शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Saturday, February 26, 2022

लिफ्ट

 लिफ्ट

लिफ्ट
लिफ्ट


पाटगावकडून तालुक्याला जाणारा रस्ता गावातील एका घरातील मुलगा, अंघोळ करून नीटनेटके कपडे घालून डोळ्यावर गॉगल घातलेला केसांवर कंगवा फिरवून कोमडा स्टाईलने भांग पाडून आपल्या मित्राला फोन करतो व सांगतो की आवरून तयार हो

“अरे रम्या जाऊया का तालुक्याला?”

“जाऊया की सच्या मला पण काम नाही शेतातल, आवरतो दोन मिनिटात.”

थोड्याच वेळात बेलबॉटम पँट घातलेला सचिन दारात टू व्हीलर हिरो गाडी घेऊन हजर होतो.

“आवरल का रे.”

घरातील आरशात केस विचरत, “आवरल की थांब आलोच.”

रमेश आपलं आवरून घरा बाहेर येतो. दोघे गाडीवर बसतात. व तालुक्याच्या दिशेने गाडी चालवतात.

थोडे अंतर गेल्यावर पुढील गावाबाहेर वाटेवर एक माणूस उभा असतो. त्याच्या हातात खुरपे असते. खांद्याला रुमाल गुंडाळलेला या दोघांना गाडीवरून येताना पाहून हात करुन लिफ्ट मागतो.

सचिन, “घेऊया का त्या माणसाला शेताला चाललाय वाटत.”

रम्या, “ नको, नको, त्याच्या हातात खुरप आहे,त्याचा चेहरा बघ राकट दिसतो. पुढं वाटला नेऊन खूरप मानवर ठेऊन लुटायचा, चल जाऊदे.आजकाल लुटणारे लई झालेत जाऊदे चालत पायजेतर.”

“ बर,बर.”

असे म्हणत सचिन गाडी पुढे दामटतो.

पुढे थोडे अंतर गेल्यावर वाटेत एक म्हातारी लिफ्ट मागत उभा असते

सचिन, “अर्, पुढे म्हातारी आहे बघ, लिफ्ट मागतेय, देऊया का?”

रम्या, “ नको, नको, म्हाताऱ्या बाया गाडीवर नीट बसत नाहीत. या कच्या रस्त्यावर हादरे जास्त, कुठतरी घसरायची व दवाखान्यात पळवायची पाळी यायची. नको बा चल.”

थोड अंतर गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक बेवड दारू पिऊन उभा असतं. तो लिफ्ट मागत असतो. तो प्यालेला असल्यानं सारखा डुलत डुलत असतो त्यांची गाडी पाहून, “ लिफ्ट ए लिफ्ट.”

“आर, रम्या तेला लिफ्ट देऊया का?”

“हे बघ तेलाच घेऊन जा तालुक्याला वासान कसा परमाळतोय बघ , आंघोळच केलाय बघ दारुन, त्यालानी कुठं धरून बसू , गाडीवर बसल्यावर लाड लाड हालयचा व हंडेल लडबडायच व गाडीवरील ताबा सुटून कुपात जायचो, चल गप.”

ते पुढे जातात. पुढे एक बाई तरुण असते ती लिफ्ट मागत असते. तेव्हां

सचिन, “ या बाईला लिफ्ट देऊया का? बिचारी उनात उभा हाय.”

रम्या, “ ए बाबा गप चल, या आड रानात ही काय करते. वाटेच वडाचं झाड सोडून उनात काय करत आहे ही, मिरवते कशी बघ. एखाद्या नवरीपेक्षा जास्त नटलीय बघ. तुलाच न्यायची वडून आडरानात त्यापेक्षा मी माघारी जातो. तू तिलाच घे, व तालुक्याला जा, म्हणजे गावभर बदनामी पसरेल.”

सचिन पुढे गाडी मारतो. थोडं अंतर गेल्यावर वाटेत. एक समाजसेवक दिसतो. तो येणाऱ्या गाड्यांना हात करत असतो. सचिन रम्याला म्हणतो. “हे बघ याला घेऊया का गाडीवर हा काही म्हातारा नाही की , बेवडा नाही.”

