लेका.”
रम्या, “ तस नाही र.., जिथं आवश्यक गरज तिथेच मदत करायची, तो शेतकरी खुरपे घेऊन उभा होता. अर्धा किलोमीटर तेला चालायला नको. त्याच पोट वाढलेल सांगत होते की तो या गाडीवर मावेल की नाही. ती म्हातारी गाडीवर नीट बसताही येत नाही. पडली तर हाड एखाद मोडायच तीच. दवाखान्याचा खर्च व पब्लिकचा मार वेगळाच. आणी ती बाई फसवी वाटली मला, कुणाला तरी गंडा लावून आली होती. व दुसर पाखरू बघत होती. व तो समाजसेवक स्वतः चारचाकीतून फिरताना कुणाला लिफ्ट देत नाही.त्याला कोण देणार. ते बेवड आज हाय नी उद्या नाही. कोण सावरत बसणार तेला. जेव्हा टमका टाकलेला उतरलं व पोटात कावळे ओरडाय लागले की जाईल घरला पळत. हे बघ आजकाल अपघात झाला चूक कोणाची बघत नाहीत पयला ड्राइव्हरला हाणतात.व वााटेतल्या लुटणाऱ्या टोळ्या वेगळ्याच."
ते दोघं आपल्या कामाला तालुक्याला निघून जातात.
निशिकांत हारुगले