रम्या, हे बघ तालुक्याचं ठिकाण फक्त दोन किलोमीटर आहे.याला घेतल्यावर तिब्बल सीट होईल पुढे पोलिस अडवतील. मग फाड पावती त्यापेक्षा चल गप्प…” थोडं अंतर गेल्यावर एक गाडी सुसाट वेगाने त्यांना घासून जाते व पुढे झाडावर आदळते. तेथे पोचल्यावर.

रम्या, “आर थांब अपघात झालाय नव्ह...”

सचिन, “ गप जाऊया उगीच ती भानगड कुणी निस्तरायची.”

रम्या, “ए थांब एखादा जीव वाचलं.”

रम्या रुग्णवाहिकेला फोन लावतो. व स्थळ व घटना सांगतो. तसेच पोलिसांना कॉल करतो, व सर्व हकीकत सांगतो. पाच मिनिटात रुग्णवाहिका हजर होते. तोपर्यंत अनेक लोक जमतात. व जखमींवर प्राथमिक उपचार करतात.रुग्णवाहिका आल्यावर जखमींना रुग्णालयात हलविण्यात येते. पोलिसांना प्राथमिक माहिती देऊन ते निघतात.

गाडी चालवताना..

सचिन, “ लिफ्ट द्यायला नकार व अपघातावेळी तयार, तुझ काय अंतरंग कळतच नाही बघ लेका.”

रम्या, “ तस नाही र.., जिथं आवश्यक गरज तिथेच मदत करायची, तो शेतकरी खुरपे घेऊन उभा होता. अर्धा किलोमीटर तेला चालायला नको. त्याच पोट वाढलेल सांगत होते की तो या गाडीवर मावेल की नाही. ती म्हातारी गाडीवर नीट बसताही येत नाही. पडली तर हाड एखाद मोडायच तीच. दवाखान्याचा खर्च व पब्लिकचा मार वेगळाच. आणी ती बाई फसवी वाटली मला, कुणाला तरी गंडा लावून आली होती. व दुसर पाखरू बघत होती. व तो समाजसेवक स्वतः चारचाकीतून फिरताना कुणाला लिफ्ट देत नाही.त्याला कोण देणार. ते बेवड आज हाय नी उद्या नाही. कोण सावरत बसणार तेला. जेव्हा टमका टाकलेला उतरलं व पोटात कावळे ओरडाय लागले की जाईल घरला पळत. हे बघ आजकाल अपघात झाला चूक कोणाची बघत नाहीत पयला ड्राइव्हरला हाणतात.व वााटेतल्या  लुटणाऱ्या    टोळ्या  वेगळ्याच."  

ते दोघं आपल्या कामाला तालुक्याला निघून जातात.

निशिकांत हारुगले

Thursday, February 24, 2022

शेन्ट

 शेंट

जिल्हा परिषदेच्या शाळेतील वातावरण सकाळचे अकरा वाजले. शाळा सुरू झाली मुले वेगवेगळ्या घरातील व आर्थिक स्तरातील हजर झाली आहेत. इयत्ता चौथीच्या वर्गातील मुले वर्गात एका बेंचभोवती उभा आहेत. त्यांचे शाळेचे ड्रेस सुंदर व नीटनेटके आहेत पांढरा शर्ट व काळी पँट. काहींनी सुगंधी अत्तर लावलेले आहे. इतक्यात एक मुलगा वर्गात प्रवेश करतो.त्याच्या हातात साधी पिशवी आहे त्या्च्या अंगावरील ड्रेस मळलेला आहे. खेडवळ आहे. तो वर्गात आल्यावर गोंधळतो . त्याचे वर्गबंधू  अंगाचा वास एकमेकाला देत व आपला ड्रेस दाखवत असतात. त्या मुलाने त्यांकडे पाहिले व आपला पेहराव पाहिला व आपल्या हाताचा वर उचलून वास घेतला. घामाचा वास येत होता. शेजारी मुलांजवळ बसण्याचे सोडून तो एका बाजूस असलेल्या बाकावर बसतो. शिक्षक आलेले नसतात.मुलांमध्ये चर्चा चालू असते..

त्यातील एक,” अरे, सोहम चार दिवसांनी १५ ऑगस्ट आहे..”

सोहम, “मी नवीन शर्ट घालणार.”

समीर, “ मी कडक ईत्री ड्रेसला करणार, व मामाच्या लग्नातील अत्तर लावणार.”

थोड्या वेळाने त्यांचे लक्ष शेजारील त्या मळके कपडे घातलेल्या श्यामकडे जाते ते त्याकडे पाहतात व हसतात व त्याकडे पहात,

सोहम, “अरे हा कोणते अत्तर लावेल.”

वेदांत, “त्याच्या अंगाला रोजच अत्तर असते.”

सोहम, “त्याचा घाम.”

समीर, “कपडे तरी बघ त्याचे किती मळलेत किती साबण लावला तरी स्वच्छ निघणार नाहीत.”

श्याम सर्व काही ऐकत असतो. मनात ‘ यांना काय माहीत माझी परिस्थिती, माझ्या घरची हालत रोज मजुरी केल्यावर घरातील चूल पेटते. ते काही नाही आज पासून आपण काहीतरी काम करायचं व आपला शाळेचा ड्रेस व इतर खर्च भागवायचा. एवढे ठरवून तो मनात ठेवतो. सर्व तास संपतात. शाळा सुटते. तो शाळेच्या फाटकातून बाहेर पडतो व धावत जातो. जाताना एका कारखान्याचे गोडाऊन जवळून जाताना तेथे

“काही काम आहे का?”

एक छोटा मुलगा काम मागत्याले पाहून मॅनेजर “काय पाहिजे तुला.”

“काहीतरी काम हवंय.”त्याला जवळ बोलवत “बाळ आम्ही लहान मुलांना कामावर ठेवत नाही. लहान मुलांना कामावर ठेवणे गुन्हा आहे.”

“पण मला पैसे पाहिजेत गरज आहे."

“किती पाहिजेत.”

“पन्नास रुपये.”

“कशाला?”

“साबण घ्यायला,”

“हे घे मी देतो.”

“नको, मला फुकटच काही, काहीतरी काम द्या त्यापेक्षा.”

त्या गोंडस मुलाचे बोलणे एकूण मॅनेजर अवाक झाला. व थोडा विचार करून त्याला म्हणाला, “ हे बघ तू इथे रोज संध्याकाळी येऊन या गोडाऊन मधील ही पडलेली रिकामी पोती गोळाकरून झाडायची व पलीकडील रूममध्ये ठेवायची. श्यामला खुप आनंद झाला. त्याने रोज यायचे ठरवले, व तो उड्या मारत घरी गेला. दुसऱ्या दिवसापासून तो शाळा सुटल्यावर त्या गोडावून मध्ये काम करू लागला दोन दिवसांनी त्याने कामावर गेल्यावर गोडावून मॅनेजरकडून दोन दिवसाचे कामाचे पैसे मागितले.

श्याम, “साहेब, मला दोन दिवसाचे कामाचे पैसे मिळतील का?”

मॅनेजर, “का रे लगेच.”

श्याम, “परवा १५, ऑगस्ट आहे ना. त्यासाठी.”

मॅनेजर, “ बर.”

मॅनेजर काऊंटर मधून ६०रुपये काढतो व त्याला देतो. श्याम ते आनंदाने घेतो, व घराच्या वाटेला लागतो. वाटेतील दुकानातून एक वासाचा मैसूर श्यांडेल सोप घेतो. व दुसरा ओके साबण  व  टाईड पावडर दहावाली त्याकडे आता दहा रुपये राहिले. त्याला काहीतरी खाऊ घ्यायचा असतो; पण तो आपल्या भावनांना आवर घालून फुलवाल्याच्या दुकानाजवळ येतो दुकानात फुलवाला हार गुंफत असतो त्याकडून काही निशिगंधाची फुले घेतो व घरी येतो. घरी आल्यावर तो आपले कपडे काढून स्वच्छ साबण लावून धुतो. व सुकल्यावर तांब्यात चुलीतील विस्तव टाकून इस्त्री करतो. व माळ्याकडील आणलेली फुले कपड्यात अलगत ठेवतो. सकाळी त्याला सुंदर वास सुटतो. सकाळी ती फुले काढून टाकतो. व दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्टला तो ड्रेस घालून शाळेत जातो. शाळेला जाताना एक समाजसेवक वाटेत त्याच्या खिशाला एक बिल्हा लावतो. श्याम हास्य मुद्रेने शाळेच्या फाटकातून प्रवेश करतो. सर्व मुले त्याच्याकडे पहात असतात.त्याच्या ड्रेसला निशिगंधाच्या फुलांचा वास येत असतो. तो खूप आनंदी असतो. कारण सर्व मुले त्यांच्या वडिलांवर अवलंबून आहेत. तो मात्र स्वतच्या पायावर उभा आहे. स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा सुगंध सर्वत्र सुटला आहे.

nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com

निशिकांत हारुगले

Monday, February 21, 2022

मोफत राशन

 मोफत राशन

मोफत राशन
मोफत राशन


ग्रामीण भागातील एका गावातील गल्लीतून एक जीप गाडी स्पीकरद्वारे पुकारत जाते. कोरोनामुळे बाहेर जाणेस मज्जाव. व सरकार सर्वांना मोफत धान्य वाटणार आहे.दुसऱ्याच दिवशी राशन दुकानात गर्दी होते.सर्व स्वस्त धान्य मिळणारे कार्ड धारक जमतात. सर्व आनंदी आहेत.मोफत धान्याची पोती घरी घेऊन जात आहेत.

श्रीपती मोफत धान्य घेऊन घरी येताना राजारामभाऊ वाटेत भेटतो.

“ काय श्रीपतराव मोदी न पाठवलेलं धान्य वाटत.”

“व्हय कोरोनाची कृपा, तुम्ही नाही आणलं.”

“आमच्या आज्याला पेन्शन मिळते, आम्हाला कसं मिळणार.”

“पण मोफत धान्य तर सर्वांना मिळत.”

“मी गेलो होतो विचारायला पण “आमच्या केसरी कार्डाला लाल दिवा दाखवला त्या दुकानदाराने.”

“बरं येतो आता रामराम.”केसरी कार्डाला

“रामराम.”

तो घरी येतो घरात धान्याची पोती ठेवतो.त्याची बायको खूप खुश असते.

काही दिवस जातात.काही कामधंदा नसल्याने घर खर्च चालवणे कठीण जाते. जनावरांचे दुधाचे पैसेच फक्त घरखर्च चालवत असतात.मोफत मिळणाऱ्या धान्यामुळे त्याचे शेताकडे लक्ष नसते .बिन कष्टाच्या धान्यामुळे शेताकडे तो लक्ष देत नाही.त्यामुळे शेतात तण वाढू लागते.त्याचाच कित्ता अनेकजण शेतकरी गिरवतात.

त्याची बायको शेत करायचा विषय काढते तेव्हा तो आळसाने तिला म्हणतो,

“फुकटच धान्य मिळतंय. शेत कशाला करायचे.”

“आव, पण शेत कराय नको का?लोक नाव ठेवतील.”

“ठेवुदेत त्यांना बघवत नाही. आम्हाला धान्य मिळतंय ते.आवंदा मी शेत करणार नाई.”

“कळंल, सरकार काय आयुष्यभर पोसणार नाही.”

“जा लई शहाणी हाईस.”

त्याचे मित्र पण समजावतात पण तो लक्ष देत नाही. त्यांना नको ते बोलतो. 

शंकर,"अरे ,श्रीपती वावर कस पुढे फायदा होईल."

श्रीपती,"जा तू मी अवंदा काय करणार नाय. पडून राहू दे."

तो कोणाचंही एकत नाही.

थोड्या दिवसांनी लॉकडाऊन उठते. व मोफत चे धान्य बंद होते. व मोजकेच धान्य मिळू लागते. तेव्हा श्रीपती शेतातील तण काढू लागतो. तेंव्हा इतर मित्र त्याला बघून हसत असतात. तेव्हा त्यांकडे पहात,

शंकर,"अर , सदा आता सरकार देत की नाई र गहू, तांदूळ."

सदा,"आर देणार की एखादा रोग आल्यावर."

शंकर,"पण मी म्हणतो शेत करण्यापेक्षा वाट बागितली तर..."

सदा, "बघायची बायका पोरासणी सांगायचं कशाला राबाय पायजे , एखादा रोग आला की कस फुकट सरकार पोसत बघ."

त्यांचे टोमणे एकूण श्रीपती लाजतो.

“खरं आहे बाबांनो तुमचं फुकटच गावल व बापलेक धावल, थोडेच दिवस ते , आपलं कष्टाचंच बर त्याची गोडी न्यारीच.”

तो कष्ट करू लागतो. थोड्याच दिवसात तणकट वाढलेल्या शेतात चैतन्य येते व हिरव्या ताटातून कणसे उभी रहातात. व घर धान्यानेभरून जात.

  निशिकांत हारुगले

Sunday, February 20, 2022

केरोसीन

    केरोसीन

केरोसीन
केरोसीन


ग्रामीण भागातील एक घर एक स्त्री स्वयंपाक करत आहे. जवळ लहान मूल खेळत आहे. थोड्या वेळाने तिचा नवरा तिथे येतो. ती चहा बनवून देते.

“अहो ऐकल का घरातील रॉकेल संपलय.”

“अग, कधी तरी घरात आल्यावर चांगली बातमी देत जा. रोज काही ना काही संपलेल असत.”

“आम्ही काय पित नाही, जावा, आज सुटी आहे. घरीआहात. मागील महिन्यात काहीच आणल नाही.”

तो तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. चहा घेतल्यावर केरोसीनचा रिकामा केन व स्वस्त धान्य दुकानाचे कार्ड घेतो व दुकानाच्या दिशेने जातो. दुकानाच्या बाहेर पाटी असते.

रॉकेल संपले आहे.

तो माघारी येतो येताना वाटेत सिलेंडरची गाडी जाताना दिसते. त्यावर लिहिले होते .

उज्वला गॅस योजना धूरमुक्त भारत .’

तो घरी येतो त्याच्या हातातील रिकामा क्यान पाहून त्याची बायको चिडते .

“आलात रिकामे.”

"मग काय करू रॉकेल संपले आहे ना."

" अहो, ते तसच म्हणतात, पवाराची सूमी आली नव्ह काल घेऊन."

" बरं उद्या बगु."

जेवण करून ती दोघे रात्री झोपी जातात.

त्याची बायको त्याला सकाळी उठवते. व बंब

तापवणेस सांगते. तेव्हा तो उठून जातो. काडेपेटी घेतो व चिमणी हातात घेऊन हलवतो.

“अरे, यात तर रॉकेल नाही.”

तरी देखील तो बंब पेटविण्याचा प्रयत्न करतो.

शेण गोळे टाकून लाकडे टाकतो;पण रॉकेल नसलेने बंब पेटत नाही वैतागतो व आजूबाजूचा पाला पाचोळा गोळा करून कसा बसा बंब पेटवतो.

थोड्या वेळाने राशन दुकानात जातो.

“साहेब रॉकेल मिळेल का?”

“बाहेर पाटी वाचली का नाही. की अडाणी आहात.”

“पण साहेब आम्ही या महिन्याच रॉकेल नेल नाही.”

“आहो, रॉकेल सरकारंन बंद केलंय.”

“पण असं का?”

“उज्वला योजने अंतर्गत आपण सिलेंडर घेतलय ना.”

“आहों. भारनियमामुळे कंदीलात घालण्यापूरत तरी द्या.”

“ते काही नाही उजेडासाठी दुकानात मेणबत्त्या मिळतात ना.”

“आहों ,पण रात्री रानात पाणी पाजय गेल्यावर कंदील उपयोगी पडतो. मेणबत्ती नाही.”

“मग चार्जिंग ब्याट्री घ्या.”

“चूल व बंब पेटवण्या पुरत तरी द्या.”

“ते काही नाही तुम्ही जा बरे.”

तो निराश होऊन घरी येतो तेव्हा त्याची बायको विचारते.

“रॉकेल मिळाले का?”

“नाही.”

“मग आता?”

“बघायचा दुसरा पर्याय.”

“आव, आता उन्हाळ्यात बर पालापाचोळा चूल व बंब पेटवण्यासाठी वापरू, पावसाळ्यात काय करायचं बोला..”

“पावसाळ्यात बघू काहीतरी.”

दुसऱ्या दिवशी तो बंब पेटवण्यासाठी उठतो. काही कागद कपटे फाडून बंबात टाकतो व त्यावर शेण गोळे टाकून लाकडे घालतो व जाळ लावतो व पाणी तापवतो. व हसत

“अडचणी येतात तर मार्ग मिळतो.”

        निशिकांत हारुगले

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...